राजीव साने यांचे व्याख्यान - शोषण आणि वर्गीय-प्रवृत्ती : एका नव्या प्रारूपाची गरज

राजीव साने यांचे पुणे येथे शनिवारी १२ मे २०१२ रोजी पुढील विषयावर व्याख्यान आहे : शोषण आणि वर्गीय-प्रवृत्ती : एका नव्या प्रारूपाची गरज

‘अभिजात भांडवलशाही’चे व कम्युनिस्ट वर्तुळात रुजलेले प्रारूप (मॉडेल) आजच्या औद्योगिक समाजरचनेत झालेल्या नूतनीकरणांमुळे कालबाह्य तर झालेले आहेच पण त्यात तत्त्वतः देखील गंभीर चुका होत्या हेही आता बऱ्याचजणांच्या ध्यानात आले आहे. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की शोषण (व त्याच्याशी संबंधित दमनादि प्रक्रिया) आणि वर्गचरित्रे(म्हणजे वर्गीय स्थानांशी सुसंगत अशा राजकीय प्रवृत्ती) हा विषयच संपुष्टात आला आहे. शोषण चालूच आहे. वर्गीय स्थाने आणि तदनुषंगिक राजकीय प्रवृत्तीदेखील नक्कीच अस्तित्वात आहेत. त्यांचा मुकाबला करणे आणि त्यांच्या पार जाणे ही कार्ये आजही तितकीच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र ही कार्ये पुढे नेण्यासाठीच अभिजात प्रारूपाला हट्टाने चिकटून न राहणे आणि त्याच्या जागी एक अधिक मर्मग्राही आणि वास्तवलक्ष्यी प्रारूप विकसित करणे आवश्यक आहे.

वेळ: सायंकाळी ६ वाजता

स्थळ : डेव्हिड ससून अनाथ पंगु गृह 'निवारा' (एस. एम. जोशी सभागृहासमोर), पुणे.
पार्किंग व्यवस्था संस्थेच्या आवारात आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या व्याख्यानास कोणी गेलं होतं का? गेले असल्यास व्याख्यानाचा गोषवारा मिळू शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.