२० मे २०१२ चे कंकणाकृती सूर्यग्रहण

येत्या रविवारी, २० मे २०१२ रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण चीन, तैवान, जपान आणि युनायटेड स्टेट्सच्या काही भागांमधून दिसेल. मुख्यतः चीनची दक्षिण किनारपट्टी, उत्तर तैवान, दक्षिण जपान आणि दक्षिण यू.एस.मधून दिसेल. ग्रहण कुठून आणि किती वेळ दिसेल यासाठी गूगल आणि नासाने उपलब्ध करून दिलेला हा नकाशा पहावा. कंकणाकृती ग्रहणाचा पट्टा किंवा चंद्राची antiumbra बरीचशी प्रशांत महासागरातूनच प्रवास करणार आहे. ग्रहण दिसण्याचा सर्वोच्च कालावधी असणारी जागाही प्रशांत महासागरातच आहे. या नकाशातूनच ठराविक ठिकाणाच्या ग्रहणाच्या वेळा समजतील.

यू.एस.च्या बहुतांश भागात सूर्याचा ग्रस्तास्त (ग्रहण लागलेले असतानाच सूर्यास्त) दिसेल. अमेरिकेतच्या ग्रहणपट्ट्यातल्या ठळक लँडमार्क्सपैकी ग्रँड कॅन्यनच्या भागातूनही सूर्याचे कंकणाकृती अवस्था दिसेल. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही.

सूर्याकडे संपूर्ण कंकणाकृती अवस्थेतही बघताना कृपया योग्य फिल्टरचा वापर करावा. फोटो काढताना अधिक काळजी घ्यावी. कॅमेर्‍यात भिंगं असतात, त्यामुळे आपले डोळे जाणे आणि/किंवा कॅमेर्‍याच्या आत जळण्याचे प्रकार घडू शकतात. पिनहोल कॅमेरा वापरूनही ग्रहण पहाता येईल.

पुढच्याच महिन्यात ६ जूनला शुक्राचे अधिक्रमण दिसणार आहे. ते पहाताना आणि/किंवा कॅमेर्‍यात बंदिस्त करतानाही अशीच काळजी घ्यावी.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ग्रहण्/सूर्य पहाण्यासाठी मायलर (mylar) फिल्म वापरता येईल. मायलर फिल्म वापरून सूर्याकडे पहाता येईल आणि फोटोही काढता येतील. जमल्यास उद्याच्या दिवसात अधिक माहिती देते.
अमेरिकेत असाल तर पुढची माहिती उपयोगी वाटावी. होम डेपोत मिळते असं वेबसाईट म्हणते आहे.

पुण्यात अरविंद गुप्तांच्या ऑफिसात, आयुकामधे संपर्क केल्यास बहुदा गॉगल आणि फिल्म मिळू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्रहण लवकर सुटायला मदत व्हावी यासाठी अापल्या विटलेल्या जीन्सपँटी व ढगळ झालेले टी-शर्ट इत्यादी जुने कपडे गुडविलसारख्या संस्थेला दान करा. ग्रहणाच्या वेळी हवा अशुद्ध होत असल्याने त्यावेळेत काही खाऊ नये. पण स्कॉच किंवा वाईन अनेक वर्षे तळघरातल्या पिंपांत ठेऊन अाधीच खराब केलेली असल्यामुळे तिच्यात अाणखी काही बिघडणार नाही, तेव्हा ती प्याल्यास चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

आम्ही म्याकडोनाल्ड आणि टॅकोबेलात मिळणारे अन्न खाऊन जगत असल्याने ग्रहणाच्या वेळेसचे अन्न खाऊन आम्हाला काही होईल असे वाटत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

साधारण सोळा वर्षांपूर्वी मी एक खग्रास ग्रहण पाहिलं आणि काही काळ खगोलशास्त्रालाच ग्रहण लागलं. मला चष्मा आला तो वेगळाच!

जुने टी-शर्ट ढगळ कसे होणार?
-- वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतातून हे ग्रहण दिसणार नाही.
पुण्यात अरविंद गुप्तांच्या ऑफिसात, आयुकामधे संपर्क केल्यास बहुदा गॉगल आणि फिल्म मिळू शकतील.

कन्फूजन......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पुण्यातून गॉगल आणि फिल्म्स घेऊन आमच्याकडे ग्रहण पहायला या असे निमंत्रण आहे ते दुर्बिटणेबैंचे. (त्यांच्या करता एक गॉगल घेऊन जा म्हणजे झालं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हरकत नाहीच.

आत्ता फिल्टर मिळवून ६ जूनच्या ट्रान्झिट्/अधिक्रमणाच्या वेळी वापरता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्यांना 'लेन्सा' Wink मिळतील त्या आम्रिकनांनी फटू टाकून खिजवल्यास आम्ही निषेध व्यक्त करणार नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग हा दोन वर्षांपूर्वीचा कन्याकुमारीमधून काढलेला फोटो (घरून) पहा (फेसबुकावर आहे)

हा फोटो योग्य वेळी, योग्य तेवढेच ढग आल्यामुळे फिल्टरशिवाय काढता आला. हेच ते कंकणाकृती ग्रहण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जुन्या फ्लॉपी डिस्कच्या आतील मॅग्नेटिक पापुद्रा वापरून सूर्याकडे पाहता येते. आधी दुहेरी पापुद्रा ठेवून पहावा. वाटले तर मग एकेरी करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

याची कृती उदाहरणासकट यूट्यूबवर सापडली.
http://www.youtube.com/watch?v=blKbwnKiZus

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रिस्की वाटते. फ्लॉपीच्या आतल्या पापुद्र्याचा रंग (युनिफॉर्मली) काळा असतो.

जुने एक्सरे सुद्धा चालतात पण त्यात काही भाग पांढरा असतो म्हणून रिस्की (मायलर फिल्मसुद्धा). (वरच्या कन्याकुमारीच्या फोटोतल्याप्रमाणे ढगांचा थर आहे असे गृहीत धरून सूर्याकडे थेट पाहण्याइतके रिस्की).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरचा फोटो काढला तेव्हा फिल्टर लावून डोळ्यांना काही दिसेना, म्हणून आपसूकच सगळ्यांच्याच डोळ्यांवरचे आणि कॅमेर्‍यांवरचे फिल्टर्स निघाले. फोटो काढला तेव्हा फिल्टरच काय साधा गॉगल घालूनही थोडं अधिकच फिल्टरींग होत होतं.

मायलर फिल्म साधारणतः फोटोग्राफीसाठी वापरतात. कन्याकुमारीच्या ग्रहणात, ढग नसताना कॅमेर्‍यासाठी मी मायलार फिल्मचे चार थर वापरले होते. त्यातून काढलेला हा एक फोटो.

या स्थितीतही भरपूर जास्त सूर्यप्रकाश होता आणि फिल्टरशिवाय सूर्याकडे सोडाच, त्या दिशेलाही बघणं शक्य नव्हतं.

वरच्या प्रतिसादातला जो ढगांचा फोटो आहे तसे ढग असताना मायलारचा एक थर वापरूनही सूर्य किंचितच, आहे-नाही इतपतच दिसत होता. विशेषतः फिल्टर काढून, ढगांचा वापर करून फोटो काढताना एल्सीडी स्क्रीनमधे बघूनच फोटो काढले. या ही वेळेला सरळ सूर्याकडे बघून फोटो काढण्याचा विचार नाही. साध्या आणि हलक्या बायनॉक्यूलर्स स्वस्तात मिळाल्यास प्रोजेक्शन वापरून खाली दिला आहे त्या पद्धतीचं काही दिसतं का हे पहाण्याचा विचार आहे.

मायलारचे चार थर वापरल्यामुळे एखाद्या ठिकाणी अ‍ॅल्युमिनीयम कमी पडलं असेल तरी फार त्रास होऊ नये. इंटरनेटवरून मागवलेले डोळ्यांना लावायचे चष्मे वेळेत आल्यास उत्तमच.

तसेही रविवारी फोटो काढणार आहे; ते पहायला डोळे उरले तर सांगायला येईनच मी. आणि हो, गेल्या पाच-सहा ग्रहणांची परंपरा पाळत याही वेळेस ग्रहणकाळात मी चिवडा खाणार आहे. कोणाला हवा असल्यास या Lubbock ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्रहणकाळात मी चिवडा खाणार आहे. कोणाला हवा असल्यास या

या निमंत्रणाचा विचार करताना आम्रिकन जन्ता "हा चिवडा कोण बनविणार आहे" यावर अवलंबून घेईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी कन्याकुमारीला २०१० साली फ्लॉपी डिस्कच्या आतील मॅग्नेटिक पापुद्रा वापरून हा फोटो काढला. मायलर ने स्वच्छ पांढरी प्रतिमा मिळते. फ्लॉपी डिस्क मुळे वेगळीच लाल रंगाची प्रतिमा मिळाली. पापुद्रयाचे किती थर वापरले ते आता आठवत नाही, बहुधा एकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता इथे फ्लॉप्या शोधणे आले! Wink

१९९५ आणि १९९९ साली भारतात दिसलेल्या खग्रास ग्रहणांच्या वेळी मी जो फिल्टर वापरला होता त्यात सूर्य असाच लालसर-पिवळट दिसायचा. अलिकडच्या काळात हे पांढरी प्रतिमा दाखवणारे फिल्टर्स मिळतात. एकेकाळी चार इंची न्यूटोनियन टेलिस्कोपमधून फिल्टर लावून सूर्य बघायचे, तो साधारण अशाच रंगाचा दिसत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमा गरीब भारतीयांना आवंदाचे हे गिरान न दाखवता शिरिमंत अम्रिकन लोकास्नी दाखवल्याबद्दल राहूकेतूंचा निशेढ,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्रविका देशात रहाणार्‍यांसाठी उपयुक्त माहिती.
हे ब्लँकेट म्हणजे पॉलिएस्टरच्या शीटवर अ‍ॅल्युमिनीयमचे कोटींग आहे. त्याचे दोन थर वापरून डोळ्यांनी सूर्याकडे पहाताना काही अडचण आली नाही. डोळ्यांसाठी आणि कॅमेर्‍यासाठीही त्याचे फिल्टर वापरेन म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांदिच्या वर्खात बर्फीच का असते नेहमी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सवत माझी लाडकी'मधे रमेश भाटकर मोहन जोशीला बर्फीची व्याख्या सांगतो. ती माहित आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्याख्या आणि बर्फी दोन्हीही माहितीये पण चांदीच्या वर्खाबद्दल कुर्यासीटी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितगार,

खरेच खूप महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही. विशेषतः तुम्ही दिलेल्या दुव्यावरुन (गूगल आणि नासाने दिलेला नकाशा) नेमके कळून येते की कोणत्या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

@बोका यांनी दिलेला फोटो खूपच सुंदर आहे

@आदितीने तिच्या होमपीचवरचा विषय असल्याने छायाचित्रांसकट खूप छान माहिती दिलेली आहे.

सूर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीवर कशा प्रकारे पसरत जाते याचे एक सुरेख छायाचित्र (बहुतेक नासानेच) प्रकाशित केलेले आहे. ते जिज्ञासूंना नेत्रसुख घेण्यास उपयोगी पडावे म्ह्णून देतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोत दाखवलेल्या सावलीच्या आत असणार्‍यांना खग्रास सूर्यग्रहण दिसायला हवे. तेव्हा अशी सावली कंकणाकृती ग्रहणात पडणार नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फोटोत दाखवलेल्या सावलीच्या आत असणार्‍यांना खग्रास सूर्यग्रहण दिसायला हवे. तेव्हा अशी सावली कंकणाकृती ग्रहणात पडणार नाही असे वाटते.

नितिनजी,

तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तर उत्तर आहे होय. कंकणाकृती सूर्यग्रहणात सावली पडतेच. फक्त या सावलीची घनता खग्रास सूर्यग्रहणाच्या मानाने कमी असते.

खग्रास सूर्यग्रहण होते त्यावेळी सावली अतिशय दाट पडते, परिणामी सूर्य भर दिवसा दिसेनासा होतो.
खंडग्रास सूर्यग्रहण होते त्यावेळी सावली अतिशय विरळ असते, परिणामी सूर्याचा केवढा भाग चंद्र ग्रासू शकतो यावर सावलीची घनता ठरते. चंद्र जेवढा सूर्याला झाकेल तेवढी सावली दाट होत जाते, पण तरीही सूर्यबिंब पूर्णपणे झाकोळले जात नसल्यामुळे खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी येणारी दाट सावली (पृथ्वीवरील अंधार ) अनुभवता येत नाही.
कंकणाकृती सूर्यग्रहण होते त्यावेळी सावली ही दाट असते पण तरीही चंद्र हा सूर्यबिंब पूर्णपणे ग्रासू शकत नसल्यामुळे सावलीचा दाटपणा कमी होतो. पण तरीसुद्धा कंकणाकृती सूर्यग्रहणाची सावली ही खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मानाने दाटच असते.

पुढील रेखाचित्रावरुन हे अधिक स्पष्ट होईल. यातील A,B,C हे ग्रहणाचे प्रकार पाहिलेत तर लक्षात येते की चंद्राच्या सावलीची घनता पृथ्वीवर कशा प्रमाणात पडते. विशेषतः रेखाचित्रातील C भाग पाहिला तर लक्षात येईन की पृथ्वीवर चंद्राची सावली ही कोणत्याही प्रकारच्या ग्रहणात पडतेच. प्रमाण फक्त वेगळे असते एवढेच.

रेखाचित्रः जालावरुन घेतले होते व त्यात आवश्यक ते बदल मी केले आहेत.
धन्यवाद,
-सागर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इकडे उद्या सकाळी सूर्य ग्रस्तोदित दिसणार आहे. त्यामुळे हापिसात जाऊन दान मागावे लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.