Skip to main content

शंकराचार्य उवाच

शंकराचार्य उवाच

अ) महिलांनी मोकळे केस सोडणे ही आपली संस्कृती नाही.

आ) महिलांनी मोकळे केस सोडणे संहारक देवताचे लक्षण आहे.

इ) स्वधर्माचे पालन करताना महिलांनी केस मोकळे न सोडता छान वेणी घालणे अपेक्षित आहे.

ई) आपला धर्म हा पतीव्रतेचा धर्म आहे.

उ) महिलांनी वेणी घालणे या मागे विज्ञान असून शास्त्र सुद्धा आहे.

ऊ) पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण स्वधर्म विसरत चाललो आहोत.

करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य नृसिंह सरस्वती यांची ही मुक्ताफळे आहेत. हे महाशय टीव्हीवरील कार्यक्रमात बोलतात तेव्हा थोडेतरी तारतम्य बाळगतात. येथे मात्र ते फारच सुटलेले दिसत आहेत.

त्यांच्या या महान वक्तव्याकडे महिलांनी गांभिर्याने पाहिले पाहिजे असे वाटते. अन्यथा आज ज्याला आवाहन म्हटले जात आहे तो उद्या आदेश होऊ शकतो.

हे महाशय वरीलप्रमाणे मुर्खासारखे बरळले, पण हे त्यांचे बरळणे ऐकायला त्यांच्यासमोर काय लाकडी ओंडके बसलेले होते? त्यांच्यातल्या एकाने तरी पतिव्रता, केस मोकळे सोडणे हे संहारक देवतांचे लक्षण, वेणीमागचे विज्ञान, केस सोडणे ही आपली संस्कृती नाही अशा बरळण्यावर आपला आक्षेप नोंदवला नाही?

तीन दिवसांच्या कुठल्यातरी विश्व स्वधर्म संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी हे महाशय बोलत होते. अशा संमेलनांमध्ये कोणकोण रिकामटेकदे जमतात व आपल्या वतीने धर्माचे असे विकृतीकरण करतात हे कळायला काही मार्ग नसतो.

आज केस मोकळे सोडण्याबद्दलचे बाष्फळ विधान झाले. महिलांनी हे विधान हसण्यावारी न नेता गंभीरपणे घेतले पाहिजे.

अशा विधानांवर महिला हक्क आयोग काही कारवाई का करत नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 31/12/2015 - 22:46

शंकराचार्य हा इसम माझ्या धर्माचा प्रवक्ता वगैरे कोणीही नाही. बालिश बहु संमेलनात बडबडला. कशाला लक्ष द्यायचं असल्या वेडाचाराकडे? लक्ष दिलं की वेडाचार आणखी माजतो.

माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांपैकी आईच्या पिढीच्या स्त्रिया वेणी घालतात. त्यांना ते सोयीचं आणि सौंदर्याचं लक्षण वाटतं म्हणून. सध्या ४५ किंवा लहान असलेल्या कोणीही वेण्या घालत नाहीत. अगदी आजोळच्या गावातल्या मुली-स्त्रियाही वेण्या घालत नाहीत. (मुंबई-पुण्यासारख्या शहरांपासून फार लांब असणाऱ्या ठिकाणांबद्दल मला नक्की माहिती नाही.) थोडक्यात हा सगळा पाणी मुठीत पकडण्याचा क्षीण प्रयत्न सुरू आहे. त्याची फारतर टिंगल करावी आणि पाच मिनीटांत आपल्या उद्योगाला निघून जावं. निषेध करून या वेडाचाराचं महत्त्व वाढवू नये.

गब्बर सिंग Fri, 01/01/2016 - 00:22

ऊ) पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण स्वधर्म विसरत चाललो आहोत.

ऑ !!!

अनुकरण ?

अंधानुकरण हा शब्द नाही वाटतं वापरला. शंकराचार्य सुधारले की बिघडले ?

अंधानुकरण - ते फक्त पाश्चात्य संस्कृतीचेच असते वाट्टं ? भारतीय संस्कृतीचे अंधानुकरण होतच नाही की काय ?

ऋषिकेश Fri, 01/01/2016 - 10:33

मुळात केस मोकळे ठेवणे वा बांधणे हे केवळ प्रतिकात्मक नाही असे वाटते.
या वैट्ट वैट्ट सामाजिक जोखडातून बाहेर पडणार्‍या, पडलेल्या मुली, सर्वात आधीकाय करत असतील तर केस मोकळे सोडतात असा प्रवाद आहे! :प
त्यामुळे मुक्तकेशा हा नारीमुक्तीचा सिंबॉलच बनला आहे! ;)

पिवळा डांबिस Fri, 01/01/2016 - 13:10

शंकराचार्य हे अविवाहित असतात ना?
मग त्यांना शिंचं काय करायचंय की स्त्रिया केस मोकळे सोडतात की न सोडतात ते?
बायकांकडे कशाला ह्याचं लक्ष?
स्त्रियांच्या केसांचं काय ते त्या स्त्रिया आणि आम्ही अशंकराचार्य बघून घेऊ!!!

"जेंव्हा तुझ्या बटांना,
उधळी मुजोर वारा!
माझा न राहतो मी,
हरवून हा किनारा!!"
:)

'न'वी बाजू Sat, 02/01/2016 - 13:56

In reply to by पिवळा डांबिस

जेंव्हा तुझ्या बटांना

अश्लील!!! (किंवा, गेला बाजार, चावट!)

(आणि, त्या 'उधळी मुजोर वारा'चा या संदर्भात नेमका काय अर्थ लावायचा म्हणे?)

तिरशिंगराव Fri, 01/01/2016 - 13:23

अविवाहित असल्यामुळे त्यांना काही गोष्टींचे ज्ञान नाही. केसांची वेणी वगैरे घातली तर केसाने गळा कसा कापता येईल ? आमच्या शेजारून जरी कोणी इस्त्री केल्यासारख्या मोकळ्या केसांची स्त्री गेली तरी, आम्ही आमचा मफलर सांभाळतो.

पिवळा डांबिस Fri, 01/01/2016 - 13:42

In reply to by तिरशिंगराव

बदमाष असतात हो त्या!
वेणी घातली तरी गळा कापतात,
आणि केस मोकळे सोडले तर काय,
माशाल्ला,
हृदयाचे तुकडे तुकडे करतात!!!
-सर्टिफाईड अशंकराचार्य

गब्बर सिंग Sun, 03/01/2016 - 01:09

नींद उसकी है, दिमाग उसका है, रातें उसकी हैं
तेरी जुल्फें जिसके बाजू पर परीशां हो गईं ____ गालिब

--------------------

बाय द वे ... भगवान शंकरांची अनेक चित्रं ही किमान ४०% केस मोकळे सोडलेली अशीच आहेत की. म्हंजे ६०% बांधलेले व ४०% खुले. वाटल्यास images.google.com वर चेक करू शकता.

.शुचि. Mon, 04/01/2016 - 19:32

In reply to by गब्बर सिंग

बाय द वे ... भगवान शंकरांची अनेक चित्रं ही किमान ४०% केस मोकळे सोडलेली अशीच आहेत की

अहो म्हणून तर शंकराचार्य म्हणताहेत ना की केस मोकळे सोडणे हे "संहारक" देवतेचे लक्षण आहे ;)
____
हा अजुन एक शेर-

शब-ए-फ़ुर्क़त में क्या क्या साँप लहराते हैं सीने पर
तुम्हारी काकुल-ए-पेचाँ को जब हम याद करते हैं.