तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.
मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.
दत्तकथा ही त्यांची ताजी पोस्ट. दत्तजन्माशी संबंधित. अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो. म्हटले तर ही कथा नैतिकतेच्या दृष्टीने भयानक आहे. अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही. आपल्याकडचे दत्ताचे व दत्तसंप्रदायाचे महात्म्य पाहता अनेकांना ही पोस्ट वाचून (विशेषत: भाषा) धक्का बसलेला असणारच. अगदी भूकंप झाल्यासारखे वाटले असणार. पण मुळात ती कथाच हिणकस आहे. अशा कथांवरून आपल्या श्रद्धा जोपासण्या-यांच्या भावनांची गय कशासाठी करायची?
केवळ धर्माचा पगडा असलेल्यांनाच नव्हे तर जे आस्तिकता-नास्तिकता यांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी दत्तकथा ही पोस्ट धक्कादायक ठरेल. ज्याला वाचायची आहे त्यांनी जरूर वाचावी. ती अश्लील आहे किंवा नाही, यामध्ये न पडता आपण त्याच्या भावार्थ नक्कीच समजू शकतो, त्या आधारावर मूल्यमापन व्हावे असे वाटते. अशा भंपक कथांच्या बाबतीत माझ्याही भावना तीव्र असतात. असेच वारंवार दिसणारे उदाहरण परशुरामाचे. वामनावतारात बळी राजाला जी शिक्षा दिली गेली त्याचे. यातल्या काही कथा तर दशवतारांच्या आहेत. अशा अनेक कथा सापडतील. म्हणजे धर्माच्या मुलाम्याखाली आपल्यावर खोटेपणा, स्वार्थीपणा, वगैरे कसा अगदी लहानपणापासून लादला गेला आहे हे लक्षात यावे. मीही माझ्या पद्धतीने या प्रकारांवर टीका करतो. मला त्यांच्यासारखी भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे मी म्हटले तसे मी त्यातला भावार्थ घेतला, त्यात मला काही वावगे वाटले नाही. माझ्याच भाषेवर काहीजण चिडतात, त्यापुढे त्यांची भाषा कोणाला फारच जहाल वाटल्यास नवल नाही.
कल्पना नसताना खूप तिखट लागल्यावर माणसाला कसे कानातून वाफा बाहेर पडताहेत असे वाटते आणि जेवायला बसलेला माणूस कसा ताटकन उभा राहतो, तसे. पण याचा भावार्थ समजावून घेऊ या आणि या भंपक कथा हद्दपार करूयात. मुख्य म्हणजे श्रद्धांच्या व भावनांच्या नावाखाली चाललेला बाजार त्यामुळे बंद व्हायला मदत होईल.
वर म्हटल्याप्रमाणे ज्या भंपक कथा आपल्या माथी मारल्या गेलेल्या आहेत त्या एकेक निवडून त्यांचे भंजन करण्याची आवश्यकता आहे. वर दोन उदाहरणे दिलेलीच आहेत.
त्या पोस्टवरचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यामुळे आस्तिकांच्या भावना दुखावतात. परंतु आस्तिक लोकांच्या भावना हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की आस्तिक या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. अगदी भाबडे म्हणता येतील अशांपासून ते अगदी लबाड असे सर्व या सदरात मोडतात. जे लबाड किंवा त्याच्या आधीच्या काही पाय-यांपर्यंत असतात, ते देव म्हणून ते जे काही मानतात, त्याला त्यांनी पार पचवलेले असते. त्यामुळे ते आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? कारण या लबाडांमुळेच धर्म रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा आपल्या सर्वांना उपद्रव होतो.
या तथाकथित श्रद्धा (अंधश्रद्धा असे वाचावे), भावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच भाबडेही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात. अशांकडून आपल्याच जवळपासच्या कुटुंबियांमध्ये कोणावर कशामुळे व कोणत्या स्वरूपाचा अन्याय होईल याचा नेम नसतो.
त्यामुळे आपल्या जवळपासच्यांमध्ये हे प्रकार दिसत असतील तर त्याबद्दल बोलायलाच हवे असे वाटते. भलेही शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल.
वर कोणी अश्लीलतेचा उल्लेख केला आहे. अश्लीलतेची अर्थात गरज नाही, स्पष्टपणाची मात्र आहे.
सपकाळांच्या मूळ पोस्टवरील टीकात्मक प्रतिक्रियेवर त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल पोस्टमधील शेवटच्या परिच्छेदातील मनोगत खाली देत आहे.
“असो. चालत राहणार हे.
तर परमभक्तांनो,
तुम्ही हजार वेळा अकौंट रिपोर्ट करा, ब्लॉक करा. डिसेबल करा. वाट्टेल ते करा.
मी काही तुमच्या मनासारखं वागणार नाही.
उद्या ब्लॉग काढेन, वेबसाईट बनवेन.
'तुम्ही माझं लिहिणं बंद करू शकाल असं वाटतंय का ? '
साला, श्रद्धा म्हणजे ढुंगणावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म 'कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत'.
तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही तरी चुकीचा धर्म शिकलेला आहात.
तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी थिल्लरगिरी माझ्याजवळ.
तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं.
ही नास्तिकता आता अशीच जहाल राहणार.
मी तुमच्यासारखा तुमच्या आई-बहिणी काढणार नाही.
तुम्हाला धमक्या देणार नाही.
तुमची डोकी फोडायला येणार नाही.
पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही.
इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
आणि नास्तिकांनो, 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं, 'आमच्या संघटना होणार नाहीत' हे बोलणं थांबवा.
यापुढे नास्तीकांच्याही संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्याच की लगेच तलवारी नाचवणं हा अर्थ नसतो.
पण ढाल तरी हातात गरजेचं आहे आता.“
निश्चय असावा तर असा.
धण्यवाद. इथे वाचली कथा अश्लील
धण्यवाद.
इथे वाचली कथा
अश्लील वगैरे नक्कीच म्हणता येईल. आक्षेपार्ह वाटलं नाही काही.
भावना दुखावलेल्या लोकांना मात्र भिश्क्याव वाटेल.
+१
पतिव्रता असणे ही दुर्मिळ बाब असावी आणि पुरुष लोक स्वच्छपणे शरीरसुखाची मागणी करु शकत असावेत कदाचित. नंतर आपल्या छटाकभर मालमत्तेसाठी स्वतःच्या रक्ताचा वारस हवा म्हणून (फक्त) बायकांवर बंधने आली असतील आणि ज्यांना फायदा दिसतोय अशा बायकांनी बुरखाप्रेमी बायकांप्रमाणे मंगळसूत्र व कुंकवाच्या रुपाने याचेही आभूषण करुन घेतले असेल. त्यासाठीच या पातिव्रत्याची महती गाणार्या येडपट कथा.
+१कामातुराणाम मध्ये मराठीतील
+१
कामातुराणाम मध्ये मराठीतील (खरंतर प्राकृतातील) पहिला ग्रंथ ज्याला म्हटले जाते त्या गाथा सप्तशतीतील काही गाथा स्त्रियांच्या व्याभिचारालाच वाहिलेल्या आहेत. व्याभिचारीणींचे खास नियम आहेत ;)
वर मी जो धागा काढला होता त्यातील विशेष उद्धृत देतो:
(व्यभिचार करता आला नाही तर नवर्याशी केलेल्या संभोगावर समाधान मानावे अश्या अर्थाची एक गाथा सर्वाधिक हशा मिळवून गेली. तर लपून संभोग करताना पाळायचे नियम सर्वाधिक वाहवा!) मला हा भाग या कार्यक्रमातील सर्वात अधिक आवडला (स्माईल) . अतिशय नेमका सूर, वाचिक अभिनयाची नजाकतभरी पेशकश, नेमक्याजागी पॉज, वाचनाचा नखरेल ढंग यांनी या मराठीतील आद्य ग्रंथाबद्दलचे कुतूहल तर चाळवलेच शिवाय सभेचा नूरही पालटला. त्यानंतर नंबर होता "शुक बहात्तरी" या अजरामर पुस्तकाचा. पतीचा डोळा चुकवून व्यभिचार करावयास निघालेल्या स्त्रीला तत्सम प्रकार करूनही बचावणार्या इतर चतुर स्त्रियांच्या विविध कथा सांगून तिला व्यभिचारापासून परावृत्त करतो.
...
कॉलेजात असताना, निकृष्ट दर्जाच्या कागदावर अत्यंत भयंकर शुद्धलेखनासहित छापलेले काही नियतकालिक/अनियतकालिक अपौरुषेय वाङ्मय वसतिगृहावर फिरत असे/लोकप्रिय होते. त्यात अनेक सुरस नि चमत्कारिक कथा असत.
मात्र, त्यातील वर्णने ही तत्कालीन समाजाच्या लैंगिकतेची प्रातिनिधिक वगैरे असल्यास कठीण आहे. असो.
अशा अपौरुषेय वाङ्मयाचे पुढे
अशा अपौरुषेय वाङ्मयाचे पुढे वेद-पुराण म्हणून कौतुक होणार की काय?
मनुस्मृतीत ब्राह्मणाने शूद्र स्त्रीचा हात धरल्यास तिने प्रतिकार न करता त्याच्याबरोबर जावे असे लिहीले आहे पण तसे काही नव्हतेच असे म्हणायचे की काय?
शिवाय आजच्या अपौरुषेय वाङ्मयात लिहीलेल्या गोष्टी आपण केल्या नाहीत म्हणून इतर लोक करतच नाहीत असे समजणारी 'भो'ळीबाजू हीच 'न'वीबाजू दिसतेय.
मंगेश सपकाळ या व्यक्तीबद्दल
मंगेश सपकाळ या व्यक्तीबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हती. पहिल्यांदा मी त्याची पोस्ट वाचली तीच मुळात अनुसूया कथेची. मी आस्तिक असल्यामुळे थोडा धक्का बसणे स्वाभाविक होते. त्यावेळी मला हा माणूस ब्रिगेड , बामसेफ किंवा त्याच्याशी निगडीत कोणीतरी असावा असंच वाटलं . पण नंतर जशा जशा त्याच्या जुन्या पोस्ट्स पाहत गेलो तसा तसा हा माणूस वेगळ्याच मुशितला आहे हे कळलं . मंग्या हा खऱ्या अर्थाने जात,धर्म,पंथ ,देश निरपेक्ष आहे. त्याला त्याच्या पद्धतीने लिहू द्याव. आपण वाचून एन्जॉय करावं . अनेक 'संस्कारी' लोकपण हळूच त्याच्या पोस्ट्स मिटक्या मारत वाचतात हेही खरंच आहे.
नंतर त्याला शिवप्रतिष्ठानच्या लोकांनी धमकावायला सुरुवात केली हे पण कळलं. मुळात शिवप्रतिष्ठानवर माझा प्रचंड राग असल्यामुळे नकळत मी मंग्याच्या साइडने कधी गेलो कळलंच नाही. सध्या सरळ सोप्या भाषेत इतके प्रगल्भ विचार मांडणारा तो फेसबुकवरील तो एकमेव मनुष्य आहे.
काहीही झालं तरी मी त्याच्यासारखा बिनधास्त कधीच व्यक्त होऊ शकत नाही हि fact आहे. तो माझा पिंड नाही. त्याच्या सगळ्याच गोष्टी पटतात असं नाही . खासकरून त्याचं भारत आणि भारतीयांना तुच्छ लेखणं हे थोडं अति आहे असं वाटत. पण तरीही मी त्याच्या पोस्ट्सचा यापुढे नियमित वाचक असणार आहे हे नक्की.
बाकी नास्तिक-आस्तिक वादाविषयी मला आतातरी काही बोलायचं नाही
हो त्याचमुळे असेल कदाचित. पण
हो त्याचमुळे असेल कदाचित. पण इतर सर्व बाबतीत प्रचंड optimistic असणारा मंगेश त्याबाबतीत कमालीचा निराशावादी आहे. सामाजिक परिस्थितीत बदल होतंच नाहीये असं काही नाही. बदल होतोय पण खूप मंदगतीने. ही कासवगती आपल्याला परवडणारी नाही हे खरंच पण आशावादी असण्यास हरकत नाही. निदान आपल्या नंतरची पिढी सुधारेल अशी तरी आशा करू शकतो. पण भीती तेंव्हा वाटते ज्यावेळी तंत्रज्ञानाचा वापर नवीन पिढीला अजून कट्टर आणि बुरसटलेल्या विचारांचा बनवण्यासाठी केला जातो. म्हणजे हायफाय वावरणारी नवी पिढी बोलताना मात्र संस्कृतीच्या बाता करते यासारखा दुसरा विरोधाभास नाही.
अजून काही कच्चा माल
मला अंधुकशी आथवणारी कथा :-
अंधुकशी आठवणारी कथा लिहितोयः-
महागुरु, आदिनाथ शंकराचे थेट शिष्य मत्स्येंद्रनाथांना कुठल्याशा विवाहित जोडप्याने नवस केला मुलगा होउ दे, तुम्हाला अर्पण़ करिन वगैरे. त्यांनी तसे व्हावे म्हणून आशिर्वादरूपी / प्रसादरूपी एक विभूती/दिव्यभुकटी दिली.
त्या स्त्रीस काय बुद्धी झाली कुणास ठाउक. तिने ती विभूती नाथ महाराज जाताच धाडकन शेणात टाकली.
काही वर्षांनी आपल्या कृपेने झालेला पुत्र परत मागण्यास मच्छिंद्रनाथ/ मत्स्येंद्रनाथ आले. त्यांना विभूती शेणात टाकली गेल्याचे समजले. तत्क्षणी ते घरामागच्या शेणाने भरलेल्या गोठ्यात जाउन "चल बेटा गोरख, ऊठ मोठा झालायेस आता" असे म्हणताच गाईच्या शेणातून(की शेणाच्या/गोवर्यांच्या राखेतून?? ) एक तेजस्वी युवक बाहेर आला. ब्रम्हचर्याचे तेज** त्याच्या चेहर्यावर्,कांटीवर झळकत होते. मत्स्येंद्रनाथ त्याला घेउन निघून गेले.
पुढे काही काळाने खुद्द मत्स्येंद्रनाथच एका स्त्रीराज्यात* भ्रमित होउन अडकले, मूळ नाथपंथी रूप विसरले. तेव्हा ह्याच त्यांच्या शिष्याने, गोरखनाथाने महत्प्रयासाने त्यांना परत आणले. लोककथा म्हणते त्यानुसार त्यांनी नर्तन्-वादन करणार्याच्या वेशात स्त्री राज्यात प्रवेश केला आणि तिथे ढोल्/ मृदुंग वाजवतानाच त्यातून "चल मच्छिंदर गोरख आया" असा ध्वनी उमटला. गुरु-शिष्य भेट होताच स्व-रूपाची जाणीव होउन मच्छिंद्र परतले.
ह्या सगळ्या कथेचा आधार काय ठाउक नाही. मौखिक परंपरेत अगदि लहानपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी एक आहे.
ह्यातला आध्यात्मिक म्हटला जाणारा अर्थही समजलेला नाही.
ह्याच कथेची पुढची व्हर्जन चोप्य पस्ते करतोय.
http://mr.upakram.org/node/1372#comment-22279
.
.
प्रेषक विसुनाना (मंगळ, 08/05/2008 - 08:24)
रा.चिं. ढेरेंच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' मधून आठवेल तसे -
मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली.
परंतु 'उर्ध्वरेता'(http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Matrimony#cite_note-8) या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली.
*स्त्री राज्य म्हणजे जिथे सर्व कारभार स्त्रिया करतात असे काहिसे.
**ह्याचा नक्की अर्थ ठाउक नाही.
.
.
.
शिवाय http://www.misalpav.com/node/21877 इथे विसुनाना म्हणतात :-
माझ्याकडे फार पूर्वी प्रकाशित झालेले (म्हणजे १९४२ साली) 'पतंजली योगदर्शन' आहे. त्यातील मूळ शब्दात (असेल तर संस्कृत श्लोकासह) 'ऊर्ध्वरेता' म्हणजे नक्की काय ते इथे सांगतो.
-->>आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या
'भक्तविजया'मध्ये गोरखनाथ कथा आहे.
माझ्या माहितीनुसार मत्स्येन्द्रनाथ-गोरखनाथ ही कथा महिपतिबुवा ताहाराबादकरलिखित 'भक्तविजय' ह्या पुस्तकामध्ये आहे. (महिपतिबुवांचा काल १७१५-९९.) हे पुस्तक भाविकांचे आवडते असल्यामुळे भक्तिसम्प्रदायातील पुस्तकविक्रेत्यांकडे आजहि ते नव्या आवृत्तीत मिळू शकेल असे वाटते.
मला ह्या पुस्तकाचे डॉ.जस्टिन अॅबट आणि एन. आर. गोडबोले ह्यांचे इंग्रजी भाषान्तर archive.org मध्ये ह्या जागी मिळाले. पुस्तकाचे इंग्रजी नाव 'Stories of Indian Saints. येथे पान ३३८-३७६ पहा. येथे मत्स्येन्द्रनाथांचा जन्म मगरीच्या पोटात झाला येथेपासून त्यांच्यापासूनची गुरुपरंपरा गहिनीनाथ-निव्रुत्ति-ज्ञानेश्वर-चांगदेव येथेपर्यंत दाखविली आहे.
आता थोडे धाग्याच्या शीर्षकावरून माझ्या मनात आलेले लिहितो.
अशा गोष्टींवर आताच्या काळात कोणी विश्वास ठेवून गुरुबाजी सुरू करू नये हा मुद्दा पूर्ण पटण्यासारखा आहे. पण अशा गोष्टींना आजची मूल्य लावून त्यांना 'भंपक' इत्यादि वर्णने चि़कटवणे हे मात्र पटत नाही. जुन्या सश्रद्ध काळात कोणी अशा कथा रचल्या आणि काहीजण त्या वाचत गेले आणि त्यांवर विश्वासहि ठेवत गेले. आज तसे काही आपण करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांना 'भंपक' असे म्हणून त्यांची बोळवण करणे आणि खिल्ली उडवणे ह्यातून आपण कोणती बौद्धिक श्रेष्ठता आणि विज्ञाननिष्ठा दाखवतो? आपली चौथीपर्यंत शिकलेली आणि मराठी पोथी कशीबशी वाचू शकणारी आजी-पणजी एकादशी करते म्हणून तिला भंपक म्हणण्याइतकेच ते निरर्थक आहे. असल्या गोष्टी 'भंपक' आहेत हे सर्वांना मान्य आहेच. तेच ते पुनःपुनः लिहून आपले बौद्धिक श्रेष्ठत्व कशाला दाखवावे?
अशा 'भंपक' कथा ह्या मौखिक इतिहासाचा मोठा स्रोत असतो. त्यातील भंपकपणा दाखवत बसून वेळ दवडण्यापेक्षा त्यामध्ये जुन्या समाजपरिस्थितीचे, इतिहासाचे काही दुवे मिळतात का हे पाहणे अधिक उपयुक्त आहे. ह्या संदर्भामध्ये रा.चि. ढेरे ह्यांच्या 'विठ्ठल - एक महासमन्वय' येथील 'भाकड' हे वर्णन ज्यांना लागू शकेल अशा लोककथांच्या आणि पुराणांच्या उपयुक्ततेचे सुरुवातीचे निरूपण वाचून पहा.
(अनेक वर्षांपूर्वी वि.का.राजवाडे ह्यांचा भोंडल्याच्या गाण्यांवरचा एक लेख वाचला होता. ह्या वरकरणी निरर्थक आणि हास्यास्पद गाण्यांमधून त्यांना बरेच काही सापडले होते असे स्मरते.)
प्रश्नातच उत्तर?
अशा गोष्टींवर आताच्या काळात कोणी विश्वास ठेवून गुरुबाजी सुरू करू नये हा मुद्दा पूर्ण पटण्यासारखा आहे. पण अशा गोष्टींना आजची मूल्य लावून त्यांना 'भंपक' इत्यादि वर्णने चि़कटवणे हे मात्र पटत नाही. जुन्या सश्रद्ध काळात कोणी अशा कथा रचल्या आणि काहीजण त्या वाचत गेले आणि त्यांवर विश्वासहि ठेवत गेले. आज तसे काही आपण करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांना 'भंपक' असे म्हणून त्यांची बोळवण करणे आणि खिल्ली उडवणे ह्यातून आपण कोणती बौद्धिक श्रेष्ठता आणि विज्ञाननिष्ठा दाखवतो? आपली चौथीपर्यंत शिकलेली आणि मराठी पोथी कशीबशी वाचू शकणारी आजी-पणजी एकादशी करते म्हणून तिला भंपक म्हणण्याइतकेच ते निरर्थक आहे. असल्या गोष्टी 'भंपक' आहेत हे सर्वांना मान्य आहेच. तेच ते पुनःपुनः लिहून आपले बौद्धिक श्रेष्ठत्व कशाला दाखवावे?
अशा 'भंपक' कथा ह्या मौखिक इतिहासाचा मोठा स्रोत असतो. त्यातील भंपकपणा दाखवत बसून वेळ दवडण्यापेक्षा त्यामध्ये जुन्या समाजपरिस्थितीचे, इतिहासाचे काही दुवे मिळतात का हे पाहणे अधिक उपयुक्त आहे. ह्या संदर्भामध्ये रा.चि. ढेरे ह्यांच्या 'विठ्ठल - एक महासमन्वय' येथील 'भाकड' हे वर्णन ज्यांना लागू शकेल अशा लोककथांच्या आणि पुराणांच्या उपयुक्ततेचे सुरुवातीचे निरूपण वाचून पहा.
मुळात, अशा गोष्टींवर शब्दशः विश्वास ठेवणारे लोक आहेत. दत्ताच्या गुरूवारी कांदा-लसूण न खाणे सारख्या किरकोळ गोष्टींपासून अनेक अंधश्रद्धा लोक बाळगतात. समाजातील अंधश्रद्धा दूर करायची तर अशा सर्वच गोष्टींचा निषेध केला पाहिजे. तुमच्या आमच्यासारख्या 'रॅशनल' लोकांना ही केवळ गोष्ट-भाकडकथा आहे हे समजते. पण आवश्यकता नसली तरी आज तसे होत नाही असे नाही.
त्याशिवाय, किरकोळ असहमती. आजीला भंपक म्हणजे आणी आजीच्या अंधश्रद्धेला भंपक म्हणणे वेगळे. असो.
सांस्कृतिक-ऐतिहासीक दृष्टीने या गोष्टींचा अभ्यास करणार्याना कशाला किती महत्व द्यायचे याची सारासार बुद्धी असावी, (ती आपल्या देशात अनेक अभ्यासकांना नाही, हे अनेकदा जाणवते. पण ते एक असो) पण त्या लोकांबद्दल इथे चर्चा चाललेली नाही असे वाटते.
फक्त हिंदू धर्मालाच का ठोकता
या लेखात म्हटल्याप्रमाणे अनैतिक आणि भंपक कथा फक्त हिंदू धर्माच्या ग्रंथातच आहेत, असे नव्हे. जगातील सर्वच धर्मग्रंथांत अशा कथा आलेल्या आहेत. बायबलच्या जुन्या करारातील डेव्हिडची गोष्ट अवश्य वाचा. वैज्ञानिक म्हणविल्या जाणाºया बौद्ध धर्मात अशा कथांचे मोठे भांडारच आहे. जातक कथांच्या संग्रहात या कथा आलेल्या आहेत. मंगेश सपकाळ यांचे लेखन मी वाचलेले नाही. त्यांचा दृष्टीकोण सर्वसमावेशक आहे की, केवळ हिंदू धर्माला ठोकणारा आहे, हे मला माहिती नाही. त्यांच्या लेखनात केवळ हिंदू धर्मातील अनैतिक कथांवरच प्रहार केले जात असतील, तर त्यापेक्षा मोठा दांभिकपणा कोणताही नाही.
जातक कथांमधील एक मनोरंजक कथा येथे देत आहे. या कथेत विवाहबाह्य संबंधांकडे थेट दुर्लक्ष करण्याचा सल्ला तिच्या पतीला देण्यात आला आहे. http://www.buddhanet.net/bt_conts.htm या वेबसाइट्वर ही कथा उपलब्ध आहे. कथेच्या शेवटी लिंक दिली आहे. या वेबसाईटवर आणखीही काही कथा उपलब्ध आहेत.
Country Man and City Wife (Adultery)
Once upon a time, there was a well-known teacher who taught in and around Benares. He had over 500 students. One of these was from the distant countryside. Knowing little about the ways of city folks, he fell in love with a Benares girl and married her. After the marriage he resumed his studies with the famous teacher. But he started missing classes, sometimes staying away for two or three days at a time.
His wife was used to doing whatever she wanted. Even though she was married to the student, she was not loyal and faithful. She still had secret boy friends.
It just so happened that after she had been with a boy friend, she acted very humble with her husband. She spoke softly and tried very hard to please him. But on other days, when she had done nothing wrong, she was rude and domineering. She yelled at her husband and nagged him. This drove the man crazy. He was completely confused by how differently she acted from one day to the next.
The countryman was so disturbed that he stayed away from classes. And while he remained home he discovered that his city wife was unfaithful. He was upset that he missed school for seven or eight days.
When he finally showed up, the famous teacher asked, "Young man, you have been away so long. What was the matter?" He replied, "Sir, my wife is cheating on me very much, and acts as humble as a servant. But on other days she is arrogant and domineering, rough and rude. I can't figure her out. I don't know what to do or where to go for help. That's why I couldn't attend your classes."
The teacher said, "Young man, don't worry. Rivers can be bathed in by anyone, rich or poor. Highways too are open to all. Generous people build roadside rest houses to gain merit, and anyone can sleep there. Likewise, all are welcome to take water from the village well.
"So too, there are some women who won't be faithful to one man. They love to keep their secret boy friends. That's just the way some people are. It's hard to understand why they act the way they do. But why get angry about what you cannot change?
"On the days when your wife has been with a boy friend, those are the days she acts meek and mild. But on the days when she has done nothing wrong, those are the days she acts rough and rude. That's just the way some people are. So why get angry about what you cannot change?
"Accept her the way she is. Treat her in the same understanding way, whether she is kind or mean to you. Why get angry about what you cannot change?"
"The student from the countryside followed the famous teacher's advice. His city wife’s behaviour no longer upset him. And when she realised that her actions were no longer secret, she gave up her boyfriends and changed her ways.
ही कथा खालील लिंकवर उपलब्ध आहे.
बायबलपेक्षा जस्त सुरस आणि
बायबलपेक्षा जस्त सुरस आणि रम्य कथा ग्रीक आणि रोमन पुराणांमध्ये आहेत.
खगोलशास्त्राचा हौशी अभ्यास करणाऱ्यांना या गंमतीजंमती सहज माहीत असतात; अशा पुस्तकांमध्ये या कथा सहज सापडतील. आकाशात स्थान मिळवलेले बहुतेकसे देव, प्राणी, देवांची वाहनं चावट आणि बायकांच्या मागे लागणारे, लंपट आहेत.
आकाशात स्थान मिळवलेले
आकाशात स्थान मिळवलेले बहुतेकसे देव, प्राणी, देवांची वाहनं चावट आणि बायकांच्या मागे लागणारे, लंपट आहेत.
अशा कथांवर एक स्वतंत्र धागा मालिका सुरू करून विक्षिप्तबाईंनी आम्हां ऐसीकरांना उपकृत करावे अशी (दाताच्या कण्या करून) मागणी करून आम्ही उपविश करतो!
;)
(जल्लां, सगलां काय खागोलानंच हाय!)
ही ही ही
आता मी फार कंटाळवाणी झाल्ये. फारसे रंजक तपशील आठवत नाहीत. ययाती-देवयानी-शर्मिष्ठा ही एक ष्टुरी आहे. तिचं "स्त्रीवाद रीमिक्स" करता येईल.
बाकी खरोखरच्या गंमतीशीर गोष्टींचा आता गाभा तेेवढा आठवतो. ते सगळीकडे सारखंच - कोणत्याशा देवाला कोणतीशी सुंदरी आवडली; तिला तो देव आवडला नाही. म्हणून भलत्याच इतर देवाने त्या लंपट देवाला आकाशातला कुत्रा, कोंबडा असं काहीतरी बनवून टाकलं. वर तुला 'स्वर्गाच्या दारातून जाता येईल', 'तू नेहेमी आकाशात असशील' असं मधाचं बोट दिलं चाटवून. (मधाचं बोट म्हटल्यावर अस्वल येईल लगेच ...)
फेसबुक खाते
फेसबुक खाते नसल्यामुळे 'अस्वल' यांनी दिलेल्या दुव्यावर जाऊन "पोस्ट" वाचली.
एकूणच भाषा पाहून निव्वळ टाईमपास म्हणून वाचायची चावट कथा इतपतच त्याचा अर्थ घेता येईल. त्यातून कोणी मंगेशराव म्हणजे कोणी विचारवंत / समाजप्रबोधनकार आहेत असा अर्थ काढत असेल तर ते दुर्दैवीच म्हणावे लागेल.
हीच नव्हे, दशावतारातल्या
हीच नव्हे, दशावतारातल्या परशुरामाच्या आणि बळीची कथाही तशीच आहे. त्यात झालेल्या अन्यायाबद्दल, त्यातल्या भंपकपणाबद्दल सांगयलाच हवे. आस्तिकांचा असल्या कथांवर विश्वास असेल, श्रद्धा असेल तर ती मोडायलाच हवी. मुळात आस्तिक म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्यावरही बरेच काही अवलंबून आहे.
कोणाच्या कुठल्या प्रकारच्या
कोणाच्या कुठल्या प्रकारच्या श्रद्धा कोणाच्या व कशा आड येतील याचा काही नेम नसतो याची तुम्हाला कल्पना नाही काय? श्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या अंधश्रद्दांमंमुळे कुटुंबातील सदस्यांवर, त्यांच्या विकासावर, त्यांच्या अारोग्यावर परिणाम होऊ शकतो याची तुम्हाला कल्पना नाही काय?
लहानपणी परीकथांवर विश्वास ठेवणा-यांना मोठे झालेल्यावर त्या कथा ख-या नसतात हे कळते ना? मग मोठे झाल्यावर या श्रद्धारूपी कुबड्या कशाला लागतात? मानसिकद्ृष्ट्या अपंग व परावलंबी असतात हे बहुतेक श्रद्धावाले. प्रत्यक्ष कुबड्यांची गरज असलेले मनाने खंबीर असलेले दिसतात, तर येथे हातीपायी धडधाकट असलेल्यांना या कुबड्या लागतात.
वर श्रद्धा हा आमचा अधिकार म्हणणे हे फारच धाडसी वाटते.
सगळ्याच श्रद्धा अंध असतात.
सगळ्याच श्रद्धा अंध असतात. अंधश्रद्धा म्हणजे द्वीरुक्ती आहे.
मानसिकद्ृष्ट्या अपंग व परावलंबी असतात हे बहुतेक श्रद्धावाले
हे कैच्या कै विधान आहे. असे काहीही नसते.
प्रत्येक जण कसे जगायचे ते स्वताचे स्वता ठरवतो. जो पर्यंत जबरदस्ती नाही होत तो पर्यंत सर्व योग्य आहे. तुम्ही उगाच दुसर्यांना अक्कल शिकवू नका आणि दुसर्यांची अक्कल काढु नका. प्रत्येक जण समर्थ आहे त्याला काय हवे आहे आणि काय नको आहे ते ठरवायला.
एकीकडे 'सगळ्याच श्रद्धा अंध
एकीकडे 'सगळ्याच श्रद्धा अंध असतात' म्हणता तरी त्यांचे समर्थन करता. कमाल आहे की नाही. थोडे आजुबाजुला पहा आणि तुमच्याच मित्रांमध्ये-नात्यामध्ये अंधश्रद्धांपायी कसे वातावरण होते, कोणावर काही अन्याय होतो का पहा. वर इतके लिहूनही तुम्ही 'जबरदस्ती नाही होत तो पर्यंत' यातच अडकून पडला अाहात. त्या गाडगे बाबांनी आयुष्य वाया घालवले म्हणायचे, तुमच्या भाषेत दुस-यांना अक्कल शिकवून. आता मी मला गाडगेबाबांइतका मोठा समजतो का असा प्रेडिक्टेबल प्रश्न विचारू नका.
"प्रत्येक जण समर्थ आहे त्याला काय हवे आहे आणि काय नको आहे ते ठरवायला." हे जे तुम्ही म्हणत अाहात त्यातच तुम्हाला आजुबाजुला काय चालले आहे याची जराही कल्पना नाही हे दिसते.
तेव्हा उगाच 'उगाच दुसर्यांना अक्कल शिकवू नका' हे स्वत:वर ओढवून घेऊ नका.
या अशा लेखांनी समाजातील
या अशा लेखांनी समाजातील अंधश्रद्धा/श्रद्धा दूर होतात हीच मोठी अंधश्रद्धा आहे. ती लहानपणीची गोष्ट आठवते का सूर्याची अन वार्याची पैज लागली की या माणसाचा कोट कोण उतरवून दाखवतो. वारा रेमेडोक्यासारखा सैरावैरा वाहू लागला .... माणसाने कोट (श्रद्धा) अधिकच गुंडालून घेतल्या अजुनच च्कटून बसला. याऊलट सूर्य पहील्यांदा हळूवार तापला व माणसाचा विश्वास संपादन केला.... माणूस जरा रिलॅक्स झाला. मग सूर्य तापत तापत तळपू लागला. व माणसाने कोट काढून फेकला.
.
हे रेमेडोके वारे जाम डोक्यात जातात. अन मग नळी फुंकले सोनारे ... इकडून तिकडे गेले वारे होते.
डोक्यातली अंधश्रद्धांची जळमटे
डोक्यातली अंधश्रद्धांची जळमटे काढण्यासाठी सगळे मार्ग योग्य आहेत. अंधश्रद्धांचा पगडा एवढा आहेच. पुढच्या वेळी अशा भंपक कथा कोणी ऐकवल्या तर डोके जागेवर असलेला माणूस जरूर त्यातला निरर्थकपणा जाणेल.
सुर्या-वा-याच्या गोष्टीतल्याप्रमाणे अतिवा-यामुळे कोट अंगाला चिकटणे नैसर्गिक आहे. ते उदाहरण तेवढे चपखल नाही. वर म्हटल्याप्रमाणे एखादी गोष्ट निरर्थक आहे, खरी नाही हे माहित असूनही त्यामागे श्रद्धा म्हणून लागत राहणे याला काय म्हणावे? लहानपणी परी किंवा बागुलबुवा, मोठेपणी श्रद्धा असलेले काहीही, पण काहीतरी लागतेच. कमाल आहे.
आजुबाजुला पहा आणि तुमच्याच
आजुबाजुला पहा आणि तुमच्याच मित्रांमध्ये-नात्यामध्ये अंधश्रद्धांपायी कसे वातावरण होते, कोणावर काही अन्याय होतो का पहा
मी सिव्हीलाइस्ड लोकांमधे रहाते आणि तश्याच लोकांमधे रहाणे पसंत करते. त्यामुळे माझ्या आजुबाजुला आस्तिक, पूजा वगैरे करणारी माणसे असतात पण अन्याय वगैरे कोणावर होत नाही. तुम्ही पण तुमचे मित्रपरीवार बदलुन जरा सभ्य, सज्जन माणसांमधे रहायला लागा म्हणजे तुम्हाला असे वेडेवाकडे दिसणार नाही.
तुमचे म्हणणे थोड्या ( च ) प्रमाणात बरोबर असेल पण ते सांगायची जागा चुकते आहे . ऐसी वर श्रद्धेपाई कोणावर अन्याय वगैरे करणारे कोणी नाहीत.
तुम्ही म्हणजे, घरातल्या भांडीवाली ला तिचा नवरा दारू पिउन मारत असेल तर तुम्ही ऑफिस मधल्या मित्राला लेक्चर झाडणार की "दारू पिउन बायकोला मारू नये".
तुमचे हे सल्ले कुठल्या जातपंचायतीत, फासे-पारध्यांच्या पालावर जाऊन दिलेत तर ते अस्थानी वाटणार नाहीत.
"तुमचे मित्रपरीवार बदलुन जरा
"तुमचे मित्रपरीवार बदलुन जरा सभ्य, सज्जन माणसांमधे रहायला लागा म्हणजे तुम्हाला असे वेडेवाकडे दिसणार नाही." हा तुमचा सल्ला जबरदस्त आहे.
ऐसी अक्षरेचे सभासद होताना तुम्ही सिव्हिलाइज्ड अाहात का, सिव्हिलाइज्ड लोकांमध्ये राहता का, तुमचा अंधश्रद्धा कोशंट किती आहे, तो तुमच्या स्वत:च्या-कुटुंबियांच्या-समाजाच्या विकासावर विपरित परिणाम करू शकतो का वगैरेची परीक्षा होते की काय?
मी म्हटले तसे जे लिहिले अाहे ते वास्तव आहे. तुम्हाला ते जाणवत नसेल तर दोन शक्यता. असले तरी त्याकडे लक्ष न देणे व खरोखरच तसे नसणे. त्याबाबतीत मी काही म्हणू शकत नाही.
ग्रामपंचायतीत जाऊन सल्ले द्यायला सांगत आहात, तुम्हाला याचीही कल्पना नाही की अशा अंधश्रद्धा आस्तिकतेच्या भंपक कल्पनांपोटी येणा-या अस्मिता ही काही फक्त अशिक्षितांची किंवा खेड्यातल्या लोकांची मक्तेदारी नाही. सुशिक्षितही त्याला बळी पडताना दिसतात. तेव्हा तुमच्या सभ्य व सज्जनतेच्या कल्पनेत काही तरी गडबड आहे. कारण मी म्हटले तसे वेडेवाकडे दिसण्याच्या बाबतीत तुमच्या भलत्याच कल्पना आहेत.
तेव्हा तुमचे भांडीवालीचे व ऑफिसचे उदाहरण गैरलागू आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
आधी तुम्ही स्वत:वर ओढवून घेत होता, अाता मला भलतेच सल्ले देत आहात आणि शिवाय इथल्या सदस्यांच्या वतीने सांगत आहात. आणखी कसल्या कसल्या अस्मिता आहेत तुमच्या? बाकी 'असे काही नसते' या डिनायलच्या भावनेत तुम्हाला रहायचे असेल तर माझी काहीच हरकत नाही.
मूळ कथेबद्दल बोलत असावेत.
मूळ कथेबद्दल बोलत असावेत.
मूळ कथा मला त्यातल्या सगळ्यांच्या डँबिसपणासाठी आवडते. आस्तिक-नास्तिक वगैरे काही संबंध नाही. समजा मी आस्तिक असते आणि समजा साईबाबांना मानत असते तर या कथेमुळे माझ्या श्रद्धेला काहीही धक्का बसला नसता. "हा देव माझा नाहीच" असं म्हणून मी देवभक्तीकडे वळले असते. मी नास्तिक असल्यामुळे मला बाईचा डँबिसपणा आवडला.
अत्रि
लग्न ठरवताना म्हणे, 'अत्रि' गोत्र कुणाशीही जुळतं, या अर्थी 'अत्रि आणि सर्वांशी मैत्री' अशी म्हण आहे. ती म्हण या कथेवरुनच तयार झाली असेल का ? अत्रि गोत्राच्या सर्व मुली, आपापल्या नवर्यांना, लहान मुलासारखं वागवत असतील का ? यावर उच्च संशोधन व्हायला पायजेल आहे.
कथा वाचणे आणि कथेचा अर्थ कळणे
कथा वाचणे आणि कथेचा अर्थ कळणे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. कथेचा सार काय आहे, हे समजले पाहिजे. कथांचे सार न समजताच त्या वर लिहून मोकळे होणे,. आपल्या पूर्वजांविषयी दुर्भावना पूर्ण लेख लिहिणे अर्थातच सार न समजता म्हणजे विद्वत्ता अशी काही धारणा आहे. किंवा यालाच बहुतेक पुरोगामित्व म्हणतात. बाकी व्यासनी म्हंटलेच आहे.
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् |. परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ||.
बाकी. पहिले माणसाला लिहिता येत नव्हते. लिहिता आले तरी थोडे बहुत लोकच लिहू शकत होते. सार पोहचविण्या साठी कथा. बहुतेक याच कारणासाठी काही चरित्रांच्या आधारवर पौराणिक कथा रचल्या गेल्या. उदा कोपिष्ट ऋषी (दुर्वासा) कळीचा नारद, राजाचे गुण दोष- इंद्रा द्वारे. इत्यादी.
पूर्वी काय झाले ते झाले. आता
पूर्वी काय झाले ते झाले. आता तरी असल्या व इतर अन्यायी-अनैतिक कथा फेकून द्यायला नकोत का ? यातून काय सार समजून घ्यायचे? की त्यांचे समर्थन करत रहात आपले हसू करून घ्यायचे? वर मी इतरही काही प्रचलित कथांची उदाहरणे दिली आहेत, जी तद्दन अन्यायी आहेत. तुमचे नसेल, पण अशा गोष्टींबद्दल काही बोलले की अनेकांच्या भावनाही दुखावतात.
..
अश्लील म्हटल्यावर विचारणं आलंच -दत्तजन्माची कथा काय आहे आणि सपकाळांचा ब्लॉग कुठे मिळेल?