इंग्रजी गाण्यांची आवड कशी निर्माण झाली/केली

परदेशी स्थाईक होण्याची संधी मिळाल्यामुळे, जशा खूप नातेवाईक, सण,देवळे,पदार्थ, मराठी/हिंदी गाणी अशा आयुष्यातील नानाविध उत्तमोत्तम गोष्टींना मुकले, तश्याच अनेक गोष्टी साध्यही करू शकले. क्षितिजे कशी किती विस्तारली याचा आढावा घेते तेव्हा सर्वात मानाचे स्थान मिळते ते गाण्यांना. भारत सोडला नसता तर इंग्रजी गाण्यांकडे ढुंकुनही पाहिले नसते. कारण कम्फ़र्ट झोन (आश्वस्त परीघ) सोडावासा वाटलाच नसता. मोटिव्हेशनच मिळाले नसते. अमेरिकेत आले तेच अचानक आले. १० दिवसात गाशा गुंडाळला व भारतातून इकडे प्रयाण केले.सीडी /कॅसेट्स घ्यायला ना वेळ मिळाला ना आठवण झाली इतकी घाईगर्दीत आले. एका महिन्याने नवरा व मुलगी आले. पण नव्या नोकरीच्या धामधुमीत त्यांना सांगायलाच वेळ मिळाला नाही की सीडी आणा.
.
नव्यानव्या नोकरीला, रहाणीला, नवलाईला हळूहळू सरावत होतो. घरात अतिशय तुटपुंजे सामान होते .टीव्ही सोडाच पलंग ही नव्हता पण नव्या देशाची, नवलाईची जाम मजा वाटायची. कशाची कमी वाटत नव्हती. आता आठवलं की फार मजा वाटते - आम्ही रात्री Candle light मध्ये रमी खेळायचो. भोवती ३-४ सुगंधी मेणबत्त्या लावून आणि दिवे घालवून. का तर भारतात सुगंधी मेणबत्त्या मी तरी तेव्हा पाहील्या नव्हत्या. सुगंधी मेणबत्त्या ही अपूर्वाई होती. संध्याकाळी मी घरी आले की, फिरायला जायचो, खूप चालायचो कारण टीव्ही नव्हता की कार नव्हती. चिनो/आँटॅरिओ (कॅलिफोर्निया) प्रदुषणही नव्हते. हळूहळू २ दरवाज्याची कार घेतली. पहिल्यांदा तर GPS माहीतच नव्हता. हातात कागदी नकाशा घेउन चक्कर मारायचो. त्या स्वस्तातील स्वस्त्/सेकंडहॅन्ड कारमध्येही बिल्ट इन रेडिओ आला. ज्यावर अर्थात स्थानिक स्टेशन्स / इंग्रजी गाणी लागायची. मग मात्र हिंदी/मराठी गाण्यांची कमतरता भासू लागली. विशेषतः मला. कारण इंग्रजी गाणी फार कर्कश्य वाटत.
.
काही दिवस असेच गाण्यांच्या विरहात /कमतरतेत गेले, मग लवकरच माझ्या लक्षात आले की कमतरता आहे म्हणून हातावर हात धरून बसण्यात point नाही. गाण्यांशिवाय भकासपणा येईल. मग विचार केला इंग्रजी गाणी नाही आवडत हे चोचले ठेवायचेच नाहीत. मुद्दाम त्या गाण्यांची taste Develop करायची. इंग्रजी गाण्यांनी डोकं उठतं म्हणुन नावं ठेवत बसलो तर आपल्यालाच त्रास होणार. त्यापेक्षा इथे जी गाणी मिळतात ती ऐकायची, आवडून घ्यायची. When in Rome... वगैरे वगैरे. पॉप संगीत ऐकता ऐकता आणि बळजबरीने आवडून घेता घेता, कल्पना सुचली की इथेही मृदू (mellow) प्रेमगीते/लोकगीते असतील की. ती का ऐकू नयेत? मग आठवले की आपणही किंचित प्रमाणात का होईना इंग्रजी गाण्यांना expose झालेलो आहोत -
.
हॉस्टेलवरती ऐकलेले brian hyland यांचे Itsy Bitsy Teeny Weeny Yellow Polkadot Bikini आपण हॉस्टेलवरती तासंतास, तबकडी परत परत लावुन ऐकले आहे. या गाण्यातील मिष्किलपणाने आपल्याला अतिशय भुरळ घातलेली आहे. हॉस्टेलवरती एका रात्री खोलीत जागुन, रेडीओवरती Clif Richard यांचे Summer Holiday ऐकले आहे. या गाण्याच्या फ्रेशनेस मुळे आपल्याला फार आवडले होते. परत कधीच ऐकायला मिळालेले. हां नाही म्हणायला शेजारचा टीन एज मुलगा सकाळ संध्याकाळ लावायचा ते Walk Like An Egyptian गाणं सारखं कानावरती आदळत असे. पण यापलिकडे इंग्रजी गाण्याची दुनिया आपण पाहीलीच नाहीये. आणि आपल्याला या दुनियेत initiate करेल असं कोणीही नाही. नवर्‍याला मात्र इंग्रजी गाणी आवडायची/आवडतात. पण त्याची आवड किंचित वेगळी आहे. त्याला दे दणादण /ढाणढाण संगीत आवडते तर आपल्याला एकदम mellow तरी किंवा अर्थपूर्ण तरी, निदान एक गुणावशेष गाण्यात लागतो.
मग एक काम केले - UK/USA चार्टसवरती दशकातली/ त्या त्या वर्षातली अशी टॉप टॉप गाणी शोधू लागले. ऐकल्यावर श्ब्द समजले नाहीत तर (९९% वेळा) लिरिक्स शोधून शोधून ऐकू लागले. कवितांची आवड होतीच तिचाही किंचित उपयोग झाला. पक्क्या कर्क राशीच्या स्वभावानुसार जमविण्याचा छंद लागला. म्हणजे, गाणे ऐकले/विसरले असे नाही. ते टिपून ठेवा. मग मात्र गाणी एकामागोमाग सापडतच गेली. नेटची, याहू, गुगलची कृपा.
.
गाण्यांचा क्रम तर आठवत नाही. पण जशी सुचेल तशी देते. मुलगी ३ वर्षाची होती , तिने एकदा शाळेतून स्काऊटचे एक कविता/गाणे आणले - Kumbaya. त्यातील तत्त्वज्ञान पटकन आवडून गेले. आणि मग हे गाणे शोधले असता काही क्लिप्स मिळाल्या. सगळ्या ऐकल्या. बर्‍याच हौशी गायकांच्या होत्या व फार सुरील्या नव्हत्या. पण एक क्लिप सापडली carole alston या गायिकेने गायलेली. - Kumbaya गाणे. या गायिकेच्या साईटवर तिच्या आवाजाअचे वर्णन केलेल आहे - "....a voice as dark and sweet as molasses". तंतोतंत खरे आहे. वाढत जाणार्‍या ड्रम्बीटस चा ठेका देखील एकदम आवडून गेला. गायिकेचा चढत जाणारा आवाज व वेगवान होत जाणारे ड्रम्बीटस, चुटक्या/टाळ्या. मग तिची अनेक गाणी ऐकली, एकेका लिंकवरुन ऊडी मारत अन्य आफ्रिकन गायिकांची गाणी/Gospel Music ऐकले. तेव्हा Gospel music ची ओळख झाली. आजही सीडी च्या दुकानात या सेक्शनपाशी पावले रेंगाळतात. पुढे Elvis Presley ची या जॉनरमधली गाणी ऐकली. पैकी माझे सर्वात आवडते - Who Am I अतिशय शांतीचा अनुभव येतो हे गाणं ऐकताना. एल्व्हिस यांचेच In my father's house अतिशय सुमधुर गाणे आहे. अर्थही इतका सुंदर आहे. पण हेच गाणं अन्य एका गायकाने गायलेले In my father's house तितकेच सुंदर आहे. हे गाणे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही. बाकी Elvis Presley यांचा जवाब नाहीच. ते कदाचित Rock and roll करता प्रसिद्ध असतीलही पण मला त्यांचे Gospel Music च सर्वाधिक आवडते - शांत, मॅनिअ‍ॅक नसलेले.
Mormon लोकंचे Latter_Day_Saint संगीत ऐकताना, I Heard Him Come-Afterglow हे गाणे ऐकले, नंतर झोपायच्या आधी खूप दिवस तेच गाणे ऐकायचे. एका कुष्ठ्रोग्याने पहील्यांदा जिजझ क्राइस्ट यांना पाहीले व त्याला काय वाटले ते वर्णन करणारे खूप उत्कट गाणे आहे.
.
नंतर केव्हातरी Country musicची ओळख झाली. निदान मी पहील्यांदा ओढले गेले ते Johnny Cash यांच्या पत्नी June Carter Cashयांनी लिहीलेल्या आणि Johnny Cash यांनी गायलेल्या Ring of Fire या गाण्याने.

Love is a burning thing
And it makes a fiery ring.
Bound by wild desire
I fell into a ring of fire.
.
I fell into a burning ring of fire,
I went down, down, down and the flames went higher
And it burns, burns, burns,
The ring of fire, the ring of fire.

अशा प्रकारे सुरुवात आहे या गाण्याची आणि मग अधिकाधिक रंगत जाते.

The taste of love is sweet
When hearts like ours meet.
I fell for you like a child,
Oh, but the fire went wild.

ओह माय गॉड!! या गाण्यात मला जे प्रेमाबद्दल वाटतं ते शब्दात सापडले, शब्द मिळाले. येस्स हीच प्रेमाची व्याख्या. त्यातला स्ट्रेट फॉर्वर्डपणा तशीच लहान मुलांच्या प्रकृतीतील निष्कपटता. वृश्चिक आणि धनुच्या कुंपणावर बसून तळ्यात की मळ्यात करणार्‍या माझ्या शुक्राला हे फायरी, स्ट्रेट्फॉर्वर्ड, पॅशनेट गाणे न आवडते तरच नवल होते. नंतर हृदयातील सर्वोच्च गायकाचा मान कोणीच घेऊ शकलं नाही. हे गाणं, जॉनी कॅश हे गायक - हेच्च! मग अनेक आले गेले. Frank Sinatra यांना कमी अज्जिबात लेखायचे नाही. त्यांच्या रसिकांच्या मनावर त्यांनी एक काळ अधिराज्य केलच पण "रिंग ऑफ फायर" ची सर कशालाच ना आली ना येणार. जॉनी कॅश यांची अन्य २ सुंदर गाणी ऐकण्यात आली - I walk the line आणि When I first saw your face. पैकी पहीले गाणे अवीट आहेच पण दुसरेही तितकेच मंत्रमुग्ध करणार आहे. स्पेशली दुसर्‍या क्लिपमधील कॅश आनि जून यांचे फोटो. जॉनी कॅश यांची कुंडली शोधून काढली - जॉनी कॅश - मीन सूर्य्/वृश्चिक चंद्र, जुन - सूर्य कर्क. नो वंडर! नो वंडर! ते एक असोच. : )
................. मिपावरील लेख
.
फ्रॅन्क सिनात्रा यांच्या आवाजातील तारुण्य, उत्साह जर कोणी टिपले नाही तरच नवल. त्यांची खूप खूप गाणी ऐकली. You make me feel so young मधील उत्साह्/तारुण्याचा unmistakable वसंत. वा!
Rupert Holmesयांचे Pinacolada हे माझे व नवर्‍याचे अतोनात आवडते गाणे. हे लागलं की आम्ही एकमेकांना कोपर मारतो कारण शोधायला गाणे जरुर ऐका. घासून वापरुन जुने झालेले लग्न आणि त्यातून दोघांनी आपल्यापुरता शोधलेली escape (सुटका) याबद्दलचे अतिशय मिष्किल गाणे. चिरतरुण! ज्या गाण्यांबद्दल मला काही एक जिव्हाळा वाटतो ते गाणे. ; )
नंतर एक गाणे खूप शोधून सापडलेले - Moonstruckया सिनेमातील, Dean Martin या गायकाने गायलेले - That's amore किती गोड, रोमॅन्टिक. अंगावर काटा आणणारे. अजुन एक आवाज अत्यंत मादक्/नशीला असणारी गायिका - Julie London. या गायिकेची गाणीही अशीच अपघाताने सापडली व मनात जाऊन बसली.You go to my head

You go to my head
And you linger like a haunting refrain
And I find you spinning round in my brain
Like the bubbles in a glass of champagne

खरच मद्य पितोय असे वाटावे असा आवाज.
.
अजुन एक गायक आवडतात ते Tony Bennett त्यांचे Fly me to the moon हे गाणे श्रेष्ठच. "Fly" शब्दावर घेतलेली लकेर. या गाण्यात २ चित्रे आहेत एक कवि काय म्हणतो ते अतिशय उपमा व काव्याने ओतप्रोत आणि दुसरे त्याच्या व्यवहारी प्रेयसीसाठी कविने केलेल भाषांतर. दोन्ही मूडस इतके सुंदर पकडले आहेत.
.
अजुनही नवी गाणी सापडत आहेत. थ्रिल वाटते, काळजाचा ठोका चुकतो. प्रवास चालूच आहे.

- तूर्तास समाप्त -

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

Country Music ऐकता का? मला वाटते हे पुष्कळसे मराठी भावगीतांसारखे असते. सोप्या चाली, वाद्यांचा फार गोंगाट नाही, स्पष्ट अर्थवाही शब्द...

दोन नमुने Country Roads, Take Me Home...
The House of Bamboo

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दरचनेमधे जास्त अलंकारिकता / गूढता न आणता, बहुतांशवेळी एखादी कथा सांगितल्याप्रमाणे स्पष्ट तपशील असणं. नोटेशन आणि तत्सम गोष्टींच्या नादी न लागता थेट गिटार हाती घेऊन शेकोटीभोवती म्हटल्यासारखी उत्स्फूर्त गाणी असं यांचं स्वरुप असतं.

-जुगारी
-रुबी तुझं प्रेम शहराकडे नेऊ नको
-माझ्यासाठी गुलाब खरेदी कर
-ल्युसिल तू मला सोडण्यासाठी उत्तम वेळ निवडलीस
-उत्तर हवेत फुंकलं जात आहे
-एका विशिष्ट विभागातला पळपुटा
-तळ्यावर

ही सर्व कंट्री गाणी फारच अप्रतिम आहेत. जरुर ऐकावीत.

जुगारी या गाण्यामधे काही संग्राह्य ओळी आहेत.

You've got to know when to hold 'em
Know when to fold 'em
Know when to walk away
And know when to run
You never count your money
When you're sittin' at the table
There'll be time enough for counting
When the dealin's done

Every gambler knows
That the secret to survivin'
Is knowin' what to throw away
And knowin' what to keep
'Cause every hand's a winner
And every hand's a loser
And the best that you can hope for is to die
In your sleep

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय अफलातून ओळी आहेत वा! काय शब्द वापरु - जीवनाचे किती सुंदर तत्वज्ञान आहे. सुभानल्ला!

Know when to fold 'em
Know when to walk away
And know when to run

Let go! Let go! कुठे थांबायचे हे कळावे लागते नाहीतर सर्व जाते Sad
___
गवि ही गाणी ऐकेन नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॅम्बलर अजून ऐकलं नाहीत केनी रॉजर्सचं ? जरुर ऐका.

आणि "रुबी डोन्ट टेक योर लव्ह टु टाऊन" या गाण्यात युद्धात जखमी, पॅरॅलाईज्ड होऊन परतलेला बेडरिडन झालेला पुरुष आपल्या जोडीदारिणीला घराबाहेर (अन्य पुरुषाकडे) जाऊ नये म्हणून विनवतोय, कम् दोष देतोय.

तुझ्या वयाच्या तरुण स्त्रीच्या गरजा मी आता पूर्ण करु शकत नाही हे मला मान्य आहे, पण तरीही, रुबी, मला सोबतीची गरज आहेच्..मी फार काळ जगणार नाही असं मी ऐकलं आहे, तेव्हा संध्याकाळी बाहेर जाऊन प्रेम इतरत्र वाटू नकोस..वगैरे बरंच काही बोलताना शेवटी ती लक्ष न देता दार आपटून निघून जाते तेव्हा असहाय तडफडीने तो म्हणतो की "मी जर हलू शकत असतो तर माझी बंदूक घेऊन हिला ठार केलं असतं".

इथे मर्यादा ओलांडल्यासारखी होते. या वाक्याला केनी रॉजर्स पोचला की लोकही टाळ्या वगैरे वाजवायचे. त्यामुळे हे गाणं वादग्रस्त झालं होतं.

त्यावर उत्तर म्हणून Geraldine Stevens या आर्टिस्टने "Billy, I have to go to town" असं त्या तरुण स्त्रीची बाजू सांगणारं गाणं रिलीज केलं.

प्रसिद्ध गाण्याला प्रत्युत्तर म्हणून गाणं असा प्रकार कमी बघायला मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! गाणे खूप छान खुलवुन सांगीतलेत गवि. नक्कीच ऐकते. किती स्फोटक आहे ते गाणं!
___
गवि ल्युसिल ऐका Smile केनी रॉजर्स यांचे. ओह डियर! तेदेखील फारच सुंदर आहे. डोळ्यात पाणी येईल इतकं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर माझ्या लिस्टेत होतं की..-ल्युसिल तू मला सोडण्यासाठी उत्तम वेळ निवडलीस.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile खरच!
____
"गॅम्ब्लर" - वा! काय सुंदर गाणं आहे. वा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गाण्यामुळे उगीचच टोलेडो नावाच्या गावातल्या एका बारमधे जाऊन बसण्याची मीनिंगलेस पण जोरदार इच्छा झाली.

खेरीज एकदा सुरुवातीच्या र्यांडम ऐकण्यात चुकीने "फोर हंड्रेड चिल्ड्रेन" असा आकडा ऐकून हबकलो आणि लुसिलचा त्याला सोडून जाण्याचा निर्णय काही क्षणांपुरता प्रचंड जस्टिफायेबल बनला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुबी डोन्ट टेक युअर लव्ह टू टाऊन - निव्वळ मास्टरपिस. गवि __/\__
___
गवि धागा वस्सुल!!!
_____

लुसिलचा त्याला सोडून जाण्याचा निर्णय काही क्षणांपुरता प्रचंड जस्टिफायेबल बनला..

हाहाहा

_____
गवि "आज त्याने तिच्यावर प्रेम करणे थांबविले" ऐका. ग्रेट प्रेमगीत आहे.
https://www.youtube.com/watch?v=VExw77xJsBQ
_____
तुम्ही वर सांगीतलेले,ब्लोइंग इन द विंड हे व्हर्जन देखील आवडते आहे.- https://www.youtube.com/watch?v=RsjiSfAmEeo
___
Grease - Summer Nights - https://www.youtube.com/watch?v=ZW0DfsCzfq4
ऐकलय की नाही?
मुलगी काही रोमँटिक व्हर्जन सांगतेय, मुलगा तीच घटना टारगटपणे सांगतोय.
फार आवडतं.
_____
एका विशिष्ट विभागातला पळपुटा - वॉव मस्त आहे हे गाणे.

Twenty years of crawling
Was bottled up inside him
He wasn't holding nothing back
He let 'em have it all
Tommy left the bar room
Not a Gatlin boy was standing
He said, This one's for Becky
As he watched the last one fall
N' I heard him say

I promised you, Dad
Not to do the things you've done
I walk away from trouble when I can
Now please don't think I'm weak
I didn't turn the other cheek
Papa, I should hope you understand
Sometimes you gotta fight
When you're a man

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाऊस ऑफ बँबु नंबर ५४ / बांबुच्या वनात .... अशी काहीतरी मराठी नक्कलही आहे. आत्ता ऐकते आहे. काय पेपी गाणे आहे Smile धन्यवाद कोल्हटकरजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्ट्री म्यूझिकमध्ये डॉन विल्यम्सची गाणी ऐकली नसतील तर वानगीदाखल ही दोन -
१.

२.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शूट!! ऑफिसमध्ये रडू येतय. पहीलं जस्ट ऐकतेय. किती किती हळवं आहे.
दुसरंही छान आहे. पण पहीलं ..... डॅम गुड!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! छंदाची वाट बिकट नसतेच नाही कधी? तिथल्या कष्टांच्याही आपापल्या सुरस गोष्टी असतात. मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान लिहिलं आहेस शुचि.

मी इंग्लिश गाणी/संगीत आवर्जून ऐकते असं अजूनही होत नाही. पण कधीतरी, कुठूनतरी एखादं गाणं कानावर पडतं, लक्ष देऊन ऐकलं जातं, ते आवडलं तर त्या कलाकारांची गाणी आवर्जून ऐकली जातात. मागे रोचनाने कोणत्याशा धाग्यात जोनी मिचेलचं 'अर्ज फॉर गोईंग'ची लिंक दिली होती. ते आवडलं, मग तिची बरीच गाणी ऐकली; बरीचशी आवडली. केरी अंडरवूडची 'ब्लोन अवे' आणि 'टू ब्लॅक कॅडीलॅक्स', आणि अॅलिसन क्राऊसचं 'द लकी वन' ह्या गाण्यांमुळे या कलाकारांची बरीच गाणी ऐकली. अॅलिसन क्राऊस बरीच वाद्यंही वाजवते; तिच्या आवाजात सेलीन दिऑंसारखी पकड नाही, ती गायिका म्हणून सेलिन दिऑंएवढी व्हर्सटाईलही नाही; पण गाण्यांचे अर्थ अधिक आवडतात. जरा बुद्धीवान, कर्तृत्ववान स्त्री असल्याचं जाणवतं. सेलीन दिऑंची गाणी तिच्या आवाजासाठी ऐकली जातात; तिचा आवाज आणि गायकीवरची हुकुमत आवडते; पण शब्द समजूनही अर्थाकडे कानाडोळा करावा लागतो. त्यातल्या त्यात 'फॉलिंग इनटू यू' अर्थाच्या बाबतीत उजवं. (हल्लीच्या काळात जी गाणी ऐकली जातात ती सगळी स्त्रियांचीच आहेत हा निव्वळ योगायोग. अॅलिसन क्राऊस आणि केरी अंडरवूड या दोघींची ओळख बऱ्या अर्ध्यामुळे झाली.)

काही गाण्यांची सवय झाल्याशिवाय ती आवडत नाहीत; तसंही अनेक गाण्यांचं झालं.

एकेकाळी मित्रामुळे प्रॉग रॉक प्रकारची गाणी ऐकली जात असत. या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा शोधून ऐकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थँक्स ऐकते अदिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! फारच दिलसे उतरलं आहे! वाचायला खूपच मजा आली.

==

बालगीतं सोडली तर माझ्या आठ्वणीत पहिलं इंग्रजी गाणं जे मनात घर वैग्रे करून बसलं ते बॉयझोनचं "इट्स ऑन्ली वर्ड्स.." रितसर स्वत:ला कफल्लक वगैरे घोषित करूनही प्रेमाचा इजहार वगैरे करणारं गाणं होतं.. त्या गुलाबी वयात ते गाणं ऐकल्यावर अगदी या हृदयीचे त्या हृदयी वगैरे झालेलं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋ. बॉयझोन चे ठीक वाटले. अर्थात त्या वयात आवडतात अशी गाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
आधी इंग्रजी गाणी म्हणजे नुसता गोंगाट अशा समजातून कधी फारशी ऐकलीच नव्हती. साडेतीन-चार वर्षांपूर्वी प्रास ह्यांनी मिपावर बीटलमेनिया ही मालिका सुरू केली होती. बीटल्स ह्या बँडचे एखादे गाणे, त्या गाण्याचा अर्थ, गाण्याची पार्श्वभूमी, संबंधित किस्से असे साधारण स्वरूप होते. त्याचे त्यांनी एकूण ४ भाग लिहिले होते. ते लेखन आणि त्यात उल्लेखलेली गाणी आवडली होती. बीटल्सची बरीच कीर्ती ऐकून होतो. त्यामुळे त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत बीटल्सची गाणी ऐकणे सुरू केले. आणि हळुहळू बीटल्सचा एकदम जोरदार पंखा झालो. काही ठेकेबाज गाणी, काही एकदम शांत गाणी, सतार-तबला वापरलेली काही गाणी, काय काय वेगवेगळे, पहिल्यांदा गोंगाट वाटणारे आवाज असणारी गाणी आवडत गेली. माझा रूममेटपण बीटल्सचा पंखा झाला आणि मग काय बोलायलाच नको.
असेच युट्यूबवर बीटल्सची गाणी हुडकताना सायमन अँड गार्फंकेल सापडले. दोन गायक आणि बऱ्याचदा केवळ अॅकॉस्टिक गिटार इतकेच असलेली गाणी भरपूर ऐकायला लागलो. मध्येच अॅडेलबैंचे गारूड बसले, ते अजून उतरलेले नाही. ह्या सगळ्यानंतर रँडम इंग्रजी गाणी ऐकण्याचे प्रमाण तसे बरेच वाढले आहे. सुरुवातीला केवळ गोंगाट असे वाटून न आवडणारी काही गाणी आजकाल आवडू लागली आहेत. (उदा. हे)
अनेकदा इंग्रजी गाण्यांचे शब्द अगदी नीट लक्ष देऊन ऐकल्याशिवाय कळत नाहीत, पण त्याने तितका फरक पडतो असे वाटत नाही. शब्द नसलेले वाद्यसंगीत किंवा अनेक तमिळ गाणी भाषा न कळूनही आवडतातच. तसेही बऱ्याचदा मराठी आणि हिंदी गाण्यांचे शब्द कळूनही माझ्या डोक्यात अर्थ घुसत नाही, तेव्हा चालायचेच! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा गारफन्कल .... फार्च छान. तो ग्रॅज्युएट सिनेमाच मस्त आहे. थोडी अ‍ॅडल्टच थीम आहे. पण काय अ‍ॅक्टिंग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी गाणी फार ऐकत नाही. मित्रांच्या संगतीमुळे मेटालिका, पिंक फ्लॉइड यांची काही गाणी ऐकली. ती आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मेटालिकाच्या "द अनफर्गिव्हन"साठी अन्य बर्‍याच गाण्यात केलेला गणगणाट माफ..

डायर स्ट्रेट्स ऐकता का? वॉक ऑफ लाईफ, सल्टन्स ऑफ स्विन्ग्ज वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डायर स्ट्रेट्स कधी काळी ऐकायचो. आवर्जून ऐकावी असं नाय वाटत आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पिंक फ्लॉईडसाठी सोबत इतर काही गोष्टी असल्या तर गाण्यांची रंगत अधिक वाढते असा माझा अनुभव आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा. अगदी अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शक्य असले तर यु ट्युब वरचे गाणे बघा. जॉर्ज जेंटली नावाच्या इंग्लिश टीव्ही सिरीयल मधे आहे.

ते गाणे गाताना आणि व्हायोलिन वाजवताना त्या नटीने काय अ‍ॅक्टींग केली आहे. अनीवे, ती स्वता गाणारीच आहे ऑस्ट्रेलियाची आहे.

https://www.youtube.com/watch?v=e2vQ9G0tpIg

मला ऑफिस मधुन यु ट्युब बघता येत नाही, त्यामुळे ही जर लिन्क बरोबर नसेल तर हा सर्च वापरा "Ebony Buckle Matty Groves desktop - YouTube"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की ऐकते/पहाते अनु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहाण्यासारखे जास्त आहे.

हे अवांतर आहे तरी टाकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐकण्यासारखे व पहाण्यासारखे आहे. फार आवडले. गोइन्ग स्ट्रेट इन्टू माय लिस्ट.
____
अनु लिंड्से स्ट्र्लिंग चे व्हायलिन वादन्/गाणी ऐक व बघ. तुला आवडतील. काय वाजवते ग ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही गोष्टी लिहायच्या राहील्या. आता यात माझी अंधश्रद्धा/ज्योतिष डोकावणार आहे पण मला सांगावेसे वाटते.... -

(१) जुन कार्टर = सूर्यरास कर्क, जॉनी कॅश = सूर्यरास मीन आणि मंगळ व चंद्र धरुन, ५ ग्रह जलराशीत. इतकी सुंदर कंपॅटिबिलिटी आहे दोघांची. आणि अशी कंपॅटिबिलिटी अनेकांचे असेल पण हे दोघे असामान्य असल्याने, निर्मितीक्षमतेमध्ये ती एनर्जी चॅनाऐझ झालेली/ट्रान्सेन्ड झालेली दिसते. नंतर आत्ताआत्ता जून आणि जॉनी कॅश यांच्या मुलीचे -रोझॅन कॅश यांचेही एक गाणे ऐकले.या गाण्याआधी ती ३ मिनिटे तिच्या वडीलांबद्दल इतकं छान बोलली आहे. हे ते मधुर गाणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकाने आपापल्या छंदाविषयी जरा लेख टाका की. खूप मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोहक सूचना आहे, विचाराधीन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा ... काय भारी लिहिलं आहे, आणि प्रतिसाद पण अतिशय छान आहेत.

आता ही गाणी ऐकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्हाला एरिक क्लॅप्टनची गाणी अतिशय आवडतील असा अंदाज आहे.
'यु लुक वंडरफुल टुनाइट'
'कोकेन'
'आय शॉट द शेरीफ'

बिली जोएलचीही गाणी मस्त आहेत.

'पियानोमॅन'
'अपटाउन गर्ल'
'शी इज ऑलवेज अ वुमन टु मी'
'ओन्ली द गुड डाय यंग'

त्यातली शेवटची दोन भन्नाट आहेत. पहिल्या गाण्यात त्याच्या प्रेयसीचं वर्णन आहे. अत्यंत कठोर, हार्श वाटणारी, टक्केटोणपे खाल्लेली, आणि ते पचवून ताठ उभी राहू शकणारी टगी बाई - दुसऱ्या बाजूला अत्यंत हळूवार होऊ शकणारी, त्याच्या आयुष्यातलं सगळं सुंदर जे आहे ते फुलवू शकणारी.

ओन्ली द गुड डाय यंग मध्ये भयंकर वात्रटपणे एका अत्यंत नाकासमोर चालणाऱ्या व्हर्जिनिया नावाच्या कॅथोलिक मुलीला 'ए, दे ना' म्हणत मागे लांगलेला डांबरट तरुण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I'd rather laugh with the sinners than cry with the saints
The sinners are much more fun

सॉलिड!!! एकदम मस्त वात्रट गाणं आहे Smile
____

She will promise you more
Than the Garden of Eden
Then she'll carelessly cut you
And laugh while you're bleedin'
But she'll bring out the best
And the worst you can be
Blame it all on yourself
Cause she's always a woman to me

सुपर्ब!!! सुपर्ब!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेच्या शेवटी शेवटी इंग्रजी गाण्यांची आवड लागली. तेव्हा शब्द काही कळायचे नाहीत (कारण आम्ही मराठी मीडियमचे) पण स्वर आणि ड्रम्स/बेसवर धरलेला ताल वगैरे छान वाटायचे. ११वीत गेल्यावर इंग्रजी मीडियमच्या पोरापोरींसोबत राहून आणि एमटीव्ही/च्यानल व्ही वगैरे पाहून (हो, तेव्हा एमटीव्हीवर गाणी वगैरे पण लागायची, तो फक्त रियालिटी शोजचा च्यानल नव्हता) थोडं अधिक कळायला लागलं. प्यारलली शास्त्रीय संगीताची आवडही वाढत होती. साधारण इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षाच्या शेवटी शास्त्रीय शिकायला सुरुवात केली आणि त्याचं गारुड असं काही बसलं, की इंग्रजी गाणी वगैरे डोक्यातून पार कुठल्या कुठे फेकलं गेलं. आजकाल सटीसामाशी एखादं गाणं ऐकलं जातं.

असो, तेव्हा अगदी सुरुवातीला ब्याकस्ट्रीट बॉइज, वेस्टलाईफ, सेलिन दियाँ वगैरे ऐकायचो. मग निर्वाना, रामस्टाईन, पिंक फ्लॉईड, रेड हॉट चिली पेपर्स, मेटॅलिका, इव्हॅनसन्स वगैरे ऐकण्यापर्यंत प्रगती झाली. त्यातच मध्ये सेपल्टूरा, ओपेथ, फियर फॅक्टरी वगैरे मंडळीही कानात आणि डोक्यात दंगा करून गेली. पुढे इंग्रजीच म्हणता येणार नाही पण यान्नी, एनिग्मा वगैरेही भरपूर ऐकलं. एनिग्मा आजही ऐकतो. मध्यंतरी पावरोट्टी, थ्री टेनॉर्स, बॉचेली वगैरेही थोडे फार ऐकले. पण शास्त्रीयचा खांब सोडायला अजून जमलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारण इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षाच्या शेवटी शास्त्रीय शिकायला सुरुवात केली आणि त्याचं गारुड असं काही बसलं, की इंग्रजी गाणी वगैरे डोक्यातून पार कुठल्या कुठे फेकलं गेलं.

भटांनो, मला वाटलं होतं तुम्ही लहानपणापासून शास्त्रीय संगीत शिकत/शिकलेले असावा.

लय भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओन्ली ब्राझील ...

https://m.youtube.com/watch?v=eA2oQ6TrYf0

बस्स .,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंट्री म्युजिक नि आमच्या विली नेल्सनचा उल्लेख नाही. कुठे फेडाल ही पापं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडं मला पण सांगायचंय विषयांतर होतंय थोडंसं पण असो.शालेय जीवन संपेपर्यंत इंग्रजीचा आणि माझा संपर्क परीक्षेपुरताच असायचा. या विषयात नेहमी मार्क्स चांगले मिळायचे. पण ते सोडून इंग्रजी जगाशी पूर्णत: अनभिज्ञ होतो. मराठी खूप वाचायचो पण इंग्रजी मनाला भिडायची नाही. ९वीत मात्र wwe पाहायचं वेड लागलं. वेड्यासारखं बघायचो. ती भारताबाहेरच्या इंग्रजी विश्वाशी माझी झालेली पहिली ओळख. (जुरासिक पार्क,टायटॅनिक पाहिलेले लहानपणी पण डब केलेले). बऱ्याचदा उच्चार कळायचे नाहीत. कळाले तरी अनेक शब्द डोक्यावरून जायचे. पण ११वी नंतर मात्र हळूहळू भाषेची गोडी लागायला लागली. तरीही जेमतेमच. चित्रपट पाहण्याचा तर प्रश्नच नव्हता. स्टार मुवीज किंवा एचबीओ चुकुनदेखील लावलेलं दिसलं तरी आईचे डोळे वटारले जायचे. आणि नाहीतरी मलाही तसा फारसा रस नसायचाच कारण काही कळायचं नाही. ११-१२वीत कॉलेजात कॉन्वेंटमधून आलेली मुलं इंग्रजी चित्रपटांबद्दल चर्चा करायची तेव्हा नवल वाटायचं. गाण्यांशी तर माझा दूर दूर वर काही संबंध नव्हता.
कॉलेजात गेल्यावर मात्र परिस्थिती बदलली. कॉलेजमधले अनेक मित्र त्यावेळी लिंकीन पार्क, एकॉन, एन्रिके इग्लीयासीस,ब्ल्यू, बॅॅकस्ट्रीट बॉईज, ब्रायन अॅडम्सची गाणी खूप ऐकायचे. त्यामुळे सतत कानावर पडू लागली. खासकरून सबमिशन, पिएल, वायवा, परीक्षेच्या वेळी लिंकीन पार्क चं 'In the end' मुलं हमखास ऐकायची. ते गाणं त्यावेळी जवळपास प्रत्यकाच्या मोबाईलमध्ये असायचं (mp३ मोबाईल ही त्यावेळी तशी नवीच गोष्ट). पण अजूनही मला फारशी आवडायची नाहीत ती गाणी. माझ्याकडे mp३ चा मोबाईल नसल्याने बऱ्याचदा मित्राचा मोबाईल घेऊन त्यावर गाणी ऐकत बसायचो. पण इंग्रजी गाणं प्लेलिस्ट मध्ये आलं की नेक्स्टचं बटण दाबायचो.
एकदा मात्र खूप टेन्शन आलेलं. अभ्यास करूनदेखील पेपर प्रचंड अवघड गेला. उदास मनाने रूमवर आलो. मित्र झोपलेला. त्याचा मोबाईल घेतला आणि सरळ 'in the end' गाणं कानात हेडफोन टाकून फुल आवाजात लावलं. परिस्थिती आणि गाण्याचे बोल यांत कमालीचं सार्धम्य असल्यामुळे गाणं कमालीचं भिडलं मनाला. पुन्हा पुन्हा ऐकलं. मग त्यांनतर त्याच्या फोनवर लिंकीन पार्कचीच अजून गाणी ऐकली. हळूहळू आवडायला लागली. त्यांची 'leave out all the rest' आणि 'in my remains' ही गाणी माझ्या सगळ्यात आवडीची. आणि हीच इंग्रजी गाणी ऐकण्याची आणि आवडण्याची माझी सुरुवात. तरी अजून फार दूरवर माझी मजल गेलेली नाही. अभी भी बच्चा हुं असंच म्हणावं लागेल. इंग्रजी गाणी अजूनही फारशी ऐकत नाही. पण जी मनापासून आवडतात ती आवर्जून ऐकतो.
मग हळू हळू इंग्रजी चित्रपटांची ओळख होत गेली. मारामारी, स्टंट आणि सेक्स याच्याही पलीकडे इंग्रजी सिनेमा आहे हे कळत गेलं. मनाला थेट भिडलेला पहिला इंग्रजी चित्रपट म्हणजे द ब्युटीफुल माइंड. ती इंग्रजी चित्रपट आवडू लागण्याची सुरुवात होती. त्यानंतर जमेल तसे मित्रांकडून इंग्रजी चित्रपट घेतले आणि पाहिले आणि मग गोडी लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी गाण्यांची आवड कशी निर्माण झाली/केली लेख अप्रतिम आहे...
मी इंग्रजी गाण्यांच्या वाटेला कधी गेलोच नाही...
कारण अजून भीमसेन पूर्ण ऐकायचे राहिलेत...
त्यांच्या तोडी ची-
‘चंगे नैनों वाली कुडियां,
सदारंग नी देंदियां सैनत...’ लज्जत न्यारीच आहे...
शिवाय शंकरा...
‘आदि महादेव...बीन बजाई...’
कितीकदा ऐकलं तरी पुन्हां-पुन्हां एेकावंसं वाटतं.
दरबारी तील
‘अौर नहीं कछु काम...
मैं भरोसे अपने राम के...’
एकदम खतरनाक...
पण विषय आहे इंग्रजी गाण्यांचा...
मर्लिन मनरो चा चित्रपट बघितला होता-‘जेंटलमेन प्रिफर ब्लांड्स’
या चित्रपटांत मर्लिन सोबत जेन रसेल होती. दोघी मैत्रिणी असतांत...त्या दोघींनी म्हटलेली गीते आवडली होती...
When love goes wrong,
Nothing goes right...
------------
Diomands are the girls
best friends...
------------
या शिवाय फ्रैंक सिनात्राचा एक पिक्चर बघितला होता-त्यांत तीन मित्र न्यूयार्क मधे भटकतात...तेेव्हां ते हे गाणं म्हणतांत-
New York New York,
It’s wonderful town...
-------------
या शिवाय फ्रेड एस्टेयर चे काही म्यूजिकल्स बघितले, त्यांतील फ्रेड चे पदलालित्य अप्रतिम होते...
यांचं पिक्चराइजेशन बघतांना आवडायचं.
दाेन आठवडयांपूर्वीच फ्रेड एस्टेयरचा रायल वेडिंग रात्रभर जागून बघितला...
मैडम माहेरी गेल्या होत्या म्हणून त्या तीन दिवसांत रात्री घरी गेल्यावर मोबाइलवर तीन पिक्चर बघितले...त्यात फ्रेड एस्टेयर चा ‘रायल वेडिंग’, ‘लाइफ आफ बेरनाडेट’ आणि सर जेम्स स्टुअर्टचा ‘ब्रोकन एरो’ सामिल होते...
तरी अजून इंग्रजी गाणी ऐकण्याची मनापासून इच्छा झालेली नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

हां ते डायमंड आर गर्ल'स बेस्ट फ्रेन्ड का कायसं गाणं प्रसिद्ध आहे पण मला त्यातला भौतिकवाद आवडत नसल्याने मला ते सहनच होत नाही Sad
न्यु यॉर्क न्यु यॉर्क ऐकेन.
"रिव्हर ऑफ नो रिटर्न" मधील गाणी जरुर ऐका. मर्लिन नेच गायलेली आहेत. फार फार गोड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिवर आफ नो रिटर्न बघितलाय...
थीम सांग मधील आशयघनता समजल्यावर पिक्चर बघतांना आणखीन मजा आली...
पुन्हां बघतांना मनरोवी गाणी नक्की ऐकणाार...
न्यु यॉर्क न्यु यॉर्क यू ट्यूब वर आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

योगायोगाने मी सध्या आशुतोश जावडेकर यांचे 'लयपश्चिमा' वाचतेय. ह्याच संदर्भात आहे.
ते वाचुन झाल्यावर तुझ्य प्रोफाइल मध्ये लिहिलेली आणि इथे लिहिलेली गाणी नक्की बघेन.
शिवाय माझी मुलं हात धुऊन मागेच लागली आहेत की मी इन्ग्रजी गाणी पण ऐकावीत म्हणुन.
त्यानी सांगितलेली देखील ऐकायची आहेत.
तुझा हा लेख अगदी मनापसुन लिहिलाय असं वाटतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

थँक्स उल्का. प्रोफाइल मधली गाणी नक्की ऐक. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0