Skip to main content

अजिंक्य दर्शनेच्या कविता

पॉर्न ओके प्लीज कविता

अजिंक्य दर्शनेच्या कविता

- अजिंक्य

ते प्रेमबीम की काय ते...

ते प्रेमबीम की काय ते....
लाईफ तसं बरंच
चाल्लं होतं की
दोघांचं! हॅपनिंगरहित
आणि तथाकथित कोमट

भरता भरता
अब्सडिर्टीचे रकाने
ओतंतच होतोे की
आपण एकमेकांच्यात
कॉफीचा कैफ!
कधी वन-बाय-टू
तर कधी घोट-घोट

अन् मग त्या दिवशी
शुगर क्रिस्टल्स शिंपडताना
तू अचानक रेडिओऍक्टिव्ह हसलीस...

तुझे व्होलॅटाईल श्वास
माझ्या कानांवर खिळले
माझे अनेक पॉज
तुझ्या डोळ्यांनी गिळले

दाखवलास मग तू
मला तुझा प्रदेश,
कोरलेले पुरुषी नकाशे आणि
जागवल्यास परदेशी ओल्या आठवणी

मंतरलेस स्वप्नांचे सडे
कोईन्सिडन्सेसचे दाखले देत देत
आणि काढत राहिलीस बरेच कपडे
मला आत शोषून घेत घेत

मीपण मग सुटा झालो
स्पर्श हळुवार पण उष्ण दिले
कॉपी पेस्ट करत तुझा चेहरा
फॅंटसीन्सना मुके केले

माझं टेक्स तुझ्यावर चढलं काय
तुझं हेवी सबटेक्स मला कळलं काय

थोडं म्युटेशनच झालं आपल्या दोघांच्यात!

मग मात्र तू बिथरलीस...

तुझे सगळे पासवर्ड शोधत
माझ्या रात्रीत फिरलीस
बाजारातल्या खेळण्यांमधे
दिवसभर रमलीस

वाचल्यास माझ्या सर्व कविता
मलाच डिलीट करायला
प्रयत्न केलास शिरायचा
अंतरंगात वगैरे

तरीही अजून मी तुझ्यात
उरतोच आहे म्हटल्यावर
कंझ्यूम कंझ्यूम कंझ्यूम
केलंस मला!

आता तू कन्फेशन मारतीयेस
त्यापेक्षा खरं बोलायचंच असेल
तर पूरेपूर खाऊन घे मला
बघ रेंगाळतीये का
जिभेवर कुठली चव?
बाकी आहे का तुझ्यात
अजून तोच किरणोत्सर्ग?

कारण फक्त त्यानेच
होऊ शकतो आपण परत म्युटंट
आणि होऊ शकतं आपल्यात
ते प्रेमबीम की काय ते....

================================

२. ये़डझवा ऑलराऊंडर

धुरंधरांचं पथक, पथकीय धुरंधर
मुलींचे ढोल, ढोलवाल्या मुली
पहिले पहिले व्हॉट्स अप,
नंतर नंतर व्हॉट्स ऍप
घुसणारे गोंडे, उडणारे बॉल्स
सायलेंट लोचट मिस्ड कॉल्स
व्हाईब्रेटिंग अर्लट्स वाजवून वाजवून
थकतोय....एक येडझवा ऑलराऊंडर…

३६ सी ओठांची उष्ण हुरहुर
लेजच्या पॅकेटची चुरचुर
आपाची आरटीआर १८०
लेमन ट्री मधला टकीला,
झूम इन, झूम आऊट
येकदम फुल्ल नाच्चो
रात्री साडे तीन, कॅबड्रॉप फ्रॉम हिंजवडी
रामबाग कॉलनीतला बलात्कार
मिटक्या मारत बघतोय...एक येडझवा ऑलराऊंडर...

ब्राम्हण, मराठा, दलित, बौद्ध टॅग्ज
त्यांची झवझवती डोळ्यांची पाती,
वरच्या, मधल्या, खालच्या
औष्ठ्य सिक्रोनाईज्ड हालचाली
सॅटरडे लेट नाईट शो,
डबल बेड, सायट्रीक व्होडका
ब्लॅकबेरी स्विच्ड ऑफ
४० हजार टेक होमच्या सेफ छातीनीशी
चढतोय...एक येडझवा ऑलराऊंडर…

================================

३. ऊफ्फ…

69, मिशनरी, डॉगी
वीर्याळलेली पहाट
कोकीळेचं नरडं

कोंबड्याचा मोबाईल आलार्म
ओलावल्याएली पँट
पाणावल्याएले डोळे

अंगाला फुटलेलं पांघरूण
सेमी-ट्रान्स्परंट खिडकी
पहाटलेला ब्रश, व्हिंटेज मोड

सकाळ ऊर्फ रद्दी
दूध ऊर्फ चितळे
बाई ऊर्फ सुवर्णा

पोळ्या ऊर्फ कागद
भाजी ऊर्फ लगदा
चहा ऊर्फ चॉकलेटी साय

एक कावळी आंघोळ
झिजलेला लक्स
मळीचा फ्लक्स

गरम पाणी
गरम बाथरूम
वाफाळलेला मी

तरारलेल्या फँटसीज्
काही फटीग फेल्युअर्स
आणि दारावर थाप

अर्धवट ओलं शरीर
अर्धवट हातातलं ‘काम’
अर्धवटलेली झपझप पाऊलं

लक्ष्मी अष्टक, भक्तीसागर
उदबत्त्या, गूळ खोबरं, जप वगैरे
सगळंच तिनदा तिनदा...

पँटीनच्या केसांवर तीर्थ
पुसटसं एक थेंब कुंकू
श्रद्धाळलेले गंध

लिफ्ट बंद
चढणा-या पाय-या
ओझरता कुजलेला डक्ट

125 सी सी, बटन स्टार्ट
ढर्रर्रर्र...ढर्रर्रर्ऱ...ढर्रर्रर्र...
गाडी बंद, गोट्या कपाळात

प्रतीक्षा दुग्धाळ हसतीये
अगं थांब..एवढं काय झालंय
मादक तुषार, कपाळात गरमाहट

कॉक रिझर्व्हवर पिळला
ढर्रर्र..गाडी स्टार्ट..टोटल कंट्रॉल
प्रतीक्षा हसतीय्ये..मी बुंग...

पत्र्या मारूती, ऑफीसला उशीर
मग ख्रिश्चनी नमस्कार
फक्..मुलचंदानी एकडे काय करतीये?

मी हजर, ती हाय, भिमरूपी येतं?
मी हो, तिच्या जवळ, मोठ्याने पुटपुटतो
लिटील लाऊडर..साली मंदीरात काय एरोटिक हसते?

भिमरूपी...बिच हसणं थांबव
महारूद्रा...ए शिवू नकोस
भिमरूपी..69, मिशनरी, डॉगी
फक्...लेट मी कॉन्सट्रेट यू बिच...भि..म..रू..पी...

================================

४. फक्‌

fucK.… FucKK…....
fuCkkkkk...fUckkkkkkk...
FUCkkk fuckkk...
FuuuuuuuUCkkkkkkk...
FUCK…....
यू डर्टी माईंड
शक्तिमॅन इज कमिंग!

ह्या पाचकळ जोकचा
एस.म.एस.
वाचत असताना;

बाईक बीआरटी पासून
१०० फूट दूर लावलेली
असताना;

येतो एक लाल डब्बा,
व खिडकीमधून टाकतो
एक तांबडी जर्द पिचकारी;

जी पडते स्ट्रेट माझ्या,
नुकत्याच घेतलेल्या,
ऑरेंज कलरच्या
Fcuk च्या ओरिजनल
जर्किंनवर!

त्या थुंकाळलेल्या
तोंडाकडे बघून,
शिवी हासडतो
ती मात्र मराठीत
ए SS मादरचोत...
आणि उगारतो,
माझं मधलं बोट !

================================

फेसबुकावर पूर्वप्रकाशित

विशेषांक प्रकार

'न'वी बाजू Thu, 02/06/2016 - 17:57

फक्ड अप.

केवळ 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य' म्हणून या असल्यांना नि त्या मन्या जोशी छापांना चालवून घ्यावे लागते. (द्याट इज़, प्रोवायडेड, यांनी स्वत: येऊन स्वत:च्या वॉलिशनने हे दळण इथे टाकले असले तर. हे जर आमंत्रित लिखाण असेल, तर यांना आमंत्रण देणाऱ्यांबद्दल काय बोलावे!)

असो चालायचेच. (रादर, इत:पर हे असलेच चालवून घ्यावे लागणार असे दिसते.)

इत्यलम्|

मेघना भुस्कुटे Tue, 14/06/2016 - 09:21

कोर्‍याकरकरीत प्रतिमा. रेडिओअ‍ॅक्टिव्ह हसणं, सेमीट्रान्स्परंट खिडकी, त्याचं-तिचं टेक्स्ट-सबटेक्स्ट, वीर्याळलेली पहाट, थुंकाळलेलं तोंड, दुग्धाळ हसणं...

चरचरीत विरोधाभास. मंदिरातलं इरॉटिक हसणं, Fcuk च्या जर्कीनवरची पिचकारी, पथकातल्या ढोलवाल्या मुली आणि पुढचे उडणारे बॉल्स, पॅंटीनच्या केसांवर तीर्थ...

आधुनिक - अजूनाजूनाजून भोगासह आणि भोगामुळे आधुनिक - जगण्यातलं पॉर्न आणि अपरिहार्य जैविक शृंगार - दोन्हीचं कोलाज.

अगदी निराळं. फ्रेश.