जलपर्णीच्या नशिबाचा तिसरा फेरा : नागिनधुरळा
उपोद्घात | पहिला फेरा | दुसरा फेरा | तिसरा फेरा | साडेतिसरा फेरा
_________
जलपर्णीच्या नशिबाचा तिसरा फेरा : नागिनधुरळा
- आदूबाळ
आनन्दध्वज तसा मूलत: शान्तप्रवृत्ती. कर्णकटुत्व, आक्रस्तालिता, टैनशन्य आदि आधुनिक जीवनशैलीशी निगडित विकारांनी तयाच्या गुबगुबीत, गुलगुलीत देहाला स्पर्शही केला नव्हता. 'यदा गतिविधि: टफ्यते, तदा टफ्यः एव गन्तुं प्रभवन्ति|'१ या आर्योक्तीचे पालन तो कसोशीने करीत असे. परन्तु दैवगती अगाध२. कोणाला नवनीतासम चिकनी तुपाळ वामांगी लाभते, तर कोणाच्या भाळी साक्षात वडवानल येतो. कोणी सुदैवी तारखांचे हिशोब न ठेवताही नाबाद राहतात, तर कोणा दुर्दैवींच्या फुग्यालाही बारीकसे छिद्र असते. गोलकांचे आच्छादन बक्कलमुक्त करता कोणास गच्चकपोतद्वयाचे स्वैर हेलकावे दिसतात, तर कोणाचे हाती प्याडेड निराशा येते. तर ते असो.
तर असा हा अखण्ड स्थितीचा निर्धारू आनन्दध्वजगारू चिरडीला का यावा? कारण तयास चोहीकडे सङ्कटांचे पर्वत दिसो लागले होते. हे पर्वत नुसते दिसते आणि आपापल्या जागी गौमान्यपूर्वक उभे राहते तरी चालते. आनन्दध्वज काही मार्ग काढता. पण ते सङ्कटगिरी एकमेकांचे नजीक येऊन मध्ये आनन्दध्वजास चिरडणियाचा यत्न करीत होते.
प्रभातसमयो पातला. आनन्दध्वजाची अधिलम्बकस्थिती३ पुरती सरलीही नसतां खुद्द मधुकशा दार ठोठावीत आली. तिला बघोन आनन्दध्वज आधी सुखावला, मग वैतागला.
"अगे कालपासून तुझियेशी संपर्काचा प्रयत्न करोन माझे अंगुष्ठ थकले. कोठे होतीस बये?"
"पाहिले मी गारू," मधुकशा तिच्या किनर्या आवाजात म्हणाली. "तुझियाकडून आलेली सदतीस संपर्कथोटके आत्ता पाहिली. लागलीच तुजकडे आले. बोल गारू, काय सेवा करू?"
"अगे, तुझी उद्यमव्यवस्थापनकोविद पदवी वाया गेली की काय? तुजकडे एक कार्य सोपविले होते. तयाचा काही वृत्तान्त? काही आवेदन? काही फलश्रुती? किमान काही वार्ता?"
मधुकशेच्या मुखावरचे भाव झरझर बदलले. कार्यबाहुल्याने श्रमलेला सङ्गणक अखेरीस मान टाकणियापूर्वी जसा आपल्या अन्तरङ्गाची झलक पडद्यावर दाखवतो तसे काहीसे. आनन्दध्वजाला त्या बदलत्या भावांचा थांग काही लागेना.
"गारू," ती अखेर म्हणाली. "तुमचा शिष्य पराभूत झाला, गारू. मी पराभूत झाले. मी तयाला शिकवू शकले नाही."
आनन्दध्वज जर आगोदरच आडवारिलेला नसता तर आडवा पडता. "काय सांगतेस काय मधुकशे? रुद्रप्रयागास 'ते' कार्य जमेना म्हणतेस? म्हणजे आजवरच्या त्याच्या त्या कथा पोकळ बाताच म्हणाव्यात की रिकामे ध्यासचिन्तन?"
"गारू, तू मला तयाला एक विशिष्ट गोष्ट शिकवायला नेमिलेस. तयांत तो अगदीच ढ गोळा की रे."
आनन्दध्वजाच्या ध्यानीं आता मुद्दा येऊ लागला. "म्हणजे, तयाकडे वेदना साहायाची शक्ती नाही?"
"नाही गारू, बिलकुल नाही." मधुकशेने मान नकारार्थी हलवली. "कुल्लद्वयांवर एक रट्टा बैसताच तो कळवळतो. मांडियांवर ताडिता डोळियांत जलकुम्भ फुटतात. चर्मकाष्ठिकेच्या दर्शनाने तो कासावीस होतो आणि करबन्धने पाहून तर हमसाहमशी रडों लागतो."
"म्हणजे वेदनेपेक्षा वेदनेच्या कल्पनेनेच तयाचे जघन विदीर्ण होते आहे. भयपटाच्या टैज़र्यानेच तो दर्भगलित होत आहे." आनन्दध्वज विचारात पडला.
"बरोबर, गारू." मधुकशा म्हणाली. "तुझी जलपर्णी तेयांस कच्चा खाईल रे. आधीच ती नरभक्षिका व्याघ्रीचा किताब मिळवोन आहे. तियेसमोर हे कोकरू टाकलेस तर तयाचे कायमचेच नुकसान करोन ठेवशील. तयाचा तो सुडौल जिराफ परत कधीच मान उंचावणार नाही. तयाच्या कटिकूपात कधीच ती उत्फुल्लता येणार नाही. तयाचे धरण कायम कोरडेच राहील."
आनन्दध्वजाने चमकोन मान वर केली. मधुकशेच्या नेत्रांतली व्याकुळता टिपली.
"व्हाय डु यू केअर?" आनन्दध्वज आश्चर्यावेगाने म्हणाला. अशा प्रसङ्गी त्या देहात खोलवर लपलेली आङ्ग्लभाषा उसळोन वर येत असे.
मधुकशा काहीच बोलली नाही.
"अब समझा!" आता हिंदवी बोलीची पाळी होती. "एक सांग, रुद्रप्रयाग बिछानियात कैसा आहे?"
मधुकशेचे नेत्र मिटले. त्या मिटल्या नेत्रांआड गतसप्ताहात रुद्रप्रयागाबरोबर व्यतीत केलेल्या घटिकापळांचे चलच्चित्र फिरत होते हे आनन्दध्वजाने ओळखले. तिचे उत्तराड्ग आवृत्त असोनही तियेच्या स्तनशिखरांत एकवटलेला ताठरपणा आनंधध्वजाच्या मुरलेल्या दृष्टीस काय ते इशारून गेला.
"अप्रतिम ... अवर्णनीय, गारू..." मधुकशा उसासत म्हणाली. "बलदण्ड बाहूंनी तो कटीभोवती विळखा घालतो तेव्हा त्या बाहूंत विरघळोन जावेसे वाटते. तयाच्या भव्य उरावरच्या केशसंभाराला नवार्द्र मृदेचा गन्ध आहे. तयाच्या कटीमध्ये मत्त एकशृङ्गाचा जोम आहे. तो जेव्हा तालचक्रात प्रवेशितो तेव्हा क्षितिकम्पाचा भास होतो. तयाचा ध्वजदण्ड..."
"पुरे, पुरे!" आनन्दध्वज आश्चर्याने म्हणाला. "मधुकशे, तू तर पुणकक्षेत्रीची आघाडीची गणिका. कित्येक हवशे-नवशे-गवशे तुझिया मण्डपाखालोन गेले. तुझिया भोगुलेपणाचा उबारा, साहवेना पुणेकरा. तरी एका नवथर युवकाने पदार्पणातच तुजला इतुके भोवण्डोन टाकावे?"
"देअर इज ऑल्वेज अ फर्स्ट टाईम, गारू." मधुकशा म्हणाली.
"अतिशय बिन्दुगामी निरीक्षण. पण ही तुझी तर पहिली वेळ नव्हे..."
"अरे, ही रुद्रप्रयागाची तर पहिली वेळ होती ना!" मधुकशा म्हणाली. "जारिणी भावाची भुकेली रे गारू. माझियाकडे येणारे बाकी लोक फक्त नलिका रिक्त करण्याच्या हेतूने येतात. धडाड धडाम, पुन्हा येईन मादाम! ते स्वतःसाठी येतात, जे चाळे करतात ते स्वतःसाठीच. रण्डिकेकडे जाणारा मनुष्य एकप्रकारे स्वमैथुनीच रत असतो. कामक्रीडा द्विदल असते हे तयांना समजत नाही. येयांची कामक्रीडा म्हणजे नथिन्ग बट् अ व्हिडियो गेम."
"आणि रुद्रप्रयाग नवखा होता म्हणोन तू तयाला तुला पाहिजे तसा घडवलास!"
"मी कोण घडवणार, गारू? मी तयाला तन्त्र जरूर शिकविले, तयाचे यन्त्र तर तगडे आहेच, पण मन्त्र स्वभावात असायास लागतो. तो रुद्रप्रयागाकडे आहे. भोगणे हे तेयासाठी दोहो बाजवांनी आहे. तो मनमुराद भोगतो, आणि शय्यासखीला मनमुराद भोगू देतो. तेथे सड्कोच नाही. स्वतःचा संवेगबिन्दु आला की फवारे उडवून विजार शोधण्या निघत नाही, पण सखीच्या संवेगानन्तर तिला कवटाळून मेघांवर तरङ्गू देतो..."
"मधुकशे,..." आनन्दध्वज हळुवारपणे म्हणाला. "तुझ्या भावना मज समजतात. पण रुद्रप्रयागास जलपर्णीचा ध्यास आहे हे तुजला ठाऊक आहे ना?"
"हो, अर्थातच ठाऊक आहे. तयाच्या बोलण्यातही कायम तिचाच विषय असतो. अमुक केले तर जलपर्णीस आवडेल का, आणि तमुक केले तर तीस रुचेल का?" मधुकशा विषादाने म्हणाली. "माझिया दारचा हा ऐरावत अखेर त्या कवटाळिणीच्या दारी पिचकारी मारणार तर..."
"बरोब्बर. नलिकामुखाशी आलेल्या रेतस्फोटाला जसे रोखता येत नाही, तद्वत या दैवगतीसही ना तू रोखू शकतेस ना मी. तू आपले नियोजित कर्म करावेस असे सुचवतो. माझा अन्दाज सांगू का?"
"सांग, गारू."
"तुझे कर्तव्य होते त्यास वेदना घेणेचे आणि देणेचे शिकविणे. जलपर्णीसमोर टिकौन राहील ऐसे कुशल बनवणे. तुझिया मनीचे कोमल भाव तुला रुद्रप्रयागाला वेदना देण्यापासून परावृत्त करताहेत. त्या सुखदघटिकांच्या सुलतानाला४ सोलून काढावयास तुझे मन तयार नाही. हाच तर तो कर्मपथातला कण्टक. साक्षात् अर्जुनाचीही जेथे सुटका झाली नाही तेथे तुझे काय? मीही भगवन्ताचेच शब्दसार सांगतो. जगीं कॉण्ट्रासेप्टिवे वागावे. कर्मे करावी, फलापेक्षा नुरावी."
"प्रयत्न करते, गारू." मधुकशा उठत म्हणाली.
"जा, मधुकशा, जा. रुद्रप्रयागाचे फलकास पार नीलकृष्ण करोन टाक. तयांस दोन द्यावयाला आणि दोन घ्यावयाला शिकव..."
याच आशयाचे तो आणखी पाच मिनिटे बोलला, पण मधुकशा निघोन गेली होती. तिने वापरलेला टिपकागद बोळास्वरूपी पडला होता. आनन्दध्वजाने तो हातीं घेतला. त्यावर मस्कारियाची पुसटचिह्ने आणि बरीच आर्द्रता होती. आनन्दध्वजाला अकस्मात अपराधी वाटले. जगी सर्व सुखी व्हावेत अशी कामना बाळगणारा, आमोद पसरवायला मदत करणारा पुणक नगरीचा जगमित्र, जनसामान्यांचा 'गारू' आज स्वार्थासाठी एका क्वचिद्लभ्य आनन्दाची आहुती द्यायला सांगत होता. योजकत्व सक्स.
--x--
मधुकशेने दिलेला अपराधीभाव झटकत आनन्दध्वजाने प्रभातीचा उर्वरित समय भ्रमणध्वनीच्या सान्निध्यात घालवला. मदत करण्याचा आनन्दध्वजाचा स्वभावच असला, त्यातून रुद्रप्रयाग मित्र असला, तरी हे सर्व घडवण्यामध्ये आनन्दध्वजाचा अन्तस्थ हेतु होता. गचागचाधिपति मालकारूचा प्रेमळ दूरध्वनि तो विसरला नव्हता. 'खचाखच गचागच'च्या पुढच्या अङ्काची जुळवाजुळव करावयाची होती. खप वाढणेचा आरम्भ याच अङ्कापासून व्हायला हवा होता. खप वाढविणेसाठी वाचकांस काही नवीन द्यावयाला हवे होते. नव्या दमाचे लेखक, नव्या नव्हाळीच्या कथा आणि नव्या उफाड्याची चित्रे अङ्कात असायाला हवी होती.
हुनर्व्यवस्थापन५ ही आनन्दध्वजाची कायमची डोकेदुखी होती. आधीच मराठी साहित्याच्या स्थितीबद्दल वर्तमानपत्रांचे स्तंभ ओसंडून उमाळे काढीत होते. जनमानसांत प्रतिष्ठा असलेल्या प्रकाशनांची ही स्थिती, तर 'खचाखच गचागच'सारख्या भूमिगत प्रकाशनांस कोण विचारतो? तरी आनन्दध्वजाने रुद्रप्रयागासारखे लेखक मिळवोन त्यांस घडविले होते. पण नवे लेखक मिळणे दुरापास्त होत चाललेले. लेखकसंख्या अल्प असल्याने प्रकाशनेही मोजकी. मोजकी प्रकाशने म्हणजे मर्यादित वाचकवर्ग. तशांत नवतन्त्रज्ञानाची स्पर्धा. आणि मर्यादित वाचकवर्ग असल्याने त्यांतून एखादा नवलेखक मिळण्याची शक्यताही अल्पस्वल्प.
शतेषु पठते मरहठ्ठग्रंथः, सहस्रेषु च गचागचः |
लेखक दशसहस्रेषु, सिद्धहस्तः भवति वा न वा ||
या अंगुष्ठनियमाप्रमाणे आनन्दध्वजाला एक लेखक मिळवायला दशसहस्र प्रयत्न करावे लागले असते, आणि रुद्रप्रयागाच्या तोडीस पोचणारा कदाचित कोणीच न मिळता. पण आशेची चिवट शॄंखला सहजासहजी तुटत नाही. तीन तासांच्या प्रयत्नांनी मात्र आनन्दध्वज थकला. आशेच्या शॄंखलेचे धागे विरावयास लागले होते. सङ्कटाचा तो पहाडही नजीक येऊ लागला होता.
अशाच दिङ्मूढ मनःस्थितीत आनन्दध्वज आपले सायंकालीन योजककार्य करावयास सुदान चायनीजमध्ये आला. आणि आत शिरताच तयाच्या आधीच भिरभिरलेल्या मस्तकात आणखी एक कळ गेली. पुलाच्या वाडीचे मूर्तिमन्त दाबङ्ग्य रक्तवर्णी नीलकमल खुर्चीवर बसोन मधुखट्टकुक्कुटसार भुरकीत होते. तयाच्या पुठ्ठ्याच्या वजनाने खुर्चीचे खूर अंतर्वक्र जाहले होते.
वाचकांस स्मरत असेल की यापूर्वी दण्डपाणी नेटके 'सर्वांस गर्भगृही घेवोन तृतीयमात्रा' देण्याची गर्जना करोन गेला होता. ती घोषणा काही प्रत्यक्षात उतरली नव्हती. (आनन्दध्वज दोन दिवस उगाचच कुले आवळोन चालत होता.) मग एके दिवशी नेटकेरूपात खुद्द गाब्बर्य स्वतःचे पायांनी चालत सुदानमध्ये अवतरले. जणू काही घडलेच नाही ऐशा आविर्भावात दोन तास बसोन हाक्कीय शेवया खावोन गेले. आनन्दध्वजाने नको नको म्हणतांही बिलापोटी सत्तर टके टिचवोन गेले, वर थापियाचे पाठीवर थापही मारोन गेले. दर तिसरे दिवशी असे घडो लागले. हे हृदयपरिवर्तन आनन्दध्वजाला कळेना.
पण एके दिवशी नेटकियाने हळूच जलपर्णीची चौकशी आनन्दध्वजापाशी करता कोडे उलगडले. धार को काटे रे, चीर धरे सन्नाटे रे जब वीर भरे खुन्खारे - असा तो भांबुर्डियाचा दबङ्ग आपल्या रज्जोसाठी कासावीस झाला होता. परन्तु या सर्पाला अस्तनीत बाळगणियाची आनन्दध्वजाची इच्छा नव्हती.
"तू जगाचे सेटिङ्ग लावतोस असे ऐकले आहे." आपल्या और्मट्यपूर्ण पद्धतीने नेटके म्हणाला होता. "भाऊंचं सेटिङ्गपण लावून दे..."
"कोण भा..." भाऊ म्हणजे स्वतः नेटके हे आनन्दध्वजाच्या ध्यानी जरा अवधीनेच आले. स्वतःला तृतीयपुरुषी एकवचनात संबोधणारी जनता आनन्दध्वजाचा मस्तकभेद करोन जाई.
सेटिङ्ग लावल्यास 'खचाखच गचागच'मागचे शुक्लकाष्ठ काढोन घेऊ अशीही लालूच नेटकियाने दाखविली होती. पण याला होकार देणे म्हणजे 'खचाखच गचागच'शी आपला काही ना काही सम्बन्ध आहे याला मूकसंमती देणे हे आनन्दध्वज ओळखोन होता.
थेट जलपर्णीला गाठावे असे आनन्दध्वजाने सूचित केले, पण नेटकेने नकार दिला. दर तिसरे दिवशी येत राहिला, आनन्दध्वजास गळ घालीत राहिला.
आनन्दध्वज स्थानापन्न झाला, आणि अपेक्षेप्रमाणे मुखींचा रस पुशीत नेटके आला.
"महोदय! आवडली पाकसिद्धी?" आनन्दध्वजाने सावधपणे विचारले.
"अलबत्! थापियाची कीर्ती अखिल पुणक चारांत आहे." नेटके समाधानाने म्हणाला. "पण ते सोड. हे घे." एक लिफाफा कौंटरवरोन सरकवीत नेटके म्हणाला.
"हे काय, महोदय?" आनन्दध्वज चकित होऊन म्हणाला.
"खाऊ आहे आनन्दबाळासाठी..." पुढे वाकोन आनन्दध्वजाचा गालगुच्चा घेत नेटके म्हणाला. "आत एक किल्लिका आहे. किल्लिका कसली असते बाळकोबा सांगेल का? पेटिकेची!"
आनन्दध्वजाच्या चेहर्यावर नेहमी एक अस्पष्ट स्मितहास्य असे. तयाच्या ओठांच्या कडा वर मुडपलेल्या होत्या, आणि गोबर्या गालांवर दोहो बाजूंना चिरस्मितहास्यामुळे उभ्या घड्या पडल्या होत्या. काही गंभीर घडल्याखेरीज ते स्मितहास्य मावळत नसे. पण काही कारणाने ते मावळले, तर आनन्दध्वजाचा चेहरा अगुस्तरोदाँच्या चिंतनमग्न मुनीशिल्पाला बुद्धाचा चेहरा चिकटवल्यासारखा दिसत असे.
तर वालुकामय समुद्रतटावर जशी जललता विरते तसे ते हास्य विरले. पेटिकेचा अर्थ न कळण्याइतका आनन्दध्वज दुधखुळा नव्हता. आपल्यावर ही मेहेरबानी का केली जात आहे याचीही पुरेपूर कल्पना तयास होती. तरीही तयाने सन्देहवर६ देण्याचिया उद्दिष्टाने विचारले,
"गरिबावर ही मेहेरनजर किंनिमित्त्ये, महोदय?"
नेटके मन्दसा हसला.
"ओपन बोलतो, आनन्दध्वजा. मजला हव्या असलेल्या एका वस्तूपर्यंत तू मजला पोहोचवू शकतोस. जलपर्णी. तसे भाऊ तिला डायरेक भिडू शकतात, कारण भाऊ दबङ्ग आहेत. पण मला समजले, ती तुजला फार मानते, गारू." उपरोधाने शब्दावर जोर देत नेटके म्हणाला. "तर माझा ओपन डाव आहे. ही पेटिका घे, माझी सेटिङ्ग करोन दे. सेटिङ्ग झाल्यावर आणखी एक ऐशीच मिळेल."
प्रश्न तत्त्वाचा होता. आनन्दध्वज गारू होता. जगमित्र. प्रेमदीनांचा कैवारी, प्रेमदु:खिता सोयरा. "माझे तियेवर प्रेम आहे, मजला मदत कर." असे नेटके म्हणता तर आनन्दध्वजहृदयवीणेचा गारूतन्तु छेडोन जाता. पण 'मला ती मिळवोन दे, मी तुजला अमुकतमुक देतो' या बार्टर्याची आनन्दध्वजाला घृणा होती. आनन्दध्वज आयुष्यात इतर काहीही असेल, पण त्याचे ठायी भाडव्य नव्हते. दालल्य नव्हते. पैम्प्य नव्हते.
"तुम्ही मजला कोण समजता, महोदय?" आनन्दध्वज सन्तापोन काही बोलू लागला, पण नेटकेने हस्तनिर्देश करोन तयास दाबिले.
"तुझे नावाने आरती ओवाळणारे भेटले. तुझी तसबीर देवघरांत ठेवणारे भेटले. कातडे कसलेही पाङ्घरलेस तरी अखेरीस तू पडलास विक्रेता. मध्यस्थ. दलाल. अ व्यक्तीस हवी असलेली वस्तू ब व्यक्तीकडे आहे हे तुजला माहीत पडले, की तू अ आणि ब यांस जुळवोन देतोस, आणि मध्ये स्वतःसाठी चार चव्वल सोडवितोस."
वास्तवाचा सामना करणे भल्याभल्या महारथींना कठीण जाते. एक क्षण असा येतो की नियती अवचित दर्पण दाखविते, आणि स्वतःचा विवसन चेहरा दिसतो. एकादाच अर्जुन नशीबवान, की तयाचे रथाची वादी भगवन्ताचे हाती. दयाबुद्धीने तयांस कर्मसिद्धान्त सांगितला. "रे बैला, इतुके दिवस युद्धसिद्ध होत होतास तेव्हा समजले नाही का आपण आपलियाच आप्तगुरूंशी लढणार आहोत? आता ऐन वेळी काहे फाटत बा?" असे विचारले असते तरी कोणी भगवन्तास दोष देता ना. असो.
आपला आनन्दध्वज जरी गारू असला तरी शेवटी मानव होता. जवळपास कोणी भगवन्तही नव्हता. आपलिया उदरनिर्वाहाचे हे उघडेवाघडे वर्णन आनन्दध्वजाच्या गण्डस्थळी बाणासारखे रुतले. वेदनेची, सन्तापाची तीव्र सणक शरीरभर पसरली.
"तुझा बाप दलाल, काय? आं?" तो कडाडला. सन्तापाने त्याच्या भाषेचा काष्टा सुटला होता. "डबल घ्यायची इकडून, काय? भाऊ म्हणतंय स्वतःला. चल सूट इकडून, भाऊंचोद. जी भाऊगिरी आहे ती स्टेशनात करायची. अन् ही पेटी बोच्यात कोंबून घ्यायची, काय?"
नेटकेच्या भरदार छातीवर आपटोन लिफाफा खाली पडला. आतली किल्ली बाहेर आली होती. नेटकेने लिफाफा उचलला, किल्ली परत आत घातली. त्याच्या डोळ्यांत अङ्गार पेटला होता.
"आनन्दध्वजा," किरणप्रतिबन्धक उपनेत्रात ती आग विझवत नेटके म्हणाला. "परत भेट होईलच. तेव्हा ही गाण्डमस्ती राहते का पाहू. येतो."
लहान होत जाणार्या नेटकेच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत आनन्दध्वज सन्तापाने धगधगत होता.
त्याच क्षणी भ्रमणध्वनि खणाणला.
"नाही झालं काम, मालकारू." आनन्दध्वज भ्रमणध्वनीत जिवाच्या आकान्ताने ओरडला. "तो रुद्रप्रयाग तिथे वास काढीत फिरतोय. दुसरं कोणीही मिळत नाही. इथे मी कितीही गांड घासली तरी अंक तसाच निघणार. खप तेवढाच राहणार. तुम्ही माझी मारणार. मारा, भाड्याहो, मारा. कारण सांगू? कारण इथे उघडूनच बसलो आहे ना मी! मालकारू, तुम्हांला सोट्याहो, तिथे बसून बोंबलायला हवंय. पाश्शे मैलांवरून भोकं बघायला हवीत. इथे शिवायला फक्त आनन्दध्वज. ग्राऊंडवर मीच घासतो आहे ना! एक काम करा मालकारू. नळी करा तुमच्या मासिकाची आणि माझ्या भोकात भरा. आग लावा दुसर्या टोकाहून, काय?"
दम लागल्याने आनन्दध्वज थांबला. क्षणभर भ्रमणध्वनिवर शान्तता होती. मग...
"मी येतोय..." एक खरखरता स्वर दुसरे बाजूने आला, आणि सम्पर्कसमाप्तीचा क्लिक्मय आवाज आला.
आनन्दध्वजाने क्षोभाच्या आवेगात भ्रमणध्वनि भिरकावला. भिन्तीवर एक टल्ला खाऊन थापासमोरच्या कढईत विसावला. थापाने त्वरेने झारियाने तो बाहेर उडविला. शेवटी तो भूमीवर विसावला तेव्हा तयाचे अन्तरङ्ग भेसूरावस्थेत बाहेर आले होते. त्या राहाड्यातच काही चैन्यान्नकणही मिसळले होते. थापा आणि सुदानचे अन्य उपस्थित आश्रयदाते या नाट्याकडे आ वासोन पाहत होते. आनन्दध्वजाचे नेत्र मात्र अश्रूंनी भरले होते.
____
१ When the going gets tough, the tough gets going.
२ दैवगतीबद्दल परवापासून काही लिहिले नव्हते म्हणोन हे. 'स्वाधीन की दैवाधीन' या वादात पूर्वपक्ष उचलोन धरत असाल तर उरलेला प्यारा स्किपा.
३ hang-over
४ king of good times
५ talent management
६ benefit of doubt
_______________
चित्रश्रेय : अभ्या
प्रतिक्रिया
कोणी सुदैवी तारखांचे हिशोब न
प्रहचंड सुंदर कथा व कथानक. काय फुलवलय आबा. वाह वाह!!! तुस्सी कम्माल कर दी!!!!!!
आबा आबा खरच!!! कमाल केलीत
______
हाण्ण!!!
_____
अरे रामा!
_____
आहाहा!! जलपर्णी हलकट आस्तिनीतील सर्पिण, मेली. मधुकशेलाच मिळो हा ऐरावत
_____
काय हे आबा!!!
_____
ढुंगण काळेनीळे कर
___________
___
बापरे बिचार्या गारुचा किती उद्रेक झाला शेवटी
ये भाग में
खडा किया है मेरा...उत्सुकता से बाल बाल खडा किया है.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भयाण जबरद्स्त काय ते औमर्ट्य,
भयाण जबरद्स्त
काय ते औमर्ट्य, भाडव्य, दालल्य, पैम्प्य. अहाहाहाहा
पाहिजे तशी वाकलीय, फिरलीय, नाचलीय भाषा.
आदूबाळा, हॅट्स ऑफ
+
जोरदार चालू आहे! आदूबाळा, दंडवत!
69 चे समर
तेच ना सरस्वतीने रुंडमाळा उसन्या घेऊन तांडवच नाही तर अॅडमांच्या ब्रायन्याकडून एल्क्ट्रॉनिक गिटार आणून आदुबाळासाठी फुल ऑन रॉक म्युझिकवर धमाल करतेय ती! - '69 चे समर'
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हे भयावह अप्रतिम आणि दिलखेचक रंडीबाज आहे.
सरस्वती आदुबाळगारुंच्या लेखणीतून काबरे नावाचे उन्मुक्त, उन्मादक आणि उन्मेषशाली नर्तन दाखवत आहे हे मान्य न करणारा प्रथम क्रमांकाचा अरसिक आहे!
म्यांव!
आदूबाळ ग्रेट
आदूबाळ ग्रेट
™ ग्रेटथिंकर™
आनन्द्ध्वज
आनन्द्ध्वज हा अकादमि पारितोशक विजेते लेखक आनन्द साधले यान्चा मानस्पुत्. आनन्द्ध्वजाच्या कथा नावाचा त्यान्चा कथासन्ग्रह १९९०च्या सुमारास प्रसिद्ध झाला होता. आदूबाळाने शैलिसह त्याला उचलेला आहे.
आदूबाळाने शैलिसह त्याला
ही तक्रार आहे की कौतूक? समजले नाही म्हणुन विचारतोय.
(कारण तक्रार असेल तर आदूबाळांनी सुरवातीलाच फोटोसकट 'आनंदध्वज' आणि 'आनंद साधले' ह्यांचा उल्लेख केला आहेच. तक्रार नसल्यास तक्रारीच्या शंकेबद्दल अगाऊ माफी).
एक प्रश्न विचारू का? (फक्त
एक प्रश्न विचारू का? (फक्त तुम्हालाच नाही, ओरिजिनल आणि फॅनफिक असं दोन्ही वाचलेल्यांना.)
साधल्यांचा आनंदध्वज आणि हा / फॅनफिकमधला आनंदध्वज यात काही फरक जाणवतो का? जाणवत असल्यास कोणता?
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
साधल्यांचा आणि तुमचा आनंदध्वज
मला आनंदध्वजाच्या कथा वाचून मला खूप वर्षं झाली, त्यामुळे चुभूद्याघ्या. मला जाणवलेले महत्त्वाचे फरक -
(सर्वांना अतिशय आवडलेल्या कथेकडे समीक्षकी जाड भिंगाच्या चष्म्यातून पाहण्याबद्दल माफी. प्रश्न विचारलात म्हणून स्पष्ट उत्तर देतो.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अगदी अतिशय धन्यवाद! समीक्षकी
अगदी अतिशय धन्यवाद! समीक्षकी भिंग कथेकडे रोखलं गेलं यातच पावलं. मुद्दे १ ते ६ अगदी पूर्णपणे मान्य आहेत. आणि त्यामागे थोडा विचारही आहे.
समजा, मूळ पात्राशी संपूर्णपणे इमान राखून त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसह, लकबींसह गोष्ट लिहिली तर तो कुसरीचा (क्राफ्ट) भाग आहे. म्हणजे एक टेम्प्लेट आहे आणि त्यात फॅक्ट भरले, बटण दाबलं, आलं उत्तर असा एक्सेलीय खाक्या होईल. मला यात मजा वाटत नाही. चॅलेंजच्या डावासारखी "और एक सत्ती" लावण्यात काय मजा? फॅनफिकचा लेखक म्हणून काहीतरी वेगळं करण्यात मजा आहे. उदा० (१) कथानक पुढे घेऊन जाणं (२) पात्रामध्ये नवे रंग भरणं (३) मूळ कथांमध्ये कमी आलेल्या पैलूला प्रकाशात आणणं, वगैरे. (आधीच्या फाफे फॅन फिकमध्येही असाच प्रयत्न केला होता.)
आनंदध्वजाच्या बाबतीत त्याचं "लय भारी" असणं (तुमचे मुद्दे १ ते ७) खरं सांगायचं झालं तर माझ्या डोक्यात गेलं. हे म्हणजे गॉड अॅक्सेस घेऊन गेम खेळण्यासारखं आहे. त्याला जमिनीवर आणावा म्हणून त्याच्यावर संकटं आणवली, त्याला कस्पटासमान लेखणारी / त्याचा अपमान करणारी पात्रं आणली, त्याचा भावनातिरेक होईल असा प्रसंग आणला, त्यात तो अगतिक झालेला दाखवला, परस्परविरोधी प्रायॉरिटीजमुळे त्याला मधुकशावर अन्याय करावा लागला आणि त्याबद्दल अपराधी वाटलं, वगैरे.
...आणि तरीही तो आनन्दध्वजच राहिला पाहिजे होता. माझ्या मते (वैयक्तिक मत अॅलर्ट):
हा त्याच्या आनंदध्वज असण्याचा गाभा आहे. निस्वार्थी, पण सामान्य राहून - पक्षी: गॉड अॅक्सेस न घेता - इतरांना मदत करणे, आणि जमलं तर आपला फायदा करून घेणे हा त्याचा 'अगदी आतला' स्वभाव आहे ('गारुत्व'). या कथेच्या शेवटी आनन्दध्वज वगळता इतर सगळे जिथून सुरुवात झाली त्यापेक्षा सुस्थितीत आहेत. आनन्दध्वजाचं थोडंफार नुकसानच झालं आहे, पण त्याला त्याची तमा नाही. सगळं पार पडल्याचा आनंद त्याला आहे. तेच त्याचं गारुत्व.
---------
हा खरं तर मोठा डिझाईन फॉल्ट आहे. चालक शिकत आहे, म्हणून माफ करून टाका.
मुद्दा क्र० ८ ही अर्थात मान्य आहे. हे आगोदरच लक्षात आलं म्हणून 'दैवगती', 'दैवाचे फेरे', 'स्वाधीन की दैवाधीन' वगैरे मखलाशी केली होती.
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
panache
हे ठीक. मात्र, माझ्या मते आनंदध्वजाची अक्कलहुशारी, त्याचा मिश्कीलपणा आणि जगण्यावरचं त्याचं प्रेम हे त्याच्या आनंदध्वज असण्याशी (identity) घट्टपणे बांधलेलं आहे. नि:स्वार्थी समाजसेवा करणारे लोक पुष्कळ असतात, पण आनंदध्वजाकडे panache आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा उपस्थित होतो की ह्या कथेतल्या आनंदध्वजाकडे आता काही panache शिल्लक आहे का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्यामुळे खरा प्रश्न हा
काहीच नाही. काहीच नाही.
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
'आनंदध्वज' नल गे मजला?
पण मग त्यात काही 'आनंदध्वज'पणा राहिला का? म्हणजे, उदाहरणार्थ, आनंदध्वजाऐवजी कथेत अशी कल्पना केली असती की महाभारतातला कृष्ण कलियुगात आलाय आणि रुद्रप्रयाग अर्जुन आहे तर काय फरक पडेल?
किंवा, रुद्रप्रयागाला नल-दमयंतीमधला नल केला आणि आनंदध्वजाला नारदमुनी केला तर? 
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हम्म. तुमचा मुद्दा कळला.
हम्म. तुमचा मुद्दा कळला. मान्य नाहीये, पण नोटेड.
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
ह.ह.पु.वा. झाली! जंतूराव,
ह.ह.पु.वा. झाली!
जंतूराव, फॅनफिक्शनचा अभ्यास वाढवा/करा इतकेच नम्रपणे सांगु शकेन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Normative?
??? अंमळ समजुतीचा घोटाळा होतोय का? फॅनफिक्शनमध्ये का-ही-ही करता यावं किंवा येऊ नये ह्याविषयी (थोडक्यात, Normative मुद्द्यावरून) मी तरी बोलत नाही आहे. आणि सर्वांना इतक्या आवडलेल्या गोष्टीच्या दर्जाविषयी उपदेश तर त्याहून करत नाही आहे. मात्र,
हा प्रश्न विचारला गेला म्हणून हा मुद्दा उपस्थित झाला. शिवाय, मूळ कथेच्या गुणधर्मांत इतके मूलभूत बदल करण्यामागच्या लेखकाच्या मनातल्या हेतूविषयी मला कुतूहल होतं म्हणून त्याला काही प्रश्न विचारले. असो. आपली करमणूक (होत असली तर) आमचा आनंदच आहे. त्याचा ध्वज मात्र आमच्या हाती नाही एवढेच नम्रपणे नमूद करतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मग तुम्हाला फॅनफीक्ससोबत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विधायक काम आणि हुरूप बळवंत्याला
'कथा वाचून मला खूप वर्षं झाली, त्यामुळे चुभूद्याघ्या.' असं मी सुरुवातीला म्हटलं आहेच. त्यामुळे माझे वरचे मुद्दे कुणी खोडून काढणार असेल तर त्यात मला रस आहेच. लेखकानं पुष्कळशा घटकांशी सहमती दाखवून मूळ कथेच्या गुणधर्मांत इतके मूलभूत बदल हेतुपुरस्सर केल्याचं सांगितलं आहे आणि त्यामागचं कारणही दिलं आहे. मात्र, ह्या बाबतीत लेखकाचा शब्द मी अखेरचा मानणार नाही कारण तितपत आधुनिकोत्तर मी आहे.
माझ्या आणि दस्तुरखुद्द लेखकाच्या मुद्दयांशी तुम्ही सहमत नसलात आणि तुमचं मत किंवा अर्थनिर्णयन त्याहून वेगळं असेल, तर माझ्या ज्ञानात भर घालायची की निव्वळ स्मायली टाकत राहायचं हा निर्णय मात्र तुमचा आणि तुमचाच आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धाग्याचं नाव बघता योग्य
धाग्याचं नाव बघता योग्य ठिकाणी ही चर्चा चालू आहे.
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ठीक.
(एका अज्ञ जंतूच्या ज्ञानात भर घालण्याची नम्र विनंती करूनही त्यास नकार देता ह्याबद्दल आभार मानता येत नाहीत म्हणून केवळ) ठीक.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ह ग पु वा
कोणी सुदैवी तारखांचे हिशोब न ठेवताही नाबाद राहतात, तर कोणा दुर्दैवींच्या फुग्यालाही बारीकसे छिद्र असते. गोलकांचे आच्छादन बक्कलमुक्त करता कोणास गच्चकपोतद्वयाचे स्वैर हेलकावे दिसतात, तर कोणाचे हाती प्याडेड निराशा येते. ----




परत परत वाचुन हसतो आहे..