Skip to main content

ही बातमी समजली का - ११४

अजित जोगीं काँग्रेस मधून बाहेर पडून नवा पक्ष काढणार.

Jogi's move to quit the Congress and float a new party to challenge the Raman Singh government is also being linked to the speculation about expected elevation of Rahul Gandhi as the party president, but he denied the suggestion saying "that has nothing to do with it."

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:36

In reply to by अनु राव

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:37

In reply to by अनु राव

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:37

In reply to by अनु राव

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:37

In reply to by बॅटमॅन

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:37

In reply to by बॅटमॅन

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:38

In reply to by बॅटमॅन

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

मिलिन्द Sat, 04/06/2016 - 03:12

In reply to by गब्बर सिंग

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे .

मिलिन्द Sat, 04/06/2016 - 03:11

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे .

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:38

In reply to by मिलिन्द

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:38

In reply to by मिलिन्द

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

'न'वी बाजू Sat, 04/06/2016 - 03:38

In reply to by मिलिन्द

आमच्या शेजारच्या गणेशउत्सव मंडळाने हीच रणनीती वापरून हजारो लोकांना परदेशी पळविले आहे. याचा प्रतिकार अशक्य आहे . क्यीऽऽऽऽऽऽर्रर्रर्रर्रर्रर्र!

गब्बर सिंग Sat, 04/06/2016 - 09:23

When the landlord doesn’t call back -

But hopefully, this research helps those who have not experienced discrimination in the housing market to get a sense of what those who have must feel like when their calls go unanswered or when a flat that was available just an hour ago mysteriously turns out to have been “rented” when they call — something they suspect is because of who they are rather than anything they have control over.

ह्या लोकांनी असा रिसर्च केला का की मुस्लिम लँडलॉर्ड कडे भाडेकरू म्हणून राहू इच्छिणारा हिंदु भाडेकरू - त्या हिंदु भाडेकरूला भेदभावास तोंड द्यावे लागते का ?

दुसरं - मुस्लिम भाडेकरू म्हणून पोझ करणार्‍याने मार्केट च्या दरा पेक्षा जास्त भाडं देईन अशी ऑफर (हिंदु लँडलॉर्ड ला) दिली का ? नसल्यास का दिली नाही ?

---

उद्योजकांचा राजकारणातील प्रवेश धोकादायक : वृंदा करात - कामगार नेते, शेतकरी यांचा राजकारणातील प्रवेश चालतो. पण उद्योजकांचा लगेच धोकादायक.

नगरीनिरंजन Sat, 04/06/2016 - 09:35

अमेरिकेचा जॉब्ज रिपोर्ट पुन्हा निराशाजनक.
Investors reset their expectations for interest rates yet again Friday, sparking declines in Treasury yields, the dollar and U.S. stocks, after data showed U.S. employers last month added the fewest jobs in more than five years.
http://www.wsj.com/articles/stocks-tick-higher-ahead-of-u-s-jobs-report-1464940259

फेडच्या व्याजदर वाढवण्याच्या घोषणा वगैरे सगळं हळूहळू हास्यास्पद होत चाललंय.
भारतातही नोकर्‍यांची निर्मिती कमालीची घटली आहे (पण जीडीपीची वाढ म्हणे ७.९% आहे ;-)). कोंबडं झाकण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत; पण सूर्य उगवायचा राहणार नाही.

नगरीनिरंजन Sat, 11/06/2016 - 18:20

In reply to by नगरीनिरंजन

भारताचा जीडीपी गेल्या क्वार्टरमध्ये ७.९% ने वाढला असं सरकार सांगत असताना काही देशद्रोही लोक मात्र त्यावर शंका घेत आहेत.

Lies, Damn Lies And Statistics

The CSO keeps updating and revising its data. It starts with putting out advanced estimates which become provisional estimates (PE) which, in turn, become revised estimates (RE) that are also changed more than once before the final figures are arrived at. If one compares apples with apples and not with oranges, the story is quite different from what the government would want us to believe. For instance, the latest PE of GDP growth in 2015–16 has been put at 7.6% over the first RE of 2014–15. If, however, we compare PE of 2015–16 with PE of 2014–15, the GDP growth figure comes down to a less impressive 6.6%. If we compare the PE of the real GDP growth figure for the fourth quarter of 2015–16 with the corresponding quarter’s PE in 2014–15, the proportion plummets from 7.9% to only 4.8%.

.....

Way back in 1972, the finance minister of West Bengal Ashok Mitra had written in this publication a column titled “The New Obfuscators” in which he had compared the Brahmins of yesteryear to today’s economists. The former used to act as a buffer between the king and the masses to tell them that things are not all that bad. Particular government economists and statisticians have become modern-day spin doctors who, not unlike the Brahmins of medieval times, want us to believe the economy is doing much better than it actually is, in order to please their political masters. But in playing along with the sycophants of the ruling regime, they end up fooling only the gullible few.

अनु राव Mon, 06/06/2016 - 10:31

महिन्याला काहीही न करता of 2,500 Swiss francs (USD 2,563) per adult and 625 francs per child under 18 मिळण्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते ते रीजेक्ट झाले..

http://www.moneycontrol.com/news/world-news/swiss-voters-reject-39money…

गब्बर सिंग Mon, 06/06/2016 - 14:49

Bitcoin’s resurgence may be short-lived

Most trading in bitcoin takes place in China: Huobi and OKCoin, two Chinese exchanges, are thought to account for more than 90% of transactions. The currency seems to have become an outlet for Chinese savers frustrated with their limited investment options and searching for high-yielding assets. The Chinese authorities are worried enough to have banned banks from dealing in bitcoin, but individuals are still free to speculate and have been doing so with gusto.

.शुचि. Mon, 06/06/2016 - 17:13

In reply to by अनु राव

अनु तू हे पूर्वी वाचून तुला समजले नाहीये का? मग गब्बरने दिलेला लेख वाचलास का? त्याने ४:१९ ला प्रतिसाद टाकलाय आणि तू ४:२१ ला. मी जस्ट सहज विचारतेय. कदाचित हे तू पूर्वी वाचून तुला समजलेले नाही असे तुला म्हणायचे आहे.
____
Usually I am sucker of the links he mentions. पण हे बिटकॉइन वगैरे नाही ब्वॉ. भारतीय राजकारण आणि इकॉनॉमिक्स चे काही प्रांत नाही वाचत.

अनु राव Mon, 06/06/2016 - 17:21

In reply to by .शुचि.

हा प्रकार म्हणजे, बीटकॉइन हा प्रकार इन जनरल. बीटकॉइन हा प्रकारच समजला नाहीये मला अजिबात.

गब्बु ला विचारण्यात अर्थ नाही, ४ लिंका फेकेल तोंडावर.

.शुचि. Mon, 06/06/2016 - 17:24

In reply to by अनु राव

लिंका हे त्याचे बलस्थान आहे. मला आवडतात त्याच्या लिंका. उगाच गं तोडकं मोडकं सांगून स्वतःचेही हात दुखवुन घेत नाही आणि इतरांनाही बुचकळ्यात पाडत नाही. ज्याला आस्था असेल त्याने अमुक लिंकवर जा आणि ज्ञानार्जन करा आणि नंतर मला शंका विचारा :)
हां एक मात्र आहे त्याने लिंका देण्याआधी स्वतः वाचायला पाहीजेत :) हाहाहा आळशी आहे.

आदूबाळ Mon, 06/06/2016 - 17:21

In reply to by अनु राव

क्रिप्टोकरन्सी का?

अहो सोपं आहे. लहानपणी आपण गोट्या, बिट्ट्या, काडेपेटीचे छाप, पोस्टाची तिकिटं वगैरे चलन म्हणून वापरत होतो ना. तसंच असतं हे.

मोठे झाल्यावर त्या वस्तूंची किंमत वाटेनाशी होते. म्हणजे त्या चलनाची व्हॅल्यू बघणार्‍याच्या मनात असते. याला फियाट करन्सी म्हणतात.

[कागदी नोटा हीदेखील फियाट करन्सीच असते, पण त्याच्या मागे सेंट्रल (रिझर्व) बँक - पर्यायाने सरकार - नावाचा भाई उभा असतो. त्या भाईची पत घसरली की ती फियाट करन्सीही मातीमोल होते. (उदा - झिम डॉलर्स.)]

पोरांना काहीतरी लुटुपुटीचं 'काम' करायला लावतात, आणि बिटकॉईन असाईन करतात. समोरच्याने मानली तर बिटकॉईनची व्हॅल्यू. नाय तर नाय.

नगरीनिरंजन Sat, 11/06/2016 - 18:42

In reply to by गब्बर सिंग

बिटकॉईन विशेष चालणार नसलं तरी ज्यावर ते चालतं त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजिला चांगलं भविष्य आहे. डिसरप्टिव्ह इनोव्हेशन आहे ते फायनॅन्शियल मार्केट्स व इ-कॉमर्समध्ये.

The blockchain is seen as the main technological innovation of Bitcoin, since it stands as proof of all the transactions on the network. A block is the 'current' part of a blockchain which records some or all of the recent transactions, and once completed goes into the blockchain as permanent database.

ब्लॉकचेनमध्ये प्रत्येक नोडकडे नेटवर्कमध्ये झालेल्या प्रत्येक ट्रांझॅक्शनची माहिती असते. त्यामुळे ऑथेंटिकेशन वगैरे सहज आणि जास्त सुरक्षित, पारदर्शी असते आणि सिस्टिम जास्त रेझिलियंट असते (काही नोड ऑफलाईन झाले तरी फरक पडत नाही).

अनुप ढेरे Tue, 07/06/2016 - 10:56

ओला/उबर गरिबीतून बाहेर यायला हातभार कसा लावतायत याबद्द्लचा लेख.

http://www.thehindu.com/news/national/driving-through-sunrise-boulevard…

मी स्वतः पुण्यातला ३-४ ओला चालकांना हाच प्रश्न विचारला होता की कीती तास काम आणि किती कमावता? साधारण प्रत्येक जण २५-३० हजाराच्या आसपास म्हणाला. रोज दहा तास सहा दिवस. प्लस पैसे वेळेवर मिळणार. आणि स्वतःच्या मर्जीचे मालक.

पण अलिकडेच कर्नाटक सरकारने हे मॉडेल मोडीत काढायचा चंग बांधला आहे. या सेवांवर बंदी आणली आहे कर्नाटकने. आणि हे लोक किती पैसे लावू शकतात यावर पण रेग्युलेशन आणणार आहे. दिल्लीमध्येदेखील किती पैसे लावता येतील यावर निर्बंध घातले गेले आहेत.

अनुप ढेरे Tue, 07/06/2016 - 11:09

In reply to by बॅटमॅन

सर्ज प्रायसिंग हा एक मुद्दा आहे. आणि इतर टॅक्सी युनिअन/रिक्षा युनिअन्स यांचं राजकारण. अ‍ॅक्चुअली पहिला मुद्दा नुसता फसाड आहे. राजकारण हा मूळ मुद्दा आहे.

बॅटमॅन Tue, 07/06/2016 - 11:10

In reply to by अनुप ढेरे

हे माजुरड्या रिक्षावाल्यांची तळी उचलून धरणारे लोक म्हणजे.....असोच. आय होप कर्नाटकाचे लोण महाराष्ट्रात पसरणार नाही.

गब्बर सिंग Wed, 08/06/2016 - 06:57

In reply to by बॅटमॅन

हे माजुरड्या रिक्षावाल्यांची तळी उचलून धरणारे लोक म्हणजे.

शंपेटर ने "क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन" ची संकल्पना मांडली होती.

जेव्हा टांगे/बग्गी या लोकांचा धंदा कार मुळे बसायला लागला होता तेव्हा पण असंच झालेलं होतं का हे शोधणं रोचक असेल.

पॉवरलूम आले तेव्हा हातमागावरच्या कामगारांनी हल्लेखोरी केली होती. पॉवरलूम्स वर.

दिलीपकुमार ला नया दौर मधे असाच प्रस्थापितांच्या बाजूने उभा करून हिरो बनवायचा यत्न केलेला होता निर्मात्याने. म्हणे - प्रस्थापितांना विस्थापित कारण्याचा यत्न morally repugnant आहे.

आता रिक्षावाल्यांची सत्ता आहे. नंतर उबर्/ल्यिफ्ट/ओला वाल्यांची चलती होईल. नंतर ड्रायव्हरलेस गाड्या आल्या की उबर्/ओला वाले बोंबलायला सुरुवात करतील.

हे सगळं चक्रनेमिक्रमेण चालू असतें .... इति अंतु बर्वा.
.
.
उबर व ल्यिफ्ट मुळे न्यूयॉर्क मधल्या मेडॅलियन च्या किंमती ढासळत गेलेल्या आहेत.
.
.
MEdallion
.
.

----------

आणखी : Wal-Mart will test grocery delivery with Uber and Lyft in Denver and Phoenix in an effort to compete with Amazon

-प्रणव- Tue, 07/06/2016 - 11:43

कराचीतील ‘तो’ डॉक्टर बनला खडसेंचा संकटकाळातील विश्वासू साथीदार -

हाहा, हा कोण इसम आहे ...

डॉ. जगवानी यांच्या पाकिस्तानमधून जळगावमध्ये येऊन स्थायिक होण्याचीही कहाणी रंजक आहे. जगवानी यांनी पाकिस्तानमधील सिंध विद्यापीठातून त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. १९८१ मध्ये ते मधुचंद्राच्यानिमित्ताने जळगावमध्ये आले होते. खडसेंचा बालेकिल्ला ओळखला जाणारा हा परिसर तेव्हा जगवानी आणि यांना भलताच आवडला आणि त्यांनी कराचीतून जळगावमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.

सुनील Tue, 07/06/2016 - 12:06

मधुचंद्राच्यानिमित्ताने जळगावमध्ये

माताय!!

पब्लिक फुकटच कश्मिर-कोडाईकनालला जातय!!

बॅटमॅन Tue, 07/06/2016 - 12:54

In reply to by सुनील

खी खी खी, हेच म्हणणार होतो. किमान गोवा-मैसूरबेंगलोरला तरी जातंय हो पब्लिक. जळगावला हणिमूण म्हणजे काय उपमा द्यावी, हेही सुचत नाही.

नंदन Tue, 07/06/2016 - 12:32

Democrats are replacing Republicans as the preferred party of the very wealthy (दुवा)

लेखातले ठळक मुद्दे -
* In 2012, something unusual happened. The wealthiest 4 percent of voting-age Americans, by a narrow plurality, supported a Democrat for president. This hadn't happened since 1964.

* A family income of $220,000 puts you in the top 4 percent in 2012.

* Rather, the more likely explanation is that the individuals comprising the top 4 percent changed... And over time, the top 4 percent has become much more diverse and much more highly educated.

* The places with the largest concentrations of wealth are now disproportionately represented by Democrats. In 2014, 17 of the 25 wealthiest congressional districts (measured by average income) were represented by Democrats. And overall, the median household income in Democratic-represented congressional districts was about $2,000 more than the median household income in Republican-represented districts ($53,358 to $51,834).

काही नोंदी -

* कॅलिफोर्निया किंवा न्यू यॉर्क सारख्या राज्यांतल्या मोठ्या शहरांमध्ये सकल $२२०,००० वार्षिक उत्पन्न हे मध्यमवर्गीय किंवा फार तर 'उच्च मध्यमवर्गीय' या गटात मोडेल. त्यामुळे लेखाच्या शीर्षकातले विशेषण (very wealthy) हे दिशाभूल करणारे आहे. (कुपर्टिनोत तर वार्षिक $२५०,००० हून कमी उत्पन्न असणार्‍या कुटुंबांसाठी 'अफोर्डेबल हाऊसिंग' उपलब्ध करून द्यायची चर्चा सुरु असल्याचे ऐकतो!)

* मात्र त्याच वेळी, तंत्रज्ञानावर आधारित नोकर्‍यांमुळे ह्या टॉप ४% तील वर्गात मोडणार्‍या लोकांचं स्वरूप कसं बदलत चाललं आहे (संपूर्ण श्वेतवर्णीय ते अधिक कॉस्मोपॉलिटीन; अधिक सुशिक्षित), हे पाहणं रोचक आहे.

* एक उदाहरणः वेस्ट व्हर्जिनिया एके काळी डेमोक्रॅट्सचा बालेकिल्ला होता (अल्पशिक्षित, श्वेतवर्णीय, खाणकामगार-युनियन मेंबर); तर शेजारचं व्हर्जिनिया राज्य रिपब्लिकन पक्षाच्या 'सॉलिड साऊथ'चा भाग होतं. आजमितीला, वेस्ट व्हर्जिनियातल्या कोळशाच्या खाणी आणि टिंबर मिल्स बंद पडत चालल्या आहेत. तिथली नवीन पिढी शहरांकडे वळली आहे. पन्नाशीपलीकडला, अल्पशिक्षित, बहुसंख्य श्वेतवर्णीय वर्ग हा रिपब्लिकनांच्या 'टेक अवर कंट्री बॅक/मेक अमेरिका ग्रेट अगेन'चा हुकमी टार्गेट आड्यन्स आहे.

दुसरीकडे, उत्तर व्हर्जिनियात - विशेषतः वॉशिंग्टन डी.सी.च्या उपनगरांत; नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या निमित्ताने तरुण, सुशिक्षित, वेगवेगळ्या देशांतून (त्यातही आशियातून आलेल्यांची संख्या लक्षणीय) येऊन स्थिरावलेले लोक अधिक आहेत. या बदलत्या लोकसंख्येमुळेच, इतर गावठी भागांतून रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळूनही ओबामाला दोन्ही खेपेला व्हर्जिनिया निसटत्या बहुमताने जिंकता आलं. थोड्याफार फरकाने, तीच परिस्थिती नॉर्थ कॅरोलायनात ('रिसर्च ट्रँगल'मुळे) घडताना दिसते.

* डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणांवर, विशेषतः आर्थिक बाबींत, या बदलांचा काय परिणाम होतो - हे पाहणं रोचक ठरेल. हा ट्रेंड जर असाच राहिला (ज्याची अजिबात शाश्वती नाही), तर डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणं अधिक लिबर्टेरियन होऊ शकतात. सॅन फ्रान्सिस्को शहर (लिबरल, बोहेमियन) विरुद्ध बे एरिया (लेफ्ट-लिबर्टेरियन) यांच्यातले काही मतभेद अलीकडील सुपरबोलच्या दरम्यान अधिक स्पष्ट झाले होते. कॅलिफोर्नियात घडणार्‍या घडामोडी, ह्या बव्हंशी संपूर्ण देशातल्या आगामी बदलांचं निदर्शक असतात, असं म्हटलं जातं - ते कदाचित याही बाबतीत खरं ठरू शकेल.

गब्बर सिंग Wed, 08/06/2016 - 06:27

MTCR म्हंजे काय व त्याच्या सदस्यत्वाचे भारतास फायदे कोणते त्याबद्दल.

अनु राव, मनोबा, तुम्हाला असं नाही वाटत की हे फायदे जरा जास्तच मोघम स्वरूपात लिहिलेले आहेत ?

-----

Not a single person needs to touch a cow during any 24-hour milking cycle.”

अनु राव Wed, 08/06/2016 - 09:34

In reply to by गब्बर सिंग

भारत आता मिसाईल विकत घेणार इतके कळले. पुढे प्रगती झाली तर अणुअभट्या आणि इंधन पण खरेदी विक्री करता येइल.

गब्बर सिंग Wed, 08/06/2016 - 17:43

Hillary Clinton criticized for wearing $12,495 Armani jacket during a speech about inequality

तिच्यावरील ही टीका अ‍ॅड होमिनिझम च्या आसपास जाणारी नैय्ये का ?? (ही टीका ही अ‍ॅड होमिनिझम आहे असं मी म्हणत नैय्ये. प्ण त्याच्याजवळपास ....)

सिरियसली : तिने किती रुपयाचे जॅकेट घातलेले होते ही बाब आर्थिक विषमतेवरील धोरणांबाबतच्या चर्चेदरम्यान रिलेव्हंट का आहे ?

तिने जाडेभरडे जॅकेट घालून तेच व्याख्यान दिले असते तर ते व्याख्यान व त्यातील मुद्दे जास्त ग्राह्य धरले गेले असते का ?

-----

मधुचंद्र शांततेत करावा, गाजावाजा बारशाला करावा. ___ शिवसेनेचा मोदींना सल्ला.

आदूबाळ Wed, 08/06/2016 - 17:59

In reply to by गब्बर सिंग

मधुचंद्र शांततेत करावा, गाजावाजा बारशाला करावा. ___ शिवसेनेचा मोदींना सल्ला.

लोल! शिवसेनेचं बाकी काही असलं तरी घोषणा आणि एकूणच शब्दप्रभुत्त्व कमाल आहे. अगदी 'उठाव लुंगी बजाव पुंगी' पासून. शिवसेनेच्या अशा घोषणांचं संकलन कुठे उपलब्ध आहे का?

गब्बर सिंग Thu, 09/06/2016 - 08:26

उडता पंजाब वरून निहलानींना हटवण्याची मागणी

नेहरूंचे नाव पुस्तकातून वगळण्यापेक्षा सेंसॉर बोर्डाची कात्री लावण्याची सत्ता काढून घ्या.

------

इस्रायल च्या तेल अवीव मधे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा हल्ला. ४ ठार. - दोन अतिरेक्यांपैकी एकाला अटक. दुसरा इस्पितळात.

------

हिंदुत्व दहशत्वाद हा .... इस्लामिक दहशतवादाइतकाच .... ब्ला ब्ला

मिलिन्द Thu, 09/06/2016 - 22:56

In reply to by गब्बर सिंग

इस्रायल च्या तेल अवीव मधे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा हल्ला. ४ ठार. - दोन अतिरेक्यांपैकी एकाला अटक. दुसरा इस्पितळात.
इस्राएलच्या स्थापनेच्या दिवसात सात-आठ लाख पॅलेस्टिनीना सक्तीने (आणि अन्यायाने) देशाबाहेर काढले होते त्याबद्दलही बोला . त्याचे हे परिणाम आहेत . निर्वासित, तंबूत राहणारी ही तिसरी पिढी आहे .

इस्राएलच्या स्थापनेच्या दिवसात सात-आठ लाख पॅलेस्टिनीना सक्तीने (आणि अन्यायाने) देशाबाहेर काढले होते त्याबद्दलही बोला . त्याचे हे परिणाम आहेत . निर्वासित, तंबूत राहणारी ही तिसरी पिढी आहे .

इस्रायल ने त्यांना निर्दय पणे ठोकून काढले पाहिजे. त्यांनी इस्रायल चे चार मारले तर इस्रायल त्यांचे १० मारतो. झक्कास पैकी.

भारताने सुद्धा इस्रायलचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन घाऊकपणे पाकीस्तानी मारावेत. व हे हल्ले होत असताना भारतीय नागरिकांना मस्त पैकी दारूचे घुटके घेत घेत हे हल्ले बघत बसता यावेत.

बॅटमॅन Fri, 10/06/2016 - 12:02

In reply to by अनुप ढेरे

नाही. व्हॉटबाउटरी ही फक्त समोरच्यांनी केलेली असू शकते, उदा. "हिंदुत्ववादावर टीका करता तर आयसिसवर का नाही?" असे विचारणे म्हणजे व्हॉटबाउटरी, परंतु
"इस्लामिक टेररिझमवर टीका करताना युरोप/अमेरिकेवर टीका का करत नाही?" असे विचारणे म्हणजे विचारवंतांच्या लेखी व्हॉटबाउटरी नाही.

अनुप ढेरे Fri, 10/06/2016 - 14:25

In reply to by बॅटमॅन

यात आणि दोनचारशे वर्षांपूर्वी झालेल्या गोष्टीचा बदला आज घेणारे मंदिरवाले लोक यात काय फरके? स्टॅचुटची लिमिट काय असावी?

बॅटमॅन Fri, 10/06/2016 - 14:28

In reply to by अनुप ढेरे

लिमिटबिमिट काही नसते. आपले लाडके लोक निवडून त्यांच्या प्रत्येक फालतू गोष्टीचे कौतुक करत बसायचे आणि बघा बघा आम्ही कसे ह्युमॅनिटॅरियन, सेकुलर, लिबरल असे म्हणत त्या फेक सहानुभूतीचे ट्रिपल एक्स पॉर्न बनवून ते विकायचे ही ती हमखास यशस्वी होणारी स्ट्रॅटेजी आहे.

लोळगे सायकल कंपनी Fri, 10/06/2016 - 16:45

In reply to by मिलिन्द

"पॅलेस्टिनी लोकांनी आता पूर्वीचे सगळे सोडून, जे काय सध्या मिळाले आहे तेवढे डेव्हलप करायचा प्रयत्न करावा. पुढे कधीतरी बलशालीबिली झाले तर इस्राईलला हरवायचे व्यूह बनवावेत. तेलावरची डिपेंडन्सी कमी होतेय तसतशी बाकी अरबांची आपापली लंगोट सांभाळायची काळजी वाढती आहे, यांचा सपोर्ट हळूहळू कमी होणारे, किंवा नुसता सहानुभूतीचा राहणारे. (तीनचार पिढ्या गेल्या, अजून दहा जायच्या आत बदलावे.)
गप शरणागती पत्करुन पुढे चालावे, आम्हाला इथनं विस्थापित केलय म्हणलं तर ते ज्यू मग आमचे आजोबा कुठुन विस्थापित झाले असे विचारतील, मग हे पॅलेस्टिनी आणि मागे जावून आम्ही इथलेच असे सांगतील, याला काय अंत नाही.
Ground reality ही आहे की, इस्राईल ईच्छे/अनिच्छेने का होईना पॅलेस्टिनींना चिक्क्कार मदत करतयं, तिचा सढळ हस्ताने वापर करुन इन्फ्रा डेव्ह्लप करावे. बेथेलेहम आणि इतर परिसरात पाणी, वीज सगळे इस्राईल देते, बाहेरुन येणारे पर्यटक इंट्री मारायला तेल-अवीवलाच उतरतात. असंख्य पॅलेस्टिनी शहाणपणाने इस्रायली परमिट घेवून जेरुसलेम, तेलअवीव मधे रोजगार मिळवतात, बेथ्लेहममधे पैसा आणत आहेत, असे स्फोट केल्याने त्यांच्या पोटावर पाय. (पर्मिट बिरमिट थोडे दिवस बंद करतात मग इस्रायली)
उगा दिलेल्या पैशाने भुयारं खोदायची, मग रडायच की आम्ची कंडीशन काय वाईट, याला काय अर्थ आहे."
- बेथलहेममधील पॅलेस्टिनी दुकानदार आणि गाईड लोकांचे हे मत आहे. (रेकॉर्डेड संभाषण वगैरे पुरावा कंपनीकडे नाही)

नितिन थत्ते Fri, 10/06/2016 - 14:18

In reply to by गब्बर सिंग

इस्राएल हे अमेरिकेचे स्टूज आहे.

इस्राएलने अगदी जवळ असलेल्या सिरियातील आयसिस विरोधात काही पाऊल उचलल्याचे ऐकले नाही.
(मध्ये जॉर्डन आणि इराक हे देश असूनसुद्धा त्यापलिकडील ईराणच्या अणुभट्ट्यांवर हल्ला वगैरे करणार होते म्हणे).

गब्बर सिंग Fri, 10/06/2016 - 16:40

In reply to by नितिन थत्ते

(मध्ये जॉर्डन आणि इराक हे देश असूनसुद्धा त्यापलिकडील ईराणच्या अणुभट्ट्यांवर हल्ला वगैरे करणार होते म्हणे).

हे एकदा नजरेखालून घाला. - १९८१ वेगळे व २०१६ वेगळे असा युक्तीवाद केला जाईलच.

पण इराण कसा रिस्पाँड करेल हे जाणून घेणे योग्य आहेच. पण रशिया, चीन व अमेरिका कसे रिस्पाँड करतील ते जाणून घेणे सुद्धा.

--

इस्राएल हे अमेरिकेचे स्टूज आहे.

पॅलेस्टाईन हे कुणाचेही स्टूज नाही हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. कोणीही त्यांना फारसे गंभीरपणे घेत नाही. इजिप्त ला सुद्धा अमेरिकेने अनेकदा पैसे/मदत दिलेली आहे. पण इजिप्त इस्रायलसारखा बनू शकला नाही. आजूबाजूची अनेक राष्ट्रे साथीला असूनही व हिझबुल्लाह ला इराण ची थेट फूस आहे पण तरीही पॅलेस्टाईन ला स्वतःचे *** सुद्धा धुता येत नाही.

---

इस्राएलने अगदी जवळ असलेल्या सिरियातील आयसिस विरोधात काही पाऊल उचलल्याचे ऐकले नाही.

साप हा नेहमी पाहुण्याच्या काठीने मारावा असं म्हणतात ______ दिनानाथ दामोदर थत्ते.

अनु राव Fri, 10/06/2016 - 16:43

In reply to by नितिन थत्ते

इस्राएल हे अमेरिकेचे स्टूज आहे.

असु दे की. अमेरीका आणि इस्त्राएल दोघेही आपला चॉइस तरी चांगला आहे हे दाखवुन देतायत.

बरी खुशामत शहाण्याची, पण मुर्खाशी ती मैत्री नको.

गब्बर सिंग Sat, 11/06/2016 - 09:48

मोदींनी अमेरिकेतून किती गुंतवणूक आणली

----

चालकविरहित मोटारगाड्यांची समस्या : विम्याचे कवच उपलब्ध नसणे. पण ही कंपनी आता असे कवच उप्ललब्ध करून देणार आहे.. सध्यातरी हे फक्त ब्रिटन मधे उपलब्ध आहे.

Unfortunately, it's only available in Britain. But the policy protects against all of the usual things you would find in your typical car insurance — damage, fire, theft. And it also goes further, covering accidents caused by malfunctions in the car's driverless systems even if the passenger has failed to use a manual override. It covers any havoc that hackers may wreak on a car's operating system. It applies to cars even if they haven't been updated to the latest software. And it even covers mishaps that may occur if your car loses satellite or other crucial connectivity.

अनुप ढेरे Sun, 12/06/2016 - 10:25

In reply to by नितिन थत्ते

अरेअरे, हेही भक्त निघाले की! दुसर्‍या एका भक्ताने असाच लेख लिहिला आहे.
http://indianexpress.com/article/opinion/columns/india-gdp-fastest-grow…

काय करावं राव यांच्या सुळसुळाटाला??

नितिन थत्ते Sun, 12/06/2016 - 11:37

In reply to by अनुप ढेरे

:)

स्टॅटिस्टिकल एरर ४%+ आहे असे दिसते. ती नेमकी २०१३-१४ काळात उणे ४% होती हे रोचक आहे.

नगरीनिरंजन Sun, 12/06/2016 - 18:28

In reply to by अनुप ढेरे

हॅहॅहॅ.. २०१२ ला धोरणलकवा होता ना पण? शिवाय इंडिया शायनिंग नव्हतं.
जानेवारीत रघुराम राजनसुद्धा जीडीपीतल्या ओव्हरलॅपबद्दल बोलले होते; पण त्याला फारसं महत्त्व नाही.

अनुप ढेरे Sun, 12/06/2016 - 21:26

In reply to by नितिन थत्ते

चिमुट काय, गोणी बाळगतो. २०१३ साली माझं ना वाईट चालू होतं ना आत्ता फार भारी चालू आहे. पण दर वेळेला जगबुडी आली असं तर नाही समजायचं?

नगरीनिरंजन Sun, 12/06/2016 - 22:38

In reply to by अनुप ढेरे

इग्नोर केलं तरी चालेल. :-) तुम्ही काही करावं म्हणून नाही बातम्या टाकत आणि जगबुडी आली असं समजा असाही कोणाचा आग्रह नाही.
भारताचा जीडीपी हा पारंपारिक तेलाच्या उत्पादनाचा निर्देशांक मानून तो अमुक टक्क्यांनी वाढेल अशी पैज लावणारे आणि त्याला विरोध करणारे ह्यांच्यातला तो मामला आहे. तुम्ही मनावर नका घेऊ उगाच.

नगरीनिरंजन Sun, 12/06/2016 - 18:31

In reply to by नितिन थत्ते

None of this means that Indian data is good. We need a new revamped system. But even if a revamped system lowers GDP growth from 7.9% to say 6.9% or even 5.9% in the last quarter, India will still be among the fastest-growing countries in the world. Despite many flaws, it is performing decently in a gloomy world economy.

अय्यरांच्या लेखात हे वाचलं. म्हणजे स्टॅटिस्टिशियन्स घुमवत नाहीयेत फक्त त्यांनी वापरायला घेतलेला डेटा चांगला नाहीय असं त्यांचं मत दिसतंय.

आदूबाळ Sun, 12/06/2016 - 17:10

In reply to by गब्बर सिंग

हे पण कॅपिटलिझम आहे गब्बरभाव. ग्राहकांकडे मतांचं कॅपिटल आहे. त्यामुळे ते आपल्या हिशोबाने कायदे बनवायसाठी लॉबी करत आहेत. बिल्डरांनी पैशाचं कॅपिटल वापरून हा कायदा अडवावा.

- "Socialism is a species of capitalism" या आगामी ग्रंथातून आणि त्यावर आधारित "मार्क्स और क्रुगमान - दो जिस्म एक जान" या बीग्रेड चित्रपटातून

राजेश घासकडवी Sun, 12/06/2016 - 18:15

In reply to by आदूबाळ

अहो, हे सांगूनसांगून लोक थकले. तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर जरूर करा. तो मस्तकशिला न्याय का काय म्हणतात त्याची प्रचिती येईल.

राजेश घासकडवी Mon, 13/06/2016 - 06:44

In reply to by गब्बर सिंग

धनशक्ती श्रेष्ठ की जनशक्ती श्रेष्ठ, एवढंच मतमतांतर आहे. बाकी सगळं सारखंच.

गब्बर सिंग Tue, 14/06/2016 - 05:48

In reply to by अनुप ढेरे

सोशलिझम हे गरिबांचं क्यापिटलिझम आहे.

ढेरेशास्त्री, तुम्हाला एक बाटली. रेमी मार्टीन ची आवडेल का ?

ऋषिकेश Mon, 13/06/2016 - 10:41

http://timesofindia.indiatimes.com/world/us/Florida-nightclub-shooting-…

एकुणच रोजच्या आयुष्यात सहज मिळणार्‍या सुखसोयींनी लावलेल्या झापडांमुळे एकुणच भावनाहीन झालेल्या अमेरिकन नागरिकांना एखाद्या व्यक्तीने आपल्या भावनेच्या अतिरेकी आहारी जाऊन एखादे नृशंस कृत्य केले की थेट हा "देशावर अतिरेकी हल्ला आहे" हा बोभाटा खरा मानून पुन्हा आपल्या कोशात जायला अमेरिकन समाज मोकळा (झाला) आहे!

सोबतीला ही व अशा बातम्याही आपण वाचत असतोचः
http://www.reuters.com/article/us-bangladesh-islamists-lgbt-idUSKCN0Y82…

या हल्ल्याचा निषेध करतोच, पण या निमित्ताने झापडबंद (आणि पुंगीवाल्यामागच्या उंदरांप्रमाणे असणार्‍या) अमेरिकन समाजाला आपण बांगलादेश होत चाललो आहोत का याचे आत्मपरिक्षण करायची सद्बुद्धी मिळो अशीही प्रार्थना करतो.

मिलिन्द् पद्की Tue, 14/06/2016 - 22:13

In reply to by ऋषिकेश

एकुणच रोजच्या आयुष्यात सहज मिळणार्‍या सुखसोयींनी लावलेल्या झापडांमुळे एकुणच भावनाहीन झालेल्या अमेरिकन नागरिकांना : थक्क करणारे, झापड्बन्द सरसकटीकरण ! निदान रक्तदानासाठी देशभर लागलेल्या लाम्ब रान्गा तरी पाहिल्या जाव्या !

.शुचि. Tue, 14/06/2016 - 23:16

In reply to by मिलिन्द् पद्की

:) रक्तदानाला रांगा तर लागल्यातच पण काही फुड चेन्स फुकट अन्न देतायत (https://www.washingtonpost.com/business/chick-fil-a-in-orlando-donates-…). आमच्या गावातही मूक मोर्चे झाले. आजच पेपरात वाचले.

.शुचि. Tue, 14/06/2016 - 08:31

In reply to by गब्बर सिंग

लेख ऑफ द टँजंन्ट गेलेला आहे. पचला नाही. इतका रॅडिकल अ‍ॅप्रोच, वेगळच काही सांगतोय की मुद्द्यापासून पार फारकतच झाल्यासारखी वाटतेय.

गब्बर सिंग Tue, 14/06/2016 - 11:06

दलाई लामा : सगळे *** हे %%%%वादी नसतात

-

जाताजाता ...

फ्रान्स मधे कडक गन कंट्रोल कायदे होते. पण तरीही पॅरिस ...
पाकिस्तानात काय स्थिती आहे माहीती नाही. पण तरीही ...
भारतात गन कंट्रोल कायदे बर्‍यापैकी सौम्य (ढिसाळ ?) आहेत ... पण ...
बेल्जियम मधे अमेरिकेपेक्षा कडक आहेत म्हणे (उदा.) ... म्हंजे फारसे कडक नसावेत .... पण ब्रसेल्स मधे...
अफगाणिस्तानात सगळा आनंदीआनंद आहे ... आणि/पण...

-----

बुंदेलखंड मधल्या शेतकर्‍यांनी 12,000 जनावरांना पाण्याआभावी सोडून दिले .... मग तिथे बैलाप्रति असलेला कृतज्ञताभाव शेतकरी सोडून देतो. गोमाता ही गोमाता नसून तो एक बोझ बनतो. शेतकरी अन्नदाता , जीवनदाता, पोशिंदा उरत नाही.

.शुचि. Tue, 14/06/2016 - 16:46

In reply to by गब्बर सिंग

दलाइ लामांचा जॉब आहे तो. समानता, करुणा वगैरेचे भाषण द्यायचा.
______
दुसरी बातमी सॉलिड आहे. किती लिंका त्या. पण विसंगती अत्यंत मार्मिक टिपणारी.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/06/2016 - 22:13

In reply to by गब्बर सिंग

बंदुकांमुळे झालेल्या मृत्युंची सांख्यिकी इथे दिसेल. अमेरिकेत दर दहा हजार लोकसंख्येमध्ये दरवर्षी १०+ लोक मरतात. काही देशांमधले हेच आकडे -

यू.एस. १०.५
यू.के. ०.२३
फ्रान्स २.८
बेल्जियम १.८
भारत ०.२८

आकड्यांवरून काय समजायचंय ते समजून घेणे.

गब्बर सिंग Tue, 14/06/2016 - 22:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"Do countries with strong gun control laws have lower murder rates?

Only if you cherry-pick the data."

- Thomas Sowell

---

The United States has the highest gun ownership rate in the world and the highest per capita rate of firearm-related murders of all developed countries.

---

आणखी इथे

.शुचि. Tue, 14/06/2016 - 22:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू आणि गब्बर सेम बोलताय की विरोधी. शी! मला कळत नाहीये :( (विच इज स्केअरी!)
तो म्हणतोय डेव्हलप्ड देशात बंदुकीचा मालकीहक्क व बंदुकांनी ओढवणारे मृत्यु यांचा दर अमेरीकेत सर्वाधिक आहे.
तू पण तेच म्हणते आहेस ना :(
मग वाद कशाबद्दल आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/06/2016 - 01:32

In reply to by .शुचि.

१. गब्बरने बंदुका आणि दहशतवादी हल्ल्यांतून होणारे हल्ले असा एकरेषीय संबंध लावला. (उदा - पॅरीस, ब्रुसेल्स, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान)
माझ्या मते, दहशतवादी हल्ले सहज थांबवता येणारे नाहीत, कुठे ना कुठे, काही ना काही होत राहीलच. जोपर्यंत वाळवंटातले आर्थिक, शैक्षणिक, सीमांचे आणि इतर अनेक प्रश्न बहुसंख्यांचं समाधान होईस्तोवर सुटत नाहीत तोवर हे असंच होत राहणार.

२. पण बंदुका आणि सरासरी मृत्युंचं प्रमाण वाचलं. त्यात अमेरिका आघाडीवर आहे. भारतासारख्या विकसनशील देशातला बंदुकांमुळे असलेला मृत्युदर यूकेशी तुल्यबळ आहे. यूकेत बंदुकांवर बरेच जास्त निर्बंध आहेत; सामान्य माणसांकडे सोडाच, बहुतांश पोलिसांकडेही बंदुका नसतात.
(सबटेक्स्ट - दहशतवादाची धास्ती असते कारण त्यात माणसं एकाएकी, अनैसर्गिकपणे मरतात. नैसर्गिक आपत्ती निराळी. पण अमेरिकेत दहशतवादाखेरीज सहज कोणालाही बंदुका मिळतात, त्यातूनही जीवितहानी होते. मग दहशतवादाची काय मातब्बरी?)
(हे वाचून दहशतवाद्यांनी मानवतावादच स्वीकारला पाहिजे. पण तसं झालं नाही तर किमान स्वतःला बंदुका घेऊन गोळीबार करायची गरज नाही एवढं तरी लक्षात घ्यावं. मनाने अस्थिर लोक शोधून, त्यांना छळून त्यांच्या हातात बंदुका दिल्या तरी काम होईल!)

तो तक्ता वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. बंदुकींमुळे होणाऱ्या मृत्युंमागे खून आणि आत्महत्या असे दोन प्रकार आहेत. विकसित देशांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खुनापेक्षा बरंच जास्त आहे; बंदुकीने दुसऱ्यांचा जीव घेण्यापेक्षा स्वतःचंच आयुष्य संपवणं बरं. अमेरिकेत बंदुका वापरून आत्महत्यांचं प्रमाण खुनाच्या फक्त दुप्पट आहे. बेल्जियममध्ये चौपट, डेन्मार्कमध्ये पाचपट, फ्रान्समध्ये दहापट आहे. म्हणजे बंदुकांनी खून करण्याचं प्रमाण अमेरिकेपेक्षा बरंच आटोक्यात आहे; निव्वळ सरासरी म्हणून आणि आत्महत्यांशी तुलना करताही. विकसनशील देशांमध्ये खुनाचं प्रमाण बरंच जास्त आहे. उदाहरणार्थ भारतात आत्महत्यांच्या दुप्पट खून आहेत. हा ट्रेंड पाहता, अमेरिकी समाज विकसनशील देशांकडे झुकलेला दिसतो.

आकडे वरवर बघून जाणवलेली ही गोष्ट. तपशीलात कोणीतरी अभ्यास केलेला असेलच.

मग वाद कशाबद्दल आहे?

गब्बरशी मी नाय वाद घालत! फडतुसांशी वाद नाय घालत आमच्यात! :प (गब्बर, ह घेने.)

.शुचि. Wed, 15/06/2016 - 01:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गब्बरशी मी नाय वाद घालत! फडतुसांशी वाद नाय घालत आमच्यात!

=)) :D
आत्महत्या, खून आणि लहान मुलांच्या हातून चुकुन उडणार्‍या गोळ्या तेजायला :(
किती म्हणून बातम्या ऐकल्यात की आई चालवत होती कार आणि कार्टं पिस्तुलशी खेळत होतं. वाट लागली :(
खरं तर अशा ३-४ बातम्या मी नुकत्याच ऐकल्यात.

नंदन Wed, 15/06/2016 - 05:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गब्बरशी मी नाय वाद घालत! फडतुसांशी वाद नाय घालत आमच्यात! (जीभ दाखवत) (गब्बर, ह घेने.)

बोरोविट्झ-esque बोरियत? ;)
(गब्बर, ह घेने.)

मिलिन्द् पद्की Tue, 14/06/2016 - 22:06

https://www.youtube.com/watch?v=Vev-OzHQy94
समसंभोगी लोकांना "त्यांच्यावर दया म्हणून" मृत्यूची शिक्षा केली पाहिजे असे सेन्ट्रल ओर्लान्डो मशिदीचा इमाम नुकतेच (कत्तली च्या आधी ) म्हणाला . तू-नळी धागा वर दिला आहे . या भडव्या इमामांना निदान अमेरिकेतून हाकलले पाहिजे .

सेन्ट्रल ओर्लान्डो मशिदीचा इमाम नुकतेच (कत्तली च्या आधी ) म्हणाला

बाप रे :(

मिलिन्द् पद्की Tue, 14/06/2016 - 22:08

In reply to by .शुचि.

थक्क करणारे विधान . अर्थात या जातीचे विचार ख्रिस्चन मूलतत्ववादीही मांडत असतात .

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/06/2016 - 22:15

In reply to by मिलिन्द् पद्की

या जातीचे विचार ख्रिस्चन मूलतत्ववादीही मांडत असतात .

पण ... "या भडव्यांना अमेरिकेतून हाकलून दिलं पाहिजे" असं फार कोणी म्हणताना दिसत नाहीत.

मिलिन्द् पद्की Tue, 14/06/2016 - 22:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता कदाचित म्हणू लागतील .हिंसेला उद्युक्त करणारे संभाषित "protection of free speech" खाली येत नाही .

.शुचि. Wed, 15/06/2016 - 04:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

https://www.washingtonpost.com/news/acts-of-faith/wp/2016/06/14/pastor-…

एक पास्टर म्हणतोय की अजुन मरायल पाहीजे होते :(
आता हे हेट-स्पीच आहे की नाही? ते ही एका ख्रिश्चन माणसाकडुन आलेले?
बघू यात काय होतं याचं ते.

मिलिंदजी, अशा बातम्या शेअर करण्यासाठी बातम्यांचा धागा आहे. इथे असे धागे सापडतील. चालू धागा हा.

समसंभोगी लोकांना "त्यांच्यावर दया म्हणून" मृत्यूची शिक्षा केली पाहिजे असे सेन्ट्रल ओर्लान्डो मशिदीचा इमाम नुकतेच (कत्तली च्या आधी ) म्हणाला .

अयान हरीसी अली यांचे मत

( अर्थात ... अयान ह्या अमेरिकन एंटरप्राईझ इन्स्टिट्युट च्या असल्यामुळे त्या जे म्हणताहेत ते मोटीव्हेटेड, हेट-फिल्ड आहेच असा युक्तीवाद होईलच. इस्लाम वर टीका करणारे हे नेहमी मोटिव्हेटेड असतात. इतर धर्मांवर टीका करणारे हे नेहमी शांत, संयमी, विचारी, फॅक्ट बेस्ड असतात. )

.शुचि. Tue, 14/06/2016 - 22:58

http://www.politico.com/story/2016/06/donald-trump-defense-airstrikes-o…

ट्रंप महणतायत की बॉम्ब टाकून उडवुन टाका ते अतिरेकी अर्थात बॉम्बिंग इन्टेन्स करा पण पेंटॅगॉनचे सल्लागार म्हणताहेत की - त्या ऑर्लँडो बॉम्बरला काहीतरी मानसिक रोग होता जसे - समलैंगिकांबद्दल पराकोटीचा द्वेष.
त्यामुळे आयसिस विरुद्धची स्ट्रॅटेजी बदलून या माथेफिरुंना काहीही फरक पडणार नाही. उलट बॉम्बिंगमुळे प्रश्न अवघड बनुन बसेल.
___
मला ट्रंपचे पटते आहे. Not that he really cares for my पटणं न पटणं. पण आपलं नमूद करुन ठेवतेय. इतिहासात कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. ;)

मिलिन्द् पद्की Tue, 14/06/2016 - 23:33

In reply to by .शुचि.

अमेरिकेने आत्तापर्यंत आयसीसवर ८ हजारांहून अधिक बॉम्बहल्ले केले आहेत, आणि ते आजही रोज चालू आहेत . पण त्यामागे श्री ट्रंप यांचे जोरदार व्यक्तिमत्व नसल्यामुळे त्यांचा फारसा उपयोग होत नसावा. आर्मीच्या जनरल्सना काहीच कळत नाही हे तर आपण जाणतोच !

.शुचि. Tue, 14/06/2016 - 23:06

http://www.9news.com/news/politics/elections/70-memorable-trump-quotes-…
ट्रंप आज ७० वर्षाचे झाले.
त्यांचे काही कोटस-

“Sorry losers and haters, but my I.Q. is one of the highest — and you all know it! Please don’t feel so stupid or insecure. It’s not your fault.”

हाण्ण!! =))
.

“I’m speaking with myself, No. 1, because I have a very good brain and I’ve said a lot of things. … My primary consultant is myself.” (MSNBC, 2016)

सॉलिडे!
.

"Appreciate the congrats for being right on radical Islamic terrorism, I don't want congrats, I want toughness & vigilance. We must be smart!" (Twitter, 2016)

:) फिदा!
.

“I do whine because I want to win, and I’m not happy about not winning, and I am a whiner, and I keep whining and whining until I win.” (CNN, 2015)

.शुचि. Tue, 14/06/2016 - 23:31

रक्तदानापूर्वी एक प्रश्नवली देतात ज्यात तुम्ही बॉडी पियर्स केलेली आहे का, गेल्या ३ महीन्यात देशाबाहेर गेलात का वगैरे प्रश्न असतात.
एक प्रश्न समलैंगिक संबंधाबद्दल असतो. जर तसा संबंध गेल्या १ वर्षाच्या कालावधीत प्रस्थापित झालेला असेल तर रक्त घेत नाहीत. त्याबद्दल ही बातमी आहे. आहे.

मिलिन्द् पद्की Wed, 15/06/2016 - 01:21

In reply to by .शुचि.

रक्तदानाच्या बाबतीत "समलैंगिक लोकांविरुद्ध पूर्वग्रह" वगैरे शुद्ध बकवास आहे . व्हायरस शोधण्याचे तंत्र सतत विकसित होत असले तरी ते परिपूर्ण नाही . शोधतन्त्राच्या खालच्या मर्यादेहून कमी व्हायरस रक्तात असू शकतो, व तरीही तो नव्या रुग्णाला एड्स देऊ शकतो . आपल्याच दुसर्या समलिंगी "बांधवाला " रक्तदानातून एड्स ची लागण झालेली यांना चालणार आहे काय ?