Skip to main content

तनाचे श्लोक

तनाचे श्लोक विडंबन

तनाचे श्लोक

- उसंत सखू

तनाधीश जो ईश मदनबाणांचा
मुळा हाच आरंभ जनगणनेचा
नमू कामाख्या मूळ सत्वर आता
रमू पंथ अनंत या मदनाचा॥

प्रभाते मनी काम चिंतीत जावा
पुढे वैखरी भोग आधी घडावा
तनाचार हा थेंब सांडीत येतो
जीवनी तो रोपुनी धन्य होतो॥

तना साजणा भोगपंथेची जावे
तरी सुखही परमउच्च ते मिळावे
तनी निंद्य ते सर्व चाळे करावे
तनी वंद्य ते वस्त्र सोडूनी द्यावे॥

तना वासना तप्त कामास येते
तना सर्वथा पापबुद्धी हवी रे
तना सर्वदा सर्व निरोध राहो
तना मंत्रुनी तो व्यभिचार लाहो॥

तना सुखसंकल्प जी-स्पॉट करावा
तना किंक-संकल्प कायी उरावा
तना कल्पना ते हवी खेळण्यांची
सदा पर्वणी हो तनोकामनांची॥

- समर्थ कामदास

विशेषांक प्रकार

धनंजय Sun, 05/06/2016 - 08:14

भुजंगप्रयात सांभाळणे अपेक्षित होते :-(

तनाधीश जो ईश कामाख्यतेचा
मुळीं हाच आरंभ जन्मा-दराचा
तरी कामदां पाॅर्न ग्रंथांस वाचा
जरी पंथ आनंत या कामनेचा॥

उसंत सखू Sun, 05/06/2016 - 09:17

पहिल्या कडव्यात थोडी गडबड असावी.मौजमजा म्हणून घ्यावे. भुजंगप्रयात वगैरे प्रकार शाळेतच घाबरवून गेलेत. आता मुक्तछंदाची फ्याशन आहे ना ? असो.

तिरशिंगराव Sun, 05/06/2016 - 10:32

असे कामुकी भोगूनी तृप्त झाले
विडा-दक्षिणा घेऊनी बोळविले|

गब्बर सिंग Wed, 08/06/2016 - 13:11

तना मंत्रुनी तो व्यभिचार लाहो॥

ही ओळ आवडली.

-

(चाहे कोई खुश हो चाहे गालियां हजार दे
व्याभिचार करके जिंदगीके दिन गुजार दे
)

प्रकाश घाटपांडे Tue, 14/06/2016 - 09:53

स्वामी कामानंद हे आकाशवाणीवरुन तन की बात मधून संवाद साधणार आहेत. खर तर विशेषांकात याचा उल्लेख यायला हवा होता.