तुम्हाला कसलीकसली भीती वाटते?
खरडफळ्यावर सध्या गप्पा सुरू आहेत; तुम्ही कोणत्याशा गर्दीच्या ठिकाणी असताना तिथे कोण्या माथेफिरूने अचानक गोळीबार सुरू केला तर. ह्या चर्चेमुळे मला कसली भीती वाटते ते मला स्पष्टच लक्षात आलं.
१. माझ्याकडे बंदूक असणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यामुळे माथेफिरूशी माथेफिरूपणा करणं मला शक्य नाही. (ट्रोलांशी ट्रोलिंग करणं तसं सोपं; त्यासाठी सरकारी परवाना वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत.) - ही भीती नाही.
२. "पळून जाणे हा बेस्ट उपाय." असं एक मत आलं. मी नियमितपणे थोडी पळते हे खरं आहे. पण आता काय मी लहान मुलगी राहिलेली नाही; गेल्याच महिन्यात सोळावं वरीस लागलंच. त्यामुळे आता स्वयंचलित बंदुका किंवा छोट्या पिस्तुलींच्या गोळ्यांपेक्षा जोरात धावून, त्या चुकवणं मला शक्य नाही. गजगामिनी हे सौंदर्याचं लक्षण नाही का? (अर्थात आम्ही सिंहकटी नसून गजकटी आहोत, पण ते इथे अवांतर आहे.) - ही पण भीती नाही; हा आत्मचरित्राचा एक तुकडा आहे.
३. मग एकच पर्याय उरतो. मेल्यासारखं पडायचं. तसंही 'आडवी झाल्यावर मेल्यासारखी झोपते' (ह्यातला मेल्यासारखी हा शब्द महत्त्वाचा) अशी असूयायुक्त वर्णनं आईकडून लहानपणापासूनच ऐकत आले आहे. त्यामुळे मेल्यासारखं पडणं मला जमण्यासारखं आहे. ह्यात वेगवेगळ्या शक्यता येतात :
अ. मला भीती वाटते की मेल्याचं नाटक करताना मी झोपले आणि स्वप्न पडून बडबडले तर बिंग फुटेल.
आ. समजा माझं मरण्याचं नाटक आहे का मी खरंच मेल्ये हे बघायचं म्हणून त्याने मला लाथ मारली; आणि माझ्या शरीरातून रक्तच बाहेर येत नाही हे दिसलं तर माझं नाटक साफच फसेल. पण बहुदा शूटर लोकांना ह्यापेक्षा बरी कामं असतील. आपण प्रयत्न करून बघायचा. समजा प्रयत्न फसलाच तर पुढची बहुदा वेळ येणार नाही. त्यामुळे आपला कितीही मोठा पोपट झाला तरी 'आता लोकांना तोंड कसं द्यायचं' अशा विचाराने जी खिन्नता (डिप्रेशन) येईल त्यापासून तरी सुटका होईल.
तर मला मेल्याचं नाटक करताना झोप लागून, स्वप्नात बडबड करून बिंग फुटण्याची भीती वाटते. तुम्हाला कसली भीती वाटते?
प्रेमळ ते भीतीदायक - बदलाचा प्रवास
कवी लोकांमुळे हल्ली लोकांना पाऊस, आई, नात्यातल्या इतर स्त्रिया, शाळेतल्या सगळ्या गोष्टी आणि शिक्षक वगळता सगळी माणसं, फळं लगडलेली झाडं, लहान वयातली मैत्री अशा एकेकाळच्या प्रेमळ गोष्टींची भीती वाटायला लागली आहे. आणि तुला कवी नामशेष होण्याची भीती का वाटते! अर्थातच, इथे इरॅशनल भीत्या लिहायच्या आहेत म्हटल्यावर आणखी काय बोलणार!
मला तर भीती अशी वाटते की
मला तर भीती अशी वाटते की हल्ला झाला आणि मी जर त्यादिवशी दाढी करायला विसरलो असेन तर? मृतांचे फोटो म्हणून जे दाखवतात त्यात माझाच चेहेरा विद्रुप दिसला तर लोक काय म्हणतील? त्या कल्पनेनेसुद्धा मला प्रचंड एंबॅरॅस व्हायला होतं. त्यामुळे आजकाल मी नीटनेटका होऊन, बऱ्यापैकी मॅचिंग कपडे घालून, भांगबिंग नीट पाडून बाहेर पडतो. लोकांनी मेट्रोसेक्श्युअल वगैरे म्हटलं तरी काही हरकत नाही - आठवड्यातून एकदा फेशियल करून घेतो, केस रंगवतो आणि भुवयादेखील कोरून घेतो. बाकीचे लोक हे असलं केल्याशिवाय बाहेर पडतात तेव्हा त्यांना नागडं कसं वाटत नाही असाच प्रश्न मला पडतो.
वाङ्मयचौर्य!
माझ्या मनातली भीती माथेफिरूच्या गोळीबाराच्या चर्चेने बाहेर आली म्हटल्यावर लगेच तुम्हाला त्याचीच कॉपी करावीशी वाटते. हे वाङ्मयचौर्य आहे. तुम्ही मेलानिया ट्रंपचं भाषण लिहून देणाऱ्यांपैकी एक दिसता. तुमची स्वतःची स्वतंत्र भीती लिहा. माझ्या भीतीची पार्श्वभूमी चोरू नका.
मृतांचे फटू म्हणून डेड
मृतांचे फटू म्हणून डेड बॉड्यांचे फोटो दाखवतात??? ते तर नॉर्मल फोटो छापतात नातेवाईकांकडून घेऊन.
त्यापेक्षा असं करा. एक ऑनलाईन सर्वीस सुरू करा. लोक आपण अपघात, हल्ल्यात मेलो तर कोणता फोटो छापावा आपल्या पश्च्चात तो फोटो त्या सर्वीसकडे सुपूर्त करतील. मेल्यावर पेपरवाले करतील सर्वीसवाल्यांना काँटॅक्ट.
1) मला मैफिलीत गाताना एखादी
1) मला मैफिलीत गाताना एखादी तान किंवा आलाप घेताना माईकसमोर भसकन् शिंकच आली तर याची भीती वाटते,
2) किस करताना/ मुका घेताना ढेकर आली/आला तर अशीपण भीती वाटते
3) चढावर असतानाच गाडी पंक्चर होण्याची भीती वाटते
4) कुणा मवाल्याशी वाद घालताना जुनं काहीतरी आठवून हसू येण्याची भीती वाटते
5) पावसात फिरताना चारदोनांसमोर पार घसरून उताणं पडून जन्मसावित्री असल्यासारखा गुडघ्यावर भोक पडलेला परमप्रिय पजामा अजून फाटेल काय अशीपण भीती वाटते :~ :~
पण माणवजात नष्ट झाली तर
पण माणवजात नष्ट झाली तर बणवलेला शिणेमा बघणार कोण? पोस्ट-अपोक्यालिप्टिक जगातील झुरळे?
साधारण अशी घटना क्लायमॅक्सला ठेवून एक विज्ञानकथा होती...बहुतेक निरंजन घाटे यांची. परग्रहावरून आलेल्या जीवांना पृथ्वीवर जीवसृष्टी असल्याचा पुरावा म्हणून एका चित्रफीतीचा छोटासा तुकडा सापडतो....थोडासा विनोदी शेवट होता गोष्टीचा.
दोन प्रमुख भीती
१- एखाद्या अपरीचीत, आयुष्यात पहील्यांदाच प्रवासात वा कुठे अपघाताने सहजच भेटलेल्या सुंदर सेक्सी ललनेशी सुरु झालेला अतीसुंदर संवाद ह्रदयाच्या दिशेने जातोसे वाटतानांच त्याचा अपघाती क्रुर पार्थिव शेवट अॅमवेत वा क्रेडीट कार्डात वा आकाशातल्या बापाच्या मायेत तर होणार नाही ना ? अशी भीती सुखद संवादा दरम्यान पार्श्वभुमीवर वाजत राहते.
२- लहान मुलांसोबत जर टीव्ही वर सार्वजनिक मारहाणीची मॉब लिंचींग ची क्रुर दृश्ये न्युज मध्ये अथवा रस्त्यात जातांना एखाद्या भुरट्या चोराचा "न्याय" केला जात असतानांची दृश्ये जी आजकाल टीव्ही व रस्त्यात सर्रास आढळतात. तेव्हा बरोबरीच्या बालकाकडुन कुठला भयंकर निरागस प्रश्न येइल ? त्या प्रश्नांची भिती वाटते. त्या द्याव्या लागणार्या "एक्स्प्लनेशनची" भीती वाटते.
यावरुन एक सकारात्मक धागा बनु शकतो
तुम्हाला कशा कशाची प्रिती वाटते ?
एक घाशीराम कोतवाल मधला डायलॉग आठवला लंपट नानाला एक कोवळी मुलगी म्हणते " मला तुमची भिती वाटते " त्यावर नाना लाडात येऊन म्हणतो
"तुला माझी भिती वाटते पण मला तर तुझी प्रिती वाटते " अस काहीतरी
"आजच्या जगात प्रितीच झुळझूळ पाणी वाहवणार्या लोकांची संख्या छोटी असली तरी या अगणितांच्या लक्षावधी भितीच्या भिंती ना हेच प्रेमपाणके पाडतील आणि तोच खरा सुदीन!!!"
प्रवीण बावणे
मी अगदी असेच नाही पण काडीसारू
मी अगदी असेच नाही पण काडीसारू रिप्लाय देतो.
परवा एकाने शहीद या शब्दाची खरी व्युत्पत्ती सांगून, शहीद ऐवजी हुतात्मा म्हणा असे सांगणारा मेसेज फॉर्वर्डला. मी म्हणालो की मराठीत आणि हिंदीत असे शेकडो शब्द आहेत. आहे का तुमच्या **त दम, सगळ्या 'त्या' शब्दांना हाकलायचा? तर लगेच 'योग्य शब्दयोजनेपेक्षा मोठे प्राब्ळम देशासमोर आहेत' वगैरे बोलू लागले. मी म्हणालो मग अगोदरच्या मेसेजलाच हे पर्फेक्ट लागू होतं. त्यावर आज भाईंनी कडीच केली, प्रपंचात रमणारे कसे मूर्ख असतात आणि मोक्षाला मुकलेले इ. असतात वगैरे सांगणारी रामदासकृत ओवी सादर केली निरूपणासोबत. त्याला रिप्लाय इतकाच दिला की अध्यात्मापेक्षा मोठे प्राब्ळम देशासमोर आहेत. त्याला अजून रिप्लाय आलेला नाही. पाहू काय येतो रिप्लाय ते. इतरांनी सांगितलेलं चालत नाही पण स्वतः तेच करतात. लय मजा येते.
सार्वजनिक ठिकाणी जिथे लायनीत
सार्वजनिक ठिकाणी जिथे लायनीत वॉशबेसिन्स असतात, तिथे बाजूची व्यक्ती, स्वतःच्या तोंडावर 'ताजगी देने वाला' पाण्याचा हपका निष्काळजीपणे जोरात (उदा. 1942मधे मनिषा कोईराला एका दृष्यात तोंड धुताना दाखवल्ये तसं) मारेल आणि ते पाणी आपल्या अंगावर उडेल की काय अशी भीती. तीच भीती लांबून चूळ फेकणार्यांच्या बाबतीत.
प्रयत्न
1942मधे मनिषा कोईराला एका दृष्यात तोंड धुताना दाखवल्ये तसं
हे असं करण्याचा बराच प्रयत्न मी तेव्हा केला होता, १९४२ मध्ये नाही, सिनेमा आला तेव्हा. पण बेसिनच्या आजूबाजूला पाणी सांडलं तर आपल्यालाच ते साफ करायला लागणार ह्याची जाणीव तीर्थरूपांनी करून दिल्यावर हे प्रकार बंद केले.
ओह शूट हे असे झालेले आहे
ओह शूट हे असे झालेले आहे व्हरमॉन्टला. आय हॅड टू नॉक ऑन अ स्ट्रेन्जर्स डोअर. कारण मी आणि गुरमीत आम्ही मरीना, लेकशोअर वरती सकाळी वॉक घेत होतो. कुठेही रेस्टरुम नव्हती, निदान आम्हाला माहीत नव्हती. त्या स्त्रीने वापरु दिले हे तिचे उपकार, देवदूत असणार ती बाई. नंतर मी तिल जाऊन गिफ्ट्कार्ड दिलेले =))
(१) जगातील कवि नामशेष
(१) जगातील कवि नामशेष होण्याची
(२) डोळे गेल्याने स्तोत्र वाचन न करता येण्याची (आता असे म्हणू नका वाचुन वाचुन स्तोत्रच क्कॉ? ;))