Skip to main content

लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) : चर्चेचा खरडा

काही बातम्या वाचनात आल्या -

पाकिस्तानने उड़ी येथे केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान मारले गेले. ह्याचा निषेध म्हणून भारताने केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याच्या (सर्जिकल स्ट्राईक)च्या निमित्ताने काही लेखन वाचनात आलं. उदाहरणार्थ, कालच्या लोकसत्तात हुसेन हक्कानी ह्यांचे विचार.

आणि काही थोर पत्रकारिता फेसबुक कृपेने सापडली; उदा. इंडियाटुडेवरचा हा दुवा. ह्याची थोरवी समजली ती अशी की हसन निसार ह्यांच्या १९ जुलै २०११ रोजीच्या मुलाखतीवरून ही बातमी बनवलेली आहे. अजित डोवाल २०१४ सालात, मोदी सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय सुरक्षा सल्लागार झाले. (हीच बातमी 'एबीपी माझा'वरही आली आहे, तेही डोवाल ह्यांचे नाव घेऊन.)

ह्या विषयात मला काहीही गती नाही; पण बातम्या वाचून थोडं ज्ञानवर्धन होत आहे. ऐसीवरच्या, युद्ध-राजकारणात प्रावीण्य आणि/किंवा रस असणाऱ्या सदस्यांना विनंती की त्यांनी त्यांची मतं आणि/किंवा संबंधित दुवे प्रतिसादांमधून द्यावेत.

अन्य काही अवांतर माहिती, वल्गना इत्यादी -
हिंदीमध्ये उड़ीच्या हल्ल्याचं एक विकीपिडीया पान तयार झालं आहे. मराठी लोक बहुदा, 'हे पुरोगामी, विचारजंती %^&* लोक काही बोलत, लिहीत नाहीत; दुर्लक्षाने मारतात', अशा चर्चा करण्यात बिझी असतील. मला खात्री आहे की ह्या चर्चा सरल्यावर विकीपीडीया पान लगेचच तयार होईल.

१. तोपर्यंत उड़ी नावाचं गाव भारतात आहे, हे मला माहीत नव्हतं. धनंजयच्या सूचनेनुसार गावाचं नाव उड़ी असं (हिंदी विकिपीडीयावरून) लिहिलं आहे.
२. हा उल्लेख ख्रि.पू./ख्रिस्ताब्द सारखा, फक्त कालमापनाच्या संदर्भासाठी.

धनंजय Tue, 04/10/2016 - 00:26

विशेषनामांतील "ड़"चे मराठीकरण शक्यतोवर "ड" असे व्हावे. मुळातील र्‍हस्व-दीर्घही शक्यतोवर मराठीत वापरावे. असे माझे वैयक्तिक धोरण आहे.

परंतु, "उरी" असे लेखन मराठी वर्तमानपत्रांत खूपच वापरले जात असेल, तर प्रयोगशरण होण्याशिवाय गत्यंतर नाही!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/10/2016 - 00:28

In reply to by धनंजय

प्रयोगशरण; त्यातही अभ्यासाचा अभाव. हिंदीतलं विकीपीडीया पान आहे आणि ते बऱ्यापैकी भरलेलं आहे एवढंच चाळलं. बाकी माहिती इंग्लिश/मराठी वृत्तसंस्थांकडून.

गब्बर सिंग Tue, 04/10/2016 - 01:54

हक्कानी यांच्या लेखामधे खालील वाक्य कळीचे आहे -

भारताने हे समजून घेतले पाहिजे, की अखेरीस पाकिस्तानला जिहादींविरुद्ध कारवाईस भाग पाडील तो केवळ त्याच्यावर येणारा पुरेसा दबाव. आता जे काही सुरू आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये केवळ तिरस्कारच कायम राहील. किंबहुना तो वाढेल.’

दबाव कसा आणता येईल हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेले आहे. दबाव आणण्यासाठीच बलुचिस्तान ना पाठिंबा द्यायचे धोरण भारत राबवतोय ना ? त्याची धार प्रखर करता येणार नैय्ये का ??

-----

त्यामुळे भारताने पाकिस्तानवर नाहक वेळ आणि शक्ती खर्च करू नये,’ असे आपणास वाटत असल्याचे ते म्हणाले.

उदाहरण देतो - भारत व चीन मधे खूप मैत्री नाही. काही प्रमाणावर तरी वैरभाव आहे (१९६२ चा परिणाम म्हणून). भारत चीन सैन्यांमधे काही वेळा तीव्र मतभेद, सीमोल्लंघन, दादागिरी घडते. जगातली सर्वात लांब डिस्प्युटेड सीमारेषा असं भारत-चीन सीमा रेषेचं वर्णन केलं जातं. तरीही भारत चीन हे देश तरीही विकसनशील धोरणे राबवत आहेत की नाही ? की भारत चीन वर खूप वेळ, शक्ती खर्च करीत आहे ? की चीन भारतावर खूप वेळ, शक्ती खर्च करीत आहे ?

मुद्दा हा आहे की - (१) भारत-चीन व भारत-पाकिस्तान ही अगदीच अ‍ॅपल्स टू ऑरेंजेस तुलना नाही. (२) चीन प्रजातंत्र नसूनही चीन विकसनशील (लोकाभिमुख) धोरणे राबवतोय. (३) बाय द वे भारत व चीन यांच्या दरम्यान अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. (४) हक्कानी यांच्या विचारांवर पाकी assumptions चा पगडा आहे. जसा पाक भारतद्वेषाने झपाटलेल्याप्रमाणे वागतो तसाच भारत वागेल ... अशी भीती त्यांना वाटते. मग भारत प्रजातांत्रिक असूनही पाकिस्तानवर नाहक वेळ आणि शक्ती खर्च का करेल ?? थोडीफार करेलही पण अति करेल हे पटत नाही. Democracies do not work like confused states (e.g. Pakistan)

राजेश घासकडवी Tue, 04/10/2016 - 04:34

उरी हल्ल्याचं प्रत्त्युत्तर दिल्याबद्दल भारतीय सरकारचं अभिनंदन. आपल्या कोणी टपलीत मारली तर आपणही त्याच्या टपलीत मारावी हा सर्वमान्य न्याय आहे. देशांतर्गत नात्यांमध्येही तो लागू होतो. त्यामुळे असा प्रतिहल्ला करणं हे भारतीय सरकारच्या दृष्टीने योग्यच आहे. इतकी वर्षं अनेक वेळा भारताने हे केलेलं आहे. त्याकाळी या कारवाया गुपचुप होत. यावेळी ती जाहीर करण्यात आली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार द्यायचा की 'अरे, याला बदडला, याला बदडला' असं सर्वांना ओरडून सांगायचं हे दोन स्वतंत्र राजकीय निर्णय असतात. असा निर्णय घेण्यामागे नक्की काय कारण आहे हे मला माहीत नाही. पण पूर्ण विचारांतीच हे धोरण ठरवलं गेलं असणार याची मला खात्री वाटते.

यापलिकडे आलेले काही अ-तज्ञ मनातले विचार...

मला वाटतं पाकिस्तान सरकारला हा प्रतिहल्ला, आणि त्याचं जाहीर होणं ही आनंदाची गोष्ट वाटली असणार. ज्या राजवटीत मिलिट्रीचा मोठा सहभाग आहे तिला शेजारच्या राष्ट्राबरोबर युद्ध नाहीतरी काहीतरी कुरबुरी चालू असणं ही स्थिती पोषकच आहे. रोटी-सडक-बिजलीसारख्या मूलभूत प्रश्नांवरून सामान्य जनतेचं लक्ष विचलित करून 'पाकिस्तान खतरेमे' अशी आरोळी ठोकता येते.

दुसरी गोष्ट अशी की लहानसहान मारामाऱ्या होणं ही कदाचित आंतरराष्ट्रीय प्रश्नांची अपरिहार्य परिणती असेल. मात्र मोठं युद्ध होणं हे भयावह आहे. याबद्दल कोणाचंच दुमत नसावं. 'राजकारणी लोक आर्मीचे हात बांधून ठेवतात नाहीतर पाकिस्तानचा आपण सहज नामोनिशाणा मिटवून टाकू' असं म्हणणारे लोक स्वतःच्याच कोषात जगत असतात. तर सीमेवरची देवाणघेवाण ही केवळ 'स्किर्मिशेस' पातळीवर ठेवून हा प्रश्न कायमचा युद्धाशिवाय, वाटाघाटींनी सोडवण्यासाठी काय करता येईल? मला माहीत नाही, पण ऐसीवरच्या इतर काही तज्ञांकडून यावर वाचायला आवडेल.

नंतरचा मुद्दा या मुद्द्याशीच संबंधित आहे. 'साल्या पाकड्यांना मारून टाका' असा चढलेला उन्माद भारतीय जनतेत दिसतो. या लोकांना ते जितकं सहज वाटतं तितकं ते नाही याची जाणीव आपल्याला लष्कराला आणि राज्यकर्त्यांना आहे याची मला खात्री आहे. मग हा उन्माद नियंत्रित करण्यासाठी पुढे काय पावलं उचलली जातील, याबद्दल मला कुतुहल आहे.

अनु राव Tue, 04/10/2016 - 09:09

In reply to by राजेश घासकडवी

न्याय झाला/ केला गेला अशी भावना पसरवणे ही न्यायालयाचे कर्तव्य आहे.
इथे सुद्धा सरकारनी नागरीकांना मेसेज देणे गरजेचे होते त्यामुळे जाहिर केले ते उत्तम केले. मधुन मधुन असले काही हल्ले वगैरे न करता सुद्धा जाहिर केले तरी आवडेल.

--------------
जी कारवाई सरकारनी जाहिर केली त्याच्या खरेपणा बद्दल संशय व्यक्त केला जातोय ( ऐसीवर ). पण ज्या सो कॉल्ड कायवाया सिब्बल सरकारनी केल्या असे ते आता म्हणतायत, त्या मात्र नक्कीच खर्‍या होत्या अशी पक्की समजुन दिसते आहे.

गब्बर सिंग Tue, 04/10/2016 - 10:11

In reply to by अनु राव

जी कारवाई सरकारनी जाहिर केली त्याच्या खरेपणा बद्दल संशय व्यक्त केला जातोय ( ऐसीवर ). पण ज्या सो कॉल्ड कायवाया सिब्बल सरकारनी केल्या असे ते आता म्हणतायत, त्या मात्र नक्कीच खर्‍या होत्या अशी पक्की समजुन दिसते आहे.

मार्मिक श्रेणी देऊन समाधान होईना.

आदूबाळ Tue, 04/10/2016 - 11:50

In reply to by राजेश घासकडवी

युद्ध भयानक असतं यात वादच नाही. पण राहून राहून म्युनिक करारावर सही करून "पीस इन अवर टाईम्स" सांगणाऱ्या नेव्हिल चेम्बरलेनचा फोटो डोळ्यांसमोर येतो.

अनुप ढेरे Tue, 04/10/2016 - 10:11

इथे एक गम्मत अशी दिसते की काही विचारवंत एकीकडे हल्ले झालेच नाहीत अशा कुरबुरी करत आहेत, प्रूफ मागत आहेत आणि दुसरीकडे आधीही असे हल्ले होतच होते असं ठामपणे कुठलही प्रूफ नसताना म्हणता. मज्जा मज्जा...





याच संदर्भात खालील वक्तव्य रोचक आहे. जाणकारांनी अर्थ लावावा.
http://www.loksatta.com/mumbai-news/social-activist-medha-patkar-commen…

दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारताने अवलंबवलेला मार्ग हिंसाचाराचा असून त्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. गांधीजींनी देशासाठी अनेक सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने केले. तोच अहिंसेचा मार्ग त्यांनी आपल्यालाही दाखवला.

अनु राव Tue, 04/10/2016 - 10:16

In reply to by अनुप ढेरे

पाकीस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करायचे असेल तर बाईंची पाकीस्तानात पाठवणी केली पाहिजे( साडी चोळी देऊन ). तिथे बुरखा घालुन मोर्चे काढुन दोन्ही शरीफ लोकांना वात आणतील.

अबापट Tue, 04/10/2016 - 10:21

In reply to by अनुप ढेरे

ढेरेशास्री , असं दिसतंय कि शंका उत्पन्न करणारे विचारवंत वेगळे आहेत व 'आधी झालेच आहे'कि म्हणणारे लोक वेगळे आहेत. दोघांना एकाच पोत्यात का बांधता ? (बाकी प्रूफ वगैरे मागणं हे गमतीशीर वाटते.प्रूफ कोणी कोणाला का द्यावीत ? आणि प्रूफ चे डॉक्टर्ड विडिओ काढण्याचे तंत्रज्ञान हि आहेच कि उपलब्ध )तात्पर्य ,हि मागणी विनोदी वाटते. बरं ते जाऊ दे , आपला विडिओ सापडला का ?

नितिन थत्ते Tue, 04/10/2016 - 10:36

In reply to by अनुप ढेरे

मेधा पाटकर यांचे वक्तव्य हे गांधींना मान खाली घालायला लावील... मेधा पाटकरांसाठी गांधींच्या अहिंसेबाबत म्हणण्याचा एक्स्ट्रॅक्ट:

Even manslaughter may be necessary in certain cases. Suppose a man runs amuck and goes furiously about, sword in hand and killing anyone that comes his way and no one dares to capture him alive. Anyone who despatches this lunatic will earn the gratitude of the community and be regarded as benevolent man.
From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man. The Yogi who can subdue the fury of this dangerous man may not kill him. But we are not here dealing dealing with beings who have almost reached perfection; we are considering the duty of the society, of the ordinary erring human beings.

He who refrains from killing a murderer who is about to kill his ward (when he cannot prevent him otherwise) earns no merit but commits a sin, he practices no ahimsa but himsa out of of a fatuous sense of ahimsa.

संदर्भ: My Philosophy of Life- M K Gandhi

अनुप ढेरे Tue, 04/10/2016 - 10:44

In reply to by नितिन थत्ते

छान प्रतिसाद. आपण गांधीजींचे विचार आउट ऑफ कंटेक्स्ट घेत आहोत, याबाबत गांधीजींची नक्की मतं काय होती हे मेधा पाटकरांसारख्या मोठ्या लोकांना माहिती नसावी हे दुर्दैवी आहे.

गब्बर सिंग Tue, 04/10/2016 - 10:56

In reply to by अनुप ढेरे

आज गांधीजी आणि त्यांच्या विचारांना न मानणारे किंवा त्यांच्यावर हसणारे वा त्यांची खिल्ली उडवणारे लोक असले, तरी शेवटी या सर्व मंडळीना गांधीजींचे नाव घेतल्यावाचून राहता येणार नाही, असे डॉ. महाजन म्हणाले.

जगातली किती बलवान* राष्ट्रे गांधींच्या विचारांच्या जवळपासची धोरणे पाळणारी आहेत ?

( * बलवान म्हंजे - सांपत्तिक, सामरिक/लष्करी वगैरे दृष्ट्या )

---

बाकी बाईंची मार्गक्रमणा शांततेच्या नोबेल कडे चालू आहे असे दिसते. देऊन टाका त्यांना एकदाचे. खरंतर एकदम दोन नोबेल्स दिली पायजेत त्यांना. शांततेचे आणि मेडिसीन चे.

घाटावरचे भट Tue, 04/10/2016 - 11:39

या हल्ल्याबाबत निरनिराळ्या ठिकाणी येणारी माहिती वाचून काही गोष्टी कळल्या -

१. प्रथमच सर्जिकल स्ट्राइक करण्याबाबत - निवृत्त सेनाप्रमुख जनरल विक्रम सिंह यांचं "असे हल्ले यापूर्वीही भारतीय सैन्याने केलेले आहेत" विधान संदर्भ सोडून वापरलं जात आहे. या विधानासोबत ते असंही म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात, इतक्या ठिकाणी आणि नियंत्रण रेषा ओलांडून इतक्या आत घुसून पहिल्यांदाच भारतीय सैन्याने हल्ले केलेले आहेत. असे हल्ले करण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि सैन्य यामध्ये प्रचंड समन्वय लागतो, तो या वेळेला दिसला. यापूर्वी केलेल्या कारवाया इतक्या को-ऑर्डिनेटेड आणि एकाच वेळेला अनेक ठिकाणी झालेल्या नाहीत.

२. पाकिस्तानची अण्वस्त्रे वापरण्याबद्दलची धमकी - बर्‍याच संरक्षण तज्ञांच्या मते 'टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन्स' वापरण्याची पाकिस्तानची धमकी पोकळ असल्याचे यातून सिद्ध झालेले आहे. पाकिस्तानकडे अशी लहान अण्वस्त्रे असतीलही. पण त्यांचा जो 'आम्ही ही अस्त्रे कमीत कमी वेळात उपयोगात आणू शकतो' (लिमिटेड बट स्विफ्ट न्यूक्लियर रिटालिएशन) हा दावा आहे, तो या हल्ल्यामुळे फोल ठरल्याचं दिसत आहे. शिवाय त्यांच्या अशी लहान अण्वस्त्रे उपयोगात आणण्याच्या क्षमतेवरेही शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

३. हल्ल्याचं टायमिंग व संभाव्य परिणाम - पाकिस्तानात सध्या लष्कर आणि नागरी सरकार दोन्हीकडे बदलाचे वारे वाहात आहेत. नवाज़ शरीफ यांच्या सरकारवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि त्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरु केलेले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ निवृत्त होत आहेत. हा हल्ला दोघांच्याही कारकिर्दीला गालबोट ठरणार आहे. त्यामुळेच पाकिस्तानी लष्कर आणि नागरी सरकार प्रतिक्रिया देण्याबाबतीत गोंधळात पडलेले दिसले. याला प्रतिक्रिया म्हणून येत्या काळात दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली तर नवल वाटायला नको. अशी आशा करुया की आपल्या गुप्तचर यंत्रणा व पोलिस व सैन्यदले यासाठी तयार आहेत.

नितिन थत्ते Tue, 04/10/2016 - 11:46

In reply to by घाटावरचे भट

"पाकिस्तानी राज्यकर्ते याडचाप (बहिसटलेले) आहेत आणि वेडाच्या भरात ते अणुहल्ला करू शकतील" किंवा "पाकिस्तान फुटला तर ही अण्वस्त्रे जहाल गटांच्या हाती पडतील" ही इमेजसुद्धा पाकिस्तानने काळजीपूर्वक कल्टिव्हेट केलेली आहे असे मला वाटते. ही इमेज सुद्धा एक डिटरंट म्हणून काम करते.

घाटावरचे भट Tue, 04/10/2016 - 11:52

In reply to by नितिन थत्ते

शक्य आहे. पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि विशेषतः आय.एस.आय हे मिस-इन्फर्मेशन पसरवण्याच्या तंत्रात वाकबगार आहेतच.

शिवाय त्यांच्या "आमचे अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडतील" या कांगाव्यामुळेच त्यांची प्रतिमा "अ स्टेट विच निगोशिएट्स विथ अ गन टु इट्स ओन हेड" अशी झालेली आहे.

बॅटमॅन Tue, 04/10/2016 - 13:01

In reply to by नितिन थत्ते

यग्झाक्टली. हे असे फिअरमाँगरिंग करणे पाकड्यांना बाकी मस्त जमते. या इमेजला तडा जाणे आवश्यक आहे.

चिंतातुर जंतू Tue, 04/10/2016 - 14:14

In reply to by नितिन थत्ते

>>पाकिस्तानी राज्यकर्ते याडचाप (बहिसटलेले) आहेत

डिटरंट म्हणून ह्याचा उपयोग होत असेलही, पण (पाकिस्तानात न जाता) मला आयुष्यात जे थोडेफार पाकिस्तानी नागरिक भेटले त्या सगळ्यांचं पाकिस्तानच्या (वेगवेगळ्या काळातल्या) राज्यकर्त्यांबद्दलचं परखड मत हेच होतं. पाकिस्तानात गेलेल्या काही मित्रांनी प्रत्यक्ष पाकिस्तानातही लोकांकडून हेच ऐकलं होतं. भारतीय नागरिकांचाही राज्यकर्त्यांवर रोष असतो, पण तो पुष्कळदा राजकीय निष्ठेनुसार असतो. तिथे तसं नव्हतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/10/2016 - 19:59

In reply to by चिंतातुर जंतू

तुमच्या ओळखीच्या पाकिस्तानी लोकांचं भुत्तो बापबेटीबद्दल हेच मत होतं का? (जावई आणि बाळ भुत्तोबद्दल मला कल्पना नाही.)

चिंतातुर जंतू Tue, 04/10/2016 - 20:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> तुमच्या ओळखीच्या पाकिस्तानी लोकांचं भुत्तो बापबेटीबद्दल हेच मत होतं का?

भुत्तो बापबेटी दोघांकडून मुळात अपेक्षा प्रचंड होत्या, पण त्यांनीही मातीच खाल्ली असा एकंदर सूर होता. 'भुत्तो हे सरंजामी कुटुंब आहे. त्यांची प्रचंड स्थावर-जंगम मालमत्ता आहे. आणि पाकिस्तानातली सरंजामशाही मोडून काढण्यात ते कुचकामी ठरले (किंवा इच्छाशक्तीच नव्हती). त्यामुळे सामान्य माणसांच्या आयुष्यात त्यांच्यामुळे फरक पडला नाही.' झरदारी तर पुरतेच वाया आहेत. रॉबर्ट वढरा त्यापुढे काहीच नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/10/2016 - 20:32

In reply to by चिंतातुर जंतू

प्रचंड अपेक्षा ठेवल्या किंवा निर्माण केल्यामुळे 'माती खाल्ली' असा सूर असेल का? पाकिस्तानी राज्यकर्ते यडपटच, ह्या सरसकटीकरणात भुत्तो बापबेटी विसंगत वाटतात; काही अंशी मुशर्रफही, लोकशाही मार्गाने निवडून आलेले नसेनात का.

दुसरं असं की, स्वातंत्र्य-निर्मितीनंतर निदान पहिली ४-५ दशकं पाकिस्तानची प्रगती झाली नाही असं वाटत नाही; ते आकडे भारताशी तुल्यबळ वाटतात. लोकांचं पर्सेप्शन वास्तवापेक्षा कठोर असतं; भारत आकाराने मोठा म्हणून कदाचित भारतातली प्रगती पाकिस्तानी लोकांना अधिक दिसत असेल व/वा गेल्या वीसेक वर्षांत पाकिस्तानी राज्यकर्त्यांचं माती खाणं वाढलं असेल, त्यातच दहशतवाद ही समस्याही, जगभरात गेल्या २० वर्षांत बरीच मोठी झालेली; अशा गोष्टींमुळे सामान्य जनतेचं मत अधिक कठोर असेल का?

(माझी माहिती तोकडी आहे आणि ह्या जर-तरच्या गप्पा म्हणजे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न आहे.)

१. ह्याचा प्रत्यय भारतात आणि अमेरिकेतही येतो; ट्रंप म्हणतो, 'मी आयकर न भरता सुटलो कारण मी हुशार आहे'; मग लगेच त्याचे पित्ते 'तो अतिमहाप्रचंड हुशार आहे' म्हणणार आणि बाकीचे हो-ला-हो करणार. भारतात, ''त्यां'ची संख्या प्रचंड वेगात वाढत्ये, अशाने 'ते' बहुमतात येतील' हे एक चलनी नाणं.

मिलिन्द Wed, 05/10/2016 - 03:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या माहितीनुसार पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजूनही साधारण स्वातंत्र्य मिळाल्यावर जी होती तशीच आहे-गहू , कापूस वगैरे. नवीन औद्योगिकीकरण अनेक कारणांनी झालेले नाही . फक्त लोकसंख्या 8 कोटीची आता 18.5 कोटी झाली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/10/2016 - 04:33

In reply to by मिलिन्द

भारत आणि पाकिस्तानचं GDP आणि purchase power parity चा हा आलेख. स्रोत
भारत पाकिस्तान जीडीपी

२००९ पर्यंत भारताची purchase power parity पाकिस्तानपेक्षा कमी होती. २००४ च्या पुढे भारताने पाकिस्तानपेक्षा अधिक प्रगती करायला सुरुवात केली असं ह्या आलेखातून दिसतंय. त्याच पानावरचे इतर आलेखही पाहता येतील. शिक्षण, जननदर, अशा इतर गोष्टीही आहेत. हे एक उदाहरण म्हणून, पाकिस्तान हे अगदीच बुडीत खातं असल्याचं भारतात मानलं जाण्याची प्रथा आहे. परंतु चित्र तेवढं वाईट नाही.

हा जननदराचा आलेख -

मिलिन्द Wed, 05/10/2016 - 03:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतात हिंदू जोडप्याला सरासरी 3 आणि मुसलमान जोडप्याला 3.5 मुले आहेत (त्यामुळेच त्यांच्यात अनेक अर्धवट दिसतात!(कृपया हलकेच घेणे!)). "त्यांची" सुमारे 2 कोटी जोडपी व्यवस्थितपणे संतती-नियमन करतात. मुसलमान फारसे कॉलेज शिक्षण घेत नाहीत कारण ते घेऊन त्यांना भारतातील पूर्वग्रदूषित आणि जाती-बद्ध अर्थव्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटते. पण त्यामुळे ते " लो स्किल ट्रॅप " मध्ये फसत चालले आहेत. "नव्या" अर्थव्यवस्थेत "जुनी" स्किल्स किती दिवस चालणार?

गब्बर सिंग Wed, 05/10/2016 - 04:26

In reply to by मिलिन्द

मुसलमान फारसे कॉलेज शिक्षण घेत नाहीत कारण ते घेऊन त्यांना भारतातील पूर्वग्रदूषित आणि जाती-बद्ध अर्थव्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटते. पण त्यामुळे ते " लो स्किल ट्रॅप " मध्ये फसत चालले आहेत. "नव्या" अर्थव्यवस्थेत "जुनी" स्किल्स किती दिवस चालणार?

(१) निळा भाग खरा आहे असं कशावरून ?
(२) तांबडा भाग हा खरा आहे असं कशावरून ? हजारो मुस्लिम माणसं व्यवसाय करतात. मग त्यांना पण आपल्या धर्मबांधवांबद्दल पूर्वग्रह असतो की काय ? Why do they not hire their own धर्मबांधव ?
(३) हिरवा भाग क्लॉडिया गोल्डिन च्या "रेस बिट्विन एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी" या पुस्तकात नमूद केलेला आहे. ( पण ती हस्तिदंती मनोर्‍यात असल्यामुळे तिचे ते मातीशी इमान नसलेले साहित्य ठरते. )

आदूबाळ Tue, 04/10/2016 - 20:56

In reply to by चिंतातुर जंतू

' झरदारी तर पुरतेच वाया आहेत. रॉबर्ट वढरा त्यापुढे काहीच नाही.

हो! हे मत मीही ऐकलं आहे. प्रचंड माया जमवलेला पण ती सांभाळायची काडीमात्र अक्कल नसलेला माणूस असं त्याचं वर्णन त्याच्या एका देशबांधवाने केलं होतं.

चिंतातुर जंतू Tue, 04/10/2016 - 14:16

In reply to by घाटावरचे भट

>>याला प्रतिक्रिया म्हणून येत्या काळात दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली तर नवल वाटायला नको.

दोन दिले तर दोन घ्यायची तयारी हवीच ना ;-)

चिंतातुर जंतू Tue, 04/10/2016 - 14:33

In reply to by नितिन थत्ते

>>आपण दोन दिले तरी तो दोन देऊ शकणार नाही याची तयारी हवी !!

प्रतिस्पर्धी दोन देऊ शकणारच नसेल तर मग दोन देण्यात काही मजाच येणार नाही ;-) हे म्हणजे ऑफिसात बॉसचा मार खाऊन मग घरी शेळपट बायकोसमोर नवरेगिरी करण्यासारखं होईल की मग!

चिंतातुर जंतू Tue, 04/10/2016 - 14:37

In reply to by नितिन थत्ते

>>ती काय फ्रेण्डली म्याच आहे की काय ?

असं समजा की पाकिस्तान चुतियापा करतच नसता; एकदम दूध का धुला असता; आणि आपण दिलेला मार (शेळपट बायको किंवा नवरा असल्यागत) निमूटपणे खात असता. मग सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानं आपल्याकडे लोकांना एवढा आनंद झाला असता का? :-)

सेक्युलर विचारवंत Tue, 04/10/2016 - 14:49

In reply to by चिंतातुर जंतू

पाकिस्तानवर टीका हे झिनोफोबिआचं लक्षण आहे. भारत उत्तर कोरिआ होतो आहे गेली दोन वर्ष या माझ्या मताला पुष्टी मिळत आहे.

गब्बर सिंग Tue, 04/10/2016 - 20:11

In reply to by सेक्युलर विचारवंत

पाकिस्तानवर टीका हे झिनोफोबिआचं लक्षण आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानवर टीका केली तर ते सुद्धा झेनोफोबिया च आहे का ओ ?

गब्बर सिंग Tue, 04/10/2016 - 21:02

In reply to by बॅटमॅन

माझी समस्या ही आहे की सगळे शांतिखोर, टगेगिरी करणारे लोक एकत्र येऊन जो युद्धविरोधी सूर लावताहेत तो मला चिंताजनक वाटतो. भारताचे आंतरराष्ट्रीय कॅरॅक्टर व प्रतिमा हे अतिसामोपचारी बनलेले आहे व त्या आगीत अलिप्त राष्ट्र परिषदेमुळे तेल ओतण्याचा उद्योग झालेला आहे. नेहरू हे त्या सगळ्या उपद्व्यापाचे म्होरके. कितीही भारतीय मेले तरी चालतील, आणि धोरणे कितीही अयशस्वी झाली तरी चालतील पण आमचे बँक्रप्ट तत्वज्ञान आम्ही जनतेवर लादणारच हा काँग्रेसी व डाव्या टगे मंडळींचा आवडता उद्योग झालेला आहे. उदा. इथे, आणि इथे, इथे सुद्धा. माकप च्या नेत्यांचे, व मेधा पाटकरांचे निवेदन सुद्धा ह्याच कॅटेगरीत मोडणारे आहे. ही मंडळी वैचारिक टोळधाडगिरी करण्यात पटाईत आहेत. गेली अनेक दशके यांच्या टोळ्यांनी "आम्हालाच काय ते जनतेचे हित कळते" अशा अविर्भावात टगेगिरी केलेली आहे. सुरक्षा, राष्ट्रवाद, व जिंगोइझम यांच्यातल्या सीमारेषा याच मंडळींनी पुसून टाकल्या. आता त्या शब्दावली मधे झेनोफोबिया चा अंतर्भाव झालेला आहे.

'न'वी बाजू Wed, 05/10/2016 - 04:46

In reply to by गब्बर सिंग

सुरक्षा, राष्ट्रवाद, व जिंगोइझम यांच्यातल्या सीमारेषा याच मंडळींनी पुसून टाकल्या. आता त्या शब्दावली मधे झेनोफोबिया चा अंतर्भाव झालेला आहे.

Let's shoot the messenger, huh?

मिलिन्द Wed, 05/10/2016 - 03:13

ते कधीच गेले हो! अणुबॉम्ब बनविल्यावर आणि 77,000 मारून काश्मीरचा प्रश्न "सोडवायचा" प्रयत्न केल्यावर ! आता जग भारत- पाक अणुयुद्ध होणार अशा भीतीत वावरत आहे.

>> आता जग भारत- पाक अणुयुद्ध होणार

हे कितपत बरोबर आहे? यु. एन. मध्ये काश्मीर प्रश्नाविषयी इतर जगाला फारसं काही पडलं नव्हतं असं वाचलं. त्यावरून इतर देशांना आपल्या अणुबॉम्ब -युद्धाविषयी फार भिती आहे असं वाटत नाही.

तिरशिंगराव Wed, 05/10/2016 - 10:11

सैन्याच्या हालचालीचा पुरावा मागणं आणि तो जाहीर करणं, या दोन्ही गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. लोकांना सूड घेतल्याचे समाधान मिळावे म्हणून सैन्याने ते जाहीर केले ते एकवेळ ठीक, पण त्यावर राजकीय नेत्यांनी मिशीला पीळ भरणे आणि त्याचा राग येऊन विरोधी पक्षांनी त्याचा पुरावा मागणे वा अशा गोष्टी आधी पण होतच होत्या (आमच्या काळात)असे म्हणणे, हे बालिशपणाचे आहे.
असे अनेक हल्ले यापुढेही दोन्ही बाजूनी होतच रहातील याची भारतीय सेनेला पूर्ण कल्पना आहे, त्यानुसार त्यांचे डावपेच तयारच असतील. त्यावर मिडियामधे जाहीर चर्चा कशाला ?
आजकाल, कणभर गोष्ट झाली तरी त्यावर मणभर चर्चा होते.

अनुप ढेरे Wed, 05/10/2016 - 10:25

In reply to by तिरशिंगराव

अगदी! आणि व्हिडो केले रिलीज तर व्हिडो खोटे असा प्रचार सुरू करणार. 'सात शेपट्यांचा उंदीर' गोष्टी सारखं कशानीही या शंकासुरांचं समाधान होणारच नाही. उलट आत्ता ते स्वतःच्या करणीनेच अनपॉप्युलर होतच आहेत.

नितिन थत्ते Wed, 05/10/2016 - 11:44

In reply to by तिरशिंगराव

पुरावे देण्याची मागणी बहुधा केजरीवालनी केली होती. ती मागणी करताना त्यांनी प्रथम सरकार आणि मोदींचे अभिनंदन केले. माझे मोदींबरोबर हजार मतभेद असतील पण या बाबतीत मी त्यांच्याबरोबर आहे असे ते म्हणाले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या पत्रकारांना वगैरे सीमेवर नेऊन काही घडलेच नाही असे दाखवले तर तुम्ही पण हल्ला केल्याचे पुरावे द्या असे ते म्हणाले.

शक्यता १- पुरावे देऊन पाकिस्तानचे तोंड फोडा असे म्हणायचे असेल.
शक्यता २- शेवटच्या वाक्यातला शॉट मारण्याआधी तोंडदेखले मोदींचे कौतुक केले असेल.

अनु राव Wed, 05/10/2016 - 11:52

In reply to by नितिन थत्ते

सर्जीकल स्ट्राइक झाला असे आर्मीच्या माणसानी पत्रकार परीषद घेउन सांगितले आहे. पुरावे मागायचे तर आर्मी कडे मागा, मोदींकडे का? आर्मी मोदींच्या दडपणाखाली धाधांत खोटे बोलते असे जर म्हणायचे झाले तर मोदींनी चांगलाच वचक निर्माण केला आहे.

------
व्हॉ.अ. वरुन : गोडुल्या रा.गा. ची सर्जिकल स्ट्राईक ची बातमी कळाल्यावरची प्रतिक्रीया : "आय सपोर्ट सर्जन्स ऑन स्ट्राईक"

--------
गोडगोडुला रा.गा. हे भारतासाठी ब्लेसिंग इन डीस्गाइस आहे. शुचिच्या भाषेत बोलायचे तर "भारतमातेला पहाटे पडलेले सुंदर स्वप्न आहे"

नितिन थत्ते Wed, 05/10/2016 - 12:03

In reply to by अनु राव

तुमच्या शेवटच्या वाक्यावरून वाटते की व्हॉट्स अ‍ॅपवर आलेल्या मेसेजसारखेच रा गा बोलले असतील असा तुम्हाला विश्वास आहे.

अनु राव Wed, 05/10/2016 - 12:08

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चाचा, रागां बद्दल माझे मत फार वाईट नाहीये. तो काही चिदु, सिब्बु सारखा पाताळयंत्री नीच माणुस नसणार असे मला वाटते.

नितिन थत्ते Wed, 05/10/2016 - 12:11

In reply to by अनु राव

वाईट नाही हो. त्याच्या मूर्खपणाचे किस्से व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतात तितका/त्या प्रकारचा तो मूर्ख आहेच असे तुम्हाला वाटते की काय असे वाटले.

विषारी वडापाव Wed, 05/10/2016 - 19:43

१९७३ च्या युद्धात अरब राष्ट्रांनी बेसावध इस्रायल सैन्यावर हल्ला केला . सावध नसल्यामुळे इस्रायलची सुरुवातीला चांगलीच पीछेहाट झाली . नंतर ते सावरले आणि त्यांनी युद्ध पण जिंकलं . पण सुरुवातीला झालेल्या पीछेहाटीमधून त्यांनी एक धडा घेतला .आपल्यावर अरब राष्ट्र या वेळेस हल्ला करणार नाहीत यावर सर्व गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांचं आणि लष्करी अधिकाऱ्यांचं एकमत झालं होत . त्यामुळेच इस्रायल बेसावध राहिले आणि त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला . ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून इस्रायली सैन्याने एक 'टेंथ मॅन डॉक्ट्रीन' नावाचं धोरण तयार केलं . जर दहा गुप्तहेर खात्याचे /लष्करी अधिकारी अंतर्गत आणि बाह्य धोक्यांवर चर्चा करत असतील आणि नऊ लोकांचं एखाद्या मुद्यावर एकमत असेल तर दहाव्या अधिकाऱ्याला हमखास विरोधी भूमिकेत जाऊन प्रश्न विचारावे लागतात . त्याचं मत बाकीच्या नऊ अधिकाऱ्यांशी जुळणार असलं तरी . .दुसरी बाजू अस्तित्वात असण्याची शक्यता कितीही कमी असली तरी त्याच्यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी हा याचा उद्देश . यानंतर इस्रायल कधीच खिंडीत अडकला नाही .सध्या पाकिस्तानी कलाकार , सर्जिकल स्ट्राईक्स च यश /अपयश यावर उच्चरवात चर्चा झडत आहेत . विरोधी बाजू मांडणारा जणू देशद्रोहीच असं वातावरण तयार झालं आहे . लोकशाहीत प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत . कुठलीही संस्था 'होली काऊ ' नसावी . अगदी लष्कर देखील . पाकिस्तान मध्ये लष्कराला कुणी प्रश्न विचारले नाही म्हणून १९७१ ला बांग्लादेश देश स्वतंत्र झाला . प्रश्न विचारण्याची प्रक्रिया थांबली तर आपला पाकिस्तान किंवा उत्तर कोरिया होईल . कोणताही पक्ष कितीही आवडता असला तरी आणि नेत्यावर कितीही श्रद्धा असली तरी प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत .अर्थातच प्रश्न विचारले जात असताना भाषा संयमाने वापरणे अपेक्षित आहे . 'जवानांना लष्करात जाण्यासाठी कोणी बळजबरी केली होती का ?' असली भाषा मूर्खपणाची आहे . पण जोपर्यंत आपण प्रश्न विचारत राहू तोपर्यंतच लोकशाही जिवंत राहण्याची शक्यता आहे . लोकशाही जिवंत राहिली नाही तर काय होत याची उदाहरण आजूबाजूला दिसतीलच . Be devil 's advocate. Be patriotic.

गब्बर सिंग Wed, 05/10/2016 - 20:14

In reply to by विषारी वडापाव

विरोधी बाजू मांडणारा जणू देशद्रोहीच असं वातावरण तयार झालं आहे . लोकशाहीत प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत . कुठलीही संस्था 'होली काऊ ' नसावी . अगदी लष्कर देखील . पाकिस्तान मध्ये लष्कराला कुणी प्रश्न विचारले नाही म्हणून १९७१ ला बांग्लादेश देश स्वतंत्र झाला . प्रश्न विचारण्याची प्रक्रिया थांबली तर आपला पाकिस्तान किंवा उत्तर कोरिया होईल . कोणताही पक्ष कितीही आवडता असला तरी आणि नेत्यावर कितीही श्रद्धा असली तरी प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत .अर्थातच प्रश्न विचारले जात असताना भाषा संयमाने वापरणे अपेक्षित आहे . 'जवानांना लष्करात जाण्यासाठी कोणी बळजबरी केली होती का ?' असली भाषा मूर्खपणाची आहे . पण जोपर्यंत आपण प्रश्न विचारत राहू तोपर्यंतच लोकशाही जिवंत राहण्याची शक्यता आहे . लोकशाही जिवंत राहिली नाही तर काय होत याची उदाहरण आजूबाजूला दिसतीलच . Be devil 's advocate. Be patriotic.

ही समस्या नेमकी सोडवण्यासाठीच "Strict Civilian Control of Military" च्या डॉक्ट्राईन ची निर्मीती करण्यात आलेली आहे.

लष्कराला प्रश्न विचारले जाऊ नयेत असं कोणीच म्हणत नाहीये. पण कोणी विचारावेत याबद्दल खरा प्रश्न आहे. खरंतर कोणी विचारू नयेत हा कळीचा मुद्दा आहे. अरविंद केजरीवाल यांना या विषयात लोकस स्टँडी नाही कारण ते राज्यसरकारचे (मुख्य)मंत्री आहेत. केंद्रसरकारचे नाही.

बॅटमॅन Wed, 05/10/2016 - 21:37

In reply to by विषारी वडापाव

हे टेन्थ मॅन डॉक्ट्रीन तुम्हीआम्ही राबवून काही होणार नाही. जिथे गरज आहे तिथे, म्ह. डोवालसरांच्या क्यांपमध्ये राबवले पाहिजे. न जाणो ते राबवतही असतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/10/2016 - 21:59

In reply to by विषारी वडापाव

'टेंथ मॅन डॉक्ट्रीन' हे सगळीकडेच पुरस्करणीय धोरण वाटतं. युद्धच कशाला व्हायला हवंय!

आपण बहुतेकदा आपापल्या कोषांमध्ये जगतो. त्यातून प्रगती करण्यासाठी काही संकट, अडचणी किंवा किमान उलट प्रश्न विचारणं होईस्तोवर आपण 'स्टेटस को' सोडत नाही. नावडणारे प्रश्न विचारणारे लोक असावेतच; 'होयबां'मुळे आपला व्यक्तिगत विकासही होणार नाही. "स्वतःलाही प्रश्न विचारणं सोडलं नाही," असं म्हणणारा 'सामना'तला मास्तर आठवतो.

Be devil 's advocate. Be patriotic.

इतरत्र लिहिलंही आहे; ह्या वाक्यामुळे पुन्हा आठवण झाली म्हणून पुन्हा एकदा. 'वुमन इन गोल्ड' नावाचा चित्रपट हल्लीच बघितला. गुस्ताव क्लिम्टने काढलेल्या चित्राचं हे नाव (गूगलून पाहा, लगेच कोणतं ते समजेल). ते चित्र ज्यू घरातून नाझींनी पळवलं. युद्धानंतर ते ऑस्ट्रीयाच्या बेल्वडेर संग्रहालयात गेलं. अनेक वर्षं प्रयत्न करून, न्यायिक कज्जे करून त्या चित्राची मालकी अडेलच्या - जिचं चित्र आहे - पुतणीकडे आली (चित्रपटात ह्या पुतणीचं काम हेलन मिरनने केलंय). ह्या कामात एका ऑस्ट्रीयन पत्रकाराने तिला बरीच मदत केली. "तू हे काम का करतोयस?" असा प्रश्न त्याला विचारल्यावर तो म्हणतो, "ही माझी देशभक्ती आहे. माझ्या देशाने कोणावरही अन्याय करू नये, ह्यासाठी माझ्याकडून जेवढं करता येईल तेवढं मी करतो."

गब्बर सिंग Wed, 05/10/2016 - 22:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण बहुतेकदा आपापल्या कोषांमध्ये जगतो. त्यातून प्रगती करण्यासाठी काही संकट, अडचणी किंवा किमान उलट प्रश्न विचारणं होईस्तोवर आपण 'स्टेटस को' सोडत नाही. नावडणारे प्रश्न विचारणारे लोक असावेतच; 'होयबां'मुळे आपला व्यक्तिगत विकासही होणार नाही.

थोडी सुधारणा करून खालीलप्रमाणे लिहितो -

व्यक्ती बहुतेकदा आपापल्या कोषांमध्ये जगते. त्यातून प्रगती करण्यासाठी काही संकट, अडचणी किंवा किमान उलट प्रश्न विचारणं होईस्तोवर व्यक्ती 'स्टेटस को' सोडत नाही. नावडणारे प्रश्न विचारणारे लोक असावेतच; 'होयबां'मुळे व्यक्तीचा व्यक्तिगत विकासही होणार नाही.

-

आता फक्त हे पाकिस्तानी व्यक्तीच्या बाबतीत घालून बघा.

आणि नंतर मेधा पाटकर आदि मंडळींच्या ही बाबतीत घालून बघा

अर्थातच गब्बर च्या व युद्धोत्सुकांच्या बाबतीत घालून पहा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/10/2016 - 22:27

In reply to by गब्बर सिंग

आता फक्त हे पाकिस्तानी व्यक्तीच्या बाबतीत घालून बघा.
आणि नंतर मेधा पाटकर आदि मंडळींच्या ही बाबतीत घालून बघा
अर्थातच गब्बर च्या व युद्धोत्सुकांच्या बाबतीत घालून पहा.

मी हिंदू नास्तिक आहे; मी हिंदू धर्मातल्या गैररूढींबद्दल बोलते.
मी भारतीय नागरिक आहे; मी भारताबद्दल बोलते.
मी फक्त एकच व्यक्ती, मी आहे; त्यामुळे मी पाकिस्तानी नागरिक, मेधा पाटकर आदी मंडळी, आणि गब्बरच्या व युद्धोत्सुक मंडळींच्या व्यक्तिगत बाबतीत बोलत नाही.

१. मूळ वाक्यरचनेशी प्रामाणिक.

गब्बर सिंग Thu, 06/10/2016 - 01:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी फक्त एकच व्यक्ती, मी आहे; त्यामुळे मी पाकिस्तानी नागरिक, मेधा पाटकर आदी मंडळी, आणि गब्बरच्या१ व युद्धोत्सुक मंडळींच्या व्यक्तिगत बाबतीत बोलत नाही.

कोषा मधे सगळे असू शकतात. पाकी, तुम्ही, मी, मेधा, मोदी, आर्मी, केजरीवाल ... सगळे. अगदी परमेश्वर सुद्धा कोषात राहू शकतो. नास्तिक माणूस हा बहुतेक वेळा कोषातून बाहेर असतो असा माझा समज आहे. कारण तो खूप स्मार्ट असतो. आमचे म्हणणे हे आहे की पाकिस्तानने आमची माणसं मारू नयेत. हा मुद्दा अनेकांसाठी व्यक्तीगत आहे पण त्याहीपेक्षा जास्त तो राष्ट्रीय सुद्धा आहे. पाकिस्तान ऐकत असेल तर मस्तच. अन्यथा भारतीय केंद्रसरकारने पाकिस्तानला बलप्रयोगातून धडा शिकवावा.

गब्बर सिंग Thu, 06/10/2016 - 03:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वडाची साल पिंपळाला लावण्यामागे काही खास कारण आहे का आपलं सहजच?

तुम्ही वेड पांघरलंत .... मग म्हंटलं आपण पण एखादा अभिनव प्रयोग करावा.

-

माणसं कोषात असतात, कोषात असतात, कोषात असतात, हे ठीकाय ओ. पण आपण कोषातून बाहेर आलो आणि वाटाघाटी करायच्या म्हंटलं तरी इतरांना कोषातून कसं बाहेर आणायचं ?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 06/10/2016 - 04:13

In reply to by गब्बर सिंग

मी जेनेरिक, संदर्भहीन बडबड केली; त्याकडे 'अदितीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे', म्हणत दुर्लक्ष करावं अशी विनंती. तसदीबद्दल क्षमस्व.

ऋषिकेश Thu, 06/10/2016 - 09:32

In reply to by विषारी वडापाव

अप्रतिम प्रतिसाद!

यावरून गेल्या पिफला पाहिलेला 'हॅना आरेण्ट' आठवला आणि त्याचे हे अप्रतिम परिक्षणही