ही बातमी समजली का? - १२७
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
PM Modi, Ajit Doval war-mongers: Digvijaya Singh
Accusing the ruling BJP of indulging in “chest-thumping” over the Armys surgical strikes on terrorist launch pads across the Line of Control (LoC), Congress leader Digvijaya Singh on Sunday called Prime Minister Narendra Modi a “war-monger”.
“This kind of strikes have taken place earlier also. The only difference is this chest-thumping and media sort of going overboard. This never happened before because the earlier Prime Minister thought these issues are best left to be dealt with by the security forces,” Singh told CNN News 18.
जनतेला जे हवं आहे ते मोदींनी दिलं. जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या. आणि जनतेने त्यास भरपूर प्रतिसाद दिला. व त्यास दिग्विजय सिंग नी दुजोरा दिला. क्या ब्बात है !!!
.
.
.
.
माहिती नाही ब्वॉ. पण LOC पार
माहिती नाही ब्वॉ. पण LOC पार हल्ले आधीही झाले होते असं चिदु म्हणतायत.
बिक्रम सिंग यांनी पण तेच स्टेटमेंट दिलंय.
म्हणूनच दिग्गीराजा ला बल आलंय.
खरंतर युद्धोत्सुकता (जंगी जूनून) ही अत्यंत मस्त गोष्ट आहे. युद्धं नसली तर गरीब माजतात साले. त्यापेक्षा युद्धांत मरत असतील तर त्यांचा (म्हंजे कल्याणकारी योजनांद्वारे त्यांच्या डोंबलावर जो पैसा ओतलेला असतो त्याचा) उपयोग तरी होतो काही.... परंतु... समस्या ही आहे की कॅपिटलिझम मुळे फडतूसांची युद्धात मरण्याची शक्यता कमी झालेली आहे.
युद्धं नसली तर गरीब माजतात
युद्धं नसली तर गरीब माजतात साले. त्यापेक्षा युद्धांत मरत असतील तर त्यांचा (म्हंजे कल्याणकारी योजनांद्वारे त्यांच्या डोंबलावर जो पैसा ओतलेला असतो त्याचा) उपयोग तरी होतो काही.
जे जवान आपले रक्षण करण्याकरता धारातीर्थी पडतात, ज्यांच्या बायका विधवा आणि पालक निर्वंश होतात, घरे उजाडतात त्यांच्याबद्दल बोलताय का?
आता म्हणाल त्यांच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नव्हती सैनिक बनण्याची.
.
"अनमिक वीरास", "हुतात्म्याच्या घरची दिवाळी" वगैरे कविता आठवुन गेल्या.
.
जर मी समजते आहे तोच तुमच्या बोलण्याचा मतीतार्थ असेल तर तुम्ही "उचलली जीभ ...." करत आहात. आणि मग तुम्हाला राष्ट्र्वादी तरी कोणी का म्हणावं?
_____
इतके दिवस म्हणत होतात गरीबांच्या डोंबल्यावरती फुक्कट पैसा ओतला जातो याची चीड आहे. आज म्हणताय गरीबांचा उपयोग युद्धात होतो. काय ते एक ठरवा ब्वॉ.... म्हणजे जमत असेल तर.
चिदू नाही माझी लष्करी अधिकारी
चिदू नाही माजी लष्करी अधिकारी पण म्हणतायत.
असे हल्ले पूर्वी होत असतील तर ते पाकिस्तानला (त्यांच्या सैन्याला) ठाऊक असेलच की. अमेरिका, चीन सर्वांना ठाउक असणार.
भारतात सुद्धा अनेक लोकांना अशा कारवाया होत असतात/असणार याचा अंदाज होता. ठाऊक नव्हते ते फक्त "नेभळट-सरकार-संताप"वादी लोकांना !
आता नव्याने एवढ्याच लोकांना कळले असावे.
म्हणे, १९९७ सालच्या अश्याच
म्हणे, १९९७ सालच्या अश्याच स्कीम मधे २५-३०००० कोटी उघड केले होते. जवळजवळ २० वर्षात फक्त दुप्पट रक्कम म्हणजे ही योजना अयशस्वी झाली असे म्हणायचे का?
१९९७ साली २५-३०,००० कोटी तर आत्ता २,००,००० कोटी उघड होयला पाहिजे होते (उदारीकरण, बाहेरच्या देशातुन गुंतवणुक म्हणुन आलेले लाखो कोटी धरले तर. )
Baramulla attack updates:
Baramulla attack updates: 'Situation under control'
दिग्गीराजांनी पाकी अतिरेक्यांना व पाकी आर्मी ला उद्देशून युद्धखोरीचा "इल्जाम" (का काय ते) कधी लावला होता ??
ब्याट्याचे अल्गोरिथम इथे बरोब्बर बसते.
---
BSF Chief Vikash Chandra Speaks To Arnab Goswami.
पण अजून हा आरोप कसाकाय झालेला नाही की "अर्णब गोस्वामी हा मोदींची सिक्युरिटी, मिलिटरी पॉलीसी ठरवतोय/चालवतोय" ??
---
PM Modi must ensure cross-border attacks become a regular response to terror strikes ____ C. Raja Mohan
Every time Pakistan-backed terrorists violate the sanctity of the LoC, the Indian security forces must do the same.
RBI मधल्या अलिकडे झालेल्या
RBI मधल्या अलिकडे झालेल्या काही बदलांचा आढावा.
https://www.bloomberg.com/view/articles/2016-10-02/india-s-central-bank…
म्हणुनच मी म्हणते की कित्येक
म्हणुनच मी म्हणते की काही मुलभुत प्रॉब्लेम अहिंसक रीतीने आर्थिक हत्यारे वापरुन सोडवता येतील...
Domino's goes vegetarian in North India for Navratri
Most of the company's restaurants in Gujarat, Madhya Pradesh, Chhattisgarh, Uttar Pradesh and Bihar will have only vegetarian menu during the Navratri period.
India to ratify Paris
India to ratify Paris agreement on climate change: Here is everything you need to know
One of the major aims of the 16-page Paris Agreement, which includes a preamble and 29 Articles, is to control the average global temperature rise to under 2 degrees Celsius and working so that it tends towards 1.5 degrees Celsius. The agreement is flexible in terms of the needs and capacities of a country. The agreement has been balanced considering factors like adaptation and mitigation with a timely increase of ambitions.
--------
Why China is upset with the Rafeal Deal !
The Rafale squadrons will be able to attack enemy targets without even crossing into the enemy’s territory.
ही बातमी समजली का? - १२७
अमेरीकेत बरेच आफ्रिकन-अमेरिकन लोक जटा ठेवतात. अन्य वंशाच्या कोणी लोकांनी जटा ठेवल्याचे माझ्या पहाण्यात नाही. कोर्टाने परवाच हा निर्णय दिलेला आहे की - जटांच्या मुळे एखाद्याला नोकरी नाकारली गेली तर तो भेदभाव (वर्णद्वेष) ठरत नाही.
http://www.vox.com/2016/9/19/12971790/court-discriminate-dreadlocks
यात हा मुद्दा मस्त घेतला गेला की समाजात वंश डिफाइन होतो तेव्हा काही अपरिहार्य घटक असतात तर काही तात्पुरते/बदलू शकणारे. बदलू शकणार्या घटकांत जटांची फॅशन मोडते.
बायकाच काय H-4 वरच्या
बायकाच काय H-4 वरच्या नवर्यांनाही हाच शाप आहे.
अजुन एक "sense of purpose" आभाळातुन कोसळणार नाहीये. आहे त्या परिस्थितीत निर्माण करावा लागणार आहे. हे सांगणे सोपे आहे पण जमणे अवघड असे कोणीही म्हणेल पण मला या फ्रस्ट्रेशनचा सेकंड हॅन्ड अनुभव आहेच. नवरा H-4 होता तेव्हा झळ मलाही पोचलेली आहे. प्रचंड फ्रस्ट्रेटिंग असते.
.
द थिंग इज त्यातुन बाहेर पडण्याकरता, स्वतःचे (H-4 जातक) शिक्षण चालू ठेवायचे व योग्य वेळ येईतो आपल्या कुर्हाडीस धार करुन ठेवायची हाच मार्ग आहे.
एच-४
ह्याबद्दल कधीतरी काहीतरी लिहायला मला आवडेल. सध्या (गेली साडेपाच वर्षं) एच-४ व्हीजावर मीही अमेरिकेत आहे. लेखात लिहिलेल्या अडचणी (फारच कमी प्रमाणात) माझ्यासमोरही होत्या. नोकरी कशासाठी करायची, आपल्या जगण्याचा अर्थ काय अशा छापाचे बरेच प्रश्न मला पडायचे, अजूनही पडतात. ह्या परिस्थितीमुळे 'हिला के रख दूंगी' भावना डोक्यातून साफ गेली आहे; आणि त्याचा मला फारच फायदा होतो, हे सुद्धा अलीकडे लक्षात आलं आहे.
बेरोजगार असावं तर अमेरिकेसारख्या देशात आणि ऑस्टीनसारख्या मोठ्या शहरात, जिथे सार्वजनिक ग्रंथालयं अतिशय श्रीमंत आहेत.
मला बेरोजगार असायला खूप आवडायला लागलं आहे.
खोटी समजूत आणि इतर
परस्थितीबद्दल काही करू शकत नसलो तर ती निदान एन्जॉय तरी करता आली पाहिजे.
हे उगाच स्वतःची समजूत काढणं आहे, असं माझं मत आहे. परिस्थिती काही वाईट वगैरे नव्हती आणि नाही. करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात; आपण तसे निर्णय घेतो का घेत नाही, हे आपल्यावर असतं. त्या लेखातलं शेवटचं वाक्यही तसंच आहे. भारतात राहायचं आणि नोकरी शोधून करायची का अमेरिकेत येऊन बेरोजगार राहायचं हा निर्णय आपापला असतो. मी जाणतेपणी बेरोजगारीचा निर्णय घेतला होता, त्याचा 'दोष' परिस्थितीवर कशाला ढकलायचा.
एच-४ विसा
हा विसा असणार्यांना भारतातलं काम करता येतं का?
उदा. एक सॉफ्टवेअर जोडपं अमेरिकेत आहे. त्यापैकी एकाला एच-वन-बी आणि एकाला एच-४ आहे. एच्वन्बी तिथल्या पगारावर काम करतो/करते. पण एच -४ फ्री-लान्स मोडवर भारतातली कामं घेऊ शकतो/शकते का? भारताल्या बँकेत एच-४ला सहज पैसे साठवता येतील का? मला वाटतं बरीच व्हाईट कॉलर कामं ऑनलाईन मोडवर होऊ शकतात.
व्हिसाचे कायदेच फक्त नाहीत तर
व्हिसाचे कायदेच फक्त नाहीत तर आयकराचा फटका मोठा असतो.
हे फक्त कायदे पाळायचे असतील तर लागू आहे. कराचे नेमके आकडे तपासून सांगायला लागतील.
एचफोरने अमेरिकेत बसून भारतीय कंपनीसाठी काम केल्यास ते उत्पन्न अमेरिकेत करपात्र ठरेल. (भारत - अमेरिका आयकर करार, आर्टिकल ५.१). कायद्याच्या भाषेत ती पर्मनंट एस्टॅब्लिशमेंट ठरेल. (the term “permanent establishment” means a fixed place of business through which the business of an enterprise is wholly or partly carried on). अमेरिकेतला आयकराचा दर ४०% आहे असं समजू.
दुसर्या बाजूला भारतीय कंपनी साडेपंधरा टक्के सर्व्हिस टॅक्स कापेल (रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम), आणि टीडीएसही कापेल**. (२०% धरू, नेमका आकडा ट्रीटीत बघून सांगता येईल.)
म्हणजे, रु. १००च्या उत्पन्नावर
भारतात: प्रत्यक्ष कर / टीडीएस रु. २० + अप्रत्यक्ष कर / सर्व्हिस टॅक्स रु. १५.५ = रु. ३५.५
अमेरिकेतः प्रत्यक्ष कर रु. ४०
एकूण करभार = रु. ७५.५
**भारताला टीडीएस कापू नका अशी विनंती आयकर खात्याला करू शकतो. पण असल्या गोष्टी बर्याचदा ट्रायब्युनलपर्यंत (खालून तिसरी अॅर्थॉरिटी) गाजवल्या जातात.
म्हणजे, या रु. ७५.५ मध्ये ट्रायब्युनलपर्यंत लढायची कॉस्टही घ्यावी लागेल. ती अंदाजे ४.५० धरू. (यशस्वी व्हायची खात्री नाही.)
म्हणजे, रु. १०० मिळवण्यासाठी रु. ४४.५ ते रु. ८० खर्च येईल. अधिक वेळ, मनस्ताप, एक्स्चेंज फ्लक्चुएशन्स इ.
>>भारताला टीडीएस कापू नका अशी
>>भारताला टीडीएस कापू नका अशी विनंती आयकर खात्याला करू शकतो.
अशी विनंती काय म्हणून करता येईल? कारण हे Income earned in India by Indian citizen असेल. एकूण उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या खाली आहे म्हणून कदाचित करता येईल. पण इतके कमी उत्पन्न मिळणार असेल तर इट मे नॉट बी वर्थ इट.
इंडीयन सिटिझन आयकर
इंडीयन सिटिझन आयकर कायद्याच्या खाली नॉन रेसिडंट असेल. भारत नागरिकत्त्वावर आधारित आयकर आकारणी करत नाही. (अमेरिका करते.)
तसंच, "सर्व्हिस रेंडर्ड आऊटसाईड इंडिया" असंही आर्ग्युमेंट करता येईल. पण वर लिहिल्याप्रमाणे हे यशस्वी होईल की नाही हे सांगता येत नाही.
CPI(M) leader M Y Tarigami
CPI(M) leader M Y Tarigami urges India, Pakistan to resolve issues through dialogue
He said it was "unfortunate" that the two countries which have a number of challenges in common are seen "indulging in accusations and counter accusations" against each other.
He appealed to “democratic forces” in both the countries to raise their voice and force their respective leadership to put an end to this “jingoistic hysteria”.
मज्जाच मज्जा.
स्वसंरक्षण ते राष्ट्रीय सुरक्षा ते राष्ट्रवाद ते जिंगोइझम ही उडी डावे फार सहज मारतात.
-----
गर्भनिरोधक गोळीचे दुष्परिणाम
स्त्रियांसाठी असलेल्या गर्भनिरोधक गोळीचे दुष्परिणाम आणि स्त्रियांच्या आरोग्याबद्दल असलेल्या उदासीनतेसंदर्भात लेख.
The pill is linked to depression – and doctors can no longer ignore it
(इमोसनल अत्याचार मोड ऑन) हे काय! एवढी महत्त्वाची बातमी आणि ऐसीवर इतर कोणालाही ती शेअर करावीशी वाटली नाही. मी सोडून बाकी सगळे स्त्रीद्वेष्टे असणार हे नक्की. (इमोसनल अत्याचार मोड ऑफ) ह्या मोडाचा आणि माझ्या हॉर्मोन्सचा काहीही संबंध नाही. ऐसीवरच्या काही पुरुष आणि काही स्त्रीसदस्यांकडून हा मोड तेवढ्यापुरता उचलला आहे.
एक आनंद देणारी बातमी. Justice
एक आनंद देणारी बातमी.
Justice Lodha panel directs banks to freeze accounts of the BCCI
http://www.loksatta.com/krida-news/miffed-bcci-to-cancel-ongoing-india-…
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-news-india/karnataka-relea…
बातमी रोचक नसून एक वाक्य रोचक आहे.
The Supreme Court on Tuesday put on hold the setting up of Cauvery Water Management Board (CWMB) but directed the Karnataka government to release 2000 cusecs water per day to Tamil Nadu between October 7-18.
क्युसेक पर डे हे काय युनिट आहे नक्की?
क्यूसेक
क्यूसेक पर डे असं यूनिट होऊ शकत नाही. एकंदर आकारमान होऊ शकतं. हे मला वाटतं २००० क्यूबिक फीट पर सेकंड या वेगाने धरणातून दिवसभर पाणी सोडत राहाणे असावे. म्हणजे २००० गुणिले ६० गुणिले ६० गुणिले २४ इतके क्यूबिक फीट पाणी ७-१८ ऑक्टोबर दरम्यान दर दिवशी तमिळ्नाडुला दिले गेले पाहिजे.
बरोबर.पण आत्ताच गूगल केलं
बरोबर.
पण आत्ताच गूगल केलं ३००० क्युसेक पर डे. प्रत्येक पेपरने अशीच बातमी दिली आहे. "अमुक अमुक क्युसेक पर डे पाणी सोडा असा आदेश. "
==
अपडेट; हा लेख सापडला.
http://www.livemint.com/Opinion/21HYZtZ7s8CQZKJk0ac2vK/Cauvery-dispute-…
The Hindu reported D.G. Parameshwara, home minister of Karnataka, as saying, “Karnataka had complied with the earlier order and released 1.68 lakh cusecs until today.” Do these numbers make any sense?
हे बरोबर आहेच. पण
हे बरोबर आहेच. पण पेपरवाल्यांचा (आणि बहुधा सुप्रीम कोडताचा पण) रेटची युनिट आणि वॉल्युमची युनिट यात घोळ झालेला आहे. किती पाणी सोडा ( बोले तो किती टीएम्सी) हे न सांगता काय रेटने किती दिवस सोडायचं हे सांगितलं आहे. असा द्राविडी प्राणायम कशाला? (लोकांनी वेगवेगळ्या रेटची बेरीज करून इतकं इतकं पाणी सोडलं असं म्हणणं सुरू केलय असं दिसलं वर. )
:-)
ही एककं माझ्या लक्षात राहत नाहीत. लक्षात ठेवली तर कदाचित समजायला, नक्की किती पाणी ह्याचा अंदाज येणं सोपं होईल. १ क्यूसेक हे एकक दररोज वापरतो का आपण! "आज एक लिटर दूध द्या" किंवा "आज दोन पेग व्हिस्की प्यायली" सारखं "दोन क्यूसेक पाण्याची आंघोळ झाली" असं बोललं जात नाही.
धरणांबद्दल मी जे काही वाचलंय ते सगळं पेपरांमध्येच. हे लोक कधीही ही एककं म्हणजे नक्की किती, हे लिहीत नाहीत. त्या प्रकाराचा राग म्हणून लगेच संदर्भासाठी ही माहिती डकवून ठेवली. बातमीबद्दल जरा विचार करायचा असेल तर इतरांचा गूगलायचा त्रास कमी होईल.
किती पाणी सोडा ( बोले तो किती
किती पाणी सोडा ( बोले तो किती टीएम्सी) हे न सांगता काय रेटने किती दिवस सोडायचं हे सांगितलं आहे
हे यासाठी असावं की पाणी किती सोडायचं यासोबतच कसं सोडायचं यालाही महत्व आहे.उदा.समजा कोयना धरणाची उपयोगी क्षमता १००टीएम्सी आहे. आता कराडला १० टीएमसी पाणी द्यायचं असं ठरलं तर त्याचं नक्की डिस्ट्र्रिब्युशन कसं करणार हा प्रश्न येतो याला? किती क्युसेक किती दिवस, किती दिवसांच्या किती 'रोट्यां'मध्ये असं उत्तर द्यावं लागतं. धरणांची पाणी सोडायची,धरणाच्या दरवाजांची उघडण्याची, नद्या/कालव्यांची पाणी वाहून न्यायची आणि लाभार्थ्यांची पाणी उचलण्याची मर्यादा असे अनेक फॅक्टर यात येतात.
(धरणावर काम केलेला)एएवा
बालाजी तांबेंविरुद्ध सरकार
बालाजी तांबेंविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
आयुर्वेदीय गंर्भसंस्कार या पुस्तकातून पुत्रप्राप्तीबद्दल उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याचा बालाजी तांबे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पर्यवेक्षीय मंडळानेही हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
माझ्या मुलाने पोटात असताना
माझ्या मुलाने पोटात असताना लिहिलेलं -
(केवळ करमणूक म्हणून वाचावे. कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देश्य नाही, तसे घडल्यास क्षमस्व)
...
...
आता डोळा लागलाच होता तोच एक भयानक असं रडणं कानावर पडलं. सुरवातीला काय चाललंय काय कळेनाच. कोणीतरी बुवा मोठमोठ्याने किंकाळत होता. बाबा जोरजोरात हसत होते. आई म्हणाली तेव्हा कळलं कि तो बुवा माझ्यावर संस्कार व्हावेत म्हणून काहीतरी मंत्र म्हणत होता (त्याला किंकाळणं म्हनावं कि मंत्र ह्या संभ्रमात) आणि बाबा त्याची मस्करी करत होते. बघू काय घडतात बालाजीचे ह्या बाळाजीवर संस्कार. त्यांचे ते मंत्र संपताच सुदेश भोसले ह्यांचे प्रवचन सुरु झाले. हे कळेल असे इंग्रजीत होते. नंतर समजले कि तो आवाज सुदेश भोसलेचा नसून अमिताभ नावाच्या टोनग्याने त्याची नक्कल केली होती म्हणे. बरी केली होती!
बरं आता आईची झोपायची वेळ झालीय. मीसुद्धा एखादी डुलकी काढतो. सकाळ पासून एवढं सगळं ऐकून कानाचे भजं झालंय त्याला जरा आराम मिळू दे...
...
...
हा हा हा. याच्यावरती एक मस्त
हा हा हा. याच्यावरती एक मस्त स्टॅंडअप कॉमेडीचा भाग होऊ शकेल. मी लहान होतो तेव्हा 'अंतरीच्या नाना कळा' नावाचा एक स्टॅंडअप शो - एकपात्री कार्यक्रम असायचा. त्यातला एक भाग अजून आठवतो आहे. बायको नुकतीच गर्भवती झालेली आहे, आणि ती वेगवेगळ्या प्रकारे नवऱ्याला 'न्यूज' देण्याचा प्रयत्न करते आणि त्या मठ्ठ नवऱ्याला काही कळत नाही. उदाहरणार्थ 'अहो, मला आजकाल आंघोळीला उभी राहिले की माझे पाय दिसत नाहीत' वगैरे वगैरे. मी इतका लहान होतो तरीही हा नवरा किती यडपट, आणि त्याला असं कूटपद्धतीने सांगणारी बायकोही त्याच्या दीडपट यडपट असं वाटत होतं. आताच्या काळात बहुतेक नवऱ्यांना पाळी थांबणं वगैरे गोष्टी माहीत असतात, जे मला त्या वयात माहिती नव्हतं. मला म्हणायचं असं आहे की आजच्या काळात जे गर्भसंस्कार नावाचे प्रकार होतात त्याबद्दल जर त्या अर्भकाच्या तोंडून काही म्हणता आलं तर ते फार विनोदी होऊ शकेल. बघा प्रयत्न करून.
संत सज्जन आलोकनाथांच्या
संत सज्जन आलोकनाथांच्या मुलावर दारु पिऊन कार चालवली आणि पोलिसांशी वाद घातला म्हणुन कारवाई.
"स्विस घड्याळे चालतात तर पाकीस्तानी कलाकार भारतात का चालू नयेत" इति राधिकातै आपटे. तोंड उघडायच्या आधी आपला बाप अतिशय नामवंत न्युरोसर्जन आहे, लोक त्याला हसतील इतका तरी विचार करायचा. माझ्या काही मित्रांना राधिकातैंना नावे ठेवल्यामुळे राग येइल, पण एक लक्षात घ्या मी डोक्याच्या आतल्या अवयवाविषयी कॉमेट केली आहे, तुम्हाला आवडणार्या गोष्टींबद्दल नाही. त्यामुळे काही तक्रार असु नये.
ओम पुरी साहेबांच्या मते "सैनिकांना सैन्यात जायला कोणी बळजबरी केली नाही"
--------
अश्या बातम्या टाकायचे इंस्पिरेशन कोणाकडुन घेतले असेल हे सांगायची गरज नाही. पण त्यांच्या नखाचीही सर मला नाही. ज्या संपादकांनी त्यांना पहिल्यांदा ऐसीवर आणले होते त्यांनीच पुढाकार घेउन पुन्हा आणावे.
many indicators of market
many indicators of market concentration are up
Recent indicators suggest that many industries may be becoming more concentrated, that new firm entry is declining, and that some firms are generating returns that are greatly in excess of historical standards. In addition, the dollar volume of merger and acquisition activity is at record levels. There are also numerous barriers to entry at the State and local levels in the form of occupational licensing and other restrictions that can effect workers as well as entry by small businesses and entrepreneurs.
थोडक्यात : कॅपिटलिस्टांची ताकद, त्यांच्या दंडुक्याची शक्ती वाढते आहे. मस्त गोष्ट आहे.
Muslims sometimes feel like
Muslims sometimes feel like second-class citizens: Mukhtar Abbas Naqvi
पाळण्यात घालून झुलवायचंच बाकी आहे आता.
मायनॉरिटी अफेअर मंत्री
आय वंडर "मायनॉरिटी अफेअर मंत्रांना" काय पॉवर असते? त्यांना मायनॉरिटी गटाकरता काही करता येते तरी का? की आपलं त्या गटाच्या काळजी/चिंता सरकारपर्यंत पोचवायच्या आणि फक्त कंठशोष करायचा? आय मीन जबाबदारीबरोबर काही अधिकारही हवेतच की अन्यथा जबाबदारी इफेक्टिव्हली पार कशी पाडता येणार.
मोदींच्या डिप्लोमसीचा खूप
मोदींच्या डिप्लोमसीचा खूप मोठा विजय. भारत सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!
http://www.dawn.com/news/1288350/exclusive-act-against-militants-or-fac…
खूपच छान बातमी
बातमी छानच आहे.
.
फक्त आत्ताचा सर्जिकल अॅटॅक या सकारात्मक डेव्हलपमेन्ट करता पुरेसा नसून, मोदींनी इफेक्टिव्हली केलेल्या आंतरराष्ट्रीय विझिटस देखील महत्त्वाच्या असणार. Today's positive development must be culmination of many such seemingly lavish & unnecessary acts. तेव्हा जरी विरोधी पक्षाने परदेशी दौर्यांबद्दल, विशेषतः खर्चाबद्दल कांकूं केलेली असली तरी त्याचा परतावा किती अमूल्य होता ते आता दिसतयच की.
याचा अर्थ यापूर्वी चे पक्ष असे परदेशी दौरे करत नसावेत जे की Penney wise pound foolish होते असे ढळढळीत दिसते आहे.
_____-
Second, Prime Minister Nawaz Sharif has directed that fresh attempts be made to conclude the Pathankot investigation and restart the stalled Mumbai attacks-related trials in a Rawalpindi antiterrorism court.
थेरड्या दाऊदला आता इतक्या उशीरा पाठवलं तरी हरकत नाही. बेटर लेट दॅन नेव्हर.
नक्की कोणी काय केलं हे बाहेर
नक्की कोणी काय केलं हे बाहेर येणार नाही.. येऊही नये.
पण जे काही आहे ते काम करतंय इतकं नक्की. जर एखाद्या रणनितीची परिणीती युद्धा ऐवजी पाकिस्तानला आत्मचिंतनाला प्रवृत्त करत असेल तर ती नक्कीच काम करतेय
याच सोबत शरीफ यांचेही कौतुक वाटले. जर हाच ताठ कणा ते त्यांच्या मिलिट्रीच्यासमोर टिकवू शकले तर दक्षिण आशियासाठी एह मोठा सकारात्मक बदल असेल.!
शरीफ यांचे दिवस भरलेत असे
शरीफ यांचे दिवस भरलेत असे वाटले. कौतुक तर आहेच.
____
Then, to a hushed but surprised room, Mr Chaudhry suggested that while China has reiterated its support for Pakistan, it too has indicated a preference for a change in course by Pakistan.
पाकीस्तान चायनाच्या हातचं खेळणं आहे हे परत अधोरेखित होतय.
रोहित वेमुला दलित नव्हताच
रोहित वेमुला दलित नव्हताच म्हणे- चौकशी आयोगाचा निष्कर्ष
'दे हॅन्ग्ड याकुब'पासून मी एक्स्प्रेस वाचणं सोडून दिलंय, तरी द क्विण्ट.कॉम वरुन ही लिंक मिळाली.
बातमीच्या मजकूरावर मी कमेंट करत नाहीये पण ऑगस्टमध्ये सादर झालेला रिपोर्ट नेमकं आता उघडकीस आणून काय टायमिंग साधलं आहे एक्स्प्रेसने, मानावं लागेल!
जातिवंत माजोरडेपणा!
Pakistan would move towards China, Russia as US is declining power
आणि हे तर हाईट आहे-
"We feel that the way forward is that the region calls for statesmanship and what I call a Nixonian transformation of Mr (Prime Minister Narendra) Modi. If he can have that outreach and develop that statesmanship which Richard Nixon demonstrated in 1971 courtesy Pakistan. I think, the options are there, opportunities are there. The ball is in Modi's court, can he rise to the occasion as a leader of 1.2 billion people to build a better and peaceful tomorrow," Syed said.
मोदी आणि स्टेट्समन,काहीही काय?
आता पाकने अमेरिकेला फक्त अणुबॉम्बची भीती दाखवायची राहिली आहे. अमेरिकेने पोसलेला अजून एक गुंड त्यांच्यावर उलटणार वाटतं.
मोदी आणि स्टेट्समन,काहीही काय?
असे नाही . राजकारणी जितका राईट विंग तितका तो सामोपचाराचे निर्णय अधिक सहज घेऊ शकतो . सर्व पूर्वीप्रमाणेच चालले असले तरी भाजपवर काँग्रेस सारखे मुस्लिम-लांगूलचालनाचे (खोटे) आरोप होत नाहीत . मोदींना संधी आहे नक्की, आणि अचानक पाकला भेटी वगैरे देऊन त्यांनी ते करण्याची तयारीही दाखविली आहे . पण पाकिस्तानला लष्कर आणि मुल्ला-मौलवींनी वेठीस धरले आहे ही मोठी अडचण आहे .
हालोवीन कॉश्च्युम
हालोवीन जवळ येते तसे विनोदी, आकर्षक, अद्भुत, भीतीदायक सर्व प्रकारचे वेश (कॉश्च्युम्स) बाजारत येत असतात. खरं तर हालोवीन हा गंमतीचा, मनोरंजनाचा दिवस असतो. पण काही विक्रेते इतक्या विचित्र किंवा विकृत वेशभूषा ठेवतात. पैकी २ अशाच वेशभूषा बाजारात विकावयास आलेल्या होत्या ज्यांवर आक्षेप घेतल्याने त्यांच्यावर बंदी आली.
(१) वॉलमार्ट्/अॅमेझॉन यांचा ट्रॅनी ग्रॅनी कॉश्च्युम
अशा अतिशय भडक मेक अप केलेल्या वृद्ध स्त्रिया ज्यांचे एकेकाळचे वैभव आता फक्त भग्नावशेष म्हणुन राहीले आहे अशा पाहील्या आहेत.पण म्हणुन कॉश्चुम काढायचा?
.
____
दुसरा एक आहे होमे डेपो चा कोणाच्या तरी घरात चोरुन पहाणारा मास्क - "क्रीपर पीपर"
.
.
ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया -
Hunt-Wells, who is a mother of two, told CBC that she feels the decoration downplays the severity of voyeurism, which can often lead to sexual assault or rape. She also said that she “failed to see the humor” in the decoration.
.
The decoration, according to Toronto local and Scary Peeper Creeper victim Breanne Hunt Wells, makes a joke of voyeurism, which is illegal in Canada and, according to Canadian authorities, closely linked to other sex crimes, including rape and sexual assault.
भारत पाकिस्तानच्या संबंधांचं
भारत पाकिस्तानच्या संबंधांचं ओझं बॉलीवूडने वाहावे अशी एक बालिश अपेक्षा असते . पाकिस्तानने काही कुरापत केली की पहिले लोक बॉलिवूडकडे बोट दाखवतात . अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा लेख http://www.firstpost.com/bollywood/surgical-strikes-done-lets-ban-bollyw...
लिंक काम करत नाहीय. पण मी लेख
लिंक काम करत नाहीय. पण मी लेख वाचला.
जे समोर दिसतं त्याला विरोध करायचा - क्रिकेट आणि बॉलीवूड. बाकी बसून विचार करायला आजच्या सोशल मिडीयाच्या काळात वेळ कुणाकडे आहे. आणि आजच्या तरुणाईचं attention span तर लहान बाळापेक्षा कमी आहे.
काल-परवा फेसबुक वर चायनीज प्रोडक्ट घेऊ नका असे पोस्ट होते. मला हसू आलं. म्हटलं अरे लेको, सरकारने त्यांना परवानगी दिलीय म्हणून ते विकतायत. ही गोष्ट दुर्लक्ष कशी करता? जर अगदी नकोच असतील तर सरकारने आयात बंद करावी, लोकांना सांगून काय होणारे.
महेश नायर यांचा लेख वाचला.
महेश नायर यांचा लेख वाचला.
वर्केबल लिंक इथे आहे - Surgical strikes done? Let’s ban Bollywood but continue our business with Pakistan
त्यातली बहुतेक आर्ग्युमेंट्स पटणेबल आहेत.
--
खालील आर्ग्युमेंट (रंगीत भाग) टेक्निकली चूक आहे.
Whilst we are seated inside the cinema hall and watching this Bollywood-under- attack dramedy, let us take a commercial break:India’s exports to Pakistan in 2015-16 was $2.17 billion. India’s imports were less than $500 million during the same period. Simply put, India makes more from Pakistan than Pakistan from India.
--
लेखकाने कलाकारांकडे कॉटन, शुगर, सिमेंट, टेक्सटाईल याप्रमाणे एक marketable good म्हणून पाहिलेले आहे. आणि एनिवे लेखकाने फ्री-ट्रेड च्या बाजूचे आर्ग्युमेंट केलेले आहे. तेव्हा माझे अनुमोदन.
free trade is the one thing that can save both !
लेखकाने कलाकारांकडे कॉटन, शुगर, सिमेंट, टेक्सटाईल याप्रमाणे एक marketable good म्हणून पाहिलेले आहे. : No, no, कॉटन, शुगर, सिमेंट, टेक्सटाईल are useful goods.
फ्री-ट्रेड च्या बाजूचे आर्ग्युमेंट:
Yes, free trade is the one thing that can save both from a catastrophe! There is vast potential! But the Pakis are scared of India swamping their markets with Indian goods! (Chinese goods are OK, for some reason!)
हिंसेला सर्वमान्यता?
Utterly butterly reprehensible: When violence is as normal as butter
लेखातलं एक वाक्य -
(T)he poet Agyeya expressed surprise at the nature of a snake: You never learnt to be civilised, he asks the reptile, so how did you gather so much poison?
Reasonable is defined as "in
Reasonable is defined as "in accordance with reason".
उदाहरण बघा -
जर तुम्ही तुमचे वागणे बदलले नाहीत तर आम्ही तुम्हाला कारागृहात पाठवू असं सरकारचा कायदा सांगतो. कारागृहात पाठवण्यासाठी तुम्हाला अटक करावी लागेल. व ही बलप्रयोगाची धमकी आहे. बलपूर्वक अटक करायला आलेल्या पोलिसांवर तुम्ही हल्ला केलात तर पोलिस तुम्हाला शस्त्रबल वापरून अटक करू शकतात. म्हंजे हिंसात्मक मार्ग पोलिस आचरतात - हे Reasonable च आहे. कारण त्यात If then else आहे.
पोलिसांवर तुम्ही हल्ला केलात
पोलिसांवर तुम्ही हल्ला केलात तर
सेल्फ डिफेन्स हा हिंसेत मोडत नाही. अॅग्रेशन हिंसेत मोडते. हिंसा वेगळी, बल वेगळे. पोलिसांना तुम्ही निवडुन दिलेले आहे, इन्डायरेक्टली. गब्बर यांच्या भाषेत - तुमचा इनडायरेक्ट करार आहे पोलिसांबरोबर. त्यामुळे पोलिसांनी उचित मर्यादेत वापरलेले बल हिंसा कसे होइल? हा अधोरेखीत शब्द ही धूसर सीमारेषा आहे.
डॉमेस्टिक व्हायलन्स ही हिंसा असते (शाब्दिक स्त्रियांकडुन आणि शारीरीक पुरुषांकडुन ज्यादहतर).
- इन्डायरेक्ट करार ऐसी कोई चीज होती है क्या? हा मात्र तुम्हालाच प्रश्न आहे.
तुमचा इनडायरेक्ट करार आहे
तुमचा इनडायरेक्ट करार आहे पोलिसांबरोबर. त्यामुळे पोलिसांनी उचित मर्यादेत वापरलेले बल हिंसा कसे होइल? हा अधोरेखीत शब्द ही धूसर सीमारेषा आहे.
तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच दिलेत.
निळा भाग पहा. निळा भाग बरोबर आहे. आणि हा करार इनडायरेक्ट आहे पण in accordance with reason आहेच.
-
हिंसा वेगळी, बल वेगळे.
तुम्हाला पकडायला आलेले पोलिस (प्रसंगी) तुमच्या विरुद्ध बंदुकीचा वापर करू शकतात की नाही ? ती गोळी तुम्हाला लागते की नाही ? त्यात तुमची प्राणहानी होण्याची शक्यता असते की नसते ?
हिंसेला मान्यता सार्वभौमत्वात अनुस्यूत आहे!
सार्वभौमत्व = हिंसा . आपल्या अंमलाखालील कोणालाही कधीही ठार मारण्याचा परवाना म्हणजे सार्वभौमत्व . हिंसेला मान्यता सार्वभौमत्वात अनुस्यूत आहे. त्यामुळेच "सार्वभौम" कायद्याखाली निर्माण केलेले 'मानव -अधिकार आयोग", कायदे वगैरे पुष्कळदा निरर्थक, नपुसंक ठरतात. अगदी अम्नेस्टी वगैरेंचा सुद्धा आग्रह स्थानिक सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या उल्लंघनावर कृती करावी असा असतो, जे हास्यास्पद ठरते.
"Of course the people don't
"Of course the people don't want war. But after all, it's the leaders of the country who determine the policy, and it's always a simple matter to drag the people along whether it's a democracy, a fascist dictatorship, or a parliament, or a communist dictatorship. Voice or no voice, the people can always be brought to the bidding of the leaders. That is easy. All you have to do is tell them they are being attacked, and denounce the pacifists for lack of patriotism, and exposing the country to greater danger."
-- Herman Goering at the Nuremberg trials
Of course the people don't want war.
लोकांना सैन्यात नोकर्या हव्या असतात, पेन्शनी हव्या असतात, माजी सैनिकांना सुद्धा मेडिकल इन्श्युरन्स हवा असतो , गॅलंटरी अवॉर्ड्स हवी असतात, Duty, Honor, Country चे उच्च मानसिक/सामाजिक स्थान हवं असतं, सैन्यदलांमधे स्त्रियांना प्रवेश द्यावा व प्रोत्साहन द्यावे असं वाटत असतं, शस्त्रं बनवणार्या कारखान्यांत नोकर्या हव्या असतात, थलसेना, नौसेना, वायूसेना, तटरक्षक दलं हवी असतात, ती अत्याधुनिक शस्त्रसिद्ध असावी असं पण मागणं असतं, ती शस्त्रं हुशार असावीत (म्हंजे वापरणार्यावर उलटू नयेत) असं पण म्हणणं असतं, युद्धात विजय झाला की साजरा करावासा वाटत असतो. पराभूत राष्ट्राकडून शस्त्रसमर्पण अपेक्षित असतं.
पण काय करणार ! लोकांना युद्ध तेवढं नको असतं. आणि मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स तर त्याहून नको असतो.
लोकांना सैनिकांनी , जवानांनी
लोकांना सैन्यात नोकर्या हव्या असतात, पेन्शनी हव्या असतात, माजी सैनिकांना सुद्धा मेडिकल इन्श्यु........ युद्ध तेवढं नको असतं. आणि मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स तर त्याहून नको असतो.
लोकांना सैनिकांनी , जवानांनी युद्धात प्राण गमावलेले हवे असतात, सैनिकांकडुन संरक्षण हवे असते, जवानांच्या, सैनिकांच्या जीवाच्या जोरावर कारखानेही चालवायचे असतात , उद्योगधंदे करुन entrepreneur (उद्योगपती) हे बिरुद मिरवायचे असते. फक्त सैनिकांना (फडतूस) दिलेल्या कर सवलती सबसिडीज नको असतात.
लोकांना शेतकर्यांचा मालही हवा असतो, शेतकर्यांनी पिकवलेल्या मालावरती आपली पोळी भाजायची असते. फक्त शेतकर्यांना दिले जाणारी कर्जमाफी नको असते.
____
लोकांना सैन्यात नोकर्या हव्या असतात, पेन्शनी हव्या असतात, माजी सैनिकांना सुद्धा मेडिकल इन्श्युरन्स हवा असतो , गॅलंटरी अवॉर्ड्स हवी असतात, Duty, Honor, Country चे उच्च मानसिक/सामाजिक स्थान हवं असतं, सैन्यदलांमधे स्त्रियांना प्रवेश द्यावा व प्रोत्साहन द्यावे असं वाटत असतं, शस्त्रं बनवणार्या कारखान्यांत नोकर्या हव्या असतात, थलसेना, नौसेना, वायूसेना, तटरक्षक दलं हवी असतात, ती अत्याधुनिक शस्त्रसिद्ध असावी असं पण मागणं असतं, ती शस्त्रं हुशार असावीत (म्हंजे वापरणार्यावर उलटू नयेत) असं पण म्हणणं असतं, युद्धात विजय झाला की साजरा करावासा वाटत असतो. पराभूत राष्ट्राकडून शस्त्रसमर्पण अपेक्षित असतं.
पण काय करणार ! लोकांना युद्ध तेवढं नको असतं.
Speak softly and carry a big stick ही म्हण माहीत आहे का. यात काठी बाळगायची असते इज नॉट इक्विव्हॅक्लन्ट टू काठीचा लगेच उपयोगही करावा. इन फॅक्ट काठी (= सैन्य, शस्त्रस्त्रे) हवीत का तर जगात युद्धे कमी व्हावीत, आपला बडगा समोरच्याला वाटावा.
Speak softly and carry a big
Speak softly and carry a big stick ही म्हण माहीत आहे का. यात काठी बाळगायची असते इज नॉट इक्विव्हॅक्लन्ट टू काठीचा लगेच उपयोगही करावा. इन फॅक्ट काठी (= सैन्य, शस्त्रस्त्रे) हवीत का तर जगात युद्धे कमी व्हावीत, आपला बडगा समोरच्याला वाटावा.
तांबडा भाग excessively basic आहे तेव्हा सहमती व्यक्त करून सोडून देतो.
निळा भाग एक स्टेप पुढे नेला की थॉमस शिलिंग्/रॉबर्ट ऑमन च्या आर्म्स रेस थियरी पर्यंत जाऊन पोहोचतो.
दोन स्टेप पुढे नेला की मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स च्या समर्थनासाठी आवश्यक मालमसाला मिळतो.
का युद्धखोर, विषारी खोपडीच्या सत्ताधाऱ्यांच्या मागेच जायचे ?
या सर्वात मानव हा एक कळप करून राहणारा, हिंस्त्र प्राणी आहे , आणि मानवी इतिहास यापुढेही सध्याच्याच पद्धतीने चालू राहील हे गृहीतक आहे. "प्रॅक्टिकल" विचाराप्रमाणे त्यात तथ्यही आहे. परंतु हे "भानामतीने" घडत नाही, तर करोडो लोक रोज करत असलेल्या निर्णयांवर ते अवलंबून असते . मानवाने थोडे डोके चालविल्यास त्यात सुधारणा होऊ शकते: उदा. आज युरोपियन राष्ट्रे एकमेकांशी युद्धाच्या पवित्र्यात नाहीत - आत्तापर्यंतचा त्यांचा बेकार इतिहास लक्षात घेता हे एक मोठेच आश्चर्य मानावे लागेल . पण असेही घडू शकते . युद्धखोरीचा सत्ता टिकवण्यासाठी मोठा उपयोग असतो , पण तोही करोडो मानवांनी तसा निर्णय केल्यामुळेच असतो . तेंव्हा सध्यापेक्षा वेगळे निर्णय करणे आपल्याला शक्य आहे का , का डोळे झाकून युद्धखोर, विषारी खोपडीच्या सत्ताधाऱ्यांच्या मागेच जायचे याचा विचार सर्व मानवांनी करावा!
Justice must also seen to be
Justice must also seen to be done असं काहीसं वाक्य आहे ते आठवलं.