फीडबॅक

संपादकीय

फीडबॅक

- ऐसीअक्षरे

चला, दिवाळी अंक प्रसिद्ध करून झाला. वाचकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत असं दिसतं आहे.

प्रतिसादांमधून - मिळालेल्या आणि न मिळालेल्या - साधारण कुठचं लिखाण लोकांना भावतं आहे याचा साधारण अंदाज येतो. पण यापेक्षा काहीतरी ठाशीव फीडबॅक हवा आहे. तेव्हा कृपया दोन गोष्टी कराव्यात ही विनंती.

१. या लेखाच्या प्रतिसादात तुम्हाला प्रचंड आवडलेल्या काही लेखांची यादी द्या. तसंच काही नुसत्याच आवडलेल्या लेखांचाही उल्लेख करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तितक्याशा न आवडलेल्या लेखांचाही उल्लेख करा. अंकातलं काय आवडलं हे सांगा आणि जर काही गोष्टी आम्ही संपादक म्हणून पुढच्या वर्षी अधिक चांगल्या करू शकू असं वाटलं, तर त्याही नोंदवा.

२. हे करून झाल्यावर त्या त्या लेखांना तारका द्या. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत असं दिसतं आहे की ज्यांना एखादा लेख प्रचंड आवडला आहे, त्यांनीच चार ते पाच तारका दिलेल्या आहेत. इतर लेखांना तारका मिळालेल्या नाहीत. जर सर्वांनीच आवडलेल्या आणि तितक्याशा न आवडलेल्या लेखांनाही तारका दिल्या तर लेखांची वाचकांच्या दृष्टीने प्रतवारी करायला आम्हाला मदत होईल. तुम्ही प्रतिसादांत जरी उल्लेख नाही केला तरी चालेल, पण तारका जरूर द्या.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आमाला तारका द्यायची पावर नाय म्हणुन तर प्रतिसादात उल्लेख करतोय केव्हाचा.
_____
एवढी मेहनत घेऊन लिहीलेल्या लेखांच्या मेहनतीवर, सजावटीवर, कवितांवर एकदम "नाही आवडला" म्हणुन ताशेरा ओढता येत नाही. माझी मर्यादा.
______
मला जाहीर फीडबॅक देता येणार नाही. "कन्स्ट्रक्टिव्ह" क्रिटीसिझमवर विश्वास नाही.
___
अंक प्रचंड आवडला आहे. मी समृद्ध झाले. एवढेच म्हणू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी श्रेणी आणि तारकांचा क्वचितच वापर केलाय आतापर्यंत. मला संपूर्ण अंक इस्त्रिच्या चित्रासकट आवडला आहे.तुम्हा संपादक मंडळातल्या सर्वांचेच आभार. संगीत,कवितांकडे मी एर्वीही दुर्लक्ष करतो कारण ते समजत नाही.नातीगोती विषयही आवडला.तारका पाचपैकी किती असं धरलं तर साडेतीन,चार,साडेचार यादरम्यान तारका इथेच देत आहे सर्वांना. फक्त एक /दोन देण्याइतकं वाईट नाही.एक जो इथे कर्सर न्या आणि पुढचं वाक्य वाचा हा तंत्रज्ञानाधारित एचटिएमेल प्रयोग मात्र हाताळण्यात मात्र आमच्या मोबाईलच्या रॅमला सुस्ती येऊ लागल्याने अर्धवट सोडला.मी लेख लिहू शकत नाही याचं जरा वैषम्य वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुप यांनी कुठेतरी म्हटल्याप्रमाणे "नव्वदोत्तरी" अंक सोडला तर सगळे अंक "नॉर्मल" आहेत. हा अंक नॉर्मल लोकांना आवडेल असा मलाही वाटला. हे असे विषय घेत जा. अर्थात प्रायोगिक विषयही हवेत पण असे रोजमर्रा के जिंदगीशी निगडीत विषय मस्त वाटतात.
पॉर्न आणि नव्वदोत्तरी हे अ‍ॅबनॉर्मल होते असे नाही पण अगदी "सरासरी" देखील नव्हतेच.
.
यावेळेस वंकू कुमार यांचा लेख (कविता नव्हे ;)) मिस केला. त्यांचा "अपग्रेड प्रेम" (http://aisiakshare.com/node/1364) नामक लेख मेंदूत पॉझिटिव्हली कोरला गेलेला आहे.
सुशेगाद यांचा "एक विचित्र मुलगी" (http://www.aisiakshare.com/node/2549) लेखही असाच आवडलेला होता. त्यांनीही काही लिहावं असे वाटत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन अंक पुर्ण वाचलेला नाही मात्र आतापर्यंत जितक वाचल त्यावरुन
"नातीगोती" ही मध्यवर्ती कल्पना जर होती तर अनेक लेख या मुळ मध्यवर्ती संकल्पनेशी दुरदुरपर्यंत संबंधित नाहीत
असे ठळकपणे जाणवते. अर्थात मध्यवर्ती चा अर्थच त्यात "इतर" ही असणार असा असतोच.
तरी एक मध्यवर्ती संकल्पनेचे भान अनेक लेख निवडतांना दिसले नाही असे प्राथमिक घाईचे मत मांडतो
जे अर्थात चुक असु शकते.
दुसरी गंमतीची बाब म्हणून घ्यावी संबंध जोडायचाच "नातीगोती" या मध्यवर्ती संकल्पनेशी तर अगदी प्रत्येकच लेखाचा
जोडुन दाखवता येइल. उदाहरणार्थ नंदा खरेंचा तो ब्रिज मेंटेनन्स चा लेख हा मुळ "नातीगोती" या संकल्पनेभोवतीच आहे.
उदा. नात्यालाही ब्रिज सारखी मेंटेनन्सची गरज असतेच हे सुचवलेले आहे. शिवाय नाती म्हणजे संवादाचा पुल व्हायला हवीत ब्रिज व्हायला हवीत. जुन्या नात्याकंडे केलेले दुर्लक्ष
म्हणजे मजा आहे. बाकी अजुन एक जचिंचा लेख हा एक स्वतंत्र प्रतिभेच्या गणितज्ञाने स्वतःच दंग होउन खेळलेला कोरडा बौद्धीक खेळ च वाटतो. म्हणजे पुन्हा तोच प्रश्न याचा नातीगोती शी या लेखाच नात काय असाव ?
लास्ट फक्त
एक लय भारी म्हण आहे संभाजी ब्रिगेडची मला प्रचंड आवडते त्यातल यमक
तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ जय शिवराय!
असाच प्रश्न मला अनेक लेखांना विचारावासा वाटतो तुमचं अंकाच्या थीमशी नातं काय ?
बाकी अंकासाठी कठोर परीश्रम घेणार्‍या व आम्हाला बसल्या जागी इतकी मोठी सुंदर मेजवानी देणार्‍या ( शिवाय आमचा खडुस फिडबॅकही मागणार्‍या) सर्व टीमचे
हजार आभार !!!!!
अनेक धन्यवाद !!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळी अंक सर्वांसाठी असावा, प्रत्येकीला त्यात काही-ना-काही वाचण्यासारखं असावं, असा विचार असतो. काहींना कविता आवडतील, काहींना रुक्ष-कोरडी गणितं, काहींना दोन्हींमध्ये रस असेल.

म्हणून दिवाळी अंकासाठी लेखन मागवतानाच हे जाहीर केलं जातं की संकल्पनेसंंबंधित लेखन असावं असा अजिबात आग्रह नाही. दिवाळी अंकात दर्जेदार लेखन असावं, त्याला विषयाचं बंधन नाही. दर्जा म्हणजे काय, याबद्दल मतभेद असणार ही खात्रीसुद्धा आहेच. पण तो विषय निराळा.

शुचि, तुला 'पावर नाय' कारण तुझं सध्या वापरातलं सदस्यनाम कोणतं, ह्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी कोणीही स्वयंसेविका मिळाल्या नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुचि, तुला 'पावर नाय' कारण तुझं सध्या वापरातलं सदस्यनाम कोणतं, ह्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी कोणीही स्वयंसेविका मिळाल्या नाहीत.

पता हए मुझको Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी चूक पदरात घया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हा यमशीपीपणा सगळ्या स्त्रियांनी साडी नेसावी ही अपेक्षा का हो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुक पे चूक हो रही है आता तूमी पण माया पातल करू नका मी थोडा नीट नेटका होउन परत येेतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याएवढा वेळ नाही म्हणून इथे. अंक दर्जेदार आहे, काही लेख मनापासून आवडले नसले तरी बरेच लेख अंतर्मूख करणारे आहेत, स्वतःचं परिक्षण करवणारे आहेत असे वाटले. लेखकांचे आणि सगळ्या चमूचे अभिनंदन आणि आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक