आयुष्यमान वाढविण्याच्या बारा कृती
राजकारण इत्यादी सोडून जरा माझ्या आणि सर्वांच्या इंटरेस्टचा एक विषय मांडतो . खालच्या दुव्यामध्ये "उंदरात यशस्वी झालेल्या" आयुष्यमान वाढविण्याच्या बारा कृती मांडल्या आहेत . आता लगेच 'शेवटी मरणारच ना!" इत्यादी सुरु होईलच. त्याला एक उत्तर असे की साधारणपणे ज्याने आयुष्यमान वाढते त्यानेच आरोग्यपूर्ण आयुष्याचा कालखंडही (healthspan) वाढतो . दुवा अत्यंत टेक्निकल आहे त्याबद्दल क्षमस्व. मराठीत मांडायचा प्रयत्न अजून सोडलेला नाही , पण योग्य वैज्ञानिक परिभाषेच्या अभावामुळे (आणि माझ्या अज्ञानामुळे ) सतत अडखळलायला होत आहे . वेळ लागणार आहे . तसेच २००९ साली मांडलेल्या या यादीचे आजमितीला काय झाले आहे, हेही शोधून काढणार आहे.
https://www.fightaging.org/archives/2009/08/a-list-of-interesting-longe…
निर्व्यंग/निरोगी/स्ववलंबी/डिग्निफाईड
वजन , कोलेस्टेरॉल , ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, पोटाचा घेर यांच्या आरोग्यपूर्ण रेंज मध्ये राहिल्यास बरेच काही साध्य होईलसे दिसते (ज्याबाबत आता भरपूर ज्ञान उपलब्ध आहे, आणि भारतातही उत्तम प्रोफेशनल्स, आणि औषधे , व्यायामशाळा मदतीला आहेत!). आयुष्य-पद्धती काटेकोरपणे पाळल्यास सुमारे ८९ पर्यंत सहज जाता येईलसे दिसते . त्यानंतर मात्र जनुक-वारसा महत्वाचा ठरू लागतो असे दिसते.
याप्रकारचे लेख ,विचार,मतं
याप्रकारचे लेख ,विचार,मतं बरीच वाचली आहेत॥ तीन माझे दृष्टीकोन {एकेक ओळ सोडून देतो.
दीर्घायुष्यासाठी:-
१)आयुर्वेदिक : पचेल तेवढंच खा {थकाल एवढं चाला.}
२ ) मानसिक : जाऊ दे ही वृत्ती असणे.
३ )शारिरीक :लो बिपी ( कमी रक्तदाब )असणे.
४ )ज्योतिष : अष्टमात शनी.
( सर्वांना आयुष्याचा कंटाळा येईपर्यंत दीर्घायुष्य मिळो )
११० वर्षे पार केलेले "सुपर" शतायुषी
"सुपर" शतायुषी:
- जगात २०१५ मध्ये १०० वर्षे पार केलेले ४,५१,००० लोक होते.
- हा आकडा २०५० मध्ये 3,678,000 इतका वाढेल असे भाकीत आहे.
- (सर्व आकडे ताकाओ यांच्या खाली दिलेल्या पेपरातून घेतलेले आहेत. )
- ११० वर्षे पार केलेल्यांना "सुपर" शतायुषी म्हणतात . आजच्या जगात हे अत्यंत तुरळक असून एकूण संख्या ४७ आहे. त्यात ४५ स्त्रिया आहेत.
१११,१११,११४ आणि ११० वर्षे जगलेल्या चार जपानी स्त्रियांचा मरणोत्तर डेटा लेखकांनी मांडला आहे. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वयात चौघींनाही भ्रमिष्टपणा नव्हता, मेंदूची सर्व स्ट्रक्चर्स आणि पेशी जवळजवळ पूर्णपणे शाबूत होत्या, आणि दोघीजणी स्वतःची व्हील चेअर स्वतः हलवू शकत होत्या.
जपानी लोकात एकूणच आयुर्मान जास्ती आहे. पण या स्त्रियांची शारीरिक स्थिती केवळ अद्भुत म्हणावी लागेल . मेंदूतल्या रोहिण्यांमध्ये फारसे कोलेस्टेरॉल साचलेले नसणे हा एक सुपर शतायूषींचा मोठा गुणधर्म मांडला आहे.
Takao et al. Acta Neuropathologica Communications (2016) 4:97
संपूर्ण पेपर मुक्तपणे उपलब्ध आहे .
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5010697/pdf/40478_2016_Art…
जपानच्या ओकिनावा बेटावर प्रचंड प्रमाणात शतायुषी आहेत. हे लोक लहान चणीचे आहेत (BMI 20.4). "ओकिनावा डाएट"ही प्रसिद्ध आहे.(https://en.wikipedia.org/wiki/Okinawa_diet). त्यांच्या आहारात रताळ्याचे प्रमाण अधिक आढळते (एकूण कॅलरीज च्या ६९% रताळी पासून!) हेही आपल्याला माहिती आहे. पुढे काय माहिती येते बघायचे.
खरच जे आयुष्य जाईल ते
खरच जे आयुष्य जाईल ते निर्व्यंग/निरोगी/स्ववलंबी/डिग्निफाईड व इतरांना त्रास न देणारे जावो बाबा :(