Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७६

अजो१२३ Mon, 23/01/2017 - 11:49

२२ जानेवारी---
ऐसीवैशिष्ट्यः
१९९९ : ग्रॅहॅम स्टेन्स हे ऑस्ट्रेलिअन मिशनरी व त्यांच्या दोन मुलांची हिंदुत्ववाद्यांनी जिवंत जाळून हत्या केली.
==========
अजोवैशिष्ट्यः
हिंदू व ख्रिश्चनांच्या दंग्यांत दोन-तीन ख्रिश्चन ठार.
=======
रोचक भाग - विकिपेडियातून (स्टेन्स म्हणजे बहुतेक वाजपेयींचा अखलाक असावा.)

The Court stated "Our concept of secularism is that the State will have no religion. The State shall treat all religions and religious groups equally and with equal respect without in any manner interfering with their individual right of religion, faith and worship." Yet, while condemning (even voluntary) religious conversions, the Court also said "It is undisputed that there is no justification for interfering in someone`s belief by way of `use of force`, provocation, conversion, incitement or upon a flawed premise that one religion is better than the other".[16] Dismissing the Central Bureau of Investigation's plea for death penalty to Singh, a Bench of Mr Justice P Sathasivam and Mr Justice BS Chauhan endorsed the Orissa High Court's finding that his crime did not fall under the rarest of rare category. In its 76-page judgement, the court came out strongly against the practice of conversion.
However, four days later, on 25 January 2011, the Supreme Court of India in a rare move expunged its own comments with regards to conversions from its Verdict.[17] This was perhaps done due to severe criticism from the media.[18][19] Leading editors, media groups and civil society members from across the country signed a statement taking strong exception to the Supreme Court's observation that the killing of Graham Staines and his two minor children was intended to teach the Australian missionary a lesson for preaching and practising conversion.
=========================================================================================================================
१५ नोव्हेंबर ---
१९४९
संभाव्य ऐसीवैशिष्ट्यः महात्मा गांधींच्या माथेफिरू जातीयवादी धर्मांध अतिरेकी मारेकर्‍यास, नथूरामला भारत सरकार कडून फाशी.
अजोवैशिष्ट्य: सेक्यूलर लोकांनी एका हिंदुत्ववाद्यास लटकावून मारले.*

* गोळी घालून मारणे हा अजिबातच रेअर प्रकार नाही, रेअर ऑफ रेरेस्ट तर कोणत्याच प्रकारे नाही. मग या माणसाला थेट फाशीच का झाली?

गब्बर सिंग Mon, 23/01/2017 - 12:00

In reply to by अजो१२३

(१) तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते समजलं नाही.

(२) व्यक्ती अ ने व्यक्ती ब ला कोणत्याही बलप्रयोगाविना, धमकीविना धर्म बदलण्यास राजी केले. व व्यक्ती ब ने धर्म बदलला. यात नेमके कोणाच्या व कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले, अजो ?

अजो१२३ Mon, 23/01/2017 - 13:46

In reply to by गब्बर सिंग

(१) तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते समजलं नाही.
>>>> नथूरामला नक्की कशासाठी शिक्षा झाली? माणूस मारल्यासाठी? १५-०८-१९४७ ते ३०-०१-१९४८ या काळात भारतात एकूण किती मर्डर झाले? मग त्या गुन्हेगारांना फाशी का नाही दिली? गोडसे नि आपटे हेच पहिले का? त्यात न्यायप्रदानाची जी तत्त्वे आहेत ती बाजूला तर सारलेली नसणार.
आता मग त्यांना फक्त मर्डरसाठी शिक्षा नाही झाली आणि अजून काही कारणासाठी झाली तर ते अजून काही कारण कोणते? अर्थातच सेक्यूलर राज्याचा विरोध करून हिंदूत्ववादी राज्य प्रथिपिण्याचा प्रयत्न करणे. पण असे (म्हनजे हिंदू सेक्यूलर इ इ) न काही बोलता सरकारने असे केले तर तो सेक्यूलर लोकांकडून हिंदुत्ववाद्याचा खून आहे.
(२) व्यक्ती अ ने व्यक्ती ब ला कोणत्याही बलप्रयोगाविना, धमकीविना धर्म बदलण्यास राजी केले. व व्यक्ती ब ने धर्म बदलला. यात नेमके कोणाच्या व कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले, अजो ?
समजा मी बिना धमकी आणि बिना बल तुम्हाला तुफान पूर आलेल्या नदीत पोहणे कसे शौर्याचे आहे असे सांगून राजी केले नि तुम्ही झालात नि पुढे तुमचं काई बरंवाईट झालं तर कोणत्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही का?
पुरोगामी लोक जेव्हा ब्राह्मण, प्रतिगामी, धर्मवादी, धार्मिक इ इ लोकांनी सामान्य समाजाचे दोहन केले असे म्हणतात तेव्हा असे म्हणणे खोटेच असते का आणि असे दोहन फक्त बल आणि धमकी या दोनच मार्गांनी केले असे म्हणायचे असते का? म्हणजे या लोकांनी देवदेव सांगून लोकांना मूर्खात काढले आणि त्यांच्यावर अन्याय केला असे म्हणतात त्यात धमकी नि बल याशिवाय अनेक इतर प्रकार असतात. आमच्या उदगीरला त्याला गुलविणे म्हणतात. गोड बोलून नुकसान करणे. नो धमकी नो बल. पण नुकसान ग्यारंटीड.

अनु राव Mon, 23/01/2017 - 13:50

In reply to by अजो१२३

स्वसंरक्षणार्थ एखाद्या गुन्हेगाराला मारले तर शिक्षा पण होत नाही. शत्रु सैनिकाला मारले तर मेडल मिळते.

गब्बर सिंग Mon, 23/01/2017 - 14:05

In reply to by अजो१२३

समजा मी बिना धमकी आणि बिना बल तुम्हाला तुफान पूर आलेल्या नदीत पोहणे कसे शौर्याचे आहे असे सांगून राजी केले नि तुम्ही झालात नि पुढे तुमचं काई बरंवाईट झालं तर कोणत्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही का?

अजिबात नाही.

जर मी मतिमंद वगैरे असेन तर चर्चा होऊ शकते. पण मी नॉर्मल व्यक्ती असेन आणि तुमचे म्हणणे ऐकून पाण्यात उतरलो तर त्यात माझ्या कोणत्याही अधिकाराचे उल्लंघन होत नाही.

----

पुरोगामी लोक जेव्हा ब्राह्मण, प्रतिगामी, धर्मवादी, धार्मिक इ इ लोकांनी सामान्य समाजाचे दोहन केले असे म्हणतात तेव्हा असे म्हणणे खोटेच असते का आणि असे दोहन फक्त बल आणि धमकी या दोनच मार्गांनी केले असे म्हणायचे असते का? म्हणजे या लोकांनी देवदेव सांगून लोकांना मूर्खात काढले आणि त्यांच्यावर अन्याय केला असे म्हणतात त्यात धमकी नि बल याशिवाय अनेक इतर प्रकार असतात. आमच्या उदगीरला त्याला गुलविणे म्हणतात. गोड बोलून नुकसान करणे. नो धमकी नो बल. पण नुकसान ग्यारंटीड.

धर्मांतरा नंतर फसवणूकीची केस करू म्हणावे तर समस्या आहे. वादी व प्रतिवादी कोण ? ज्याची तथाकथित फसवणूक झाली तो वादी ? त्याच्या पहिल्या धर्माचे धर्ममार्तंड्/धर्मपंडित ? की सरकार ?? फसवणूक झाली त्याचे काँट्रॅक्ट कोणते ? What was promised by whom to whom and how was it to be measured and evaluated ?

(आणि हा भाग तुम्हाला अमान्य असेल असा आडाखा आहे) पहिला धर्म जो काही होता त्याने तरी फसवणूक केली किंवा नाही ते पण पहावे लागेल. नैतर निर्वाणा फॉलसी होईल.

अजो१२३ Mon, 23/01/2017 - 15:04

In reply to by गब्बर सिंग

फक्त बल आणि धमकीनेच केलेले नुकसान अयोग्य असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते.
१. तुमच्या मते प्रमोशनचे, इ अमिष दाखवून ऑफिसमधे लैंगिक (गैर)फायदा घेणे या हिशेबाने योग्य असावे.
२. खोटे बोलणे नि वागणे चालत असावे. अंतत्स्थ्य हेतू वेग्ळा, दाखवायचे दात वेगळे. यातनं होणारं नुकसान चालतं वाटतं.
बहुतेक तुमच्या मते जगातले सर्व लोक समान बुद्धीचे असतात, सर्वांना समान महिती असते आणि परिपक्वता असते. अजून चिकार गोष्टी जगातल्या सगळ्या लोकांना समानच असतात. म्हणून कोणी कोणाला फसवू शकत नाही. (बहुतेक तुमच्या मते मानवी इतिहासात देखिल कोनी कोणाला फसवलेले नसावे. सर्वांना समान मार्क पडत असावेत.)
एवढा किचकट पीनल कोड बदलून दोन शब्दी करायला हवा.
=====================

धर्मांतरा नंतर फसवणूकीची केस करू म्हणावे तर समस्या आहे. वादी व प्रतिवादी कोण ? ज्याची तथाकथित फसवणूक झाली तो वादी ? त्याच्या पहिल्या धर्माचे धर्ममार्तंड्/धर्मपंडित ? की सरकार ?? फसवणूक झाली त्याचे काँट्रॅक्ट कोणते ? What was promised by whom to whom and how was it to be measured and evaluated ?

मर्डरनंतर तर माणूसच नसतो. तरी केस चालते. तिथे काय संदर्भ असतात ते पहा ना. धर्मांतरानंतर तर माणूस देखिल असतो.

अनु राव Mon, 23/01/2017 - 16:25

In reply to by अजो१२३

तुमच्या मते प्रमोशनचे, इ अमिष दाखवून ऑफिसमधे लैंगिक (गैर)फायदा घेणे या हिशेबाने योग्य असावे.

येस काहीही गैर नाही ह्याच्यात.

--------
सिव्हीलाइज्ड देशात सुद्धा, पोलिस इंटरोगेशन मधे सुद्धा आरोपीला खोटे सांगुन ( तुझ्या बोटांचे ठसे हत्यारावर मिळाले, तुझ्या सहकार्‍यानी गुन्हा कबुल केलाय ) कन्फेशन मिळवले तर ते न्यायालयात ग्राह्य धरले जाते.

पण बळाचा वापर करुन कन्फेश्न मिळाले तर ते चालत नाही.

अजो१२३ Mon, 23/01/2017 - 17:00

In reply to by अनु राव

येस काहीही गैर नाही ह्याच्यात.
--------
सिव्हीलाइज्ड देशात सुद्धा, पोलिस इंटरोगेशन मधे सुद्धा आरोपीला खोटे सांगुन ( तुझ्या बोटांचे ठसे हत्यारावर मिळाले, तुझ्या सहकार्‍यानी गुन्हा कबुल केलाय ) कन्फेशन मिळवले तर ते न्यायालयात ग्राह्य धरले जाते.

बहुतेक तुमचा पुढचा युक्तिवाद सरकारला लोकांना फाशी द्यायचा अधिकार आहे तेव्हा लोकांनी सरकारी अधिकार्‍यांचे मुडदे पाडण्याचा अधिकार असणे योग्य आहे इ असणार आहे.

गब्बर सिंग Mon, 23/01/2017 - 21:45

In reply to by अजो१२३

मर्डरनंतर तर माणूसच नसतो. तरी केस चालते. तिथे काय संदर्भ असतात ते पहा ना. धर्मांतरानंतर तर माणूस देखिल असतो.

मर्डर नंतर माणूस नसतो हे बरोबर आहे पण त्या केस मधे एकतर मृत व्यक्तीचे नातेवाईक असू शकतात किंवा सरकार वादी असू शकतं. सरकारला तसा अधिकार आहे. व तो अधिकार (आणि जबाबदारी) सरकारला संविधानानुसार आहे.

-

धर्मांतरानंतर सरकार हे वादी का व कसे असू शकेल ? कोणत्या आधारावर ? फसवणूक कोणत्या आधारावर ठरणार ?

-

बहुतेक तुमच्या मते जगातले सर्व लोक समान बुद्धीचे असतात, सर्वांना समान महिती असते आणि परिपक्वता असते. अजून चिकार गोष्टी जगातल्या सगळ्या लोकांना समानच असतात. म्हणून कोणी कोणाला फसवू शकत नाही. (बहुतेक तुमच्या मते मानवी इतिहासात देखिल कोनी कोणाला फसवलेले नसावे. सर्वांना समान मार्क पडत असावेत.). एवढा किचकट पीनल कोड बदलून दोन शब्दी करायला हवा.

ऐसीवरच्या एखाद्या नवख्या मेंबराने असे विधान केले असते तर समजण्यासारखे आहे.
गब्बर थेट समानतेचा विरोधक आहे हे माहीती असूनही अजो, तुम्ही असं म्हणताय ?

धर्मांतराच्यावेळी फसवणूक घडतच नाही असे मी म्हणत नाही. फसवणूक घडत असेलही.
पण ती तशी घडत्ये हे सिद्ध कोणत्या आधारावर करणार हा प्रश्न आहे.
फसवणूक म्हंजे काहीतरी वचन द्यायचे व त्याची पूर्तता करायची नाही - ही साधीसोपी व्याख्या ध्यानात घ्या. ती अधिक क्लिष्ट असू शकते. पण सध्या साध्यासोप्या व्याख्येवर युक्तीवाद करा. नंतर क्लिष्ट व्याख्येवर युक्तीवाद करूया.

अजो१२३ Mon, 23/01/2017 - 22:42

In reply to by गब्बर सिंग

प्रत्येक चराचराला काही मिनिमम थ्रेशोल्डपेक्षा चांगलेच वागवले पाहिजे अशा समतेचा मी फार कट्टर पुरस्कर्ता आहे. आणि अशा ढोबळ समतेचाच पुरस्कर्ता आहे, सपाटवादाचा नाही.
==============
मूळात एखाद्या कृत्यास गुन्हा का मानावे वा मानावे का याचे कायदेशीर फ्रेमवर्क आहे. एकूण न्यायदान का, कसे, कोण्या निकषांवर करावे याचे निकष आहेत. तर धर्मांतराला तेच फ्रेमवर्क पर्याप्त आहे. उदा. माझे राजकीय बदलण्याचे मला स्वातंत्र्य आहे, आणि पक्षांना देखिल आहे. परंतु काही कृती लोकशाहीबाह्य मानल्या जातात नि त्याला शिक्षा आहे. आपल्याकडे अँटी कंवर्जन लॉ बहुतेक आहे. तो कायदा नीट असणं नि त्याचं नीट पालन होणं आवश्यक आहे.
============
मिशनरी सेवेसाठी धर्मप्रसार करतात कि धर्मप्रसारासाठी सेवा? दुसरे खरे असेल तर भारतात ते अलाउड नाही.

गब्बर सिंग Mon, 23/01/2017 - 23:54

In reply to by अजो१२३

मूळात एखाद्या कृत्यास गुन्हा का मानावे वा मानावे का याचे कायदेशीर फ्रेमवर्क आहे. एकूण न्यायदान का, कसे, कोण्या निकषांवर करावे याचे निकष आहेत. तर धर्मांतराला तेच फ्रेमवर्क पर्याप्त आहे. उदा. माझे राजकीय बदलण्याचे मला स्वातंत्र्य आहे, आणि पक्षांना देखिल आहे. परंतु काही कृती लोकशाहीबाह्य मानल्या जातात नि त्याला शिक्षा आहे. आपल्याकडे अँटी कंवर्जन लॉ बहुतेक आहे. तो कायदा नीट असणं नि त्याचं नीट पालन होणं आवश्यक आहे.

माझ्या माहीतीत तरी अँटी कन्व्हर्जन लॉ फक्त तामिळनाडू मधे आहे.

असा कायदा अस्तित्वात असण्यासच संविधानात्मक आक्षेप असू शकतो.

मिलिन्द Tue, 24/01/2017 - 06:34

In reply to by अजो१२३

धर्म-प्रसारासाठी सेवा करण्यापासून हिंदूंना नक्की कोणी थांबविले आहे ?
आणि भारतात जर स्वेच्छेने धर्मांतर करण्यावर बंदी असेल तर ती फारच कींव करण्याजोगी गोष्ट आहे.

धर्म-प्रसारासाठी सेवा करण्यापासून हिंदूंना नक्की कोणी थांबविले आहे ?

असं नाही देखिल पण घर वापसी विरुद्ध खूप किंचाळ्या ऐकू आलेल्या.

आणि भारतात जर स्वेच्छेने धर्मांतर करण्यावर बंदी असेल तर ती फारच कींव करण्याजोगी गोष्ट आहे.

अमेरिकेत बसून भारतात उठसूट किव करावेसे वाटणे किव करायच्या लायकीचे आहे.
(मिलिंद भाय, पर्सनली नै लेने का. मी अतिशय तीव्र रेसिडेंत भारतीय अस्मितेचा माणूस आहे.)

मिलिन्द Thu, 02/02/2017 - 23:17

In reply to by अजो१२३

पर्सनली बिलकुल नहीं लेते है, भाई: आप बहूत बडे है ! लेकिन मेरे लिये सभी अस्मिताये हास्यास्पद है. जब बाकी कुछ नही होता तब अस्मिता होती है(पर्सनली नै लेने का)- भारतकी कौन्सीभी कास्ट या धर्म देखिये.
और आपने बडे शिताफीसे मूळ मुद्दा टाळा है: स्वेच्छासे धर्म-परिवर्तन पर बंदी लगानेका . ये तो "घर-वापसी" के भी विरुद्ध जाता है!
(माँ राष्ट्रभाषा मुझे क्षमा कर!)

बॅटमॅन Thu, 02/02/2017 - 23:34

In reply to by मिलिन्द

ते बाकी काही असूद्यात, पण

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नव्हती;
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही;
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसेल.

तुमची हिंदी सर्वांत मोठी भाषा असूदे, पण ती आमची राष्ट्रभाषा नव्हती, राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषा नसेल! हिंदुस्तान जिंदाबाद! (हँडपंप उखडला)

गब्बर सिंग Mon, 23/01/2017 - 21:51

In reply to by अजो१२३

तुमच्या मते प्रमोशनचे, इ अमिष दाखवून ऑफिसमधे लैंगिक (गैर)फायदा घेणे या हिशेबाने योग्य असावे.

यात दोन बाबी आहेत -

(१) प्रमोशन चे आमिष दाखवणे : हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी बेसिस असेलच की. उदा. एखादा मिटींग मधली हिंट, एखादा इमेल वगैरे
(२) लैंगिक संबंध ठेवणे - हे सिद्ध करता येऊ शकतेच.

तसे धर्मांतराच्या बाबतीत काय व कसे सिद्ध करणार ? कोणत्या आधारावर ?

अजो१२३ Mon, 23/01/2017 - 22:25

In reply to by गब्बर सिंग

नविन न्यायव्यवस्था एका अत्यंत चूक अशा प्रेमाइसवर आधारली आहे कि प्रत्येक गोष्टीचा पुरावा असतोच. खरं तर प्रत्येक सत्याचा आजघडीला जीवंत असा पुरावा असतोच याची अगोदर सिद्धता मागायला पाहिजे.

गब्बर सिंग Mon, 23/01/2017 - 23:58

In reply to by अजो१२३

नविन न्यायव्यवस्था एका अत्यंत चूक अशा प्रेमाइसवर आधारली आहे कि प्रत्येक गोष्टीचा पुरावा असतोच. खरं तर प्रत्येक सत्याचा आजघडीला जीवंत असा पुरावा असतोच याची अगोदर सिद्धता मागायला पाहिजे.

अजो, नविन च नव्हे तर प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात सुद्धा "प्रमाण" ही संकल्पना आहे. https://en.wikipedia.org/wiki/Pramana

तपशील वाचलात तर ....

मिलिन्द Tue, 24/01/2017 - 06:49

In reply to by गब्बर सिंग

  • मूळ गफलत ही लैंगिक संबन्ध म्हणजे स्त्रीचे शोषणच या खुळचट संकल्पनेत आहे.
  • समाजाला यात फक्त बलात्कार होत नाही ना एव्हढाच इंटरेस्ट असायला पाहिजे.
  • एखाद्या स्त्रीने स्वतःच्या फायद्यासाठी बॉसबरोबर स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवले तर त्यात "फसवणूक" नक्की कुठे आली ? एक प्रौढ मनुष्य म्हणून तिला ते स्वातंत्र्य असायला हवे.

नितिन थत्ते Mon, 23/01/2017 - 14:26

In reply to by अजो१२३

>>नथूरामला नक्की कशासाठी शिक्षा झाली? माणूस मारल्यासाठी? १५-०८-१९४७ ते ३०-०१-१९४८ या काळात भारतात एकूण किती मर्डर झाले? मग त्या गुन्हेगारांना फाशी का नाही दिली? गोडसे नि आपटे हेच पहिले का? त्यात न्यायप्रदानाची जी तत्त्वे आहेत ती बाजूला तर सारलेली नसणार.

Your statement makes a conjecture that no person other than Nathuram Godse was hanged for murders between 15 Aug 47 to 30 Jan 48.

If you have a data on this please provide it here.
How many murders happened?
Were the culprits caught?
Was the trial able to convict them?
What Punishment was given to them if convicted?

अस्वल Tue, 24/01/2017 - 11:09

In reply to by अजो१२३

गोळी घालून मारणे हा अजिबातच रेअर प्रकार नाही, रेअर ऑफ रेरेस्ट तर कोणत्याच प्रकारे नाही. मग या माणसाला थेट फाशीच का झाली?

जोशीबुवा कशाला, कायकू, का शिळ्या कढीला ऊत आणता?
तुम्हाला दिनवैशिष्ट्य "सेक्यूलर लोकांनी एका हिंदुत्ववाद्यास लटकावून मारले." असं म्हणायचंय ना? मग म्हणा ना!
टेन्शन नॉट, जस्ट मेन्शन.

नथुरामचे पंखे का तुम्ही?वा,वा. नवं नाटक पायलंच असेल तुमच्या हिरोवर बेतलेलं? काय?

अजो१२३ Fri, 27/01/2017 - 17:29

In reply to by अस्वल

का शिळ्या कढीला ऊत आणता?

नथुरामला माणूस मारल्याची शिक्षा झाली आहे का महात्मा मारल्याची झाली आहे हे महत्त्वाचं आहे. याचं उत्तर मला जालावर, इ भेटले नाही. शिळी कढी जाऊच द्या मी आयुष्यभर दुग्धजन्य पदार्थ पाहिलाच नाही.

तुम्हाला दिनवैशिष्ट्य "सेक्यूलर लोकांनी एका हिंदुत्ववाद्यास लटकावून मारले." असं म्हणायचंय ना? मग म्हणा ना!

त्याकरिता वरील प्रश्नाचे उत्तर आवश्यक आहे.

नथुरामचे पंखे का तुम्ही?वा,वा. नवं नाटक पायलंच असेल तुमच्या हिरोवर बेतलेलं? काय?

मी नथुरामची बाजू समजून घेत आहे. (नवं? नवंं कोणतं?) नाटक पाहिलं आणि आवडलं. (शांतिप्रिय, गांधीवादी, इ) लोक हिटलरावर इतक्या कादंबर्‍या वाचतात, त्यांनी नथूरामवरचे पुस्तक वा नाटक जे त्याच्या अ‍ॅम्गलने आहे ते बघायला पाहिजे. पुण्यातले गांधीवादी ब्राह्मण तर फक्त लोकांच्या गैरसमजाच्या भीतीपोटीच हे नाटक पाहायचे टाळत असावेत असा कयास आहे.
मूळात नथूरामच्या नाटकात खोटं काय काय आहे हे समजणं फार आवश्यक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 24/01/2017 - 21:30

In reply to by मिलिन्द

एकोळी विचारमौक्तिकांना बहुदा विनोद वगळता इतर कोणतंही मूल्य नसतं, हे तुम्हाला समजू नये! कमॉन!!

आदूबाळ Wed, 25/01/2017 - 19:50

सही: टाळ मृदंग उत्तरेकडे दक्षिणेकडे, आम्ही गातो पश्चिमेकडे मंजे काय असू शकतं?

संपूर्ण अभंग:

प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतेसंगें नाचों रंगीं ॥१॥
कोणे वेळे काय गाणें । हे तों भगवंता मी नेंणे ॥२॥
वारा धावे भलतया । तैसें माझी रंग छाया ॥३॥
टाळमृदंग दक्षिणेकडे । आम्ही गातो पश्चिमेकडे ॥४॥
बोले बाळक बोबडे । तरी ते जननीये आवडे ॥५॥
नामा म्हणे गा केशवा । जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥

------
म्हणजे आमची तुटकीफुटकी, सदोष भक्तीही गोड मानून घ्यावी असं नामदेवराव म्हणतायत. ही संतवाङ्मयात वारंवार येणारी थीम आहे - की बाबा रे, मी अज्ञ आहे, जमेल तितकं करतोय. मी काय लय भारी शास्त्रार्थ जाणणारा पंडित नव्हे. पण तरीही माझी भक्ती सच्ची आहे, वगैरे.

चोखामेळ्याचा याच प्रकारातला अभंगः

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योगयाग तप अष्टांगसाधन ।
नकळेचि दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

गब्बर सिंग Thu, 26/01/2017 - 11:48

War on Bad Science

अजोंसाठी.

John Ioannidis was put in touch with the Arnolds in 2013. A childhood math prodigy turned medical researcher, Ioannidis became a kind of godfather to the science reform crowd in 2005, when he published two devastating papers—one of them titled simply “Why Most Published Research Findings Are False.” Now, with a $6 million initial grant from the Arnold Foundation, Ioannidis and his colleague Steven Goodman are setting out to turn the study of scientific practice—known as meta-research—into a full-fledged field in its own right, with a new research center at Stanford.

अजो१२३ Fri, 27/01/2017 - 17:32

किती आणि कोणत्या अ‍ॅक्टिव सदस्यांनी ऐसी सोडले आहे आणि का?
============
संस्थळाच्या पहिल्या ५०० धाग्यांमधे कार्यरत असलेले किती % सदस्य आजदेखिल आहेत?

गब्बर सिंग Fri, 27/01/2017 - 01:01

जिथे सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध आड येतात (उदा. आदिवासींच्या शतकानुशतकांची पारंपरिक वहिवाटीची जमीन हिसकावून घेऊन ती राष्टीय-परराष्टीय कंपन्यांना विकणे ), तेंव्हा सरकारे (सर्वच पक्षांची!) सरळसरळ फॅसिस्ट, दमनकारी पद्धतीने वागतात हे आपण दंडकारण्यात बघत आहोतच .

हॅहॅहॅ

संस्थानं खालसा केली गेली त्याबद्दल तुम्ही असंच म्हणाल ?
संस्थाने खालसा करून एकछत्री प्रजातांत्रिक राष्ट्रात बलपूर्वक संम्मिलित करणे हे दमनकारी होते - असं म्हणाल ?

मिलिन्द Fri, 27/01/2017 - 01:58

In reply to by गब्बर सिंग

एका भूभागावर 'सार्वभौम" राज्य करणे (अर्थात हिंसेच्या बळावर!) आणि जमिनीच्या छोट्या तुकड्यात पोटापुरती शेती करणे यात तुम्हाला काहीच फरक दिसत नाही? हे वडाची साल पिंपळालाच नाही, तर कुत्र्याला लावणे आहे!

एका भूभागावर 'सार्वभौम" राज्य करणे (अर्थात हिंसेच्या बळावर!) आणि जमिनीच्या छोट्या तुकड्यात पोटापुरती शेती करणे यात तुम्हाला काहीच फरक दिसत नाही? हे वडाची साल पिंपळालाच नाही, तर कुत्र्याला लावणे आहे!

बिल्कुल नाही.

हे फक्त एकच आहे. "hatred of rich".

आदिवासींची (१) वहिवाट आणि (२) जंगलाचे रक्षक या दोन्ही भूमिका फक्त लबाडीच्या आहेत. चोरीच्या आहेत. आदिवासींचा जंगलावर कोणताही अधिकार नाही व जरी जंगलातील जमीनीच्या छोट्या तुकड्यावर त्यांची गुजराण चालत असली तरी - (१) ते त्या मालमत्तेच्या अधिकाराच्या नोंदणी व रक्षणासाठी कर देत नाहीत, (२) त्यांच्या भूमि व्यक्तिरिक्त जंगलातले रिसोर्सेस मुक्तपणे ओरबाडून (वर आणि आम्ही जंगलाचे रक्षक आहोत असा अध्याहृत दावा करून) राष्ट्रीय संपत्तीची लूट करतात.

तुम्ही फक्त size बद्दलचे आर्ग्युमेंट करून "यवढंस्संच तर आहे... सोडा की त्यांना" असं म्हणून श्रीमंतांना खजील करून त्या फडतूस आदिवासींना लबाडीला प्रोत्साहन देताय.

मिलिन्द Fri, 27/01/2017 - 05:34

In reply to by गब्बर सिंग

"आदिवासींचा जंगलावर कोणताही अधिकार नाही": एव्हढा मोठा जोक मी बऱ्याच दिवसात ऐकला नव्हता. ब्रिटिशांनी सर्व "पडीक" जमीन राणीची (crown land) म्हणून जाहीर केली, व आदिवासींना उपरे ठरविले. आदिवासींनी ब्रिटिशांशी जो लढा दिला त्याचा स्वतंत्र भारत देश निर्माण होण्यास चांगला उपयोग झाला. स्वतंत्र भारताच्या संसदेने आदिवासींच्या या योगदानाची परतफेड साम्राज्यवादी ब्रिटिश कायदा जसाच्या तसा ठेवून केली . एकदा आदिवासींना उपरे ठरविल्यावर त्यांना लुटायचा आणि त्यांच्या बायकांवर बलात्कार करण्याचा "अधिकार" अर्थातच भारताच्या वन खात्याला आणि "सुरक्षा दलांना " प्राप्त झाला, जो अर्थातच त्यांनी वापरून घेतला. आदिवासींकडे जमिनीच्या मालकीचे पेपर्स नाहीत कारण हिंदू , मुसलमान, ब्रिटिश कोणत्याच राजवटीशी संबंध ठेवायला जी कागदपत्रांची साक्षरता आणि सरकार-दरबारातला स्मार्टपणा लागतो तो त्यांच्याकडे नव्हता , पण तो त्यांच्या कल्चरमध्येच नव्हता, त्यामुळे तो "का नव्हता" हे विचारणे चूक आहे (आणि ब्रिटिश व बामणी काव्याचाच एक नमुना आहे ). आजही काँग्रेस सरकारने त्यांना जमिनीवर अधिकार दाखविण्यासाठी जी कागदपत्रे आणायला सांगितली आहेत, त्यातली बरीचशी त्यांच्याकडे नसतात, त्यामुळे बरीचशी प्रकरणे "पडून" च आहेत. आदिवासी भागात खरे "उपरे" हे भारतीय राज्यसंस्थेचे प्रतिनिधी आहेत, आदिवासी नाहीत!

आदिवासींकडे जमिनीच्या मालकीचे पेपर्स नाहीत कारण हिंदू , मुसलमान, ब्रिटिश कोणत्याच राजवटीशी संबंध ठेवायला जी कागदपत्रांची साक्षरता आणि सरकार-दरबारातला स्मार्टपणा लागतो तो त्यांच्याकडे नव्हता , पण तो त्यांच्या कल्चरमध्येच नव्हता, त्यामुळे तो "का नव्हता" हे विचारणे चूक आहे (आणि ब्रिटिश व बामणी काव्याचाच एक नमुना आहे ).

मग संस्थानिकांकडे स्मार्टपणा होता व कागदपत्रे होती तरीही ती संस्थाने खालसा/बरखास्त केली ?
आदिवासींकडे स्मार्टपणा असता आणि त्यांनी कागदपत्रे मिळवली व राखली असती आणि १९४७ नंतर दाखवली असती तर त्यांच्या जमीनी खालसा केल्या नसत्या ? का बरं ?

(कुळ कायद्याबद्दल ... जाऊदे)

यालाच मी पुरोगाम्यांचा डामरटपणा म्हणतो. की श्रीमंतांप्रति जन्मजात होस्टिलिटी. बघावं तेव्हा त्यांच्या मालमत्तेवर/संपत्तीवर डोळा ठेवून ह्याला इतकं मिळालं ते त्याला नाय मिळायला पायजे व त्याला हेहे नाय मिळालं ... तरी त्याला ते दिलं पायजे. मग नवीन मूल्य स्थापन करायचं आणि त्याच्या नावाखाली ओरबाडायचं आणि वाटायचं आणि स्वतःच्या पाठीवर थाप मिळवायची. रॉबिनहूडगिरी. म्हणूनच म्हणतो आदीवासींवर अनन्वित अत्याचार व्हायला पायजेत. जे होताहेत ते चालूच रहावेत. आणखी व्हावेत. इतके व्हावेत की आदीवासींनी ओरबाडलेली जमीन पुनः एकदा श्रीमंतांच्या हातात जायला हवी.

सामो Fri, 27/01/2017 - 18:58

In reply to by गब्बर सिंग

रॉबिनहुड आवडते पात्र आहे माझे. त्याच्या कृत्यांमुळेच (कृत्य चे अनेकवचन). पण गब्बर च्या ब्रेन स्टॉर्मिंगमुळे सगळ्याच व्हॅल्यु च्यायला ढवळुन निघाल्यात.

गब्बर सिंग Sun, 29/01/2017 - 04:33

अजोंना प्रश्न -

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

याचा अर्थ काय ?

अजो१२३ Sun, 29/01/2017 - 10:02

In reply to by गब्बर सिंग

परंपरा पाळंणे सोयीचे नसते. कठीण असते. त्या प्रयत्नपूर्वक पाळाव्या लागतात.
===========
परंपरा पाळणे नैसर्गिक देखिल नसते.

गब्बर सिंग Sun, 29/01/2017 - 10:05

In reply to by अजो१२३

परंपरा पाळंणे सोयीचे नसते. कठीण असते. त्या प्रयत्नपूर्वक पाळाव्या लागतात.

मग ते तसे का लिहिलेले नाहीये ?

की परंपरा पाळणे सोपे नसते कठीण असते. व तरीही पाळायच्या असतात व त्यातून हे हे फायदे होतात == असं स्पष्ट, स्वच्छ का म्हणत नाहीयेत ??

अजो१२३ Sun, 29/01/2017 - 11:26

In reply to by गब्बर सिंग

बहुतेक ते कवनात्मक आहे म्हणून तसं लिहिलं नाही.
=============
स्प्ष्ट स्वच्छ असं काही नसतं. एखादा अर्थ समजूनच घ्यायचा नाही वा वाकडंच लावायचं म्हटलं तर उपाय नाही.

बॅटमॅन Sun, 29/01/2017 - 17:07

In reply to by अजो१२३

परंपरा पाळणे नैसर्गिक नसते आणि पाचेक किंवा फारतर दहाएक हजार वर्षांपूर्वी सगळे नैसर्गिकच चालले होते. त्यामुळे त्या दहाहजार वर्षांत उदयाला आलेल्या परंपरा सर्वच अनैसर्गिक आणि म्हणून चूक आहेत. हीहीहीहॉहॉहॉ

चिमणराव Tue, 31/01/2017 - 05:09

In reply to by बॅटमॅन

परवडत नाही अथवा पटत नाही म्हणून परंपरा पाळत नाही. पाइक होणे, व्हायलाच पाहिजे हा जुलुमच आहे.पटल्या तर पाळतो.

गब्बर सिंग Mon, 30/01/2017 - 07:35

फेब्रुवारी २, २०१७.

अर्थसंकल्पावरील विवाद व चर्चा -

कम्युनिस्ट्स = हे बजेट अँटी फार्मर, अँटी लेबर, अँटी पूअर आहे व म्हणून अँटी पीपल आहे. आम्ही याचा निषेध करतो.

काँग्रेस = सोशल सेक्टर साठी काही नैय्ये या बजेट मधे. कर्जबाजारी शेतकर्‍यांना दिलासा द्यायला हवा होता.

केजरीवाल = निराशाजनक अर्थसंकल्प

बहनजी = पिछडी जा....

राष्ट्रवादी = फुले आंबेडकरांच्या विचारांना काळीमा फासणारे बजेट

शिवसेना = महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपस....

तृणमूल काँग्रेस = केंद्र शोरकार को गोरीब का कुछो चिंता नॉय !!!

ओवेसी = दाढीवाल्या प्रधानमंत्र्यांकडून... आणि "घोटून घोटून" दाढी केलेल्या अर्थमंत्र्यांकडून "इथल्या" दाढीवाल्यांना काही मिळाले नाही.

नितिन थत्ते Mon, 30/01/2017 - 15:03

In reply to by गब्बर सिंग

हॅ हॅ

सध्याचे अर्थमंत्री विरोधी पक्षात असताना आयकर मर्यादा ५ लाख करा म्हणत असत ब्वॉ !! अर्थमंत्री झाल्यावर अडीच लाखाच्या पुढे जायला जमलेलं नाही !!

http://www.thehindubusinessline.com/news/raise-it-slab-to-rs-5-lakh-dem…

तेव्हा या प्रतिक्रिया रूटीन असतात यात काय आश्चर्य.

अनु राव Mon, 30/01/2017 - 15:07

In reply to by नितिन थत्ते

मग काय, पार फसवलय ह्या मोदी सरकारनी.

तिकडे ट्रंप बघा, कमिट केल्याप्रमाणे लगेच अध्यादेश काढतोय. १०-२०% केले कमिट केल्याच्या तरी आमच्यासारखे अल्पसंतुष्ट लोक खुष असतात.

गब्बर सिंग Mon, 30/01/2017 - 19:36

In reply to by अनु राव

प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं. हे वचन न देता सुद्धा त्याची पूर्तता केली. आमच्यासारखे लोक यावर खूश होतात. ( आता उगीचच "त्याची युटिलीटी संपली होती" वगैरे डायलॉग्स येतीलच. )

खरंतर जीएस्टी ला सुद्धा भाजपाने सत्तेत नव्हते तेव्हा विरोध केला होता. व अणुकरारास सुद्धा. अणुकरार हा देशहिताचा असूनही व ते भाजपाच्या सर्वांना पटत होतं तरीही (अडवाणींच्या लहरीखातर ??) विरोध केला होता. आता जपान शी आणि कॅनडा शी अणुकरार कसा केला ?? लबाड साले.

बाकी १५ लाख रु. प्रत्येकाच्या अकाऊंट मधे जमा केले तर जी माणसं थोडंफार काम करत आहेत ती सुद्धा काही करणार नाहीत. तेव्हा ते न केलेलेच बरे. ते १५ लाख रु. देशातल्या जनतेची घामाची कमाई आहे असं नाही. त्यांचे नैय्येतच. पण ही असली चक्रमादित्य वचनं ने देणं श्रेयस्कर.

नितिन थत्ते Mon, 30/01/2017 - 20:31

In reply to by गब्बर सिंग

>>( आता उगीचच "त्याची युटिलीटी संपली होती" वगैरे डायलॉग्स येतीलच. )

पण आम्ही तर म्हणतो की बरखास्त केलंच नाही. त्याचं नाव बदललं !! ;)

गब्बर सिंग Mon, 30/01/2017 - 20:51

In reply to by नितिन थत्ते

पण आम्ही तर म्हणतो की बरखास्त केलंच नाही. त्याचं नाव बदललं !!

कैच्याकै. तुमचा मोदींना विरोध असू शकतो हे समजण्याजोगे आहे पण हे म्हंजे अंधद्वेष्टेपण आहे.

नीती आयोगाची उद्दिष्टं आणि नियोजन आयोगाची उद्दिष्टं यांत जमीन आसमानाचं अंतर आहे.

आता तुम्ही लगेच म्हणालंच की "उद्दिष्टं वेगळी असली तरी पॉलीसीज जर जुन्याच राबवणार असाल तर फरक काय ?"
(काल रात्री ररांशी याच बद्दल बोलणं झालं आणि त्यांनी नेमका हाच आक्षेप घेतला होता. व थत्तेचाचा, तुम्ही पण मागे हाच आक्षेप घेतला होतात. )

फरक जो तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहात तो हा आहे की नीती आयोग पंचवार्षिंक योजना बनवत नाही. नियोजन आयोगाचं प्रमुख Deliverable हे पंचवार्षिक योजना हे होतं. (पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी वगैरे पण आलं. परंतु मूळ Deliverable हे पंचवार्षिक योजना हे होतं.).

अनुप ढेरे Mon, 30/01/2017 - 21:08

In reply to by गब्बर सिंग

हेच बोल्तो. नियोजन आयोगाला आर्थिक वाटण्या करायचा अधिकार होता. नीती आयोगाला नाही. आर्थिक वाटण्या अर्थ मंत्रालय करतं. हा खूप मोठा फरक आहे. त्याहून पुढे, याच्याशी कंसिस्टंट बदल म्हणजे केंद्राच्या रेवेन्यूच्या ४२% डायरेक राज्यांना जातो. कुठल्याही स्कीमशी न जोडलेला. (आधी हे ३०% होतं प्रमाण).

हाच मुद्दा किती वेळा चघळला जाणार काय माहिती.

गब्बर सिंग Mon, 30/01/2017 - 21:29

In reply to by अनुप ढेरे

ररांचा मुद्दा हा सुद्धा होता की नियोजन आयोग बरखास्त केलात ते ठीकाय. पण त्याला पर्याय म्हणून काय दिलेत. त्यावर माझे उत्तर हे की नियोजन आयोगाला पर्याय न देणे हेच इष्ट आहे.

नियोजन आयोगाशी संलग्न दोन महत्त्वाच्या समस्या म्हंजे - (१) जसजसे माहीतीचे स्थानिक पासून उच्चस्तराकडे अ‍ॅग्रीगेशन होते तसतसे त्यातला स्थानिक स्पेसिफिसिटी कमीकमी होत जाते. (२) नियोजन मंडळाच्या कर्मचार्‍यांना त्या कामाच्या पूर्ततेसाठी इन्सेंटिव्ह्ज जवळपास शून्य असतात.

म्हंजे प्लॅनिंग हे राष्ट्रीय पातळीवर न होता ते ग्रामपातळीवर, तालुका, जिल्हा पातळीवर व्हायला हवे. व ते होण्याची प्रक्रिया केव्हाच सुरु झालेली आहे. तिला गती मिळणे आवश्यक आहे.

सुधीर Wed, 01/02/2017 - 10:30

In reply to by गब्बर सिंग

"प्लॅनिंग हे राष्ट्रीय पातळीवर न होता ते ग्रामपातळीवर, तालुका, जिल्हा पातळीवर व्हायला हवे."
गब्बर शेठ, "कॉपरेटीव्ह फेडरलिझम" इतपर्यंत नीतिआयोगाच्या हेतूचं वेगळेपण मान्य आहे. पण गाव पातळीवर प्लॅनिंग पटत नाही. फिस्कल कन्सॉलीडेशन कसं शक्य होईल मग? दोन गावातल्या प्रायॉरिटीज तर ठरवाव्या लागतीलच ना?

गब्बर सिंग Thu, 02/02/2017 - 11:24

In reply to by सुधीर

गब्बर शेठ, "कॉपरेटीव्ह फेडरलिझम" इतपर्यंत नीतिआयोगाच्या हेतूचं वेगळेपण मान्य आहे. पण गाव पातळीवर प्लॅनिंग पटत नाही. फिस्कल कन्सॉलीडेशन कसं शक्य होईल मग? दोन गावातल्या प्रायॉरिटीज तर ठरवाव्या लागतीलच ना?

गाव पातळीवर प्लॅनिंग पटत नाही ? का ?

(१) गावातले अंतर्गत प्लॅनिंग गाव करू शकते. हे तरी पटतंय ?
(२) दोन गावांच्या मधे असलेल्या प्रायोरिटीज कोणत्या ? व त्या प्रायोरिटिज ... त्या दोन गावातले नेते ठरवू शकणार नाहीत ?? का बरं ? नेगोशिएशन त्या दोघांत का होऊ शकत नाही ?

-

तुमचा फिस्कल कन्सॉलिडेशन चा मुद्दा लक्षात आला नाही.

सुधीर Thu, 02/02/2017 - 22:29

In reply to by गब्बर सिंग

गाववाल्यांनी "वरून मंजूर" झालेल्या निधीत जी कामं बसतील त्याचे खुशाल नियोजन करावे.

देशपातळीवर तसा समन्वय/निगोशिएशन्स नेत्यांनी (राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी) जरूर करावेत (सरसकट केंद्राने ठरवण्यापेक्षा. तरी सुद्धा केंद्रसरकारने हस्तक्षेप करणं अगदीच चुकीच आहे असं मला वाटत नाही). पण राज्यपातळीवर राज्याच्या विकासासाठी कुठल्या विभागाला किती निधी मिळाला पाहिजे हे निर्णय मात्र राज्य मंत्रिमंडळानेच घेतलेले बरे. ती अकांऊटेबिलीटी (एकंदर राज्याच्या विकासाची आणि पुन्हा सत्तेत येण्याची) त्यांचीच. उदा. मुख्यमंत्र्यांनीच ठरवावं निधी पश्चिम महाराष्ट्राला किती वळवायचा? विदर्भाला किती? यासाठी मुख्यमंत्र्यावर पश्चिम महाराष्ट्राला/विदर्भाला झुकतं माप देणारा आहे असा आरोप झाला तरी चालेल. ती लॉबींग सत्ताधारी पक्षाच्या त्या त्या विभागाच्या प्रतिनिधींनी करावी. वेगळ्या विदर्भाच्या (विभागाच्या) फुटीरता वादाची भीती मुख्यमंत्र्याला वाटत असेल तरच ती निगोशिएशन्स फारफार तर अजून एक पातळी खाली उतरून दोन विभागाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष करावीत. अशा निधी वाटपात एकमत होण्याची शक्यता कमीच. त्यामुळे निधी मोजक्या लोकांनी वरूनच वाटप केलेला बरा. नाहीतर ते टू मेनी कुक सारखं होऊन जाईल, असं आपलं मला वाटतं.

नितिन थत्ते Tue, 31/01/2017 - 10:19

In reply to by अनुप ढेरे

>>नियोजन आयोगाला आर्थिक वाटण्या करायचा अधिकार होता. नीती आयोगाला नाही. आर्थिक वाटण्या अर्थ मंत्रालय करतं. हा खूप मोठा फरक आहे.

पण शेवटी वाटण्या दिल्लीतूनच ठरणार ना? अ ला अधिकार होते ते काढून ब ला दिले. आणि अ रद्द केले.

असो. मोदींचे मेन एक्ज़िक्युटेबल प्रॉमिस "जॉब निर्माण करणे- निर्माण होतील अशा पॉलिसीज राबवणे" हे होते. त्यावर काही काम होत नाहीये. होत असले तरी त्याचे परिणाम दिसत नाहीयेत.

आणि "एवढे् मोठे भ्रष्टाचार" झाले होते त्यांचा छडा लावणे हे ही होत नाहीये.

अनुप ढेरे Tue, 31/01/2017 - 14:04

In reply to by नितिन थत्ते

https://swarajyamag.com/ideas/bibek-debroy-explains-how-niti-aayog-has-…

ऑब्सोलीट कायदे खारीज करण्याचं काम भारी वाटत आहे. जे नीती आयोगाच्या मदतीने राजस्तान/महाराष्ट्रात चालू आहे.

अनु राव Tue, 31/01/2017 - 09:18

In reply to by गब्बर सिंग

गब्बु - ह्या असल्या कामाला फुटकळ असे पण म्हणवत नाही रे. नो सिस्टेमिक चेंज.
अजुन २ वर्ष आहेत ट्रंपोबा ची स्पेशन ट्युशन लावायला पाहिजे. किंवा स्वस्तातली शिकवणी पाहिजे असेल तर रॉडी दुतर्तेची.

आदूबाळ Mon, 30/01/2017 - 17:49

चिंजं / अदिती:

युनिशिकागोच्या डिजिटल डिक्शनरी प्रकल्पामध्ये "अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी" शं गो तुळपुळे आणि अ‍ॅन फेल्डहाऊस ही आलेली आहे. ऐसीच्या मुख्यपानावरच्या डिक्शनर्‍यांच्या यादीमध्ये घालू शकता.

http://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/

----
ही डाऊनलोड कशी करायची?

राही Tue, 31/01/2017 - 11:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फारच छान. आता यादवकालीन शब्दार्थ शोधण्यासाठी ग्रंथालये धुंडाळायला नकोत.
'ऐसी'वरच्या या शब्दकोशांमुळे अनेक द्राविडी प्राणायाम टळले आहेत. फारच चांगली सोय.

आदूबाळ Tue, 31/01/2017 - 15:22

करुणात्रिपदीतून उदृत

श्री गुरुदत्ता जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
चोरे द्विजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥
पोटशुळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥
द्विजसुत मरतां वळले ते मन हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां वळले ते मन न वळे की आतां । श्री गुरुदत्ता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥
जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।

ही काय ष्टुरी आहे कोणाला माहीत आहे का? प्रथम एका ब्राह्मणाचं पोट दुखायला लागतं (पोटशुळाने द्विज तडफडता) आणि मग पुढच्या चरणात त्याचा मुलगा मरतो?

घाटावरचे भट Wed, 01/02/2017 - 09:52

In reply to by आदूबाळ

दोन वेगवेगळ्या ष्टुरीज आहेत. नाशिक मुक्कामी असताना पोटदुखीच्या व्याधीने ग्रस्त आणि त्याकारणाने आत्महत्या करायला निघालेल्या ब्राह्मणाला नरसिंह सरस्वतींनी आपल्या सोबत जेवायला बसवले आणि ते अन्न ग्रहण करताच त्याची वेदना दूर झाली असे वर्णन आहे. दुसर्‍यात एका दांपत्याचे मृत बालक जिवंत केल्याचा उल्लेख आहे. हे खरं तर गुरुचरित्रातील अध्यायांचे एक एक वाक्यतले वर्णन आहे.

मिलिन्द Tue, 31/01/2017 - 00:16

चित्रपट माहितीबद्दल धन्यवाद! जरूर बघायचा प्रयत्न करीन. ट्रम्पच्या मूर्ख "बॅन" वर इथे प्रचंड वादळ उठले आहे, निदर्शने होत आहेत (मीही सामील आहे!). बाकी काही नाही तर त्या सर्व देशात सध्याच्या युद्धात जीवावर उदार होऊन अमेरिकेला दुभाष्या, खबऱ्या वगैरे प्रकारची मदत करणारे हजारो लोक आहेत. अमेरिकेत स्थायिक होण्याच्या संधीच्या आशेने हे लोक हे अतिशय धोक्याचे काम स्वीकारतात , आणि त्याचा अमेरिकन सैन्याला प्रचंड उपयोग होतो. त्यांना संधी नाकारणे ही कृतघ्नतेची , बिनडोकपणाची हद्द म्हटली पाहिजे.

(संपादक : अलीकडे काय पाहिलंत - २७ या धाग्यावरच्या ह्या प्रतिसादाखालची राजकीय चर्चा इथे हलवली आहे.)

ट्रंप जे करतो त्यात बरोबर काही असूच शकत नाही असं गृहित धरलं की ही अशी मुक्ताफळं उधळता येतात. अंधद्वेष्टेपणा.

हे कन्व्हिनियंट बातम्या ऐकून व वाचून होतं. गैरसोयीची बाजू अस्तित्वातच नसते असं गृहित धरलं की मग .... हे असे डायलॉग मारता येतात.

मोदी हा मागच्या जन्मी पण खोटारडा होता असं म्हणायला कमी करणार नाही तुम्ही. तसं ट्रंप गेल्या सात जन्मी पण मूर्ख होता असं पण म्हणाल तुम्ही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 31/01/2017 - 02:34

In reply to by गब्बर सिंग

पार्टी पूपींगबद्दल आधीच क्षमायाचना.

हे कन्व्हिनियंट बातम्या ऐकून व वाचून होतं. गैरसोयीची बाजू अस्तित्वातच नसते असं गृहित धरलं की मग ...

बरोबरच आहे तुमचं. गैरसोयीच्या बातम्या वाचण्याची सक्ती नसते; आणि इथे गैरसोयीची बाजू काय हे मांडण्याजागी 'तुम्ही कसे फडतूस' अशा छापाच्या पिंकांखेरीज काही म्हटलं जात नाही.

गब्बर सिंग Tue, 31/01/2017 - 04:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

The Case for Extreme Immigrant Vetting : It’s a practice as American as apple pie—and for good reason.

ह्या लेखातला मजकूर तुमच्या सोयीसाठी खाली देत आहे. मुद्दा हा आहे की Extreme Immigrant Vetting ची अमेरिकेत प्रदीर्घ precedent आहे. तेव्हा ट्रंप ने जे काही केलेले आहे ते त्या precedent ला धरूनच केलेले आहे. "आम्हाला जे वाटते ते बरोबरच असते" अशा आविर्भावात ट्रंप ला मूर्ख ठरवणे अविचारी आहे.

पुढे - precedent ला धरून वागणे हे प्रत्येक वेळी बरोबर असते असं कोणीच म्हणत नाही. पण प्रत्येक वेळी चूक असते असं म्हणणं अव्यवहार्य आहे. राज्यशास्त्राच्या कोणत्याही अभ्यासकाला विचारलेत तर तर तो हेच सांगेल की precedent चे एक विशिष्ठ स्थान असते जे लोकांच्या एक्स्पेक्टेशन्स सेट करण्याचे काम करते.

As early as 1645, the Massachusetts Bay Colony prohibited the entry of poor or indigent persons. By the early 20th century, the country was filtering out people who had “undesirable” traits, such as epileptics, alcoholics and polygamists.

Even our Favorite Founding Father du jour, Alexander Hamilton (himself an immigrant), thought it was important to scrutinize whoever came to the United States. He wrote:

"To admit foreigners indiscriminately to the rights of citizens, the moment they put foot in our country … would be nothing less, than to admit the Grecian Horse into the Citadel of our Liberty and Sovereignty. … The United States have already felt the evils of incorporating a large number of foreigners into their national mass. … In times of great public danger there is always a numerous body of men, of whom there may be just grounds of distrust; the suspicion alone weakens the strength of the nation, but their force may be actually employed in assisting an invader."

And in 1740, Delaware enacted legislation to “Prevent Poor and Impotent Persons being Imported." Many of these colonial-era restrictions remained in place until 1875, when the Supreme Court invalidated state-imposed head taxes on immigrants to fund the financial burden of caring for poor entrants, and made immigration the sole purview of the federal government. But that wasn’t the end of immigrant filters. Congress responded by creating the vetting system that—although modified many times—remains in place today. In 1875, Congress prohibited the entry of prostitutes and convicts. In 1882, Congress suspended the immigration of Chinese laborers, and added idiots, lunatics and persons likely to become public charges to the list for good measure.

बाकी लेख वाचाल तर आणखी मुद्दा स्पष्ट होईल.

संभाव्य आक्षेप -

(१) पण हे प्रतिगामी आहे, गब्बर. आपण मागचेच धरून न बसता प्रगति करायला हवी, गब्बर !!!
(२) परंतु, युनो ने इमिग्रेशन चा अधिका....
(३) कोण कुठला लेखक ... आम्ही काय म्हणून त्याला गांभीर्याने घ्यायचे ??

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 31/01/2017 - 04:45

In reply to by गब्बर सिंग

कोण कुठला लेखक ... आम्ही काय म्हणून त्याला गांभीर्याने घ्यायचे ??

+१

शिवाय, मराठी संस्थळावर येऊन मी एवढं इंग्लिश वाचत नाही. इंग्लिशमधल्या लिंका आणि त्यांतला मजकूर डकवलेला, तर ऐसीवर कशाला येऊ!

मिलिन्द Tue, 31/01/2017 - 05:13

In reply to by गब्बर सिंग

त्या ७ देशात सध्याच्या युद्धात जीवावर उदार होऊन अमेरिकेला दुभाष्या, खबऱ्या वगैरे प्रकारची मदत करणारे हजारो लोक आहेत. अमेरिकेत स्थायिक होण्याच्या संधीच्या आशेने हे लोक हे अतिशय धोक्याचे काम स्वीकारतात , आणि त्याचा अमेरिकन सैन्याला प्रचंड उपयोग होतो. त्यांना संधी नाकारणे ही कृतघ्नतेची , बिनडोकपणाची हद्द म्हटली पाहिजे.
शिवाय ही ऑर्डर म्हणजे :

  • बघा, अमेरिका तुमच्या विरोधातच आहे , अशी आयसिसला प्रचाराची संधी देणे.
  • लिबिया, इराक मधली लढाई संपत आली असताना भावी संबंध बिघडवणे, इराकला अणिकच इराणच्या घशात घालणे .
  • आणि मुख्य म्हणजे कोणत्या मुसलमानाचे डोके फिरेल हे आम्ही ठामपणे सांगू शकतो हा वेडसर अहंभाव बाळगणे.

ट्रम्पच्या मंत्रिमंडळातले दोन जनरल्स आणि संभाव्य परराष्ट्रमंत्री यांनी खाजगीत या निर्णयाविरुद्ध पुट्पुट केली आहे. त्या क्षेत्रातले तद्न्य सोडून स्टीव्ह बॅनन हा, कोणत्याही वरिष्ठ सरकारी स्थानाचा अनुभव नसलेला दीड -दमडीचा गौर-वर्ण-वर्चस्ववादी, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण ठरवीत आहे.
----

दीड -दमडीचा गौर-वर्ण-वर्चस्ववादी, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण ठरवीत आहे.

असत्य. तो दीड दमडीचा नक्कीच नाही. धनदांडगा आहे. मस्तपैकी.

( श्रीमंत माणूस म्हंजे .... नेहमीप्रमाणे पुरोगाम्यांच्या मते "सर्वे दोषा: कांचनम आश्रयन्ते". त्यातून तो बँकर .... म्हंजे खलनायकांचा खलनायक. )

----

बघा, अमेरिका तुमच्या विरोधातच आहे , अशी आयसिसला प्रचाराची संधी देणे.

हॅहॅहॅ

गेल्या आठ वर्षांत इमिग्रेशन चालू ठेवलं होतं. जोमात. आणि तरीही आयसिस जन्माला आली आणि फोफावली. तेव्हा आयसिस असं म्हंटली नाही की "बघा अमेरिका तुमच्या विरोधात नाही" आणि आयसिस च्या संभाव्य सदस्यांनी सुद्धा असा विचार केला नाही की "अमेरिकेने इमिग्रेशन चालू ठेवलेले आहे तेव्हा आपण राडे न करावेत".

----

आणि मुख्य म्हणजे कोणत्या मुसलमानाचे डोके फिरेल हे आम्ही ठामपणे सांगू शकतो हा वेडसर अहंभाव बाळगणे.

हे वाक्य आणि -

बघा, अमेरिका तुमच्या विरोधातच आहे , अशी आयसिसला प्रचाराची संधी देणे.

हे वाक्य ... ही दोन वाक्ये विसंगत नाहीत ???????????????

मला एक समजत नाही. की लिबियामधलं युद्ध जेव्हा सुरू झालं, तिथे शेकडो लोक ओबामांनी मारले तेव्हाच त्याबद्दल लोकांनी आवाज कसा नाही उठवला. का ते शांतीदूत ओबामांनी सुरू केलं म्हणून ते बरोबर होतं?

बघा, अमेरिका तुमच्या विरोधातच आहे , अशी आयसिसला प्रचाराची संधी देणे.

मग आयसिलला प्रचाराची कोणती संधी दिली पाहिजे? बघा, अमेरिका आमच्या (आयसिलच्या) बाजूनेच आहे असा प्रचार करायची?
===================
ईश्वराने जी तुम्हाला अ‍ॅबसॉल्यूट फ्री विल दिली आहे तिचा वापर करून तुम्ही हिलरीबाईला मत दिले. ती हारली. आता घरी बसा चार वर्षे.

आणि मुख्य म्हणजे कोणत्या मुसलमानाचे डोके फिरेल हे आम्ही ठामपणे सांगू शकतो हा वेडसर अहंभाव बाळगणे.

रशियावर निर्बंध घाललेले तेव्हा सर्वच रशियन लोकांचे डोके फिरले आहे असे ओबामाला म्हणायचे होते का?

बाकी काही नाही तर त्या सर्व देशात सध्याच्या युद्धात जीवावर उदार होऊन अमेरिकेला दुभाष्या, खबऱ्या वगैरे प्रकारची मदत करणारे हजारो लोक आहेत. अमेरिकेत स्थायिक होण्याच्या संधीच्या आशेने हे लोक हे अतिशय धोक्याचे काम स्वीकारतात , आणि त्याचा अमेरिकन सैन्याला प्रचंड उपयोग होतो. त्यांना संधी नाकारणे ही कृतघ्नतेची , बिनडोकपणाची हद्द म्हटली पाहिजे.

पाकमधे भारतासाठीचे दुभाषी नागरिक व खबरे असणारच. मग आपण पोटेशिंयल (आर्थिक इ) डिफरन्स असता तर अव्याहत मायग्रेशन होऊ दिले असते का?
=============
अमेरिकेत स्थायिक होणे हिच एक ऑफर असू शकते? आणि हिच असेल तर दुसरे दुसरी ऑफर (डॉलर) मानणारे अन्य लोक असणारच ना?
==========
स्वतःच्या देशाशी बईमान लोक नंतर अमेरिकेशीही बईमान असतील.
============
या लोकांचा अपवाद करता येईल पॉलिसीत. उलट अपवाद केला तर जास्त खबरे मिळतील.
==================
मग बिनडोकपणा कोणाचा?

मिलिन्द Fri, 03/02/2017 - 05:27

In reply to by अजो१२३

स्वतःच्या देशाशी बईमान लोक नंतर अमेरिकेशीही बईमान असतील. : आयसिस , अल कायदा हे त्यांचा "स्वतःचा देश " कधीपासून झाले?
पाकमधे भारतासाठीचे दुभाषी नागरिक व खबरे असणारच. मग आपण पोटेशिंयल (आर्थिक इ) डिफरन्स असता तर अव्याहत मायग्रेशन होऊ दिले असते का?: त्यांच्या जिवाला पाकिस्तानात धोका असताना जर आपण त्यांना आश्रय दिला नसता तर १. आपले अफाट बिनडोकत्व (आणि कृतघ्नता) सिद्ध झाले असते आणि २. आपले त्या देशाच्या माहितीचे स्रोत लवकरच पूर्णपणे आटले असते.

मिलिन्दपासून भारतीयांनी सावध राहायला पाहिजे. तो भारताच्या (न द्यायला पाहिजे त्या) खबरा अमेरिकेला देत असू शकतो. त्याबदल्यात अमेरिकेने त्याला तिथले नागरिक राहू देणे हा त्याच्यामते पुरेसा मोबदला आहे.

मिलिन्द Fri, 03/02/2017 - 05:33

In reply to by अजो१२३

थँक्यू थँक्यू थँक्यू ! मला इतके महत्व दिल्याबद्दल सद्गदित झालो आहे. दोन्ही देशांची हेरखाती मुख्यतः माझ्या मागावर असतात , आणि ट्रम्प आणि मोदी माझ्याबाबतच्या बातमीची आणि माझ्या उच्चारांची रोज आस्थेने चौकशी करतात! अमेरिकेला तर भारताबाबतचा सोर्स मी एकटाच आहे ना!

अनु राव Tue, 31/01/2017 - 09:12

गब्बु - तुझे पगडीधारी दैवत काल रडल्यासारखे बोलत होते टीव्हीवर बघितलेस का? लुंगीवाल्यानी खुप सिग्रेट्चे चटके दिले असणार.

अनु राव Tue, 31/01/2017 - 09:34

In reply to by गब्बर सिंग

तोच रे तो, स्युडोसायन्स ( हा खुपच बेनाइन शब्द वापरलाय, खरे तर क्वॅक म्हणायला पाहिजे ) मधे डॉक्टरेट केलेला.

गब्बर सिंग Tue, 31/01/2017 - 09:43

In reply to by अनु राव

काय ओ ? किमान त्यांच्या धार्मिक मानचिन्हाचा उल्लेख आदरार्थी करा. अर्थशास्त्राच्या डॉक्टरेट बद्दल वेडंवाकडं बोललात तरी ठीक आहे. अर्थशास्त्राला "The dismal science" म्हंटलंच जातं.

ममोसिं चं वय झालं. रिटायर व्हावं त्यांनी. शांतपणे.

पण आता त्यांच्यावर प्रेशर असणार की - काँग्रेस ने तुम्हाला चान्स दिला ... आता परतफेड करा.

अनु राव Tue, 31/01/2017 - 09:45

In reply to by गब्बर सिंग

पण आता त्यांच्यावर प्रेशर असणार की - काँग्रेस ने तुम्हाला चान्स दिला ... आता परतफेड करा.

१० वर्ष परतफेड तर करत होते सर्व गैरकृत्यांवर स्वताचा स्टँप मारुन.

पगडी ची आब्रु ज्याची त्यानी सांभाळायची. आधी पगडीला लाज येइल असे वागुच नये.

तिरशिंगराव Tue, 31/01/2017 - 20:12

एच्-१/बी व्हिसावाल्यांना सरसकट जास्त पगार द्यायला लावला तर किती भारतीय परत पाठवले जातील ? आणि हे आय्.टी. शिवाय सर्वच क्षेत्रांना लागू आहे का ?

बॅटमॅन Wed, 01/02/2017 - 01:27

In reply to by गवि

दहावा किंवा बारावा यांपैकी एका दिवशी. त्यांपैकी नक्की कधी हे विसरलो. दहनादिवशी करत नाहीत हे नक्की.

सामो Thu, 02/02/2017 - 21:31

In reply to by गवि

गवि संदर्भ - गरुड पुराण. कालच वर्णन वाचले. १० व्या दिवसापर्यंत किमान पिंडदान केलेच पाहीजे ज्यायोगे अंगठारुपी पुरुषाला (जीवाला) चलनवलन स्वतःच्या मर्जीनुसार करण्याशी शक्ती येते. पुढे ४७ दिवसात तो वैतरणी नदी पार करतो. किती सुंदर नाव आहे वैतरणी पण ती मास-अस्थी-मज्जा वगैरेची नदी आहे जिचे काठ हाडांचे आहेत. मीदेखील गरुड पुराण कालपासून सहजच वाचायला चालू केले आहे.पण खाली त्याबद्दलचे सनसनाटी वर्णन आहे ते वाचा -
.
http://zeenews.india.com/hindi/india/yamlok-yatra-complete-in-47-days-s…

सामो Fri, 03/02/2017 - 03:54

जेमतेम ५-६ वर्षांची होते. मॉन्टेसरीत होते. म्हणजे खरं तर ३-४ वर्षांचीच असेन. नक्कीच. घराजवळ अरण्येश्वर मंदीर होते. लहानपणी कोणाचा ना कोणाचा हात धरुन विशेषतः सोमवारी अरण्येश्वरास जाणे होई. देवळापाशीच जुना पुराणा, ऊंच, भारदस्त पिंपळवृक्ष होता. ज्यावरती पोपट, कावळे, साळुंक्यांची अविरत लगबग चाले. बाजूलाच आवळा, बोगनवेल, तगर, आंबा, जांभुळ आदि झाडाझुडपांची दाटी असे. या झाडांवरती संध्याकाळच्यासुमारास, चिमण्यांचा अविरत चिवचिवाट चाले. तसा प्रचंड चिवचिवाट नंतर कधी फारसा अनुभवला नाही. पिंपळाचा काळसर, जाड, पुरातन बुंधा, संधीप्रकाशात अधिकच जुनाट व भारदस्त वाटत असे. जणू एखादा पुराणपुरुष असावा तसा. हे अरण्येश्वराचे देऊळ फार आठवते. उत्कटतेने, गूढ रंगात आठवते. संध्याकाळी कोणा मोठ्या व्यक्तीचा हात धरुन निघालेली मी. अत्यंत बालपणी प्रत्येक अनुभव, सुगंध हा नवा असल्याने मेंदूतील पेशी अत्यंत उत्तेजित करणारा, ठसा उमटविणारा असतो. अजुनही ते देऊळ आठवले की वाटते पूर्वजन्मात गेले आहे. अतिशय गूढ वाटते. असेच गूढ मंतरलेले एकदा वाटलेले होते ते कोणाच्यातरी कानातील माणकाची कुडी पहाताना. सूर्यकिरण असे परावर्तित झालेले की कुडीतील माणिक डाळींबी रंगात इतकं सुंदर उजळून निघाले होते. मंत्रमुग्ध करणारा रंग. तसा डाळींबी रंग परत पहाण्यात आला नाही.
वाचताना असे वाटणे सहजशक्य आहे की यात काय एवढे. पण लेखिकेकरता,दोन्ही अनुभव गूढ्-उत्कट्-शिव आहेत, शब्दातीत आहेत!! लहानपणी कोणीतरी भीती घातलेली होती की त्या देवळात एक भिकारी बसतो ज्याच्या पायात किडे पडलेले आहेत आणि जर खोटे बोलले तर आपल्याही पायात किडे पडतात. त्या भीतीमुळे की काय नकळे,पण अद्यापही खोटे बोलता येत नाही.
तुम्हा कोणाला असं होतं का? काही आठवणी कालातीत बनून जातात (transcend time)