Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

'फोनमधून मराठी टाइप करायला जमत नाही', 'ऑफिसातल्या लोकांना सहज देवनागरी टायपिंग करण्यासाठी ऐसी वापरायला सांगितलं', किंवा 'ऑफिसात गमभन प्ल्गिन चालत नाही' वगैरे वाचून मला एक मूलभूत प्रश्न पडला. मला वाटायचं की देवनागरी टायपिंगला आता इतके पर्याय आहेत की कुठूनही ते करता यावं. उदा. मी विंडोज, मॅक आणि लिनक्स / युनिक्स अशा तीनही डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवरून देवनागरी टाइप करू शकतो. त्यासाठी ऐसीच्या प्लगिनची मला गरज भासत नाही (अर्थात, त्यानं सोय होते आणि इतक्या वर्षांच्या वापरामुळे त्याची सवय झालेली आहे हा मुद्दा मान्यच आहे). त्याच प्रमाणे टॅबलेट किंवा फोनबाबत सांगायचं तर मी विंडोज, अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस अशा तीनही प्रणालींच्या यंत्रांवर देवनागरी टाइप करून पाहिलेलं आहे. आता तर अँड्रॉइडवर हँडरायटिंग इनपुटमध्येही मराठीचा पर्याय गूगल देतं. देवनागरी टायपिंगला इतके पर्याय असूनही मग लोकांना ज्या अडचणी येत आहेत त्या कशामुळे?

अनु राव Fri, 03/02/2017 - 14:55

चिंज - एक अत्यंत सिरीअस प्रश्न आहे.

मला गेले कीत्येक महिने ऐसीवर रोमन लिपीत टाइप करता येत नाहीये.
मधे ऐसी ला प्रॉब्लेम झाला होता, तेंव्हा रोमन टायपिंग होत होते.

काय करावे? ह्या प्रॉब्लेम मुळे मला धेडगुजरी* लिहावे लागते.

* धेड जातीची मनापासुन क्षमा मागुन.

चिंतातुर जंतू Fri, 03/02/2017 - 15:14

In reply to by अनु राव

>> मला गेले कीत्येक महिने ऐसीवर रोमन लिपीत टाइप करता येत नाहीये.

कोणता प्लॅटफॉर्म? माझ्या निरिक्षणानुसार रोमन / देवनागरी टॉगल विंडोज डेस्कटॉपवर चालत असे, पण इतर डेस्कटॉपवर नाही. टॅबलेट किंवा फोनवरून अर्थात करता यावं, कारण तिथे सरळ नेटिव्ह कीबोर्ड वापरता येतो.

चिंतातुर जंतू Fri, 03/02/2017 - 18:29

In reply to by अनु राव

>> अचानक त्याच मशिनवर रोमन लिपी चालणे बंद झाले.

जुन्या आणि नव्या गमभन प्लगिनमध्ये फरक आहे. जुन्या पद्धतीत लिपीबदलासाठी Ctrl+\ वापरावं लागे. आता बहुधा F9 वापरावी लागेल.

अनु राव Fri, 03/02/2017 - 18:41

In reply to by चिंतातुर जंतू

Yes, F9 is working as toggle.

धन्स चिंज. कीती महिने लोकांना विचारत होते, कोणी सांगितले नाही. अगदी मनोबानी सुद्धा सांगितले नाही.

चिंतातुर जंतू Fri, 03/02/2017 - 18:45

In reply to by अनु राव

>> धन्स चिंज. कीती महिने लोकांना विचारत होते, कोणी सांगितले नाही. अगदी मनोबानी सुद्धा सांगितले नाही.

कोरडे धन्यवाद चालणार नाहीत. 'रँटिंग सोडल्यास बामणांचा जगाला काही उपयोग नाही' हे रोज १० वेळा घोका संध्येसारखं.

आदूबाळ Fri, 03/02/2017 - 16:02

In reply to by अनु राव

* धेड जातीची मनापासुन क्षमा मागुन.

गुजर जातीची मनापासून (किंवा कशापासूनही) क्षमा न मागण्याचं काही विशेष कारण?

- डा'वी बाजू
(पारंपारिक बेवडेशाहीचा नि:पात...)

अनु राव Fri, 03/02/2017 - 16:53

In reply to by आदूबाळ

मला "धेडगुजरी" शब्दातला "गुजरी" शब्द गुजर जातीवरुन असावा असे वाटत होते पण खात्री नव्हती.

आता गुजर जातीची पण मनापासुन क्षमा मागते.

अजुन कुठल्या जातीची क्षमा मागणे अपेक्षीत असले तर आत्ताच सांगा, म्हणजे राहुन जायला नको. नाहीतर कोणीतरी ब्राह्मणी कावा आहे म्हणुन ऐसीवर लेख पाडेल

'न'वी बाजू Fri, 03/02/2017 - 18:13

In reply to by अनु राव

नाहीतर कोणीतरी ब्राह्मणी कावा आहे म्हणुन ऐसीवर लेख पाडेल

ते तसेपण पाडेलच. तेव्हा राहू द्या.

"It is a good rule in life never to apologize. The right sort of people do not want apologies, and the wrong sort take a mean advantage of them." - P.G. Wodehouse.

बॅटमॅन Fri, 03/02/2017 - 19:01

In reply to by आदूबाळ

तेच बरोबर आहे आबा. संस्कृतात -इक वाली रूपे करताना प्रथम स्वरच फक्त मॉडिफाय होतो तोच रूल इथेही फॉलो केलेला आहे.

धनंजय Tue, 07/02/2017 - 03:35

In reply to by बॅटमॅन

"पारंपरिक" शब्द अपवादात्मक नव्हे,पण गंमत म्हणून ... पाणिनीय सूत्र ७.३.१९ ते ७.३.३१ पर्यंत बरेच अपवाद आणि पोट-अपवाद (म्हणजे मुळातल्या नियमासारखी वृत्तीचे प्रयोग) आहेत.
पैकी ७.३.२० सूत्रात "अनुशतिकादि"गण सांगितला आहे, म्हणजे एक यादीच...
(ऐहलौकिक, सार्वलौकिक, वगैरे अपवाद कदाचित इथे-तिथे वाचनात आलेले असतील).

पाणिनीने त्याच्या काळात प्रतिष्ठित लोक जसे काही बोलत असत ते सर्व "साधु"प्रयोग वर्णिलेले आहेत. म्हणजे असे दिसते, की समासातील पूर्वपद आणि उत्तरपद दोहोंमधले स्वर बदलण्याची प्रवृत्ती त्याला ऐकू आली असली पाहिजे, आणि त्या सगळ्या अव्यवस्थित प्रयोगांची त्याने गणना करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जमेल तितके "नियमित-अपवाद" पण त्या अपवादांचे पोट-अपवाद त्याला द्यावे लागले.

शिवाय बरेच लोक "वैश्वधेनवम्" म्हणत, पण तरी काही लोक "वैश्वधैनवम्" म्हणीत, त्या प्रकारच्या वैभाषिक प्रयोगाची नोंद त्याला करावी लागली...

माझ्या मते "ऐहलौकिक" वगैरे बर्‍याचशा तात्कालिक प्रयोगांची नोंदणी जशी पाणिनीला करावी लागली, तशी च सोय मराठी तज्ज्ञांना "पारंपारिक" या शब्दप्रयोगाची करावी लागेल.

नितिन थत्ते Fri, 03/02/2017 - 17:07

It is not great problem.

I was using Baraha to type in devnagari. But that has some conflict with SAP's functions (F9 key) so I can't keep Baraha running constantly.

At home GaMaBhaNa works as such.

अजो१२३ Fri, 03/02/2017 - 23:35

ब्राह्मणी व्यवस्था नक्कीच फक्त ब्राह्मणांच्या स्वार्थासाठी असेल. मग त्यांची ५००० वर्षापासून साठवलेली संपत्ती कुठे आहे? ती गेली तर कुठे गेली? कधी गेली? कुणाकडे गेली?
गेल्या १०-२० वर्षांत ब्राह्मणांच्या एका पिढीला वैभव प्राप्त झालं आहे त्याचं तिला फार अप्रूप आहे (पहा - घासकडवींची प्रगतीमालेची सिरिज). १.७% लोकांकडे उरलेल्या ९८.३% लोकांची संपत्ती असूनही त्यांना अशी दशांशात झालेली प्रगती एवढी लाभदायक का वाटली?

बॅटमॅन Mon, 06/02/2017 - 15:10

In reply to by अजो१२३

ब्राह्मणी व्यवस्था नक्कीच फक्त ब्राह्मणांच्या स्वार्थासाठी असेल. मग त्यांची ५००० वर्षापासून साठवलेली संपत्ती कुठे आहे? ती गेली तर कुठे गेली? कधी गेली? कुणाकडे गेली?

अडचणीचे प्रश्न विचारून फुर्रोगाम्यांना अडचणीत आणणार्‍या अजोचा निषेध.

मिलिन्द Tue, 07/02/2017 - 03:53

In reply to by बॅटमॅन

मेहनत करणाऱ्यांवरचे लुटारू दोन प्रकारचे असतात : गट्स नसलेले आणि गट्स असलेले.
गट्स नसलेले , तलवार उचलू न शकणारे (अर्थात ब्राम्हण) धर्मसंस्था निर्माण करतात .
गट्स असलेले (क्षत्रिय) राज्यसंस्था निर्माण करतात .
यांचे आतून संगनमत असते , आणि राज्यसंस्थेचे समर्थन करणारे आधारग्रंथ ब्राम्हण लिहितात.
प्रत्यक्ष लूटमार (कर वसुली इत्यादी) करणाऱ्यांपेक्षा घरी बसून लेखनकामाठी करणाऱ्यांना लुटीचा खूपच कमी हिस्सा मिळणार हे उघड आहे.

प्रत्यक्ष लूटमार (कर वसुली इत्यादी) करणाऱ्यांपेक्षा घरी बसून लेखनकामाठी करणाऱ्यांना लुटीचा खूपच कमी हिस्सा मिळणार हे उघड आहे.

पुरोगामी हा गट ह्याच समस्येच्या निवारणासाठी निर्माण झाला. त्यांना मोठा हिस्सा पण हवा, विचारवंत असल्याची प्रतिष्ठा पण हवी, आणि प्रतिस्पर्ध्याकडून प्रत्याक्रमण पण नको.

राही Mon, 06/02/2017 - 15:47

In reply to by अजो१२३

लक्ष्मी मुळात चंचल. ती अशी पाच पाच हजार वर्षे मूठभर लोकांकडे टिकून राहील म्हणता?
अहो,साम्राज्ये गेली, अगदी रोम पासून ते मगध,गुप्त,चोल, विजयनगर,मुघल,मराठे, पेशवे, ब्रिटिश अगदी सर्वं यस्य वशात् अगात स्मृतिपथं, कालाय तस्मै नमः
राज्ये करणारे,सत्ता गाजवणारे टिकतात असे वाटते की काय?

बॅटमॅन Mon, 06/02/2017 - 15:56

In reply to by राही

मग ५००० वर्षांची ऑप्रेसिव्ह ब्राह्मणी व्यवस्था कशी काय टिकून राहिली? इतकी वर्षे तुंबड्या भरल्या, कुठेतरी युरेशियात नेऊन संपत्ती दडवलीच असेल. नाही म्हणताच कसे?

राही Mon, 06/02/2017 - 18:43

In reply to by बॅटमॅन

क्षत्रियांनी राज्ये केली म्हटले तरी आज मौर्यांचे वंशज मोरे, कलचुरींचे वंशज चुरी, चालुक्यांचे चाळकेआणि/साळके,शेलार,जाधव,गुप्त, सेन,पाल आज काय करत आहेत?
लोकसंख्या वाढली तसे जमिनीचे वाटप होऊन विभाजन झाले. एकेकाळी शेकडो एकर जमिनी असणारे बिघ्या दोन बिघ्यांचे मालक झाले. वरसले वाटली गेली.
कुळ कायद्यात अनेकांच्या जमिनी गेल्या हे अगदी जवळून पाहिले आहे. महाराष्ट्रात एके काळी देशस्थांचा वरचष्मा होता,नंतर कोंकणस्थ आले.(सरोजिनी वैद्य यांच्या आई सरस्वतीबाई अकलुजकर यांची आत्मकथा सरोजिनीबाईंनीच शब्दबद्ध केली आहे. त्यात एकेकाळी मोठमोठ्या घराण्यांकडे किती संपत्ती होती आणि तिला कशा वाटा फुटल्या याचे रंजक वर्णन आहे.)
पाच हजार वर्षांपूर्वी आणि नंतर जर दगडी हत्यारे,कवड्या,मणी,घोडे,गायी-बैल,हस्तिदंत,चुना-मातीची अथवा दगडी घरे,गड, गढ्या,महाल,रथ,गाडे,गाड्या, बग्ग्या, धामणी, छकडे, सारवट गाड्या, पालख्या,पगड्या, मंदिल मोती, रत्ने,माणके, धान्य,पशु,नोकर-चाकर यांत धन मोजले जात होते असेल तर आज ते सर्व नष्ट झाले आहे. राजवटी बदलल्या, चलने बदलली.(डी मॉनेटायझेशन प्रमाणे.)आधीच्या राजवटीतले राव नंतरच्या राजवटीत रंक झाले. जमिनीत पुरून ठेवलेले हंडे आणि त्यांतल्या मोहरा मातीमोल झाल्या. ज्यांना सापडल्या त्यांनी त्यातले धातु गाळून विकून खाल्ले. हिंदुस्थानात सोने, चांदी आदि मौल्यवान धातूंचा साठा किती होता आणि आता किती आहे याचा शोध घ्यायला हवा. त्या काळी नाशिवंत वस्तू हे धन होते, आणि वस्तुविनिमयाची व्यवस्था होती.
गेल्या हजार वर्षांत उपखंडात सार्वत्रिक गरीबी होती आणि ब्राह्मण-क्षत्रिय त्यातल्या त्यात सुस्थितीत होते असे मला वाटते.
विषमता तेव्हाही होती, आताही आहे.

बॅटमॅन Mon, 06/02/2017 - 19:09

In reply to by राही

छे छे, ब्राह्मणांनी संपत्ती कमावलीच. नाही म्हणताच कसे? ऑप्रेसिव्ह ब्राह्मणी व्यवस्था आहे ना ही शेवटी!

राही Mon, 06/02/2017 - 19:30

In reply to by बॅटमॅन

उपरोधाची दिशा समजली.
तरीसुद्धा, गेल्या कित्येक शतकांत जगात सर्वत्र धर्मसत्ता ही सामान्यजनांसाठी जास्त ऑप्रेसिव ठरत आली आहे. कारण रोजचे जगणेसुद्धा धर्मसत्तेच्या अंमलाखाली गेले होते, जसे आज मुस्लिम जगतात चालू आहे; त्यांना जरी ते आज ऑप्रेसिव वाटत नसले तरी.

अनु राव Tue, 07/02/2017 - 10:36

In reply to by बॅटमॅन

ब्राह्मणांनी संपत्ती कमावलीच

बॅटोबा, वाक्य चुकले आहे तुझे. ते असे पाहिजे.

ब्राह्मणांनी संपत्ती कमावलीच ( ती सुद्धा सर्व समाजाला लुटुन लुबाडुन हे वेगळे लिहीण्याची गरजच नाही )

राजेश घासकडवी Mon, 06/02/2017 - 19:31

In reply to by राही

क्षत्रियांनी राज्ये केली म्हटले तरी आज मौर्यांचे वंशज

कोणाकडे कधी किती श्रीमंती होती, आणि आत्ता त्यातली किती दिसते आहे, ही चर्चा थोडी दिशाभूल करणारी आहे.

मला वाटतं ब्राह्मणांनी पितृसत्ताक व्यवस्था निर्माण केली आणि सांभाळली याचा 'ब्राह्मण सर्वसत्ताधीश होते' असा गैरअर्थ काढला जातो आहे. कुठल्याही राज्यव्यवस्थेत पैसा, सैन्य, करआकारणी या गोष्टी राजसत्तेच्या अखत्यारीत येतात. मात्र समाजात लोकांनी एकमेकांशी कसं वागावं यात राजसत्ता शक्यतो ढवळाढवळ करत नाही. या समाजजीवनाच्या नियमांबद्दल अधिकार असणं यातून एक मर्यादित प्रमाणातच पैसा किंवा शक्ती मिळते. त्यामुळे 'व्यापार आणि सैन्य तर क्षत्रिय-वैश्यांच्या हाती होतं, मग ब्राह्मणांना नावं का ठेवता? त्यांच्या हाती काहीच शक्ती नव्हती.' हा युक्तिवाद या परिप्रेक्ष्यात पाहायला हवा. समाजजीवनात कोणाला वाळीत टाकायचं, कोणाशी व्यवहार ठेवायचे, कोणाला अस्पृश्य ठरवायचं हे आणि हेच अधिकार ब्राह्मणांना होते. त्यामुळे त्या अधिकारांच्या जोरावर थोडीफार तुलनात्मक समृद्धी ब्राह्मणांना मिळाली. मात्र त्यांच्याकडे पैसा किंवा राज्यसत्ता नाही म्हणून काहीच शक्ती नव्हती हा निष्कर्ष निरर्थक आहे. त्यांच्या ताब्यात धर्मसत्ता होती. राजसत्ता आणि धर्मसत्तेची प्रभाववर्तुळं (स्फिअर्स ऑफ इन्फ्लुअन्स) वेगवेगळी होती. समाजात चालत आलेली वर्णाधिष्ठित व्यवस्था ही ब्राह्मणांच्या भल्यासाठीच होती, आणि ती त्यांनीच चालवलेली होती.

अनु राव Tue, 07/02/2017 - 10:34

In reply to by राजेश घासकडवी

ब्राह्मणांनी पितृसत्ताक व्यवस्था निर्माण केली आणि सांभाळली

ह्या पृथ्वीवर जिथे ब्राह्मण नसलेले जमिनीचे तुकडे आहेत, तिथे पण पितृसत्ताक पद्धतच कशी निर्माण झाली बाई? गुर्जी एकदा माझा शिकवणी घ्याच तुम्ही.

अनुप ढेरे Tue, 07/02/2017 - 11:04

In reply to by अनु राव

नागालँडमध्ये वनवासीलोकांमध्ये सद्ध्या जे चाललय ते देखील पितृसत्ताक म्हणता येईल. स्त्रीयांना ३३% आरक्षण दिल्याबद्दल आक्ख्या राज्यात दंगली चालू आहेत.

'न'वी बाजू Wed, 08/02/2017 - 19:43

In reply to by अजो१२३

प्राग्ज्योतिषपुर बोले तो गुवाहाटीचे एक्स्टेन्शन नव्हे काय? यानी कि आसामात? मग मध्येच हे शिंचे नागाल्याण्ड कोठून उपटले?

नितिन थत्ते Tue, 07/02/2017 - 11:21

In reply to by अनु राव

Qazi, Maulavi, Bishap, Father, Padre are all Brahmins in respective places.

---------------------------------
but they as well as hindu brahmins did not create the Patriarchy.
They did not decide Force should be equal to the multiplication of mass and acceleration. They only wrote the formula in the books.

अनु राव Tue, 07/02/2017 - 11:24

In reply to by नितिन थत्ते

ओहो. म्हणजे कुठे ब्राह्मण असे म्हणले असेल तर काझी असे समजुन घ्यायचे.

आबा - अशी एक डिक्शनरी तयार करा तुम्ही.

'न'वी बाजू Tue, 07/02/2017 - 18:42

In reply to by नितिन थत्ते

(बाकी सर्व ठीक, पण... 'Bishap'???)

----------

They did not decide Force should be equal to the multiplication of mass and acceleration. They only wrote the formula in the books.

किञ्चित फरक आहे.

न्यूटनसाहेबाने निरीक्षणाअंती 'बल हे वस्तुमान आणि त्वरणाच्या गुणाकाराइतके असते' हे सूत्र मांडले असेल खरे, परंतु त्याचे एन्फोर्समेंट केले नसावे. म्हणजे, 'बल हे वस्तुमान आणि त्वरणाच्या गुणाकाराइतके नसते असे म्हणतोस काय? थांब, आजपासून तू आणि तुझे आख्खे खानदान वाळीत आहे असा फतवाच काढतो' असा प्रकार गेला बाजार न्यूटनसाहेबाने तरी (आणि गेला बाजार गतिविषयक नियमांविषयी तरी) बहुधा केला नसावा. ('बहुधा' आणि 'नसावा' असे म्हणतोय, कारण आयुष्यात कशाच्याही अभ्यासाच्या अभावे ही आमची केवळ एक अटकळच आहे. हं, आता न्यूटनसाहेबाच्या नियमांचा डोलारा एकदा प्रस्थापित झाल्यावर पुढेमागे त्याला च्यालेंज करू पाहणार्‍या एखाद्या होतकरूच्या नशिबी समकालीन प्रस्थापितांकडून असे काही आले असणे अगदीच अशक्य नसावे, परंतु पुन्हा एकदा, आयुष्यात कशाच्याही अभ्यासाच्या अभावे यावर भाष्य करणे योग्य नव्हे. एखादा बर्‍यापैकी बाय डीफॉल्ट सर्वज्ञ गाठून जिज्ञासेची (असल्यास) पूर्ती करून घ्यावी.)

राजेश घासकडवी Tue, 07/02/2017 - 19:47

In reply to by नितिन थत्ते

ब्राह्मण हा शब्द बाजूला ठेवून आपण धर्मगुरू हा शब्द वापरू. धर्मगुरूंनी केवळ त्याकाळी असलेल्या प्रथांच्या नोंदी केल्या, त्या बनवण्यात किंवा घडवण्यात काही हातभार लावला नाही ही फारच भोळी कल्पना आहे. 'देवाने सृष्टी बनवली, मानवजात निर्माण केली. त्या देवाने मला प्रत्यक्ष भेटून माणसाने या समाजात वागण्याचे नियम काय आहेत हे सांगितलं.' असं अनेक प्रेषित म्हणतात. बायबल, कुराण तर या असल्या आदेशांनी भरलेलं आहे. ते आदेश मोडणारांना काय शिक्षा द्यावी हेही लिहून ठेवलेलं आहे. परपुरुषाबरोबर झोपणाऱ्या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा आहे. ती अमलात आणली जात होती, काही ठिकाणी अजूनही आणली जाते. धर्मगुरूंनी सांगितलं आहे म्हणून राजा या शिक्षा द्यायला तयार असायचा, जवळपास बांधील असायचा. 'समाजव्यवहाराची नदी वाहाते, ती ही अशी अशी वाहाते' एवढं सांगूनच ते थांबले नाहीत तर तो प्रवाह कुठे जावा, 'चुकीच्या' दिशेला जात असेल तर काय करावं, त्यासाठी लोकांना वाळीत टाकणं, शिक्षा देणं हे भरपूर केलं.

अजो१२३ Wed, 08/02/2017 - 20:26

In reply to by राजेश घासकडवी

लगेच ब्राह्मण चा धर्मगुरु नि मग बायबल नि कुराण नि मग वाळी...मग पुन्हा ब्राह्मण अभिप्रेत...

परपुरुषाबरोबर झोपणाऱ्या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा आहे. ती अमलात आणली जात होती, काही ठिकाणी अजूनही आणली जाते.

चला, असे समजू कि या धर्मगुरुंनी कोणीही कोणासोबतही कितीदाही कसेही केव्हाही झोपणार्‍या समाजात वरचा नियम मुद्दाम आणला. मग ...
१. का आणला? मंजे परपुरुषासोबत झोपू नये असा का आणला, स्वपुरुषासोबत झोपू नये असा का नाही आणला? मंजे यात त्यांचा स्वार्थ काय?
२. लोकांनी तो का ऐकला? मंजे लोकांना अक्कल नव्हती का? ज्या काळात लोकांना इतकी कमी अक्कल होती त्याकाळात एकट्या धर्मगुरुमधे कोणते म्यूटेशन झाले होते?
३. परस्त्रीसोबत झोपायचे नको म्हणणार्‍या सात्विक पुरुषाच्या मागे क्रूर बलात्कारी स्त्रीया लागल्या होत्या म्हणून हा कायदा लोकमान्य झाला का?
४. मारण्यामधे कमी अधिक वेदनादायी मारण्यांच्या प्रकारांचे यांचे अध्ययन होते का?
५. परपुरुषासोबत आरामात झोपणार्‍या पुरोगामी म्हणा वा नैसर्गिक समाजात मुळात एकाच पुरुषासोबत झोपणार्‍या स्त्रीयांवाले लोकांची (नंतर जे धर्मगुरु म्हणून ओळखले जाऊ लागले) मूळात ही असली विचित्र आणि अनैसर्गिक फॅशन चालूच कशी आणि का झाली?
६. आता हा कायदा काटेकोरपणे पाळला गेला आहे असे मानून (आणि बायका किती तशा आहेत याचा एक टक्का मानून) एक डेमोग्राफिक अ‍ॅनॉमली निर्माण होते. अशा मरणार्‍या बायकांमुळे पुरुषांना आपल्यापेक्षा लहान स्त्रीयांसोबत लग्न करावे लागते. आणि या हत्या चालूच राहिल्याने लग्न करणार्‍या स्त्रीया आणि पुरुष यांच्या वयातला फरक ही प्रथा निर्माण झालेल्या वर्षापासून शतकानुशतके वाढतच जातो. शेवटी इतका कि लेकरे बनणार नाहीत. मग मुनुष्यजात संपते.
७. लेटेस्ट कोण्या धर्मगुरुने कोण्या अशा स्त्रीला जाहिर रित्या ठेचायची शिक्षा दिली आहे?
८. लग्न न झालेल्या बाईने कुमारिका असताना एका माणसाशी संभोग केला आणि नंतर दुसर्‍याशी लग्न केले तर नियम रिट्रोस्पेक्टीवली लागू व्हायचा का? का व्हायचा? का नाही व्हायचा? कायतरी लॉजिक देत असणार ना धर्मगुरु.
९. धर्मगुरुंनी उठून देवाने मला फेस टू फेस असा नियम बनव असे खोटे मुद्दाम पिकवले तर ज्या स्त्रीयांना परपुरुषांसोबत झोपायचे होते त्यांनी उठून 'देवाने मला परपुरुषासोबत झोप' असे खोटे मुद्दाम का पिकवले नसावे?
१०. यातल्या ज्या परपुरुषांची "गैरसोय" झाली त्यांनी असा फतवा काढणार्‍या त्या आदिम नैसर्गिक समाजातल्या धर्मगुरुच्या टाळक्यात काही का नाही हाणले?
११. धर्मगुरु हे पुरुष असतील तर त्यांची स्वतःची गैरसोय होइल असा कायदा त्यांनी का बनवला? कि असं होतं का कि परपुरुषांच्या सोबत झोपणार्‍या स्त्रीया धर्मगुरुंच्या सोबत देखिल झोपत आणि मग नियमाप्रमाणे मारल्या जात आणि यात धर्मगुरु निर्दोष मानले जात?
१२. आदिम जमान्यातल्या बायका (कोणत्याही काळात जेव्हा असले नियम बनले ते धर्म नश्ट झाले असले तरी संदर्भ लागू होतो.) कशामुळे असले अनैसर्गिक फतवे , ते ही जीवाच्या विरुद्ध मानू लागल्या? त्यांनी धर्मगुरुला चेचण्याचा प्रोजेक्ट का नसेल केला?
---------------
बाय द वे, या धर्म, संस्कृती उभारणीच्या काळात मानव समाजाला अक्कल येत होती का जात होती?

अजो१२३ Wed, 08/02/2017 - 19:13

In reply to by राही

पाच हजार वर्षांपूर्वी आणि नंतर जर दगडी हत्यारे,कवड्या,मणी,घोडे,गायी-बैल,हस्तिदंत,चुना-मातीची अथवा दगडी घरे,गड, गढ्या,महाल,रथ,गाडे,गाड्या, बग्ग्या, धामणी, छकडे, सारवट गाड्या, पालख्या,पगड्या, मंदिल मोती, रत्ने,माणके, धान्य,पशु,नोकर-चाकर यांत धन मोजले जात होते असेल तर आज ते सर्व नष्ट झाले आहे.

पाच हजार वर्षांपूर्वीचे दगडी हत्यारे,कवड्या,मणी,घोडे,गायी-बैल,हस्तिदंत,चुना-मातीची अथवा दगडी घरे,गड, गढ्या,महाल,रथ,गाडे,गाड्या, बग्ग्या, धामणी, छकडे, सारवट गाड्या, पालख्या,पगड्या, मंदिल मोती, रत्ने,माणके, धान्य,पशु,नोकर-चाकर, इ इ चार हजार वर्षांपूर्वीच नष्ट झाले असणार. मग ब्राह्मण ५००० वर्षांपूर्वी श्रीमंत आणि ४००० वर्षांपूर्वीनंतरपासून (from after before) गरीब असे देखिल म्हणता येईलच ना?

राजवटी बदलल्या, चलने बदलली.(डी मॉनेटायझेशन प्रमाणे.)आधीच्या राजवटीतले राव नंतरच्या राजवटीत रंक झाले.

इंग्रज गेले ही एकच घटना राजवट बदलली या सदरात मोडते. त्या आधी ब्राह्मण श्रीमंतच होते असे म्हणायचे आहे ना? एक तर चलन बदलल्याने कोणीच्च गरीब होत नाही, आणि भारताचे चलन आपण ज्या काळाबद्दल बोलत आहोत तेव्हापासून बदललेले नाही.

त्या काळी नाशिवंत वस्तू हे धन होते, आणि वस्तुविनिमयाची व्यवस्था होती.

आज नाशवंत वस्तू धन नाहीत?

गेल्या हजार वर्षांत उपखंडात सार्वत्रिक गरीबी होती आणि ब्राह्मण-क्षत्रिय त्यातल्या त्यात सुस्थितीत होते असे मला वाटते.

अन्य खंडाच्या तुलनेने?

अनु राव Mon, 06/02/2017 - 16:15

In reply to by राही

राहीतै, फार जुनी नाही गोष्ट करत, इथे लोकांच्या मते अगदी अगदी आत्ता आत्ता पर्यंत ब्राम्हणच सत्तेत राहुन बाकी समाजाला लुटत होते. इतक्यात कशी लाखो कोटींची संप्पत्ती घालवतील हो लोक आणि ते सुद्धा ब्राह्मण.
कुठे सांगा ती संपत्ती, आमच्या वाडवडलांना जाब तरी विचारु आम्ही की " का हो इतकी संपत्ती असताना, स्वता गरीबीत राहिलात आणि आम्हाला पण तसेच ठेवलेत?"

चिंतातुर जंतू Mon, 06/02/2017 - 16:54

In reply to by अनु राव

>> फार जुनी नाही गोष्ट करत, इथे लोकांच्या मते अगदी अगदी आत्ता आत्ता पर्यंत ब्राम्हणच सत्तेत राहुन बाकी समाजाला लुटत होते. इतक्यात कशी लाखो कोटींची संप्पत्ती घालवतील हो लोक आणि ते सुद्धा ब्राह्मण.
कुठे सांगा ती संपत्ती, आमच्या वाडवडलांना जाब तरी विचारु आम्ही की " का हो इतकी संपत्ती असताना, स्वता गरीबीत राहिलात आणि आम्हाला पण तसेच ठेवलेत?"

अनुतै, सारखं इतरांना कामाला लावायचं, स्वतः पोकळ रँटिंग फक्त करत बसायचं आणि आपल्या (बामणी!) कुचकामी निरुद्योगीपणाचं जाहीर प्रदर्शन करायचं सोडा बघू. जरा कंबर कसून काही तरी समाजोपयोगी काम करताना अनुतै आम्हाला दिसू देत. अन्यथा आम्ही तुमच्या पोकळ पृच्छांसाठी कुणालाच उत्तरदायी समजणार नाही आणि वर बामणांची नालस्ती करत बसू. हे घोर पाप तुमच्या माथी नको असलं तर एवढं एक कराच -

भारतात अल्पभूधारक का होईना, पण शेतकरी असणं आणि स्वतःची काही एक शेतजमीन असणं पूर्वापार सामाजिक उतरंडीत महत्त्वाचं मानलं जाई. बहुजन / कनिष्ठवर्णीय समाज इतरांच्या जमिनी कूळ म्हणून कसत असे, तर उच्चवर्णीयांना राजाकडून जमिनी इनाम वगैरे मिळत असत. जरा जाऊन शोधून काढा बरं की ब्रिटिशपूर्व काळात ब्राह्मणांच्यात किती लोकांकडे अजिबात जमिनी नव्हत्या आणि दलितांच्यात हे प्रमाण किती होतं. हवं तर इथे लोकांना विचारा की किती लोकांच्या जमिनी कूळ कायद्यात कमी झाल्या.

बॅटमॅन Mon, 06/02/2017 - 19:13

In reply to by चिंतातुर जंतू

या मंगळावरील समाजात फक्त श्रीमंत ब्राह्मण आणि अतिगरीब दलित वगळता कोणीच नसल्याने असे झाले असावे.

चिंतातुर जंतू Mon, 06/02/2017 - 19:50

In reply to by बॅटमॅन

>> या मंगळावरील समाजात फक्त श्रीमंत ब्राह्मण आणि अतिगरीब दलित वगळता कोणीच नसल्याने असे झाले असावे.

गावगाड्यात बामणालाही मान असे अन् महारालाही; मात्र. त्यांतला फरक तुम्हाला माहीत नसेल, तर आपल्या इतिहासाविषयीच्या तुमच्या आकलनाविषयीच मूलभूत शंका उपस्थित होतात. असो. पोकळ रँटिंग चालू राहू द्या.

बॅटमॅन Wed, 08/02/2017 - 20:50

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या कमेंटचे आकलन करून घेऊन जे काही भरभरून रँटल्या गेले आहे ते पाहता तुमच्या वैचारिक अवस्थेची आणि आकलनक्षमतेची फार काळजी वाटते.

चिंतातुर जंतू Thu, 09/02/2017 - 08:59

In reply to by बॅटमॅन

>> तुमच्या वैचारिक अवस्थेची आणि आकलनक्षमतेची फार काळजी वाटते.

रडिवलंस भावा. आजपासून माझी तलवार म्यान बघ तुझ्यासाठी.

अजो१२३ Wed, 08/02/2017 - 19:18

In reply to by चिंतातुर जंतू

जरा जाऊन शोधून काढा बरं की ब्रिटिशपूर्व काळात ब्राह्मणांच्यात किती लोकांकडे अजिबात जमिनी नव्हत्या आणि दलितांच्यात हे प्रमाण किती होतं

वर संपत्तीत काय काय येतं यात जमिनीचा उल्लेख झालेला नाही. तिथे वाक्यरचनेत बसत नाही.

Nile Mon, 06/02/2017 - 20:38

In reply to by अनु राव

इतके दिवस झोपा काढल्या की काय? अनेक ब्राह्मणांच्या सावकारीच्या पेढ्या पाहिल्यात. त्यातली दफ्तरं तर कित्येकांकडे अजून आहेत. जंत्रीमध्ये लिहलेले हिशेब पाहीलेले आहेत. वाडवाडे वगैरेंची अजूनही येणारी महिना पाच रु भाड्यांची तक्रारही ऐकलेली आहे. इतकंच काय, "आमच्या आजोबांनी/पणजोबांनी सगळं घालवलं" असे उद्गारही अनेकदा ऐकलेत. त्यामुळे, ह्यातलं काहीच तुमच्या कानावर आलेलं नाही हे पाहून तुम्ही एकतर झोपाच काढल्या असतील किंवा आजही ज्याप्रमाणे आपल्याच काल्पनिक विश्वात तुम्ही वावरता तशाच आजवर वावरल्या असाल अशी शंका येते. असो.

अजो१२३ Wed, 08/02/2017 - 19:29

In reply to by Nile

अनेक ब्राह्मणांच्या सावकारीच्या पेढ्या पाहिल्यात.

त्यात उधार घेणारे सगळे ब्राह्मणच होते ना?

"आमच्या आजोबांनी/पणजोबांनी सगळं घालवलं" असे उद्गारही अनेकदा ऐकलेत.

करेस्पाँडिंगली "आमच्या आजोबांनी/पणजोबांनी फुक्कट घब्बाड्ड मिळवलं" असे उद्गारही अनेकदा ऐकलेत का? जागे असाल ना तुम्ही सतत?
------------------------------------------------
आजोबांनी संपत्ती घालवली ही तक्रार ब्राह्मणांत, मराठ्यांत कमी आहे.

Nile Wed, 08/02/2017 - 20:22

In reply to by अजो१२३

जाब तरी विचारु आम्ही की

वरती तुमच्या अनुराव यांनी हे कधीच कसं माहित नाही असं विचारलंय त्याला दिलेलं उत्तर आहे. आज काय जेवलात ला काल मटनवडे केले होते असं तुमच्यासारखं उत्तर द्यायची सवय आम्हाला नाही.

त्यात उधार घेणारे सगळे ब्राह्मणच होते ना?

नाही.

सिद्धि Wed, 08/02/2017 - 05:21

In reply to by अजो१२३

संपत्ती कुठे आहे? ती गेली तर कुठे गेली? कधी गेली? कुणाकडे गेली?

जुगार खेळून, आधी धंद्यात पडून आणि मग सपशेल पडून, नाना प्रकारचे छंद फंद करून आणि फायनली आपापसांत वाटणीवरून कोर्ट- कचेऱ्या करून घालवली.

स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढ्यांनी जमीनदारी आणि सावकारी करून जमिनी , वाडे , दागदागिने इत्यादीमध्ये भरपूर पैसे गुंतवून ठेवले होते.
पण मधल्या १/२ पिढ्यांनी वर लिहिलेले उद्योग केले. दरम्यान स्वातंत्र्य मिळालं - कुळकायद्यात जमिनी गेल्या. पश्चिम महाराष्ट्रातील समाजाला गांधीहत्येचे परिणाम जास्ती भोगावे लागले

परिणामी - नंतरच्या पिढीला (जे आत्ता पंचाहत्तरीत वगैरे असतील ) खूप कष्टात दिवस काढावे लागले. मग पुढच्या पिढ्या आपापल्या कर्तृत्वानुसार कनिष्ठ ते उच्चं मध्यमवर्ग असा प्रवास करत्या झाल्या.

घाटावरचे भट Mon, 06/02/2017 - 14:55

आता english type करायला neat जमतं आहे! Yay!

अनुतैंना आणि चिंजंतूंना खूप खूप thanks...

प्रति,
व्यवस्थापक/मालक/चालक,

"लिपी
देवनागरी
English

लिपीबदलासाठी Ctrl+\ वापरा. देवनागरी लिपीत टंकनसहाय्य "

शिंचं हे तेवढं बदला की मग आता...

अनु राव Mon, 06/02/2017 - 17:27

ऐसीची श्रेणीव्यवस्था कधी सुरु होणार आहे?

प्रतिसाद टाकल्या टाकल्या २०-३० सेकंदात "निरर्थक" श्रेणी मिळण्याचा आनंदच काही और होता. फार चुकल्याचुकल्यासारखे होते आहे.

ऋ ची तर स्वाक्षरी सुद्धा श्रेणीसुविधेवर अवलंबुन होती.

अबापट Tue, 07/02/2017 - 11:45

In reply to by अजो१२३

अजो , काय हो हे एकदम ? ( मुळशी ला काहीतरी विशेष बघितले काय ? ) अहो तुम्ही म्हणताय या विषया बद्दल इथे फार रुची कोणाला नसावी . भेटू त्यापेक्षा प्रत्यक्ष !!! शिवाय अजून दोन विषयावरचे लिहायचे बाकी आहे अजून . आठवण काढल्याबद्दल धन्यवाद

अजो१२३ Thu, 09/02/2017 - 10:19

In reply to by अबापट

सूक्ष्म जगत हे एक आपलं वेगळं जग आहे. ते दिसत नाहीत म्हणून अचूनच मिस्तेरियस. शाळेत शिकलं होतं तेव्हापासून यांच्याबद्दल कितीतरी नव्या न्यूज वाचल्यात नि पुन्हा फंडे गंडलेत. शिवाय उत्क्रांतीवृक्षाचे नवकृष्णांनी वर्णन केल्यापासून त्यांना आपले पितृत्व प्राप्त झालेले आहे. त्यांच्या अस्तित्वांचे स्केल ही अचंबित करणारे आहेत. शिवाय सजीव निर्जीव सगुण निर्गुण इ इ विशेषणे ईश्वराव्यतिरिक्त त्यांना देखिल लागू होतात.
-----------
एखाद्या विषयाच्या मॅच्योर अंडरस्टँडिंगबद्दल सध्याला तरी माझं तुमच्याबद्दलचं मत लै फार्मात चाललेलं आहे. म्हणून म्हटलं. कै घाई नै. पण कधीतरी लिहा.

आदूबाळ Mon, 06/02/2017 - 23:10

नवव्या परिशिष्टाचा प्रतिसाद इथे चिकटवतो आहे. त्या बातमीवाल्या धाग्यात काही कळत नाही.

--------------------

नवव्या परिशिष्टाची सुरस आणि चमत्कारिक कहाणी

आटपाट भारतदेशात लोकशाही चालवणारे तीन खांब रहात असत. Legislature (कायदा करणारे), judiciary (कायद्याचा अर्थ लावणारे) आणि executive (कायदा वापरणारे). भारतीय लोकशाहीच्या या तीन खांबांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न आजवर केले आहेत. त्यातला हा आद्य म्हणावासा प्रकार.

स्वातंत्र्य मिळालं. एकीकडे घटना समितीने घटना आणली. दुसरीकडे नेहरूप्रणीत समाजवादी सरकारने आपली समाजवादी उद्दिष्टं निश्चित केली, आणि त्याकडे वाटचाल सुरू केली. एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं "कसेल त्याची जमीन". जमीनदारी पद्धतीचा समूळ विनाश. त्यासाठी कूळ कायदा वगैरे कायदे देशभर पारित झाले. जमीनदारांकडच्या जमिनी काढून कुळांना दिल्या गेल्या.

पण दुसरीकडे, "right to property" हा मूलभूत अधिकार म्हणून घटनेत जाऊन बसला होता. जमीनदारं वैतागली, आणि कूळकायदे माझ्या मूलभूत अधिकारावर गदा आणताहेत, आणि म्हणून घटनाबाह्य आहेत (ultra vires the constitution) म्हणून हायकोर्टांत दावे ठोकले. कामेश्वर सिंह वि० बिहार राज्य या केसमध्ये १९५० साली पाटणा हायकोर्टाने 'बिहार लँड रिफॉर्म्स अ‍ॅक्ट' घटनाबाह्य ठरवला. पण मागोमाग अलाहाबाद आणि नागपूर हायकोर्टांनी त्यांचे त्यांचे कूळकायदे 'घटनाबाह्य नाहीत, ओक्के आहेत' असा निर्णय दिला. अशा वेळी हे खटलं सुप्रीम कोर्टात जातं. आणि इथे मूलभूत अधिकारांचा प्रश्न असल्याने 'कॉन्स्टिट्युशन बेंच' म्हणजे झाडून सगळ्या न्यायमूर्तींचा बेंच.

पण तिकडे सरकारच्या पोटात पाकपुक झालं. नवं कोरं सरकार, नवी कोरी आश्वासनं. (पहला पहला प्यार है, पहली पहली बार है"च्या चालीत वाचावं.) उद्या सर्वोच्च न्यायालयाने "घटनाबाह्य" म्हणून निकाल दिला तर काय करायचं? (त्या काळी "चुनावी जुमळा होता" म्हणून चुना लावण्याची पद्धत नसावी.)

पण कोर्टाला थांबवायचं तर घटना आडवी येते. म्ह्णजे घटना बदलायला हवी. घटना तर नुकतीच बनली होती. ताजी ताजी घटना बदलणं ही नामुश्की, आणि कोर्टाने कूळकायद्यांत पाचर मारणं हीसुद्धा नामुश्कीच. पण नेहरूंनी ठरवलं की बोला तो बोला. कूळकायदा आकेच रहेगा. मग १९५१ च्या उन्हाळी सत्रात पहिलंवहिलं घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं.

त्यात आर्टिकल ३१-अ/ब घालून त्याद्वारे घटनेला "नववे परिशिष्ट" नामक शेपूट जोडलं. त्या परिशिष्टात लिहिलेले सगळे कायदे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. सुप्रीम कोर्टही त्यात काहीही बदल करू शकणार नाही. 'Judicial review'च्या कक्षेबाहेर असलेले हे कायदे. त्यात सगळे कूळकायदे कोंबले गेले.

हे विधेयक स्वतः नेहरूंनी संसदेसमोर मांडलं, आणि कूळकायदे कसे गरजेचे आहेत यावर एक भावनिक भाष्य केलं. अनेकांनी या विधेयकाच्या बाजूने मत मांडलं, पण आचार्य कृपलानींसारख्या काहींनी विरोधातही मांडलं. विरोधकांचं म्हणणं होतं की कोर्ट काय म्हणतंय बघू, आणि मग ठरवू. घटनासमितीने घटना काय येडे म्हणून बनवली नाहीये. सहाच महिन्यांत त्यात बदल करायचे म्हणजे काय... वगैरे. गंमत म्हणजे स्वतः आंबेडकरांनी या विधेयकाच्या बाजूने भाष्य केलं, आणि त्यांच्या विनयशील, ऋजू स्वभावाप्रमाणे "मूळ घटना आम्हाला हेच म्हणायचं होतं, जर भाषा स्पष्ट नसेल तर चूक आमची आहे" वगैरे सांगितलं.

प्रचंड बहुमताने हे विधेयक पारित झालं.

(एक महत्त्वाची गोष्ट अशी, की ही घटनादुरुस्ती "पूर्वलक्ष्यी प्रभावाने" (retroactive effect) करण्यात आली होती. मागे व्होडाफोन केससंदर्भात पूर्वलक्ष्यी प्रभावाबद्दल लिहिलं होतं. आत्ता व्होडाफोनच्या नावाने बोंब ठोकणार्‍या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की घटनेच्या जिंदगीतली पहिली दुरुस्तीदेखील पूर्वलक्ष्यी होती! असो.)

======
नवव्या परिशिष्टाची जन्मकथा इथे संपली. तशीच त्याची मृत्युकथाही तितकीच रोचक आहे. त्याबद्दल डिट्टेलमध्ये परत कधीतरी. (गब्बर आणि गुर्जी डोक्यावर बसू नयेत म्हणून फिक्स वेळ देत नाही (डोळा मारत) )

पण थोडक्यात ती अशी आहे: हा मार्ग म्हणजे legislatureच्या हाती मिळालेलं कोलीत होतं. एखादा अन्यायी, घटनेला घोडा लावणारा कायदा तसाच रेटायचा असेल तर त्याला नवव्या परिशिष्टात घातलं की झालं! कॉफेपोसा, फेरा, लेव्ही शुगरचा कायदा, तामिळनाडूमध्ये असलेला ६९% आरक्षणाचा कायदा वगैरे नवव्या परिशिष्टात आहेत. विशेषतः इंदिरा-काळात झालेल्या ३९व्या आणि ४०व्या घटनादुरुस्तीने तर वात आणला होता. शेवटी 'आय आर कोएल्हो' आणि 'वामन राव' या दोन केसने हा मार्ग 'बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन' वापरून बंद करून टाकला!

अबापट Tue, 07/02/2017 - 11:41

In reply to by आदूबाळ

आबा ,आतुरतेने वाट पाहतोय , पुढच्या इष्टुरी ची !!

अवांतर : कृषिप्रधान समाजात कमालीची अन्यायकारक विषमता असली , तर पुढे मागे केव्हातरी झिम्बाब्वे होतो असे वाटते . सगळ्यांचे वाटोळे .!!! कुळकायद्याचा विषय निघाला कि उगाचच असे वाटते कि ( त्या भिकारचोट वगैरे म्हणाल्या जाणाऱ्या ) समाजवाद्यांनी कुळकायदा आणून .इथला झिम्बाब्वे टाळला का ? ( येऊ द्या आता .... ;)

अनु राव Tue, 07/02/2017 - 11:53

In reply to by अबापट

जेंव्हा झिंम्बाब्वे मधे गोर्‍या लोकांची मोठी शेती आणि त्यावर काम करणारे काळे मजुर अशी परिस्थिती होती तेंव्हाचा मजुरांचा जीवनाचा दर्जा ( अन्न, मिळणारे शिक्षण, आरोग्य व्यवस्था, कायदा सुव्यवस्था ) हा शेतजमीन मजुरांमधे वाटल्यावर बराच घटला.

*Apartheid वेगळे आणि जमिनीची असमान मालकी वेगळी ( मुद्दाम सांगावे लागले, नाहीतर वेगळेच काहीतरी घेउन बसला असता )

काळ्या मजुरांना जमिन विकत घेऊन जमिन मालक बनण्यात अडथळा नव्हताच. १९९० पासुन जबरदस्तीने जमिन त्यांच्या खर्‍या मालकांकडुन काढुन घेउन सो कॉल्ड वाटण्यात आली आणि झींबाब्वे च्या लोकांचे हाल चालू झाले.

अबापट Tue, 07/02/2017 - 12:15

In reply to by अनु राव

वाचा हो मी काय लिहिलंय ते !!
मुद्दा आपले झिम्बाब्वे न होण्याचा आहे

आणि झिम्बाब्वे त गोऱ्या लोकांनी जमीन रास्त भावाने विकत घेतली होती का नुसतीच घेतली होती ? ( फार पूर्वी नाय हो ) जरा सांगाल ?

>>"काळ्या मजुरांना जमिन विकत घेऊन जमिन मालक बनण्यात अडथळा नव्हताच."
हॉय हॉय हे खरे हो !! कृषिप्रधान देशात जमिनी काढून घेतलेल्या मजुरांचे वारस नक्किच श्रीमंत झाले असतील , तरीही साले जमिनी घेईनात !!! मूर्ख फडतूस लेकाचे

हे "Apartheid वेगळे " कुठून आले , मी तर काढले नाही ...

चर्चा भरकटतीय ...विनम्र्विनन्ति मूळ उपस्थित प्रश्नाला उत्तरे देण्यात येतील .

अनु राव Tue, 07/02/2017 - 12:25

In reply to by अबापट

झाला ना झिंबाब्वे थोड्या प्रमाणात भारताचा. तोच तर मुद्दा आहे.

इंग्रज निघुन गेल्यावर भारताचे झिम्बाब्वेकरण, केनियकरण होणे चालूच आहे. भारत मोठा असल्यामुळे वेग कमी आहे इतकेच.

अबापट Tue, 07/02/2017 - 15:13

In reply to by अनु राव

हे विंटरेष्टिंग होतंय ताई , म्हणजे काय ते जरा विषद करून सांगाल काय ? ( आणि केन्यात प्रोजेक्ट करतो त्यामुळे तुमचे हायपोथेसिस फर्स्ट हॅन्ड .जाग्याओ पडताळून पण पाहू शकतो .. ) तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगाच !!!
अवांतर माहितीकरिता : केनिया आणि झिम्बाब्वे च्या परिस्थितीत बराच फरक आहे हे आपण जाणत असणारच ... तेव्हा तुम्ही या दोन वेगळ्या परिस्थितींबद्दल लिहीत असणार असे गृहीत धरतो ...

अनु राव Tue, 07/02/2017 - 15:30

In reply to by अबापट

समजुन उमजुन न कळल्यासारखे करणार्‍यांना काय विषद करुन सांगणार. विषाद वाटण्यासारखी परिस्थिती माझी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/02/2017 - 22:30

In reply to by अनु राव

मला समजलं नाही. केनिया आणि झिंबाब्वेबद्दल मला काहीही माहिती नाही. विषाद वाटण्याआधी प्रयत्न कराच तुम्ही, अनुतै.

चिंतातुर जंतू Tue, 07/02/2017 - 15:35

In reply to by अबापट

>> म्हणजे काय ते जरा विषद करून सांगाल काय ?

अनुताई आणि विषद! अशी अपेक्षा ठेवत असाल तर साने गुरुजींनंतर तुम्हीच थोर मनाचे आहात बापट!

चिंतातुर जंतू Tue, 07/02/2017 - 12:05

In reply to by अबापट

>> कृषिप्रधान समाजात कमालीची अन्यायकारक विषमता असली , तर पुढे मागे केव्हातरी झिम्बाब्वे होतो असे वाटते . सगळ्यांचे वाटोळे .!!! कुळकायद्याचा विषय निघाला कि उगाचच असे वाटते कि ( त्या भिकारचोट वगैरे म्हणाल्या जाणाऱ्या ) समाजवाद्यांनी कुळकायदा आणून .इथला झिम्बाब्वे टाळला का ?

इतकं दूर कशाला जाता? पाकिस्तानात जा!

According to the Pakistan-based NGO, Society For Conservation and Protection of The Environment (SCOPE), about one-half (50.8%) of rural households in Pakistan are landless, while 5% of the country’s population owns almost two-thirds (64 percent) of its farmland.

The major effort to redistribute land to peasants and landless—Laws in 1972 and 1977 by Zulfikar Ali Bhutto—were struck down as un-Islamic by Pakistan courts in a number of decisions from 1979 to 1989.

इथून उद्धृत.

अबापट Tue, 07/02/2017 - 12:19

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद जंतू , पण तुमचे ' भिकारचोट समजले जाणारे समाजवादी , त्यांनी आणलेला कुळकायदा व त्याचे परिणाम ' यावर मत नाही का ?

चिंतातुर जंतू Tue, 07/02/2017 - 14:45

In reply to by अबापट

>> तुमचे ' भिकारचोट समजले जाणारे समाजवादी , त्यांनी आणलेला कुळकायदा व त्याचे परिणाम ' यावर मत नाही का ?

ज्या विषयात अधिकारवाणीनं बोलण्याइतका अभ्यास नाही त्या विषयात पोकळ रँट मारायची नाही असं मी ठरवलंय. काय सांगावं, उगीच इतिहाससंशोधक असल्याचा ठपका बसायचा :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/02/2017 - 22:28

In reply to by चिंतातुर जंतू

श्रेणीव्यवस्था अजूनही चालू झालेली नाही म्हणून प्रतिसाद द्यावा लागला.

'हे हवं' आणि 'ते हवं'च्या पोकळ रँटी मी पण करून घेते. मोडका कोड सुधारणं मला तर जमणाऱ्यातलं नाही.

तिरशिंगराव Wed, 08/02/2017 - 15:48

In reply to by अबापट

कुळकायद्याच्या धर्तीवर, स्वतंत्र भारतात, भाडेकरुंना टोकाचे संरक्षण देणारा कायदा कधीपर्यंत होता आणि त्यांत बदल कधी झाला, याबद्दल माहितगाराने लिहिलेले वाचायला आवडेल. आम्ही फक्त, भाडेकरुला कधीच काढता येत नाही आणि तो इतिहासकालीन २०-ते ४०रुपये भाडं देऊन वर्षानुवर्षे रहातो आणि मालकाच्या तोंडाला फेस आणतो, एवढे ऐकले होते. कसेल त्याची जमीन याच धर्तीवर 'राहील त्याचे घर आणि दुरुस्तीचा बोजा मात्र मालकावर' असा काहीसा कायदा होता का ?

सामो Wed, 08/02/2017 - 19:21

In reply to by अनु राव

असे लोक विरळेच. छान लेख आहे अनु. हे असं सकारात्मक , आदर्शवादी वाचलं की जोमाने, उत्साहाने जगायची उमेद येते. ऐसीचे कोणी अशा व्यक्तींना गाठून त्यांची मुलाखत घेऊ शकत नाहीत का? सहजच विचारतेय. नाही घेतली तरी दु:ख नाही. जस्ट एक सजेशन. फेसबुकवर शेअर करत आहे.

मिहिर Wed, 08/02/2017 - 05:50

विंडोजमध्ये मराठी टाईप करण्यासाठी तुम्ही काय वापरता? इन्स्क्रिप्ट, विंडोज इनपुट टूल की अदितीने बोलनागरीचा कळफलक विंडोज वापरायची कॢप्ती सांगितली होती ते, की अजून काही? लिनक्सच्या बोलनागरीची सवय झाल्यापासून गमभनही काहीसे त्रासदायक वाटते. नवीन लॅपटॉप घेतल्यावर मराठी लिहिण्याच्या कामासाठी घाईगडबडीने लिनक्स इन्स्टॉल केले होते!

चिंतातुर जंतू Wed, 08/02/2017 - 11:34

In reply to by मिहिर

>> विंडोजमध्ये मराठी टाईप करण्यासाठी तुम्ही काय वापरता? इन्स्क्रिप्ट, विंडोज इनपुट टूल की अदितीने बोलनागरीचा कळफलक विंडोज वापरायची कॢप्ती सांगितली होती ते, की अजून काही?

विंडोजवर काम करण्याची फारशी वेळ येत नाही, पण जेव्हा येते तेव्हा मी गूगल मराठी इनपुट वापरतो. ते वाईट आहे, कारण तुम्ही इंग्रजीत टाइप करता त्यानुसार गूगल आपली अक्कलहुशारी लावून तुम्हाला काय टाइप करायचं आहे ते सुचवतं. त्यात बरेचदा योग्य पर्याय असतोही, पण कधी कधी नसतो. अशा वेळी मी सरळ ऐसीवर येऊन तिथे टाइप करतो आणि हवं तिथे पेस्ट करतो.

गब्बर सिंग Wed, 08/02/2017 - 22:31

मिलिंदरावांना प्रश्न -

(१) https://www.nytimes.com/2017/02/08/opinion/a-conservative-case-for-clim…

(२) https://www.wsj.com/articles/a-conservative-answer-to-climate-change-14…

मिलिंदराव, आज एकाच दिवशी न्युयॉर्क टाईम्स व वॉल स्ट्रीट जर्नल - दोन्ही मधे क्लायमेट चेंज वर लेख आहेत. क्लायमेट चेंज वर आपले मत हवे आहे. माझा ह्या विषयाचा शून्य अभ्यास आहे.

मिलिन्द Wed, 08/02/2017 - 23:08

In reply to by गब्बर सिंग

पृथ्वीच्या वातावरणात उष्णता-साठवणारे वायू (कार्बन डाय -ऑक्साईड, मिथेन इत्यादी) जमत आहेत हे सत्य आहे. त्याने ध्रुवांवरचा बर्फ वितळून समुद्राची पातळी उंचावत जाऊन किनाऱ्यालगतच्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो हे सत्य आहे. (उदा. १. फ्लोरिडातली काही शहरे अनेक दिवस ८ इंच पाण्याखाली असतात.२.गरम पाण्यामुळे अचानक वादळ होण्याचा धोका वाढला असून अनेक विमा कंपन्यांनी समुद्री वाहतूक कव्हर करणे बंद , किंवा अतिशय महाग केले आहे. ३. सीरियातली यादवी दमास्कस बाहेरच्या स्लम्स मध्ये सुरु झाली. ही स्लम्स अपुऱ्या पावसामुळे शेतीवरचे लोक शहराकडे वळल्यामुळे निर्माण झाली होती. ४. भारतात प्रदूषणामुळे गव्हाचे उत्पादन ३० ते ५० टक्क्यांनी घटले आहे ).

वाद आहे तो मोठे नुकसान किती वर्षात होणार यावर आहे: ३० का १०० ? आणि त्यासाठी कोणी किती संपत्तीची किंमत द्यायची? . भारत व चीन सह "तिसऱ्या" जगताचे म्हणणे आहे की आत्तापर्यंत श्रीमंत देशांनी त्यांच्या विकास-काळात भरपूर प्रदूषण केले आहे , "आता पाळी आमची आहे". ही भूमिका वारंवार न्याय्य वाटली तरी भारताला त्याचे भौगोलिक स्थान, आणि दक्षिण किनाऱ्यावरची प्रचंड मनुष्यवस्ती पाहता अखेर हे धोक्याचे आहे (चीनची स्थिती वेगळी आहे!)

सामो Thu, 09/02/2017 - 09:26

सध्या आलेल्या धाग्यात नानावटी व खंडागळे यांचे धागे फारच आवडले. ऑफबीट आहेत दोन्ही. दोन्ही बुद्धीमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंची चुणुक दाखवतात. लोलक सूर्यप्रकाशात लक्कन चमकावा तसा. नानावटींचा उपरोध. खंडगळे यांची कल्पनाशक्ती व शैली. मस्त.
कुणाला वा कशालाही कमी लेखायचे नाहीये पण चर्वितचर्वणाचा फार कंटाळा आलेला होता त्या पार्श्वभूमीवर हे दोम्ही अपवाद तापलेल्या वाळवंटातील थंड वार्‍याच्या झुळुकेसारखे वाटले.

अजो१२३ Fri, 10/02/2017 - 16:52

सामान्य जनतेला एखादी गोष्ट नक्की काय आहे, का आहे, तिचे काय लॉजिक आहे हे कळणे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे नसते. आम्ही दिलेल्या कागदावर सही करा नैतर करा हवी तितकी धावपळ असा धोषा मागे ही होता नि आताही आहे.
-----------------
मंजे मुळात मनोबाचे बिल किती येते, का येते हे त्याला कळणं ...

अजो१२३ Sat, 11/02/2017 - 12:46

अलिकडे काय पाहिलं, खाल्लं, ऐकलं या मालिकांत उरलेल्या इंद्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून अलिकडे काय हुंगलं, स्पर्शिलं या सिरिज चालू कराव्यात.

सामो Sat, 11/02/2017 - 18:58

In reply to by अजो१२३

काय हुंगलं

मुलीने व्हिक्टोरिया सिक्रेट चे घाऊक बॉडी मिस्टस आणले आहेत. ते मला ठीक वाटले. थोडे युथ सेंट्रिक इन्टेन्स्/फ्लोरल आहेत. पण मी "क्लिनिक चा कॅलिक्स" आणलाय. तो विकत घेणे हे स्वप्न होते. आणि तो एखाद्या ऑकेजनलाच हवा होता. अजुन उद्घाटन करायचे आहे. पण रोज कपाटातून त्याची शीळ ऐकू येते ;) आणि कटाक्षाने मोह टाळावा लागतो कारण एकच ऑकेजन - ऑकेजन - ऑकेजन. :) ऑकेजन येतय पण आता नवरा येईल तेव्हा त्याच्याबरोबर फिरायला जाताना काढणार आहे

'न'वी बाजू Sun, 12/02/2017 - 11:47

In reply to by सामो

अहो प्रतिसाद देताना प्रतिसादाला जरा शीर्षकबीर्षक देत जा हो! काय वाट्टेल ते द्या, पण द्या. हे जे डीफॉल्ट शीर्षक येते, ते कधीकधी फारच भयंकर येते.

सामो Sun, 12/02/2017 - 16:49

In reply to by 'न'वी बाजू

अगदी १००% खरे आहे. मी बदलत होते पण बॅट्याबुळे ब्लॉक झालेली ती कमेंट.