Skip to main content

फोटोंसाठी नावं सुचवा

माझं मांजरप्रेम नव्यानं सांगायची गरज नाही. तसा माझा प्रसिद्धीचा हव्यासाही निराळा सांगायची गरज नाही. त्यामुळे आज नवा धागा काढलाय - फोटोंना नावं सुचवा/ठेवा/द्या, फोटोंची वर्णनं करा, त्या निमित्तानं आठवलेले निराळे फोटो दाखवा असं सगळंच. नावं ठेवताना कोणाच्याही भावना दुखावण्याची पर्वा करण्याची गरज नाही. मांजरींच्या बाबतीत 'मला पाहा फुलं वाहा' हे नेहमीचंच; त्यामुळे नावं देताना/ठेवताना त्यापेक्षा अधिक क्रिएटिव्हिटीची अपेक्षा आहे.

१. चंद्रिका तिर्री
२. चंद्रिका तिर्री
३. चंद्रिका तिर्री

नंदन Tue, 14/02/2017 - 07:56

नावं (अनुक्रमे):
Yawny मनीच्या गोष्टी*
उंच माझा बोका गं!
https://memegenerator.net/instance/39732548

सध्या निवडणुकांचा शीजन असल्याने (पुनश्च, अनुक्रमे):
मुंबई: महानगरपालिकेत वाघाची डरकाळी
स्वदेश: झाडावर चढवा, दिवे ओवाळा
परदेश: !!!

(*अन्यत्र पूर्वकोटित)

अंतराआनंद Tue, 14/02/2017 - 10:13

(१) मनी माझीया वसते वाघीण.
(२) कश्याला, कश्याला! नुसतं औक्षण चाललं असतं.
(३) हायला! कसलं भांडतेय. (खास आदितीच्या मांजराच्या सवयीचे भाव)

तिरशिंगराव Tue, 14/02/2017 - 12:16

१. नोटाबंदी करता काय ?

२. दिवाळ्ळी दिवाळ्ळी आली, लोण्याचे लाडू, उंदराच्या करंज्या,माशाचे अनरसे तयार ठेवा.

३. पहिल्यांदाच चाललीये, अमेरिकेला!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/02/2017 - 00:11

अंतरा आणि तिरशिंगराव, प्रतिसाद मस्तच. पण त्यातही औक्षण आणि नोटाबंदी हे दोन विशेष आवडले.

गवि Wed, 15/02/2017 - 01:06

आल्टर्नेटिव्ह:

१. स्कूल-स्पोर्ट्स डे
२. स्कूल-अॅन्युअल डे
३. स्कूल- बॅक फ्रॉम व्हेकेशन

नितिन थत्ते Wed, 15/02/2017 - 21:12

तेजायला, मागे मालकांच्या कुत्र्यावर लेख येऊन गेला आता मालकिणीच्या मांजरीवर !!

संदर्भ

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/02/2017 - 21:42

In reply to by नितिन थत्ते

तुमचं वय झालं आता. माझ्या जुन्या मांजरीवर पहिल्याच दिवाळी अंकात लेख येऊन गेला, पांढरू, हे तुम्हाला आठवत नाहीये. आणि आता तर लेखही लिहिलेला नाही. लोकांनाच लिहायला उद्युक्त करत्ये.

गवि Fri, 17/02/2017 - 11:01

In reply to by 'न'वी बाजू

इन नवी बाजूओंका कुछ सच नही बाबा. इनको देनेके लिए खोडसाळ और भडकाऊ ये किमान दो श्रेणीयां तो पहेले चालू करनेकी कृपा व्यवस्थापन करे तो हम कातडेके जोडे बनाके पहेनाये तभ्भी ऋणसे उतराई नही होंगे.

सिफ़र Wed, 15/02/2017 - 22:35

मला फोटो पाहून तीन ऐसीकर आठवले...

१. सतत "आSSSSSSक्रमण"च्या तयारीत असणारी _ _ _.
२. ऐसीवर आपला वावर कमी करून लांबून मजा पाहणारी _ _ _.
३. कायम प्रश्नार्थाक असलेला _ _ _.

गाळलेल्या जागा भरा ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/02/2017 - 00:09

हे तीनही फोटो मला भलत्याच कारणांसाठी आवडतात. गॅरी विनोग्रांड नावाच्या प्रसिद्ध फोटोग्राफरचं एक वाक्य वाचलं होतं, "समोरचं दृश्य प्रत्येक व्यक्तीला दिसत असतं. त्यातली कोणती चौकट निवडून लोकांना दाखवायची हे फोटोग्राफरांचं कसब असतं."

पहिल्या फोटोच्या वेळेस बाई नुकत्या झोपेतून उठून जांभई देत होत्या.
दुसऱ्या फोटोतली फांदी सरळसोट उभी नाहीये, दोन फांद्यांच्या दुबेळक्यापलीकडे घराचा त्रिकोण दिसतोय, त्याचं शीर्ष आभाळाकडे रोखलेलं आहे. पण दिसताना दिसतं की म्याडम काय हिंमतवाल्या आहेत! आणि तिला खरोखर तेव्हा तसं वाटत असणार, असा माझा अंदाज.
तिसरा फोटो काढला तेव्हा बाई चेकाळलेल्या होत्या. मांजरी दिवसातून काही वेळा अशा चेकाळतात; घरभर उनाडतात; आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. अशीच एकदा ती अंदाधुंद चेकाळलेली असताना काढलेला फोटो कोणाला कसा दिसतो, हे वाचून गॅरी विनोग्रांडचं वाक्य पुन्हा आठवतं.

तो तिसरा फोटो मलाही प्रचंड आवडतो. तो फोटो बघितला की तिचं चेकाळणं आठवतं आणि आपल्याकडे मांजर नक्की का आहे, याची आठवण होते.

सामो Fri, 17/02/2017 - 12:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्या लोकांना भावनांची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी हा प्रतिसाद टाळून पुढे जावे. तुमच्या वेळेचा अपव्यय नको पण त्याहीपेक्षा मला नंतर कधीतरी झाडल्या गेलेल्या दुगाण्या नकोत.
.

आपल्याकडे मांजर नक्की का आहे, याची आठवण होते.

कुत्रा पाळलेले बरेचसे लोक कुत्र्याने आपले आयुष्यच कसे बदलवुन टाकले ते सांगतात. आणि खूप सिन्सिअरली, आत्यंतिक जिव्हाळ्याने, आपुलकीने बोलतात. त्यांचे म्हणणे हेही असते की तुम्ही कुत्रा जर पाळला नसेल तर तुम्ही अतिशय दुर्दैवी तसेच अतिशय सुदैवी आहात. दुर्दैवी कारण जे निरलस प्रेम पाळीव कुत्रा त्याच्या धन्याला देतो त्याची सरच अन्य कोणत्याच प्रेमास येत नाही असे म्हणतात. इतकं की एका लेखिकेने डॉग म्हणजे रिव्हर्स केले असता गॉडच असे म्हटले आहे. ईश्वरी, निरलस, निरपेक्ष व आतून आलेले , फक्त त्या क्षणात मोजता येणारे, आपल्याहूनही अधिक असे धन्यावरचे प्रेम.सुदैवी कारण त्याच्या मृत्युपश्चात जे दारुण दु:ख होतं ते तुम्हाला कधी सहन करावे लागले नाही.
.
मला या प्राण्याची माहीती नाही. मी कधी पाळला नाही. इन फॅक्ट कॉलेजात मला चावलाच आहे.अनेकदा भीती वाटलेली आहे. हा पिल्ले झालेल्या एका फेरोशिअस, भटक्या कुत्रीस दया म्हणुन भर पावसात अगदी भरपूर नासकवणी करुन देऊन आलेले आहे. आणि तिच्या कृतज्ञतेचा पुढे भारतातील वास्तव्यभर अनुभव घेतलेला आहे. पण बाकी नाही.
.
मात्र ...मात्र ... होल्ड ऑन. मीही अगदीच दुर्भागी नाही.लहानपणी मेरा पाला एक उनाड अत्यंत देखण्या बोक्याशी पडलेला आहे. मूर्तिमंत देखणेपण असा तो नारेंगी-सोनेरी, गबदुल बोका, निळे डोळे, काय ऐट काय रुबाब आणि स्वतःच्या सौंदर्याचे केवढे यथार्थ भान. पार मेस्मराइझ करुन टाकत असे. आणि वर आपल्या मर्जीचा मालक. त्याला हवा तेव्हा घरात येऊन दूध पिऊन मिशा फेंदारुन जाणार, नाही वाटलं तर महीनों महीने नाही येणार. पण हे लहानसे तीळभरचे ऋणानुबंधही त्याच्या जातीविषयी इतकी आपुलकी निर्माण करुन गेले माझ्या मनात. मांजराच्या मनस्वी स्वभावाचा आनि रॉयल सौंदर्याचाही तो मूर्तिमंत प्रतिनिधी होता. कुठे असेल बिचारा देव जाणे. असो.
.
हां नंतर एका पक्ष्याच्या पिलाच्या ऋणानुबंधाविषयी तर मी लेखच लिहीलेला आहे. कारण मृत्युच्या दारातील पक्ष्याच्या डोळ्यात पाहीलेला विसरता न येणारा क्षण. तो क्षण जेव्हा आमच्यातल्या भाषेच्या, जातीच्या (मनुष्य जात्-पक्षी जात) ही बंधने गळू पडली आणि मला जाणवले की त्या क्षणात चिरंतन सत्य गोठलेलं होतं. - http://aisiakshare.com/node/4272
.
अ‍ॅल्फी आणि पॉन्चु हे २ गिनीपिग सध्या घरी पाळलेले आहेत, पैकी अ‍ॅल्फी खूप इमोशनल आहे. धावत येतो, कुलबुल-कुलबुल बोलतो. दोघांनीही फार लळा लावला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 17/02/2017 - 21:02

In reply to by सामो

मला भावनात्मक जवळीक या प्रकारांशी फार घेणंदेणं नाही; म्हणूनच मी मांजर आणल्ये. तिला कंटाळा आला की तीपण मला लाथा मारते. भावनाशून्यता ही भावना परस्परसंमतीची आहे.

दिवसातली १०-१५ मिनटं तिर्री चेकाळलेली असते; ती वेळ साधारणतः संध्याकाळी असते. दिवसभर अभ्यास, काम, फोन-अ-फ्रेंड वगैरे करून कंटाळा आलेला असतो. तेव्हा ही आपला मूर्खपणा प्रदर्शित करून आमची मेजर करमणूक करते. तिला कंटाळा आला की सरळ दुसरीकडे निघून जाते आणि चक्क झोपून जाते. अत्यंत निरुपयोगी आणि यडपट जीव आहे तो! पण मला तिच्यासाठी वेळ आणि श्रम करावे लागत नाहीत. त्यामुळे या करमणुकीची किंमत अतिशय माफक असते.

*हा विनोद न समजल्यास मंडळ दिलगीर आहे.

१४टॅन Thu, 16/02/2017 - 20:37

१. युती तुटल्यानंतर सेनेच्या चिन्हासाठी ऑडिशन.
२. आपण उभ्या उभ्या झोपतो, क्काय. बेट?
३. त्याने भिंत खरंच बांधलीए आणि ही ब्यागपण माझ्या साईझची नाहीए....

मांजरींच्या बाबतीत 'मला पाहा फुलं वाहा' हे नेहमीचंच

अग्ग्गदी!!!
अधिक माहितीसाठी:

मला बोकोबा हे सदस्यनाम हवंय.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/02/2017 - 23:56

In reply to by १४टॅन

त्याने भिंत खरंच बांधलीए आणि ही ब्यागपण माझ्या साईझची नाहीए....

आता ट्रंपुलीच्या काळात खरंच ... :ड

१४टॅन Fri, 17/02/2017 - 15:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्रंपुलीच्या काळात

तुम्ही भलत्याच फ्रेंडली दिसताय त्याच्याशी॓! मी ते अमेरिकेत जाण्याआधी मोबाईल अनलॉक करुन दाखवलाच पाहिजे वगैरे चर्चा वाचल्यावर पार गारद झालेलो.

राजेश घासकडवी Fri, 17/02/2017 - 04:37

In reply to by १४टॅन

१. युती तुटल्यानंतर सेनेच्या चिन्हासाठी ऑडिशन.

मी अगदी हेच्च लिहायला आलो होतो. पण तुम्ही आधीच ते लिहून माझी पंचाइत केलीत. तुम्ही दूष्ट आहात.

१४टॅन Fri, 17/02/2017 - 15:15

In reply to by राजेश घासकडवी

ऐसीच्या भिंतीवर 'कोणीतरी दूष्ट आहे' असं यापुढे लिहीलेलं दिसलं की त्याचा आळ आता तुमच्यावर येणारे.

(जस्ट किडींगः इथे 'अर्जून लव पूजा' वाले लोक पण हवे होते यार!)

धर्मराजमुटके Fri, 17/02/2017 - 22:26

१ ला फटु : बघतोस काय ! मुजरा कर !
२ रा फटु : देता की जाता ?
३ रा फटु : मांजर म्हणतं माझीच लाल ! (बॅग हो !)

रावसाहेब म्हणत्यात Fri, 03/03/2017 - 05:47

१) जवळ आलीस तर खाऊन टाकीन
२) विक्षिप्तपणात आहे कुणी माझ्या वर?
३)