मोहीम - २ फलक

नमस्कार मंडळी,
मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे. माझ्या अल्पज्ञानाने अन अनुभवाने जेवढी माहीती आहे ती मी लिहायचा प्रयत्न करत आहे.
................................
माणसाने व्यवसायास सुरुवात केली की जाहीरातीची सुरुवात झालीच. सुरुवातीची जाहीरात म्हणजे जो व्यवसाय करतो त्याची एक खूण म्हणून दर्शनीभागात व्यवसायाशी संबधीत वस्तू टांगणे. सुतार, चांभार, लोहार अशा आदिम व्यवसायांची जाहीरात अशीच व्हायची.
3
आजही त्याच पध्दतीस अनुसरणारा व्यवसाय म्हणजे पंक्चरवाले. टांगलेले अथवा ढिगाने ठेवलेले टायर पाहताच कडेला कोणी मल्लू एखाद्या ट्युबला टबबाथ घालत बसलेला असणारच.
2
तर ह्याअनुसार एखादी डिश, काटाचमचा, बाटली, बूट, घोड्याचा नाल अशा खुणा व्यवसायाला ओळख देऊ लागल्या.
1दरवाज्यावर लावलेली पाटी फक्त समोरुन दिसते, बाजूने येणार्‍याला दिसण्यासाठी भिंतीला काटकोनात अशा वस्तू टांगल्या जात. फलकांचे हे खापर खापर पणजोबा आजच्या एलईडी न लेसर साईन्सच्या जमान्यातही आपले स्थान राखून आहेत. चला तर ह्या फलकांना कसे बनवले जाई, सध्या बनवले जाते ह्याचा आढावा घेऊ.
आद्य फलक : लाकडी फळकुटांवर कोरुन अथवा रंगाने लिहून टांगले जाई.
4
ह्यात सुधारणा झाली ती धातूच्या फ्रेम्स आणि पत्रा वापरुन फलक तयार करण्याची.
5
पत्र्यावर तैलरंगाने लिहिलेले फलक बरेच वर्ष चालत आणि बर्‍याच पिढ्या प्रचलित होते. अगदी २००० सालापर्यंत डिजिटल बॅनर सर्वत्र होईपर्यंत ऑईलपेंटने बोर्डस रंगवणारे पेंटर्स गल्लोगल्ली असत.
6
पेंटरलोक हे जास्त शिक्षित नसले तरी अक्षरे रेखायची एक विशिष्ट शैली आत्मसात केलेले असत. फलकावरची अक्षरे शक्यतो ठसठशीत फॉन्टस मध्ये असत. असे बरेचसे फॉन्टस डेकोरेटिव्ह पध्दतीने रंगवले जात, त्या अक्षरांना बीव्हेल एंबॉससारखा थ्रीडी इफेक्ट रंगाद्वारे दिला जाई, अक्षरांची सावली रंगाने दाखवून हा इफेक्ट अधिक उठावदार होई. अशा रंगकर्त्याचे शि़क्षण एखाद्या गुरुमार्फतच होई, हातात सफाई येईपर्यंत अक्षरे घोटणे, मधले सोपे रंगकाम करणे अशा इयत्ता पास करत शेवटी चित्रांचा भाग रिअलिस्टिक पध्दतीने जमायला लागला की शिष्य स्वतःचा रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन स्वतःचे नाव झोकदार सहीत टाकायला मोकळा होई.
7
अक्षर आरेखनाच्या पध्दतीतही घराणी असत. पट्टीचा पेंटर बोर्डावरचे 'र' अथवा 'स' अक्षर पाहून पेंटर सांगलीचा कि कोल्हापूरचा हे ओळखू शके. चित्रात चांगला हात असलेले पेंटर्स शक्यतो अक्षरआरेखनात एवढे यशस्वी होत नाहीत अन त्याच्या उलट असते. चित्रे काढणार्‍या पेंटर्सना चित्रपटाचे जाहिरात होर्डिंग अन नाटक सिनेमाच्या पार्श्वभूमीचे पडदे हा एक उत्पन्नाचा हमखास मार्ग ९०-९५ सालापर्यंत होता. डिजिटल बोर्डांच्या सुळसुळाटाने हि जमात मात्र डायनासोरसप्रमाणे अदृष्य झाली.
धातूच्या पत्र्यावर टिकाऊ फलकाचा अजून एक मार्ग म्हणजे पोर्सलीनचे बोर्ड्स. पांढरा रंग सोबत हिरवा, लाल अथवा निळा रंम्ग लावलेले पोर्सलीनचे चमकदार फलक कित्येक वर्षे टिकत. ब्रिटिशांच्या काळातले नीलफलक किंवा पारशी बेकर्‍यांचे फलक कित्येकांना आठवत असतील. जुन्या कंपन्या, पेट्रोल पंपांचे फलक पोर्सलीन एनॅमलचे असत. अलिकडच्या काळात व्हिनाईल फलक येईपर्यंत निदान पोस्टाचे अन बँकाचे तरी फलक पोर्सलीन एनॅमलचे असत.
9
8

धातूची अथवा लाकडी अक्षरे बसवून केलेले फलक हे अत्यंत कारागीरीचे काम असे. ह्या फलकांचे आयुष्यही बरेच असे. धातूच्या अक्षरांना पॉलीश केले अन लाकडी अक्षरांना वेळोवेळी रंगकाम केले तर ५०-५० वर्षे हे फलक टिकत.
11
आता ह्या सर्व पध्दतींचा उपयोग व्यवसायांच्या फलकासोबत खांबावरचे फलक, दिशादर्शक फलक, नामफलक, वाहनांवरचे फलक आदि फलकांसाठी थोड्याफार फरकांने केला जाई. डिजिटल फ्लेक्सचे युग येईपर्यंत असेच फलक दिसत. अ‍ॅक्रेलिक लेटर्स अन निऑन साईन्स चा वापर डिजिटल येण्याआधीपासून होता पण विद्युतफलकांचा भाग आपण सोयीसाठी दुसर्‍या डिजिटल फलकांच्या भागात घेऊ.
धन्यवाद.
(ह्या सर्व पध्दती मी ह्या व्यवसायात येण्याच्या आधीच्या असलेने सर्व चित्रे जालावरुन साभार. Wink आगामी भागात काही स्वतः केलेले जाहीरात फलक देण्याचा प्रयत्न करीन.)
आले अन जमाना बदलला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी आहे. योग्य उदाहरणांमुळे लेख उत्तम आणि वाचनीय झाला आहे. उत्सुकता वाढत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आगामी भागात काही स्वतः केलेले जाहीरात फलक देण्याचा प्रयत्न करीन.

आणे दो...आणे दो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या, उदाह‌र‌णे म‌स्त‌च‌ बे. ते र‌ स च्या व‌ळ‌णाव‌र‌नं सांग‌ली की कोल्लापूर‌ ते ओळ‌ख‌णं बाकी ज‌ब‌रीच‌ हां. म‌ला पेंट‌र‌म‌ध‌लं ओळ‌ख‌णारं एक‌मेव व‌ळ‌ण‌ म्ह‌ण‌जे त्या उगारेचं ब‌घ‌. विशेष‌त: त्याची स‌ही.

र‌च्याक‌ने व्य‌व‌सायाची जाहिरात‌ अशा चिन्हाने क‌र‌णे यासंबंधीची जी उदाह‌र‌णे आहेत ती स‌र्व‌च्या स‌र्व युरोपात‌ली दिस‌तात‌. आप‌ल्याक‌डं ब‌हुधा जुन्या काळी असं न‌व्ह‌तं. युरोपात‌ही हा प्र‌कार‌ ब‌हुधा १२००-१३०० नंत‌र‌च सुरू झाला असावा, पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फोटो भारी आहेत
Good. Year या लोगोच्या दोन शब्दांच्या मध्ये जे चित्र आहे ते नेमके कशाचे ?
ते चित्र काय दर्शवते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं आहे हो . हा लेख नेहमीच्या अभ्या पेक्षा प्रा. अभ्याशेठ यांनी लिहिल्यासारखा वाटतो . : ) येऊ द्या हो अजून आणि लवकर ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ आबा , तुम्ही तिकडे याच धाग्याला दिलेल्या प्रतिसादातले "अद्ययावत "म्हणजे पेरूगेट पासचे का ?
( अवांतर : तिथे त्या सलून चे प्रोप्रा श्री म माटे आहेत : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेरुगेट‌पाशीही एक अद्य‌याव‌त‌ आहे? मी म्ह‌ण‌तोय‌ ते टिळ‌क‌ र‌स्त्याव‌र‌ म‌हाराष्ट्र म‌ंड‌ळाक‌डून‌ साहित्य‌ प‌रिषदेक‌डे जाताना प‌हिल्याच‌ (लिम‌येवाडीच्या) कोप‌ऱ्याव‌र‌ लाग‌त‌ं ते. या अद्य‌याव‌त‌च्या माग‌च्या घ‌रात‌ एक स‌माज‌वादी नेते र‌हाय‌चे (ना ग गोरे किंवा एस‌ एम‌ जोशी - आता न‌क्की आठ‌व‌त नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाय हो , काहीतरी गडबड झाली . माटे मास्तरांच्या नावाच्या कारागिराच्या सलून चे नाव काहीतरी वेगळे असावे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो गोख‌ले वाडा आणि एसेम‌ गोख‌ल्यांचे मेहुणे. (ताराबाई ह्या मूळ‌च्या गोख‌ले.) म‌ला निश्चित‌ माहीत‌ आहे आणि मी त्याच‌ वाड्यात‌ र‌स्त्याव‌र‌च्या खोल्यांपैकी प‌हिल्या खोलीत‌ १९६३ ते १९६६ अशी तीन‌ व‌र्षे राहिलो आणि स‌मोर‌च्याच‌ गुर्ज‌रांच्या अरुणोद‌य‌ बोर्डिंग‌ हाऊस‌म‌ध्ये जेव‌लो. जुन्या आठ‌व‌णी जाग्या झाल्या. बाकी हे बोल‌णे क‌स‌ल्या 'अद्य‌याव‌त‌' बाब‌त‌ चालू आहे ते म‌ला माहीत‌ नाही.

ख‌जिना विहीर‌, न‌र‌सिंहाचे देऊळ‌ (येथेच‌ वासुदेव‌ ब‌ळ‌व‌ंत राहात‌ अस‌त‌) अ.वि गृह‌ ह्या र‌स्त्याव‌र‌ थोडे आण‌खी पुढे ना.ग‌.गोरे राहात‌ अस‌त‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, नाही, मी काहीत‌री गोंध‌ळ क‌र‌तो आहे. घ‌रात‌ल्या थोर‌ म‌ंड‌ळींना विचार‌लं आहे, तेव्हा ट्याम‌प्लिस‌.
______________

हा न‌काशा ब‌घा.

a

जिथे "ICA-The Institute of Computer Accountants" लिहिलंय‌ तिथे अद्य‌याव‌त‌ होतं. त्याच्याच‌ पाठिमागे अस‌लेल्या घ‌रात‌ एस‌ एम‌ जोशी राहाय‌चे. हाच‌ तो गोख‌लेवाडा का?

माझा गोंध‌ळ व्हाय‌चं आण‌खी एक‌ कार‌ण म्ह‌ण‌जे जिथे "Optimistik Infosystems Pvt" लिहिलंय‌ तिथे एक‌ दुम‌ज‌ली घ‌र‌ होतं, आणि त्याव‌र "एस‌ एम‌ जोशी" आणि त्याच्या खाली "एन‌ एम‌ जोशी" असं र‌ंग‌व‌ल्याचं आठ‌व‌त‌ंय‌. त्यात‌ले "एन‌ एम‌ जोशी" व‌कील‌ होते असं घ‌रात‌ल्या थोरांनी सांगित‌लं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.त्याच्याच‌ पाठिमागे अस‌लेल्या घ‌रात‌ एस‌ एम‌ जोशी राहाय‌चे:::: हो S M राहायचे त्या घराचं तोंड लिमयेवाडीच्या रस्त्यावर सुरुवातीला होतं /आहे . टिळक रस्त्यावरून लिमये वाडी रोड जिथे चालू झालाय तिथेच बहुधा दुसरे घर . (ती वेब आणि मॅप सोल्यूशन्स ची गल्ली चालू होताना दाखवलीय तिथेच ..समोरच्या बाजूला ) ICA च्या मागच्या अंगाला .

>>>Optimistik Infosystems Pvt" लिहिलंय‌ तिथे एक‌ दुम‌ज‌ली घ‌र‌ होतं<<< इथे गोखले वाडा होता .

हे सगळं बहुतेक ... कारण या मॅप मधील टिळक रोड आणि लिमये वाडी सोडलं तर बाकीची नावे ICA वगैरे हि आधुनिकोत्तर आहेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लेक्स‌ बोर्डाच्या लाक‌डी/लोख‌ंडी फ्रेम‌चा ख‌र्च‌ मूळ‌ फ्लेक्स‌पेक्षा जास्त‌ अस‌तो अस‌ं ऐक‌ल‌ं आहे ते ख‌र‌ं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ख‌राख‌रा रेट सांग‌तो थ‌त्तेसाहेब,
फ्लेक्स नॉर्म‌ल ८ रु स्क्वेअर फुट्. स्टार फ्लेक्स (म‌टेरिअल जाड अस‌ते ज‌रा, प्रिंटिंग फोर पास्) २५ रु स्केव‌र फुट्.
बॅकलिट फ्लेक्स ३५ रु स्क्वेअर फुट्.
आता फ्रेम्. आधी हे रनिंग फुट‌व‌र घ्याय‌चो आता स्क्वेअर फुट व‌र हिसाब चालु आहे.
लाक‌डि फ्रेम १० स्क्वेअर‌ फुट‌प‌र्यंत १०० रु फिक्स्. नंत‌र ७ रु स्क्वेअर फुट प‌ण ह्यात ब‌न‌व‌णे आणि खिळे ठोक‌णे इन्क्लुड्.
मेट‌ल फ्रेम १५ रु स्केव‌र फुट्. पाउण इंची स्केव‌र पाईप फ्रेम्. १०० स्केव‌र फुटाव‌र रेट क‌मि होतो. पेस्टिंग‌चे ३ रु स्केव‌र फुट, मोठ्या होर्डिंग‌ला २ रु. त्यात चिक‌ट‌व‌ण्याचे ट‌फ‌बॉन्ड (फेव्हिक्विक‌सार‌खे अस‌ते) ह्याचा रेट इन्क्लुड्.
उदा: १० बाय ३ चा बोर्ड असेल त‌र फ्लेक्स १० गुणुले ३ ब‌रोब‌र ३० स्केव‌र फुट गुणुले ८ रु ब‌रोब‌र २४० रुप‌ये. मेट‌ल फ्रेम ४५० रु.
एकुण ६९० रुप‌ये. डिझाईन चे वेग‌ळे. लोखंडि ब्रॅकेट असेल त‌र वेग‌ळे, ब‌स‌व‌ण्याचे वेग‌ळे. साधार‌ण ग्राउंड फ्लोर‌चा बोर्ड ९०० ते १००० रु सांग‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाही भाग‌ आव‌ड‌ला. आगामी भागाच्या प्र‌तीक्षेत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌स्तं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. वीस वर्षांपूर्वी सगळीकडे हाताने लिहिलेलं असायचं. आता फ्लेक्सच्या काळात जास्त रेखीव नीट काम दिसतं, पणबटबटीतपणा वाढलेला वाटतो. या दृश्य फरकाबद्दल आणि त्यामागच्या तांत्रिक कारणांबद्दल काही लिहाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब‌ट‌ब‌टीत‌प‌णा वाढ‌ला हे ख‌र‌ंच‌.
त्या टाइप‌सेटिंग‌ क‌र‌णाऱ्यांना ल‌ग्न‌प‌त्रिकेचा फॉण्ट पुस्त‌काला (सिरिअस‌ म्याट‌र‌ला) वाप‌रू न‌ये हे प‌ण‌ क‌ळ‌त‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थ‌त्तेचाचा, तुम‌च्या म‌ते "ल‌ग्न" हे सिरिअस‌ म्याट‌र‌ नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जो प‌त्रिका वाट‌तो त्याच्यासाठी शिरेस‌...

प‌त्रिका ज्याला अॅड्रेस‌ केलेली अस‌ते त्याच्यासाठी कुठे शिरेस‌ अस‌त‌ंय‌ ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चार हजार महीना पगारात 150 पत्रिका बडीवणार्याने काय काय करावे साहेबा, मजकूर दिला तसा करतात हेच नशीब. ब्रोशर एवढे पैसे आणि वेळ हवा, तर अशा कला दाखवता येतील. त्यावर पन लिहिलेय आधी. एक पत्रिका उपसंहार लिहितो लवकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही का रागाव‌ला हो?

मागे एका स‌ंस्थ‌ळाव‌रील‌ व्य‌क्तीने (छोटेसे - "हाऊ टु" टाइप‌) पुस्त‌क‌ लिहिले होते. आणि म‌ला अभिप्राय‌ विचार‌ला होता. तेव्हा त्यांना प‌हिली गोष्ट‌ हीच‌ सांगित‌ली. फॉण्ट‌ साधा घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाय ओ थत्ते साहेब, बिल्कुल नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख सुंद‌र. फार‌च स‌चित्र अस‌ल्याने वाच‌ताना म‌जा आली. मालिका चांग‌ली लांब करा प्लीज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

येऊ द्या माल‌क‌ तुम‌च्या स‌व‌डीने. ज‌ंता वाट‌ पाह्य‌तेय‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो नंद‌न माल‌क,
च‌ढ‌व‌तो फ‌ल‌काचा दुस‌रा भाग ल‌व‌क‌र‌च.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या, लोक‌स‌त्ता का म‌टा च्या र‌वीवार‌च्या पुर‌व‌णीत "अक्ष‌र‌नामा" का अश्याच काहीत‌री नावाचे एक छोटे स‌द‌र याय‌चे. त्यात त्यांनी कुठ‌लात‌री खास फ‌ल‌क, दुकानाचे/ब‌ंग‌ल्याचे/बिल्डींग चे नावाची पाटी दिलेली असाय‌ची आणि त्याचे व‌र्ण‌न असाय‌चे.
तुला इथे ब‌घित‌ल्याव‌र मी खुप प्र‌य‌त्न केला होता ते शोधाय‌चा प‌ण साप‌ड‌ले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌टात असावे ब‌हुधा कार‌ण अलिक‌डे लोक‌स‌त्ता वाच‌नात म‌ला आठ‌व‌त नाहि असे काही. आधी दोन्हि पेप‌र त‌से मिळाय‌ला अव‌घ‌ड‌च आम्हाला. Sad
आज‌काल नेट आवृत्त्या त‌रि दिस‌तात्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलिक‌डे नाही. ही २०१५ ची गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>म‌टात असावे ब‌हुधा<<

ते चंद्रमोहन कुलकर्णी यांचं सदर होतं आणि ते रविवारच्या म.टा.त येत असे. उदा. हे पाहा :
कौस्तुभ ओरिजिनल आणि कॉपी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाब्बो, चंद्र‌मोह‌न कुल‌क‌र्णी लिहिणार म्ह‌ण‌जे काय्.
म‌स्त आहे लिहिले. प‌ण ते नाव 'कौस्तुभ' त्याचा फोटो काय दिस‌त नाहि. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>प‌ण ते नाव 'कौस्तुभ' त्याचा फोटो काय दिस‌त नाहि. <<

त्याच‌ स‌द‌रात‌ले इत‌र काही लेख‌ :

पित‌ळे मॅन्श‌न्
म‌स्क‌ती म‌हाल
ग‌ण‌प‌ती निवास
साक‌व‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतु , हेच ते स‌द‌र्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्त‌म‌ दुवे.
(या निमित्ताने लेखाचंही किंचित‌ उत्ख‌न‌न‌ क‌र‌तो Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0