तंत्रज्ञान
नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?
संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?
- 19 comments
- Log in or register to post comments
- 6732 views
टू डी वर्ल्डच्या अद्भुत दुनियेत!
आपल्यातील अगाध परंतु मर्यादित बुद्धीमत्तेच्या कुवतीनुसार आपण लांबी, रुंदी व उंची या त्रिमिती (व काळ ही चौथी मिती) विश्वात राहणारे प्राणी आहोत याची आपल्याला कल्पना आहे. परंतु विज्ञान कथालेखक मात्र अनेक वेळा बहुमिती विश्वात आपल्याला नेतात व तेथील चक्रावून सोडणाऱ्या गोष्टीतून आपले मनोरंजन करत असतात. त्यांच्या मते त्या बहुमिती विश्वातील माणसं आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतात. मेंदूला थोडे जास्त ताण दिल्यास विज्ञान कथालेखक वर्णन करत असलेल्या बहुमिती विश्वाची आपण कल्पना करू शकतो व त्यात राहणाऱ्या सूपरइंटेलिजेंट प्राण्यांच्या जीवनाचा वेध घेऊ शकतो.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about टू डी वर्ल्डच्या अद्भुत दुनियेत!
- Log in or register to post comments
- 4538 views
द स्पिरिट.. चार्ल्स लिंडबर्ग.
राईट ब्रदर्सनी हवेपेक्षा जड इंजिनवर चालणारं आणि पायलटच्या हाती संपूर्ण कंट्रोल्स असलेलं विमान उडवून दाखवलं. माणूसप्राण्याचा हा एक जबरदस्त लोभस गुण आहे की एकदा "ब्रेक थ्रू" सापडला की पुढे सुधारणा करुन तंत्र परफेक्ट बनवण्याचं काम हा प्राणी फार झपाट्याने करतो. राईट्सनी आपल्या विमानात सुधारणा करत करत ते आणखी स्थिर बनवलं.. आणखी नियंत्रित बनवलं...
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about द स्पिरिट.. चार्ल्स लिंडबर्ग.
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6564 views
द राईट फ्लायर वन..
सध्या ऐसीवर विमानांचा विषय चालू आहे.. म्हणून आधुनिक विमानांविषयीच्या काही कन्सेप्ट्स आणि तत्सम लिखाण, जे यापूर्वी मिपावर प्रकाशित झालं होतं तेच ऐसीवर प्रकाशित करण्याची इच्छा आहे. म्हणून हा एक धागा. थोड्या थोड्या अंतराने इथे आणखी काही कन्सेप्ट्सविषयीचे विचार पुनर्प्रकाशित करण्याचा बेत आहे.
ऐसीच्या धोरणात जुने लेख अन्य ठिकाणांहून आणून टाकलेले बसत नसतील तर ते अप्रकाशित केल्यास काहीच हरकत असणार नाही.
................................................................................................
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about द राईट फ्लायर वन..
- 21 comments
- Log in or register to post comments
- 11088 views
समरांगणसूत्रधार ग्रन्थातील यन्त्रविधान आणि विमानविद्या
’समरांगणसूत्रधार’ हा इसवी सनाच्या १०व्या-११व्या शतकाच्या पुढेमागे लिहिला गेलेला हिंदु वास्तुशास्त्रावरील संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. धारानगरीचा विद्वान राजा भोज ह्याने हा ग्रन्थ रचला अशी श्रद्धा आहे. म.म. टी. गणपतिशास्त्री ह्यांनी सर्वप्रथम उपलब्ध हस्तलिखितांच्या आधारे ह्या ग्रन्थाची मुद्रणयोग्य आवृत्ति तयार केली आणि बडोदा संस्थानच्या ग्रन्थालयाच्या माध्यमामधून दोन खंडामध्ये ती १९२४ साली प्रसिद्ध केली. तिचाच उपयोग मी पुढील लेखनामध्ये केला आहे. त्यातील संस्कृत श्लोकांची - काही जागी थोडी स्वैर अशी - भाषान्तरे माझी आहेत.
८३ अध्यायांच्या ह्या ग्रंथात वेगवेगळ्या आकाराच्या नगरांसाठी, ग्रामांसाठी आणि खेटकांसाठी (खेडी) जमीन कशी निवडावी, त्यांचे आराखडे कसे असावेत, त्यांमध्ये राजप्रासादापासून वेगवेगळ्या आकाराची घरे कशी आणि कोठे बांधावीत, राजप्रासाद कसे असावेत, वेगवेगळ्या देवतांची देवालये कोठेकोठे असावीत अशा प्रकारच्या स्थापत्यविषयक विचारांपासून, मूर्ति कशा कोराव्यात, चित्रे कशी काढावीत अशा प्रकारच्या कला आणि सजावटीपर्यंतच्या अनेक विषयांवर विवेचन सापडते. आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारची नगरे पायापासून बांधायला मोकळी जागाहि उपलब्ध नाही आणि आधीच अस्तित्वामध्ये असलेली नगरे सांभाळणे बाजूस ठेवून नवी नगरे निर्माण करण्याचे कारणहि नाही. राजप्रासादासारख्या वास्तु बांधणे आता कालबाह्य झाले आहे कारण त्यात राहण्यासाठी ऐतिहासिक प्रकारचे राजेच उरलेले नाहीत. थोडक्यात म्हणजे ह्या ग्रंथात वर्णिलेल्या गोष्टी आता बह्वंशी कालबाह्य झाल्या आहेत आणि केवळ इतिहासाचा अभ्यास असे त्याचे आता प्रमुख महत्त्व उरले आहे. त्यातील विवेचनाचा आजच्या काळातील स्थपतीला - आर्किटेक्ट - विशेष काही उपयोग नाही हे खरे आहे.
सध्या ह्या संस्थळावर चालू असलेल्या दुसर्या धाग्यावरून दिसते की प्राचीन आणि मध्यकालीन हिंदुस्तानात यन्त्रविद्या कशी होती - आणि विशेषत: प्राचीन भारतात विमाने बनविण्याचे ज्ञान होते काय ह्या अनुषंगाने ’समरांगणसूत्रधार’ ह्या ग्रंथाचा उल्लेख वारंवार केला गेला आहे. त्याचे कारण असे आहे की ह्या ग्रंथाच्या एकूण ८३ अध्यायांपैकी ३१वा अध्याय (२२३ श्लोक) ’यन्त्रविधान’ ह्या विषयाला वाहिलेला आहे. प्रासाद, वाटिका, नगरे, मन्दिरे इत्यादि सजविण्यासाठी उपयोगी ठरतील चीजांची निर्मिति हा वास्तुशास्त्राचाच भाग आहे आणि म्हणून ’यन्त्रविधान’ हेहि ह्या अध्यायामध्ये वर्णिलेले आहे. जल, वायु, अग्नि, तसेच नाना धातु, लाकूड, चर्म इत्यादींचा युक्तीने उपयोग करून नाना चमत्कृतिदर्शक ’यन्त्रे’ कशी बनविली जातात ह्याची वर्णने येथे आहेत. अधिक मनोरंजक म्हणजे आकाशात उडणारे विमान कसे करता येते हेहि अध्यायात वर्णिले आहे.
(येथील विमानविषयक भाग वाचून माझे तरी असे मत झाले आहे की ह्या यन्त्रविधान अध्यायातील अन्य बहुसंख्य वस्तूंप्रमाणे हे ’विमान’हि मनोविनोदनाचा भाग, सोप्या शब्दात एक प्रकारचे खेळणे, अशा स्वरूपाचे दिसते. ही विमाने दूरच्या प्रवासाच्या अथवा युद्धाच्या कामाची होती असे वाटत नाही.)
हे वाचून कोणी उत्सुकतेने अध्याय पाहू लागला तर त्याच्या पदरी बरीचशी निराशा येते. ह्या निराशेची कारणे तीनचार आहेत. एकतर बरीचशी ’यन्त्रे’ ही कारंजी, फवारे, कठपुतळी बाहुल्या अशा प्रकारच्या आज अगदी सोप्या वाटणार्या गोष्टी आहेत. १०व्या ११व्या शतकामधील औद्योगिकपूर्व साध्या दिवसांमध्ये ह्याचे कौतुक निश्चित वाटत असणार पण आता काळ आणि समज पुष्कळच पुढे गेले आहेत. दुसरे कारण म्हणजे ह्या वस्तूंची वर्णने अगदी त्रोटक स्वरूपात दिली आहेत आणि केवळ त्या वर्णनांवरून ती वस्तु बनविणे शक्य होईल असे वाटत नाही. सर्वांना विशेष स्वारस्य असणार्या विमानाचे वर्णनहि अगदीच उडतउडत आहे. ते वाचून तसे विमान बनविणे आणि ते कसे उडते हे समजणे शक्य वाटत नाही. ही वर्णने अशी त्रोटक का आहेत ह्याचे उत्तरहि अध्यायातच दिले आहे. त्यासाठी श्लोक ७९-८१ पहा:
यन्त्राणां घटना नोक्ता गुप्त्यर्थं नाज्ञतावशात्॥ ७९
तत्र हेतुरयं ज्ञेयो व्यक्ता नैते फलप्रदा:
कथितान्यत्र बीजानि यन्त्राणां घटना न यत्॥ ८०
तस्माद् व्यक्तीकृतेष्वेषु न स्यात्स्वार्थो न कौतुकम्
वस्तुत: कथितं सर्वं बीजानामिह कीर्तनात्॥ ८१
यन्त्रे का चालतात हे गुप्तता राखण्याच्या हेतूने सांगितलेले नाही. असे न सांगण्याचे कारण अज्ञान हे नाही. ७९
न सांगण्याचा हेतु असा आहे हे लक्षात घ्यावे. हे सांगण्यामुळे काहीहि फळ मिळणार नाही. त्याची बीजे अन्यत्र सांगितलेली आहेत, यन्त्रे का चालतात हे सांगितलेले नाही. ८०
ते स्पष्ट करून सांगण्याने काही साधणारहि नाही आणि त्यामध्ये काही विशेषहि नाही. वस्तुत: बीजांच्या वर्णनातून येथे ते सर्व सांगितलेलेच आहे. ८१
अध्यायाचे पहिले सुमारे ४० श्लोक हे ’बीज’ म्हणजे काय आणि बीजांच्या कमीअधिक प्रभावाने नाना यन्त्रे कशी निर्माण होतात ह्या विवेचनासाठी आहेत. ’क्षितिरापोऽनलोऽनिल:’ म्हणजे पृथ्वी, आप, अग्नि. आणि वायु ह्या चार भूतांची बीजे - त्यांचे अंगभूत गुण - ह्यांच्या कमीअधिक उपयोगाने यन्त्र निर्माण होते. ह्या चारी भूतांना पायाभूत असल्याने ’आकाश’ हेहि पाचवे भूत मानले गेले आहे. ’सूत’ (पारा) हे एक भूत आहे असे जे एक मत आहे ते चुकीचे आहे असे ग्रन्थकर्ता सांगतो कारण ’सूत’ हा प्रकृतीने पार्थिव म्हणजे पृथ्वीभूताचेच रूप आहे. [प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे भूते, त्यांची बीजे आणि त्या बीजांच्या संमिश्रणातून निर्माण होणारी यन्त्रे ह्याचा अर्थ मला समजलेला नाही. जालावर जे थोडे पाहायला मिळाले त्यावरून ’भू्त’ म्हणजे भौतिक (Natural Philosophy) आणि ’बीज’ म्हणजे पारलौकिक (Occult) अशा दोघांच्या सहकार्यातून यन्त्र निर्माण होते असे सुचविले आहे असे दिसते. ग्रीक तत्त्वज्ञ ऍनक्झागोरस (ख्रि.पू. ५००-४२८) ह्याने जी ’seeds’ अथवा ’live principles’ वर्णिली आहेत त्याच्याशी प्रस्तुत ग्रन्थातील ’बीजा’चा संबंध दर्शविला आहे. तसेच ’बीज’ ही संकल्पना समरांगणसूत्रधार ह्या ग्रन्थामध्ये प्रथमच पाहायला मिळते असेहि सांगण्यात आले आहे. पहा 'The Concept of Yantra in the Samarangana-sutradhara of Bhoja' by Mira Roy, The Indian Journal of History of Sciences, 19(2): 118-124 (1984)]
हे मुख्य तत्त्व सांगितल्यावर ग्रन्थकर्ता यन्त्रांच्या प्रकारांकडे आणि यन्त्रांच्या स्वयंवाहक, बाहेरून एकदा प्रेरणा लागणारे अशा प्रकारच्या वर्गीकरणाकडे वळतो. तदनन्तर यन्त्रामुळे काय चमत्कार दिसू शकतात - उदा. जलामध्ये अग्नि आणि अग्निमध्ये जल - असे वर्णन येते. यन्त्रज्ञानामुळे धन, विलास, राजाची कृपादृष्टि, प्रमदांचे प्रेम, विस्मयकारक वस्तु, देवादिकांच्या दर्शनाने त्यांची कृपा अशा सर्व ईप्सित गोष्टी साध्य होतात असे सांगितले आहे.
ह्यानंतर काही चमत्कृतिपूर्ण यन्त्रांचे प्रत्येकी एकदोन ओळींमध्ये वर्णन येते. वर्णनाच्या त्रोटकपणामुळे मला तरी त्यामधून विशेष बोध होत नाही. काही उदाहरणे पहा:
शय्याप्रसर्पण यन्त्र -
विधाय भूमिका: पञ्च शय्या त्वादिभुवि स्थिता
प्रतिप्रहरमन्यासु सर्पन्ती याति पञ्चमीम्॥ ६५
पाच आधार (= भूमिका) निर्माण करून पहिल्या आधारावर ठेवलेली शय्या प्रतिप्रहर अन्य आधारांवर सरकून पाचव्यावर जाते.
नाडीप्रबोधन यन्त्र -
क्रमेण त्रिशतावर्तं स्थाले दन्ता भ्रमन्त्यसौ ॥ ६६
तन्मध्ये पुत्रिका कॢप्ता प्रति नाडिं प्रबोधयेत्
स्थालीमध्ये उभी बाहुली क्रमाने तीनशे दात्यांमधून फिरते आणि दर नाडीला इशारा देते. (घडयाळासारखा escape mechanism वापरून तीनशे दात्यांचे चक्र फिरते आणि दर नाडीला आवाज करते असा ह्याचा अर्थ असावा असे वाटते. नाडी = अर्धा मुहूर्त = २४ मिनिटे.)
गोलभ्रमण यन्त्र -
गोलश्च सूतिविहित: सूर्यादीनां प्रदक्षिणम्॥ ६९
परिभ्राम्यत्यहोरात्रं ग्रहाणां दर्शयन् गतिम्
पार्यावर (सूति = quicksilver, मोनिअर-विल्यम्स) आधारित असा गोल सूर्य इत्यादींचे भ्रमण आणि ग्रहांची गति दर्शवीत अहोरात्र फिरत राहतो.
दूरगमन यन्त्र -
गजादिरूपे रथिकरूपतां गमित: पुमान्॥ ७०
भ्रान्त्वा नाडिकया तस्या: पर्यन्ते हन्ति योजनम्
गज इत्यादि अथवा रथारोही रूपातील पुरुष (बाहुली) नाडीमधून (tube) तिच्या अन्तापर्यंत एक योजन प्रवास करतो.
दीपतैल यन्त्र -
दीपिकापुत्रिका कॢप्ता क्षीणं क्षीणं प्रयच्छति॥ ७१
दीपे तैलं प्रनृत्यन्ती तालगत्या प्रदक्षिणम्
दीपातील बाहुली तालावर नृत्यामधून प्रदक्षिणा करत करत दिव्यामध्ये थोडेथोडे तेल घालत जाते.
जलपान करणारा हत्ती -
यावत्प्रदीयते वारि तावत्पिबति सन्ततम्॥ ७२
यन्त्रेण कल्पितो हस्ती न तद्गच्छत्प्रतीयते
यन्त्रातील हत्ती जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत पीत राहतो. तो जागेवरून हलतांना दिसत नाही.
नाचणारे-गाणारे पक्षी आणि प्राणी -
शुकाद्या: पक्षिण: कॢप्तास्तालस्यानुगमान्मुहु:॥ ७३
जनस्य विस्मयकृतो नृत्यन्ति च पठन्ति च
पुत्रिका वा गजेन्द्रो वा तुरगो मर्कटोऽपि वा॥ ७४
वलनैर्वर्तनैनृत्यंस्तालेन हरते मन:
तालावर नाचणारे आणि बोलणारे पक्षी पाहणार्याच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण करतात. बाहुली, हत्ती, घोडा, माकड तालावर घिरटया घेत नृत्य करून मन रिझवतात.
गाणारे लाकडी पक्षी -
अङ्गुलेन मितमङ्गुलपादेनोच्छ्रितं द्विपुटकं तनुवृत्तम्
संविधेयमृजु मध्यगरन्ध्रं श्लिष्टसन्धि दृढताम्रमयं तत्॥ ८९
दारवेषु विहगेषु तदन्त: क्षिप्तमुद्गतसमीरवशेन
आतनोति विचलन्मृदुशब्दम् शृण्वतां भवति चित्रकरं च॥ ९०
एक अंगूळ व्यासाची तांब्याची दोन वर्तुळे एकमेकांपासून पाव अंगुळाइतकी दूर बसवून त्यामध्ये रन्ध्र पाडून त्याच्या आत लाकडी पक्षी ठेवल्यास येणार्याजाणार्या वार्यामुळे गोड गातात आणि ऐकणार्याचे चित्त रिझवतात.
पुढील तीन श्लोकांवरून मला काहीच बोध होत नाही.
सुश्लिष्टखण्डद्वितयेन कृत्वा सरन्ध्रमन्तर्मुरजानुकारम्
ग्रस्तं तथा कुण्डलयोर्युगेनमध्ये पुटं तस्य मृदु प्रदेयम्॥ ९१
पूर्वोक्तयन्त्रे विधिनोदरेऽस्य क्षिप्तेऽथ शय्यातलसंस्थमेतत्
ध्वनिं तत: सञ्चलनादनङ्गक्रीडारसोल्लासकरं करोति॥ ९२
अस्मिञ् शय्यातलविनिहिते मुञ्चति व्यक्तरागम्
चित्राञ्शब्दान्मृगशिशुदृशां याति भीत्येव मान:
किञ्चैतासां दयितमभितो निर्भरप्रेमभाजाम्
प्रौढिं गच्छन्त्यधिकमधिकं मन्मथक्रीडितानि॥ ९३
दोन खण्ड एकमेकावर चांगले बसवून मुरज वाद्यासारखा (मुरज - डफ अथवा कंजीरा) आकार देऊन आणि मध्ये एक रन्ध्र पाडून त्यामध्ये एक मऊ स्तर द्यावा. ह्याआधी वर्णिलेले यन्त्र त्याच्या आतमध्ये नीट बसविल्यावर आणि त्याला शय्येच्या खाली ठेवल्यावर अनंगक्रीडेला उत्तेजित करणारा ध्वनि ते करते. शय्यतलावर त्याला ठेवल्यावर आणि त्याने चित्रविचित्र आवाज केल्यावर मृगनयनांचा मान जणू घाबरून निघून जातो. एवढेच नाही तर आपल्या प्रियकराविषयी बन्धरहित प्रेम निर्माण झालेल्या त्यांची मन्मथक्रीडिते अधिकाधिक वृद्धि पावतात.
वाद्ययन्त्रे -
पटहमुरजे वेणु: शङ्खो विपञ्च्यथ काहला
डमरुटिविले वाद्यातोद्यान्यमून्यखिलान्यपि
मधुरमधिकं यच्चित्रं च ध्वनिं विदधात्यलम्
तदिह विधिना रुद्धोन्मुक्तानिलस्य विजृम्भितम्॥ ९४
पटह (ढोल), मुरज (डफ), बासरी, शंख, विपंची (Indian Lute - मोनिअर विल्यम्स, सतार, वीणा अशासारखे वाद्य), काहला (काहल एक वाद्य - मोनिअर विल्यम्स), डमरु, टिविल (टिव् टिव् असा आवाज करणारे काही वाद्य - एक तर्क) अशा प्रकारची आघात करून वाजवायची वाद्ये आहेत. असे वाद्य मधुर आणि चित्रविचित्र जो ध्वनि निर्माण करते तो अडवून धरलेल्या आणि मोकळ्या केलेल्या वायूचे विलसित आहे.
ह्यापुढील चार श्लोक विमानसंबंधी आहेत -
लघुदारुमयं महाविहङ्गं दृढसुश्लिष्टतनुं विधाय तस्य
उदरे रसयन्त्रमादधीत ज्वलनाधारमधोऽस्य चातिपूर्णम्॥ ९५
तत्रारूढ: पूरुषस्तस्य पक्षद्वन्द्वोच्चालप्रोज्झितेनानिलेन
सुप्तस्वान्त: पारदस्यास्य शक्त्या चित्रं कुर्वन्नम्बरे याति दूरम्॥ ९६
इत्थमेव सुरमन्दिरतुल्यं सञ्चलत्यलघु दारुविमानम्
आदधीत विधिना चतुरोऽन्तस्तस्य पारदभृतान् दृढकुम्भान्॥ ९७
अय:कपालाहितमन्दवह्निप्रतप्ततत्कुम्भभुवा गुणेन
व्योम्नो झगित्याभरणत्वमेति सन्तप्तगर्जद्ररसरागशक्त्या॥ ९८
हलक्या वजनाच्या लाकडातून मोठया पक्ष्याचा मजबूत आकार निर्माण करून त्याच्या पोटामध्ये पार्यावर चालणारे यन्त्र ठेवावे आणि त्याच्या खाली अग्नि लावून ठेवावा. त्यामध्ये आरूढ असलेली पुरुषाकृति बाहुली दोन पखांच्या वरखाली करण्याने उत्पन्न झालेल्या वार्यामुळे पार्याच्या शक्तीने आश्चर्यवत् दूरवर जाते. अशाच प्रकाराने देवळाच्या आकाराचे मोठे लाकडी विमानहि तसेच दूरवर जाते. त्यासाठी पारा धारण करणारे चार मोठे कुम्भ त्यामध्ये ठेवावेत. लोखंडापासून बनविलेल्या कवटीच्या आकाराच्या (= पसरट) भांडयातील अग्निमुळे तापलेल्या कुम्भांच्या गुणामुळे तापलेल्या आणि मोठा आवाज करणार्या पार्याच्या शक्तीने ते विमान लगेचच आकाशाचे आभूषण बनते.
भीतिदायक आवाजाचे सिंहनाद यन्त्र -
वृत्तसंधितमथायसयन्त्रं तद्विधाय रसपूरितमन्त:
उच्चदेशविनिधापिततप्तं सिंहनादमुरजं विदधाति॥ ९९
स कोऽप्यस्य स्फार: स्फुरति नरसिंहस्य महिमा
पुरस्ताद्यस्यैता मदजलमुचोऽपि द्विपघटा:
मुहु: श्रुत्वा श्रुत्वा निनदमपि गम्भीरविषमम्
पलायन्ते भीतास्त्वरितमवधूयाङ्कुशमपि॥ १००
पक्के आणि वर्तुलाकृति लोखंडी यन्त्र आत पार्याने भरून उंच जागी ठेवून तप्त केल्यास सिंहनादासारखा ढोलाचा आवाज करते. जणू काही नरसिंहाचा पसरलेला महिमाच असा हा गंभीर आवाज असा असेल की हा कानी पडल्यावर मदमत्त हत्ती भयभीत होत्साते अंकुशाच्या टोचणीची पर्वा न करता पलायन करतील.
हलणार्या-डोलणार्या कठपुतळी बाहुल्या -
दृग्ग्रीवातलहस्तप्रकोष्ठबाहूरुहस्तशाखादि
सच्छिद्रं वपुरखिलं तत्सन्धिषु खण्डशो घटयेत्॥ १०१
श्लिष्टं कीलकविधिना दारुमयं सृष्टचर्मणा गुप्तम्
पुंसोऽथवा युवत्या रूपं कृत्वाऽतिरमणीयम्॥ १०२
रन्ध्रगतै: प्रत्यङ्गं विधिना नाराचसङ्गतै: सूत्रै:
ग्रीवाचलनप्रसरणविकुञ्चनादीनि विदधाति॥ १०३
करग्रहणताम्बूलप्रदानजलसेचनप्रमाणादि
आदर्शप्रतिलोकनवीणावाद्यादि च करोति॥ १०४
नेत्र, मान, हाताचा तळवा, मनगट, हात, मांडया, बोटे असे संपूर्ण शरीर त्यात जागोजागी छिद्रे ठेवून तुकडयातुकडयांनी बनवावे. खिळ्यांनी त्याला पक्के घट्ट करून पुरुषाच्या वा तरुणीच्या सुंदर रूपामध्ये त्याला बनवून कमावलेल्या कातड्याने झाकावे. विशिष्ट औषधी (नाराच = a particular medicament मोनिअर विल्यम्स) लावलेल्या आणि छिद्रांतून ओवलेल्या दोर्यांच्या वापराने मान हलविणे, लांब वा आखूड करणे, हातात हात देणे, ताम्बूल देणे, पाणी शिंपडणे, आरशात निरखणे, वीणावादन करणे इत्यादि गोष्टी हे शरीर करते.
द्वारपाल, रक्षक अशी कार्ये करणार्या बाहुल्या -
पुंसो दारुजमूर्ध्वं रूपं कृत्वा निकेतनद्वारि
तत्करयोजितदण्डं निरुणद्धि प्रविशतां वर्त्म॥ १०६
खड्गहस्तमथ मुद्गरहस्तं कुन्तहस्तमथवा यदि तत्स्यात्
तन्निहन्ति विशतो निशि चौरान् द्वारि संवृतमुखं प्रसभेन॥ १०७
लाकडापासून केलेले पुरुषाचे रूप निवासस्थानाच्या द्वारात ठेवल्याने त्याच्या हातात दिलेला दंड आत प्रवेश करू पाहणार्यांचा मार्ग अडविते. ते रूप तोंड झाकलेले आणि हातामध्ये खड्ग, मुसळ अथवा भाला धारण करणारे असेल तर ते रात्री प्रवेश करू पाहणार्या चोरांना द्वारातच निर्दयतेने मारून टाकते.
ह्यानन्तर श्लोक १०९ ते १७१ ह्यांमध्ये नाना जलयन्त्रे आणि धारागृहे कशी निर्माण करावीत ह्याचे विस्तृत वर्णन आहे. उंचावरून खाली पडणारे अथवा जमिनीखालील बोगद्यातून (सुरंग) आणलेले पाणी सच्छिद्र वा छिद्रविरहित नालिकांचा उपयोग करून कसे खेळवावे, त्यातून कारंजी कशी करावीत अशा प्रकारचे हे वर्णन आहे. त्याच्या शेवटी -
वापीस्थलस्थितमथ त्रपयावनम्र-
माच्छादितस्तनभरं करपल्लवेन।
गाढावसक्तवसनं जलरोधमुक्ता-
वालोकते प्रणयिनीजनमत्र धन्य:॥
जलविहाराच्या वापीमध्ये लाजेने खाली दृष्टि लावलेल्या, स्तनभार हातांनी झाकणार्या, अडविलेले पाणी सुटल्यावर अंगाला वस्त्र चिकटलेल्या प्रणयिनींना जो पाहातो तो धन्य आहे.
अखेरीस चार प्रकारचे झोपाळे कसे करावेत ह्याच्या वर्णनानंतर हा यन्त्रविधान अध्याय समाप्तीला येतो.
(अवान्तर - ’यन्त्रसर्वस्व’ नावाच्या ग्रन्थामध्ये भारद्वाजऋषींनी विमानविद्येचे निरूपण केले आहे अशी श्रद्धाळूंची श्रद्धा आहे. ह्या लेखासाठी वाचन करतांना हा निबंध माझ्या वाचनात आला. निबंधकर्त्या प्राध्यापकांना, जे Indian Institute of Science madhIla praadhyaapaka aaheta, भारतात प्राचीन कालामध्ये विमान विद्या होती हे विश्वासार्ह वाटत नाही आणि प्राचीन भारतातील विमानविद्येची ही सर्व गोष्ट २०व्या शतकातच निर्माण झाली आहे असे मत त्यांनी मांडले असून ते मत का आणि कसे निर्माण झाले हेहि दाखविले आहे.)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about समरांगणसूत्रधार ग्रन्थातील यन्त्रविधान आणि विमानविद्या
- 69 comments
- Log in or register to post comments
- 25342 views
विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी
विकीपीडीयावरच्या मराठी टंकनाबद्दल माहितगारमराठी यांनी काढलेले धागे, उदय यांचा एक प्रतिसाद आणि मागे झालेल्या काही खरडगप्पांमुळे हा धागा काढत आहे. (शिवाय स्वतःचं नाव सातत्याने बोर्डावर दिसायला नको का!)
Taxonomy upgrade extras
- Read more about विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी
- 53 comments
- Log in or register to post comments
- 56186 views
आईनस्टाईनबाबांचा (आईबाबांचा) स्थिरांक
फ्रान्स नावाचा एक देश होता. तिथे बरेच शास्त्रज्ञ राहायचे/आले. त्यातला एक एके दिवशी एक दगड घेऊन आला नि म्हणाला कि आजपासून याच्या वस्तुमानाला एक किलो म्हणायचे. http://en.wikipedia.org/wiki/Kilogram दुसरा एक छडी घेऊन आला नि म्हणाला कि आजपासून हिच्या लांबीला एक मीटर म्हणायचे. http://en.wikipedia.org/wiki/Metre तिसरा एका द्रव्याचे एक आयसोटोप घेऊन आला नि म्हणाला कि आजपासून या या दोन उर्जास्थितींतून स्थांनांतर करताना याच्यातून एक हजार तरंगलांब्या निघायला जितका वेळ लागतो तो एक सेकंद मानायचे. http://en.wikipedia.org/wiki/Second
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आईनस्टाईनबाबांचा (आईबाबांचा) स्थिरांक
- 34 comments
- Log in or register to post comments
- 10568 views
आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अॅन्ड्रॉईड अॅप
नमस्कार मंडळी.
सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप तय्यार केले आहे. हे अॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
कित्त्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत. अश्यावेळी, "आरती संग्रह (मराठी)" अॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अॅन्ड्रॉईड अॅप
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1807 views
ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
गोव्याच्या कोंकणी भाषेच्या भाषिकांना मदतीची विनंती
नमस्कार,
मी अनेक वर्षांनी इथे पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करते आहे. शब्दनिवडीच्या ज्या चुका होतील, त्या कृपया गोड मानून घ्याव्यात ही विनंती!
मला सध्या गोव्याची कोंकणी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची थोडी मदत हवी आहे. जर तुम्ही ह्या भाषेचे भाषिक असाल, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा अथवा इथे प्रतिक्रिया द्या.
थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:
काय मदत हवी आहे?
डेटा ॲनोटेशन करायचे आहे: म्हणजे ह्या भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्या मजकूराची शैक्षणिक गुणवत्ता काय ह्याचे रेटिंग द्यायचे आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about गोव्याच्या कोंकणी भाषेच्या भाषिकांना मदतीची विनंती
- 3 comments
- Log in or register to post comments
- 764 views