भाजीमंडई
ललित लेखनाचा प्रकार
वाळकं
काही दुर्दैवी लोकांना ती गुळगुळीत खिरा काकडी म्हणजेच काकडी असं वाटतं. वाळुक न खाल्लेली काही माणसं ओळखीत आहेत पुण्यातली.
अजून एक म्हणजे गाजर.
दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा मोठा असेल तर माझी आजी तो सरळ म्हशीला घालते. पुण्यात लहान कोवळी दोडकी मिळणं महामुष्कील. बंगलोरला तर लहान कोवळी दोडकी खाणे म्हणजे पाप आहे की काय असं वाटतं.
काशी बोरं आणि देशी बोरं असे दोन बोरांचे प्रकार. हे सगळीकडे मिळतात. सांगली-मिरज-कोल्हापूर इकडे भाज्या खरंच मस्त ताज्या मिळतात.
भाज्या
प्रत्येक गांवी, भाज्या वेगळ्या चवीच्या मिळतात, असा अनुभव आहे. मुंबईत रहात असताना, कोबी, फ्लॉवर या भाज्यांना, शिजवल्यावर, एक प्रकारचा उग्र वास जाणवत असे. त्यांत कोबीच्या भाजीला तर, घासाच्या शेवटी, एक कडवट चव जिभेवर जाणवायची. अर्थातच, ती फक्त माझ्यासारख्या खवय्यांनाच जाणवायची. आता पुण्याला आल्यावर फरक जाणवतो. कोबीची भाजी नुसतीच खाऊ शकतो, पाहिजे तेवढी. फ्लॉवरचा उग्रपणा तेवढा जाणवत नाही. वांगी कधीही कडु निघत नाहीत. आम्ही एवढ्यावरच खूष! मग कोल्हापूरला गेलो तर याहून चांगल्या चवीच्या भाज्या मिळतील, हे कळले.
बडोद्याला, खंडेराव मार्केटमधे फारच छान भाज्या मिळायच्या. वांगी तर फारच चांगल्या चवीची. पुढे, कामानिमित्त कंपनीच्या गेस्ट हाऊसवर गेल्यावर, त्या राजस्थानी महाराजच्या हाताला तर अशी काही चव होती की साधाच स्वयंपाक पक्वान्नासारखा वाटायचा. आमटी तर किती वाट्या प्यायचो, त्याची गणनाच नाही.
काही गोष्टी आठवल्या. जमेल त
काही गोष्टी आठवल्या. जमेल तशा लिहितो.
मलाही अगोदर कळायचं नाही की हे लोक दोन-दोन किलो वांगी घेऊन का जातायत त्यांच्या गावी. एकदा मावशीच्या घरी फलटणला गेलो असताना तिने बाकी काही नको फक्त वांगी आणि खवा घेऊन ये (मिरजेच्या विटा डेअरीत उत्तम खवा मिळायचा) असं सांगितल्याचं आठवतंय. ती घेऊन गेलो तर तिच्या मिस्टरांनी खुश होत "वाह कृष्णाकाठची वांगी!!" असं म्हणल्याचं आठवतंय. त्यावेळी आम्हाला त्याच नावाचा मराठीत एक धडा होता ते झटकन मला तिथे क्लिक झालं.पुस्तकात वाचलेल्या गोष्टींचं ते पाहिलं प्रात्यक्षिक वगैरे असावं.
त्यात पण सगळ्यात बेस्ट वांगी म्हणजे नरसोबाच्या वाडीची. हिरवट पांढरी. त्या वांग्याची भरली भाजी काय होते म्हणून सांगू. माणूस वाडीला जाणार असेल तर त्याला बासुंदी,कवठाची बर्फी आणि किलोभर वांगी घेऊन येण्याची ऑर्डर हमखास मिळते आजही घरच्यांकडून.
इथे मुंबईतली जांभळी वांगी अजिबात आवडत नाहीत त्यामुळे आजही घरून जाताना वांगी घेऊन जाणं होतच.
अख्ख्या पुण्यात मला वाळकं कुठंच दिसली नव्हती, सगळीकडं त्या फिकट हिरव्या रंगाच्या गुळगुळीत काकड्या. मी तोपर्यंत त्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. फक्त ओटी भरताना असतात तसल्या या काकड्या वाटतं असं वाटलेलं. पण त्या अजूनच वेगळ्या हे नंतर समजलं.
माझी आज्जी अस्सल कोल्हापुरी. आम्ही सरसकट सगळ्याच प्रकारांना काकडी म्हणायचो. पण ती मात्र वाळकं काकडी असे दोन शब्द वापरायची. स्वैपाक करताना वाळकाची कोशिंबीर करू काय असं विचारायची. वाळकं आणि काकडी कशी ओळखतात ते मला समजायचं नाही. आज किती दिवसांनी वाळकं हा शब्द ऐकला.
कोल्हापुरात मिळणारी अजून एक भारी पालेभाजी म्हणजे पोकळा जो आमच्या बाबांना अतिशय आवडायचा आणि आजी मिरजेला येताना न चुकता दोन पोकळ्याच्या पेंड्या घेऊन यायची. बाबांनी प्रचंड शोधूनही त्यांना शेवटपर्यंत मिरजेत-सांगलीत पोकळा मिळाला नाही कधी. अजून पण मिळतो की नाही माहित नाही.
चवीला काय लागायची ती भाजी. कितीही मोठी पेंडी असली तरी भाजी करताना इतकी आळायची की जेमतेम दोघांना पुरेल इतकीच भाजी बनायची. पण अफाट चव होती. खूप वर्षं झाली खाल्लाच नाही पोकळा.
केवळ पन्नास किलोमीटर अंतर असूनही सांगली आणि कोल्हापूरच्या ठेवणीतल्या शब्दांत कमालीचं अंतर आहे. उदा. आमच्या इथे हरभरा डाळ वाटून केलेल्या तिखट पदार्थाला "वाटली डाळ" म्हणतात तर कोल्हापुरात त्याच पदार्थाला "मोकळं तिखट" म्हणतात. हे एक उदाहरण झालं बाकी अनेक असतील.
सहमत. पोकळ्याबद्दल क्व
सहमत. पोकळ्याबद्दल क्वचित कधीतरी ऐकलं पण भाजी कधीच नै खाल्ली. सांगली-मिरजेत पोकळा मिळत नाही हे खरेच.
वाळुक हा शब्द आजी-आजोबा वापरत. काकडी अन वाळूक यांत काय फरक आहे ते मला अजूनही माहिती नाही. आईबाबांनी मात्र कधी हा शब्द वापरल्याचे आठवत नाही. 'आळणे' हाही खास तिकडचाच शब्द.
विटा डेअरीतील खवा अजूनही उत्तम आहे.
वाटली डाळ हा एक अतिप्रिय पदार्थ. त्याला कोल्हापुरात मोकळं तिखट म्हणतात हे माहिती नव्हते. रच्याकने हळदीकुंकवातली ती कसलीशी कोशिंबीर असते तीही फार आवडते. लहानपणी आईसोबत कधी हळदीकुंकवात जात असे तेव्हाच ती केली जाई, अदरवाईज कधी केल्याचे आठवत नाही.
काकडीबद्दल अजूनेक म्ह. आमचे उत्तरभारतीय मित्रही ककडी आणि खीरा असे दोन शब्द वापरतात. पण त्यांचे म्यापिंग काही केल्या लक्षात येत नाही.
माईनमुळा हा प्रकारही बहुधा मला वाटते विशेषकरून आपल्या भागातलाच असावा. धारवाड भागात होत नाही हे नक्की.
पोकळा खाऊन बघ बॅटमॅन,
पोकळा खाऊन बघ बॅटमॅन, त्याच्याच जातीतली तांदळी/तादूळसा/तांदूळजाची भाजी. नुसतीच परतून भाकरीबरोबर खायलाफार मजा येते. इथं पोकळा मुबलक मिळतो.
वाळकं म्हणजे हिरव्या रंगाची बारकी (कधी सरळ, कधी वाकडी) असणारी काकडी. ती त्या खिऱ्या काकडीसारखी गब्दुल असत नाही आणि गुळगुळीतपण असत नाही. तिला अगदी बारीक लव असते.
बसाप्पाचा पेढा भारी हे खरेच
बसाप्पाचा पेढा भारी हे खरेच, पण हाडाचा मिरजकर असूनही माझे मत वाडीच्या पेढ्याला. त्याची सर कशालाच येऊ शकत नाही. ताजा ताजा खवा करतात, डोळ्यासमोरच दूध आटवतात. त्याची चव जगात भारी असते. वाडीला जेवायचं आणि खिद्रापूरचं देऊळ पाहून मिरजेला परतायचं हा प्रोग्र्याम स्ट्याण्डर्ड आहे. तेवढा तिथपर्यंतचा रस्ता नीट बनवा म्हणावे.
+१
वाडीचा पेढा आणि बासुंदी लै भारी. पण ती तिथेछ खायला मज्जा येते. वाडीच्या मंदिराच्या रस्त्याला लागून असलेल्या गल्लीत १-२ मस्त दुकानं आहेत. सकाळी-सकाळी गेलं तर आपल्यासमोर खवामशीनमध्ये दूध आटत असतं. फक्त तेव्हा मिळणारी बासुंदी गार नसते. १०-११च्या सुमाराला गेलात तर थंडगार बासुंदी मिळते.
असं? लक्षात ठेवीन. तूर्त म
असं? लक्षात ठेवीन. तूर्त मला सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलजवळचे अनुराधा हे एक उत्तम मटन थाळीवाले हाटेल माहिती आहे. मिरजेतला रेहेमतुल्ला म्ह. नुस्ते नावच मोठे, लक्षण इतके कै खास नै. पवार बंगल्याजवळ पटेल म्हणून नवीन हाटेल सुरू झालेय तेही बरे आहे.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Karadantu
डिंक डेसर्ट. कर्नाटक पेश्शल, बॉर्डरकडं फेमस.
आबा , भर पुण्यात नवीन पुणे
आबा , भर पुण्यात नवीन पुणे तिसात ( म्हणजे कोथरूड , कर्वेनगर , सिंहगड रोड ईस्ट * )मध्ये सगळीकडे जोशी स्वीट्स मध्ये मिळतंय . ( हे जोशी स्वीट्स वाले जोशी /परचुरे का जे कोण ते हुबळी का धारवाड चे आहेत . एकमेकांशी कानडीतच बोलतात )
* म्हणजे सिंहगड रोड विठ्ठलवाडी पर्यंत . धायरी ते किरकिटवाडी पुणे तिसात नाही येत .
काहीही
शेगाव ला पण दोन कचोऱ्या मिळतात, त्यात ती लाल डगलेवाल्या शर्माजींची कचोरी मस्त अस्ते.
पुण्याला मला वाटते डेक्कन ला मिळते. बावधन ला ही.
मुंबई मध्ये मात्र नाहीच मिळत कुठे, पारल्यात विदर्भ वडापाव म्हणून एक दुकान आहे, बंधुराज तिथून शेगाव कचोरी घेऊन आले, एकदम बंडल...
निषेध निषेध निषेध..!!!
अस्सल मुंबईकरासाठी मुंबई फक्त बोरीवली ते चर्चगेट (वेस्टर्न लाईन वाले) आणि अन्धेरी ते सी एस टी (हार्बर लाईन वाले) येवढीच आहे. बाकी ते सेन्ट्रल वाल्यांना मुलुंड परेन्त घ्यावं लाग्तय म्हणून पण चंबूर (ऋषि कपूर तिथे राहतो हे सोडून बाकी काय अस्तय माहीत नाही.), घाटकोपर, कुर्ला(एकदम कंडम / बाद जागा असं ऐकल्याने तिथे जायचं कशाला?) गोवंडी (तडीपार लोक राहणार नंबर एक) इ. इ. ही असली भिकार ठेसनं मुंबईत येत नाहीत.
पुणेकरांना काय चार पुणेकर एकत्र जमून टुकार मिसळपाव वाल्याला पण "धन्यवाद, थोर" वगैरे संबोधतात आणि अख्खं पुणं तिथे लोटतं. तस्मात पुणेकरांनी पुण्याला काय वाटेल ते म्हणावं मुंबईच्या वाटेला जाऊ नये.
खिक्क!!
अस्सल मुंबईकरासाठी मुंबई फक्त बोरीवली ते चर्चगेट (वेस्टर्न लाईन वाले) आणि अन्धेरी ते सी एस टी (हार्बर लाईन वाले) येवढीच आहे.
खिक्क!!
तुम्ही "अस्सल" मुंबैकर नाहीत हेच सिद्ध होतय!
जिथे रिक्षा जात नाहीत तीच "अस्सल" मुंबै!!
(जन्माने चौपाटीकर) सुनील
खरा मुंबईकर
>>तुम्ही आंग्लाळलेले म्हंजे सोबो वाले मोठे लोकं आहात.
मी इथेच जन्माला आलेली आहे.. आणि परकीयांना आम्ही मुंबईचं नागरीकत्व देत नाही. फक्त जन्माने मुंबैकर असू शकतात
<<
ह्यावर माझ्या परिचयातले स्वतःला खरे मुंबईकर समजणारे काय म्हणतात ते पाहा :
ज्यांची मुंबईत पिढीजात जमीन आणि शेती होती ते आम्ही खरे मुंबईकर. बाकी सगळे नंतर आलेले लोक. (त्यांची खरोखर शेतजमीन होती. त्यांची कुळं कोळी होती. अजूनही त्यांच्या घरच्या गणपतीला दर वर्षी नेमानं नैवेद्य म्हणून ते कोळी लोक ताजे मासे घेऊन येतात.) मुंबईत माझ्या माहितीतले असे लोक बाणगंगा तलावापासून पार कांदिवली-बोरिवलीपर्यंत आहेत.
ठाणं मुंबईत केव्हापासून
ठाणं मुंबईत केव्हापासून यायला लागलं म्हणे???
त्याचे काय आहे, तत्त्वत: आणि तांत्रिकदृष्ट्या ठाणे हे यमशीजीयमच्या हद्दीत येत नसेलही (तेच पिनकोड आणि तेच एष्टीडीकोड शेअर करत असले तरी - चूभूद्याघ्या), परंतु बाहेरच्या माणसाशी बोलताना अनेकदा ठाण्याचेच काय, पण पार डोंबिवली/उल्हासनगर/कल्याण इतकेच कशाला, अगदी बदलापूरपर्यंतचे लोक "आम्ही 'बॉम्बे'त (आता 'मुंबई'त) राहातो" म्हणून सांगतात, असे निरीक्षण आहे ब्वॉ. (सन्माननीय अपवाद असतीलही - चूभूद्याघ्या.)
दादर (प.) मुंबईत नाही? बरं!
मुंबई मध्ये मात्र नाहीच मिळत कुठे
........शिवाजी पार्क, सेना भवन, दादर पश्चिम परिसर येत असेल तुमच्या मुंबईत, तर जिप्सी कॉर्नरच्या शेजारी एक चहावाला आहे, त्याच्याकडे आहे शेगाव कचोरी. ती ला. ड. शर्माजींची की कसे ते नाही ठाऊक. तिथूनच माहीमच्या दिशेने जाताना अय्यंगार बेकरी लागते. तिच्या आसपासही आहे एक दुकान.
मस्त. कपिलतीर्थ मंडई
मस्त. कपिलतीर्थ मंडई भुलभुलैय्या आहे एक .. कुठून कुठे निघायचो कळायचंच नाही.
बाकी भाजीविक्रेत्यांप्रमाणेच इथले रिक्षावाले पण उर्मट नाहीत. विशेषतः पुण्याहून आल्यावर हा फरक लगेच जाणवतो.
अवांतर : अवंतीचं कांदेपोहे प्रकरण पण आवडलेलं . त्यावर लिहायचं होतं पण आळस ...
आता तर आमच्या कोल्हापूरची आहे म्हणून अजूनच आवडली अवंती.
घारगावचे पेढे
दरवर्षी सुट्टीत नाशिकला जाताना, घारगावचा पेढा मला वडिल घेऊन द्यायचे. अजुनही तो मला फार आवडतो. पण आता तशी चव राहीली नाही. गडद तपकीरी रंगाचा मोठा चपटा गोल आकाराचा पेढा एस टी च्या खिडकीतून विकत घ्यायचा. साध्या वर्तमान पत्रात गुंडाळून तो पेढा माझ्या हातात यायचा. काय आनंद व्हायचा तेव्हा.
तसच नगर माझ आजोळ तिथून नेहमी बोर पुण्याला आणली जायची. आधी वाटायच की पुण्यात पण मिळतात की. जेव्हा ती बोर खाल्ली त्या वेळी चवीतला फरक कळाला.
घारगाव
आळेफाट्याहुन नगर ला जाताना लागतं तेच का हे?
एकदा मावशी मी आई आणि काका आळेफाट्याहून येवल्याला जाताना काकांनी घारगाव ला एका जागी मलई रोटी, शेव भाजी आणि अक्खा मसूर खायला घातलेला.. गव्हाच्या जाड दोन रोट्या एका वर एक दाबलेल्या आणि मध्ये लाल तिखट घालून कालवलेल्या मलईचा जाड थर. नुस्ती गरम गरम रोटी सुद्धा भारी लागती. हॉटेल अगदीच टपराट होतं.
हॉटेल लक्ष्मी नाव होत त्याचं.. मुख्य म्हंजे, हॉटेल मियाभाईचं आहे.
मी पण येवल्याहुन येताना
मी पण येवल्याहुन येताना त्याच एरीआत "चौरंगीबाबा" किंवा अश्या नावाच्या सेमीटपरी कम धाबा हॉटेलात उत्कृष्ट जेवण खाल्ले होते.
गल्ल्याच्या मागे अनिरुद्धबापु चा मोठ्ठा फोटो होता. मालकाला आवर्जुन जेवण चांगले असल्याचे सांगितल्यावर त्याने बापुंची कृपा असल्याचे सांगितले.
खरी गोष्ट वेगळीच आहे. "जा
खरी गोष्ट वेगळीच आहे. "जा बेटी, जी ले अपणी जिंदगी" म्हणताना आमरसपुरीच्या मनात आलेलं की पोरीनं तसंही शेण खाल्लेलंच आहे, तेव्हा ही ब्याद आता घरातून गेलेलीच बरी. नायतर कुलजीते ला राज (नाम तो सुना होगा) नं बंदूक दाखवूनही आमरसपुरीनं गच्च हात धरून ठेवलेला. तस्मात राज (नाम तो सुना होगा) चं कौतुक नाही. काजोलला धावता येईल इतक्याच स्पीडने रेल्वे पळवणारा रेल्वे डायवर आणि तिला जाऊ देणारा आमरसपुरी हेच खरे हीरो.

मस्त लिहिलंय, बाकी ते
मस्त लिहिलंय, बाकी ते अंबाडी तांदळी पोकळा माठ चाकवतादींचा उल्लेख राहिला वाट्टे. कोल्हापुरातील मंडईतील खरेदीचा माझा अनुभव बाकी तोकडाच- एकदाच खरेदी केलेली. नववी-दहावीत असेन तेव्हा. आतेभावाबरोबर जाऊन दोन जुड्या पालक घेऊन आलो तेव्हा साफ करताना आत्याच्या लक्षात आले की त्या जुडीत भुंगा लपलेला होता. =)) कळायचं बंद झालेलं तेव्हा.