Skip to main content

लघु वाल्गुदभारत- भाग २.

ऋषिकेश Wed, 12/09/2012 - 15:47

पुन्हा एकदा __/\__

ठंठंठठंठं ठठठंठठंठः तर कहर आहे!

राजेश घासकडवी Wed, 12/09/2012 - 19:18

जबरदस्त.
अस्त्युत्तरस्यां ने सुरूवात आणि ठंठंठठंठं ठठठंठठंठः ने शेवट हे महानच.

पुढचे भाग काय बॉंग्लामध्ये येणार की काय? :) किंवा जोकरचं वर्णन ढसाळी शैलीत कदाचित...

बॅटमॅन Fri, 19/10/2012 - 20:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कार्यबाहुल्यात "बाहुल्य" झालो असल्याने सध्या काही दिवस व्यस्त हौ. लौकरच फुडचा भाग लिवनारे :)

'न'वी बाजू Wed, 12/09/2012 - 23:21

या 'लघु वाल्गुदभारता'चे नामांतर मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून 'वाल्गुडी डेज़' असे करता यावे काय? भविष्यात कधीतरी दूरदर्शन मालिका वगैरे काढायची झाल्यास कदाचित कामी येईल, असे वाटते.

कृपया विचार व्हावा.

नितिन थत्ते Thu, 13/09/2012 - 15:10

मस्त. दोन्ही भाग उच्च आहेत.

अवांतरः
खलु वेनकुलोद्भवः

दुष्ट वेन राजाने नियोगाची पद्धत सुरू केली असं मनुस्मृतीत वाचलं होतं. त्याच वेन कुलात उत्पन्न झालेला तर नव्हे?-

अमुक Sun, 07/10/2012 - 23:37

शाळेत असताना पाठ्यपुस्तकात वाचलेले संस्कृत वेचे (अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा..) आणि भोज-कालिदासाची कुटप्रश्नाञ्ची जुगलबन्दी (..ठंठंठठंठं..) आठवली कितीतरी वर्षान्नी. खूप खूप आभार. पुढच्या भागांसाठी उत्सुक.

ऋता Thu, 25/10/2012 - 01:32

रोचक आहे लिहिलेलं.

"वाल्गुदभारत" की "वल्गुदभारत"? नक्की कोणता शब्द बरोबर आहे आणि त्याचा अर्थ काय? (भाग एक आणि दोन: शीर्षक पहा)

बॅटमॅन Thu, 25/10/2012 - 01:35

In reply to by ऋता

ऊप्स गलतीसे मिष्टेक होगया. वाल्गुदभारत हा शब्द बरोबर आहे. वाल्गुद=वटवाघूळ (संस्कृतमध्ये). बॅटमॅनची संक्षिप्त कहाणी म्हणून ते लघु वाल्गुद-भारत.