Skip to main content

"बिंज् वॉचिंग" (Binge Watching)

सर्वात आधी, "बिंज वॉचिंग" म्हणजे काय ? तर माझ्या समजुतीप्रमाणे, "बिंज" हा शब्द "अल्पावधीत अतिरिक्त सेवन करणं" अशा अर्थाने रूढार्थाने अस्तित्त्वात आहे. बहुतांशी तो एकेका रात्री दारूचे "खंबेच्या खंबे" पिण्याला किंवा "तुडुंब" भरून मेजवानी करण्याला वापरला जात होता/अजूनही वापरतात.

तर मग हे "बिंज वॉचिंग" म्हणजे काय तर, एखाद्या प्रदीर्घ मालिकेचे सर्वच्या सर्व भाग एकसलग बघणे. (किंवा, असं एकसलग बघून दोने-तीन सत्रांमधे त्या मालिकेचे अथपासून इतिपर्यंतचे भाग संपविणे!)

अमेरिकेमधे (की युरपमधेसुद्धा ? कल्पना नाही.) चित्रपटांबरोबर लोकप्रिय मालिकाही ऑनलाईन माध्यमांद्वारे उपलब्ध होण्याला सुरवात झाली, आणि या "बिंज वॉचिंग"ची साथ तरुण पीढीमधे - कॉलेजच्या डॉर्मेटरीजमधे वगैरे विशेषतः - पसरली. आणि मग जसं कुठल्याही "पॉप कल्चर फिनोमिना"चं होतं तसं ही साथ हळुहळू जनसामान्यांमधेही पसरायाला सुरवात झाली. "बिंज वॉचिंग" या संज्ञेमागचा मला समजलेला कार्यकारणभाव तो हा.

अलिकडच्या एक दोन वर्षांमधे या प्रकाराला अस्मादिक सामोरे गेले. (आता 'तुमच्यासारखे गोगलगायीच्या वेगाने चालणारे समाजघटक बिंज वॉचिंगमधे आले म्हणता, ही फ्याशन आता कचर्‍याच्या डब्यात जायला हरकत नाही' असे मत आमच्याच काही शुभचिंतकांनी (!) व्यक्त केलेले आहे हा भाग अलाहिदा) काही गोष्टी समजल्या. त्या तपासून पहाणे नि न समजलेल्या गोष्टी समजून घेणे असा या, काहीशा विस्कळित धाग्यामागचा उद्देश.

- आता हा प्रकार (अतिमद्यपान किंवा अतिखानपान यांसारख्या त्याच्या थोरल्या भावंडांसारखाच) अनारोग्यकारक आहे हे काय वेगळे सांगणे ? "आता थांबू, आता थांबू" म्हणत म्हणत माणसं एपिसोड मागून एपिसोड बघत रहातात नि रात्रीच्या रात्रींचं खोबरं होऊन जातं. शिवाय कुटुंबसंस्थेच्या अनुषंगाने काय काय होतं हे सांगायला मी पामर असमर्थ आहे. नवरा-बायको-मुले यांच्यामधे टिव्ही दुरावा निर्माण करत असेल तर "बिंज वॉचिंग" त्यांना एकमेकांपासून प्रचंड वेगाने दूर लोटतं हा आरोप मला मान्य आहेच. (परंतु कुठल्याही अट्टल अल्कोहोलिकला सारं काही मान्य असूनही तो ते करतच रहातो, तीच गत येथेही होते हे नमूद करणे भाग आहे. )

- उपरोक्त दुष्परिणामांव्यतिरिक्त एका काहीशा महत्त्वाच्या गोष्टीकडे मला लक्ष वेधून घ्यायचं आहे - किंवा मला ते समजून घ्यायचं आहे म्हणाना. या बिंज वॉचिंगच्या आधी मला कुठलीही चित्रमालिका हा प्रकार अपुरा किंवा त्रासदायक वाचायचा. मालिका म्हण्टल्या, की आज एक तास बघा. मग एक आखखा आठवडा वाट पहा. मग दुसरा भाग पहा. त्यात परत त्या जाह्यरातींचा त्रास. अगदी शोज् रेकॉर्ड करून जरी पाह्यला गेलं तरी फारफारतर जाहिराती टाळता येतील, पण ते "अगले किश्त"साठी वाट पहाणं आलंच. या प्रकारामुळे चित्रमालिका हा प्रकारच मला कधी महत्वाचा वाटला नाही. एखादा चित्रपट म्हणजे कसं गोळीबंद काम आहे. त्या दोन तीन तासापुरते आपण अव्यभिचारी निष्ठा ठेवून ते पहायचं. Unity of space and time. सिरियलमधे ती मजा कुठून येणार ? हा आजवरचा विचार. पण या बिंज वॉचिंगने त्याला नक्कीच तडा दिला असं म्हणायला हवं.

"ब्रेकिंग बॅड" नावाच्या मालिकेचे असे सुमारे पाच "सीझन्स" - म्हणजे जवळजवळ सत्तर-ऐंशी (की अधिक ?) भाग मी बिंज वॉचिंगमधे पाहिले. व्यक्तिशः ही मालिका मला उत्कृष्ट दर्जाची वाटली/वाटते. तर ही मालिका पहातानाच माझ्या मनात असे कायसेसे विचार आले की, एखादा चित्रपट त्याच्या आस्वादाच्या Unity of space and time या गोष्टीमुळे एखाद्या प्रदीर्घ कथेसारखा किंवा कादंबरीसारखा Dense अनुभव देत असेल तर या बेट्या 'बिंज वॉचिंग'मधे "ब्रेकिंग बॅड" सारखं काही पाहिलं तर आपण काहीतरी महाकाव्यासदृष तर अनुभवत नाही आहोत ? "ब्रेकिंग बॅड" या मालिकेच्या मला वाटणार्‍या दर्जेदारपणाबद्दल दुमत होईल यात शंका नाही. पण मुद्दा "ब्रेकिंग बॅड" ह्या, किंवा कुठल्याही एकाच मालिकेबद्दलचा नसून, काहीएक किमान दर्जा असणारं काहीही एकसलग अनुभवण्याबद्दलचा , त्या एकसलग अनुभवण्यात नक्की काय नवं हाती गवसलं याबद्दलचा आहे.

तुमच्यापैकी कुणाला यात स्वारस्य वाटते काय ? वाटत असल्यास कसे ? माझ्या वरच्या मुद्द्याशी कुणाला सहमती/असहमती वाटते काय ?

सन्जोप राव Tue, 18/02/2014 - 10:01

चर्चाविषयाच्या मोहक थैलर्यामुळे खाजगीपणाच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करुन ('हो,पीत होतो पूर्वी' या थाटात) मी 'माँक','कोलंबो','एलेमेंटरी','मेंटॅलिस्ट''कम्प्लीट शेरलॉक होम्स' आणि- आता लाज सोडलीच आहे तर इतके तरी कशाला- 'फ्रेंडस' चे ही बिंज वॉचिंग केले आहे असे कबूल करतो.

गवि Tue, 18/02/2014 - 10:16

In reply to by सन्जोप राव

++ फ्रेंड्स, द वंडर ईअर्स, टू अँड हाफ मेन, एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन, 80s - The decade than made us, फुल हाऊस, कबूल है

शेवटचे शब्द हे कन्फेशन नसून सीरियलचेच नाव आहे.

पण आता मी सावरलोय. गेले चारसहा महिने पूर्ण सोबर आहे..

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 10:14

In reply to by ॲमी

कर अगं, जाम मजा येते!

शिवाय कधीकधी एखादा एपिसोड बघून एखाद्या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण होते, त्यापायी काही आठवडे आपण थांबून ती पाहतो आणि नंतर त्यांनी माती खाल्ल्यावर दवडलेल्या वेळाबद्दल चिडचिड होते. सलग पाहताना एकाच दिवसात काय तो निकाल लागून जातो. बिग बँगचे दोन सीझन्स पाहिल्यानंतर ते बथ्थड लोक माझ्या डोक्यात जायला लागले आणि मी त्या सिरीजला वेळात रामराम केला. तशी सूट्सपण फार लायकीची नव्हती. दोन सीझन्स पाहून मजा आली. पण नंतर डोक्यातली ब्यांडविड्थ न खाता ती मालिका डोक्यातून घरंगळून गेलीही. हे मला आवडतं.

राजन बापट Tue, 18/02/2014 - 18:14

In reply to by गवि

>>> मेघना भुस्कुटे , अस्मि यांस उद्देशून : कर अगं, जाम मजा येते!
------------------------------------------------------------------
सुधाकर : मी काही अशा दुबळया मनाचा नाही की, मला तिची सवय लागेल. सर्वांची समजूत मला घालता येईल, पण माझी स्वत:ची समजूत मला मात्र या वेळी घालता येत नाही. चल, आण कुठं आहे ती? या यमयातना घडीभर तरी विसरण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.

तळीराम : मी घेऊनच आलो आहे बरोबर- ही घ्या.
(पेला भरू लागतो.)

सुधाकर : अरे, उगीच जास्त मात्र भरू नकोस.

तळीराम : छे, छे, अगदी थोडी! ही एवढीच- फक्त- एकच प्याला!
(सुधाकर पिऊ लागतो. पडदा पडतो.)
------------------------------------------------------------------

"एकच प्याला". अंक पहिला, प्रवेश पाचवा.

ताजा कलम : प्रस्तुत प्रवेशाबरोबरच, "व्यंकूची शिकवणी" ही द मा मिरासदार यांची कथाही प्रस्तुत संदर्भांत आठवली हे नमूद करतो. ;-)

ऋषिकेश Tue, 18/02/2014 - 10:10

मी फ्रेंड्स, साराभाई, हाऊ आय मेट युर मदर, लॉस्ट वगैरे अनेक सिरीयल्सचे बिंज वॉचिंग केले आहे. अश्या प्रकारे सिरीयल्स उरकण्याला सुरूवात मात्र महाभारत या एपिकनेच झाली होती (हो हो तेच चोप्रांचे).

तुम्ही म्हणता ते तोटे फारसे जाणवले नाहीत कारण तेव्हा ब्याचलर होतो. आता अश्या प्रकारच्या वॉचिंगला वेळ मिळणे कठीण होत चालल्याने एकसलग बघणे आपोआप बंद झाले आहे. तुकड्या तुकड्यांनी एकेक एपिसोड काही सिरीयल्सचे बघत असतो

मणिकर्णिका Tue, 18/02/2014 - 10:11

प्रत्येक भागात प्लॉट वेगळा असलेल्या मालिका एकसलग बघितल्या नाहीत तर काही फरक पडत नाही अशी माझी पहिल्यांदा पॉलिसी होती. जसं की फ्रेण्ड्स, हाऊ आय मेट युअर मदर, मॅड मेन, एक्स फाईल्स इत्यादी. काही काळानंतर "ठिक आहे हो, आता काहीतरी नवीन बोला' असं झाल्याने मी त्या मध्येच सोडूनही दिलेल्या आहेत. पण प्रिझन ब्रेक, मिल्ड्रेड पिअर्स, तुमची ब्रेकींग बॅड, प्राईड अँड प्रीज्युडीस या मात्र झपाटल्यासारख्या पाहिल्या आहेत. प्रिझन ब्रेकमधला प्रत्येक भागातला तपशील जसे तास जात राहायचे तसा गळून पडायचा त्यामुळे मरो ते काम, आराम, काय होतंय ते एकदाचं पाहून टाकू असं झालं होतं. शेरलॉकच्या एका भागाचा दुसर्‍याशी फार संबंध नसला तरी त्याचं येड लागल्यागत झालं होतं, म्ह्णून शेरलॉकचंही 'बिंज वॉचिंग' झालं होतं. नुकताच गेम ऑफ थ्रोन्स देखील मी दोन सीझन शनिवार-रविवारी संपवले होते. गांजाची तार अशी लागते असं म्हणतात. तुम्हाला वेळ-काळ-परिसर याचं भान राहात नाही.

कुतूहल जोवर ताजं, कुरकुरीत आहे तोवर ते शमवून घेण्याचा आनंद मला या बिंज वॉचिंगने मिळाला. मला त्यात विचित्र, वीयर्ड काहीच वाटलं नाही. कारण ते जर मी त्यावेळीच शमवलं नसतं तर मी इंटरनेटवरून कुठून कुठून, काय-काय शोधून काढून ते थोडंफार शमवण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यातली सगळी मजा निघून गेली असती. ऑस्ट्रेलियन मास्टर शेफ भारतात ऑस्ट्रेलियानंतर कितीतरी महिन्यांनी ब्रॉडकास्ट होते. मी ३-४ भाग पाहून त्याचा विनर कोण आहे हे इंटरनेटवरून शोधून काढलं होतं. माझ्या अंदाजाप्रमाणेच विजेत्याचं नाव निघालेलं पाहून मला कोण आनंद. पण नंतर प्रत्येक वेळी तो स्पर्धक एलिमनेशन राऊंडला आला की मला आधीच माहित असायचं की तो बाद होणार नाहीये म्हणून, त्यामुळे मला ते थ्रिल अनुभवता यायचंच नाही.

उपमाच द्यायच्या झाल्या तर एकसलग पाहिल्या नाहीत तर चालतंय अशा मालिका कथासंग्रहांसारख्या असतात. एक कथा वाचून पुस्तक ठेवून दिलं, वेगवेगळ्या मनःस्थितीत पुढच्या पानावरून सुरू केलं तर चालतं. पण या बिंज वॉचिंगवाल्या अतिशय उमद्या कादंबरयांसारख्या असतात, ज्या एका बैठकीत संपवव्याशा वाटतात. त्याने फटीग तर येत नाहीच, शिवाय, 'फायनली गॉट ओव्हर विथ'चा छान अनुभव येतो.

Nile Tue, 18/02/2014 - 11:06

मला ही सवय अमेरिकेत आल्यानंतरच लागली. फूकटचं अमर्याद इंटरनेट, भाड्याच्या घरात असणारी केबल वगैरे प्रमुख कारणं. युएसए, टीबीएस वगैरे चॅनेल्सवर 'बॅक टू बॅक' अनेक कार्यक्रम सारखे लागत असतात. आमची भारतात असताना टीव्ही बाबतीत झालेली प्रचंड उपासमार आम्ही इथे येऊन अपचन होईस्तो भरून काढली. गेल्या पाच साडेपाच वर्षात जेव्हढा 'टीव्ही' इथे आल्यावर पाहिला त्याच्या एक दशांशही त्या आधीच्या संपूर्ण आयुष्यात पाहिला नसेल!

लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, बोन्स, माँक, मॅड अबाऊट यू, साईनफेल्ड, एव्हरीबडी लव्हस रेमंड, किंग ऑफ क्वीन्स, सेव्हड् बाय द बेल, फ्रेश प्रीन्स ऑफ बेल एअर, चीअर्स, द ़कॉस्बी शो, द डेली शो, कोलबेर, कोनन, लेटरमन, जे लेनो, वगैरे एकापाठोपाठ एक दिसतील तसे पाहणे हा नित्यक्रम कॉलेजात असताना बनला. कालांतराने एकेक शो सलग बघुन संपवणे सुरू झाले. आठवतील तशी यादी.

१. साईनफेल्ड (संपूर्ण डिव्हीडी सेट घेऊन अ ते क्ष संपवला, आधी क्रमाने बघितला नसल्याने)
२. एव्हरीबडी लव्हज रेमंड (वरील प्रमाणे)
३. हॉऊस एम डी
४. ब्रेकिंग बॅड
५. मॅड मेन
६. टॉप गिअर ( १८ सीझन्स, ~११० एपिसोड्स पाच-सहा दिवसात. हात तुटून गळ्यात असल्याने लवकर संपला)
७. द वेस्ट विंग (१५६ एपिसोड्स, एक आठवडा. हाफिस असेल तर रोज पाच-सहा तास, विकेंडला १४-१५ तास)
८. माल्कम इन द मिडल
९. अ‍ॅडवेंचर्स ऑफ ब्रिस्को काऊंटी ज्युनिअर
फायरफ्लाय, फ्रीक्स अ‍ॅन्ड गीक्स वगैरे अल्पकाळ टिकलेल्या सिरीज,शिवाय लाईफ ऑफ बर्डस, लाईफ ऑफ मॅमल्स वगैरे डेविड अटेनबरो मायकल पेलिन आणि मायकल वूड्सच्या ऐतिहासिक डाक्यूमेंटर्या, केन बर्न्सच्या अनेक डाक्युमेंटर्या वगैरे वगैरे..

हे सगळं सांगण्याचं कारणं काय की या व्यसनात आम्ही पुरते बुडालो आहोत, तरीही व्यसनातून सुटण्याचे कारण दिसत नाही.

नविन येणार्‍या काही सिरीजमध्ये मात्र बिंज वॉचर्सकरता म्हणून विशेष प्लॉट बदलले आहेत असे जाणवते (एपिसॉडिक प्लॉट पेक्षा, सिरीज अशी थिम), त्यामुळे जास्त मजा येते.

मेघनाने म्हणल्याप्रमाणे, काही सिरीज कंटाळवाण्या होतात त्या एक दोन दिवस पाहून सोडून देता येतात. फ्रायडे नाईट लाईट्स, डेक्स्टर, ऑलवेज सनी इन फिलाडेल्फिया वगैरे असेच एक दोन सिझन बघून सोडून दिले.

सद्ध्या कंटिनम नावाची कॅनेडियन सायफाय सिरीज बघणे चालू आहे. पहिले दोन सिझन आवडले. शिवाय, हाऊस ऑफ कार्ड्स आणि ऑरेंज इज द न्यू ब्लॅक आहेच.

राजेश घासकडवी Tue, 18/02/2014 - 11:31

पूर्वी स्टार वॉर्सच्या डिव्हिडी रेंट करून आणणे, जेम्स बॉंडच्या डिव्हिड्यांचा तैवानहून आणलेला संच पहात बसणे, किंवा कधी कधी लॉ अॅंड ऑर्डरची मॅरेथॉन दिवसभर बघत बसणे इतपतच होत असे. नेटफ्लिक्सवर जेव्हा आख्ख्याच्या आख्ख्या सीरीज ठेवलेल्या पाहिल्या तेव्हा बिंज वॉचिंगची खरी चटक लागली. अर्ध्या तासाचा एक एपिसोड असे एका सीझनचे सव्वीस एपिसोड टीव्हीवर बघायला सहा महिने लागतात. तेच नेटफ्लिक्सवर जाहिरातीशिवाय बघितले तर ताशी सुमारे तीन या वेगाने नऊ तासात - म्हणजे वीकडेच्या दोन बिंज सेशनमध्ये संपतात. अशा अनेक सीरियल्स मी बघितलेल्या आहेत. ब्रेकिंग बॅड, फ्युचुरामा, द वेस्ट विंग, हाउस ऑफ कार्ड्स हे चटकन आठवतात. कधी कधी मुलगा बघतो त्याबरोबर 'हाउ इट्स मेड' चे देखील अनेक एपिसोड यंत्रमुग्ध होऊन पाहिले आहेत.

कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण होतं आहे का? या प्रश्नावर मी हो असं उत्तर दिलं होतं. मात्र बिंज वॉचिंगचा इतका प्रादुर्भाव पाहिल्यावर ते मत किंचित बदलण्याची वेळ आली आहे असं दिसतं.

गवि Tue, 18/02/2014 - 11:42

In reply to by राजेश घासकडवी

आता या सर्वांमधे रेकॉर्डिंग सुविधेच्या एचडी बॉक्सेसची भर पडली आहे. टाटा स्काय एचडी प्लस किंवा एअरटेल किंवा तत्सम सेवादात्यांच्या सेट टॉप बॉक्समधे आठवड्याभराच्या किंवा महिन्याभराच्या दैनिक साबणवड्या बंदिस्त करुन एकाच विकांताला सर्वाचा फडशा पाडणे असा ट्रेंड हळूहळू भारतात येतो आहे.

फारएण्ड Tue, 18/02/2014 - 11:50

फ्रेण्ड्सने सुरूवात झाली. दिवसभरात रीरन्स असलेल्या चॅनेल्स वर सगळे एपिसोड्स पाहायचे. प्रत्येक वेळेचा एपिसोड कोणत्या सीझन च्या कोणत्या भागात 'सुरू' आहे याचा ट्रॅक ठेवायचा असे 'मिक्स्ड बिंज' ही केलेले आहे. मनमुराद हसवणार्‍या पण त्याचबरोबर स्मार्ट विनोद असणार्‍या सिरीज पैकी माझ्या बाबतीत तरी फ्रेण्ड्स ला तोड नाही (किमान पहिले ७-८ सीझन). मात्र ही खर्‍या अर्थाने सिटकॉम नव्हे. कारण जितकी हिस्टरी तुम्हाला माहीत असेल तितकी जास्त मजा येते. त्यामुळे फ्रेण्ड्स चे रिपीट बिंज सुद्धा केलेले आहे. त्यात नंतर डीव्हीडीज मधे नेटवर्क्/केबल वर दिसणार्‍या एपिसोड्स पेक्षा बरेच काही जास्त असते हे कळाल्यावर आणखीनच.

याव्यतिरिक्त वेस्ट विंग, व्हाईट कॉलर, डेस्परेट हाउसवाईव्हज, बिग बॅंग थिअरी, हाउ आय मेट..., मॉडर्न फॅमिली, टू अ‍ॅण्ड हाफ मेन, बॉस्टन लीगल, न्यूजरूम, मॅड मेन व सध्या बर्न नोटिस यांचेही बिंज बर्‍याच वेळा केलेले आहे.

मिहिर Tue, 18/02/2014 - 12:07

अरे बापरे! इतके लोक आहे इतक्या सिरियली बघणारे!
हॉस्टेलमध्ये आजूबाजूला चिक्कार जण अशा गोष्टी बघत असतात. एवढा वेळ कसा काय घालवू शकतात ह्यात असे वाटते. आत घुसले की बुडून जास्त वेळ जाईल म्हणूनही सुरू करायची इच्छा होत नाही. फारच कौतुक ऐकून 'फ्रेंड्स' बघायला सुरू केली होती. दुसर्‍या सीझनमधले ३-४ भाग पाहिले, पण लोक जिथे 'ख्या: ख्या:' करून हसायचे तिथे मला हसूच यायचे नाही. :( शेवटी असेल ब्वॉ आमचीच विनोदबुद्धी कमी अशा निष्कर्षावर आलो.
इतक्यात काही हे बिंज वॉचिंग करेन असे वाटत नाही.

Nile Tue, 18/02/2014 - 21:32

In reply to by मिहिर

फ्रेंड्सचा (भारतातील) चाहता वर्ग हा मुख्यतः मुंबई-पुण्यातील तरूण कॉलेजवर्ग (म्हणजे त्या वयात हे बघणे) असे एक वादग्रस्त(?) (आणि फक्त) निरीक्षण नोंदवतो. फ्रेंड्स (आणि त्याचीच कॉपी वाटावं असं 'हाऊ आय मेट युअर मदर' हे दोन्ही) विनोदाच्या बाबतीत सुमार आहे असं माझं दुसरं वादग्रस्त मत व्यक्त करून इथून काढता पाय घेतो. ;-)

अतिशहाणा Tue, 18/02/2014 - 21:39

In reply to by Nile

फ्रेंड्स फारच सुमार वाटते. एकेकाळी (जंगली महाराज रस्त्यावरुन त्याच्या डीवीडी विकत घेण्याइतपत) फार आवडले होते याची आता लाज वाटते. हाऊ आय मेट युअर मदर तर एकदोन भागातच बंद केले.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/02/2014 - 01:49

In reply to by अतिशहाणा

एवढी काही लाज वाटायचं कारण नाहीये. तेव्हा ते आवडलं, आता आवडत नाही एवढंही पुरेल. मी एकेकाळी अतिहास्यास्पद वाटणारे, आर्नीचे सिनेमे विकत घेतले होते. रिटेल थेरपी म्हणूनही नाही, उगाच. अजूनही 'कमांडो'ची डीव्हीडी नाही याबद्दल दुःख करते (म्हणजे ती विकत घेईन असं नाही, खरंतर घेणारच नाही). मी अजूनही टीव्ही लावल्यावर समोर फ्रेंड्स आलं तर पाहते. जाहिरातींचा ब्रेक आला की चॅनल बदलते.

'बिग बँग थिअरी'चे काही भाग पाहिले, फार आवडलं नाही. कदाचित सात-आठ वर्षांपूर्वी पाहिलं असतं तर कदाचित आवडलं असतं.

लॉरी टांगटूंगकर Tue, 18/02/2014 - 21:48

In reply to by Nile

बघणारे काका लोकंसुद्धा परिचयाचे आहेत. बाकी भारताबाहेर साठी काय निरीक्षण आहे कारण तिकडले महाभाग फु़कट्या टोरेंटप्रेमी मंडळींसाठी इतके दहा सिझन बनवणार नाहीत असे वाटते.

मुख्यतः हा शब्द म्हणजे सोड्याच्या बाटलीला भोक .

बॅटमॅन Wed, 19/02/2014 - 00:01

In reply to by Nile

निळोबांना माझ्याकडून एक मार्मिक.

मला बिग ब्यांग थेरी आवडायचे कारण म्ह. विनोदांचा नर्ड कोशंट फार जास्त आहे. विनोद बाय इट्सेल्फ लै उच्च असो वा नसो. पण सालं तेही नंतर बोअरच झालं. फ्रेंड्स पाहिले नाही, हौ आय मेट युवर मदर पाहिले, त्यातली रॉबिन आवडायची अन अजूनही आवडते. पण ती मदर कोण आहे ते कळायला साला इतका वेळ लावला की टर्नॉफ झाला पुरता. हल्कट साले! बाकी माळका पाहिल्याच नाहीत. पाहिल्या पाहिजेत.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 19/02/2014 - 00:25

In reply to by Nile

'फ्रेंड्स' एकदम बकवास आहे. 'मॅश' आणि 'साइनफेल्ड' मजेदार आहेत. रेमंडपण ठीकच. 'बिग बॅग थियरी' आणि 'कर्ब युअर एन्थुजिअ‍ॅझम' केव्हा केव्हा उत्कृष्ट आहे पण सामान्यपणे आजकालचे सिटकॉम्स फारसे आवडत नाहीत.

फारएण्ड Wed, 19/02/2014 - 01:25

In reply to by मिहिर

अजून बघा व शक्यतो पहिल्यापासून सलग बघा, एवढेच सांगतो. मात्र ही डेटिंग कॉमेडी आहे त्यामुळे तशा प्रकारचे विनोद फारसे आवडत नसतील तर कदाचित आवडणार नाही. माझ्याकडे दहाही सीझन्स डीव्हीडीवर आहेत आणि मी असंख्य वेळा बघतो. नुसते चॅण्डलर चे सीन्ससुद्धा पुन्हा पुन्हा बघण्यासारखे आहेत.

वरती लोकप्रियते बद्दल विचारले आहे - ही सिरीज २-३ सीझन्स नंतर एवढी प्रचंड लोकप्रिय होती की नंतर हॉलीवूड मधले मोठे लोक आवर्जून हजेरी लावून जावू लागले एपिसोड्स मधे. सुरूवातीला गंमत म्हणून एक दोघांना बोलावले गेले पण नंतर स्टार लोकच इंटरेस्ट दाखवू लागले. याच्याइतकी "हॉलीवूड हजेरी" दुसर्‍या कोणत्याही सिरीज मधे नसेल. २००० च्या आसपास लोकप्रिय असलेले जवळजवळ सगळे स्टार्स यात येउन गेले आहेत. ब्रॅड पिट व जेनिफर अ‍ॅनिस्टन एकत्र असताना तो एका एपिसोड मधे आला व त्याने 'रेचेल हेट क्लब' चालू केला होता असे सांगतो तो भाग, चॅण्डलर व ज्युलिया रॉबर्ट्स चा एपिसोड, जोइ व सुझन सॅरेण्डॉन, फीबी व चार्ली शीन, ब्रूस विलीस असलेले ४-५ भाग हे ही धमाल आहेत.

मात्र पहिले ७-८ सीझन्स खरे. नंतर दिग्दर्शक बदलले व ते लोकप्रियते मुळे वाढवलेले सीझन्स होते (९ व १०). ते खास नाहीत. आम्हाला कॅरेक्टर्स मुळात आवडत असल्याने चालतात बघायला तरीही :)

नंदन Tue, 18/02/2014 - 12:35

>>> काहीएक किमान दर्जा असणारं काहीही एकसलग अनुभवण्याबद्दलचा , त्या एकसलग अनुभवण्यात नक्की काय नवं हाती गवसलं याबद्दलचा आहे.
--- ज्याला 'रनिंग गिग्' किंवा 'इनसाईड जोक/रेफरन्स' म्हणता येईल, अशा थीम्स्/प्रसंग/सूचक गोष्टींची उपस्थिती वा निर्देश - या गोष्टींचा उपयोग/प्रयोग अधिक मोकळेपणाने लेखक वा दिग्दर्शकाला या नवीन फॉर्मॅटमुळे करता येऊ लागला आहे. विशेषतः नेटफ्लिक्सने बनवलेल्या मालिका पाहताना हे अधिक जाणवतं. (उदा. 'ब्रेकिंग बॅड' मधला स्विमिंग पूल ही थीम किंवा त्यात पडलेले खेळणे - ज्याचं पडद्यावर प्रथम दर्शन आणि त्यामागचं स्पष्टीकरण यांच्यात मालिकेचे अनेक भाग उलटतात). 'एपिसोडिक मेमरी'तली ही लवचीकता प्रेक्षकांच्या दृष्टीनेही, या बाबतीत अधिक सोयीची आहे.

नाईलने म्हटल्याप्रमाणे, जुन्या मालिका कालानुक्रमे 'बिंज वॉचिंग' करत पाहताना पात्रांचे स्वभाव, लकबी, मालिकेतल्या थीम्स् उलगडत जातात. 'द वायर'सारखी मालिका - जिच्यात प्रत्येक एपिसोड (किंवा काही वेळा सीझनही) एका निश्चित अंतबिंदूवर येऊन संपत नाही - पाहताना ती कालानुक्रमे सलग पाहणं; हे दर आठवड्याला एकेका भागाची वाट पाहण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर वाटतं.

थोडे अवांतर -
चार्ल्स डिकन्सच्या अनेक कादंबर्‍या ह्या तत्कालीन साहित्यिक नियतकालिकांतून ठरावीक काळाने पुस्तकाचे एकेक प्रकरण, अशा प्रसिद्ध होत गेल्या. आता त्या सलग वाचताना काही वेळा ती बाब खटकत राहते - जसं की, प्रत्येक भागाच्या शेवटी उत्कंठावर्धक काहीतरी घडतं किंवा कथानकाच्या ओघाला अपेक्षित अर्धविराम मिळतो. येथे दोन भिन्न गोष्टींची तुलना करण्याचा हेतू नाही; पण जर 'ग्रेट एक्स्पेक्टेशन्स' सारखी कादंबरी पारंपरिक पद्धतीने प्रकाशित झाली असती - तर तिचं स्वरूप आणि आजच्या काळात वाचताना येणारा अनुभव - यांत निश्चितच जाणवण्याइतपत फरक पडला असता.

एका अर्थी, ही त्या त्या माध्यमाची (आणि अर्थातच वाचकाची/प्रेक्षकाची) मर्यादा म्हणता येईल. व्लादिमिर नाबोकोव्हची या संदर्भातली टिप्पणी जरी वाचनाबद्दल असली तरी थोड्याफार फरकाने मालिका पाहण्याची पारंपरिक पद्धत आणि नवीन पद्धत यांच्यातल्या फरकालाही काही प्रमाणात लागू व्हावी -

"Curiously enough, one cannot read a book: one can only reread it. A good reader, a major reader, an active and creative reader is a rereader. And I shall tell you why. When we read a book for the first time the very process of laboriously moving our eyes from left to right, line after line, page after page, this complicated physical work upon the book, the very process of learning in terms of space and time what the book is about, this stands between us and artistic appreciation. When we look at a painting we do not have to move our eyes in a special way even if, as in a book, the picture contains elements of depth and development. The element of time does not really enter in a first contact with a painting. In reading a book, we must have time to acquaint ourselves with it. We have no physical organ (as we have the eye in regard to a painting) that takes in the whole picture and then can enjoy its details. "
[लेक्चर्स ऑन लिटरेचर]

१. मूळ संज्ञेचा अर्थ निराळा आहे. येथे शब्दशः अर्थ अपेक्षित :)

मी Tue, 18/02/2014 - 13:32

पहिल्यांदा सुशीची पुस्तकं हातात पडली तेंव्हा आधाशासारखी बरीच वाचली, मग तेच पुढे व.पुंच्या बाबतीत घडले, किंवा सिड्ने शेल्डन वगैरे, नंतर गिरीश कुबेर, कुरुंदकरही काही प्रमाणात. किशोर ऐकायला लागलो तर अहोरात्र फक्त किशोरच होता मग पुढे रफी आणि मग हृद्यनाथ मंगेशकर. टिव्ही म्हणजे बर्‍याचशा गाजलेल्या अमेरिकन सिरिअल्स लागोपाठ पाहिल्या, त्यात नुकतेच 'हाऊस ऑफ कार्ड्स' पाहिली. असेच काहिसे गेम्सच्या बाबतीत घडले होते, मारिओ,रोडरॅश, क्वेक, वुल्फेन्स्टाइन, अनरिअल, ड्युक निकेम,डूम, मॅक्स पेन, मॉर्ट्ल कॉम्बॅट, एज ऑफ एम्पायर्स, सोलिटेअर, कॉल ऑफ ड्युटी वगैरे, गेम्सच्या बहुतेक लेव्हल्स संपेपर्यंत गेम्स खेळल्याचे आठ्वते आहे.

ऋषिकेश Tue, 18/02/2014 - 13:37

In reply to by मी

(चक्क)'मी' एकेकाळी (ऑफ ऑल रायटर्स) सुशींची पुस्तके अधाशासारखी वाचत होता हे त्याच्या (महान पातकाच्या वगैरे) कबुलीनंतरही खरं वाटत नाहीये ;)

मी Tue, 18/02/2014 - 13:49

In reply to by ऋषिकेश

मी दवणेंना विसरलो म्हणून कोणी म्हणेल असे वाटले होते.

(चक्क)'मी' एकेकाळी (ऑफ ऑल रायटर्स) सुशींची पुस्तके अधाशासारखी वाचत होता हे त्याच्या (महान पातकाच्या वगैरे) कबुलीनंतरही खरं वाटत नाहीये

आता तिसरी/चौथीत असताना मी आणि माझे मित्र पायात काहि नसताना चांगले २/४ किलोमीटर तंगडतोड करुन पतंग खेळणे, पकडणे वगैरे करत असु, घरी परत येताना कोणाच्या बागेतले कच्चे तुरट पेरु चोरुन खात असु; आता ते करणं शक्य नाही पण तेंव्हा ते करणं फारसं गैर नव्हत असं आपलं मला वाटतं. :)

आता भविष्यात ऐसीचं ट्रॅकर मी आधाशासारखं वाचत/ट्रॅक करत होतो असं म्हंटल्यास एकदम एलिटपणाचा शिक्का बसेल काय असं वाटून गेलं.

मी माझाच प्रतिसाद संपादन करु पहात असतान तुम्ही बुच मारलेत :), त्यातलं हे फायनल वाक्य होतं -
पण हे पहाणे ते बिंज् असो वा नसो फारच वेळखाऊ वाटु लागले, त्या क्षणभंगुर/क्षणभंगार ग्रॅटिफिकेशन साठी लाचार होणं म्हणजे कोकेन अ‍ॅडिक्ट झाल्यासारखे किंवा बायबल मधे सांगितलेल्या ७ पापांपैकीच ते एक आहे असं वाटलं, मग प्रायश्चित्त म्हणून ते सगळं सोडून बिंज् हेल्थच्या मागे लागल्याचे स्मरते.

अनामिक Tue, 18/02/2014 - 14:41

फ्रेंड्स, एव्हरीबडी लव्ज रेमंड, टु अ‍ॅन्ड हाफ मेन, साईन्फेल्ड (काही सिझन्स्), लॉ अन्ड ऑर्डर (एस.वी.यु), ब्रदर्स अ‍ॅन्ड सिस्टर्स, ग्रेज अ‍ॅनाटॉमी (काही सिझन्स्), ह्या सगळ्यांचे बिंज वॉचिंग केले आहे. पैकी फ्रेंड्स, एव्हरीबडी लव्ज रेमंड ह्याम्चे सतत/रिपीट बिंज वॉचिंग सुरूच असते. ह्या दोन्ही मालिका सध्या आमच्या बेड टाईम ललाबाय आहेत म्हंटले तरी चालेल.

बिग बँग आणि मॉडर्न फॅमिलीही आवडत्या मालिकांपैकी आहेत, पण त्यांचे बिंज वॉचिंग असे केले नाही!

हिंदी मधे साराभाई, आणि महाभारताचे तर मराठीत गुंतता हृदय हे (संपूर्ण नाही) ह्या मालिकेचे बिंज वॉचिंग केले आहे.

कॉलेजात असताना मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने मुव्ही मॅरॉथॉन ह्या प्रकारात एक सलग ६-७ मुव्हीजही बर्‍याचदा पाहिल्यात!

कान्होजी पार्थसारथी Tue, 18/02/2014 - 16:15

एकदा आजारी असताना, कशातच लक्ष लागेना म्हणून HIMYM चे ब्याक टु ब्याक एपिसोड्स टीवीवर पाहिले, शेवटी ते डोक्यात गेले म्हणून बंद केलं. नाही म्हटलं तर एक आक्खा सीजन पाहिलाच.
मग एका मित्राकडून अश्या बऱ्याच सीटकॉम मिळाल्या. त्यापैकी उल्लेखनीय विल नि ग्रेस, स्क्रब्स. ज्यांचे सगळे सीजन पाहावेसे वाटले, हे Binge Watching निकटच्या एकदोन मित्रांबरोबर(च) झाल्यामुळे त्यातल्या प्रेक्षकांसोबत प्रत्यक्षात हसायला मिळे, मित्रांमध्ये टोमणे मारायला सिक्रेट संदर्भ तयार होत इत्यादी, आणि वेगळेच भावबंध तयार होत. शेरलॉक, Louie, Curb Your Enthusiasm,Band of Brothers इ. इ. एकच एक मालिका बघण्यापेक्षा मी दोन,तीन अशा मिक्स करून बघतो. रात्री पार धुंद होऊन जातात.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/02/2014 - 18:25

'बिंज वॉचिंग'वर काय आक्षेप आहेत हे काही नीटसं समजलं नाही.

'हाऊस अॉफ कार्ड्स', 'एपिसोड्स', 'ब्रेकिंग बॅड' वगैरे मालिका आम्ही दोघंही एकत्र बिंज करून पाहिल्या. कोणी एकाने "आता झोप आली, आवरू या" असं म्हटल्यावर दुसऱ्याने "एकच आणखी पाहून झोपू या" असं म्हणणं नेहेमीचं. दोघांचीही अवस्था 'अगं अगं म्हशी' अशीच. सध्या 'एपिसोड्स'चा तिसरा सीझन टीव्हीवर येतो आहे, आणि आठवड्याला एक या हिशोबात बघणं तापदायक वाटतंय. काही आठवडे थांबून, उरलेले भाग रेकॉर्ड करून एकदाच काय ते संपवून टाकायचा विचार आहे.

आदूबाळ Tue, 18/02/2014 - 20:39

In reply to by Nile

मला तर नंबर्स बेहद्द आवडलं. गुन्हे शोधण्यात गणिती संकल्पनांचा वापर करणं (आणि ते पडद्यावर मांडणं) भारीच. पात्रांचं भावविश्व छान रेखाटलं आहे - "मोठा मुलगा सिंड्रोम" असलेला, पण तरीही असुरक्षित असलेला डॉन, गणिती वंडरकिड चार्ली, निवृत्तीचं आयुष्य जगणारे वडील, डॉनचे सहकारी. चार्ली अ‍ॅप्सचा गुरू/मेंटॉर लॅरी हे माझं सगळ्यात आवडतं पात्र.

मला एक प्रश्न आहे - माझं गणिताचं ज्ञान हे बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार याच्यापलिकडे नाही. गणितात गती असलेल्या लोकांना नंबर्स कितपत भावतं?

Nile - तुम्हाला का नाही आवडलं?

Nile Tue, 18/02/2014 - 21:24

In reply to by आदूबाळ

मी नंबर्सचा एपिसोड पाहिला साधारण २००८/०९ मध्ये. तेव्हा डिटेक्टिव अनेक डिटेक्टिव्ह/कॉप शो सुरू होते. (बर्न नोटीस, कॅसल, माँक वगैरे.) त्यातही 'खास क्षमता असलेला प्रोटॅगॉनिस्ट' अशीही थिम असलेले अनेक शो आले होते. त्यातले विशेष कोणतेच आवडले नाहीत. (ओव्हरडोस?) लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर खर्‍याखुर्‍या घडलेल्या घटनांवर बेतलेले असल्याने ते जास्त आवडले (यातील कॉप्स, लॉयर्स 'खास' दाखवलेले नाहीत, एक विन्सेंट जरा सायकॉलॉजिकली वेगळा दाखवला आहे, पण 'खास' नाही). त्याच वेळी हाऊस बघत असल्याने त्यातील प्लॉट्स च्या तुलनेत नंबर्स खास वाटला नाही. चार्लीची अ‍ॅक्टिंगही/कॅरॅक्टर ओढून ताणून वाटले (त्याला आधी वेगवेगळ्या रोलमध्ये पाहिल्यानेही असेल).

अर्थात, मी मधलाच एक एपिसोड पाहिला होता, तेही एक कारण असेल.

धनंजय Tue, 18/02/2014 - 21:12

In reply to by Nile

असेच म्हणतो. एक-दोन अंक बघितले, पण मालिका नाही आवडली.

धनंजय Tue, 18/02/2014 - 21:14

नेटफ्लिक्सला दोष देतो.

रात्रभर जागून मालिका संपवून पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये पेंगलेलो आहे.

अतिशहाणा Tue, 18/02/2014 - 21:43

नेटफ्लिक्सवर माँक उपलब्ध असताना पुरवून पुरवून पाहण्याचा निर्णय घेतला व पाचव्या सीझनच्या मध्यावर नेटफ्लिक्सने त्याचे स्ट्रीमिंग काढून टाकल्याने फारच हताश झालो. आता लायब्ररीत डीवीड्यांसाठी नंबर लावणे आले. त्यामुळे नंतर ब्रेकिंग ब्याड, २४, हाऊस ऑफ कार्ड्स वगैरे एका बैठकीत शक्य होतील तितके असे करुन पाहिले आहेत. लाय टू मी, चक, ऑरेंज इज ब्लॅक वगैरे काही मालिका पाहण्याचा प्रयत्न केला पण फारसा रस निर्माण झाला नाही. साईनफेल्ड, बॉस्टन लीगल, जेरेमी ब्रेटचा शेरलॉक हे डिस्कवरच उपलब्ध असल्याने अनेकदा या कार्यक्रमांचे पुनःपुन्हा बिंज वॉचिंग होते.

रुची Tue, 18/02/2014 - 22:05

'द वायर' चे पाचही सिझन्स बिंज करून पाहिलेले आहेत आणि त्याबद्दल आजिबात पश्चात्ताप नाही. ही मालिका पहायला सुरु केली त्यादरम्यान मी नोकरी करत नव्हते, नवर्याबरोबरच पहाणार असे त्याला दिलेले वचन मी दिवसा मोडत असे आणि त्यालाही हेरगिरी केल्याने त्याची कल्पना होती, त्यावरून अजूनही आमच्यात गृहकलह होतात..असो. मला अत्यंत आवडलेल्या मालिकांपैकी एक.

एकदा आजारी असताना शेजारणीने तिच्याकडचा डॉ. हाऊसचा पहिल्या सीझनचा डेव्हीडी संच दिला होता. कोचवर लोळता-लोळता ह्यू लॉरीबद्दलच्या प्रेमाखातर पहायला सुरवात केली आणि त्याचे व्यसन जडले. ठराविक साचा आणि तशी सुमारच मालिका पण ह्यू मात्र नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट असल्याने सगळे सीझन्स पाहिले (ऑलमोस्ट एकापाठोपाठ एक)मजा आली पण सगळ्यांना आवडेलच असे नाही.

चिंतातुर जंतू Tue, 18/02/2014 - 23:22

In reply to by रुची

आतापर्यंत धाग्यावर उल्लेख झालेल्या अनेक मालिकांना पाहण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला, पण 'वायर'ची सर कशालाच आली नाही. तिचा उल्लेख केल्याबद्दल (रुची आणि नंदनचे) आभार!

Nile Tue, 18/02/2014 - 23:26

In reply to by चिंतातुर जंतू

चिंतातुर गुर्जींकडून एकाही फ्रेंच मालिकेचे रेकमेंडेशन न आल्याने आम्ही फार्फार निराश झालो आहोत! ;-)

चिंतातुर जंतू Tue, 18/02/2014 - 23:34

In reply to by Nile

चिंजंने बिंज करून पाहिलेली एकमेव फ्रेंच मालिका - द स्पायरल. तिच्यावर 'वायर'चा उघड प्रभाव होता. शिवाय सार्त्र-सिमोन द बोव्हारवर आधारित एक चांगली मिनीसीरीज पाहिली होती, पण नाव लक्षात नाही. आणखी एक आवडलेली मालिका - फे पा सी, फे पा सा. बालक-पालकचा खास फ्रेंच धर्तीचा न्यूरॉटिक, खट्याळ आणि शिवराळ अवतार.

रोचना Wed, 19/02/2014 - 14:43

In reply to by चिंतातुर जंतू

+१.
द वायर ऑल द वे! सर्वोत्कृष्ट मालिका ऑफ ऑल टाइम. दोन-तीन दा सलग पाहिलीय.

मी प्वारो आणि मार्पल, आणि लॉ अँड ऑर्डर चे ही थोडेफार बिंजवॉचिंग केलंय. पण वायर ची मजा औरच.

अक्षय पूर्णपात्रे Tue, 18/02/2014 - 22:14

एकटेपणा आणि बिंज वॉचिंग यांचा जवळचा संबंध असावा असे वाटते. एकटेपणा आणि मॉर्बिडिटीचे आकर्षण यांचाही जवळचा संबंध असावा असे वाटते. अशा एकट्यांसाठी 'डेक्स्टर' ही मालिका सुचवू इच्छितो. आयरिश 'द फॉल', स्विडिश 'वॉलँडर' आणि किवी 'टॉप ऑफ द लेक' यासुद्धा आवडण्यासारख्या आहेत, त्यातल्या त्यात 'टॉप ऑफ द लेक' अधिकच देखणी आहे.

राजन बापट Tue, 18/02/2014 - 22:17

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

पैकी डेक्स्टर मॉर्गनची कहाणी पाहिली. मालिका एकसुरी म्हणायला हवी परंतु मला त्याचंसुद्धा व्यसन लागून तीही मी संपूर्ण पाहिलीच.

अक्षय पूर्णपात्रे Tue, 18/02/2014 - 22:37

In reply to by राजन बापट

मला मायकेल हॉलने (त्याची भुमिका असलेली 'सिक्स फिट अंडर'ही प्रेक्षणीय होती.) रंगवलेला डेक्स्टर आवडतो. पण एकसूरीपणा आणि ताणाताणी केव्हा केव्हा असह्य (प्रिझन ब्रेक, बोन्स, लॉस्ट) होऊ शकतात. म्हणून डेक्स्टर पाहतांना इतर हमालकामे (टॅक्स रिटर्न्स, बिले भरणे वगैरे वगैरे) करता येतात. ब्रेकिंग बॅडचा वॉल्टर किंवा बहूतेक वायरचा मिक्नल्टीही एकसूरी वाटण्याची शक्यता आहे. पण अमेरिकन मालिकांमध्ये वास्तव पात्रांची इतकी प्रचंड वाणवा आहे की या मालिकांमधल्या मूख्य पात्रांपेक्षा इतर वास्तव भासणार्‍या पात्रांमुळेही त्या पहाव्याश्या वाटतात. ब्रिटिश मिनीसिरीजमध्ये मात्र हा दोष फारसा आढळत नाही.

कान्होजी पार्थसारथी Tue, 18/02/2014 - 22:29

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

एकटेपणा आणि बिंज वॉचिंग यांचा जवळचा संबंध - सहमत.
'एकटेपणा आणि मॉर्बिडिटीचे आकर्षण' याविषयी जरा खुलवून सांगाल?
बाकीची नावं सुचवल्याबद्दल आभार!!

अक्षय पूर्णपात्रे Tue, 18/02/2014 - 22:35

In reply to by कान्होजी पार्थसारथी

'एकटेपणा आणि मॉर्बिडिटीचे आकर्षण' याविषयी जरा खुलवून सांगाल?

हे फारसे गंभीर विधान नाही. म्हटले तर विनोदीच आहे. मागे एकदा झॉम्बी या विधाबद्दल पसंती दर्शवल्यामुळे इकडच्या एका नगरकरांनी मारलेल्या टोमण्याला फारा दिवसांनी दाद देण्याचाही एक सुप्त प्रयत्न होता.

Nile Tue, 18/02/2014 - 23:38

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

एकटेपणा आणि मॉर्बिडिटीचे आकर्षण यांचाही जवळचा संबंध असावा असे वाटते.

डेक्स्टर आवडले नाही! :-)

मला मायकेल हॉलने (त्याची भुमिका असलेली 'सिक्स फिट अंडर'ही प्रेक्षणीय होती.) रंगवलेला डेक्स्टर आवडतो.

दोन आयुष्यं जगणारा आणि कायदे हातात घेऊन प्रकरणाचा निकाल लावणारा डेक्स्टर तुम्हाला आवडतो हे वाचून अजिबात आश्चर्य वाटले नाही! ;-)

रुपाली जगदाळे Tue, 18/02/2014 - 22:22

ब्रेकिंग bad तसा पहिला. हौस ऑफ कार्ड्स सीजन २ नुकताच नेटफ्लीक्स वर रिलीज झालाय. तो या लॉंग विकएंड ला संपवला. It’s a lot better than season 1. पण एका वेळी चार-पाच तासच बघणं होतं. ते हि मुलांना चुकवून, ती घरात नसताना किंवा दुसरीकडे व्यस्त असतानाच बघता येतं. त्यासाठी कधी कधी मी घरातून काम करते म्हणजे मनसोक्त टी व्ही बघता येतो (hopefully nobody from my office is here :D ).

राजन बापट Tue, 18/02/2014 - 23:01

देशीविदेशी हा प्रकार कसकसा पाहिला जातो ?

ढोबळ मानानं बोलायचं तर दोन प्रकार आहेत : डिव्हीडीचा संच घेऊन पहाणे किंवा ऑनलाईन पहाणे.

ऑनलाईन पहाण्यात बरेच प्रकार येऊ शकतात असं दिसतं :
अमेरिकेत "नेटफ्लिक्स" या कंपनीच्या सभासदांना बरंच काही स्ट्रीमींगवर उपलब्ध आहे. मात्र सगळंच नाही.
एचबीओ या दर्जेदार चॅनलचं काहीही नेटफ्लिक्सवर नाही. ते सर्व "एचबीओ ऑन डिमांड" (का कायसंसं नाव आहे) त्यावर पहावे लागते असे दिसते.
या दोनखेरीज http://projectfree.tv/ या ठिकाणी बरंच काही (अनधिकृतरीत्या) उपलब्ध दिसतं. तिथे बरेच पॉप अप्स वगैरे आहेत तेव्हा सांभाळून जाणे.

या शिवाय भारतातले लोक कुठून कुठून मिळवून स्ट्रीमींग पहातात ते जाणून घ्यायची इच्छा आहे.

अरे हो ते सेट-टॉप बॉक्स चं विसरत होतो. तो प्रकार नेमका कसा लोक चालवतात ?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/02/2014 - 23:16

In reply to by राजन बापट

अरे हो ते सेट-टॉप बॉक्स चं विसरत होतो. तो प्रकार नेमका कसा लोक चालवतात ?

तुम्ही जसा चालवता, अमेरिकेत तसाच. कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवायचे आणि नंतर पहायचे.

भारतात एच्बीओ दिसतो; कोणे एकेकाळी तरी तो फुकटच होता.

Nile Tue, 18/02/2014 - 23:28

In reply to by राजन बापट

अरे हो ते सेट-टॉप बॉक्स चं विसरत होतो. तो प्रकार नेमका कसा लोक चालवतात ?

अमेरीकेत तुमच्या केबलवाल्याला सांगून डीव्हीआर सर्व्हिस चालू करून घ्यावी लागते (अधिकचे पैसे). आजकाल एकाच वेळी सहा-सहा कार्यक्रम रेकॉर्ड करता येतील असे बॉक्सेस मिळतात. कोणते प्रोग्रॅम्स हवे ते सांगून ठेवायचं, आपोआप तो प्रोग्रॉम लागला की ते रेकॉर्ड होतं.

Nile Tue, 18/02/2014 - 23:50

In reply to by राजन बापट

हुलु: सुरु असलेल्या अनेक सिरीझचे लेटेस्ट एपिसोड्स हुलुवर बघता येतात. हुलुप्लस चे सबस्क्रिप्शन नेटफ्लिक्ससारखेच आहे.

अमेझॉन: अमेझॉन प्राईमची मेंबरशीप असेल तर अनेक सिनेमे आणि शोज् फुकटात पाहता येतात. शिवाय, एकेक अंक करून विकत घेतात येतात.

क्रॅकलः सोनीची क्रॅकल.कॉम सेवा साधारण अशीच. (जेरी साईनफिल्डची नवी 'कमिडीअन्स इन कार्स गेटिंग कॉफी' ही क्रॅकलवरची सिरीज आहे.)

Nile Wed, 19/02/2014 - 06:24

In reply to by राजन बापट

फ्री स्ट्रीमिंगच्या लिंक्स हव्या असतील तर इथे पहावे (आपापली नैतिकता सांभाळून)

www.ovguide.com
sidereel.com
tvmuse.com

या ठिकाणी वेगवेगळ्या फ्री लिंकांचे कलेक्शन शोधता येते/शोधून ठेवलेले असते. प्रोजेक्ट फ्री टीव्हीवर असते तसेच.

Nile Wed, 19/02/2014 - 00:17

एचबीओवरील मालिका पाहणं आम्हाला परवडणारं नसल्याने वायर वगैरे पहायचे असून सुद्धा जमत नाही. एचबीओचे वरील शो नेटफ्लिसादि वरती येतच नाहीत. म्हणजे एचबीओ सबस्क्रिप्शन असणे शिवाय वैध पर्याय नाही. सिड्या आणून बघणेत फार वेळ जातो. असो.

एचबीओवरील, वायर, वीप, गर्ल्स (असो, असो!) वगैरे पहायचे आहेत. साधारण तीच गोष्ट शो टाईमची, 'मास्टर्स ऑफ सेक्स" (मास्टर्स अँड जॉन्सन्स वरील शो) बघायचा आहे.

शिवाय, ट्रू डिटेक्टिव्ह आणि यंग डॉक्टर्स नोटबूक या मालिकेंबद्दल कुतुहल आहे.

रुची Wed, 19/02/2014 - 00:25

In reply to by Nile

ट्रू डिटेक्टिव सध्या पहातेय, आत्तापर्यंत तरी आवडतेय. दोन अतिशय वेगळ्या डिटेक्टिव्जचे आयुष्य आणि त्यांचा गुन्ह्याकडे पहाण्याचा पूर्णपणे वेगळा दृष्टीकोन रोचक वाटतोय. मालिका बरीच ग्राफिक आहे आणि थोडा 'वायर'चा प्रभाव आहे असे मला वाटून गेले.
पण निळूभाऊ एच.बी.ओ. घ्यायचे नसेल तरी लारब्ररीतून आणून तरी बघाच या मालिका, निदान 'वायर' तरी.

Nile Wed, 19/02/2014 - 01:13

In reply to by रुची

पहिला अंक पाहिला, मॅथ्यू एकदम आवडला (एकटा आणि 'मॉर्बिड' आहे ना! ;-) ).

एचबीओ घ्यायचे म्हणजे केबल घ्यावी लागेल आधी. आणि केबल न घेणे हा केबल कंपन्यांविरोधातला माझा एकट्याचा लढा आहे. ;-) येस, लायब्ररीत शोधतो पुन्हा, मागे मिळाल्या नाहीत. नेटफ्लिक्साच्या लिस्टमध्ये टाकलेल्या आहेत, पण त्यांचा नंबर वर येत नाहीए. :-)

रुची Wed, 19/02/2014 - 01:22

In reply to by Nile

आणि हो, मास्टर्स ऑफ सेक्स ठीक आहे पण मला त्याची कास्ट फार आवडली नाही. शिवाय त्याच धर्तीवर असलेला 'किंन्सी' हा सिनेमा कितीतरी सरस वाटला होता त्यामुळे मनात त्याच्याशी तुलना होतच रहाते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/02/2014 - 01:24

In reply to by Nile

"मास्टर्स ऑफ सेक्स"बद्दल न्यूयॉर्करचा रीव्ह्यू फार बरा नव्हता, पण वाईटही नव्हता. पण डीव्हीडी येण्याची वाट पहावी लागेल .

आमच्या ग्रंथालयात सीड्या मिळतात, आणि गावात कुठल्याही शाखेत सीडी असली तरी घराच्या जवळच्या शाखेत ती मागवता येते. त्यामुळे ही मालिका डीव्हीडीवर येण्याबद्दल उत्सुकता आहे.

Nile Wed, 19/02/2014 - 06:20

In reply to by राजन बापट

लेखातला 'उहापोह' आवडला.

४ सलग अंक ड्रामा (४ तास) ही व्याख्या चालून जाईल. मला विचाराल तर मी ५ तास असे म्हणेन. मी सलग १३ तासांपेक्षा जास्त अनेकदा बिंज केले आहे (ऑरेंज, हॉस ऑफ कार्ड्स वगैरे). शिवाय, मॅट्रिक्स तिन्ही सिनेमे सलग, गॉडफादर तीन्ही सिनेमे एकापाठोपाठ, बॉर्न ट्रीलजी इ. सुद्धा बिंज या व्याखेत यावेत.

राजन बापट Wed, 19/02/2014 - 06:53

In reply to by Nile

नाईल यांचा प्रस्तुत धाग्यावरचा एकंदर प्रतिसाद पहाता त्यांना "मटका किंग" "गुटखा किंग" सारखी "बिंज किंग" सारखी पदवी द्यावी काय ? "बिंज किंग"शिवाय इतर रोचक नावे सुद्धा सुचवावीत.

अमुक Wed, 19/02/2014 - 08:55

In reply to by राजन बापट

बि़ंजजगत बिंजून काढून बिंजगामी प्रतिसाद देत इतका सगळा बिंजारव करून अखिल बिंजबंधुभगिनीसमाजाला बिंजामृत पाजल्याबद्दल श्री. नीलोत्तम प्रतिबंधे यांना बिंजसाध(द)क, बिंजपुंगव, बिंजभूषण, बिंजशिरोमणी, बिंजदर्शनसम्राट असे अनेकानेक साजेसे पुरस्कार बिंजगिव्हिन्ग् पद्धतीनेच देण्यात यावेत अशी व्यवस्थापकांना विनंती. ;)

फारएण्ड Wed, 19/02/2014 - 06:03

बिंज वॉचिंग चालू असताना आपला काउच पोटॅटो करून टाकणार नाही असे खाणेही कोणी सुचवेल काय? :) अमिताभच्या 'गाणा गाणेके साथ खाणा खाणे की भी जरूरत होवे" सारखे वाटले तर काय हेल्थी खावे याबद्दल लोकांचे काय इन्पुट आहे? कधी चहा, कधी आइसक्रीम व कधी फळे असे खातो पण ज्याचे दूरगामी परिणाम जाणवणार नाहीत आणि खातानाही काही आवडीचे खातोय असे वाटेल असे सांगा. नाहीतर उकडलेली ब्रॉकोली खा म्हणून सांगाल :) (ती खाउच जेवताना पण) बिंज-फ्रेण्डली काय आहे?

अमुक Wed, 19/02/2014 - 06:30

In reply to by फारएण्ड

तुमच्या इथे 'केल' वनस्पती मिळत असेल तर त्याचे टोपभर चिप्स बनवून खा असे सुचवेन. बनवायला अगदी सोपे आहेत.
केलची एक जुडी घ्या. कडक देठापासून पाने टरकावून वेगळी करा. एका पातेल्यात ऑलिव्ह तेल, मीठ, मिरेपूड, लाल तिखट, तीळ असे मिश्रण तयार करा नि त्याचा केलच्या पानांना मसाज करा (लडबडवा). पाने भट्टीच्या तव्यांवर एकावर एक येणार नाहीत अशी पसरवा. भट्टी ३५०°फॅ (180°से) ला गरम करून त्यात १५-२० मिनिटे किंवा खरपूस होईपर्यंत भाजा. अत्यंत स्वादिष्ट, कुरकुरीत, पौष्टिक, हवेसारखे हलके चिप्स् मिळातील.
----
ही कृती माझी मीच ठरवली असल्याने अगदी तसेच दाखविणारी चित्रफीत थोडी शोधून मिळाली नाही. पण ही चालवून घ्यायला हरकत नाही.

चित्र जालावरून साभार

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/02/2014 - 18:29

In reply to by अमुक

या मिश्रणात अॉलीव्ह तेलाच्या जोडीला फक्त लसूणपूड आणि मीठ हे दोनच प्रकारही चांगले लागतात. इतालियन सीझनींग या नावाने जो प्रकार दुकानात मिळतो, तो ही वापरून पहायचा आहे.

भट्टी भाजताना केल कुरकुरीत झाल्यावर केलची चव फार राहत नाही. म्हणून मी काही पानं आधीच काढते आणि काही पानं कुरकुरीत करते. (केलची चव फार आकर्षक नसते, पण तरीही समाधानाखातर काही पानं अशी खायला गंमत वाटते.) कुरकुरीत पानं हातानेच खावी लागतात, काट्याने खाता येत नाहीत. पण या पानांच्या चवीपेक्षा कुरकुरीतपणाच जास्त जाणवतो.

अमुक Wed, 19/02/2014 - 18:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढल्या वेळी इतालीय मसाले वापरून पाहेन. धन्यवाद.

केलची चव कडू असते. कुरकुरीत झाल्यावर आणि चोपडलेल्या मिश्रणामुळे तो कडूपणा कमी व्हायला मदत होते. कुरकुरीतपणा अधिक जाणवतो हे खरे आहे पण हे आहेच 'मन्चिन्ग् फूड' म्हणून. तोंडाला चाळा हवा म्हणून पण पोटात चांगले अन्न जावे म्हणून.
आणि चिप्स् हे काट्याने का खावेत ? अपना हाथ जगन्नाथ. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/02/2014 - 18:39

In reply to by अमुक

चिप्स् हे काट्याने का खावेत ?

सोफा, जमीन साफ करण्यात एका काट्याची भर पडली तर निदान तेलकट हात सोफ्याला, कपड्यांना पुसले जात नाहीत.

निनाद Wed, 19/02/2014 - 06:33

बिंज वॉचिंगला बिंज लिसनिंग हा काहीसा पर्याय होऊ शकेल का?
त्या प्रकारात आपल्याला मालिका 'चढत' नाही हे मात्र आहे! ;)

लिसनिंगमुळे काही प्रमाणात माझे व्यसनही भागले आणि मला खुप वेळ मिळाला हे नमूद केलेच पाहिजे.

सध्या http://www.abc.net.au/radionational/programs/360/ येथून ३६० डाकूमेंटरीज ऐकतो आहे. खरोखर ३६० अंशातले विषय आहेत! जुने प्रसारित कार्यक्रमपण उतरवण्याची सोय आहे.

मॉथ आणि धिस अमेरिकन लाईफ पण आवडते आहे. टेड ठीक.

अजून कुणी असे ऐकते का?
कोणते कार्यक्रम ऐकता?

Nile Wed, 19/02/2014 - 06:41

In reply to by निनाद

रेडिओलॅब आणि प्लानेट मनी अधूनमधून ऐकतो. धिस अमेरिकन लाईफही ऐकतो.

रेडिओलॅबवरील विज्ञानासंबंधीच्या चित्र विचित्र गोष्टी विशेष प्रिय!

http://www.radiolab.org/archive/

निनाद Wed, 19/02/2014 - 06:43

In reply to by Nile

रेडियोलॅब चाळले चांगले वाटतेय. ऐकण्याच्या यादीत घेतले आहे... :)

मस्त.. ऐकण्यात येईल. ही बाजू दाखवल्या बद्दल धन्यवाद!
रेडियो ल्याब आणि एबीसी कार्यक्रम एकमेकांना देतात बहुदा...
कारण Piddington वरचा You Are The Judge हा कार्यक्रम मी एबीसीवर ऐकला आहे.
(किंवा इंडिपेंडंट प्रोड्युसर्स हे कार्यक्रम अनेकांना विकत असावेत.. किंवा एन्पीआर आणि इतरांचा शेकह्यांड असावा)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/02/2014 - 18:24

In reply to by अजो१२३

एका वेळेस, ठराविक एवढे भाग येतात, ८, १३, असे कितीही. मग काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुढचे भाग येतात. काही महिन्यांचा, वर्षांचा खंड मधे आला तर आधीच्या भागांचा एक सीझन, पुढच्या भागांचा पुढचा सीझन.

अजो१२३ Wed, 19/02/2014 - 19:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय मालिकांत असे सिजन्स नसावेत असे वाटते. इतका गॅप दिल्याने प्रेक्षकांची लिंक तुटत नाही का? कि स्टोरीच वेगळी असते?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/02/2014 - 19:20

In reply to by अजो१२३

मलाही वाटतं की भारतीय मालिकांमधे असे सीझन्स नसतात. पण मी भारतीय मालिका, अगदी पूर्वी डीडी मेट्रोवर यायच्या त्या सोडून, पाहिलेल्या नाहीत.

इतका गॅप दिल्याने प्रेक्षकांची लिंक तुटत नाही का? कि स्टोरीच वेगळी असते?

बरेचदा नवा सीझन सुरु होण्याआधी जुने भाग पुन्हा दाखवतात. चौथा सीझन नवा येणार असेल तर निदान तिसरा तर पुन्हा दाखवला जातो. शिवाय डीव्हीडी, नेटफ्लिक्स असे पर्याय असतात ज्यामुळे जुने भाग पाहता येतात. 'फ्रेंड्स'सारख्या मालिकेला एकसलग गोष्ट नसल्यामुळे फार फरक पडत नाही, पण 'ब्रेकिंग बॅड' किंवा 'हाऊस अॉफ कार्ड्स'सारखा ड्रामा असेल तर मागचे भाग पुन्हा दाखवले जातात.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 19/02/2014 - 20:11

'द वायर' आवडत असलेल्या आणि 'लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर' सहन केलेल्या लोकांनी 'होमिसाइडः लाइफ ऑन द स्ट्रिट' ही डेविड सायमननीच लिहिलेली मालिकाही पाहून टाकावी. योगायोगाने वायरवारी सुरू असतांना मी ल्युजियानातच राहत असे त्यामुळे सायमनच्या 'ट्रेमे'विषयी प्रचंड उत्सुकता होती पण 'ट्रेमे' अजिबातच आवडू शकली नाही.

अवांतरः डेविड सायमनने एडवर्ड स्नोडेन प्रकरणात अमेरिकन सरकारची बाजू घेणे फारच खटकले.

Nile Thu, 20/02/2014 - 05:49

सोप्रानोज् ह्या जवळजवळ सर्वच याद्यांत* 'बेस्ट शो एव्हर' मध्ये येणा-या मालिकेचा कोणीही उल्लेख केला नाही हे पाहून आश्चर्य वाटले.

एचबीओची असल्याने, बिंज करणे अजून जमलेले नाही, पण काही अंक टिव्हीवर पाहिले आहेत.

*रेफरंस

अपरिमेय Tue, 10/06/2014 - 01:28

इकडे कोणी गेम ऑफ थ्रोन्स बघत नाही का? याचा चौथा सिझन सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पहिला एपिसोड बघितला आणी पुढच्या ३-४ दिवसात १ तासाचा एक असे ३० एपिसोडस् बघितले. आता पुढच्या रविवारी चौथा सिझन संपेल.

ॲमी Sat, 21/10/2017 - 06:58

फ्रेंड्स सिरिज पाहिली ११ दिवसात. २३६ एपीसोड (२० ते २५ मिनिटांचे).

पहिले ४ सीझन फारच आवडले. ५व्यापासून दर्जा(किंवा माझी आवडण्याची पातळी) खालवत गेला. ८वा सिझनतर अतिमहाप्रचंड बोअर झाला. रॅच आणि रॉस फारच डोक्यात गेले. जोइ आणि फिबीमुळे ते इरिटेशन भरून निघायचं ...

एकंदर मजा आली बिंजायला.

सामो Sun, 22/10/2017 - 11:54

In reply to by ॲमी

काय सांगतेस अस्मि. मी ही सध्या फ्रेन्डस्चे बिंज वॉचिंग करते आहे. रेचल ग्रीन अन रॉस याइक्स. खरच डोक्यात जातात. जोइ व चांडलर आवडतात. त्या गुडी गुडी, गोडगोड हसणाऱ्या मोनिकाच्या ढुंगणावर लत्तप्रहार करावासा वाटतो. डंबॲस तेजायला. सगळ्या बाबतीत परफेक्ट म्हणे. पेताड साली, चांडलरला अज्जिब्बत शोभत नाही ते ध्यान. सॉरी पण टोकाची आवडत नाही ती मला.

फारएण्ड Mon, 23/10/2017 - 18:42

In reply to by ॲमी

पुढे दर्जा खालावत गेला हे खरे आहे. मला साधारण पहिले ६-७ भारी वाटतात. नंतर असलेले आधीच्या संदर्भांवरून आलेले विनोदही चांगले आहेत. कालच सहाव्या सीझन मधला तो थॅन्क्सगिव्हिंग एपिसोड आहे (ट्रायफल मधले बीफ - यावरून लक्शात येइल :) ) तो कितव्यांदातरी पाहिला. माझा सर्वात आवडत्या एपिसोड्स पैकी एक आहे तो.

बहुधा सीझन ८ नंतर दिग्दर्शक, लिहीणारे वगैरे बदलले. लोकप्रियते मुळे वाढवत गेले. त्यामुळे आधीचा दर्जा राहिला नाही. त्यामुळे पहिल्या सीझन्स मधले भाग कितीही वेळा पाहताना कंटाळा येत नाही तसे सी-८ व पुढे होत नाही.

अबापट Sat, 21/10/2017 - 07:15

काल बिंज वॉचिंग केलं . यू ट्यूब वर , एकापाठोपाठ एक स्टेअर वे टू हेवन नि चालू करून फारोख च्या लाईव्ह एड ला थांबलो व्हाया लिनर्ड स्किनर्ड , मडी वॉटर्स आणि या सगळ्यांच्या bbc डॉक्युमेंट्रीज , आणि शिवाय गिटार च्या उत्तम रिफस आणि सोलोज ..
मजा आली .

गौराक्का Mon, 23/10/2017 - 11:56

सध्या सलग चार दिवस सुट्टीमुळे प्राईम विडीओ वर द गुड वाईफ चे दोन सिझन संपवले... आता ऑफिसात बसून पेंगतेय.
सेक्स अँड सिटी पासून ख्रिस नॉथ च्या अखंड प्रेमात आहे मी.. यात पण तो मस्तच दिसतोय.

आयलोबा Mon, 23/10/2017 - 12:50

सध्या साइनफेल्ड चा बिंज वॊचिंग चालूये. व्यसन लागलंय. एवढा कि लिफ्टमध्ये, ऑफिस मध्ये काम करताना, शौचालयात, सगळीकडे तेच चालू असतं मोबाइलवर (ऍमेझॉन प्राईम ची कृपा)

दुष्परिणाम:
१. मालिका कितीही आवडली तरी असं व्यसन लागल्याने कधी एकदा संपवून टाकतो असं होतं..
२. ट्रू डिटेक्टिव्ह आणि ब्लॅक मिरर एकेका विकांताला संपवला आणि डिप्रेशन मध्ये गेले, अति ताप झाला डोक्याला..
३. बऱ्याच परीक्षा, जॉब इंटरव्हऊ गंडवले मालिकांच्या नादात..

बाकी 'फील गुड' वाल्या मालिका (जिव्हज अँड वूस्टर, मॉडर्न फॅमिली) वगैरेंचं बिंज वॊचिंग निरुपद्रवी होतं. डेथ-नोट, स्ट्रेन्जर थिंग्स पण ठीकठाक.

सामो Mon, 23/10/2017 - 21:23

बिंज वॉचिंग आवडले नाही. झोपेतून ऊठ्ल्यावरती निदान आपण रि-चार्ज तरी झालेलो असतो. बिंज वॉचींग मध्ये झोपेसारखाच वेळ पट्टकन निघुन जातो. आणि नंतर रुखरुख लागते की काहीच प्रॉडक्टिव्ह झाले नाही याची.
मला असा वेळ गेला की डिप्रेसड वाटते.

Nile Wed, 25/10/2017 - 00:14

गेल्या जवळजवळ चार वर्षांत वर उल्लेखलेल्या एचबीओवरील बहुतेक सर्व मालिकांचे बिजिंग करून झालेले आहे इतके नमूद करून मी खाली बसतो. (च्यायला हा धागा येऊन इतकी वर्षं झाली!)

भांबड Wed, 25/10/2017 - 10:41

मी बिंज वाचिंग केलं पण चित्रपटाच. द हँगओव्हर तिन्ही भाग अन् चिवडा करंज्या संपवल्या.

भांबड Wed, 25/10/2017 - 21:34

ह्या चित्रपटांत, पहिल्या भागात जो सुरुवातीला नायक वाटतो तो फक्त सुरुवातील न् शेवटलाच दिसतो. अॅलनच कॅरॅक्टर मात्र जाम आवडलं. तिसऱ्या भागात तर सगळं फुटेज त्यानेच खाल्लय. स्टू चा उच्चार मी मनातल्या मनात च्यु च करत होतो.

मिलोराद Thu, 26/10/2017 - 00:56

युरोपियन मालिका बघायला आवडतात.' ब्लू आयज्' ही स्वीडिश राजकीय थरारमालिका नुकतीच संपवली.तशी आटोपशीर दहा भागांची.राजकीय पटलावर दोन पक्षांमधली चढाओढ ,नव्यानं आकार घेणारा वंशवादी अतिरेकी गट अशा मॅक्रो पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्राच्या खासगी आयुष्यातले मायक्रो संघर्ष.मजा आली.शेवटचे तीन एपिसोडस् फारच भन्नाट.तशीच ' हैमात ' ही एडगर राईशची वीस भागांची अभिजात जर्मन मालिका (खरंतर सिनेमाच).दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीतल्या एका गावातल्या शेतकरी कुटुंबातल्या तीन पिढ्यांची महाकाव्यात्म गाथा.निव्वळ विलक्षण.३५ मिमिवर चित्रित केल्यामुळे लाभलेला सघन दृश्यपोत आणि रंगांतून ब्लॅक ॲंड व्हाइटमध्ये वारंवार जात राहण्याची शैली.म्हणजे एकाच शाॅटमध्ये दृश्यातले रंग अचानक हळहळू विरुन जातात आणि ते ब्लॅक ॲंड व्हाइट होतं.मग पुन्हा अवचित त्यात हलकेच रंग परत येतात.ही खास अनुभवण्याची चीज आहे.
तशा इतरही खूप मालिका लाडक्या आहेत. डाॅमनिक ग्राफ या आवडत्या दिग्दर्शकाची ' इन फेस आॅफ क्राइम ' ही जर्मन मालिकाही अतिशय सघन अनुभव देते.

अमुक Thu, 26/10/2017 - 02:41

In reply to by मिलोराद

या मालिकांची ओळख करून दिल्याबद्दल आभार!
इतरांच्या सोयीसाठी काही दुवे -

Blå ögon (Blue Eyes)
https://www.youtube.com/watch?v=sNEGkSqDAug
https://www.theguardian.com/tv-and-radio/2016/mar/24/blue-eyes-more4-te…

Heimat

https://en.wikipedia.org/wiki/Heimat_(film_series)
https://www.youtube.com/watch?v=-aApuWwjjAU

आयलोबा Thu, 26/10/2017 - 17:57

In reply to by मिलोराद

यांपैकी कुठलीच ऐकली नाहीये. शोधून बघते. धन्यवाद.

'देकालॉग' म्हणून एक पोलिश सिरीज आहे. १० भाग आहेत एकेक तासांचे. बायबल मधल्या Ten commandments प्रत्यक्ष्य आयुष्यात पाळणं कसं अवघड आहे हे दाखवलंय.
http://www.imdb.com/title/tt0092337/

मिलोराद Thu, 26/10/2017 - 18:27

In reply to by आयलोबा

'डेकलाॅग' हा जागतिक सिनेमात मास्टर मानल्या जाणाऱ्या क्रिश्तोफ किश्लोवस्की या दिग्दर्शकाचा मास्टरपीस आहे. तुम्हाला डेकलाॅग आवडली असेल,तर किश्लोवस्कीचा समकालीन क्रिश्तोफ झानुस्सीची ' वीकएन्ड स्टोरीज् ' ही दहा भागांची मालिकाही अवश्य बघा.

चिंतातुर जंतू Fri, 27/10/2017 - 00:16

In reply to by मिलोराद

जर लोक किश्लोव्स्की आणि झानुसींबद्दल बोलत असतील, तर मग फासबिंडरची 'बर्लिन अलेक्झांडरप्लाट्झ' बघितलेलं कुणी आहे का इथे?

मिलोराद Fri, 27/10/2017 - 10:31

In reply to by चिंतातुर जंतू

हो,अर्थातच पाहलीय.माझ्याकडे क्रायटेरियननं काढलेली विशेष आवृत्ती आहे.त्यात निर्मितीप्रक्रिया,मुलाखती, फासबिंडरवरची डॉक्युमेंटरी असा ऐवज आहे.आधी मालिका पाहून मग डॉब्लिनची मूळ कादंबरी वाचली.

१४टॅन Thu, 26/10/2017 - 19:52

सुरुवात झाली शेरलॉकने. शेरलॉक होम्सची जवळपास सगळी पुस्तकं, फॅनफिक, चित्रपट पाहिले. जुनी शेरलॉक होम्सही पाहिली जेरेमी ब्रेटवाली. रॉबर्ट डाऊनी ज्यु.च्या शेहोचे दोन्ही भाग पाहिले. मग शेरलॉक आली तेव्हा तीही बिंजवॉच केली. मग वाटलं, मस्तय हे. मोठ्ठ्या पुस्तकासारखं. मग सिरीज शोधू लागलो आयएमडिबीवर.
१. शेरलॉक
२. ब्रेकिंग बॅड
३. हाऊस एम. डी. (ऑटाफे. मला फार्फार्फारच आवडली.)
४. क्रिमीनल माईंड्स (जी पाहून वेळ वाया घालवला असं वाटतं अशी एकच सिरीज.)
५. हॅनिबाल (हेही एक पात्र आवडतं. ह्यावर निघालेलेही सगळे सिनेमे पाहिले आहेत.)
६. नार्कोज (भारीच. ॲक्शन रिच, मसाला एकदम. सगळ्यांचे अभिनय मात्र उत्तम.)
७. ट्रू डिटेक्टीव्ह
८. गॉथम
९. प्रिझन ब्रेक (गोष्ट जबरी. दिग्दर्शन ॲव्हरेज.)
१०. डेक्स्टर
११. हाऊस ऑफ कार्ड्स (कालच सीझन ५ संपवला. गोष्ट, अभिनय, केव्हिन स्पेसीची संवादफेक आणि दिग्दर्शन एकदम झक्कास. इंग्रजीही सुधारतं थोडं.)
१२. द वॉकिंग डेड (खरोखर उत्कंठा काय असते ती ही सिरीज पाहणाऱ्यांनाच कळू शकते. जबरी. मी एकेक एपिसोड पाहतच नाही. अख्खा सिझन आला की एकदम.)
१३. मेंटॅलिस्ट. (अबापट आणि नीलों(?)चं रेकमेंडेशन. जब्बरदस्त आहे. जाम आवडली.)
१४. ग्लो (आबांचं रेकमेंडेशन. थोडी पकाऊ. ॲलिसन ब्रे सुसह्य करते तो अनुभव.)
१५. स्ट्रेंजर थिंग्ज (गोष्ट आणि मुलांचा अभिनय मस्त.)
१६. ब्लॅक मिरर. (गोष्टी अप्रतिम. सिरीज डिप्रेसिंग.)

जीओटी, होमलँड, लॉस्ट ह्यांचा पहिलाच भाग पाहून जाम कंटाळलो. पुढचे अगदी पाहवेनात. डेअरडेव्हिलही पहायचा प्रयत्न केला, पण तिही गॉथमसारखीच निघाली.
इथली चर्चा वाचून द वायर पहायची इच्छा आहे. अजून रेकमेंडेशन्स च्या अपेक्षेत.

अनु राव Thu, 26/10/2017 - 11:01

In reply to by १४टॅन

मेंटॅलिस्ट. (जंतू आणि नीलोंचं रेकमेंडेशन.

चिंजं, तुम्ही ठिक आहात ना? तुम्ही तळागाळातल्या लोकांचे भावविश्व समजुन घेताघेता स्वता तळागाळात जाऊ नका हो.

चिंतातुर जंतू Thu, 26/10/2017 - 16:03

In reply to by १४टॅन

१३. मेंटॅलिस्ट. (जंतू आणि नीलोंचं रेकमेंडेशन. जब्बरदस्त आहे. जाम आवडली.)

मी दिलेलं मेंटलिस्टचं रेकमेंडेशन दाखवा.

अनु राव Thu, 26/10/2017 - 16:53

In reply to by चिंतातुर जंतू

चिंजं, तुम्ही इन्टरेस्ट दाखवलेला बघुन मी ब्रेकींग बॅड चे २ सिझन बघितले. बघायला जरी कंटाळवाणे नसले आणि मनोरंजक असले तरी बऱ्यापैकी उथळ ( टिपिकल अमेरिकन ) आणि अत्यंत अवघड गोष्टी सहज शक्य दाखवल्या आहेत. तुमचे काय मत?

चिंतातुर जंतू Fri, 27/10/2017 - 00:12

In reply to by अनु राव

तुमचे काय मत?

'ब्रेकिंग बॅड' फारच सनसनाटी, अॅक्शन-पॅक्ड आणि त्यामुळे धंदेवाईक झाली. मात्र, माशीचा भाग मला आवडला.

फारएण्ड Thu, 26/10/2017 - 10:57

वायर नक्कीच रेकमेन्डेड. भन्नाट आहे.

वॉकिंग डेड बद्दल फक्त ऐकले आहे. आता हे वाचून पाहतो.

बॅटमॅन Thu, 26/10/2017 - 12:20

Die Deutschen ही जर्मनभाषिक २० पार्ट मालिका अवश्य पहा. प्राचीन काळापासून हिटलरपर्यंतचा जर्मन इतिहास वर्णिला आहे, उत्तम आहे.

ॲमी Thu, 26/10/2017 - 15:56

आतापर्यंत प्रतिसादात ज्या मालिकांची नावं आली आहेत त्यातल्या imdb टॉप 250 मधल्यांची यादी

http://www.imdb.com/chart/toptv/

2. Band of Brothers (2001) 9.5

4. Game of Thrones (2011) 9.4

5. Breaking Bad (2008) 9.4

6. The Wire (2002) 9.3

11. The Sopranos (1999) 9.2

12. Sherlock (2010) 9.1

21. True Detective (2014) 9.0

23. Fargo (2014) 9.0

25. Death Note (2006) 8.9

34. House of Cards (2013) 8.9

35. Pride and Prejudice (1995) 8.9

38. Stranger Things (2016) 8.9

39. Black Mirror (2011) 8.9

40. Friends (1994) 8.9

41. Seinfeld (1989) 8.9

45. Narcos (2015) 8.8

49. Sarabhai vs Sarabhai (2004) 8.8

59. It's Always Sunny in Philadelphia
(2005) 8.7

63. The West Wing (1999) 8.7

64. The Return of Sherlock Holmes
(1986) 8.7

65. The Adventures of Sherlock Holmes
(1984) 8.7

68. Six Feet Under (2001) 8.7

77. Top Gear (2002) 8.7

82. Curb Your Enthusiasm (2000) 8.7

84. Dexter (2006) 8.7

91. The X-Files (1993) 8.6

116. Mad Men (2007) 8.6

121. Louie (2010) 8.6

142. The Newsroom (2012) 8.5

155. Agatha Christie's Poirot (1989) 8.5

177. Hannibal (2013) 8.5

181. Futurama (1999) 8.5

182. Suits (2011) 8.5

204. Modern Family (2009) 8.4

211. Jeeves and Wooster (1990) 8.4

227. Walking Dead (2010) 8.4

238. 24: Live Another Day (2014) 8.3

239. Lost (2004) 8.3

245. Boston Legal (2004) 8.3

248. M*A*S*H (1972) 8.3

ॲमी Thu, 26/10/2017 - 16:25

In reply to by ॲमी

पुण्यातल्या कोणाकडे या मालिकांचं कलेक्शन आहे का?
सध्या Alfred Hitchcock Presents डाउनलोड करतेय.... पण आमच्या १.५ गब डेटाप्लॅननुसार त्यालाच बरेच दिवस लागतील :(

पुंबा Thu, 26/10/2017 - 19:08

In reply to by ॲमी

वाय फाय असेल तर तुम्ही show box किंवा terrarioum सारखे ॲप वापरा. मोफत लाईव्ह स्ट्रीमींग होते सिरीजचे. वेगवान आणि उत्तम रिझोल्युशन. वायफाय वर उत्तम चालते.

ॲमी Fri, 27/10/2017 - 09:29

In reply to by ॲमी

मिलोराद, धन्यवाद :-) मी वेगळ्या लिंकवरून डाउनलोड करतेय.

पुंबा, वायफाय नाही. १.५गब/दिवस चा मोबाईल डाटाप्लान आहे.

स्ट्रीमींग नकोय. संग्रह करायचा आहे टॉप २५० चित्रपट आणि सिरीजचा.

पुंबा Fri, 27/10/2017 - 11:18

In reply to by ॲमी

ॲमी, तुम्हाला शो बॉक्स वरून डाऊनलोड देखिल करता येईल. टॉरंट किंवा इतर कुठल्याही डाऊनलोडींग ॲपवरून. स्पीड उत्तम मिळते. मुख्य गोष्ट सर्व चित्रपट, मालिका आहेत तिथे(जुन्या नव्या).

चिंतातुर जंतू Fri, 27/10/2017 - 11:07

'वायर'वरून आठवलं - डेव्हिड सायमनची 'ड्यूस' कुणी पाहतंय का? भारतात उपलब्ध आहे का?

मिलोराद Fri, 27/10/2017 - 15:31

In reply to by चिंतातुर जंतू

हो.मी चाच्यांच्या उपसागरातून उतरवून घेतली.पण फारशी आवडली नाही.

मंदार कात्रे Sun, 29/10/2017 - 11:36

रामायण ,महाभारत ,चाणक्य्
सूट्स ,फ्रिन्ज ,एक्स फाइल्स्
हाउ आय मेट युवर मदर
द प्रॅक्टिस , आणि इतर अनेक्

नेहमीच गोंधळलेले Mon, 30/10/2017 - 18:26

माझी यादी :
ब्रेकींग बॅड, हाऊस ऑफ कार्ड्स, मॅडम सेक्रेटरी, शेमलेस (शेमलेस मधले फ्रँक गॅलाघरचे पात्र म्हणजे केस स्टडी आहे.), लास्ट टँगो इन हॅलिफॅक्स, शेटलँड, हाऊस्, एक्स फाईल्स, इ.
बाकी हे जास्त/अति-बघणं हा सध्याच्या जगण्यातला मोठा एस्केप रूट आहे.

भांबड Sun, 18/03/2018 - 13:35

तर काल-परवाच मला नाॅस्टेजिया झाला. खुपच त्रासदायक हो.
लहानपणी दुसर्यांच्या घरी जाऊन जाऊन बघितलेल्या मालिकांपैकी एक मालिका स्टाॅकात घावली, "अलिफ लैला". सगळेच्या सगळे भाग.
लहानपणी घरी टिव्ही नसल्यानं दुसर्यांच्या घरी जाऊन/ रस्त्यावर ऊभा राहून/टाचा ऊंच करुन खिडकितून मालिका बघणे ह्यावर घरच्यांच्या प्रतिक्रिया अन् ज्यांच्या घरी जायचो त्यांचे चेहरे/हावभाव/समक्ष प्रतिक्रिया/असमक्ष प्रतिक्रिया ई ई हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो.
तर त्या पैकी ही मालिका, मी माझ्या तुनळीच्या वाहिनीवरही चढवली आहे(काॅपीराइट क्लेम आले तरीही). आणखी काही भाग चढवायचे बाकी आहेत. ते ही लवकरच...
जवळपास ७० भाग आहेत, नाव टाकण्यात थोडी गडबड झालीये, तीही लवकर सुधारेल.
खाली दुवा देत आहे.

https://www.youtube.com/playlist?list=PLx7Ov8DimiqQnh02utfBZrqtgRt-I2HmC