स्तनांच्या कर्करोगाचा बाजार - Welcome to Cancerland

'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस' या नावाखाली फेसबुकवर चाललेला बावळटपणा तुमच्या परिचयाचा आहे का? (नसेल तर तुम्ही पुरुष आहात; किंवा बावळट लोक तुमच्या फेसबुक लिस्टीत नाहीत.)

फायरफॉक्स हा ब्राउजर म्हणून किती लोकांना आवडतो, याची मला कल्पना नाही. मला क्रोम टाळायचा होता, म्हणून मी फायरफॉक्स वापरते. त्यात हल्ली नवीन, रिकामी टॅब उघडली की वाचण्यासाठी लेख सुचवले जातात. त्यात एक लेख मिळाला. मूळ लेख वाचायचा बाकी आहे, जरा जड आहे; पण त्यातून एक उत्तम लेखाचा दुवा मिळाला. Welcome to Cancerland

'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस' नावाखाली काय वाटेल तो बावळटपणा फेसबुकावर चाललेला असतो. गेली काही वर्षं मी त्यावरून "पण यामुळे काय फरक पडणार आहे?" असं विचारण्याचा क्षीण प्रयत्न करून झाला. त्यावर (मराठी आंजामुळेच ओळख झालेल्या) एका कवयित्रींनी, "सोड ना. तुला नको असेल तर नको करूस" म्हणून किमान शब्दांत आपला कमाल अवेअरनेस दाखवून झाला होता. हे प्रकरण मला कधीही समजलं नाही; आणि समजलं तरी मूर्खपणाचं वाटेल, याबद्दल खात्री होती. ती खात्री या लेखामुळे पटली.

हा फेसबुकी बावळटपणा म्हणजे आपण कोणत्या रंगाची ब्रेसियर घातली आहे तो रंग फक्त लिहायचा; आपली पर्स कुठे ठेवली आहे ती जागा तेवढी लिहायची; असलं काही तरी. चाबरटपणा करण्याबद्दल मला आक्षेप असण्याची शक्यताच नाही; मी हौसेनं चाबरटपणा करते. पण बावळटपणा आणि चाबरटपणा यांतला फरक मला समजतो! हा लेख वाचताना मला 'बार्बरा, तूच गं, तूच!' असं सतत होत होतं.

हा सगळा बावळटपणा अमेरिकेत सुरू झाला. स्तनांच्या कर्करोगाबद्दल बोलण्यासाठी एके काळी लोकांना लाज वाटत असे. स्तन म्हणजे लैंगिकता किंवा स्तन म्हणजे आईचं दूध पिणं; म्हणजे चारचौघांत कसं हो बोलायचं याबद्दल! तेही आपल्यासारख्या सुसंस्कृत अमेरिकी लोकांनी ... अश्शीच ही अमेरिका! या विषयाबद्दल लोकांना, विशेषतः स्त्रियांना बोलतं करता यावं, या 'थोर' विचारांपायी हा बावळटपणा सुरू झाला असावा. माझ्या ममव (मराठी मध्यमवर्गीय) मनाला सतत प्रश्न पडायचा; मेलं आमच्या देशात लोकांना दोन वेळचं खायला धड मिळत नाही; ठरावीक वय उलटल्यावर दर वर्षा-दोन वर्षांनी मॅमोग्राम करून घ्यावा, अशी संस्कृतीही नाही; त्या समाजात हे प्रकरण किती बिनडोकपणाचं आहे!

लेख वाचताना मला शेजारची मैत्रीण आठवली. गेल्या महिन्यात माझा वाढदिवस होता. तिनं मला विचारलं, "तू केंड्रा स्कॉटमधून काही घेणार आहेस का?"
मला कसलाही संदर्भ लागला नाही. केंड्रा स्कॉट हे खोट्या दागिन्यांचं दुकान आहे. सोन्या-चांदीचं पाणी दिलेले दागिने असतात. चष्मा आणि घड्याळ वगळता बाकी दागिने मी वापरत नाही, हे तिला चांगलंच माहित्ये. "का गं? तुला स्मरणभ्रंश वगैरे झाला का?"
"वाढदिवसाच्या महिन्यात केंड्रा अर्ध्या किंमतीत दागिने विकते. तुझा लायसन्स दाखवून मला सवलत मिळेल. तुला चालेल ना?"
"मला काय आक्षेप असायचाय!"
तिथली एकंदर प्रक्रिया बघितली. त्यांनी माझा लायसन्सचा नंबर किंवा माझं नावही लिहून घेतलं नाही. चेहरा-फोटो बघितला, वाढदिवसाची तारीख बघितली, मैत्रिणीला अर्ध्या किंमतीत कानातले मिळाले. "तुझ्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या महिन्यापर्यंत मॅचिंग गळ्यातलं घ्यायला पैसे वाचवून ठेवते."
मी थक्कच झाले. "बाई गं, हे दागिने मुळात किती किंमत वाढवून विकतात, हे तुझ्या लक्षात आलं का?" मला राहवेना.
"ती काय फक्त पैसे-पैसे करत नाही. धर्मदाय कामासाठीही दागिने देते; लिलावासाठी वगैरे. माझ्या आईला स्तनांच्या कर्करोगामुळे केमोथेरपी घ्यायला लागली होती; तेव्हा ती डोक्याला फडकं गुंडाळयची. त्यांनी तिला त्याबद्दल विचारलं. आणि breast cancer survivor आहे म्हणून फुकटात तिच्या आवडीचं कानातलं दिलं."

माझा स्वतःवरचा विश्वास उडाला हो! काय बोलावं हे मला सुचेना. 'तुला स्तनांचा कर्करोग झालाय; केमोथेरपीचा त्रास सहन करावा लागतोय; हा कर्करोग कशामुळे होतो हे नक्की माहीतही नाही; पण हे घे फुकट कानातले!"

तर बार्बरा एहरेनरिच हिनं cellular immunology या विषयात औपचारिक शिक्षण घेतलं आहे. इतरही बऱ्याच विषयांमध्ये तिला रस आहे, हे मूळ लेखात दिसलं. तिला उतारवयात स्तनांचा कर्करोग झाल्याचं लक्षात आलं. यापुढे एकंदर भांडवलशाही समाजात काय, काय घडतंय, याबद्दल तिनं खुमासदार शैलीत लिहिलेलं आहे. वैद्यकीय व्यवसायाची प्रतिक्रिया - ठरावीक चरकातून जाऊन, ठरावीक उपचार प्लीज, प्लीज, प्लीज, घ्याच म्हणतोय ना आम्ही - अशी व्यक्तीला कमी लेखणारी आली. दुसऱ्या बाजूनं, नफेखोरीच्या गुलाबी फीती, गुलाबी (कापडी) अस्वलं यांचा मारा झाला. मग स्तनांच्या कर्करोगावर संशोधन करण्यासाठी मॅरेथॉन वगैरे धावणं, हे प्रकार; बरं धावून जे पैसे देणगी म्हणून मिळवले जातात, ते कसे खर्चायचे याबद्दल या स्त्रियांना काहीही म्हणता येत नाही.

सगळ्यात कळीचा मुद्दा वाटतो ती म्हणजे भाषा. स्तनांच्या कर्करोगाशी लढा दिला, त्यातून वाचलेल्या, survivors ही असली युद्धजन्य, युद्धखोर भाषा. ती म्हणते, मग रोगाला ज्या बळी पडल्या त्या काय लढल्याच नाहीत? त्या मैदान सोडून पळून गेल्या आणि आम्ही लढलो म्हणजे आम्ही नक्की काय त्यात तीर मारले?

अमेरिकेत या स्त्रियांना हॉस्पिटलांमधूनच सपोर्ट ग्रूपमध्ये सहभागी व्हायला सांगतात. तिथेही सगळं गोडगुलाबीच. रोगामुळे आम्ही कशा अंतर्बाह्य बदललो आणि आमची आयुष्यं सुधारली! म्हणजे हा असा भीषण रोग झाला, त्यासाठी केमोथेरपीसारखे भयंकर उपचार करून घ्यावे लागले, आणि त्याबद्दल रागसुद्धा येऊ नये. आला तरी तो व्यक्त करू नये. चारचौघांत बरं नाही ना दिसत.

आणि या सगळ्या प्रकारांत, उपचार कोणते, किती, कसे घ्यायचे किंवा उपचार नाकारायचेच; बालिश गुलाबी रंग; सपोर्ट ग्रूपमधल्या लोकांच्या बालिश व्यक्तता; या सगळ्याबद्दल तिचा मुद्दा - स्तनांचा कर्करोग झाला म्हणून तुम्ही बायकांना लहान पोरांसारखं वागवता. एके काळी बायॉप्सीसाठी भूल दिली जात असे; त्यात कर्करोग सापडला तर भूल उतरेस्तोवर स्तन काढून, किंवा कर्करोगाच्या पेशी काढूनच टाकत असत. त्या बाईला काय हवंय, तिचा काय निर्णय आहे, वगैरे गोष्टी तिला विचारायच्याच नाहीत. आजही अमेरिकी व्यवस्था, स्त्रियांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ देतच नाही. पुन्हा एकदा, चॉम्स्की म्हणतो तसला 'मॅन्युफॅक्चर्ड कंसेंट'.

निबंध वाचताना मला फार मजा आली. फार मोठा नाहीये, १५-२० मिनीटांत वाचून होईल. जरूर वाचा. माझा सूर तक्रारीचा वाटेल, तो तसा आहेच. तिचा तसा नाही. ती नर्मविनोदी शैलीत हे सगळं मांडते.

किमान बेबी पिंक रंगाचा राग असेल, तर तेवढ्यासाठी तरी निबंध वाचाच.

(सध्या काय वाचताय या धाग्यात लिहायला सुरुवात केली. पण फार मोठा प्रतिसाद वाटला म्हणून नवा लेख म्हणूनच डकवला.)

---

पुरवणी - ज्या मूळ लेखातून या निबंधाचा दुवा मिळाला होता, तो वाचून झाला. When do you know you're old enough to die? Barbara Ehrenreich has some answers . बार्बरानं आयुष्यभर cellular immunology या विषयात केलेलं संशोधन आणि सध्या या विषयात काय सुरू आहे; या संदर्भात तिनं लिहिलेलं पुस्तक आज प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचा परिचय आहे. दीर्घायुष्याबद्दल बडी-लंबी छापाचे शब्दांचे खेळ न करता काही मांडणी असावी, असं लेख वाचून वाटलं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख चांगला आहे. Welcome to Cancerland ची लिंक उघड नाही, Your access to this site has been limited असा error येतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो जो प्रश्न आहे तुमच्या ब्रेझिअरचा रंग कोणता हा पाच वर्षांपूर्वी (अंदाजे) फेसबुकवर आलेला होता. फेसबुक किंवा इतर ठिकाणी काय नवीन चाललं आहे यासाठी काही साइट्स ,चानेल आहेत. किंवा आपले अच्युतराव गोडबोलेही*१ अधुनमधून ही माहिती लोकसत्तामध्ये देत असतात. आता त्या विषयावर काय चाबरटपणा चालला आहे हे कळण्यासाठी फेसबुक/ योग्य ब्राउजर पाहायला लागेलच. १) अमेरिकी लोक अथवा इतर देशांतील जनता या रोगाकडे कसे पाहते,व्यक्त होते हा एक मोठा विषय आहेच. २) त्या रोगावर आमच्या शास्त्रातच योग्य उपाय आहे हे पटवणे हासुद्धा वेगळा मुद्दा आहे. ३)कर्करोगी मुलांच्या दवाखान्यात जाऊन त्यांच्याशी बोलणे,त्यांच्या इच्छा पूर्ण करणे हे बॅालिवुड कलाकार करत असतात. कोण कोणाचे भलं करतोय तर मला आनंदच आहे.

*१- मी एक खोटा ( तसा खराच) इमेल अँड्राइड फोन फोनसाठी केलाय त्यासाठी गोडबोले हे नाव घेतलय. तसा मी गोड बोलत नसलो तरी. यात नवीबाजू काही नाही.
-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या बाईंचं नाव प्रथम ऐकलं ते "Nickel and Dimed"च्या संदर्भात. किमान वेतनावर काम करत त्यांनी केलेला अमेरिकेतल्या असमानतेचा आणि दारिद्र्याचा अभ्यास खूप रोचक होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा ब्राचा रंग लिहीणं प्रकार किमान दहा वर्षापूर्वीही नक्की चालू होता. नुसतं "ऑरेंज" वगैरे लिहून खिदळणं वगैरे. पोरींना काय गुदगुल्या व्हायच्या कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेख आवडला. सर्वच गोष्टींचा बाजार करणं अमेरिकन लोकांना उत्तम जमतं. त्यात स्त्रियांचं बालिकाकरण होतं हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

ब्राचा रंग सांगण्याच्या आचरटपणाची चेष्टा करणारा लेख मी त्यावेळी लिहिलेला होता. तो लवकरच इथे डकवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक पहाते ग्रन्थालयात आलं तर. इतक्यात येणार नाहीच. पण ...
लेख , लेखाचा विषय, आशय मस्तच. खास अदिती लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. मिसळपाववर नगरीनिरंजनाचा https://www.misalpav.com/node/14847 हा मस्त् लेख आला होता यावर. त्या लेखावर ३_१४ तैंचा प्रतिसादही आहे. विसरल्याकी काय तै?

(मिसळपाववरील जवळपास सगळे लेख वाचलेला आणि सध्या ४९७९ किलो वजन असलेला) महाकाय हत्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस' या नावाखाली फेसबुकवर चाललेला बावळटपणा तुमच्या परिचयाचा आहे का? (नसेल तर तुम्ही पुरुष आहात; किंवा बावळट लोक तुमच्या फेसबुक लिस्टीत नाहीत.)

हा बावळटपणा माझ्या परिचयाचा नाही पण त्याचे कारण तिसरेच आहे. ते म्हणजे मी फेसबुककडे ढुंकूनहि पाहात नाही.

तरीहि उत्सुकतेमधून Welcome to Cancerland हा लेख वाचण्याचा प्रयत्न केला पण त्याला Your access to this site has been limited असे उत्तर मिळाले आणि त्याच्याखाली टेक्नोमंद लोकांना आणखीनच बुचकळ्यात टाकणारे मैलभर लांबीचे काही अगम्य मार्गदर्शन.

बाकी लेखात लिहिल्याप्रमाणे गुलाबी रंगाचा अतिरेक, मऊमऊ अस्वले आणि अन्य प्राणी ह्यांचा अतिरेक हा जरा जादाच होतो आहे असे मलाहि वाटत आले आहे. अमेरिकेत जे आज होते ते उद्यापर्यंत भारतातील ममव पर्यंत पोहोचते त्यामुळे भारतातहि हे वाढत आहेच. अलीकडच्या भारतीय लहान मुलांना गुलाबी अस्वल कुशीत घेऊन झोपायची सवय पालकच लावतात.

मला विनोदी वाटणारी गोष्ट म्हणजे Grief Councellors. कोठे मोठ्या अपघातात बरेच लोक मेले की Grief Councellors तेथे पोहोचले आहेत असे बातम्यांमध्ये आवर्जून सांगितले जाते. म्हणजे शोकसंतप्त परिवार (सरकारी हिंदीमधील शब्द) 'चला Grief Councellors कडे जाऊन आपली Grief कमी करून घेऊ या' असे म्हणत बाहेर पडले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. हे touchy feely.प्रकार जरा हाताबाहेर जाऊ लगले आहेत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांना मूळ लेखातला दुवा उघडता येत नाहीये, त्यांच्यासाठी हा दुवा -

http://barbaraehrenreich.com/cancerland/

वेबसाईट उघडत नसेल तर ऐसीच्या सर्व्हरवर त्याची PDF ठेवलेली आहे, ती इथून उतरवून घेता येईल.

(तो का उघडत नाहीये, हे मला अजूनही समजलेलं नाही. पण ते महत्त्वाचं नाही. मूळ निबंध फारच सुंदर आहे; जरूर वाचा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूळ निबंध फारच सुंदर आहे; जरूर वाचा

नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमित्ताने ही एक हौस फिटवुन घेतली जात असावी.
माझ्या ब्रेसीयरचा रंग कळावा त्याने तो इतरांना वा कुणा विशिष्ट व्यक्तीला कळल्याने एक सेक्शुअल थ्रिल येत असावे त्याच्या आनंदासाठी
हे एक कॅन्सर अवेयरनेस च गोड निमीत्त असेल.
हे अर्थातच सप्रेस्ड सोसायटीज मध्ये ( भारतासारख्या ) होण्याचे प्रमाण अधिक असावे.
बाकी एड्स हा कॅन्सरहुन अधिक गंभीर विषय कॅन्सर हुन अधिक थिल्लरपणे बिनडोकपणे सेलीब्रेटला जातोच ना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात शर्ट, टीशर्ट, कुडता, ब्लाऊज असा कोणताही कपड्याचा प्रकार चारचौघांत वापरत असताना, त्यातून ब्रेसियरचा पट्टा डोकावला तरी कोणीतरी संस्कृतीरक्षक मुलगी/बाई येऊन, तो पट्टा झाकण्याचा प्रयत्न करते; असं करताना अनेकदा आपल्या खाजगी अवकाशाच्या मर्यादाही सहज ओलांडल्या जातात; पण तो पट्टा झाकण्यातून या बाया फक्त आपली संस्कृती जपत नसतात तर आपल्या लैंगिक विकृतीही समाजापासून झाकत असतात, हे मला आत्ताच समजलं!

ब्रेसियरचा रंग सांगणं म्हणजे एक्झिबिशनिझम! सुतावरून स्वर्ग गाठत आहात; किंवा फार व्हिक्टोरियन मूल्यं बाळगून आहात; किंवा आपण फार निराळ्या विश्वांत राहतो आणि हॉकिंगचा बहुविश्व-सिद्धांत तो हाच, एवढंच म्हणून खाली बसते.

आणि एक्झिबिशनिझम ही लैंगिक विकृती? त्याशिवाय कोणतीही समाजमाध्यमं चालणार नाहीत. या हिशोबात जगातली बहुतांश मंडळी विकृत आहेत; तुमच्या-माझ्यासकट.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असा प्रतिसाद मला जमतच नाही. मला हेच्च फक्त पिक्चर्स मध्ये आठवलं/वाटलं. लहानपणी पाहीलेला विकृत माणूस आठवला आणि मनात आलं नाही हो मारवा ब्रेसिअरचा रंग सांगणे आणि पॅन्टीची झिप उघडुन , लहान मुलीला लिंग दाखविणे, यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद डोक्यावरून जाताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो परदेशात कुठे सप्रेस्ड असतात? पण तिथेसुद्धा काही वर्षांपूर्वी ते स्लटवॉक चं खूळ काढलं होतं नाही का? निमित्त काय तर कुठल्यातरी छोट्या शहरातल्या कुठल्यातरी चवलीपावली हवालदाराने काहितरी उद्गार काढले. एक्झिबिशनची प्रवृत्ती बायकांमध्ये नैसर्गिक आहे. पण असले काहितरी निमित्त मिळाले की हौस फिटवता फिटवता आपण काहीतरी भारी क्रांतिकारक करतो आहोत असे वाटून घ्यायची सोय होते! एका दगडात दोन पक्षी...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0