ऐसीची कचरापेटी
नमस्कार ऐसीकर बंधु-भगिनींनो,
वर बंधु, भगिनी वगैरे म्हटलं असलं तरी मला काही विवेकानंद बनायचं नाहीये. कारण काही लोकांना मी बंधु मानत नाहीत, तर काहींना भगिनी मानायला मला आवडणार नाही. नुकताच राखीपौर्णिमेतून सुटलोय, मग उगाच असल्या बाबतीत (नको त्या) रिश्तों के इल्जाम का घ्या?
असो, भाषणाच्या सुरुवातीचा करायचा भंकस ज्योक तर करून झाला. आता मला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळता येईल. तो म्हणजे आम्ही व्यवस्थापक तुम्हा ऐसी सदस्यांसाठी किती झटत असतो आणि त्यातून काय फलनिष्पत्ती होते ते... तर ऐसीवरचा वावर सदस्यांसाठी कायमच सुखकर व्हावा म्हणून आम्ही झटत असतो. त्यासाठी वेळोवेळी आम्ही नवीन नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. तशीच एक सुविधा गेल्या काही तासांच्या झटझटाटीतून आम्हाला सुचलेली आहे. आणि अर्थातच ऐसी हे लोकशाही संस्थळ असल्यामुळे आम्ही सर्व लोकशाही राज्यकर्त्यांप्रमाणे जनमताचा कानोसा घेत असल्याची बतावणी करतो. त्यासाठी हा लेख.
तेव्हा नमनाच्या आधीच काही घडे तेल ओतायच्या आतच सुरुवात करतो. ऐसी अक्षरे हे संस्थळ आम्ही गेली जवळपास सात वर्षं चालवत आहोत. लोकं येतात, लोकं जातात, आपले विचार मांडतात, कविता टाकतात, लेख लिहितात, प्रतिसाद लिहितात, मध्येच आम्ही व्यवस्थापक काहीतरी विशेषांक काढतो, दिवाळी अंक काढतो... हे चक्रनेमिक्रमणाने चालू आहे. पण त्याच सात वर्षांत इतर सोशल मीडिया ज्याप्रमाणे प्रगल्भ होत गेला, तसं ऐसी काही सुधारलं नाही, असं आमच्या लक्षात यायला लागलेलं आहे. लोकं सोशल मीडियावर येऊन नक्की काय करतात? काही लोक लेखन वगैरे फुटकळ गोष्टी करतात खरे, पण लोकांचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे भांडणं करणं. आता सोशल मीडिया जेव्हा 'नववधू प्रिया मी बावरते' पर्वात होता, तेव्हा लोकं बऱ्यापैकी सभ्य चर्चा करायचे. ट्रोलिंग होत असे, नाही असं नाही, पण जुनं ते सोनं या न्यायाने त्याकाळचं सगळं तसं चांगलंच होतं म्हणायचं. असो. तर सध्या लोकांचा कल असा दिसतो की ऑनलाइन मीडियावर येऊन गदारोळ करायचा. लोकांचे अपमान करायचे, त्यांना शिव्या द्यायच्या, गलिच्छ भाषा वापरायची, आकांडतांडव करायचा, तूतूमैमै करायची, बाचाबाचीपर्यंत वेळ न्यायची, एकमेकांच्या आदरस्थानांना चिखलात लोळवायचं, इत्यादी इत्यादी.
दुर्दैवाने ऐसीवर या सगळ्याचा थोडा अभावच होता. पण सुदैवाने, सध्या ती कमी भरून येताना दिसते आहे. लोकांचं एकमेक्यांना शिव्या देणं, अपमान करणं, उणीदुणी काढणं, आरोप-प्रत्यारोप करणं हे वाढत चाललेलं दिसत आहे. 'एकदाचं गंगेत घोडं न्हालं' असं समजून आम्ही व्यवस्थापकही ते गोड मानून घेतो आहोत. पण या बाबतीत मागे असल्यामुळे अधिक वेगाने त्या दिशेने प्रवास करण्यासाठी काहीतरी करावं असा विचार उत्पन्न झाला. तेव्हा थोड्या झटझटाटीनंतर आम्ही ठरवलं की जे लोक या दिशेने ऐसीला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या अभिव्यक्तींसाठी एक स्वतंत्र धागा सुरू करावा. म्हणजे त्यांचे प्रयत्न वेगवेगळ्या धाग्यांवर विखुरले जाण्याऐवजी वाचकांना एकत्रित वाचता येतील.
आम्हा ऐसी संपादकांची विनोदबुद्धी थोडी तिरकसच असल्यामुळे या धाग्याला 'ऐसीची कचरापेटी'सदृश नाव द्यायचं घाटतं आहे. प्रत्येक घरात कचऱ्याचे डबे असतात. आणि काही विशिष्ट पदार्थ त्यांत टाकले जातात. मग ते टेबलावर असोत, ताटांत असोत, स्वयंपाकघरात तयार झालेले असोत - शेवटी ते कचऱ्याच्या डब्यात जातात. आम्ही ऐसीच्या कचरापेटीकडे त्याज्य पदार्थांचा समूह म्हणून न पाहाता एकत्रित करण्याच्या कलाकृतींचं संग्रहालय म्हणून पाहात आहोत. इतरत्र कुठे तिथे जाण्यायोग्य प्रतिसाद निर्माण झाले की शक्य तितक्या तत्परतेने आम्ही ते त्या धाग्यावर डकवू, जेणेकरून सर्वांना कधीतरी या कलाकृतींचा स्वतंत्र आस्वाद घेता येईल, आणि त्या कलाकारांना दाद देता येईल. कचरापेटीसदृश अपमानास्पद नाव देण्याचं निव्वळ कारण म्हणजे केवळ हे गलिच्छ म्हटलेलं नक्की काय आहे असा विचार करत लोक तिथे जातील. असे धागे वाचनमात्र करणंही विचाराधीन आहे, कारण उगीच कोणातरी हवश्या नवश्या गवश्याला तिथे जाऊन तिथल्या ताजमहालांना आपली वीट लावण्याची संधी का द्या?
तर मंडळी, या धाग्याला नाव काय द्यावं याबद्दल तुमच्याकडून मदत हवी आहे. आम्ही काही नावं ठरवली आहेत - त्यांपैकी कुठची आवडतात ते सांगा, किंवा तुम्हाला सुचलेली नावं सांगा.
- ऐसीची कचरापेटी
- गटारीची कटोरी
- कच्रपट्टिका (संस्कृतसदृश लिहिलं की सन्माननीय वाटतं)
- वायफायची मळमळ
- bileवेड
- कर्कश्श म्यूझियम
स्वच्छ ऐसी अभियान ही फारच
स्वच्छ ऐसी अभियान ही फारच भारी आयड्या आहे. तसं बघितलं तर ही कचरापेटी हे त्या अभियानाचं एक अंग आहे. शपथ वगैरे गोष्टींवर हलकट पुरोगाम्यांचा काही विश्वास नसतो, कारण शपथ कसली घेणार ते? त्यापेक्षा ती इथल्या मूठभर सनातन्यांसाठी ठेवू. आणि अभियान म्हटलं की झाडू मारतानाचे फोटो हवेत सगळ्यांचे.
हीही आयड्या चांगलीच आहे.
हीही आयड्या चांगलीच आहे.
आमच्या देशात जेव्हा अधिकृत सरकारी स्वच्छता अभियान चालू झाले , त्याला पोस्टर म्हणून आदरणीय मोदींजींनी एक पंचाधारी हातात काठी घेतलेल्या वृद्ध गृहस्थांचे चित्र लावले होते.
या गृहस्थांचे चित्र लावले की एक बरे होत असावे. हलकट प्रेस्टिट्यूट देशद्रोही फुरोगाम्यांनाही बरं वाटतं असावं
आणि देश/संस्कृती अभिमानी अशा मंडळींना पंचा/धोतर धारी गृहस्थ नागडेही दिसून ते चवीनुसार हवे तसे दगड ही मारत बसण्याचा पर्याय असू शकतो.( असले अधिकृत प्रातःस्मरणीय म्हणून काय झालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून दगुड वापरता येतातच)
अशी एकंदरीत विन विन परिस्थिती येते यामुळे.( आहेत की नाही आमचे लाडके नेते मोदीजी हे चतुर आणि हुशार!!!)
आम्ही हुशार झालो
तुम्हीही चतुर व्हा ना.
(ऐसी स्वच्छता अभियाना करिता पद्मविभूषण मार्गदर्शक काका यांचा फोटो मी आणू शकेन. सध्या डेसपरेट आहेत ते. देतील फोटो)
अभियानाचं अधिकृत गाणं
अभियान म्हटलं त्यासाठी अधिकृत गाणं हवं. अदितीने 'पट्टी रॅप' हे गाणं सुचवलं, आणि मी त्याला अनुमोदन देऊन प्रस्ताव पटलावर ठेवतो आहे. तुम्हाला इतर काही सुचली तर सांगा.
https://www.youtube.com/watch?v=DcTJXSTtMzU
माबोवर आहेत वाहतं पान
माबोवर आहेत वाहतं पान पद्धतीचे धागे. तीस/पन्नास खरडी झालावर जुन्या आपोआप नष्ट होत राहतात. ( रेडिओअॅक्टिव द्रव्ये नष्ट होत जातात, विघटन पावतात तसं काहीसं.) स्थानिक माबोकर नागपूर/ गोवा/ एलए/टोकियो/ठाणे इत्यादि. त्या खरडी वाइट नसल्या तरी इतरांना संदर्भ लागत नसल्याने ते वाचत नाहीत.
आता इथेही महिन्याभरात ज्या लक्शवेधी खरडी दोनचार सभासदांत देवाणघेवाण झाल्या त्या तशाच प्लास्टिकसारख्या न सडता हिमालयात थिजून राहतात कित्येक काळ तशा राहाव्या असं त्यांचीही अपेक्षा नसावी.
ऐसी अक्शरेलाच मोठी कचरापेटी आणि त्यातल्या आम्ही घोंघवणाऱ्या माशा कुणालाच मनापासून म्हणवून घ्यायचे नसावे.
आणखी तीसचाळीस वर्षांनी पुढची पिढी झुने धागे काढून वाचेल तेव्हा आमचे मामा/मावशी/काका/आत्या/आजीआजोबा असेही लिहायचे का ही विचारणा होईल ही खात्री आहे.
संपादकमंडळ सतत सहकाऱ्याने संस्थळ चालवत आहे आणि एक सभासद म्हणून निष्ठा दृढ आहेत.
समाचार नावाचे वाहते पान काढता येईल. समाचार शब्द द्व्यर्थी आहे. चांगले वाईट दोन्ही अर्थ आहेत.
उत्तम!
उभ्या (ऐसी)आयुष्यात पहिल्यांदा अक्कल वापरून काही ढंग चे काम केलेत!
(आता 'स्लिपरी स्लोप'च्या बोंबा सुरू होतीलच. पण अर्थात हे खाजगी संस्थळ असल्याकारणाने त्या गैरलागू आहेत, हे उघड आहे.)
(आणि हो, ही ट्रीटमेंट उद्या मलासुद्धा मिळू शकते, याची पूर्ण कल्पना आहे. ऑनेस्टली, आय डोंट केअर. माझ्यावर त्याने काहीही फरक पडत नाही. मला जेव्हा जे बोलावेसे वाटेल, ते मी तरीही - आणि मला वाटेल त्या शब्दांत - बोलणारच. संपादकांना उडवावेसे वाटले - मला किंवा माझ्या लिखाणाला - तर अवश्य उडवू द्यात. काय आणि कसे लिहायचे ते ठरविण्याचे आणि मग ते लिहिण्याचे काम माझे; काय ठेवायचे नि कशाला आणि कोणाला उडवायचे हे ठरविण्याचे आणि मग त्याप्रमाणे उडविण्याचे काम संपादकांचे. मी माझे काम इमानेइतबारे करतो; संपादकांना त्यांचे काम इमानेइतबारे करूद्यात.)
आजवर ओंडका राजाचे राज्य चालले होते. 'मी मारल्यासारखे करतो; तुला रडल्यासारखे करायचे असलेच, तर कर, आग्रह नाही'चा जमाना होता. आता बहिरीससाण्याचे राज्य आले. कधीतरी यायचेच होते; आत्ताच आले, हे ठीकच झाले.
अर्थात, (पुढेमागे) याचाही अतिरेक होऊ शकतोच. कथित स्लोप स्लिपरी होऊ शकतोच. पण आधी म्हटल्याप्रमाणे, हे खाजगी संकेतस्थळ असल्याकारणाने, ते पूर्णपणे मालकां-संपादकांचे प्रेरॉगेटिव आहे. सदस्यांना पसंत नसल्यास त्यांना चालू लागण्याचे प्रेरॉगेटिव आहेच. फार फार तर काय होईल, की बरेच किंवा सगळेच सदस्य सोडून गेले, तर कदाचित पुढेमागे संस्थळ बंद पडेल. ते बंद पडू द्यायचे, की चालू ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या मगदुराप्रमाणे प्रयत्न करायचे, हा सर्वस्वी मालकासंपादकांचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे ते काय हवे ते करतीलच. ओंडका-राज्यात कितीतरी सदस्य सोडून गेले, त्यांची पर्वा केली नाही, तर आता ससाणा-राज्यात ती करण्याचे कोणतेच बंधन मालकांसंपादकांवर असण्याचे काही कारण असू नये.
सदर धागा बोर्डावर ठेवलेला नाही.
हे उत्तम केलेत. मात्र, एक कुतूहल. श्री. राजेश घासकडवी हे त्या धाग्यावर जाऊन निष्कासित केलेल्या प्रत्येकाला जातीने उत्तरे देण्याचे सौजन्य का बरे दाखवीत आहेत? नाही म्हणजे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, हे मान्यच आहे. तक्रार नाही. निव्वळ कुतूहल.
अपेक्षा आणि अधिकार
'न'बा, माझ्या उभ्या आंजा आयुष्यात तुम्ही कधीही असभ्य-छपराट भाषा वापरल्याचं बघितलेलं नाही; ना कधी कोणाचा, कोणत्या गटाचा व्यक्तिगत पातळीवर अपमान केलेला; ना कधी बेकायदेशीर हिंसेची मागणी केलेली. तुमची मतं मला, ऐसी व्यवस्थापकांना व्यक्तिशः पटतील किंवा पटणार नाही. पण ऐसीच्या धोरणाबाहेर जाऊन, ऐसीला तसदी होईल अशा प्रकारे तुम्ही कधीही लिहीत नाही. आता कचरापेटी उघडली म्हणून तुम्ही असा छपरीपणा सुरू कराल, याची शक्यताही कमी वाटते.
ऐसीवर अनेक सदस्य आहेत ज्यांची मतं मला प्रत्येक वेळेस पटतील असं नाही. बहुतेकदा पटणार नाहीत. एकदाही पटणार नाहीत. मात्र असभ्य छपराटपणाच्या पातळीवर हे लोक कधीही उतरणार नाहीत. निदान असभ्यपणा काय आणि त्याची जागा काय याबद्दल आपली मतं पटतील. किंबहुना ऐसीवर नियमितपणे लिहिणाऱ्या लोकांचा ऐसीवर तेवढा अधिकार आहे.
'आता हे आवरा' असं म्हणण्याचा अधिकार ऐसी सदस्यांना आहे.
समाचार धाग्यावरच समाचार
समाचार धाग्यावरच समाचार घ्यावा एकेकाचा.
वाहते पानही हवेच. आपोआप कचरा नष्ट होत जाईल.
म्हणजे हासुद्धा प्रयोग करून पाहा ना.
" तिकडे ये बघतो तुला."
शाळेतली आठवण - वर्गात सहा बोटे दाखवून गुद्द्याची खूण म्हणजे सहावाजता शाळा सुटल्यावर बुकलेन तुला. धमक्या त्यावेळेस खऱ्या करत. तो मुलगा दोनचारजणांच्या घोळक्यातून पळून जायचा.
तर मुद्दा असा की ज्याप्रमाणे
तर मुद्दा असा की ज्याप्रमाणे नवीन सिनेमा यायचा असला की प्रत्येक हिरो आणि हिरवीन डैरेक्टर अन प्रोडूसर हिरिरीने धिस इज दिफरंट असा घोषा लावतात अन पहायला जावे तर तोच गुल अन तीच काडी
प्रत्येक नवे संस्थळ (मराठी) याच प्रकारे चालते, चालवले जाते,
वेलकम टू वर्ल्ड ऑफ एडीटर्स
ज्याप्रमाणे नवीन सिनेमा यायचा
ज्याप्रमाणे नवीन सिनेमा यायचा असला की प्रत्येक हिरो आणि हिरवीन डैरेक्टर अन प्रोडूसर हिरिरीने धिस इज दिफरंट असा घोषा लावतात अन पहायला जावे तर तोच गुल अन तीच काडी
.
शॉल्लेट. अनेक वर्षांपूर्वी मुंबईत राहत होतो तेव्हा माझ्या एका रूम पार्टनरचा मित्र सिनेजगतात कामाला होता त्याने नेमकं हेच सांगित्लं होतं.
.
मतभेद असावेत.
आचरटबाबा, माझे तुमच्याशी मतभेद असले तरीही मुद्दाम व्यक्त करण्याएवढे तीव्र नसतात. पण इथे मतभेद आहेत.
जर खुशालचेंडू वा इतर कोणाला वाटत असेल की सगळी मराठी संस्थळं सारखीच असतात, तर तसा विचार करण्याची आणि व्यक्त करण्याची पूर्ण सोय असावी. लोक विरोध करतात, मतभेद व्यक्त करतात म्हणून कोणाला आपली मतं व्यक्त आली नाहीत, असं होऊ नये.
तुमची भाषा कधीही 'विरोध खपवून घेणार नाही', किंवा 'विरोध करणारे लोक !@$%^* आहेत', अशा छापाची नसते. मात्र तशी भाषा करणाऱ्यांना सभ्यपणा म्हणजे काय हे समजत नाही; ते दाखवण्याची जबाबदारी आपली, तुमच्या-माझ्यासारख्या लोकांची आहे.
नाकातील केस जाळायचे आहेत का?
नाकातील केस जाळायचे आहेत का?
.
.
.
.
.
आमच्याकडे जळक्या ढुसकुल्यांचा पुरवठा होलसेल भावात केला जाईल् .