ऐसीची कचरापेटी

नमस्कार ऐसीकर बंधु-भगिनींनो,

वर बंधु, भगिनी वगैरे म्हटलं असलं तरी मला काही विवेकानंद बनायचं नाहीये. कारण काही लोकांना मी बंधु मानत नाहीत, तर काहींना भगिनी मानायला मला आवडणार नाही. नुकताच राखीपौर्णिमेतून सुटलोय, मग उगाच असल्या बाबतीत (नको त्या) रिश्तों के इल्जाम का घ्या?

असो, भाषणाच्या सुरुवातीचा करायचा भंकस ज्योक तर करून झाला. आता मला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळता येईल. तो म्हणजे आम्ही व्यवस्थापक तुम्हा ऐसी सदस्यांसाठी किती झटत असतो आणि त्यातून काय फलनिष्पत्ती होते ते... तर ऐसीवरचा वावर सदस्यांसाठी कायमच सुखकर व्हावा म्हणून आम्ही झटत असतो. त्यासाठी वेळोवेळी आम्ही नवीन नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. तशीच एक सुविधा गेल्या काही तासांच्या झटझटाटीतून आम्हाला सुचलेली आहे. आणि अर्थातच ऐसी हे लोकशाही संस्थळ असल्यामुळे आम्ही सर्व लोकशाही राज्यकर्त्यांप्रमाणे जनमताचा कानोसा घेत असल्याची बतावणी करतो. त्यासाठी हा लेख.

तेव्हा नमनाच्या आधीच काही घडे तेल ओतायच्या आतच सुरुवात करतो. ऐसी अक्षरे हे संस्थळ आम्ही गेली जवळपास सात वर्षं चालवत आहोत. लोकं येतात, लोकं जातात, आपले विचार मांडतात, कविता टाकतात, लेख लिहितात, प्रतिसाद लिहितात, मध्येच आम्ही व्यवस्थापक काहीतरी विशेषांक काढतो, दिवाळी अंक काढतो... हे चक्रनेमिक्रमणाने चालू आहे. पण त्याच सात वर्षांत इतर सोशल मीडिया ज्याप्रमाणे प्रगल्भ होत गेला, तसं ऐसी काही सुधारलं नाही, असं आमच्या लक्षात यायला लागलेलं आहे. लोकं सोशल मीडियावर येऊन नक्की काय करतात? काही लोक लेखन वगैरे फुटकळ गोष्टी करतात खरे, पण लोकांचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे भांडणं करणं. आता सोशल मीडिया जेव्हा 'नववधू प्रिया मी बावरते' पर्वात होता, तेव्हा लोकं बऱ्यापैकी सभ्य चर्चा करायचे. ट्रोलिंग होत असे, नाही असं नाही, पण जुनं ते सोनं या न्यायाने त्याकाळचं सगळं तसं चांगलंच होतं म्हणायचं. असो. तर सध्या लोकांचा कल असा दिसतो की ऑनलाइन मीडियावर येऊन गदारोळ करायचा. लोकांचे अपमान करायचे, त्यांना शिव्या द्यायच्या, गलिच्छ भाषा वापरायची, आकांडतांडव करायचा, तूतूमैमै करायची, बाचाबाचीपर्यंत वेळ न्यायची, एकमेकांच्या आदरस्थानांना चिखलात लोळवायचं, इत्यादी इत्यादी.

दुर्दैवाने ऐसीवर या सगळ्याचा थोडा अभावच होता. पण सुदैवाने, सध्या ती कमी भरून येताना दिसते आहे. लोकांचं एकमेक्यांना शिव्या देणं, अपमान करणं, उणीदुणी काढणं, आरोप-प्रत्यारोप करणं हे वाढत चाललेलं दिसत आहे. 'एकदाचं गंगेत घोडं न्हालं' असं समजून आम्ही व्यवस्थापकही ते गोड मानून घेतो आहोत. पण या बाबतीत मागे असल्यामुळे अधिक वेगाने त्या दिशेने प्रवास करण्यासाठी काहीतरी करावं असा विचार उत्पन्न झाला. तेव्हा थोड्या झटझटाटीनंतर आम्ही ठरवलं की जे लोक या दिशेने ऐसीला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या अभिव्यक्तींसाठी एक स्वतंत्र धागा सुरू करावा. म्हणजे त्यांचे प्रयत्न वेगवेगळ्या धाग्यांवर विखुरले जाण्याऐवजी वाचकांना एकत्रित वाचता येतील.

आम्हा ऐसी संपादकांची विनोदबुद्धी थोडी तिरकसच असल्यामुळे या धाग्याला 'ऐसीची कचरापेटी'सदृश नाव द्यायचं घाटतं आहे. प्रत्येक घरात कचऱ्याचे डबे असतात. आणि काही विशिष्ट पदार्थ त्यांत टाकले जातात. मग ते टेबलावर असोत, ताटांत असोत, स्वयंपाकघरात तयार झालेले असोत - शेवटी ते कचऱ्याच्या डब्यात जातात. आम्ही ऐसीच्या कचरापेटीकडे त्याज्य पदार्थांचा समूह म्हणून न पाहाता एकत्रित करण्याच्या कलाकृतींचं संग्रहालय म्हणून पाहात आहोत. इतरत्र कुठे तिथे जाण्यायोग्य प्रतिसाद निर्माण झाले की शक्य तितक्या तत्परतेने आम्ही ते त्या धाग्यावर डकवू, जेणेकरून सर्वांना कधीतरी या कलाकृतींचा स्वतंत्र आस्वाद घेता येईल, आणि त्या कलाकारांना दाद देता येईल. कचरापेटीसदृश अपमानास्पद नाव देण्याचं निव्वळ कारण म्हणजे केवळ हे गलिच्छ म्हटलेलं नक्की काय आहे असा विचार करत लोक तिथे जातील. असे धागे वाचनमात्र करणंही विचाराधीन आहे, कारण उगीच कोणातरी हवश्या नवश्या गवश्याला तिथे जाऊन तिथल्या ताजमहालांना आपली वीट लावण्याची संधी का द्या?

तर मंडळी, या धाग्याला नाव काय द्यावं याबद्दल तुमच्याकडून मदत हवी आहे. आम्ही काही नावं ठरवली आहेत - त्यांपैकी कुठची आवडतात ते सांगा, किंवा तुम्हाला सुचलेली नावं सांगा.

- ऐसीची कचरापेटी
- गटारीची कटोरी
- कच्रपट्टिका (संस्कृतसदृश लिहिलं की सन्माननीय वाटतं)
- वायफायची मळमळ
- bileवेड
- कर्कश्श म्यूझियम

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

नाकातील केस जाळायचे आहेत का?
.
.
.
.
.
आमच्याकडे जळक्या ढुसकुल्यांचा पुरवठा होलसेल भावात केला जाईल् .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाकातले केस नाही नाकातली केसं Wink

पळा पळा पळा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला हे कोल्हापुरातच शिकलो. एक तो केस. अनेक ती केसं.
एक ते बोट, अनेक ती बोटं, एक ते..... असो. उदाहरणं कानातली केसं जाळणारी असायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा हा

मी तर आता सरकारदरबारी केसच करावी म्हणतोय. केसं हाच खरा उच्चार असून या पुणेरी लोकांनी अनुस्वार खाऊन टाकला. आमच्याकडं या, बामन काय अन नॉनबामन काय, सगळे केसंच म्हन्त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बामन नाही बामनं म्हनायचं.
कागदं, दगडं, उंदरं, कावळं वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसतीच "केसं उभी राहत्यात" म्हटलं तर त्यांचं स्थान अध्याहृत असतं सांगली मिरज कोल्हापूरकडे. आणि या रचनेत "भापो" फॅक्टर जबरी असतो. उदा. भरलेल्या ऑड्यन्सससमोर कोणी आपल्याला स्टेजवर अचानक ढकलून दिल्यास जे होईल ते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न आहे. मुद्दाम चणे खायची गरज नाही.

सदर धागा आणि गुर्जींचं पुनरागमन यांची संभावना टाकाऊतून टिकाऊ, कचऱ्यातून कला किंवा चिखलातून कमळ अशी करावी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदीअगदी.
दिवाळीअंकरुपी बालार्काची प्रभा फाकताना, गुर्जी, काही धाग्यारुपी दलदलीतील गोजीरवाण्या कमळवाणी उमलले जणू.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी, अत्यंत निकडीची निकड होती.
स्वच्छ ऐसी अभियानात सहभागी होण्याची इच्छा आहे.
(हल्ली असल्या गोष्टींची शपथ वगैरे घेऊन ते फेबु आणि इन्स्टाग्राम वर टाकणे पद्धत असते.
एक शपथ पण लिहून टाकणार का ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वच्छ ऐसी अभियान ही फारच भारी आयड्या आहे. तसं बघितलं तर ही कचरापेटी हे त्या अभियानाचं एक अंग आहे. शपथ वगैरे गोष्टींवर हलकट पुरोगाम्यांचा काही विश्वास नसतो, कारण शपथ कसली घेणार ते? त्यापेक्षा ती इथल्या मूठभर सनातन्यांसाठी ठेवू. आणि अभियान म्हटलं की झाडू मारतानाचे फोटो हवेत सगळ्यांचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीही आयड्या चांगलीच आहे.
आमच्या देशात जेव्हा अधिकृत सरकारी स्वच्छता अभियान चालू झाले , त्याला पोस्टर म्हणून आदरणीय मोदींजींनी एक पंचाधारी हातात काठी घेतलेल्या वृद्ध गृहस्थांचे चित्र लावले होते.
या गृहस्थांचे चित्र लावले की एक बरे होत असावे. हलकट प्रेस्टिट्यूट देशद्रोही फुरोगाम्यांनाही बरं वाटतं असावं
आणि देश/संस्कृती अभिमानी अशा मंडळींना पंचा/धोतर धारी गृहस्थ नागडेही दिसून ते चवीनुसार हवे तसे दगड ही मारत बसण्याचा पर्याय असू शकतो.( असले अधिकृत प्रातःस्मरणीय म्हणून काय झालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून दगुड वापरता येतातच)
अशी एकंदरीत विन विन परिस्थिती येते यामुळे.( आहेत की नाही आमचे लाडके नेते मोदीजी हे चतुर आणि हुशार!!!)
आम्ही हुशार झालो
तुम्हीही चतुर व्हा ना.
(ऐसी स्वच्छता अभियाना करिता पद्मविभूषण मार्गदर्शक काका यांचा फोटो मी आणू शकेन. सध्या डेसपरेट आहेत ते. देतील फोटो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गटारगंगा की लहरे.
.
गंगा की लहरे या चित्रपटाचे समीक्षण लिहिताना, खरपूस समाचार घेताना श्रीकांत ठाकरेंनी हे नाव दिलं होतं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"घंटागाडी" या नावाचा विचार व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्लिटराटी जसा शब्द आहे तसा इथे योगदान देणाऱ्या लोकांना गटराटी असा शब्द वापरण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सामना ने आजच सुचवलेल्या, 'झिंगलेलं माकड' या वाकप्रचाराचाही सहानुभूतिपूर्वक विचार व्हावा. अर्थात, त्यांचा कॉपीराईट असेल तर नाईलाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कचरापेटीतील कचरापेटी कसं वाटतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मात्रोष्का बाहुलीसारखं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालभारतीवरच्या चित्रासारखं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

सडके टमाटे ( Rotten Tomato चे भाषांतर ) हे नाव कसे वाटेल ? किंवा
कुजकी अंडी ! ! ( ज्याला आत हात घालायचा असेल त्याला हाताला काय मिळणार हे नावावरुन बरोब्बर समजेल. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधिक चित्रदर्शी वाटतंय कारण उकिरड्यात कचरापेटीचा बंदिस्तपणाही नसतो ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्खि खि खि

अख्खं ऐसी अक्षरे कचरापेटी असतांना वेगळा कोपराच कचरा म्हणून का? असो. चालू द्या तुमचं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

bileवेड

याला आपलं मत आहे.

--------------
शिवाय "कोमट पुणेकरांना माहीत नसलेल्या शिव्या" (श्रेयअव्हेर : उद्गीर के लाला*) हे उपशीर्षकही चालेल.

*जिये तू हजार साला

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकच नंबर. लय भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नावात काय आहे? नाव काहीही असो . आतमधला कचरा कुजून त्याचे सोनखत होवो आणि ऐसीचा तरू त्यावर तरी तरारो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईशपथ, आजच एका वहीवर सुविचार टाकला छापायला. "शरीराची खडी आणि रक्ताचे डांबर वापरुन कष्टाचा रोलर फिरवल्याशिवाय यशाचा हायवे तयार होत नाही"
काय करावे राहीतै, तरु तरारुन तर्र होणे ते सगळे खरे आहे हो, पण टाकी बाहेरच्या बाजुला लांब बसावायची म्हणत्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरीराचे सोनखत आणि मेहनतीचे यीस्ट वापरल्याशिवाय यशाचे पीक तयार होत नाही.

(अशीच साखळी येऊद्यात ऐसीकरहो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी4
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिखट शब्दांचा चिवडा, विरोधाचा फरसाण, खुनशीपणाचा चिंचगुळ आणि पूर्वग्रहाचा शेव कांदा पसरल्याशिवाय आंजावरची भेळ चमचमीत होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी शिव्यांची शेव शिवरावी असे काहीतरी हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL

असंच एक मिसळीवरबी येऊंदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शरीराचं दूध, सुवर्तनाचा विस्तव, कष्टाचं तेल आणि नशिबाची मोहरी घातल्याशिवाय...
एक मिनिट - फोडणीची बासुंदी कोण खातं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फोडणीची नसेल खात, परंतु सध्या चुलीवरची फ्याशन जोरात आहे.

बुद्धीचा गहू आणि परिश्रमाचा कोळसा तोही शिस्तीच्या चुलीत वापरल्याशिवाय खरी पोळी तयार होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सोनखतात यीस्ट???

हा यीस्टचा अपव्यय नव्हे काय?

अवांतर: कोणीतरी मद्यार्काचे वर्णन yeast-shit असे केलेले पूर्वी कधीतरी वाचले होते, ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांच्या आयुष्यांचं पाणी, मनकी बातांची साखर, गोरक्षकांच्या नितळ भावनांचं दूध आणि नोटबंदीचा चहा टाकून तो ट्रोलआर्मीच्या गटारग्यासवर उकळल्याशिवाय विकासाचा चहा तयार होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतमधला कचरा कुजून त्याचे सोनखत होवो आणि ऐसीचा तरू त्यावर तरी तरारो.

भावना पोहोचल्या.

(अवांतर: कचऱ्याचे सोनखत होत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेरे! आतमधला कचरा हा सोनखताचा कच्चा माल असू शकेल ही शंकासुद्धा तुम्हाला येऊ नये ना.
आणि आतापर्यंतच्या विसंवादावरून तो कच्चा माल तसाच आहे हेही लक्ष्यात येऊ नये ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी रोचक दिलंय हो न बा !! सालं साधं सोनखत म्हणजे काय लोकांला माहित नाही.यांना डोक्यावरून वाहणार्याची दुःखे काय कळणार ? हे उगाचच

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मी तुम्हाला मार्मिक!

(थोडक्यात, तुम्ही माझी पाठ खाजवा, अन्... किंवा, काय ते रूप, अन्...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठरलं का ठरलं ठरलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अभियान म्हटलं त्यासाठी अधिकृत गाणं हवं. अदितीने 'पट्टी रॅप' हे गाणं सुचवलं, आणि मी त्याला अनुमोदन देऊन प्रस्ताव पटलावर ठेवतो आहे. तुम्हाला इतर काही सुचली तर सांगा.
https://www.youtube.com/watch?v=DcTJXSTtMzU

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माबोवर आहेत वाहतं पान पद्धतीचे धागे. तीस/पन्नास खरडी झालावर जुन्या आपोआप नष्ट होत राहतात. ( रेडिओअॅक्टिव द्रव्ये नष्ट होत जातात, विघटन पावतात तसं काहीसं.) स्थानिक माबोकर नागपूर/ गोवा/ एलए/टोकियो/ठाणे इत्यादि. त्या खरडी वाइट नसल्या तरी इतरांना संदर्भ लागत नसल्याने ते वाचत नाहीत.
आता इथेही महिन्याभरात ज्या लक्शवेधी खरडी दोनचार सभासदांत देवाणघेवाण झाल्या त्या तशाच प्लास्टिकसारख्या न सडता हिमालयात थिजून राहतात कित्येक काळ तशा राहाव्या असं त्यांचीही अपेक्षा नसावी.
ऐसी अक्शरेलाच मोठी कचरापेटी आणि त्यातल्या आम्ही घोंघवणाऱ्या माशा कुणालाच मनापासून म्हणवून घ्यायचे नसावे.
आणखी तीसचाळीस वर्षांनी पुढची पिढी झुने धागे काढून वाचेल तेव्हा आमचे मामा/मावशी/काका/आत्या/आजीआजोबा असेही लिहायचे का ही विचारणा होईल ही खात्री आहे.
संपादकमंडळ सतत सहकाऱ्याने संस्थळ चालवत आहे आणि एक सभासद म्हणून निष्ठा दृढ आहेत.

समाचार नावाचे वाहते पान काढता येईल. समाचार शब्द द्व्यर्थी आहे. चांगले वाईट दोन्ही अर्थ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजोरडं हे नाव कसं वाटतं..

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हा हा हा हा हा... पर्फेक्ट!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीसाठी कायपन म्हणून हा धागा सुरू केला आहे. धाग्याचं उद्घाटन ऐसीचे मान्यवर सदस्य गब्बरसिंग यांच्या प्रतिसादानं केलेलं आहे.

सदर धागा बोर्डावर ठेवलेला नाही. याबद्दल कोणाची काही मतं असतील तर वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धाग्याचं उद्घाटन ऐसीचे मान्यवर सदस्य गब्बरसिंग यांच्या प्रतिसादानं केलेलं आहे.

.
गब्बरचा आदरार्थी उल्लेख करणं असांसदीय आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उभ्या (ऐसी)आयुष्यात पहिल्यांदा अक्कल वापरून काही ढंग चे काम केलेत!

(आता 'स्लिपरी स्लोप'च्या बोंबा सुरू होतीलच. पण अर्थात हे खाजगी संस्थळ असल्याकारणाने त्या गैरलागू आहेत, हे उघड आहे.)

(आणि हो, ही ट्रीटमेंट उद्या मलासुद्धा मिळू शकते, याची पूर्ण कल्पना आहे. ऑनेस्टली, आय डोंट केअर. माझ्यावर त्याने काहीही फरक पडत नाही. मला जेव्हा जे बोलावेसे वाटेल, ते मी तरीही - आणि मला वाटेल त्या शब्दांत - बोलणारच. संपादकांना उडवावेसे वाटले - मला किंवा माझ्या लिखाणाला - तर अवश्य उडवू द्यात. काय आणि कसे लिहायचे ते ठरविण्याचे आणि मग ते लिहिण्याचे काम माझे; काय ठेवायचे नि कशाला आणि कोणाला उडवायचे हे ठरविण्याचे आणि मग त्याप्रमाणे उडविण्याचे काम संपादकांचे. मी माझे काम इमानेइतबारे करतो; संपादकांना त्यांचे काम इमानेइतबारे करूद्यात.)

आजवर ओंडका राजाचे राज्य चालले होते. 'मी मारल्यासारखे करतो; तुला रडल्यासारखे करायचे असलेच, तर कर, आग्रह नाही'चा जमाना होता. आता बहिरीससाण्याचे राज्य आले. कधीतरी यायचेच होते; आत्ताच आले, हे ठीकच झाले.

अर्थात, (पुढेमागे) याचाही अतिरेक होऊ शकतोच. कथित स्लोप स्लिपरी होऊ शकतोच. पण आधी म्हटल्याप्रमाणे, हे खाजगी संकेतस्थळ असल्याकारणाने, ते पूर्णपणे मालकां-संपादकांचे प्रेरॉगेटिव आहे. सदस्यांना पसंत नसल्यास त्यांना चालू लागण्याचे प्रेरॉगेटिव आहेच. फार फार तर काय होईल, की बरेच किंवा सगळेच सदस्य सोडून गेले, तर कदाचित पुढेमागे संस्थळ बंद पडेल. ते बंद पडू द्यायचे, की चालू ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या मगदुराप्रमाणे प्रयत्न करायचे, हा सर्वस्वी मालकासंपादकांचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे ते काय हवे ते करतीलच. ओंडका-राज्यात कितीतरी सदस्य सोडून गेले, त्यांची पर्वा केली नाही, तर आता ससाणा-राज्यात ती करण्याचे कोणतेच बंधन मालकांसंपादकांवर असण्याचे काही कारण असू नये.

सदर धागा बोर्डावर ठेवलेला नाही.

हे उत्तम केलेत. मात्र, एक कुतूहल. श्री. राजेश घासकडवी हे त्या धाग्यावर जाऊन निष्कासित केलेल्या प्रत्येकाला जातीने उत्तरे देण्याचे सौजन्य का बरे दाखवीत आहेत? नाही म्हणजे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, हे मान्यच आहे. तक्रार नाही. निव्वळ कुतूहल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'बा, माझ्या उभ्या आंजा आयुष्यात तुम्ही कधीही असभ्य-छपराट भाषा वापरल्याचं बघितलेलं नाही; ना कधी कोणाचा, कोणत्या गटाचा व्यक्तिगत पातळीवर अपमान केलेला; ना कधी बेकायदेशीर हिंसेची मागणी केलेली. तुमची मतं मला, ऐसी व्यवस्थापकांना व्यक्तिशः पटतील किंवा पटणार नाही. पण ऐसीच्या धोरणाबाहेर जाऊन, ऐसीला तसदी होईल अशा प्रकारे तुम्ही कधीही लिहीत नाही. आता कचरापेटी उघडली म्हणून तुम्ही असा छपरीपणा सुरू कराल, याची शक्यताही कमी वाटते.

ऐसीवर अनेक सदस्य आहेत ज्यांची मतं मला प्रत्येक वेळेस पटतील असं नाही. बहुतेकदा पटणार नाहीत. एकदाही पटणार नाहीत. मात्र असभ्य छपराटपणाच्या पातळीवर हे लोक कधीही उतरणार नाहीत. निदान असभ्यपणा काय आणि त्याची जागा काय याबद्दल आपली मतं पटतील. किंबहुना ऐसीवर नियमितपणे लिहिणाऱ्या लोकांचा ऐसीवर तेवढा अधिकार आहे.

'आता हे आवरा' असं म्हणण्याचा अधिकार ऐसी सदस्यांना आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नबा,
मी तिथे जाऊन उत्तरं देत नाहीये. उत्तरं आधीच, मूळ धाग्यांवरच दिली होती. प्रतिसाद हलवल्यावर उपप्रतिसाददेखील हलतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नको तो नवा धागा रद्द करुन टाक अदिती. काय जो राडा व्हायचा तो आपापल्या ओरिजनल धाग्यावरच व्हावा. कारण मग इथुन तिथे, तिथुन इथे इ-उड्या मारताना लिंक (साखळी) तुटते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण संग्रहालयाचा फायदा असा, की सगळा राडा एकत्रितपणे मांडलेला दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाचार धाग्यावरच समाचार घ्यावा एकेकाचा.
वाहते पानही हवेच. आपोआप कचरा नष्ट होत जाईल.
म्हणजे हासुद्धा प्रयोग करून पाहा ना.
" तिकडे ये बघतो तुला."
शाळेतली आठवण - वर्गात सहा बोटे दाखवून गुद्द्याची खूण म्हणजे सहावाजता शाळा सुटल्यावर बुकलेन तुला. धमक्या त्यावेळेस खऱ्या करत. तो मुलगा दोनचारजणांच्या घोळक्यातून पळून जायचा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मुद्दा असा की ज्याप्रमाणे नवीन सिनेमा यायचा असला की प्रत्येक हिरो आणि हिरवीन डैरेक्टर अन प्रोडूसर हिरिरीने धिस इज दिफरंट असा घोषा लावतात अन पहायला जावे तर तोच गुल अन तीच काडी

प्रत्येक नवे संस्थळ (मराठी) याच प्रकारे चालते, चालवले जाते,

वेलकम टू वर्ल्ड ऑफ एडीटर्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

ज्याप्रमाणे नवीन सिनेमा यायचा असला की प्रत्येक हिरो आणि हिरवीन डैरेक्टर अन प्रोडूसर हिरिरीने धिस इज दिफरंट असा घोषा लावतात अन पहायला जावे तर तोच गुल अन तीच काडी

.
शॉल्लेट. अनेक वर्षांपूर्वी मुंबईत राहत होतो तेव्हा माझ्या एका रूम पार्टनरचा मित्र सिनेजगतात कामाला होता त्याने नेमकं हेच सांगित्लं होतं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माबो आणि मिपावर तंबी देऊन आइडी उडवतात. संपादनावर नियमन आणले.
ऐसीच्या मॅाण्डळाने असले काहीच केले नाही अजून. @खुशालचेंडु हा फरक पाहा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरटबाबा, माझे तुमच्याशी मतभेद असले तरीही मुद्दाम व्यक्त करण्याएवढे तीव्र नसतात. पण इथे मतभेद आहेत.

जर खुशालचेंडू वा इतर कोणाला वाटत असेल की सगळी मराठी संस्थळं सारखीच असतात, तर तसा विचार करण्याची आणि व्यक्त करण्याची पूर्ण सोय असावी. लोक विरोध करतात, मतभेद व्यक्त करतात म्हणून कोणाला आपली मतं व्यक्त आली नाहीत, असं होऊ नये.

तुमची भाषा कधीही 'विरोध खपवून घेणार नाही', किंवा 'विरोध करणारे लोक !@$%^* आहेत', अशा छापाची नसते. मात्र तशी भाषा करणाऱ्यांना सभ्यपणा म्हणजे काय हे समजत नाही; ते दाखवण्याची जबाबदारी आपली, तुमच्या-माझ्यासारख्या लोकांची आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसे केले नसेल अजून. पण करणार नाही असे खात्रीने सांगता येत नाही. डाव्यांना जशी उजव्यांबद्दल खात्री नसते तशी उजव्यांना डाव्यांबद्दल नसते. मधल्यामधे आमचे मरण कारण आम्ही मध्यम मार्गी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

विनोद का प्राप्त परिस्थिती? >>नुकताच राखीपौर्णिमेतून सुटलोय, >>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती प्रत्येकालाच सांगत सुटलीय कि तुम्ही कधी असभ्य भाषा वापरली नाही. काय दिवस आलेत. बाल राहुल शिवमंदीरी गेल्याचा फिल येतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते सुद्धा जानवे घालून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

कचऱ्यातून (लेखन) कला
किंवा (लेखन) कलेचा कचरा
ही नावे सूचतायत

"ऐसी तैसी डस्टबीन" असही म्हणता येईल ... जरा ग्लोबल वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||