वाईट मुलींची टॉप टेन लक्षणं

Shanaya

येताजाता काही मराठी मालिका पाहिल्यावर मला वाईट मुलींची जी टॉप टेन लक्षणं दिसली ती ही अशी -

  1. वाईट मुली सेक्सी असतात. त्या हिरोईनपेक्षा सुंदर असतील तर जास्त वाईट असतात.
  2. वाईट मुली तंग, आखूड आणि सेक्सी कपडे घालतात. त्यांनी साड्या नेसल्या तर ब्लाऊज ऑफ शोल्डर, स्लीव्हलेस, ओपन बॅक किंवा यापैकी सर्व असतो. त्यांना हे कपडे छान कॅरी करता येत असल्याने त्या जास्त वाईट ठरतात.
  3. वाईट मुलींना मेकअप करायला आवडतो. त्या कायम सुंदर आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात.
  4. वाईट मुलींना शॉपिंग करायला खूप आवडतं. त्या स्वतःच्या आवडीने कपडे घेतात. नवऱ्याने आणलेली काकूबाई टाईप साडी बघून हरखून जात नाहीत. गजरा वगैरे आऊट ऑफ क्वेश्चन.
  5. वाईट मुली इंग्रजी माध्यमात शिकलेल्या असतात. त्या मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतात. त्यांना‌ मराठी शब्दांचे अर्थ माहिती नसतात.
  6. वाईट मुलींना बर्गर, पिझ्झा, पास्ता वगैरे आवडतं. त्यांना लाल माठ आणि शेपू वगैरे स्वर्गीय भाज्यांपेक्षा हे मेले पिझ्झे आणि पास्ते आवडतात. इतकं जंक खाऊनही त्यांचीच फिगर हिरोईनपेक्षा छान असते. दुष्ट कुठल्या!
  7. वाईट मुलींना रोमान्स करताना त्यांना काय हवं ते नक्की माहिती असतं. त्या नवऱ्याच्या स्पर्शाने मोहरून वगैरे जात नाहीत. त्यामुळे पर्यायानं पार्श्वभूमीला द्रुत लयीत सतार वगैरे काही वाजत नाही.
  8. वाईट मुली‌ त्याग वगैरे करायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांना काय हवं ते मिळवतात.
  9. बॉयफ्रेंड / नवरा / सासरचे लोक यांनी अपमान केला तर वाईट मुली उगाच टिपं गाळत बसत नाहीत. त्या सरळ उलट सुनावतात.
  10. वाईट मुलींना पैशाचं महत्व चांगलंच ठाऊक असतं. मनाच्या आणि नात्यांच्या श्रीमंतीने पोट भरत नाही, चैन करता येत नाही हे त्यांना उमगलेलं असतं.

या सगळ्यामुळे मला वाईट मुली खूप आवडतात.

ता.क. - ११. वाईट मुलींची नावं शनाया, मायरा, कियारा वगैरे असतात. हे महत्वाचं लक्षण राहून गेलं होतं.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

वाईट मुली इंग्रजी माध्यमात शिकलेल्या असतात. त्या मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतात. त्यांना‌ मराठी शब्दांचे अर्थ माहिती नसतात. - या सगळ्यामुळे मला वाईट मुली खूप आवडतात.????

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता एक तौलनिक अभ्यास होऊ दे; १० वर्षांपूर्वी, ५० वर्षांपूर्वी वाईट मुली कशा असायच्या, आता कशा आहेत. आणि चांगल्या मुलींच्या प्रगतीचा आलेख कसा आहे ते! Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साठेक वर्षांपूर्वी वाईट मुली गोल पातळं नेसायच्या आणि बाहुबलीतल्या चंद्रसेनेप्रमाणे फुगेरी हातांची ब्लाउजं घालायच्या. आणि विशेष वाईट मुली तिरक्या भांगांनी आपल्या वाईटपणाची झैरात करायच्या.

त्यानंतर स्लीव्हलेस ब्लाउज घालणं, केस कापणं वगैरे सुरू झालं म्हणे त्यांच्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण त्यापूर्वीच्या वाईट मुली तर चक्क शाळेत वगैरे जायच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'सतीबंदी झाली, इतपत एकवेळ ठीक. पण आता मुलींना शाळेत घालून शिक्षणसुद्धा द्यायचे म्हणजे फारच झाले ब्वॉ. ही नसती सुधारकी खुळें! यातून फक्त मुलेमुली एकत्र येऊन व्यभिचार करायला शिकतात. समाज किडतो. (नि त्यानंतर मग कुठल्याशा शाळेत शिक्षणाच्या नावाखाली मुलामुलींनी शिक्षकशिक्षिकांच्या प्रोत्साहनाने कसे व्यभिचार केले, त्याचे दाखले.) मुलींना शिक्षण घरच्या संस्कारांत, त्यांना गृहकृत्यदक्ष करण्याच्या दृष्टीने द्यावे. शालेय शिक्षणाने मुली बहकतात, व्यभिचारास प्रवृत्त होतात.'

अशा प्रकारची हळहळ, 'विचार' आदि नाथमाधवांच्या कादंबऱ्यांतून बख्खळ वाचलेले आहेत. (कधी थेट शब्दांत, तर कधी तसे सूचित करण्याकरिता हेतुपुरस्सर रंगविलेल्या प्रसंगांतून.)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाळीसेक वर्षांपूर्वी वाईटपणाचा स्पेक्ट्रम म्हणजे पंजाबी ड्रेस घालणं ते मॆक्सी, मिडी आणि बॊबीस्टाइल मिनीस्कर्ट. त्याच काळात तमाम ममव बर्या मुलींनीही सुटसुटित म्हणून घरी गाऊन घालायला सुरुवात केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला खरंतर वाईट मुलींच्या अभ्यासापेक्षा त्यांना वाईट म्हणणार्या पुरुष-पंतोजींचा अभ्यास झालेला आवडेल.
'सकच्छ की विकच्छ?' यावर तावातावाने चर्चा करणार्या पुरुषांच्या पुरुष पोरांनी विकच्छ स्वीकारलं, पण अभिमानाने सांगत राहिले की 'आमच्यात लग्न झाल्यावर पंजाबी ड्रेस घालणं अलाउड नाही'. त्यांच्या पुरुष पोरांना आज तो प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. त्यांचे आजचे काय प्रश्न आहेत? त्यांच्या पोरी, नातवा आज त्यांना कशा फाट्यावर मारतात? हे वाचायला मला फर्फार आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाईट या शब्दा ऐवजी "ढाकचिक" हा शब्द वापरावा असे सुचवतो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रामाणिकपणा >>> या सगळ्यामुळे मला वाईट मुली खूप आवडतात.>>आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी सिरियल मधल्या मुलींनी, कोणाच्या लक्षांत येणार नाही, अशा पद्धतीने चुडेलपणा केला पाहिजे. खरं चुडेल कोण, हे सिरियल संपल्यावरच लक्षांत आलं पाहिजे.
मराठी सिरियलच्या दिग्दर्शकांनी, एखादी घटना घडल्यावर, प्रत्येकाच्या चेहेऱ्यावरची प्रतिक्रिया, क्रमाक्रमाने दाखवण्याऐवजी, तंत्राचा वापर करुन, एकच वेळी, सात-आठ पात्रांचे चेहेरे, पडद्यावर दाखवावेत, जेणेकरुन वेळेची बचत होईल आणि वाचलेल्या वेळांत आणखी जाहिराती कोंबता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कामी सिरियल दिग्दर्शकाने न्यूज च्यानलप्रमाणे अनेक पात्रांचे चेहेरे एकाच वेळी दाखवण्याची सोय वापरली पाहिजे, बोले तो पीआयपी (पिच्चर इन पिच्चर).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय नाय, पीआयपी सिम्पल झाले,
ते अकापेला की काय मध्ये कोलाज टाइप दाखवतात तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी सिरियल मधल्या मुलींनी, कोणाच्या लक्षांत येणार नाही, अशा पद्धतीने चुडेलपणा केला पाहिजे. खरं चुडेल कोण, हे सिरियल संपल्यावरच लक्षांत आलं पाहिजे.

'चुडैल'करिता मराठीत 'हडळ' असा साधासोपासुटसुटीत तथा छानसौंडिंग, मराठमोळा पर्याय आहे. ('चुडेलपणा'ऐवजी 'हडळगिरी' कसा वाटतो?)

(पण 'हडळगिरी' म्हणजे नेमके काय? किनऱ्याकापऱ्याफाटक्या थेरड्यालतामंगेशकरी आवाजात 'ह्यॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः' करत पोरासोरांना भिवविणे? की अमावास्येच्या रात्री उंदीर खाऊन मग त्या पकडलेल्या पोरासोरांपैकी चारपाचांचा बळी देणे? पण मग त्याकरिता मराठी सीर्यलीतल्या तरण्याताठ्या मुली काय कामाच्या? त्यासाठी थेरड्याच पाहिजेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

हा नवीन पिढीने, कारस्थाने करणाऱ्या सिरियली बायकांसाठी वापरलेला शब्द आहे, मूळ अर्थाने नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लता मंगेकर या गायिकेविषयी काढलेल्या अपशब्दांचा निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मग मी टू नबांचा निषेध. एरवी या नबाशेटशी एकेकट्याने पंगा घेण्यात अर्थ नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असल्या आवाजांची गरज नाही. वय, आवाज, पत कशालाही न शोभणारी 'अनदेखी अनजानी' गाणी चालतील.

या बाई मात्र दोन लांबड्या वेण्या घालतात आणि साड्या नेसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साताठ गाणी गाऊन 'विलायती' गाणी गाणारी म्हणवून घेणाऱ्या आणि मध्येच मांड्या दाखवत नाचणाऱ्या; न-घोगऱ्या अमिताभबच्चनी छक्केछाप आवाजात गाणाऱ्या हडळीपेक्षा कैकपटींनी बऱ्या.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नका हो, एवढा त्रास करून नका घेऊ. त्यापेक्षा हे सुमधुर, सुकोमल, सुशील, सुचरित, सुधारित, सुमार गाणं ऐका बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे गाणं अतिशय आवडतं आहे.

उगिचच आपलं ते एखाद्याच्या मागे लागणं.

लता मंगेशकरांनी हजारो गाणी गायली. आम्हाला त्यातली बहुतांशी गाणी आवडतात.

जगी असा कोण आहे जो सर्वच गोष्टी सर्वोत्तम करेल. काहीतरी, कुठेतरी कमीजास्त होणारच.

चला आम्ही आत हे सुमधुर, सुकोमल, सुशील, सुचरित, सुधारित, सुमार चांगले,छान् गाणं ऐकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं अतिशय आवडतं आहे.

ज्याचीत्याची आवड. (मत आणि आवड, प्रत्येकालाच असते, वगैरे वगैरे...)

जगी असा कोण आहे जो सर्वच गोष्टी सर्वोत्तम करेल. काहीतरी, कुठेतरी कमीजास्त होणारच.

अर्थात. पण मुद्दा तो नाही. मुद्दा, कधी थांबायचे, याची जाण असण्याबद्दल आहे.

तलतची 'वाईट' म्हणता येण्यासारखी गाणी फार थोडी असावीत. (अर्थात, हे वैयक्तिक मत. आणि हो, तलतची 'वाईट' म्हणता येण्यासारखी गाणीसुद्धा आहेत. मोजकीच असावीत, पण आहेत.) पण मुद्दा तोही नाही.

मुद्दा हा आहे, की आपला ज़माना, आपली सद्दी संपल्यावर तलत गायचा थांबला; अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल त्या जाँरमध्ये घुसला नाही.

..........

हे ऐका. अतिशय रटाळ.

तरीही, १९८०च्या दशकात तलतची काही गाणी नव्या साजासह (परंतु तोवर म्हाताऱ्या झालेल्या तलतच्या जोशहीन आवाजात) स्टीरियोमध्ये पुनर्मुद्रित केली गेली, ती करायला त्याने नकार द्यायला पाहिजे होता, असे राहूनराहून वाटते. त्यात त्याची थेरडीलता झाली. भले ओरिजिनल साउंडट्रॅकच्या मुद्रणाचा दर्जा तेव्हाच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे तितका अव्वल नसेलही, परंतु ती मजा ज्याने चाखली आहे, त्याचा पुनर्मुद्रित आवृत्ती ऐकून पचका होतो. उगाच तलतला मानगुटीला धरून आणून, माइकसमोर बसवून, त्याच्या मानेवर सुरी ठेवून, "आता गातोस, की चालवू सुरी?" म्हणून धमकी देऊन त्याच्याकडून जबरदस्तीने ते गाणे म्हणवून घेतल्यासारखे वाटते.२अ

२अ हे ऐका, आणि हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेकॉर्ड होण्यासाठी खूप काळ खेळत राहिलेला कपिल देव आठवला.

सरीना विल्यम्स आता पुन्हा 'जगज्जेती' होईल का नाही माहीत नाही. निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर टिकून राहू शकणाऱ्या क्षेत्रातल्या लोकांची निवृत्ती भले त्यांच्या अपेक्षेच्या आधी येत असेल; पण त्यामुळे त्यांचं जगज्जेतंपण तेवढं लक्षात राहतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणी कुठे आणी कधी थांबायचे हे कसे ठरवायचे, तो भाग सुदधा जो तो ठरवतो. लता का थांबल्या नाहीत हे त्यांनाच ठाऊक. आठवा- फिल्मफेअर पुरस्काराच्या वेळेला त्यांनी जाहिर सांगितले की , बास, आता इतरांना द्या तो म्हणुन. अस समजुया की गाणे त्यांचे आयुश्य आहे, आनंद आहे म्हणुन त्या गायल्या.
वर आलेले गाणे त्यांना गायला मिळाले, चोप्रा कुटुंबीय त्यांनी 'च' गाणे गावे ह्या बाबतीत अती आग्रही होते. त्यामुळे सगळ्या बाबी ह्या त्यांच्या पथ्यावर पडल्या असे समजा.
बाकी चित्रपट हा निर्मात्यासाठी व्यवसाय आहे. जर त्यात इनवॉल्व लोकांना लतानेच गाणे गावे असे वाटले, तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय. आणी लताला ते गावेसे वाटणे हा ही त्यांचाच निर्णय. आपला त्यात सहभाग तो काय? तुम्ही ही बघितलेत की नंतर म्हणजे ई.स. २००० नंतर, तसेही त्यांनी गाणे म्हणणे थांबवले. ते योग्यच होते.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक सारखं काटेरी बोललं की कंटाळा गेतो. गोग्गोडपणा जसा कंटाळवाणा असतो तसाच ' निगेटिव्हिटी/उटसूठ-काटेरी' पणाही.
___________
लता मंगेशकरांनी काही काळ तरी त्यांच्या कलेने माझे जीवन आनंदमय केले. त्यामुळे मला तरी त्यांचा उगाचच अनादर करत चर्वितचर्वणा करण्याचा कंटाळा येतो.
एकूण काय मूलभूत कंटाळा कंटाळा येतो.

  • ‌मार्मिक7
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक दिली आहे. खूप मनातलं बोललात. स्वतःला अजिबात विशेष आस्था नसली (अँड दॅट्स अबसोल्यूटली ओके) तरी खूप लोकांच्या मनात आदर श्रद्धा जवळीक असलेल्या कोणाबद्दल मूर्तीभंजन करणं हे अनावश्यक आणि टाळण्यासारखं आहे. किमान शब्दयोजना तरी सौम्य असावी असं व्यक्तिगत मत आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. अदितीचे नाव 'काटेरी दवणे' ठेवायला पाहिजे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा काटेरी दवणे Smile कसली हसतीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं काही करु नका, विरोध आणि काटेरी मते व्यक्त व्हायलाच हवीत.
इश्टीरिओटाईप इल्ला बिट्टं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे झकासे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काटेसावर गं! ('सावर रे')
कारली पेरणारी बाई ('सूर्य पेरणारा माणूस')
शब्दांचा क्षोभ थिजे ('शब्दांचा मोर भिजे')
भडकणाऱ्या मुलांसाठी ('घडणाऱ्या मुलांसाठी')
काट्यात खौफ आहे ('फुलण्यात मौज आहे')

अशी काही पॅरादवणीय शीर्षकेही सोबत सुचवून ठेवतो! Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता खरंच कारली पेरते पाहा पुढच्या मौसमात. (आणि उगवली की तुलाच पोस्ट करेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो काटा, १४ पैकी तीनांनाच, randomly टोचतो म्हणून विक्षिप्त काटा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तुम्ही irrationalचं रॅशनलीकरण करताय हं... आधीच बजावून ठेवते. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढच्या भागात वाईट मुलांची येउ द्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मुलं मुळातच वाईट्ट असतात ना ??? Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांकडे कोण पाहतं? मालिका बघणाऱ्या प्रेक्षकवृंदाला बावळट खांब म्हणून पुरुषपात्र पुरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटतं होतं, ते फक्त म्हणतात की बायको सोज्वळ अन् मैञिण बोर्ड असावी.
आणि अजून एक, तरुण स्त्री कधीच वाईट नसते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

ञ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी असो, परंतु लाल माठ ही खरेच एक स्वर्गीय भाजी आहे. नाद नै करायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलाही सगळ्या पालेभाज्या आवडतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही लाल माठात पाणी भरतो. तसं काळ्यात पण भरतो. पण मेनली लालच.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक गाणं आहे - "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं".
तुम्ही दिलेल्या चित्रात नळंच घागरीला (माठाला) लावलाय. क्या बात! इश्क पिच्चरातल्या "इस कारीगरने खुदाकी कुदरत को बदल डाला ना" सारखं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांत नवीन काही नाही. शंकराची पिंडी बघितली असेलच! तर, हे अगदी पुरातन काळापासूनच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लुब्रा , लुब्री , लुब्रेपणा हे शब्द नामशेष झालेले आहेत आजकाल. असे आणखी शब्द सुचवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही तर फक्तं बाह्य लक्षणे झाली.

अजून बरीच आहेत की ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

या वरून हे Ek Buri Ladki आठवले. चित्र सोयीसाठी इथे पण डकवतो.

ek buri ladki

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो , बुरी लडकीची ही विशेषणं नव्हेत.
ही सर्व चांगल्या बेटीची लक्षणं.

नवऱ्याला न विचारता स्वत: निर्णय घेते हे पुरुषी अहंकाराला डिवचणारे असते. आणि एमसीपी म्हणजे "हँ " करणारे कुणी अजून भेटलेली नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक फिरकतही नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचं तुम्हाला आश्चर्य वाटतंय??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

Smile नाही. काही लोक फक्त प्रतिक्रिया वसुल करायला येतात आणि बेपत्ता होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का फिरकलं पाहिजे? फिरकलं तरी प्रतिक्रिया का दिल्या पाहिजेत? 'कंटाळा आला' हे म्हणण्याचं स्वातंत्र्य हवं तर दुर्लक्ष करण्याचं स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काहीही हरकत नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक लेखक प्रतिसाद देत नाहीत, तसंच अनेक प्रतिसाद देणारे लेखन करत नाहीत. तक्रार नक्की कोणी कोणाबद्दल करावी? मी म्हणेन की इट टेक्स ऒल काइंड्स...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इट टेक्स ऒल काइंड्स

चमन मे इख्तलाते हुए रंग-ओ-बू से बात बनती है
हम ही हम है तो क्या हम है तुम ही तुम हो तो क्या तुम हो (मेजर ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी, तुम्हाला असं लेखकाने नुसता लेख पाडून लंपास होणं योग्य/क्षम्य वाटतंय? क्या मय सही पढ रहा हू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या प्रश्नाला सहजसोपं हो/नाही उत्तर नाही. ते चर्चाविषयावर अवलंबून आहे. एखाद्या स्फोटक विषयावर चार ओळींची जळती काडी टाकून लोकांना 'तुम्ही भांडा, मी मजा बघतो/बघते.' असं म्हणून बाजूला राहाणं हे एक टोक झालं. ते निश्चित निषेधार्ह आहे. मात्र मौजमजेचा धागा टाकून त्यवरच्या चर्चेत सहभागी न होणं हे दुसरं टोक. इथे निषेध न करता, 'काहीतरी ठीकठाक लेखन केलं आहे ना, मग ठीके' अशी सौम्य भुमिका घेता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या स्फोटक विषयावर चार ओळींची जळती काडी टाकून लोकांना 'तुम्ही भांडा, मी मजा बघतो/बघते.' असं म्हणून बाजूला राहाणं हे एक टोक झालं. ते निश्चित निषेधार्ह आहे.

.
अनेकांच्या हिताचा किंवा स्वारस्याचा मुद्दा असेल आणि एखाद्याने त्यावर तपशीलवार, अभ्यासपूर्ण लेख लिहिला असेल आणि तरीही कोणी काहीच प्रतिसाद दिला नाही किंवा फुटकळ प्रतिसाद दिले तर ते टोक असतं का ? की आणखी दुसरं काही असतं ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर तू फक्त दुवे डकवतोस व क्वचित रोशालाही पात्र होतोस, पण ज्यांना वाचायचे ते वाचतातच. उदाहरणार्थ - रिसायकलिंग ची दुसरी बाजू तू मांडली होतीस. की रिसायकलिंग फॅनॅटिक्स ना हे देखिल समजलं पाहीजे रिसायकलिंग, किती कॉस्टली व बरेचदा पर्यावरण-कॉस्टली असतं. तो दुवा तर मी ऑफिसात एकीला (रिसायकलिंग फॅनॅटिक) पाठवलेला. माझ्या द्न्यानकक्षा रुंदावतात. ज्याच्यात्याच्यावर आहे तो दुवे वाचतो की दुवे त्याला फडतूस वाटता.
मला आवडतात कारण ते उपयोगी पडतात. पण एकंदर चर्चेत मी झिरो किंवा निगेटिव्हच आहे. पण सांगायचा मुद्दा हा की तू तुझ्या मनाजोगे व्यक्त व्हायचे सोडु नकोस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नायनाय. मी माझी कैफियत मांडत नव्हतो.
मी फक्त गुर्जींशी भांडत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीते मला. तुझी कैफियत म्हणुन नाहीरे, मी उगाच मांडलाय तो मुद्दा. एवीतेवी या विषयावर चर्चा चाललीये म्हणुन.
_________________
मी कोणाचीही बाजू घेउन हिरोगिरी करत नाहीये. आधी माझं मला थोडं झालय हाहाहा. घरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोडं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एका डायमेन्शनची दोन टोकं सांगितली होती. मोठ्या/चांगल्या/अभ्यासपूर्ण लेखावर त्रोटक प्रतिसाद आणि फालतू लेखावरही बरेच प्रतिसाद हीही टोकं म्हणता येतील, पण वेगळ्या डायमेन्शनांमधली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुमासदार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकाशानंद!

आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाईट मुली व वाईट्ट मुली यांना एकाच न्यायाने वागवू नका. वाईट्ट मुलींचे विशेषाधिकार तुम्हाला हिरावून घेण्याचा कुठलालाही अधिकार तुम्हाला नाहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/