एथिकल पॉर्न
एथिकल पॉर्न
एथिकल पॉर्न? हे काय नवीन आता? येऊन-जाऊन पॉर्नच ते. त्यात काय मारे एथिकल आणि नॉन-एथिकल? नेटफ्लिक्सवर समीक्षकांनी वाखाणलेली एक बहुचर्चित डॉक्युमेंटरी पाहताना हा शब्द कानावर पडला आणि त्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकता जागी झाली.
आई झाल्यापासून तसंही एथिकल, मॉरल असे शब्द ऐकले की लगेच माझे कान टवकारतात. आपल्या मुलांसाठी जे जग आपण निर्माण करतोय त्यातली प्रत्येक गोष्ट त्यांची निरागसता जपणारी असावी, अशी उत्कट इच्छा तर असतेच; पण चांगल्या-वाईटाची जाण त्यांना स्वतःला व्हावी, इतपत सजग बनेपर्यंत भोवतालच्या जगात घडणाऱ्या कितीतरी अवांछित गोष्टींपासून पासून त्यांचं रक्षण कसं करायचं असा प्रश्न सतत पडत असतो. या पार्श्वभूमीवर 'एथिकल पॉर्न' हा शब्द ऐकला आणि टेप थोडीशी रिवाइंड मोडवर गेली.
साल २००२. इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष. थर्ड आणि फायनल इयरच्या प्रोजेक्टसाठी सोयीचं होईल, म्हणून नुकतंच घरून मिळालेलं एक पर्सनल कंप्युटर नामक धूड. हॉस्टेलच्या बारा गुणिले बाराच्या रूममधली कितीतरी जागा त्यानं व्यापलेली. भारतात इंटरनेट हा शब्द नुकताच प्रचलित झाला असला तरी घराघरांत जाऊन पोहोचला नव्हता. मग लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट फोन, व्हाट्सऍप वगैरे खूप दूरदूरच्या गोष्टी. महत्त्वाचे ई-मेल्स सोडले तर तसंही काय काम त्या इंटरनेटचं, अशी धारणा होती. त्यासाठी तासाला पंचवीस रुपये घेणारी सायबरकॅफे नामक खोपटी फोफावलेली होतीच. फ्लॉपी डिस्क आणि सीडी ड्राईव्ह वापरायचे दिवस ते. अशातच एका मैत्रिणीनं माझ्या रूममधलं ते मशीन बघून म्हटलं.
"पॉर्न बघितलं आहेस का? आता काय कंप्युटर तुझ्याकडे."
"पॉर्न? छे! काहीपण काय!"
आईच्या "गुणी" संस्कारांनी असं वरवर धुडकावून लावलं तरी वय वर्ष अठराला मोह झालाच.
"असं कुणालाही बघता येतं? लीगल नसेल ना पण. कुठून मिळतं ते? माझ्या कंप्युटरमध्येपण बघता येईल?"
"त्यात काय विशेष? मी सीडी अरेंज करू शकते."
"नको नको. कुणाला कळलं तर? व्हायरस आला तर? आणि चुकून कंप्युटर बिघडला वगैरे तर दुरुस्त करायला आलेल्या माणसाला कळेल का. मी पॉर्न पाहिलं ते?
"अस्सं कसं कुणाला कळेल?"
"नक्की?"
.....
..........
"हे असं असतं? एवढं भावनाशून्य आणि रूक्ष? उगीच पाहिलं मी. फार विचित्र वाटतंय मला. "
"तुला काय राज-सिमरनची लव्ह स्टोरी पाहायची होती का?
"अगदी तसं नाही. पण अगदीच सोललेस नाही का हे सगळं?"
.....
..........
सोळा वर्षं झाली या प्रसंगाला. भोवतालच्या जगातल्या कितीतरी गोष्टी बदलल्या. आपण ह्याच जगात वाढलो का असे संभ्रम पडावेत, इतकं बदललं सगळं. लहानपणी आजी-आजोबा, आई-बाबा म्हणायचे तसं "आमच्या वेळी असं नव्हतं" हे वाक्य स्वतःच्याही तोंडी यायला लागलं, तेही वयाच्या पस्तिशीतच. आपल्यापेक्षा तीन-चार वर्षांनी लहान असलेल्या लोकांबरोबर 'जनरेशन गॅप' जाणवावा एवढ्या झपाट्यानं सगळं बदलत गेलं. स्त्रियांची समाजातली, नात्यांमधली, लग्नसंस्थेमधली भूमिका बदलत गेली. पण दुर्दैवानं पॉर्न मात्र तसंच राहिलं. तितकंच अर्थशून्य, संवेदनारहित, बीभत्स, मठ्ठ. आणि जनमानसात तेवढंच निषिद्ध. फरक इतकाच की हे सगळं आता इंटरनेट वर एका क्लिकच्या अंतरावर, अत्यंत सोयीस्कररीत्या मिळायला लागलं आणि तेही चकटफू!
गुगलवर सर्वात जास्त शोधल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये फेसबुक, जी-मेल, अमेझॉनसारख्या प्रतिष्ठित शब्दांबरोबर सातत्यानं झळकणारा शब्द म्हणजे पॉर्न! त्याच्याशीच निगडित ‘पॉर्नहब’ या वेबसाईटला २०१७ सालात २८ अब्ज व्हिझिट्स मिळाल्या. गणित मांडायचं असेल तर सेकंदाला १००० आणि दिवसाला चक्क ७ कोटी ७० लाख. आणि हे झालं फक्त एका साईटबद्दल. अशा किमान पाच ते सहा वेबसाईटस जगभरातल्या ‘टॉप ५० व्हिझिटेड साईट्स’मध्ये दिसतात. व्हाट्सअॅप आणि ई-मेलसारख्या माध्यमांतून वितरित होणारे तर नाहीच या गणतीत. आणि तरीही, हो तरीही आपण अजूनही पॉर्न हा शब्द उच्चारणंही वर्ज्य मानतो. 'आम्ही त्यांतले नव्हेच' असं म्हणत राहतो. इतरांना चांगल्या-वाईटाच्या व्याख्येत तोलत राहतो. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधल्या दुहेरी अर्थाच्या गाण्यांवर, हिंसेवर आपला जाहीर आक्षेप. सहजासहजी आपल्या मुलांपर्यंत पोहोचतं ना ते! पण दिवसाला मिळणाऱ्या ७ कोटीपेक्षा अधिकपैकी एकही व्हिझिट आपल्या पुढच्या कोवळ्या पिढीची नसेल, ह्यावर मात्र किती भाबडा विश्वास आपला! भर चौकात उभं राहावं आणि सहज तीन-चार वायफाय कनेक्शन्स मिळावीत अशा काळात आपण मात्र आपल्या घरचं कनेक्शन सेक्युअर करून आणि टीव्हीला चाईल्ड लॉक लावून निश्चिंत होतो.
'सायबर सायकॉलॉजी अँड बिहेजविअर' जर्नलमधील एका प्रबंधासाठी केलेल्या सर्वेक्षणात असं सिद्ध झालं की सहभागी झालेल्या विद्यार्थ्यापैकी ७८% (९३% मुलं आणि ६२% मुली) जणांनी वय वर्षे १८च्या आधी ऑनलाईन पॉर्नोग्राफी पाहिलेली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सहभाग असलेला वयोगट चौदा ते सतरा. घडवावं तसं घडणारी, अर्धवट आकारलेली चौदा-पंधरा वर्षांची शिल्पं. असं एकांगी, भरकटलेलं काहीतरी पाहतायंत आणि कळत-नकळत त्यांच्या स्वतःबद्दलच्या अन् एकूणच जाणीवा, संवेदना बदलतायंत.
सहा वर्षांपूर्वी 'बालक पालक' नावाचा सिनेमा आला होता. किशोरावस्थेमध्ये असलेली काही मुलं वाईट संगतीमुळं पॉर्न पाहू लागतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही वडीलधारी मंडळी वेळीच त्यांच्याशी संवाद साधून त्यापासून कशी परावृत्त करतात, अशा सूत्रावर आधारित हा चित्रपट त्यावेळी, एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा म्हणून खूप नावाजलाही गेला. पण दिग्दर्शकानं या कथानकासाठी १९८०चा साधा सोपा काळ निवडला म्हणून सूत्ररूपात बांधता आला असावा कदाचित. इंटरनेट जिथं एका क्लिकवर 'जो जे वांच्छिल तो ते लाहो' तिथं असं म्हणत २४ तास आपल्या इच्छापूर्तीसाठी हजर असतं, तिथं हे असं फक्त परावृत्त करून, समजावून सांगून भागेल?
त्यापेक्षा जे त्यांच्या दर्शनी पडतंय तेच हळूहळू बदललं तर? थोडंसं चांगलं केलं तर? फक्त पुढच्या पिढीसाठीच नव्हे, तर तुम्हां-आम्हां सर्वांसाठीच.
सेक्स. मनुष्यप्राण्याच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक. त्या दृष्टिकोणातून खरंतर कामोत्तेजक कंटेंट पाहणं ह्यात गैर काहीच नाही. अमेरिकेतील बर्कली विद्यापीठातल्या प्रोफेसर लिंडा विल्यम यांनी त्यांच्या 'हार्डकोअर' पुस्तकात म्हटल्याप्रमाणं प्रौढ सिनेमा हे खरंतर पौरुषत्व, स्त्रीत्व आणि लैंगिकता यांमधील एक संभाषण आहे. पॉर्न पाहणं हा कायद्याने गुन्हा नाही. धूम्रपानासारखं ते तब्येतीला हानिकारकही नाही आणि तशी तळटीप पॉर्नशी निगडित कोणत्याही मजकुरावर दिसणार नाही. अर्थात त्याच्या आहारी जाणं, त्याचं व्यसन लागणं हे नक्कीच मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नसेल, पण पुन्हा तो ज्याच्या-त्याच्या तारतम्याचा प्रश्न झाला. दांपत्यजीवनावर त्याचा होणारा चांगला-वाईट परिणाम हासुद्धा व्यक्तिगत पातळीवर मर्यादित राहतो. एकूणच पॉर्नोग्राफी पाहणं हा एक अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे, खाजगी बाब आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग म्हणून ते कुणी, किती, केव्हा पाहावं किंवा पाहू नये यावर भाष्य करणं फुटकळ आहे. असलाच तर आपला आक्षेप असायला हवा त्याच्या सादरीकरणाला. त्यामध्ये समाविष्ट झालेल्या चुकीच्या विषयांना. ह्या साऱ्याशी अनाहूतपणे जोडल्या गेलेल्या नकारात्मकतेला. पडद्यावर आणि पडद्यामागे.
पॉर्न कलाकारांच्या जीवनाबद्दल कुणी सुरस कहाण्या सांगितल्याचं ऐकिवात नाही. या क्षेत्राला फक्त एक व्यवसाय म्हणून न मिळणारा दर्जा, कलाकारांचं होणारं शोषण, निर्मात्यांकडून मिळणारी अनादरात्मक वागणूक, या साऱ्यांत अडकल्यानंतर न मिळणारी समाजमान्यता, असे पडद्यामागचे प्रश्न तर आहेतच; पण पडद्यावरही जे दाखवण्यात येतं त्यात वर्षानुवर्षं असलेला एकांगीपणा आपण गृहीतच तर धरलाय. मग तो सोनकेसरी ललनांनी मठ्ठपणानं त्यातील पुरुषांच्या सोयीप्रमाणं वाटेल तसं वागणं असो, कृत्रिमरीत्या घडवलेली शरीरं असो, नाहीतर शक्तिशाली व्यक्तींनी दुबळ्यांवर केलेला अत्याचार असो. केवळ स्त्रियांचंच नाही तर एकूणच एखाद्या व्यक्तीचं ‘ऑब्जेक्टिफिकेशन’ करणं, अजाणांची फसवणूक करून त्यांचा फायदा घेणं असे अनेकानेक प्रकार पॉर्नच्या यादीत दिसतील. आश्चर्याची बाब अशी की सेक्ससारख्या वास्तववादी आणि आनंददायी गोष्टीबरोबर अट्टहासानं जोडली गेलेली ही नकारात्मकता आपल्याला टोचत नाही. आपल्याला टोचतं ते पॉर्न! नीरक्षीरविवेकबुद्धीनं विचार करून या साऱ्या समीकरणातलं नको ते बाजूला करून चांगल्यावर भर द्यायचा प्रयत्न केला तर? एथिकल पॉर्न हेच सांगायचा प्रयत्न करतंय.
तर नेमका काय फरक आहे एथिकल आणि नॉन-एथिकल पॉर्नमध्ये? इतर कोणत्याही क्षेत्रासारखं इथंही कलाकारांना कामाचा योग्य मोबदला देणं, कलाकारांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्यांच्यावर कोणतीही गोष्ट न लादता त्यांच्या मतांचा आदर करणं, त्यांच्या पसंतीला प्राधान्य देणं, त्यांच्या शरीरयष्टीबद्दल अवास्तव अपेक्षा न ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्यावर कोणतीही गोष्ट न लादणं अशा अनेक गोष्टी पॉर्नला एथिकल म्हणजेच नैतिक बनवतात. सेक्सला एक सकारात्मक दृष्टिकोणातून सर्वांसमोर, प्रामुख्यानं पुढच्या पिढीसमोर आणणं आणि त्यामधील व्यक्ती ह्या कोणत्या अपघाताच्या बळी नसून निव्वळ कलाकार आहेत ह्या विचाराची अंमलबजावणी करणं यामध्ये पॉर्नोग्राफीचं नैतिक असणं झळकतं.
काही दशकांपूर्वी कॉफीच्या मळ्यात राबणाऱ्या कामगारांना वाजवी मोलमजुरी मिळत नाही, हा विचार रुजला आणि 'फेअर ट्रेड कॉफी' बाजारात आली. सध्या हस्तकलेच्या वस्तूंपासून चॉकलेट्सपर्यंत काहीही विकत घेताना पुढारलेल्या देशामध्ये तरी बहुतांशी ग्राहक 'आपण जी वस्तू घेतोय ती बनवणाऱ्या व्यक्तीला योग्य मोबदला मिळाला असेल ना' असा विचार करताना दिसतात. आज दुग्धोत्पादन करणाऱ्या संस्था त्यांच्या गायी मोकळ्या वातावरणात फिरणाऱ्या, चारा खाणाऱ्या आणि नैसर्गिक रीतीनं वाढलेल्या आहेत असं अभिमानानं मिरवताना दिसतात. चिकन आणि अंडी ज्या कोंबड्यांपासून मिळतात त्या 'केज फ्री' होत्या हे कळलं तर त्यांच्यासाठी थोडंसं बरं वाटून चार घास जास्तच जातात आपल्याला(!). सामाजिक जबाबदारी म्हणून ग्राहक 'फेअर ट्रेड'साठी थोडे जास्त पैसे मोजायलाही तयार होतो. एकूणच एथिकल म्हटलं की कुठेतरी ज्या वस्तूचा वापर करतोय ती फक्त आपल्याला आनंद देतेय का, हा विचार न करता ती कशी बनवली गेलीये हा विचारसुद्धा केवढा महत्त्वाचा आहे, हे आताशा आपल्याला पटायला लागलंय. मग अशा कितीतरी बाबतींत फेअर असणं इतकं जिव्हाळ्याचं झालेलं असताना पॉर्नसारखी अगणित लोकसंख्येकडून पहिली जाणारी गोष्ट फेअर असावी, एथिकल असावी हा विचार मुख्य प्रवाहात का न रुजावा?
काही साहसी, सुशिक्षित आणि बुद्धिमान दिग्दर्शकांनी या संदर्भात थोडी पावलं उचलून एथिकल पॉर्नची निर्मिती करणं सुरू केलं आहे. नॉन-एथिकल पॉर्नच्या तुलनेत ही निर्मिती संख्येनं अजूनतरी बोटावर मोजण्याइतकीच आहे. पण ज्या जाणीवेनं ही चळवळ सुरू झाली आहे, त्यामागचा उद्देश चांगला आहे आणि तो तसाच राहिला तर खूप खोलवर रुतून बसलेला लोकांचा पॉर्नबद्दलचा दृष्टिकोन बदलणं थोडंसं सुकर होईल.
अर्थात फक्त एथिकल आहे म्हणून ते अगदी डोळे झाकून(!) राजरोसपणे पुढच्या पिढीच्या हवाली करावं का?, असाही अनाकलनीय प्रश्न पडतोच. आपण जसे तरलो तशी पुढची पिढीपण स्वतः स्वतःचे मार्ग काढेल असाही विश्वास वाटतोच. पॉर्नशी निगडित खरंतर असे कितीतरी प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं तितकीशी सरळसोट सोप्पी नाहीत. आणि एथिकल पॉर्न ह्या साऱ्या प्रश्नांचं एकमेव उत्तरही नाही.
पॉर्नचं एथिकल असणं हे सजगतेकडे उचललेलं एक सकारात्मक पाऊल मात्र नक्कीच आहे. एथिकल पॉर्नच्या प्रचारमोहिमेत सक्रिय सहभाग असलेल्या एरिका लस्ट या निर्माती-दिग्दर्शिकेच्या शब्दांत सांगायचं झालं तर, "सेक्स अश्लील असायला हरकत नाही, पण त्यामागची मूल्यं शुद्ध असायला हवीत!"
एथिकल पॉर्न लोकांची आवडनिवड बदलायचा आटापिटा करत नाहीये. पण लोकांना हवी असलेली करमणूक त्यांच्या मूलभूत चांगुलपणाशी तडजोड न करता पाहायला मदत नक्कीच करतंय. अन् हेही नसे थोडके.
विशेषांक प्रकार
एन्जॉयबल
परंतु एंड यूजरला याद्वारे मिळणारा अनुभव नक्की कसा वेगळा असेल ते स्पष्ट होत नाही.
अंतिमतः तो अभिनय असतो. आणि त्यामुळे मला वाटतं अभिनेते जर आनंदी असतील तर त्यांच्या अभिनयातही चांगल्या अर्थानं फरक पडेल. जर तो अधिक चांगला वठेल तर एंड यूजरला तो अधिक वास्तव आणि त्यामुळे एन्जॉयबल वाटेल.
राजकीय भूमिका
न्याय्यवर्तन ही राजकीय भूमिका असेल तर मुळात फरक पडणारच नाही; कारण अन्यायातून जन्मलेल्या गोष्टींचा अनुभव घेतलाच जाणार नाही.
'आम्हाला काही फरक पडत नाही. बालमजुरी असो किंवा शोषणातून निर्माण होणाऱ्या गोष्टी, आम्हाला आमच्या सुखापलीकडे काही बघायचंच नाही' अशी भूमिका असेल तरीही काही फरक पडणार नाही. कारण जरा (जास्त) पैसे मोजून वस्तू, सेेवांचा भोग घेण्याचे प्रकार हे लोक करणार नाहीत.
राजकीय भूमिका विरुद्ध उपभोक्त्याचा अनुभव.
एथिकल पोर्न असो किंवा फ्रीरेंज कोंबडीची अंडी अथवा मांस. बऱ्याच जणांसाठी अगोदर एक उपभोक्ता म्हणून येणारा अनुभव महत्त्वाचा असतो- राजकीय भूमिका नंतर येते. राजकीय भूमिका योग्य असली परंतु त्याद्वारे येणारा प्रोडक्ट जर अनुभवाच्या पसंतीस उतरला नाही तर त्यागणारेही कैकजण असतात.
सामान्यपणे फ्रीरेंज अंडी अथवा मांस जास्त उत्तम असते असे सांगतात. ते अनेकांच्या अनुभवास उतरले आहे.
इथे तसे काही झाले आहे का, असल्यास किती हा अनुभवाचा विदा अपेक्षित होता. अगदी हार्डकोर आकडेमोड नसली तरी थोडे तौलनिक विश्लेषण- जे फक्त अन्य गोष्टींशी तुलनेवर विसंबत नाही- ते अपेक्षित होते आणि ते इथे दिसत नाही.
सारांशाने: सैद्धांतिक भूमिकेला विरोध नाही- त्याचा परिणाम म्हणून काही नोटिसेबल फरक आहे की नाही हे दिसणं/दाखवणं अपेक्षित आहे. जर असा फरक असतो हे समजलं तर या भूमिकेस लोकांचा सपोर्ट वाढेलच.
फ्री-रेंज कोंबडी, वगैरे...
लेखातच फेअरट्रेड कॉफी, फ्रीरेंजच्या कोंबड्यांची अंडी, मांस अशी उदाहरणं आहेत.
(आगाऊ इशारा: प्रतिसादात मुक्त चिंतन आहे. कोणाला त्याबद्दल काय वाटेल, याबद्दल काहीही तमा न बाळगता केलेले. कोणाला काही वाटलेच, तर टू हेल विथ इट.)
नाही म्हणजे, फेअर ट्रेड कॉफीचे उदाहरण ठीकच आहे, परंतु फ्री-रेंज कोंबडीचे उदाहरण अंमळ रोचक तथा उद्बोधक (आणि या ठिकाणी कदाचित समर्पकसुद्धा) वाटले.
म्हणजे असे पाहा. कोंबड्यांना एवढ्याश्या खुराड्यात कोंबायचे नाही, मोकळ्यावर सोडायचे, हे ठीकच आहे. परंतु, खाण्यासाठी/विकण्यासाठी कोंबडीला मारण्यापूर्वी/तिची अंडी हिरावून घेण्यापूर्वी तिची लेखी संमती घेता काय? मुळात तुमच्या कुक्कुटपालनाच्या धंद्यात प्रस्तुत कोंबडी संमतीने (तिच्या. तुमच्या नव्हे. किंवा अन्य कोणाच्याही नव्हे.) आली होती काय?
बरे, ग्राहकाच्या दृष्टीतून पाहायचे झाले, तर या अशा कोंबड्या/ही अशी अंडी ही अधिक रुचकर म्हणून टौट केली जातात. यात तथ्यांश किती, याबद्दल कदाचित दुमत असू शकेलही, परंतु, ग्राहकाला आकर्षित करण्याचा तो एक मार्केटिंग प्लॉय असतो, हे मात्र खरे. (फ्री-रेंज कोंबड्या (सपोज़ेडली) अधिक रुचकर असतात (म्हणून एवढ्याश्या खुराड्यातल्या कोंबड्यांपेक्षा त्या खाव्यात), यात एथिकल नक्की काय आहे? हा तर निव्वळ स्वार्थ झाला; खाणाऱ्याचाही, नि विकणाऱ्याचाही!) त्याउपर, "आम्ही आमच्या कोंबड्यांना 'चांगले' (व्हॉटेव्हर दॅट मे मीन) वागवतो" (पक्षी: तुम्ही ज्या आम्ही मारलेल्या कोंबड्या किंवा आम्ही चोरलेली अंडी खाता, त्यांकरिता त्या (मरणाऱ्या आणि/किंवा त्या अंड्यांच्या जन्मदात्या) कोंबड्यांना तुमच्या सुखापायी कमी त्रास होतो) म्हणून, काही गिऱ्हाइकांच्या अंगभूत 'सेन्स ऑफ फेअरनेस'ला (पुन्हा: व्हॉटेव्हर दॅट मे मीन) गोंजारून, त्या मुद्द्यावरून त्यांची स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची सोय करून देऊन, त्या अधिकच्या गिऱ्हाइकांनाही आकर्षित करण्याची ती एक ट्रिक असते. बरे, या मुद्द्यावरून अशा कोंबड्यांच्या/अंड्यांच्या किमतीही कैच्याकैच वाढीव असतात. यात, त्या कोंबड्यांना मोकळे सोडण्याकरिता कुक्कुटपालकास होणारा अधिकचा खर्च जरी जमेस धरला, तरीसुद्धा, कुक्कुटपालकास बऱ्यापैकी वाढीव नफ्याचा भागही यात नसतोच, असा दावा आजतागायत कोणी केल्याचे निदान माझ्या तरी वाचनात आलेले नाही. (चूभूद्याघ्या.) त्याउपर, त्या वाढीव नफ्याचा कितपत समभाग प्रस्तुत कोंबडीस मिळतो, हेदेखील शंकास्पदच आहे.
हे म्हणजे, कोंबडी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो माझीच लाल, नि मधल्यामध्ये तिसऱ्याचा (विकणाऱ्याचा) लाभ!
या सर्व व्यवहारात कोंबडीची बाजू सोडून द्या. तिला तसेही कोणी विचारलेले नाही. (तिला दिली जाणारी तथाकथित 'चांगली वागणूक' हीसुद्धा तिला काय हवे/नको ते विचारून दिली गेलेली नाही. कुक्कुटपालकाने ती आपल्या सोयीकरिता नि नफ्याकरिता आपल्याच मनाने तिच्यावर एकतर्फी लादलेली आहे.१) कुक्कुटपालकाबद्दल तर बोलायलाच नको. तो तसाही येनकेन प्रकारेण धंदा करायला (नि नफा कमवायला) बसलेला आहे. ("त्याने धंदा केला नाही, नि नफा कमविला नाही, तर तो खाईल काय? त्याचेही पोट भरायला नको?") राहता राहिली गोष्ट गिऱ्हाइकाची. या गिऱ्हाइकाची - या व्यवहारातल्या तिसऱ्या अनिवार्य घटकाची - मात्र मला मोठी गंमत वाटते.
अरे, एवढीच 'एथिकल' वगैरे बनण्याची हौस आहे, तर मग सरसकट व्हेगन बन ना, भोसडीच्या!
(टीप: हा व्हेगॅनिझमच्या, व्हेजिटेरियॅनिझमच्या, वा अन्य कशाच्याही, छुप्या किंवा उघड, समर्थनाचा आणि/किंवा प्रचाराचा प्रयत्न नाही. प्रस्तुत प्रतिसादकाकडून या जन्मात (किंवा बापजन्मीसुद्धा) असे काही होणे हे निव्वळ असंभव आहे.)
हे म्हणजे, मला रांडेकडे जायचे तर आहे. त्याकरिता वेश्याव्यवसाय हा कायदेशीर तर असला पाहिजे (असे मला वाटते). मात्र, रांडांच्या अधिकारांची, त्यांच्या वेल्फेअरची, मला चाड आहे. (असा माझा (माझ्यापाशीच) दावा आहे. किंवा, असे मी (स्वतःशीच) ठरविलेले आहे.) म्हणून, रांडेकडे जाण्यापूर्वी, मी तिच्या भडव्याजवळ (खुद्द रांडेजवळ नव्हे; कदापि नव्हे!) विचारपूस करून खातरजमा करून घेतो, की बाबा रे, तुझ्या रांडांना तू 'चांगले' वागवितोस ना रे? आणि, (माझ्याबरोबरच्या) या व्यवहाराला त्या रांडेची संमती आहे ना रे? आणि, तो (भडवा) "होऽऽऽ!" म्हणाला, की मगच मी रांडखान्याची पायरी चढतो. (किंवा, अशी आगाऊ हमी जाहिरातींतून देणाऱ्या भडव्यांच्या रांडांकडेच मी जातो.)
(किंवा, मी (फॉर व्हॉटेव्हर रीझन) कधीही रांडांकडे जात नाही. रांडबाजारांशी माझा खरे तर काडीमात्र संबंध नाही. मात्र, मत आणि ढुंगण प्रत्येकालाच एकएक (तरी) असते, या महोक्तीप्रमाणे, रांडबाजारांबद्दल नि रांडबाजारांचे व्यवहार कसे चालावेत याबद्दल मला मते आहेत. एकीकडे रांडबाजार हे समाजात अपरिहार्य, कदाचित अनिवार्यसुद्धा आहेत, असेही मला वाटते, तर दुसरीकडे, रांडबाजारांचे व्यवहार 'एथिकली' चालावेत, रांडांना 'चांगली वागणूक' मिळावी, त्यांना 'संमतीचा अधिकार' वगैरे असावा, ("सर्वेऽपि सुखिनः सन्तु" या उक्तीस अनुसरून) त्यांचेही 'भले' वगैरे व्हावे, असेही माझे आपले एक मत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची, ते एन्फोर्स करण्याची कोणतीही ताकद वा मेकॅनिझम माझ्याजवळ नाही. किंबहुना, त्या दिशेने मी कधी काही विचारही केलेला नाही, तसा तो करण्यात मला खरे तर स्वारस्यही नाही, नि प्रामाणिकपणे, काही घेणेदेणेही नाही. मात्र, "हे व्यवहार 'एथिकली' झाले पाहिजेत; होतकरू गिऱ्हाइकांनी बाकी काही नाही तरी भडव्यांजवळ विचारपूस केली पाहिजे, गेला बाजार अशी स्पष्टपणे जाहिरात करणाऱ्या भडव्यांनाच थारा दिला पाहिजे" अशा काहीबाही फेसबुकी पोष्टा टाकण्यात, झालेच तर 'रांडबाजार विशेषांकां'तून लेखबिख लिहिण्यात (या असल्या लेखांत बहुतकरून "माझी रांडबाजारांशी पहिली तोंडओळख कशी झाली", याचीच वर्णने, रंगवूनरंगवून नि चावूनचघळून केलेली असतात; परंतु तो मुद्दा पूर्णपणे वेगळा. आणि, हे ज्ञान मला कशाला, हा त्याहूनही वेगळा मुद्दा. परंतु ते एक असो.), किंवा, यापैकी काही जमणे नसल्यास, कोणी अशी पोष्ट लिहिली असल्यास ("आज सकाळीसकाळी मला पातळ शी झाली" असल्या फेसबुकी पोष्टांना जितक्या परमोत्साहाने 'लाईक' करण्याची जनरीत आहे, किमान तितक्या तरी उत्साहाने) तिला 'लाईक' करण्यात, किंवा, अशा एखाद्या 'विशेषांका'त कोणी असा लेख पाडला असल्यास, त्यावर काहीबाही प्रतिसाद टाकण्यात (किंवा इतरांच्या प्रतिसादांस 'मार्मिक' वगैरे देण्यात) धन्यता वगैरे मानतो.२)
नाही म्हणजे, वेश्या यासुद्धा माणूसच आहेत, त्यांना सर्व मानवाधिकार असायला पाहिजेत, त्यांना संमतीचा (किंवा नकाराचा) अधिकार असायला पाहिजे, त्यांचेही 'भले' वगैरे व्हायला पाहिजे, हे सगळे सगळे ठीक आहे; त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. (मुळात वेश्याव्यवसाय असावा किंवा नाही, याबद्दल काही म्हणणे असण्यापूर्वीसुद्धा, त्याचे समूळ तथा संपूर्ण उच्चाटन हे अशक्य आहे, याची मला कल्पना आहे, आणि म्हणून, तो असणे अपरिहार्य जर असेल, तर त्याला असू द्यावे, परंतु किमानपक्षी त्यावर काही नियंत्रण असावे, इतपत मला पटते.३) याउपर, वेश्यांनी आपले मानवाधिकार जाणून त्यांच्या प्राप्तीसाठी काही चळवळ वगैरे केल्यास, सरकारने वेश्यांशी सल्लामसलत, चर्चा वगैरे करून, त्यांचे प्रश्न समजून घेऊन, त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ तथा त्यांच्या कल्याणार्थ काही कायदे वगैरे करून त्यांची अंमलबजावणी वगैरे केल्यास, तथा सेवाभावी संस्थांनी आणि या समाजघटकाची सेवा करण्यास उत्सुक४ असलेल्या व्यक्तींनी वगैरे त्यांच्याशी उपरोक्त पद्धतीने सल्लामसलत, चर्चा, विचारपूस इ. करून त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी त्यांना मदत वगैरे केल्यास (तथा समाजजागृती वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे केल्यास) माझा त्यास (घरबसल्या) फुल्ल पाठिंबा वगैरे आहे.५ बाकी, इतरांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी जमल्यास हातभार वगैरे लावावा, नपक्षी हातभार लावू नये. दोन्हीं परिस्थितींत माझे त्याबद्दल काहीही म्हणणे नाही. परंतु, या असल्या भंपक, निरर्थक, फील-गुड हाफ-मेझर्सचा (खरे तर नॉन-मेझर्सचा) काय उपयोग?
सांगण्याचा मतलब इतकाच, की त्या रांडांचे/कोंबड्यांचे भले व्हावे, असे जर खरोखरच, मनापासून जर वाटत असेल, तर गेला बाजार त्या रांडांना/कोंबड्यांना विचारा रे, की बाबांनो (खरे तर बायांनो), नक्की काय केले असता तुम्हाला फायदा होईल? नाहीतर, ते जर जमत नसेल, तर सोडून द्या. त्या परिस्थितीत तुम्हाला दोनच पर्याय आहेत. एक तर (इतकेच वाटत असेल, तर) कोंबडी/अंडी खाणे/रांडांकडे जाणे सोडून द्या. नाहीतर मग विचार करणे सोडून द्या, नि मनसोक्त आनंद उपभोगा. पण असला फालतूपणा करू नका. त्यांने (कुक्कुटपालक/भडवे सोडल्यास) कोणाचेही भले होत नाही.
(मूळ लेखात फ्री-रेंज कोंबडीचे उदाहरण आहे. तद्वत, येथे रांडांचे उदाहरण घेतलेले आहे. प्रस्तुत लेखविषयाच्या - पॉर्नच्या -. संदर्भात, सांगण्याचा मुद्दा ध्यानात आला असेलच, अशी अपेक्षा करतो.)
- (फरहाद.घोडेश्वर) 'न'वी बाजू.
==========
तळटीपा:
१ दक्षिण संयुक्त संस्थानांतल्या गुलामगिरीतसुद्धा "आम्ही आमच्या गुलामांना 'चांगली वागणूक' देतो", असा दावा अनेक गुलाममालक करीत, असे ऐकून आहे. (शिवाय, गुलामगिरीची प्रथा ही कशी 'एथिकल' आहे, हे पटवून देण्याकरिता बायबलमधले दाखलेही काढून देत, असेही ऐकलेले आहे. परंतु हे थोडे अवांतर झाले.)
२ प्रस्तुत प्रतिसाद टंकतानासुद्धा मी केवळ माझीच लाल करून घेत आहे, हे मला सहर्ष (तथा आगाऊ) मान्य आहे.
३ नाही. "समाजात वेश्या आहेत, म्हणून आमच्या आयाबहिणींची अब्रू वाचते" असले एक अत्यंत खुळचट - तथा एके काळी (कदाचित अजूनही) अत्यंत लोकप्रिय - असे विधान ऐकण्यात आलेले आहे. तसले काहीही मला म्हणावयाचे नाही.
४ यात कोठलाही कुत्सित गर्भितार्थ दडलेला (अथवा उघड) नाही. अत्यंत सरळ अर्थाने तथा गंभीरपणे हा वाक्प्रयोग केलेला आहे.४अ
४अ वास्तविक, हे सांगण्याची गरज असू नये, परंतु तरीही.
५ हे लिहितानासुद्धा मी केवळ माझीच, इ. हे मला सहर्ष, इ.इ.
अवांतर -हलाल व झटका यातील जास्त एथिकल काय आहे?
हलाल व झटका यातील जास्त एथिकल १ काय आहे? शिवाय या एथिकलनेसमधे तुम्ही यात स्थल, काल, समाज, व्यक्ति सापेक्षता विचारात घेतली नाही. का ही न’वी बाजू नसल्याने विचारात घेतली नाही?
३ नाही. "समाजात वेश्या आहेत, म्हणून आमच्या आयाबहिणींची अब्रू वाचते" असले एक अत्यंत खुळचट - तथा एके काळी (कदाचित अजूनही) अत्यंत लोकप्रिय - असे विधान ऐकण्यात आलेले आहे. तसले काहीही मला म्हणावयाचे नाही.
कामातुराणां न भयं न लज्जा । यातील कामातुर झाल्याने बलात्काराचा गुन्हा करण्यास "भय" न वाटण्याचा जो भाग आहे तो कामातुरतेतून उदभवणाऱ्या कामेच्छेची पातळी कामपुर्तीचे सेवा मूल्य घेउन कमी करण्याची शक्यता जर गणिका व्यवसायातून होत असेल तर आयाबहीणींची "अब्रू" वाचण्याची शक्यता वाढते हे आपल्याला पटत नाही का?
१ कमी नॉनएथिकल म्हटले तरी चालेल
हे म्हणजे...
हलाल व झटका यातील जास्त एथिकल १ काय आहे?
हे विचारणे म्हणजे, तुमच्या कानाखाली जाळ काढणे आणि तुमच्या पेकाटात लाथ घालणे यांत जास्त एथिकल१ काय आहे,२ असे विचारण्यासारखे आहे.
म्हटलेलेच आहे, की तुम्ही त्याला राम म्हणा, वा रहीम म्हणा; परमेश्वर एकच आहे.३ तद्वत, तुम्ही हलाल करा, नाहीतर झटका; ज्याच्या मानेवरून सुरी फिरायची, ते परमेश्वराचे लेकरू एकच आहे. एवढेही करून जर त्याच्या मानेवरून सुरी फिरायचीच असेल (आणि, खाणाऱ्याच्या नरड्याखाली ते उतरायचेच असेल), तर (खाणाऱ्याच्या दृष्टीने) की फरक पैंदा?४ खाणाऱ्याला चवीशी मतलब; पेड़ गिनन्याशी नव्हे.
(सवांतर: म्हटलेले आहे, की Those who love sausage and respect the law, should not see either one being made.)
यातील कामातुर झाल्याने बलात्काराचा गुन्हा करण्यास "भय" न वाटण्याचा जो भाग आहे तो कामातुरतेतून उदभवणाऱ्या कामेच्छेची पातळी कामपुर्तीचे सेवा मूल्य घेउन कमी करण्याची शक्यता जर गणिका व्यवसायातून होत असेल तर आयाबहीणींची "अब्रू" वाचण्याची शक्यता वाढते हे आपल्याला पटत नाही का?
ग्यारंटी काय? शेवटी, हाज़िर सो वज़ीर!५ (त्याउपर, फुकट ते पौष्टिक, असाही दाखला देणार होतो, परंतु, जाऊ द्या.)
सांगण्याचा मतलब इतकाच, की इतकेच भय आणि/किंवा लज्जा नसलेला कामातुर जर असेल, तर तो इतके फाइन डिस्टिंक्शन करेलच, असे सांगता येत नाही.
आणि, समजा, त्यामुळे तुमच्या आयाबहिणींची "अब्रू" वाचण्याची शक्यता वाढते६, असे जरी मानले, तरीसुद्धा, तुमच्या आयाबहिणींची "अब्रू" वाचावी, याकरिता तिसऱ्या कोणीतरी आपली "अब्रू" विकायला काढावी, ही अपेक्षा कितपत सयुक्तिक आहे? ("हलवायाच्या घरावर तुळशीपत्र" यालाच म्हणत असावेत काय?७)
==========
तळटीपा:
१ तुमच्या का. जा. काढणाऱ्याच्या आणि/किंवा तुमच्या पे. ला. घालणाऱ्याच्या दृष्टिकोनातून; तुमच्या किंवा अन्य कोणाच्या दृष्टिकोनातून नव्हे.
२ केवळ समांतर दाखला दिला आहे. हिंसेचा इरादा, (सुप्त अथवा जागृत) इच्छा, धमकी, आणि/किंवा आवाहन, असा कोणताही (नसलेला) गर्भितार्थ यात कृपया वाचू नये.
३ चूभूद्याघ्या.३अ
३अ या "चूभूद्याघ्या"मध्ये स्थलकालसमाजव्यक्तिसापेक्षता पूर्णपणे विचारात घेतलेली आहे. असो.
४ आणि, खाणारा जर असा (कृत्रिम) फरक करणारच असेल, तर (त्या देवाच्या लेकराच्या दृष्टीने) की फ. पैं.?
५ पूर्वी, लहानपणी नारायण पेठेत राहात असताना, रस्त्यात अनेकदा कन्स्ट्रक्शनवरची गाढवे दिसत. पाठीवर लादलेली ओझी बाळगत, एकापाठोपाठ एक, एका रांगेत रस्त्यातून चालत जाणारी. असो; तो (अति)प्रसंग अधिक रंगवून सांगत नाही. समझने वाले को इशारा क़ाफ़ी.
६ तुमच्या आयाबहिणी शक्य तोवर कानाखाली जाळ काढण्यास सक्षम नाहीत काय, हे आणि असे इतर प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू. (तसेही, ते दर वेळेस पुरेसे ठरेलच, असेही नाही.)
७ अतिअवांतर: "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र" असे का म्हणत असावेत? हलवाई कोण? त्याच्या घरावर तुळशीचे पान कशाकरिता ठेवायचे?
सांगण्याचा मतलब इतकाच, की
सांगण्याचा मतलब इतकाच, की इतकेच भय आणि/किंवा लज्जा नसलेला कामातुर जर असेल, तर तो इतके फाइन डिस्टिंक्शन करेलच, असे सांगता येत नाही.
कामातुर अवस्थेत गेल्यावर त्याला भय किंवा लज्जा वाटत नाही असा अर्थ आहे.
लज्जा संकोच सर्व गळले. चित्त चळले चित्त चळले. रामा शिवा हरी मुकुंद मुरारी॥
हलाल व झटका यातील जास्त एथिकल काय आहे?
हलाल व झटका यातील जास्त एथिकल१ काय आहे?
झटका हे हलालच्या तुलनेत जास्त एथिकल आहे.
यामागचं लॉजिक या लेखातच आहे.
चिकन आणि अंडी ज्या कोंबड्यांपासून मिळतात त्या 'केज फ्री' होत्या हे कळलं तर त्यांच्यासाठी थोडंसं बरं वाटून चार घास जास्तच जातात आपल्याला(!). सामाजिक जबाबदारी म्हणून ग्राहक 'फेअर ट्रेड'साठी थोडे जास्त पैसे मोजायलाही तयार होतो. एकूणच एथिकल म्हटलं की कुठेतरी ज्या वस्तूचा वापर करतोय ती फक्त आपल्याला आनंद देतेय का, हा विचार न करता ती कशी बनवली गेलीये हा विचारसुद्धा केवढा महत्त्वाचा आहे, हे आताशा आपल्याला पटायला लागलंय.
"मांसाचे उत्पादन करताना बळी पडणाऱ्या प्राण्याला किंवा पक्षाला शक्य तेवढ्या कमी वेदना व्हाव्यात" असं वाटणाऱ्या ग्राहकांनी झटका या प्रकारच्या मांसाचे समर्थन करावे आणि हलाल या प्रकारच्या मांसाचा निषेध करावा.
एथिकल पॉर्नच्या धर्तीवर एथिकल पोर्क / एथिकल बीफ / एथिकल मीट / एथिकल चिकन यांचा आग्रह व्हावा.
उत्तर दिल्ली पालिकेने खरंच
उत्तर दिल्ली पालिकेने खरंच श्लाघ्य निर्णय घेतलाय.
ज्यांना हलाल मांस खायचं आहे वा झटका (एथिकल) मांस खायचं आहे त्यांना आपापल्या निवडीचा अधिकार प्राप्त झाला आहे. (याआधी हा अधिकार ते कोणत्या प्रकारे बजावायचे याची कल्पना नाही.)
BTW, मला स्वतःला, हलालच्या तुलनेत झटक्याचे मांस आवडते कारण त्याची लज्जत खरंच अप्रतिम असते.
टॉक ऑफ द डेव्हिल...
आजच्याच हफपोष्टात हे आर्टिकल आले आहे.
कदाचित ग्राहकाला फरक कळणार नाही
कदाचित ग्राहकाला फरक कळणार नाही.
चोरबाजारातली वस्तू आणि सामान्य दुकानातील वस्तू पुष्कळदा उपभोगताना समानच असते.
अनेथिकल पॉर्नमध्ये कलाकारांच्या मोबदल्याची चोरी करून निर्मात्या-विक्रेत्याच्या साखळीने ग्राहकापर्यंत पोचवली, अशी "चोरी"च्या व्याख्येची व्याप्ती वाढवल्यास, मग अनेथिक पॉर्नचे हस्तांतर चोरबाजारच होतो.
(काही पॉर्न संकेतस्थळे जाहिरातींवर चालतात, पॉर्न-उपभोक्त्याला थेट पैसे द्यावे लागत नाहीत -- अशा ठिकाणी ग्राहक कोण त्याबाबत योग्य निर्णय करून "बाजार"च्या व्याप्तीत विश्लेषण करता यावे.)
पुन्हा तेच
जर अन्याय्य वा चौर्यकर्मातून आलेली उत्पादनं वा सेवा वापरणार नाही, ही राजकीय भूमिका नसेल तर काही फरक पडणार नाही. हे ग्राहकांच्या किंवा फुकट्यांच्या, अर्थात वापरकर्त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर
एथिकल पॉर्न तयार करण्यामागचा उद्देश यशस्वी का अयशस्वी होणार, याची चर्चा निराळी असेल. उदाहरणार्थ, एरिका लस्टनं तिच्या पद्धतीचे सिनेमे बनवण्यामागे तिचा काय उद्देश आहे; तिला समाजप्रबोधन करायचं आहे का नफा मिळवायचा आहे का तिला जे बघायला आणि दाखवायला आवडतं ते तयार करायचं आहे का यांतले एकापेक्षा अधिक उद्देश आहेत, हे तपासावं लागेल. तिला ज्या अर्थी गेली बरीच वर्षं तिच्या पद्धतीचे सिनेमे तयार करणं शक्य झालं आहे, आणि तिनं काही पुस्तकंही प्रकाशित केली आहेत; तिचे बरेच उद्देश साध्य होत असावेत. (याची यादी विकिपीडीयावर सापडेल.)
सदर लेख वाचता माझी अशी धारणा झाली की लेखिका, तिच्या परिवारातली तरुण मुलं-मुली यांनी अन्यायातून तयार झालेल्या वस्तू-सेवा न वापरणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे.
त्यामुळे नक्की कुणाचा उद्देश आणि तो सफल झाला का विफल, याचे निष्कर्ष काढण्याआधी बऱ्याच लोकांचे बरेच उद्देश आहेत, आणि ते निरनिराळे आहेत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
लेखाच्या सारांशवाक्यात मुद्दा स्पष्ट केलेला दिसतो, तो फेल नाही
लेखाचे सारांशवाक्य येणेप्रमाणे :
एथिकल पॉर्न लोकांची आवडनिवड बदलायचा आटापिटा करत नाहीये. पण लोकांना हवी असलेली करमणूक त्यांच्या मूलभूत चांगुलपणाशी तडजोड न करता पाहायला मदत नक्कीच करतंय. अन् हेही नसे थोडके.
यावरून लेखकाची भूमिका कळते की तीच आवडनिवड पुरवणारी हवी असलेली करमणूक पाहायच्या पर्यायांपैकी हे आहेत :
(पर्याय) मूलभूत चांगुलपणाशी तडजोड करणारी
(पर्याय) मूलभूत चांगुलपणाशी तडजोड न-करणारी
लेखाचा उद्देश दोन चांगुलपणा-तडजोड पर्यायांपैकी एक निवडण्याबाबत आहे. त्यावरील छत्र धरणारा विषय "आवडनिवड/हवी ती करमणूक" यात "तडजोड/तडजोड-नाही/बदल" हा लेखाचा उद्देशच नाही, कारण "बदलायचा आटापिटा नाही" असे स्पष्ट केलेले आहे.
लेखकाची धारणा आहे की मूलभूत चांगुलपणा असा काही असतो (ते स्वयंस्पष्ट मानून युक्तिवाद आहे). लेखकाचे हे गृहीतक मान्य केला समजा. मग आवडीनिवडीबाबत काहीच फरक नाही, अशा दोन पर्यायी वस्तूंपैकी चांगुलपणाशी सुसंगत अशी वस्तू व्यक्ती निवडू शकेल. हा मुद्दा आहे, तो फेल नाही.
मला सुरुवातीचे काही परिच्छेद
मला सुरुवातीचे काही परिच्छेद वाचून असं वाटलं की पॉर्नसाठी "मठ्ठ" "कोरडं" "संवेदनारहित" वगैरे शब्द वापरून लेखिकेला पॉर्न अधिक इमोशन सेंट्रिक असावं असं वाटतंय का?
तसं असेल तर पॉर्न वेबसाईट्सवर गुलाबी रंगाचे स्त्रियांसाठी वापरण्यात येणारे चिन्ह वापरून रोमँटिक पॉर्न उपलब्ध असते. पण मला सेक्स म्हणजे प्रेम किंवा हळुवारपणा असावा ही अपेक्षा पटत नाही. लोक लैंगिक गोष्टींकडे त्यांच्या जडण घडणीच्या चष्म्यातून बघत असतात. पण आपल्या लैंगिक इच्छेचे मूर्त स्वरूप जसे आहे, किंवा आपल्या फँटसी जश्या असतात तसेच पॉर्न असावे ही अपेक्षा मला टोकाची वाटते. दोन (किंवा अधिक) व्यक्तींमध्ये सेक्स ही एकच देवाणघेवाण असू शकते. त्यासाठी त्यांनी प्रेमात असायची, त्यांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर असायची काहीच गरज नाही. त्यांनी फक्त एकमेकांच्या सेक्ससाठी असलेल्या होकाराचा किंवा नकाराचा आदर करावा हा एकच एथिकल मुद्दा मला महत्वाचा वाटतो. आणि अर्थातच चाईल्ड पॉर्नची निर्मिती न होणे. पण ते कुठेही लीगल नाही. तरीही त्याची निर्मिती होते ही आपल्या समाजातली विकृती आहे.
कंसेंटिंग ऍडल्ट आपल्या लैंगिक गरजा कशा पूर्ण करतात तो पूर्णतः त्यांच्या प्रश्न आहे. आणि पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जशी मागणी आहे तसेच व्हिडीओ तयार केले जातात. किंबहुना ती एकमेव अशी जागा आहे जिथे सगळ्या प्रकारच्या देहयष्टीच्या, एथनिसिटीच्या, तसेच वायाच्याही "कॅटेगरी" उपलब्ध असतात कारण तशी मागणी प्रेक्षकांकडूनच होत असते. जरी ते वर्गीकरण सेक्सिस्ट, रेसिस्ट असले, कारण ते तसे असतेच, तरी जाहिरातींमध्ये आणि मेनस्ट्रीम सिनेमामध्ये मानवी देहाच्या सौंदर्याबद्दल असलेले एकसूरी ठोकताळे पॉर्नमध्ये बघायला मिळत नाहीत. आणि हे खऱ्या जगात लोकांना काय आकर्षक वाटतं याचंच प्रतिबिंब आहे. तसंच दोन कंसेंटिंग ऍडल्ट असतील तर "डॉमिनंट" "सबमिसिव्ह" वगैरे रोलप्ले करणे यातही काहीही गैर नाही किंवा तसा अभिनय असलेले पॉर्न बघणेही. इथे महत्वाचा कन्सेंट आहे. आणि ज्या वयात मुलं लपून छपून पॉर्न बघू लागतील त्या वयात त्यांना, यातलं काही करून बघायचं असेल तर समोरच्या व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीला स्पष्ट होकार असणे गरजेचे आहे असे पालकांनी सांगायला हवे.
मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं. की लग्न, संसार, पोरंबाळं या स्थित्यंतरातून पुढे जात असताना लोक अधिकाधिक काँझर्व्हेटिव्ह होऊ लागतात. आपल्याला मूल असलं की जग अधिक हळुवार असावं, त्यांचा निरागसपणा टिकावा ही अपेक्षा भावनिक दृष्टिकोनातून मी समजू शकते, पण १४-१७ वर्षांच्या मुलांनी उत्सुकतेपोटी आंतरजालावरच्या पॉर्नकडे वळणे यातही मला काही गैर वाटत नाही. मुलं मोठी होणारच कधीतरी. आपल्या आधीची पिढी चोरून पुस्तकं वाचायची आणि वाचता वाचता मनात त्याचा सिनेमा तयार करायची. इथे सिनेमा आयता मिळतो आणि ढिगाने सिनेमे उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचा एकूण परिणाम कमीच होत असावा असं मला आता वाटायला लागलं आहे.
अर्थातच पॉर्न स्टार्सना एथिकल वागणूक मिळावी याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि त्यांना समाजातही दुटप्पी दुय्यम वागणूक मिळू नये. या संदर्भात मला सनी लिओनीची एक मुलाखत आठवते. https://www.youtube.com/watch?v=bQjYVRJft8k
ही मुलाखत ज्या पद्धतीनं घेतली आहे ती पाहून मला पॉर्न बघणं जास्त पवित्र वाटलं होतं. आणि यात भारतात एकूणच सेक्स या विषयाबद्दलच किती औदासिन्य आणि स्टिग्मा आहे हे दिसून येतं. तसं असायची खरंच गरज आहे का?
एथिकल पॉर्न- ही संकल्पना
एथिकल पॉर्न- ही संकल्पना उत्तम वाटली.
अंगावर येणारे जबरदस्त ह्युमिलिएटींग पॉर्न, स्त्रिया रडत असताना त्यांच्यावर होणारा बलात्कार, भुकेने, अंगाची काडी झालेल्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत केलेले चाळे , अतोनात ड्रग्ज देउन केलेले बलात्कार, चाइल्ड पॉर्न, हे सारे भयानक प्रकार नजरेस चुकून पडलेले आहेत. यापुढे आधी क्लिप खालील, कमेंटस वाचूनच पॉर्न बघते.
खरं तर कामभावना मारायची असेल तर पॉर्न पहावे असे मत झालेले आहे. यांत्रिकी, भावनाशून्य अभिनयरहीत पॉर्नने खरं तर इच्छेवरती पाणीच पडतं. त्या मानाने शुंगा पेंटिग्ज, काही इन्टिमेट कविता, सेक्स स्टोरीज आणि पिन अप गर्ल्स हझार पटींनी जास्त कामोत्तेजक वाटतात.
एथिकल पॉर्न या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा आहे.
दुसऱ्याचा सेक्स बघून उत्तेजीत होणे
पॉर्न म्हणजे सेक्स व्हिडिओ मग त्याला काही ही नाव ध्या.
मुळात दुसऱ्याचा सेक्स बघून उत्तेजीत होणे हीच एक विकृती आहे..
सेक्स कोणाला शिकवावा लागत नाही तो नैसर्गिक आहे.
जसे मुलांनी जन्म घेतला की दूध पिणे त्याला शिकवावं लागत नाही तसे सेक्स हार्मोन्स कार्यान्वित झाले की सेक्स कसा करावा हे कोणत्याच प्राण्याला शिकवावे लागत नाही .
अती उत्तेजन ह्याचा अर्थ अर्धवट अपूर्ण सेक्स हा आहे.
आणि स्व भवणेनी एकत्रित मन करून केलेला सेक्स हा खूप आनंद देणारा आणि powerfull sex असतो
पॉर्न हा उद्योग आहे आणि त्या साठी पॉर्न चे प्रकार
जबरदस्ती नी करून तसे विभाजन केले तरी अर्थ आणि परिणाम बदलत नाहीत.
ह्तर नेमका काय फरक आहे एथिकल
ह्
हे ठीकच आहे, नव्हे उत्तमच आहे- परंतु एंड यूजरला याद्वारे मिळणारा अनुभव नक्की कसा वेगळा असेल ते स्पष्ट होत नाही.
म्हणजे पोर्नमधले कलाकार सुखी इ. ठेवलेले असोत. जे दिसणार त्यात आणि नेहमीच्या व्हिडिओत कसा फरक पडतो हे स्पष्ट झालेलं नाही. पडद्यावर जर पुरेसा फरक दिसत नसेल तर बाकी गोष्टींचा रिलेवन्स कसा ते कळत नाही.
अर्थात इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणे इथेही "कामगारांचा" आदर करणे हे आवश्यक आहे यात दुमत आजिबात नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की हे सर्व सांभाळल्यामुळे एंड रिझल्टात नक्की काय अन किती फरक पडतो. बाकी काही नाही.