संपादकीय - नका गडे सारखंसारखं सिरीयस घेऊ!!!

संकल्पना

संपादकीय -नका गडे सारखंसारखं सिरीयस घेऊ!!!

- चिंतातुर जंतू

मराठी माणूस आजकाल ज्या प्रकारे व्यक्त होतो आहे ते पाहता आमच्या शंकेखोर मनात एक शंका सारखीसारखी उसळत असते : साला ही मराठी माणसं स्वतःलाच इतकं सीरियसली का घेतात बुवा? म्हणजे बघा ना, अवनी नावाची एक नरभक्षक वाघीण दिवसाढवळ्या मारली जावो किंवा आपल्या अरुणाताई (आणि त्यासुद्धा दिवसाढवळ्याच) संमेलनाध्यक्षपदी निवडल्या जावोत, साला सोशल मीडियावरच्या सदाजागृत सिटिझनांपासून ते म.टा.-लोकसत्तात पहुंच असलेल्या ‘नेटिव्ह ओपिनियन’कारांपर्यंत सगळे सारखेसारखे सीरियस होतात, बाह्या सरसावतात आणि आपापल्या लेखण्या किंवा कळफलक बडवू लागतात! आणि मग फेसबुकापासून ते रविवार पुरवण्यांच्या ऑनलाईन आवृत्त्यांपर्यंत जिथेजिथे हात मारता येईल तिथेतिथे बाकीचे सगळे सदाजागृत सदासीरियस त्यावर तितकेच सीरियसली बाह्या सरसावून तऱ्हतऱ्हेच्या लायका-स्मायल्या-कमेंटा हाणू लागतात. छे, साला केटली सीरियस परिस्थिती छे ने!

मग डोकं थोडं खाजवता असं जाणवलं की आपण (पक्षी : मराठी माणसानं बरं, आम्ही नव्हे त्यातले…) हे आपल्या हातांनी करून घेतलं आहे, असं म्हणण्याची हीच ती वेळ आणि हीच ती जागा (पक्षी : ऐसी अक्षरे, दिवाळी अंक वगैरे). आणि त्याच दोघींना दिमतीला घेऊन (पक्षी : जागा, वेळ) म्हणायला हवं की लोकहो, आज ह्या इथे ह्या ठिकाणी आपल्या ह्या महाराष्ट्री समाज नावाच्या गुंतागुंतीच्या एन्टिटीला कशाची गरज असेलच, तर ती स्वतःला सारखंसारखं सीरियसली घेणाऱ्या (पक्षी : स्वसासासी) माणसांची नव्हे, तर राखी सावंतांची! होय होय, हे आम्ही सीरियसली आणि शुद्धीत म्हणतो आहोत. बोलायला विषय कोणताही असो, आणि त्यात चश्मा जरी लावलेला असला, तरीही ह्या महनीय अक्काबाई (पक्षी : ज्यांचा फेरा येतो अशा) आपण उदाहरणार्थ, कुणी विदूषी किंवा देश की दीदी वगैरे असल्याचा अज्जिबात आव आणत नाहीत; उलट, त्या सीरियस आहेत अशी शंका कुणाला स्वप्नातही येऊ शकत नाही. केवढं कर्तृत्व आहे हे! पण आपण (पक्षी : म. मा. ब. आ. ना. त्या…) इतके कर्मदरिद्री आहोत की बिचाऱ्या राखीताईंना आपण निव्वळ हसण्यावारी नेतो. ह्या व्हिडिओतला पहिल्या मिनिट-दीड मिनिटाचा ऐवज (हो! महाराष्ट्र देशाचा ऐवजच आहे तो!) जरी पाहिलात तरी तुम्हाला खातरी पटावी. आणि राखीताईंव्यतिरिक्त आणखी कुणाची गरज असलीच तर ती ह्या ट्रम्पतात्यांची -

कारण त्यांच्या बाबतीतही हेच म्हणता येतं (पक्षी : ते. सी. आ. अ. शं. कु. स्व. ये. श. ना.) (त्यातच, जेंडर इक्वॅलिटीवर आमचा विश्वास नसल्याची मालकीणबैंना शंका जरी आली, तरी आमची नोकरीच जाईल. त्यामुळे मांजर पाळली नाही तर किमान सेक्स रेशो तरी पाळायलाच हवा.) (मुखपृष्ठाविषयी आणखी स्पष्टीकरण मिळणार नाही. मागितल्यास जो अपमान होईल त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. हुकुमावरून.)

आता स्वतःला सीरियसली न घेण्याची सामाजिक-बौद्धिक-सांस्कृतिक-आर्थिक समकालीन गरज एकदा मान्य केलीये तर श्रीगणेशा स्वतःपासूनच करावा म्हणून आम्ही गेलो नंदा खऱ्यांकडे. आमच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या थीमची खिल्ली उडवताना ते पूर्वीच भर चौकात सापडले होते. त्यामुळे त्यांना म्हटलं तेच करा, म्हणजे आमच्याकडे एरवी ढुंकूनही न बघण्याचा आव आणणारे आणि स्वतःला सारखंसारखं खूप सीरियसली घेणारे काही असंतुष्ट आत्मे जरी तुष्ट झाले नाहीत तरी किमान तुंदिलतनू विघ्नकर्ता गणेश (मतकरी नव्हेत, ते जिम-टोन्ड आहेत.) हे ऐसीवंदन स्वीकारेल. आता गणरायाला नर्तन जरी करायला लावलं नाही तरी त्याचं मनन केल्या केल्या आम्हाला अर्थात आठवली ती थिएटर अॅकॅडमी (आ. स्प. मि. ना. मा. जो. अ. हो. त्या. ज. आ. घे. ना. हु.). आणि तेवढ्यात वार्ता कानावर आली की साक्षात महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आता जन्मशताब्दी आहे! अर्थातच हे ओघानं आलं, की पुष्कळसे स्वसासासी लोक त्या निमित्तानं ह्याच नव्हे तर सर्व ठिकाणी, तेदेखील म.ला.व्य.च्या नखाचीही सर त्यांना नसताना आणि प्रतिभेची तर प्रतीक्षाही न करता आपल्या लेखणीला आणि इतर बऱ्याच गोष्टींना मोले (किंवा अमोले) स्रवाया घालणार आहेत. थोडक्यात, ज्यानं स्वतःला कधी सीरियसली घेतलं नाही अशा म.ला.व्य.ची वर्षभरात किती थट्टा होणारे विचार करा! मग ज्या टी.ए.नं म.ला.व्य.च्या हयातीत आणि सपत्नीक (इथे कराल स्मायली कल्पावा) उपस्थितीतच त्यांच्या शब्दाशब्दाला सीरियसली न घेण्याचं धारिष्ट्य करून स्टेजवर ‘तीन पैशांचा तमाशा’नामक जी प्रगाढ आणि सघन पण सीरियस वगैरे टवाळी केली ती आमच्यातल्या काही सी.सिं.ना आठवली (स्वसासासी नव्हे; सीनियर सिटिझन). त्यातच ‘तमाशा’ला चाळीस वर्षं झाल्याचं निमित्त झालं (निमित्ताच्या निमित्तानं आज ह्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्राच्या आणखी एका लाडक्या व्यक्तिमत्वाच्या, पक्षी : बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फेमस शब्दप्रयोगाची आठवण येते आहे, पण ते असोच.) त्यामुळे टी.ए.मधले एक आद्य टवाळटोळ चंद्रकांत काळे ह्यांना आमच्यावर मेहेरनजर करण्याची विनंती केली आणि त्यांनी तिला मान दिला.

अशानं आम्ही जरा हुश्श करणार तोच आमची एक घोर मिस्टेक आमच्या लक्षात आली. ‘ऐसी अक्षरे’च्या अंकांचं बौद्धिक वजन हा काही विशिष्ट स्वसासासी मान्यवरांमध्ये चर्चेचा विषय असतो ह्याची कुणकुण आम्हाला लागलेलीच आहे. ह्या उपक्रमात सामील होण्यासाठी मग विनोदाला सीरियसली घेणाऱ्या काही पब्लिक इंटेलेक्चुअल्सना खाजगीत खाणाखुणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यातच, आता आम्हाला वाटू लागलं की ह्या स्वसासासी प्रवृत्तीचे धोकेही आमच्या वाचकांपर्यंत पोहोचायला हवेत. आमच्यापैकी काहींचं फ्रेंचप्रेम जगजाहीर असल्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीत झालेल्या स्वसासासी प्रयोगांबद्दलच्या एका नाटकावर वसंत आबाजी डहाकेंनी लिहिलेला एक लेख इथे आम्हाला उपयोगी पडला. राजीव नाईकांनी आमच्या विनंतीखातर तत्परतेनं आपली एक कविता देऊ केली. संजीव खांडेकरांनीही हा चॅलेंज स्वीकारला आणि झिझेकच्या मांडीला मांडी लावून ते शड्डू ठोकून सरसावले (मिक्स्ड मेटॅफर? आम्हाला माहीत्ये, पण post-modern interdisciplinary खांडेकर ह्या मि.मे.साठी किती सक्षम आहेत ते तुम्हाला माहीत नाही, एवढंच ह्या ठिकाणी सांगून आम्ही खाली बसतो). त्या निमित्तानं स्वसासासी मालिकेतल्या दुसऱ्या एका क्रांतीच्या सावलीतल्या देशांमधून काही व्यंगचित्रं आणि एक विनोद अंकात प्रविष्ट झाला. (आमचं इस्टर्न-ब्लॉक देशांवरचं प्रेम जगजाहीर नसलं तरी १९८९नंतरदेखील धडधाकट आणि फोफावतं आहे, हे सुज्ञांस कळलं असेलच.)

आमच्या सगळ्याच लेखकांचं आमच्यावर असलेलं प्रेम आम्हाला कितीही जरी भरीला घालत असलं तरी घाबरू नका, अंकातल्या चाळीसेक लेखांची आज ह्या ठिकाणी ह्या निमित्तानं ह्या संपादकीयात वर्णी लागणार नाहीए. कारण, अंकातले लेख अंकाच्या विषयाला किती साजेसे आहेत आणि नसले तरी किती चांगले आहेत ह्याचं आ. स्प. मि. ना. मा. जो. अ. हो. त्या. ज. आ. घे. ना. हे म्हणण्याची आम्ही केवळ संधी शोधत होतो.

तर ते असो, सांगायचा मुद्दा हा की ह्या स्वसासासी समूहापासून सावध राहा, रात्र - आणि दिवसही - वैऱ्याचे असतीलही - किंवा नसतीलही - तरी ह्या लोकांमुळे ते बोअरिंग होत आहेत हे मात्र नक्की. आणि २०१९तर जवळच आलं आहे. सरकार कुणाचंही येवो, जोवर आपल्या राखीताई ह्या स्वसासासी चळवळीविरोधात उभ्या आहेत तोवर जीवनाला (गहन नसेल, पण) अर्थ आहे, महाराष्ट्राला (उज्ज्वल नसेल, पण) भवितव्य आहे, किंवा (म.ला.व्य.ला बहुधा आवडता) वूडहाऊस म्हणत असे तद्वत,
God's in his heaven —
All's right with the world!…

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

तक्रार करणार होते. पण जेंडर ब्यालन्स आणि मांजर हे कीवर्ड आल्यामुळे सोडून देत्ये. किती टवाळटोळकी खपवून घ्यायची याला मर्यादा आहेत, हे विसरू नका!

मी बघत्ये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बघून घेईन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आख्ख्या दिवाळी अंकात ( आतापर्यंत वाचलेल्या लेखांत) ऐसीवर ज्यांची आणि ज्यांचे कैवारींची टिंगलटवाळी केली जाते त्या मराठी _मध्य_वर्ग ( पक्षी : ममव) यांचा उल्लेख न होणे खपवून घेतले जाणार नाही. ( पक्षी : सुषमा स्वराज अशी तंबी सतत देत असतात.) नंतर पंतप्रधानही " करारा जबाब दिया जायेगा" हे वेळोवेळी एक बोट नाचवून सांगतात.
जंतूबाब, तुम्हीही वेळीच एखादी कृती/ वाक्य आत्मसात करावे लौकर. वाक्यावाक्यांमधून सात्विक संताप दिसत आहे. एकदोनदा अभिषिक्त सम्राटाच्या मांजरीच्या शेपटाआडून टिका केली आहे.
आता राखी सावंतएवढा धीटपणाचे कौतुक ओसंडून वाहिले आहे. तरी मंदिरा बेदीही यावी. पण तिने हिमाचलमध्ये ट्रक चालवण्याचे कठीण आव्हान पेलून मनगट आणि मेंदूची क्षमता सिद्ध केली आहे॥

बाकी "स्वतःला सारखंसारखं सीरियसली घेणाऱ्यां"साठी स्वतःला_सारखंसारखं _सीरियसली_ घेणारे असा शब्द बरा दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वूडहाऊस म्हणत असे तद्वत,
God's in his heaven —
All's right with the world!…

ब्राउनिंग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ब्राउनिंग?

मूळ काव्य त्याचं, पण ह्या वाक्यांशाचं पुनःपुन्हा उद्धरण करून ब्राउनिंगला नाममात्र ठेवण्याची बेहद्द किमया साधलेला मात्र वुडहाऊस. Smile

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ही. जी. इ.ग.ज.आ.का.रा.
भ.मू.हो.ना.ए.तू.हो.ज्या.
या आणि असल्या अस्त्रांमुळे, संपादकीय वाचताना आमचा मेंदू भंजाळला. याच्यापुढे न.बां.च्या तळटीपा वाचणे देखील जास्त सोपे वाटू लागले आहे!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते आपलं संपादकीय लोकांनी नीऽऽट वेळ देऊन वाचावं आणि टीएल्ड्यार करु नये म्हणून केलेली क्लृप्ती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मला जे लेख आवडतात, ते साधारणतः अशाच प्रकारचे असतात. लेखाकडे नजर टाकली आणि समजलं काय सुरू आहे, तर मग 'हूं' (श्रेय : तिरशिंगराव) अशी प्रतिक्रिया आपसूक येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सम्पादकीय झेपले नाही ब्वा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचताना मी ब्राऊजरचं सर्च फंक्शन वापरलं. एकदा डँबिसपणा समजल्यावर मग समजण्यासाठी पुन्हा वाचलं.

स्वसासासी = स्वतःला सारखेसारखे सिरीयली घेणारे
म. मा. ब. आ. ना. त्या… = मराठी माणसानं बरं, आम्ही नव्हे त्यातले…
ते. सी. आ. अ. शं. कु. स्व. ये. श. ना. = त्या सीरियस आहेत अशी शंका कुणाला स्वप्नातही येऊ शकत नाही.
टी.ए. = थिएटर अकॅडमी
म.ला.व्य = महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व
आ. स्प. मि. ना. मा. जो. अ. हो. त्या. ज. आ. घे. ना. हु. = आणखी स्पष्टीकरण मिळणार नाही. मागितल्यास जो अपमान होईल त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. हुकुमावरून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वसासासी = स्वतःला सारखेसारखे सिरीयली घेणारे

१. अश्लील, अश्लील!
२. काहीकिंचित द्विरुक्ती (सारखेसारखे आणि सिरीयली)
३. 'अशी ही बनवाबनवी'मधल्या त्या झाडाला काय वाटत असेल? तेच ते, 'सारखं सारखं'वालं
४. एकता कपूरच्या आत्मचरित्राला हे 'टायपो छे' वाक्य शोभेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुणाचा गं माझा मुद्रितशोधक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचवा = वाचताना चुकल्यासारखं वाटणे.

असे काही चपखल शब्द शोधण्याची मोहीम सुरू करावी हा संपादकांचा उद्देश असावा.
इंग्रजीत आद्याक्षरांवरून सुटसुटीत लक्षात राहणारा शब्द तयार होतो तसा मराठीत होणे जरा जड जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0