सध्या काय वाचताय? - भाग २७
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
फायरफॉक्सनंही स्वतःची 'रेकमेंडर सिस्टम' सुरू केलेली दिसते. त्यात उद्वेगाबद्दल (anxiety) हा लेख सापडला.
The usefulness of dread
लेखाची सुरुवात जशा प्रसंगांतून होते, तसेच प्रसंग मी अनुभवले आहेत; तपशिलांत बारके फरक आहेत एवढंच. लेखक ज्या anxietyबद्दल सुरुवातीला बोलतो, तसा माझा स्वभावही नाही. त्यामुळे लेख समजणं आणखी कठीण वाटलं. पण लेखातला हा भाग अगदी पटला -
... I found myself drawn to philosophical theories that assured me there was no meaning or value to life save the ones we gave it, ones that told me there was no predetermined purpose to my existence. To believe that there was a final end to my life, a purpose, a destination, an intended teleology, was to be infected with an anxiety that I was not fulfilling my purpose in life, that I was ‘wasting’ my life. That anxiety could be relieved only by convincing myself that this life was purposeless, that I could never snatch defeat from the jaws of victory. Curiously enough, this thought was more sustaining than airy directives for how to seek out the Truth about Reality and the Being that underlay it.
मला तसं वाटत नाही.
माझ्या आकलनानुसार लेखात उद्वेगाचं उदात्तीकरण नाही; आपल्याला नैसर्गिकतः उद्वेग येतो आणि स्वभाव बदलता येत नाही, त्यामुळे त्या उद्वेगासोबत राहायला शिकणं; आपण आहोत तसे मान्य करणं आहे. लेखातली भाषा मात्र कविता लिहिल्यासारखी आहे, त्यामुळे ते उदात्तीकरण वाटू शकतं.
न्यू यॉर्करमधली कथा - Seeing Ershadi
ही कथा मला फारशी झेपली नाही. जंतू, आबा, चिपलकट्टी किंवा आणखी कोणी मदत करणार का?
'Richard Bach's book' "A Gift of Wings"
I have started reading 'Richard Bach's book' "A Gift of Wings".
पुस्तकांबद्दलचा एक सुंदर विचार जो माझा आतापर्यंत लाडका होता, त्याला स्पर्धा करणारा Richard Bach यांच्या पुस्तकातील एक सुंदर विचार आज मला सापडला.
So far my most favorite quote about books was by sarah ban breathnach-
A passionate woman, I like my men and books to knock my socks off. It's got to be love at first site.I need to be bowled over by an author's insight to wonder how I lived before the book explained it all to me, or how the author knew me so well. - sarah ban breathnach
Today my most favorite quote is -
The only time, I can write is when some idea is so scarlet-fierce that it grabs me by the neck and drags me thrashing and screaming to the typewriter. I leave heel marks on the floors and fingernail scratches on the wall, every inch of the way. - Richard Bach
________________________
Few other nice quotes -
It took me to learn that the hard thing about writing is, to let the story write itself, while one sits at the typewriter and does as little thinking as possible.
_____________
When I decided at last that I didn't care what the book publisher wanted and that I didn't care what I wanted and that I was just going to go ahead and be naive and foolish and forget everything and write, that is when the story opened its eyes and started running around.
I am a troll
वाचायला घेतलंय : I am a troll लेखिका : स्वाती चतुर्वेदी .
सुरवात केल्यावर लक्षात आलं की यातील निम्मं जरी खरं असलं तरी फार भयानक आहे .
माझी अशी इच्छा आहे की निदान ढेरेशास्त्री, आचरट बाबा आणि अरुणराव जोशी यांनी तरी हे पुस्तक वाचावं आणि त्याचं खंडन करावं ( म्हणजे आमच्या जिवंत जीव येईल )
बैंनी केवळ एकाच बाजुचे गुणगान
बैंनी केवळ एकाच बाजुचे गुणगान (!) केले आहे.
डाव्यांनी आणि (स)माजवाद्यांनी गेली शतकभर जो धिंगाणा इतिहासात आणि राजकारणात घातलेला आहे त्याला प्रतिक्रिया येणारच होती. अंमळ उशीर झाला. एकानेच मारायचे आणि दुस-याने मरायचे अशी अपेक्षा ठेवण्यात चुक नाही पण तसे घडेलच असे नसते हे बैंना कळायला हवे.
एकांगी लेखन बैंनी केले आहे. फारसे मनावर घेऊन त्रास करण्यात अर्थ नाही.
खंडन करायला पुस्तक वाचावसं
खंडन करायला पुस्तक वाचावसं वाटलं नाही पण हे रोचक आहे.
The most troubling part of Chaturvedi's book is its crux, which is primarily based on one source, and someone who does not inspire much confidence. Khosla, who gives Chaturvedi an insiders' perspective into the BJP's social media unit, comes from a family with a long association with the Congress, as Chaturvedi writes.
इथुन.
https://www.huffingtonpost.in/2016/12/28/why-swati-chaturvedis-book-on-…
सो हे पुस्तक काय असेल याचा अंदाज येतो आणि ते वाचण्यात वेळ घालवावासा वाटत नाही.
पुस्तक आणि परिचय
हे पुस्तक काय असेल याचा अंदाज येतो आणि ते वाचण्यात वेळ घालवावासा वाटत नाही.
पुस्तक मीदेखील वाचणार नाही. मात्र, तुम्ही ज्या पुस्तक-परिचयाचा दुवा दिला आहे त्यातून काही वेचे उद्धृत करतो -
From threats of sexual violence to murder, the weapons of the troll army are many and flashed without any impunity. Chaturvedi painstakingly lists the most popular of these handles that regularly tweet out filth with some of whom she's had close encounters online. Police complaints and reporting on Twitter have yielded precious little. Shockingly, dozens of these handles continue to be followed by Prime Minister Narendra Modi, in spite of being made aware of the nature of their activities online.
हे तुम्हाला मान्य आहे ना ढेरे?
By compiling various instances of public misdemeanour by politicians like Smriti Irani and Giriraj Singh as well as the overt support of BJP leaders for trolls who attack critics of the ruling government, Chaturvedi shows the organised and strategic thinking that goes into running political campaigns online.
हेही तुम्हाला मान्य आहे ना ढेरे?
what surprised me most is Khosla's apparent naiveté. The realisation that the BJP is not exactly fond of Muslims dawned on her much belatedly, she says.
हे परिचयकार ज्याला नाईव्ह म्हणताहेत, तो मूळ मुद्दा (भाजपचं मुस्लिमप्रेम) तुम्हाला मान्य आहे ना ढेरे? म्हणजे तुम्हाला पण लेखिका नाईव्हच वाटते आहे ना?
When Chaturvedi gets to the trolls proper or the top bosses who run the BJP's social media unit with the help of the RSS, their statements do not confirm any fact that we already don't know or can't imagine for ourselves (this is particularly true for the trolls, most of whom are anonymously interviewed and studies in every cliché in the rulebook of regressive thinking)
Chaturvedi also appears to present familiar information -- such as BJP paying its online foot soldiers to tweet and troll on social media or has bots doing the job -- with great aplomb, as though these are new findings, when that's really not the case.
पेड ट्रोल्स आणि बॉट्सचं अस्तित्वही तुम्हाला (ह्या परिचयकर्त्याप्रमाणेच) मान्य आहे ना ढेरे? थोडक्यात, ह्या सर्व गोष्टी घडतात हे इतकं उघड आहे, की ते कळून घेण्यासाठी पुस्तक वाचण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही, हे मत तुम्हाला मान्य आहे ना ढेरे?
हा हा हा. भाजपाचा आयटी सेल
हा हा हा. भाजपाचा आयटी सेल अस्तित्वात आहे ( खरं तर सर्वच मोठ्या पार्ट्यांचे आहेत. ) आणि ते सो.मि. वर भाजपाचा ऑर्गनाइज्ड/पेड प्रचार करतात हे मला मान्य आहे.
पण पण सो.मि वर शिविगाळ करणारे लोक यांना पैसे देउन ठेवले आहेत याला पुरावे हवेत. अमुक अमुक क्यांपेनसाठी भाजपाने या या लोकांना इतके-इतके पैसे दिले असे क्लेम असायला हवेत. वरील रिव्यु वाचुन पुस्तक ॲनेक्डोट्सने भरलेले आहे असं वाटतं.
सानेगुरुजींची फेव्हरीट लिस्ट आलीये
जबरदस्त लिस्ट आहे थोडा है थोडे की जरुरत है
Marx’s Concept of Man-----Eric Fromm
Economics of Feasible Socialism-----Alec Nove
Marxism After Marx----- David MacLelan
Anarchism------David Miller
Cartesian Meditations------Edmund Husserl
Habermas & the Dialectic of Reason----David Ingram
The Philosophical Discourse on Modernity---Jurgen Habermas
Freedom & Nature-----Paul Ricour
Anarchy State & Utopia------Robert Notzick
Libertarianism Defended----Tibor Machan
Sapiens & Homo-Deus-----Yuval Noah Harari
Enlightenment Now----Steven Pinker
Spirituality without Religion------Sam Harris
Intuition Pumps & Other Thinking Tools-----Dan Dennete
The Selfish Gene-----Richard Dawkins
A Theory of Justice---- John Rawls
द मेकिंग ऑफ एक्साईल , सिंधी हिंदूज अँड पार्टीशन ऑफ इंडिया
द मेकिंग ऑफ एक्साईल , सिंधी हिंदूज अँड पार्टीशन ऑफ इंडिया . लेखिका नंदिता भवनानी.
फाळणी बद्दल बरीच पुस्तके आहेत, काही चित्रपट असावेत . सगळं वेलडॉक्युमेंटेड आहे असा निदान माझा समज होता. आणि तो चूक होता.
सिंध प्रांत , त्यातील फाळणीपूर्व परिस्थिती , फाळणीनंतर ची परिस्थिती आणि तिथून सगळं सोडून आलेल्या समाजाबद्दल अभिनिवेशविरहित भाषेत लिहिलेले हे पुस्तक अतिशय आवडले. हे सगळं आपण वाचलेल्या (पंजाब व बंगाल) मधील फाळणी वेळच्या परिस्थिती पेक्षा खूप वेगळे आहे.
जरूर वाचावे .
आता कबुली :
१. माझे संपर्कात आलेल्या सिंधी मंडळींबद्दल फारसेसे बरे मत नव्हते.
२. अजिबात माहिती नसताना कुणाहीबद्दल घाऊक भावात बरेवाईट मत बनवणे चुकीचे.
हे सर्व मला हे पुस्तक वाचल्यावर (पुन्हा एकदा) जाणवले.
मत बनवणे
माझे संपर्कात आलेल्या सिंधी मंडळींबद्दल फारसेसे बरे मत नव्हते.
२. अजिबात माहिती नसताना कुणाहीबद्दल घाऊक भावात बरेवाईट मत बनवणे चुकीचे.
याबाबतीत माझा अनुभव सांगतो. एकूणच सर्वसामान्य मराठी माणसाचे सिंधी व गुजराती लोकांबद्दल चांगले मत नसते. कित्येकदा त्यांच्याबद्दल कुचेष्टेचे आणि टीका करणारे उद्गार काढले जातात. मी जेंव्हा गुजरातमधे नोकरीस गेलो, तेंव्हा मला फार चांगला अनुभव आला. तसेच, मुंबईत असताना सिंधी लोकांशी जो संबंध आला तेंव्हा, फाळणीच्या वेळी त्यांनी जो त्रास सोसला, त्याची कल्पना आली आणि अंगावर शहारे आले.
घाऊकपणे असा कुठल्याही लोकांचा तिटकारा करण्यामागे, कित्येकदा अज्ञानच कारण असते.
आणि एवढे असूनही त्या लोकांचे सर्वसाधारण मराठी माणसाबद्दल चांगले मत असते. ते बिघडायला शिवसेनेसारखे जहाल लोकच कारण होतात.
अमृतसर , मिसेस गांधी'ज लास्ट बॅटल
सतीश जेकब आणि मार्क टली लिखित "अमृतसर , मिसेस गांधी'ज लास्ट बॅटल "
सतीश जेकब बीबीसी चे प्रतिनिधी होते. आणि ऑपेरेशन ब्लु स्टार च्या वेळी अमृतसरात होते. आंखो देखा हाल + Analysis ..
इंदिरा गांधींची हत्या व दिल्लीतील शिखांचे हत्याकांड .. हे सगळं
आत्ता वाचायला घेतलं आहे . दोन तीन दिवस रोचक वाचन होणार .. बहुधा .
आमचा बाप...
जाधवांनी संपादित केलेलं पुस्तक 'आमचा बाप आणि आम्ही' वाचलं आहे. त्यांचं संपादन अप्रभावी वाटलं. मात्र गेल्या १०-१५ जाधवांबद्दल वाचलेल्या बातम्या वगळून वाचण्याचे कष्ट केले तर पुस्तक अधिक प्रभावी वाटतं. पुन्हा एकदा, पुस्तक नरेंद्र जाधवांनी संपादित केलं आहे; ते त्यांतले एक लेखक आहेत.
एकापाठोपाठ एक वाचली दोन
एकापाठोपाठ एक वाचली दोन पुस्तकं , एकाच माणसा वर आधारित आणि त्याचं अगदी परस्पर विरोधी चित्र उभं करणारी. विरप्पन . चेसिंग द ब्रिगांड ... ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली अखेर विरप्पन मारला गेला त्याने लिहिलेलं आणि दुसरं आहे बर्डस, बीज अँड बँडीट...विरप्पन ने कीडनॅप केल्यामुळे त्याच्या गॅंगच्या ताब्यात असलेल्या दोन निसर्ग अभ्यासकांनी त्या अनुभवाबद्दल त्यांनी लिहिलेलं पुस्तक .
दोन्ही पुस्तकातील विरप्पन ची इमेज इंटरेस्टिंगली परस्पर विरोधी आहे .
ष्टोकहोल्म शिंड्रोम?
गवि शेठ , या पुस्तकात वीरप्पन बद्द्ल सहानुभूती , गुणगान वगैरे नाहीये. वीरप्पनने या मंडळींना चुकून किडनॅप केले होते ( हे कुणी लय वट वाले सरकारी आहेत अशी चुकीची माहिती मिळाल्याने ) हि मंडळी वीरप्पनच्या बरोबर फक्त १४ दिवस होती. हि मंडळी कुठल्याही शहरी सुविधा नसलेल्या अवस्थेत त्या जंगलात राहत होती स्वतः निसर्ग अभ्यासाकरिता. त्यांना वीरप्पन हा एवढा इन्व्हिन्सीबल/ इल्युझिव्ह वाटला नसावा. जिथे कुठे यांना विस्मय वाटलेला लिहिला आहे तो वीरप्पन च्या जंगल स्किल्स बद्दल ( आता कुठल्याही विरोधी टीमच्या बॅट्समन ला विराट कोहली च्या कव्हर ड्राइव्ह बद्दल जो विस्मय /हेवा वाटेल असाच आहे तो ) त्याबरोबरच वीरप्पन च्या मर्यादा यांना चांगल्या दिसल्या. हे वाचल्यावर माझा तरी असा समज झाला की वीरप्पन चे वीरप्पन असणे (राजकीय पाठिंब्या बरोबरच ) त्या तीन राज्यांमध्ये विभागलेल्या अजस्त्र जंगलामुळे , आणि त्याच्या त्या जंगलाच्या ज्ञाना मुळे जास्त होते .
कुठेही वीरप्पन कसा चांगला , दयाळू , (खरं तर त्याचा दोष नाही ) वगैरे छाप विधानं या पुस्तकात नाहीत त्यामुळे मला स्टोकहोम सिंड्रोम वाटलं नाही .
वीरप्पन ने यापूर्वी फिल्लम स्टार राजकुमार ला किडनॅप केले होते शंभरांहून जास्त दिवस स्वतःबरोबर ठेवले होते . त्याच्या सुटकेनंतरच्या प्रतिक्रिया मात्र स्टोकहोम सिंड्रोम झाल्यासारखा होत्या.
हे पुस्तक वाचल्यावर आधीच चेसिंग द ब्रिगाण्ड हे आधीचे पुस्तक वेगळ्या कारणांनी अधिक इंटरेस्टिंग वाटले .
पुरंदरे!
माझी भाची बरोब्बर साडेतीन वर्षांची झाली तेव्हा तिच्यासाठी मी (ऐसीवरच शिफारस वाचून) माधुरी पुरंदऱ्यांची पुस्तकं घेऊन गेले होते. बाबाच्या मिशा, मुखवटे, पाहुणी, हात मोडला वगैरे. तिला मराठी अक्षरओळख नाही, मीच वाचून दाखवली. एका बैठकीत तिनं पाची पुस्तकं ऐकली, आणि पाचवं संपताक्षणी तिनं पहिलं पुस्तक पुन्हा माझ्या हातात दिलं, अजून एकदा वाचून दाखव म्हणून. थोड्या दिवसांनी ती त्यातली चित्रं बघून स्वतः गोष्टी रचून सांगायला लागली. दुसऱ्या साडेचार वर्षाच्या भाच्यालाही ही पुस्तकं प्रचंड आवडतात, रोज सकाळी त्याच्या आईला वाचून दाखवायला सांगतो.
हा धागा अवश्य पाहा: http://aisiakshare.com/node/2024
दोन नवी पुस्तकं
अक्षरओळख नसलेल्यांसाठी दिवाळीच्या मुहुर्तावर दोन नवी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत - हॅॅत्तेच्या!! आणि किती काम केलं!
चाहूल उद्याची
सुबोध जावडेकरांचं , 'चाहूल उद्याची' हे नवीन पुस्तक वाचलं. सर्वच विज्ञानकथाच नाहीयेत . त्यांतील काही सत्य घटनांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, 'अखेरची साक्ष' ही कथा सलमान खानच्या खटल्याशी मिळती-जुळती असल्याने फारच उदबोधक वाटली. पैशाने खटला जिंकता येतो, या सर्वसामान्य समजुती पलिकडे जाऊन, आधुनिक शोधांचा आधार घेऊनही एखाद्या प्रामाणिक माणसाची साक्ष, कशी बदलता येते, याचे सुंदर चित्रण आहे.
'मेंदूची बाळे' ही कथा देखील अतिशय नावीन्यपूर्ण वाटली. त्याशिवाय, ऑपरेशन राहत, नको विसरु , नियतीशी करार, रिसेट बटन या कथा विशेष उल्लेखनीय वाटल्या. जावडेकरांच्या नेहमीच्या शैलीतच सर्व कथा आहेत.
वेगळे प्रवास, अनोखे अनुभव
नुकतेच, 'वेगळे प्रवास, अनोखे अनुभव' हे श्रीकृष्ण सवदी यांचे पुस्तक वाचले. सवदी हे डिफेन्सचे ऑडिट करायचे. त्यानिमित्त, त्यांना आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागात प्रवास करावा लागला. त्यातील आलेले विविध अनुभव, त्यांनी वेगवेगळ्या मासिकांत प्रसिद्ध केले होते. त्याचे हे संकलन आहे. नक्षलवाद्यांशी समोरासमोर भेट झाल्यावर त्यांनी दाखवलेले प्रसंगावधान, हत्तीच्या पिल्लाने त्यांचा वाटाड्या म्हणून केलेले काम, आधुनिक द्रोपदीशी भेट आणि एकंदरच मनुष्य स्वभावाचे आलेले मासलेवाईक अनुभव वाचायला मजा येते. लेख लहान असल्यामुळे, बसल्या बैठकीला पुस्तक वाचून संपते.
राजेंद्र प्रकाशन, मुंबई, १४ ऑगस्ट २०१५.
Rebel Sultans: The Deccan
Rebel Sultans: The Deccan from Khilji to Shivaji
हे मनु एस पिल्लई यांचे पुस्तक वाचत आहे. जगरनॉट या प्रकाशन संस्थेच्या ॲपमध्ये एक महिन्यांकरीता चकटफू मिळाले आहे. खिलजीच्या देवगिरी स्वारीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटापर्यंतचा दख्खनचा इतिहास या पुस्तकातून मांडायला घेतला आहे. पट तसा खूप मोठा आहे पण तो कमी पानात बसवण्यात लेखक यशस्वी झाला आहे असे आता तरी वाटते. बॅटमॅनभौ जेव्हा वाचायला घेतील तेव्हा त्यांच्याकडून आणखी कळेल अशी आशा आहे.
Spy Chronicles , Raw ISI and the illusion of peace :
Spy Chronicles , Raw ISI and the illusion of peace :
रॉ आणि आय एस आय च्या माजी प्रमुखांच्या विविध ठिकाणी झालेल्या एकत्र चर्चांमधून तयार झालेलं पुस्तक. ( या सर्व चर्चांमध्ये लेखक /संपादक या दोघांबरोबर असतं )
आधीच सांगतो , कि वाचायला सुरुवात केल्यावर पहिला काही भाग माझा भ्रमनिरास झाला होता. दोष सर्वस्वी माझा होता . या दोन संस्था म्हणल्यावर मी काहीतरी चमचमीत / स्पाय स्टोरीज वाचायला मिळतील अशा अपेक्षेत होतो . हे असलं काहीही नाहीये यात .
पण जसजसा वाचत गेलो तसतशी मजा येऊ लागली .
" अखंड भारत " या संकल्पनेबद्दल थंडपणे ISI चा माजी मुख्य माणसाचे बोलणे वगैरे अनेक धक्कादायक गोष्टी यात आहेत . किंवा सर्जिकल स्ट्राईक मागची अगतिकता /गरज वगैरे अनेक अनेक गोष्टींवर चर्चा आहे .
भयंकर वाचनीय पुस्तक आहे .
The year of the hare
https://www.nytimes.com/2002/07/06/books/a-skewed-and-skewering-look-at…
'The year of the hare' हे एकदम नर्मविनोदी , मार्मिक नीरीक्षकाच्या दृष्टीतुन 'फिनलंडच्या एका लेखकाने' लिहीलेले पुस्तक वाचते आहे.
'
२०१८चा युवा साहित्य अकादमी
२०१८चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं नवनाथ गोरे यांचं 'फेसाटी' ही आत्मकथनात्मक कादंबरी व माधुरी पुरंदरे यांचं व्हॅन गॉग ही दोन पुस्तके सध्या वाचत आहे.
मागल्या वर्षी साहित्य अकादमी मिळालेला आसाराम लोमटेंचा आलोक हा कथासंग्रह वाचून झाला. विलक्षण कथा आहेत यातल्या. ग्रामीण कथांच्या नावाखाली किस्सेबाज अन शहरी वाचकाला आवडणाऱ्या नसत्या पुर्वग्रहांना चिवडत बसणाऱ्या या कथा नाहीत. खुप बारकाईने गाव चितारलं आहे त्यांनी, अनेक अंगांनी. ते कादंबरी लिहित आहेत असं कळलं. लवकर यायला हवी.
Man's Eternal Quest -
Man's Eternal Quest - Paramahansa Yogananda पुस्तक Salvation Army मध्ये सापडले. अतिशतय आवडले. जरी नेहमीचे अध्यात्म, कूटस्थ चैतन्य विषयक विचारच परत परत मांडले असले तरी ते ज्या विश्वासार्हता किंवा conviction ने मांडले आहेत ती मांडणी अत्यंत रोचक वाटली.
__________
काल Barnes & Nobles मध्ये ''how to change your mind - book michael pollan" वाचले/चाळले. लेखकाने, supraconciousness, tap करण्याकरता काही ड्रग्स्चे प्रयोग केले त्यातुन आलेले अनुभव आणि मुख्य म्हणजे प्रायोगिक निरीक्षणे, संकलीत आहेत. अर्थात पूर्ण वाचुन झालेल्च नाही. पण ड्रग्स (LSD , mashrooms व अन्य्) घेतल्यानंतर अनुभवविश्व विस्तारते व चैतन्याचे एक नवीन विश्वरुप दर्शन घडते त्याबद्दल या पुस्तकात वाचता येते. उदा - एका विशिष्ठ मादक द्रव्यसेवनानंतर, लेखकाला जाणवू लागले की तो एका पोलादी वेटोळ्यांच्या स्प्रिंगमध्ये बंदिस्त झालेला असुन जखडला गेलेला आहे. लेखक पॅनिक होउ लागला तितक्यात त्याला दिसले की एक चिमुकली वेल त्या वेटोळ्यांवरुन चढत चढत आकाशात झेपावते आहे आणि ती वेल लेखकास काही सांगू पहात आहे. लेखकाच्या एक लक्षात आले की ती पोलादी स्प्रिंग ना वेलीला बंदिस्त करु शकते. इतकेच नव्हे तर उलट त्या स्प्रिंगरुपी अडथळ्यावर ती वेल फक्त मातच करत नाही तर त्या अडथळ्याचा उपयोग करुन घेउन, ती वेल तिचा विकास साधते आहे. हे जे वेलीतील कूटस्थ चैतन्य आहे, intelligence आहे तो आपल्यात(माणसात) नाही. जसे माणूस ज्या ज्या गोष्टी साध्य करु शकतो त्या गोष्टी वनस्पती साध्य करु शकत नाहीत तशाच वेलीस ज्या गोष्टी साधतात त्या माणुस करु शकत नाही. मग माणूस हा अन्य जीवांहून श्रेष्ठ आहे या अहंकारास त्याने धक्का पोचतो.
एकंदरच ड्रग्ज मुळे अहंकार विरघळून जातो. The acid disolves ego आणि व्यक्ती अन्य सर्वच प्राणी, पक्षी, इतकेच काय तर मूलद्रव्यातही आत्मा पाहू शकते.
_______________________________________________
_
जे योगानंद सांगतात तोच अनुभव ड्रगीज ना येतो. फरक इतकाच की योगानंदांसारख्या साधकांना अथक परिश्रमांनंतर जो अनुभव येतो तो या ड्रग्ज घेणाऱ्यांना तत्काळ येतो.पण हा शॉर्ट्कट घातकच. अगदी १००% घात करणारा असतो.
बियॉंड द लाईन्स, लेखक कुलदीप नय्यर
फाळणीवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांपैकी हे महत्वाचे पुस्तक . अशाकरिता महत्वाचे कारण सियालकोट मधील सधन कुटुंबातील नय्यर हे स्वतः फाळणी काळात भारतात निघून आले. त्यामुळे स्वानुभवावरचे पुस्तक आहे . सुरुवातीला जरी बाळबोध वाटले तरी आता मजा येतीय . फाळणीग्रस्त असले तरी फाळणीपूर्व काळात सधन एलिट असल्याने मोठ्या लोकांशी संपर्क /अनुभव , स्वानुभवामुळे विषयाप्रती असलेली संवेदनशीलता आणि नंतरच्या आयुष्यात पत्रकार असल्याने तसेच बऱ्याच कागदपत्रांना असलेला ऍक्सेस यामुळे एक वेगळे परिमाण. १९३०-४० मधील आत्ताच्या पाकिस्तान मधील हिंदू मुस्लिम परस्परसंबंध यात १९४० नंतर होत गेलेला बदल अत्यंत सहजसाध्या पद्धतीने लिहिलेला. केवळ १९४० च्या आसपास झालेल्या घोषणेमुळे दोन्ही समाज मनामध्ये होत गेलेला बदल ...वगैरे . थोडंच वाचून झालंय पण आवडतंय .
हे वाचून झालं झालं की रांगेत " RSS , a view from inside लेखक वॉल्टर अँडरसन आणि श्रीधर दामले " हे पुस्तक आहे . तेव्हा पुढचे पंधरा दिवस बरे जाणार दिसतंय .
nudge theory/कोण असतात हे कळसुत्रधार?
https://www.weforum.org/agenda/2016/08/a-nudge-in-the-right-direction-h…
हा लेख रोचक आहे.
आपल्या नकळतही आपण एखाद्या पर्यायाकडे अलगद ढकलले जातो. कोण असतात हे कळसुत्रधार?
Three Body Problem
Cixin Liu या चिनी लेखकाच्या ३ सायन्स फिक्शन कादंबऱ्यांची मालिका. विस्तीर्ण पट. काळ आणि अवकाश दोन्हींबाबत. काहीवेळा शब्दबंबाळ, तपशिलसमृद्ध पण तरीही नितांत वाचनीय. कल्चरल रेवोल्युशनपाशी सुरु होऊन मानवतेच्या अस्तित्त्वाच्या क्षितिजापलिकडे जाणारी. काहीदा डिप्रेस करणारी पण कल्पकतेच्या भव्यतेने मुग्ध करणारी. भरपूर प्रश्न पडतात. सांप्रत काळात चीनमध्ये इतके बहरलेले सायन्स फिक्शन असू शकेल हे माहीतही नव्हते.
तिसरी, पहिली मग दुसरी
माझा क्रम: तिसरी सर्वोत्तम, पहिली मग दुसरी. तिसरी जरूर म्हणजे जरूर वाचण्याची शिफारस करतो.
गंमत म्हणजे मी दुसरी कादंबरी वाचल्यानंतर इतर दोन वाचल्या. दुसऱ्या कादंबरीत गरजेपेक्षा जास्त तपशील आहेत. आणि ते वॉलफेसरचं प्रेमप्रकर्ण जरा बोअर आणि कृत्रिम आहे. पहिली आणि तिसरीचा अनुवाद केन लिउने (जो स्वत:ही नावाजलेला सायन्स फिक्शन लेखक आहे) केलाय आणि दुसरी तिसऱ्याच एकाने. तेही एक कारण असावे दुसरी कंटाळवाणी वाटण्याचे.
पहिली वाचून संपवतोय.
पहिली वाचून संपवतोय.
जबरदस्त आहे.
आता दुसरी आणि तिसरी मिळवतो.
-----
बरेच तपशील आहेत आणि थिअरीसुद्धा, पण एकदम पकड घेते कादंबरी. आता आणखी चिनी सायन्स फिक्शन शोधलं पाहिजे.
---
ॲमेझॉनने ह्याचे हक्क घेतलेत आणि बजेट आहे १ बिलिअन. (असं ऐकलंय. पण ॲमेझॉन आहे तेव्हा.. )
'मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती' डॉ. आ. ह. साळुंखे
'मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती' डॉ. आ. ह. साळुंखे.........
'मनुस्मृती हा कायद्याचा व नीतिनियमांचा जगातील आद्य ग्रंथ आहे', अशा प्रकारे अनेकदा तिचा गौरव केला जातो. हा गौरव करताना ऐतिहासिक प्रक्रिया सामान्यतः ध्यानात घेतली जात नाही. वस्तुतः जो ग्रंथ आद्य असेल तो अनेक त्रुटींनी युक्त असण्याची शक्यता आपण मान्य केली पाहिजे. काळाच्या ओघात पुढचे ग्रंथ अधिक विकसित, परिपकव व परिपूर्ण होणे योग्य म्हटले पाहिजे. परंतु मनुस्मृतीला आद्य ग्रंथ म्हणणाऱ्यांची भूमिका अशी नसते. एकीकडून त्यांना आद्य म्हणून मनुस्मतीचा गौरवही करायचा असतो आणि दुसरीकडे ती सर्वश्रेष्ठ म्हणून तिचे गुणगाहीन करायचे असते. अशा गोष्टीची निर्मिती ईश्र्वरापर्यंत व एखाद्या देवतेपर्यंत मागे नेली जात असल्यामुळे त्या गोष्टीला आद्यता व सर्वश्रेष्ठता हे दोन्ही गुण चिकटवण्यात त्यांना कोणतीही विसंगती वाटत नाही. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र हि दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असू शकत नाहीत. ….मनुस्मृती हा कायद्याच्या क्षेत्रातील आद्य ग्रंथ तर नाहीच ,पण तो आदर्श व सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असेही म्हणता येत नाही.
श्रीपाद वल्लभ चरितामृत
गुरुचरित्र वाचण्याच्या अट्टाहासाला पूर्णविराम मिळुन त्याला अतिशय चपखल असा 'श्रीपाद वल्लभ चरितामृत' हा पर्याय सापडलेला आहे. सध्या तरी वाचते आहे, अतिशय आवडत आहे. काहीतरी शोधत होते ते सापडल्याची धूसर जाणीव मनात चमकते आणि परत 'टू गुड टू बी ट्रु' असे वाटुन परत मनाला दामटवते. हा ग्रंथ आयुष्याचे सुकाणू ठरो.
सध्यातरी फार आवडत आहे - इतकेच. परत त्याबद्दल अधिक कधीतरी पुन्हा!
दोन पुस्तकं
दोन पुस्तकं
१) Jeeves and the King of Clubs - Ben Schott
फॅन फिक्शन हा आवडीचा विषय. वुडहाऊसची फॅन फिक्शन वेळोवेळी प्रकाशित होत असते. गतवर्षी आलेलं Jeeves and the Wedding Bells ही Sebastian Faulks यांनी लिहिलेली नवी जीव्ह्ज-वूस्टर कादंबरी गतवर्षी प्रकाशित झाली होती. बरी होती, पण शेवटी वूस्टरला 'खऱ्या प्रेमा'च्या भानगडीत अडकवल्यामुळे वैताग आला होता. असो.
शॉटच्या या नव्या कादंबरीकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या आधी घडणारी ही कादंबरी जॉनरबेंडर आहे. यात जीव्ह्ज एमाय५चा एजंट आहे, आणि त्या भानगडीत तो वूस्टरलाही गोवून घेतो.
माझ्या मते ही कादंबरी लिहिताना लेखकाने एक मोठ्ठी चेकलिस्ट केली होती. जीव्ह्ज वूस्टर कादंबरीत काय हवं याची. उदा० वूस्टरला गृहित धरणाऱ्या आणि वाट्टेल ते करायला लावणाऱ्या आत्या, पैशाच्या अडचणीतले मित्र, वूस्टरशी अपघाताने एंगेज होणाऱ्या मुली, impostors, ड्रोन्स क्लबमधली रावडी संध्याकाळ, वगैरे. मग पद्धतशीरपणे लेखकाने सगळ्या टिका हाणून टाकल्या आहेत.
पण हा लेखनाचा मनमोहन देसाई ॲप्रोच दुर्दैवाने गंडला आहे. कथा ठिसूळ झाली आहे. वुडहाऊसच्या कथा कितीही पाचकळ घटनांनी भरलेल्या असल्या तरी त्यातलं इंटर्नल लॉजिक मात्र घट्ट असतं. इथे तेच बोंबललं आहे. आणि शीर्षकाचा संदर्भ अक्षरश: शेवटच्या पानात आणून चेकलिस्टही कंप्लीट केली आहे.
एक वेधक गोष्ट म्हणजे आक्रस्ताळी राष्ट्रवादाला मारलेली कोपरखळी. यात व्हिलन आहे रॉडरिक स्पोड - अर्ल ऑफ सिडकप. तो 'ब्लॅकशॉर्ट्स' ही संघटना स्थापन करतो (रेफरन्स: हिटलरची 'ब्राऊनशर्ट्स' संघटना') आणि घोषवाक्य असतं - 'मेक ग्रेट ब्रिटन ग्रेट अगेन' (यावर भाष्य करायची गरज नाही).
पाचापैकी दोन तारे. तेही भाषेचा आव बरा आणल्याबद्दल.
२. Lies Sleeping - Ben Aaronovitch
'रिव्हर्स ऑफ लंडन' मालिकेतली ही सातवी कादंबरी. याबद्दल ऐसीवर पूर्वी लिहिल्याचं आठवतंय, पण आत्ता नेमका संदर्भ सापडत नाहीये.
(लंडन) मेट्रोपॉलिटन पोलिस कॉन्स्टेबल पीटर ग्रँट नोकरीच्या पहिल्या महिन्यातच एका जादुई घटनेत अडकतो. त्याला त्यातून सोडवायला थॉमस नायटिंगेल नावाचा इसम मदत करतो. नायटिंगेल असतो मेट्रोपॉलिटन पोलिसच्या 'जादुई विभागा'चा मुख्य. तो पीटरला आपल्या पंखांखाली घेतो. त्या दरम्यान पीटरची लंडनमधल्या काही नद्यांशी ओळख होते१,२. काही जादुई प्राण्यांशी मैत्री होते. आणि एक व्हिलनही...
'अर्बन फँटसी' प्रकारातली ही पुस्तकं आहेत. लंडन, त्याचा इतिहास, जादू, आणि मुख्य म्हणजे अत्यंत प्रवाही लेखन. ॲरोनोविचला 'नव्या' लंडनची नस बरोबर सापडली आहे. लंडनची बहुसांस्कृतिकता त्याला दिसते, आणि तो न डरता त्याच्या पुस्तकात आणतो. पीटर ग्रँटचा परिवार सिएरा लियोनियन आहे. त्याची सहकारी सहारा गुलीद मूळची पाकिस्तानी आहे - अगदी हिजाब वगैरे घालणारी. डॉ वालिद हे पात्र बांगलादेशी आहे.
सातव्या पुस्तकात ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. पहिल्या सात भागांमधल्या व्हिलनचा नायनाट झाला आहे. पीटरच्या आयुष्यात स्थैर्य येऊ पाहतंय. त्याने आणि नायटिंगेलने सुरू केलेला जादुई उपक्रमही आता घडी बसवतो आहे. आता पुढल्या भागात काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
__________
१म्हणजे नक्की काय होतं ते पुस्तकातच वाचा.
२लंडनमध्ये थेम्स ही एकच नदी नाही. फ्लीट, टायबर्न वगैरेही आहेत.
From the sixteenth to the
From the sixteenth to the eighteenth century, the Mughal Empire did much to create modern-day India. It consolidated the country into a sovereign political unit, established a secular tradition in law and administration, and built monuments such as the Taj Mahal.
बाकी ठीक. पण ठळक केलेला भाग निखालस असत्य आहे.
महान चूतियानंदन लेख आहे.
महान चूतियानंदन लेख आहे. विशेषत: औरंगजेबाबद्दल बोलताना ऑड्री ट्रुश्केच्या पुस्तकाचा आधार घेतलाय ते पाहून फुटण्यात आले आहे. =)) हे म्हणजे महाराजांबद्दल बोलताना पिवळ्या ब्रिगेडी पुस्तकांचा आधार घेण्यापैकी आहे. =)) आणि असा लेख हे छापणार आणि जंतू त्याची भलावण करणार. मज्जा येणार निच्छीत!
परवाच ही ट्विट वाचली
An authorative source of the racial composition of Mughal mansabdars from Akbar to Shah Jehan shows a predominance of Turani and Irani migrants in Highest, High and Medium mansabs...
Helps understand status of Indian 'races' in the Mughal era and the Indianness of the Mughals. pic.twitter.com/56JDkcjZeo— Uday S Kulkarni (@MulaMutha) December 4, 2018
मुक्तेश्वरांची शब्दकळा
डॉ. वसंत स. जोशी ह्यांचा 'संशोधन साधना' हा लेखसंग्रह वाचत होतो. मुक्तेश्वरांच्या शैलीची त्यांनी दिलेली उदाहरणे लक्षणीय वाटली :
``या पहिल्या प्रसंगात मुक्तेश्वरी चिरपरिचित शैलीचा प्रत्यय देणारी काही उदाहरणे अशी आहेत. (अहिमहिरावणवध काव्यात) राक्षसांनी देवीला अर्पण केलेल्या सुवर्णपात्रातील अन्नाचे वर्णन --
| वोदन पंचरंगाचे कुसरी । नाना वळवंटाच्या क्षीरी । श्रवत घृतसाकरी । पाकपात्रे वोतीती ११३. मध्वी वडे मधुवडे । कीरवडे आंबवडे । रायवडे चिंबवडे । चंद्रातुल्य आरूवार ११४. घा-या घारीगे क्षीरघारीया । साकर मांडे सांजवटीया । पु-या गुळवरीया बळकुसरिया । खाज्या करंज्या घृतपुरे ११५. लाडु तीळवे कानवले । फेण्या दंडुरिया हे सकळे। अधीक मासीचे महिमागळे । कडकणे माळा सलेबा ११६. धीरडी ढोकळे वेढणीयां । मुदा दथ्योदनाचिया । आफुट बहुधान्य घुगरीया । संखेरहीत रीचवीती ११७. रिचवीती कथीकांचे डेरे । धारिती घृतरसाचे धारे । मधुदधी दुग्ध येकसरे । प्रवाह वाट सोडीती ११८. समुद्री नाना सरितांचे वोघ ! मीनले त्यांचा न दीसे मार्ग । तेवी वोपीता त्याचि सीग । नये काठीवरी शोधीता ११९.
देवीने फळाची इच्छा व्यक्त करिताच राक्षसांनी ती अर्पण केली. 'लोणची रायती सांबारी। शाखा फळावळीकंद कुसरी । परवडुनि मीठ मोहरी। बहुता करीं समर्पले १३३. मधुरा आंबुसी सीखरणी । येळा कपुर सुगंध मळणी । देकर देतसे सेउनि । मीटक्या देतु मटमटा १३४, केळे अंबे नारीकेळे । द्राक्ष बद्रिफळें फणस रसाळें । अंजीरी खर्जुरि जांभळें। रायआवळे नारींगे १३५. माहुलींगे मातुळींगे । गभीरे कमरखे आनासे सुभंगे । युक्षदंड कांडोरी आव्यंगे । आणी आनंगे आप्रसीधे १३६. भागले राक्षस वोपीतां । परी पुरे न ह्मणे देवी खाता । ह्मणे आशोक वना उपरी आतां । त्रुप्त जाली दुसरेनी''
The Witch Doesn't Burn in This One - Amanda Lovelace
छान कवितांचे पुस्तक वाचनात आले. फेमिनिस्ट कविता आहेत. कवितांशी आयडेंटिफाय करता आले. अतोनात इच्छा झाली की मुलीला हे पुस्तक भेट द्यावं. पण मग विचार केला नको, तिचे तिला पाहू देत, अनुभव घेउ देत, तिची मतं तिने बनवावीत. मी कशाकरता तिला बायस करु?
प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या कवितेशी आयडेंटिफाय करु शकेलच.
______________________________
________________
____________________
Always put yourself first, sacrifice at your own risk.
हे तर फार आवडलं. हे जितकं सोपं वाटतं तितकं नाही ना पण, स्त्रियांमध्ये, त्याग करण्याची वृत्ती अतोनात बळावलेली तर असतेच शिवाय we are also at the mercy of our emotions. दुर्लक्ष केल्याने, नवऱ्याला होणारा त्रास, आपण लक्ष दिले नाही तर मुलांची (सो कॉल्ड) आबाळ , घरातील पसारा सगळ्या गोष्टी अंगावर येतात. मला हे कळत नाही समाजाच्या अपेक्षा कुठे सुरू होतात आणि स्त्रियांच्या स्वत:च्या स्वत:कडुन अपेक्षा कुठे सुरु होतात :(
Journey without maps ..आणि स्मरणगाथा
Journey without maps ... Graham Greene
पुन्हा एकदा वाचतोय
आणि रा रा मुक्तसुनीत यांनी कुठंतरी आठवण करून दिल्यामुळे गो नी दांडेकरांचे स्मरणगाथा . ( ३०-४० वर्षांपूर्वी वाचले होते ,पण पुन्हा आता )
अत्यंत अवघड, खडतर आणि एक्सेंट्रिक असे हे प्रवास ... साईड बाय साईड वाचतोय .
3 puस्तके
आज बार्न्स & नोबल्स मधुन ३ पुस्तके विकत घेतली-
व्हिक्टर फ्रँकल यांचे - Man's Search for Meaning
boy who was raised as a dog - हे पूर्वी वाचलेले आता विकतच घेतले आहे. सायकॉलॉजीवरील अतिशय आवडीचे पुस्तक आहे.
अतुल गावंडे यांचे - being mortal
फ्रँकल यांचे पुस्तक सुरु केले आहे, खाली ठेववत नाहीये.
अतुल गावंडे यांचे पुस्तक अजुन उघडलेले नाही. वाचल्यानंतर, त्याबद्दल लिहीन.
व्हिक्टर फ्रँकल यांचे पुस्तक आवडले. दुर्दम्य आशावाद या बळावर त्यांनी जर्मन यातनातळामधील आयुष्यावर विजय मिळवलेला आहे. प्रत्येकाने वाचलेच पाहीजे असे सुंदर पुस्तक आहे.
साचि कौल चं पुस्तक तू वाचच.
साचि कौल चं पुस्तक तू वाचच. भन्नाट आहे. स्त्रीमुक्तीवादिच आहे ती. इतक्या खुसखुशित शैलीत स्वत: ब्राउन असण्यामुळे होणारे भेदभाचव् , शरीरयष्टि सुदृढपणाकडे झुकत असल्याने होणाऱ्या फजिती, भारतिय लग्नांचा भलाथोरला घाट व त्यातुन होणारा गोंधळ वगैरे खुप विनोदी शैलीत लिहीते.

ऑनलाइन ट्रोलिन्ग, डेट रेप यांविषयी मात्र तिने खुप माहिति दिलेली आहे. हे गंभिर विषय तितक्याच गंभिरतेने हाताळले आहेत.
___________________
न्यु एज जॉनरमधिल हे पुस्तक म्हणजे सॅकरिन स्वीट आहे. खऱ्या कहाण्या आहेत पण तोचतोच भाबडा रटाळ गोडपणा. जग इतकं सरळ झालं तर मग काय हवं होतं. प्रेम द्या-प्रेम घ्या यापलिकडे कामच उरलं नसतं.
रिग्रेशन थेरपी हा पुस्तकाचा विषय आहे. एकदा वाटलं आपणही रिग्रेशन थेरपी काय चीज आहे पहावी.पण मग सावध विचार आला, उगाच दिवसाढवळ्या भास सुरु झाले, मन डिस-इन्टिग्रेट होउन बसलं ना या जगातले ना धड त्या जगातले तर काय घ्या.