ही बातमी समजली का - भाग १९६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
शेषन यांच्यामुळे झाले. चक्क
शेषन यांच्यामुळे झाले. चक्क दंड आकारला जात असे. त्यानंतर चढत्या प्रमाणांत शिक्षा वाढायच्या. अगदी निवडणुकीला अपात्र ठरवणे इतकेही ताणले जायचे. व्हिडीओ शूटिंग करून पुरावा तयार करणे वगैरे त्यांनीच सुरू केलं. त्यामुळे कोणालाही कुठलीही पळवाटच शिल्लक रहावयाची नाही. हा त्रास राजकीय पक्षांना इतका असह्य झाला की, तीन सभासदांचा निवडणूक आयोग करून शेषन यांचा अधिकार कमी करायचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यालाही ते पुरून उरले. १९९० पासून त्याचा निवडणुक आयुक्त म्हणून कार्यकाळ सुरू झाला. प्लेक्स किंवा डिगीटल प्रिंटिंग भारतात फार उशीरा सुरू झालं. २००५ साली डिगीटल छपाईच जागतिक प्रमाण जेमतेम ८-९ टक्के होत असं कुठेतरी वाचल्याच आठवतंय. खर ते १९९२ सालीच निवृत्त व्हायचे. पण निवडणूक आयोगाचा कालावधी ६ वर्षांचा असल्याने ते १९९६ साली निवृत्त झाले. त्यावरूनही राजकीय पुठाऱ्यांनी वैताग व्यक्त केल्याच आठवतंय. हा माणूस एवढा मनस्वी होता की, सुप्रीम कोर्टाशीही याच वाजलं. शेवटी कोर्टालापण त्यांना समज द्यायला लागली.
म्हणजे ...
तंत्रज्ञान बदललं, भिंती रंगवण्याजागी फ्लेक्स करणं स्वस्त झालं, चलनात आलं; त्याच्या बरोबर शहराच्या विद्रूपीकरणाची मनोवृत्ती बदलली नाही आणि निवडणूक आयोगानं बदलत्या तंत्रज्ञानाची दखल घेतली नाही. शेषन ह्यांच्या नंतर कोणीही एवढे ताकदीचे निवडणूक आयुक्त न मिळाल्यामुळे फ्लेक्समुळे शहरांचं विद्रूपीकरण वाढलं, असंही म्हणता येईल.
भिंती रंगवल्यावर दंड आकारणं आणि त्रिसदस्यीय निवडणूक आयोग ह्या दोन गोष्टी अत्यंत पुसटपणे आठवतात. पेपरात हेडलाईन्स येत असतील तेव्हा अशा बातम्यांच्या! त्याचं महत्त्व तेव्हा अजिबातच समजलं नव्हतं.
शेषन यांनी भिंती विद्रुपीकरण
शेषन यांनी भिंती विद्रुपीकरण थांबवलं ते भिंतींवर निवडणुकीच्या प्रचाराचा मजकूर लिहिण्याचे. त्यावेळी फ्लेक्स तंत्रज्ञान उपलब्ध असते तर शेषन उमेदवाराच्या प्रचाराचे फ्लेक्स रोखू शकले असते. दादा, भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स रोखू शकले नसते. ते त्यांच्या अधिकारकक्षेच्या बाहेर असल्याने.
शाम भागवत म्हणतात तशा उमेदवाराला अपात्र ठरवण्याच्या घटना त्यांच्या काळात घडल्या हे खरे आहे. पण ती काहीशी वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखी मनमानी होती.
नव्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काय केलं असतं ते सांगता येत नाही. त्यांनी निवृत्ती काळात काही भाष्य केले असे ऐकलेले नाही. आपले राजेश कुलकर्णी इथे रोज जे "फुसके बार" टाकायचे तो निवडणूक प्रचार म्हणून कसे मोजले असते त्याची कल्पना मला करता येत नाही.
व्यक्तिनिष्ठ फरक
शेषन ह्यांची गुणवत्ता मोजण्याइतपत माझा ह्या विषयाचा अभ्यास नाही. त्यांच्याबद्दल वस्तुनिष्ठ विधान करण्याची माझी पात्रताच नाही.
मला शेषन ह्यांच्याबद्दल विशेष प्रेम का, हे वर लिहिलेलंच आहे. जरा अक्कल येण्याच्या वयात, आजूबाजूला लाचलुचपत, नियम सतत वाकवले जाणं, बळी तो कान पिळी ह्या गोष्टी दिसत होत्या. तेव्हा शेषन ह्यांनी निवडणूक आयोगाला कणा आणि ताकद असते हे दाखवून दिलं. (हेच गो. रा. खैरनार मुंबईच्या आयुक्तपदी असतानाची गोष्ट. तीच गोष्ट चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असतानाची.) आज मला ह्या विषयांत जे काही समजतं, किंवा माझी जी काही मतं आहेत, त्यानुसार ह्या लोकांचं मूल्यमापन मी कसं करेन, हे माहीत नाही.
पण भ्रष्ट राजकारणी आणि त्यांना पोषक नोकरशाही हे जन्मापासून बघत आलेली असताना अचानक हा माणूस, कायदा आणि व्यवस्थेच्या चौकटीत राहून समाजाच्या हितासाठी काही करता येतं, अशी भावना निर्माण करून गेला. त्यांनी घेतलेल्या विशिष्ट निर्णयांमुळे खरंच समाजाचं हित झालं का, किती झालं, हे मुद्दे इथे गौण आहेत. अधिकारी व्यक्तीनं समाजाच्या भल्यासाठी सत्ताधारी आणि शक्तीशाली लोकांशी पंगा घेतला, आणि त्यात त्याला यश मिळालं, हे शेषन, खैरनार, चंद्रशेखर ह्या लोकांमुळे समज येताना दिसलं.
आता मला तेवढंच आठवतं. बाकीचे तपशील, शेषन ह्यांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन ह्या गोष्टी निराळ्या. त्या झाल्याच पाहिजेत. आता मी मोठी झाले; त्यांच्या कामाचे काहीबाही दुष्परिणाम आता दिसायला लागले असतीलच; तेही वाचायला मला आवडेल. पण न कळत्या, वाढत्या वयात त्यांनी मला दाखवलेल्या आशावादाशी त्यांच्या कामाच्या मूल्यमापनाचा काहीही संबंध नाही.
दुःखद
मी त्यांची काही मोजकीच पुस्तके वाचली आहेत; पण विज्ञानात त्यांनी जो रस तयार केला तो आजही टिकून आहे. ‛आकाशाशी जडले नाते’त डॉ. जयंत नारळीकरांनी प्रा. मोहन आपटे यांनी पुस्तकाबद्दल कळवलेल्या काही सूचनांबद्दल आभार व्यक्त केल्याचे स्मरते.
राजकीय कल्लोळात ही बातमी निसटून कधी गेली ते कळलेच नाही.
विज्ञानात रुची तयार करणाऱ्या आपटे सरांना अभिवादन.
मराठीत विज्ञानाबद्दल लिहिणं
आता मला लक्षात येतं की मराठीत विज्ञानाबद्दल, विशेषतः खगोलशास्त्राबद्दल लिहिणाऱ्या सुरुवातीच्या अगदी मोजक्या लोकांपैकी ते एक. विश्वोत्पत्ती, महास्फोट वगैरे विषयांवर मराठीत लिहिणारे कदाचित पहिलेच. म्हणजे मराठीत ह्या विषयात ज्या संज्ञा वापरल्या जातात त्या कदाचित आपटे सरांनी तयार केल्या असतील.
आपटे सर उत्तम शिक्षक होते. ठाण्यात किंवा शीवला एका हौशी अभ्यासवर्गात त्यांनी दोन लेक्चरं घेतलेली मी ऐकली होती. 'हे फारच सोपं आहे', असं कठीण विषयाबद्दल वाटणं सोपं नाही; ते आपटे सरांना जमलं होतं. खगोलशास्त्राबद्दल मराठीत लिहिणाऱ्या, आपटे सरांच्या वयाच्या इतर काही लोकांबद्दल काहीबाही गॉसिप कानावर येत असे. आपटे सरांबद्दल असं कधीही ऐकलं नाही. आपटे सरांच्या राजकीय विचारसरणीशी अजिबात सहमत नसणाऱ्या हौशी खगोलाभ्यासक लोकांनाही सरांबद्दल आदरच होता.
अशा लोकांपैकीच एकाच्या फेसबुक पोस्टमुळे त्यांच्या निधनाची बातमी समजली.
डॉ. नारळीकर आणि प्रा. आपटे ह्या दोघांनी मराठीत विज्ञानाबद्दल लिहून माझ्यासारख्या अनेकांना हा वारसा पुढे चालवण्याची प्रेरणा दिली आहे.
आदरांजली
सहावीत असताना बाबांनी त्यांची 'मला उत्तर हवंय - पदार्थविज्ञान' आणि 'मला उत्तर हवंय - खगोलशास्त्र' ही पुस्तके आणली होती. सोप्या भाषेत कित्येक महत्त्वाच्या संकल्पनांचा परिचय त्यात करून दिला होता. अनेक संकल्पना त्यावेळी समजल्या नसल्या तरी काही संकल्पना समजणे व न समजलेल्या संकल्पनांबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करणे ह्यामुळे ती पुस्तके विशेष आवडली होती. विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण करण्यात ह्या पुस्तकांचा आणि आपटेसरांचा खूप मोठा वाटा आहे. आदरांजली.
बऱ्याचदा भोळ्या भाबड्या
बऱ्याचदा भोळ्या भाबड्या शिक्षित मध्यम्वर्गाला शेषन/खैरनार/चंद्रशेखर यांच्या सारखे अधिकारी लोकप्रतिनिधींना विरोध करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात ते अतिषय भावते. "कोर्टाने सरकारला फटकारले" ही या मध्यमवर्गाची सर्वात आवडती वृत्तपत्रीय हेडलाईन.
अशा लोकांच्या कार्याने काहीतरी सुधारणा घडेल अशी अस्थानी आशा त्यांना वाटत असते. खरे तर अशा गोष्टी तात्पुरत्या स्वरूपाच्या होतात. शेषन यांनी निवडणूक आयुक्त म्हणून ज्या सुधारणा केल्या त्यातील मतदार ओळखपत्र ही एकच त्यातल्या त्यात कामाची सुधारणा ठरली. बाकीच्या सुधारणा या काही कामाच्या ठरल्या नाहीत. उदा. त्यांनी त्यावेळी उमेदवारांच्या खर्चाला कात्री लावली. एखाद्या निवडणुकीतच प्रचारखर्च कमी झाला असेल. त्यानंतर उमेदवार खर्चाचा धडाका पूर्ववत सुरू झाला आणि खर्चाची मर्यादा ओलांडली म्हणूण एकाही विजयी उमेदवाराची निवडणूक आजवर रद्द झाली नाही. शिवाय आता राजकीय पक्षांनी त्यातून मार्ग काढला आहे. सोमी वरून जो प्रचार होतो त्याचा खर्च मोजणे (आणि तो विशिष्ट उमेदवाराच्या खर्चात मोजणे)आयोगाला शक्य नाही. दुसरी सुधारणा म्हणजे उमेदवाराच्या संपत्तीचे प्रतिज्ञा पत्र. उमेदवार ती सादर करतात. अमुक उमेदवाराची संपत्ती पाचपट झाली वगैरे बातम्या वृत्तपत्रात येतात. त्याने मतदारांना काहीही फरक पडत नाही. आणि हे अशिक्षित मतदारांबाबत नाही. मुळात उमेदवाराने भ्रष्टाचार केला किंवा नाही केला हे मतदारासाठी महत्त्वाचे नाही. माझ्या मतदारसंघात दोन उमेदवार आहेत. एक स्वच्छ चारित्र्याचा आहे त्याच्या संपत्तीत काही वाढ झाली नाही आणि दुसरा मात्र ज्याम भ्रष्ट आहे आणि त्याची संपत्ती पाच वर्षात वीसपट झाली आहे. तरी तो स्वच्छ उमेदवार राममंदिर नको वाला आहे आणि भ्रष्ट उमेदवार राममंदिर हवे वाला असेल तर मी राममंदिर हवे वाला मतदार स्वच्छ उमेदवाराला मत देणे (रादर भ्रष्ट उमेदवाराला मत न देणे) संभवत नाही.
अधिकचा भाग म्हणजे शेषन यांचा हा झपाटा (डिसेंबर ९० ते डिसेंबर ९६) जेव्हा सरकार (सत्ताधारी पक्ष) दुर्बळ होऊ होता त्या काळातला आहे.
At best he as CEC was untested during times of strong governments. At the worst he is known to run behind Rajiv Gandhi's car with files when he was Cabinet Secretary till Dec 89.
खैरनार हा एक ज्योक होता. मीडियाने बनवलेला. अण्णा हजारे हा दुसरा ज्योक.
चंद्रशेखर यांनी सरकारशी पंगा घेऊन काही काम केलेले नाही. त्यांनी ठाण्यातली जी अतिक्रमणे उठवली ती बाळ ठाकरेंच्या आशीर्वादानेच आणि ती ही ठाण्यातील आनंद दिघे यांचा पाया खिळखिळा करण्यासाठी. तरीही त्यांनी जे केले त्याचा फायदा ठाणेकरांना बऱ्यापैकी मिळतो आहे. म्हणजे अतिक्रमणे इतक्या वर्षांनीही त्यावेळच्या लेव्हलला पोचलेली नाहीत.
'मकबूल'
हा प्रतिसाद वाचत असताना मला 'मकबूल'मधले नसिरुद्दीन आणि ओम पुरी आठवले.
लोकशाहीत कोणताही एक पक्ष, किंवा लोकशाहीच्या आधारभूत चार स्तंभांपैकी कोणताही एक फारच ताकदवान (आणि पर्यायानं माजोर्डा) का होऊ नये, ह्याचा विचार; किंवा काही वर्षांपूर्वी आशिष नंदी जयपूर लिटफेस्टमध्ये भारतीय लोकशाहीचं भवितव्य आणि खालच्या जातीतल्या लोकांचीही भ्रष्टाचार करण्याची वृत्ती आणि पत ह्याबद्दल बोलले होते, हे आठवत होतं.
औद्योगिक उत्पादन सात वर्षांच्या तळात
औद्योगिक उत्पादन सात वर्षांच्या तळात
कोळसा, पोलाद, औद्योगिक उत्पादन अशा सगळ्या क्षेत्रांत बोंब लागलेली दिसते.
बोरिवली/ठाणे/मुंबई जवळचे
बोरिवली/ठाणे/मुंबई जवळचे बागकामप्रेमी/ झाडांची आवड असणाऱ्या ऐसीकरांनो
संजय गांधी पार्कात रविवारी (नोव्हेंबर १७) facebook group, public, free get together, discussion. 107th event. 07:45am to 10:45am
वोडाफोनने एस्सारकडून बिझनेस
वोडाफोनने एस्सारकडून बिझनेस घेताना म्हणे पेमेंटातला ट्याक्स कापूनच द्यायचे होते असं काही आठवतय. ती रकम भारत सरकार/ डिपार्टमेंट अजूनही क्लेम सोडत नाही. मग त्यांचे लिगल डिपार्टमेंट काय करत होते?
दुसरा झटका २०१६ ला जिओने दिला तो माहितच आहे. तर सध्या १लाखकोटी देय होऊन परदेशींनी ही वोडाफोन इंडिया गुंतवणूक बुडित दाखवली आहे.
लायसन फी जास्त आहे ओरडतात त्याबद्दल माहीत नाही. ( म्हणजे 2जी,3जी कस्टमर घालवायचे नाहीत पण यातच कॉस्ट वाढतेय. 4जी मध्ये कॉस्ट कमी येते सेवा देण्यात.)
( आंजावरून गोळा केलेल्या/वाचलेल्या माहितीवर आधारित)
Brussels-based NGO uncovers
Brussels-based NGO uncovers 265 fake news websites serving 'Indian governmental interests'; portals linked to NGO behind MEPs visit to Kashmir
https://www.disinfo.eu/2019/11/13/uncovered:-265-coordinated-fake-local…
फक्त firstpost वर दिसली ही बातमी. बाकी कुठे उल्लेख नाही.
- ओंकार.
- ओंकार.
कन्झ्युमर स्पेन्डिंग म्हणजे
कन्झ्युमर स्पेन्डिंग म्हणजे अक्षरश: अन्नधान्यावरचा खर्च कमी झाला आहे.
जीडीपी तरीही ४-५% नी वाढतोय. हा मोदींचा चमत्कार किंवा ह्यालाच “ह्युमन इन्जेन्युइटी” म्हणत असावेत.
https://www.outlookindia.com/website/story/business-news-first-time-in-four-decades-consumer-spending-in-india-falls-by-37-report/342379
अजब तुझे सरकार!
तलाठ्याच्या १८०० रिक्त पदांसाठी साडेपाच लाखांहून अधिक उमेदवार. सगळं ऑनलाईन करण्याच्या हट्टापायी तब्बल २४ दिवस चाललेली परीक्षा. ४८ प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न, म्हणजे प्रश्नसंख्या झाली ४८००! अबब!
अस्वस्थ तरुणाईची ‘महापरीक्षा’!
एक नंबर
"बेकारी" ही पाश्चात्य संकल्पना आहे तिला हिंदुस्थानात थारा नाही
एक नंबर कॉमेंट आहे.
अजित पवारांना क्लीट चीट मिळण्यातली तत्परता वाखाणण्यासारखी आहे.
सरकार स्थापनेच्या दोन-चार दिवस आधीपासून फेसबुकवर ममवंच्या (मराठी मध्यमवर्गीय) कॉमेंट्स वाचत होते - हे सगळं शेतकऱ्यांसाठी चालू आहे - छापाच्या. कधी नव्हे ते ममव शेतकऱ्यांबद्दल बोलायला लागले आहेत.
मनमोहन सिंह आर्थिक परिस्थितीविषयी
मनमोहन सिंह आर्थिक परिस्थितीविषयी कालच्या 'हिंदू'मधून -
The fountainhead of India’s economic malaise
India is now a $3-trillion global economic powerhouse driven largely by private enterprise. It is not a tiny command and control economy that can be bullied and directed at will. Nor can it be managed through colourful headlines and noisy media commentary. Shooting down messengers of bad news or shutting off economic reports and data is juvenile and does not behove a rising global economic powerhouse. No amount of subterfuge can hide the performance and analysis of a $3-trillion market economy of 1.2 billion people. Economic participants respond to social and economic incentives, not diktats or coercions or public relations.
जेएनयूचे विद्यार्थी का संतापले?
जेएनयूमधील फीवाढीचा नक्की काय अर्थ आणि विद्यार्थी आंदोलन नक्की का करताहेत ह्याविषयी आजच्या लोकसत्तामधून -
NRC process to be carried out
NRC process to be carried out in entire country, says Amit Shah in Rajya Sabha
आसाममधल्या NRC प्रक्रियेला कुणी विरोध केला आणि कुणी तिचं समर्थन केलं? त्याची पार्श्वभूमी काय? दिवाळी अंकातला लेख - आसाममधल्या नागरिकत्वाचं संकट
नवाकाळ वर्तमान पत्राचे माजी
नवाकाळ वर्तमान पत्राचे माजी संपादक नीळकंठ खाडिलकर यांचे निधन झाले आहे.
संपादक-मालक या कॅटेगरीतील ते शेवटचे असावेत.
या पेपरातील हेडलाईन जवळजवळ अर्धे पान व्यापत असे असा ७२ पॉईंटचा फॉण्ट वापरत. गो रा खैरनार यांना प्रसिद्धी देण्यात नवाकाळ हे वर्तमानपत्र आघाडीवर होते.
अजित पवारांचा राजीनामा
उद्या बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देताच काही तासांत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
आणि फडणवीस यांचाही राजीनामा
अखेर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा. केवळ ८० तासांत फडणवीस सरकारला पायउतार व्हावे लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा
बाकी सर्व ठीक, पण...
...भाषा???
नाही म्हणजे, खफ-खव-व्यनित वगैरे एक वेळ ठीक आहे, परंतु मेनबोर्डावरसुद्धा? पब्लिक फोरमवर???
हॅविंग सेड दॅट,
अजित पवारांची निष्कारण ** लागली.
राज्यपालाची झोपमोड झाली.
अमीत्शा- फडण२० दुक्कल शरद पवारांपुढे गडबडली चक्क.
हा प्रेमाइस बरोबर असू शकेलही कदाचित. (मला कल्पना नाही.) परंतु, तो बरोबर आहे असे जरी मानले, तरीसुद्धा,
उद्धव ठाकरेंचा राजयोग फायनली ॲक्टिव्हेट होणार.
हा ॲट बेष्ट नॉन सेक्वायटूर आहे. (ॲट वर्ष्ट विशफुल थिंकिंग असू शकेलही कदाचित - मला निश्चित कल्पना नाही (चूभूद्याघ्या) - परंतु तो भाग तूर्तास सोडून देऊ.)
असो.
हो, पण...
आणि नॉन सेक्वायटूर का म्हणे?? उद्धव मुमं पदाची शपथ घेतायंत.
हो, घेताहेत खरे. परंतु हे प्रेमाइसवरून आपोआप फॉलो होत नाही, म्हणून नॉन सेक्वायटूर, इतकेच.
(अद्यापही यात कोणाचा काय गेम असू शकतो, सांगवत नाही.)
नबा, मांडवली!
उत्तम. (परंतु, तेवढे प्रतिसादाचे शीर्षकसुद्धा बदलू शकाल काय? आभार.)
प्रियांका रेड्डी, बलात्कार, खून, आरोपी, शिक्षा, फाशी वगैरे
प्रियांका रेड्डी, बलात्कार, खून, आरोपी, शिक्षा, फाशी वगैरेचा ऐसीवर फारसा उल्लेख दिसला नाही पण क्विन्टवर हे उरफाटं लिखाण सापडलं -
मुहम्मदला पोलिसांनी पकडून नेल्यामुळे त्याच्या आईवडिलांची कशी उपासमार होते आहे वगैरे नेहमीचाच पुरोगामी माल-मसाला आणि संबंधित फोडणी आहेच.
बलात्कारी माणसाच्या जातीचा
बलात्कारी माणसाच्या जातीचा/धर्माचा (कुठल्याही) बाजूने वापर करून बातमी देणं हे साफ चूक आहे.
मुहम्मदला पोलिसांनी पकडून नेल्यामुळे त्याच्या आईवडिलांची कशी उपासमार होते आहे वगैरे नेहमीचाच पुरोगामी माल-मसाला आणि संबंधित फोडणी आहेच.
ह्याच्यावर आक्षेप आहे की उपासमारीवर?
बातमीत आणखी बरंच काही आहे. इतर तिघांना वगळून नेमकं मुहम्मदलाच खपासाठी निवडलं असावं.
... असे वार्तांकन करण्यावर आक्षेप
आक्षेप एकूणच आशयावर आहे. (अर्थात कुणी कुठलं वार्तांकन करावं हा त्या-त्या व्यक्ती-संस्थेचा अधिकार - मान्य )
पण, एकीकडे त्या बळीवरील अत्याचारांमुळे जनमत गुन्हेगारांविरुद्ध प्रक्षुब्ध असताना, पहा हो तो गरीब बिचारा आरोपी, त्याला पोलिसांनी उचलून नेले हो, आणि मग - त्याचे वृद्ध आईबाप -> गरिबी -> उपासमार -> सहानुभूती -> दया -> शिक्षेतून सूट -> पुनर्वसन -> आरोपी दुसरा गुन्हा करायला मोकळा... ! आणि हा कल्पनाविलास नाही, असा प्रत्यक्षात झालं आहे, - शिलाई मशीन.
तेंव्हा आरोपीबद्धल समाजात कुठलीही सहानुभूती निर्माण होईल असे वार्तांकन करण्यावर आक्षेप आहे.
Reference -
Delhi CM Arvind Kejriwal, in an effort to rehabilitate the juvenile, decided that his government would go ahead and give him Rs 10,000 along with a sewing machine to enable him to open a tailoring shop.
दिशा सामुहिक बलात्कार व
दिशा सामुहिक बलात्कार व हत्येप्रकरणी अटकेत असलेले चार आरोपी पोलिस चकमकीत ठार झाले आहेत.
बातमी -
https://www.deccanchronicle.com/nation/crime/061219/all-4-accused-in-hy…
प्रियांका रेड्डी च्या निमित्ताने...
एरवी आपल्या उठण्या बसण्यातली माणसं मद्याच्या अमला खाली कशी वागू शकतात हे पाहिलं की काही प्रश्न मनात येतात. एक स्त्री म्हणून तर नक्कीच. मद्य सेवनानंतर लोकांची मूळ प्रवृत्ती जागी होते असं म्हणतात. पण यातही दोन प्रकार आहेत. काही माणसं एकदम गप्प होऊन जातात तर काही प्रचंड बडबड करतात. गप्प होणाऱ्या लोकांच्या मनात काय चालतं ते समजणं शक्य नाही परंतु जे लोक बोलत - बहुतांशी खरंतर बरळत सुटतात त्यांच्याविषयी फार आश्चर्य वाटतं. अनेकदा यात इतरांविषयी अत्यंत तुच्छतेने बोलणं हे धक्कादायक वाटतं. त्यातही मद्यपी व्यक्ती एखाद्या स्त्री विषयी बोलत असेल तर आश्चर्याची जागा संताप आणि घृणा घेऊ शकतात. कारण एरवी हीच व्यक्ती सर्वमान्य सामाजिक नियमांत बसेल असं वागत-बोलत असते. त्या व्यक्तीला स्वतःला स्त्री नातेवाईक असतात. मग ती पत्नी, मुलगी, आई, सून, बहीण अथवा त्या ग्रुप मध्ये असणाऱ्या मैत्रिणीही असू शकतात. मग त्यांच्या विषयी नाही तरी इतर कोणातरी स्त्री विषयी असं का बोलावसं वाटतं? ते ऐकणाऱ्या परिवारातल्या स्त्रियांना काय वाटत असेल याचा साधा विचारही मनात येत नाही का? दुसऱ्या दिवशी नशेत बोललो असेन , असं म्हणून जबाबदारी झटकताना आपण पुन्हा पुन्हा असं का वागतो याचा विचार केला जातो का?
डॉक्टर प्रियांकाच्या बाबतीत हैदराबाद मध्ये जे झालं, त्यामुळे स्त्रियांच्या मनात प्रचंड चीड, निराशा आणि असुरक्षिततेची भावना आहे. जे झालं त्यात शिक्षण, सांपत्तिक स्थिती, सामाजिक पातळी, मद्याचा अंमल, पुरषी मानसिकता, लैंगिक भावना यांचा किती सहभाग होता? वाचिक हिंसा ही शारीरिक हिंसेपेक्षा नक्कीच सौम्य समजली जाते, परंतु त्या मागच्या मानसिकतेत फक्त वरवरचा फरक आहे का? मद्याच्या अमलाखाली तो नाहिसा होऊ शकतो का?
दारूच कशाला पाहिजे!
अनेक स्त्रीवादी असं म्हणतात की बलात्कार एका स्त्रीवर होतो पण त्याचं दडपण खूप जास्त स्त्रियांना जाणवतं. मग "उपाय" म्हणून 'सातच्या आत घरात', 'तुम्हीच काळजी का घेत नाही', कराटे वगैरे शिकणं करत जबाबदारी बाईवरच ढकलली जाते. सुरक्षिततेसाठी सोबत कोणा विश्वास असलेल्या पुरुषाला घेऊन जाण्याचा पर्याय निघतो. गुन्हा करणारा पुरुषच आणि पुन्हा सुरक्षिततेसाठी अवलंबून राहायचं तेही पुरुषावरच.
वाटेल ती बडबड करण्यासाठी दारू पिण्याचीही गरज नसते. एरवी चांगल्या घरातले म्हणवणारे दोन स्त्रियांची वादावादी झाली की 'कॅटफाईट' बघायला जमतात; बायकांच्या ड्रायव्हिंगला नावं ठेवतात; किंवा बायकांनी काय-कसं वागायला पाहिजे ह्याबद्दल लेक्चरं झोडतात; आणि अशी किती उदाहरणं देऊ! स्त्रीवाद म्हणजे बायकांनीच काय ते करायला पाहिजे आणि पुरुषांवर कसलीही जबाबदारी नाही! सध्या प्रियांका रेड्डींवर झालेल्या हिंसक गुन्ह्यामुळे भावना चेतवल्या वगैरे आहेत; पण असं काहीही नसतानाही 'आम्ही पुरुषांनी असं-असं वागलं पाहिजे' छापाची काहीही चर्चा पुरुषांकडून घडत नाही किंवा 'आमच्या कोणत्या वर्तनामुळे स्त्रियांना असुरक्षित, गैरसोयीचं, uncomfortable वाटतं' असा प्रश्न विचारत नाहीत. संस्कृती आणि स्त्रीवाद दोन्ही जपण्याची जबाबदारी स्त्रियांवरच असते. संस्कृतीधार्जिणे लोक किमान सनातनी म्हणून सोडून देता येतात. स्वतःला उदारमतवादी म्हणवणाऱ्यांचं काय करायचं?
पेज आऊट, पिचई इन गूगल.
गूगलची मुख्य कंपनी, अल्फाबेटच्या प्रमुखपदावरून लॅरी पेज पायउतार होणार; तिथे सध्याचे मायक्रोसॉफ्टचे सुंदर पिचई येणार.
Larry Page steps down as CEO of Alphabet, Sundar Pichai to take over
जरा जपून!
नाही म्हणजे, तुमच्या भावना समजू शकतो, त्यांच्याशी सहानुभूत असू शकतो. परंतु, 'जिन्हें नाज़ है हिंद पर'चे आजच्या हिंदीतले भाषांतर हे दुर्दैवाने 'भारत तेरे टुकडे होगे, इन्शा अल्लाह, इन्शा अल्लाह' असे होते. त्यामुळे, कोणी तत्परतेने तुमची बदली टुकडे टुकडे गँगमध्ये करणे टाळण्याकरिता, शीर्षकासंबंधाने अंमळ जपूनच राहिलेले बरे, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
उठा ! सोशल मिडिया सोजिरांनो !!! पानिपत उद्याला रीलीज होतोय्
उठा माझ्या मराठ्या सोशल मिडिया सोल्जरांनो उद्या " पानिपत " रीलीज होतोय्
उडवु देउ धुमाकुळ रीव्ह्युंचा
पाउस पाडु प्रतिसादांचा
दुखवुन घेऊ भावनांना
विसरुन जाऊ वेदनांना
चला मराठ्यांनो डिस्कसुन टाकु पानिपताला
सोशल मिडीयावर तलवारी उपसु या
रीॲलीटी त हरलेल्ल्या लढाईला व्हर्च्युअल रीॲलीटी त जिंकुया
लय मज्जा येणार असा अंदाज येतो या
बाय द वे कुठली संघटना आंदोलन करेल थेटर बंद करण्यासाठी ?
१) डिक्शनरीची दोनतीन apps
१) डिक्शनरीची दोनतीन apps आहेत त्यात काल they शब्द zero words found आलेले. पण गूगल ट्रान्सलेटने बरोबर दिले. App size किती वाढवणार.
२)
Webster, said in a statement: "Pronouns are among the language's most commonly used words, and like other common words (think go, do, and have) they tend to be mostly ignored by dictionary users.
ते आता समजले.
धन्यवाद.
नागरिकत्व सुधारणा विधेयक - योगेंद्र यादव
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयी योगेंद्र यादव आजच्या 'लोकसत्ता'मधून :
विरोधात उभे राहावे लागेल..
डाबर
एक अस्वस्थ शांतता आहे.
डाबरचा सप्टेंबर-२०१९ च्या तिमाहीचे अर्निंग कॉलचे ट्रान्स्क्रीप्ट वाचताना मॅनेजमेंट कडून हे कळले की, काश्मीर बंद नंतर सप्लाय चैन डिस्टर्ब झाल्याने सेल्सवर फरक पडला खास करून ज्यूस बिझनेसवर. एचयूएलच्या मॅनेजमेंट कडून पण "काही ठिकाणी" सप्लायचैन डिस्टर्ब झाल्याने तर काही ठिकाणी लिक्विडीटी इश्यू असल्याने सेल्स अफेक्ट झाल्याचे म्हटले आहे. अजून बर्याच कंपन्या असतीलच. बीबीसी कडून आणि स्थानिक पत्रकारांकडून कळते की, चार महिने झाले पत्रकारांना पण नेट साठी झगडावे लागत आहे. पत्रकारांना बातमी पोस्ट करण्यासाठी सरकारने चालू केलेल्या सेंटर मध्ये येवून २-३ तास खर्च करावे लागतात. सामान्य लोकांना इंटरनेट अजून नाहीच. छोटे व्यवसायिक जीएसटी चे विवरण कसे भरत असतील? इंटरनेटशा निगडीत इतर व्यवसायांचे काय? ऐन सफरचंदाच्या सिझन आणि ईद मध्ये इतर व्यावसायिकांचे किती नुकसान झाले? माझ्या मित्रांची मुलं युट्यूब लावल्याशिवाय जेवत नाहीत. जेव्हा मी त्यांना विचारतो काश्मीरी मुलांचे काय? तेव्हा काही गप्प राहतात तर काही त्याचेही समर्थन करतात.
आता चालू असलेला असाच वादग्रस्त निर्णय. पॉलिसी डिसिजन्स ज्यामूळे जी चालू आहे ती व्यवस्था कोलमडून पडते. स्टेबल रिजन अनस्टेबल बनतात. करफ्यू, नेटबंदीच लोण एकापेक्षा अधिक ठिकाणी पसरत जाते. सरकारचे माजी अर्थ सल्लागार अरविंद सुब्रमण्यम अर्थव्यवस्थेबद्धल गंभीर इशारा देत असताना जे काही चालू आहे ते म्हणजे, आधीच उल्हास त्यात फाल्गून मास असे काहीसे. पण सारासार विचार करू शकणार्या कुंपणावरच्या समर्थकांचे मौन / मूक संमत्ती मला जास्त हानीकारक वाटते.
टीव्ही,फ्रिज,वाहनं,मोटारी
>>टीव्ही,फ्रिज,वाहनं,मोटारी या व्हाईट गुड्सबद्दल 'एक चालू असताना ती वस्तू टाकून दुसरी नवीन' घेऊ हा विचार कमी झाला असावा.
हे लोकांना उधळपट्टी न करण्याची उपरती झाल्यामुळे असेल की उत्पन्नाच्या स्रोतांविषयी शंका* वाटू लागल्याने लोकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली असेल?
*एक वस्तू असताना नवी घेणारे लोक म्हणजे चांगले उच्च उत्पन्न गटातले लोक असतात. ज्यांना रोजच्या नव्हे तर पुढच्या दोनतीन वर्षांच्या जेवणाची चिंता नसते.
एक वस्तू असताना नवी घेणारे
एक वस्तू असताना नवी घेणारे लोक म्हणजे चांगले उच्च उत्पन्न गटातले लोक असतात.
हो. शिवाय महागाई आणि शहरातल्या जरा बाहेर मोठ्या जागा मिळतात तिकडे जाणारी नोकरदार जोडपी सासुसासरे/आइवडिलांच्या शहराच्या मध्यवर्ती जागेतच कसेतरी राहू या विचारामुळे एक प्रकारची लादलेली एकत्र कुटुंबपद्धती व त्याचे गुणगान सुरू झाले आहे. अर्थात काही व्हाईट गुडस शेअरिंग पद्धतीने वापरल्या जाऊ लागल्या.
एकदा का आर्थिक चटके कमी करणे सुरू करण्याचे ठरले की त्याच्या पुष्ट्यर्थ सांस्कृतिक नातीगोतींचं महत्त्व वगैरे खरडी पासरीभर पडतात.
तर काय -एकूण खप कमी होण्यास कारण वाढले.
उत्पन्नाच्या स्रोतांविषयी शंका* वाटू लागल्याने
हे तर अगदी उंबऱ्यावर येऊन बसलय भूत. पर्यटन कंपन्यांचेही काही खरं नाही. (कॉक्स & किंग्झ!)
सुहास पळशीकर यांचा नागरिकत्व
सुहास पळशीकर यांचा नागरिकत्व सुधारणा बिलाविषयी लेख 'इंडियन एक्सप्रेस'मधून -
Scars of CAB protests will further burn bridges between northeast and rest of India
रामचंद्र गुहा अटकेत
रामचंद्र गुहा यांना आंदोलनादरम्यान अटक करण्यात आली आहे
CAA आंदोलन: राजधानी दिल्लीत मोबाइल सेवा बंद
CAA आंदोलन: राजधानी दिल्लीत बहुतांश भागामध्ये मोबाइल सेवा बंद
आणि मेट्रोची १८ स्टेशने बंद असं रेडिओवर सांगतायत.
नागरिकत्व कायद्याला विरोध: दिल्लीत जमावबंदी; इंटरनेट, मेट्रोही बंद
मोदी ज्या बेपर्वाईने उतावीळपणे निर्णय घेत आहेत्
मोदी एकापाठोपाठ ज्या रितीने अत्यंत संवेदनशील ज्वलनशील विषयांवर निर्णय घेत आहेत. ते निर्णय योग्य आहेत की अयोग्य हा विषय बाजुला ठेवला. तर किमान असे निश्चीतपणे म्हणता येते की. ज्या एक एक प्रचंड व्यापक निर्णयाने उदा. ३७० अगोदर आणि आता सीएबी एनआरसी संपुर्ण समाज हादरणार आहे या निर्णयामुळे दिर्घ़काळ समाजसरोवर ढवळुन निघुन त्यावर असंख्य तणावतरंग निर्माण होणार आहेत. याची मोदी सरकारला सुस्पष्ट कल्पना असुनही.
पहील्या निर्णयाचे पडसादही जोवर थांबत नाही तो विषय अजुन विझत नाही तोवरच दुसर्या निर्णयाचा बॉम्ब टाकण्याची सरकारची ही उतावळी अपरीकक्व बेपर्वाइ दर्शक घाई अत्यंत चुकीची आहे इतकेच म्हणायचे आहे. आणि ज्वलनशील विषयांपेक्षाही अगत्याचे असणारे आर्थिक प्रश्न आर्थिक विषय मागे पडत आहेत हे अधिकच चिंताजनक आहे.
३७० चा निर्णय वा सीएबी चा निर्णय योग्य आहे की अयोग्य हा विषयच वेगळा यावर सध्या काहीच मत नाही पण ही जी शो ऑफ ची शैली आहे ती भयावह आहे. यात सरकारची या निर्णयांचा जनतेवर होणारा परीणाम आटोक्यात आणण्यासंदर्भातली संवेदनशुन्यताच दिसुन येते. तुम्ही कितीही मेलात तरी चालेल आम्ही एकामागोमाग निर्णय घेतच राहु समाज कितीही टोकाचा अस्थिर झाला तरी निर्णय रथ थांबणार नाही असे दिसते.
सरकारच्या या संवेदनशुन्य बेपर्वा उतावळ्या निर्णयशैली वर मान्यवरांची मते जाणुन घ्यायची उत्सुकता मला आहे.
पूर्ण बहुमत मिलाले आहे.
पूर्ण बहुमत मिलाले आहे.
आर्थिक आघाडीवर जी पडझड* सुरू आहे तिला थोपवण्याचे कोणतेहि मार्ग दिसत नाहीत. (टॅलेंटची कमतरता आणि जाणकारांचे न ऐकण्याची मनोवृत्ती)
त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यंत कदाचित असंतोष हाताबाहेर जाऊन सत्ता गमावण्याची वेळ येईल.
म्हणून आपला जो मुख्य अजेंडा आहे तो पूर्ण करून घेण्याची घाई असावी.
शेषन ह्यांचं निधन.
माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन ह्यांचं निधन. माझ्या वाढत्या वयात निवडणुका वगैरे प्रकरणांत रस निर्माण होण्यात शेषन ह्यांचा धडाका आणि त्यांना माध्यमांकडून मिळालेला मोठा प्रतिसाद ह्या दोन गोष्टी कारणीभूत होत्या.