Skip to main content

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

'ऐसी अक्षरे' व्यवस्थापनाकडून नोंद - सदर लेखात व्यक्त केलेल्या मतांशी व्यवस्थापन सहमत नाही.

माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.

आधुनिक काळात भारतात प्राकृतिक चिकित्सा प्रचलित करण्यात महात्मा गांधी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. एडोल्फ जूस्टची पुस्तक रिटर्न टु नेचर या पुस्तकाने महात्मा गांधींना प्रभावित केले. त्यांनी 18 नोव्हेंबर 1945 मध्ये 'ऑल इंडिया नेचर क्योर फाउंडेशन ट्रस्ट' स्थापना केली. आज या जागेत आयुष मंत्रालयच्या अंतर्गत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आहे. आयुष मंत्रालयाने 2018 मध्ये 18 नोव्हेंबर हा दिवस प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून घोषित केला. आज अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्रात औषधांचा वापर न करता, माती, पाणी, ऊन, वाष्प, योग, आहार नियंत्रण इत्यादि द्वारा रुग्णांचा उपचार केल्या जातो. आयुर्वेदातील पंचकर्म, षटकर्म चिकित्सा ही दिली जाते. भारतातील विद्यमान अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्र सामाजिक संस्थांद्वारे चालविले जातात. स्वस्त असूनही ही चिकित्सा पद्धतील लोक मान्यता मिळाली नाही. लोकांचा विश्वास या पद्धतीवर बसत नव्हता. मुख्य कारण, आधुनिक मापदंडवर प्रमाणिकता सिद्ध करण्यासाठी अनुसंधानवर खर्च करणे या संस्थांच्या आवाक्या बाहेर आहे. याशिवाय सरकारची भारतीय चिकित्सा पद्धतींबाबत अनास्था. आयुष मंत्रालयाची स्थापनाच 2014 मध्ये झाली. अल्प बजेट असले तरी थोडे फार अनुसंधान कार्य ही मंत्रालयाने सुरू झाले आहे. भविष्यात बजेट ही वाढेल आणि परिणाम ही उत्तम मिळतील ही अपेक्षा.

करोना काळात आमच्यापाशी औषध नाही. तरीही प्रोटोकॉलानुसार एलोपैथीची रेमडेसिवीर, हायड्रोक्लोरोक्वीन , फेबुफ्लू इत्यादि कोरोंना विषाणू विरुद्ध निरर्थक औषधी दिल्या गेल्या. परिणाम हजारो डॉक्टर सहित लाखो रुग्ण दगावले. करोना आणि औषधींचे साईड इफेक्ट ही मुख्य कारणे. दुसरीकडे प्रकृति प्रदत्त गिलोय, अश्वगंधा इत्यादि औषधी प्रभावी ठरल्या. परिणाम, दिल्लीचेच बघा प्रोटोकॉल मध्ये नसतानाही दिल्लीचे अधिकान्श हॉस्पिटल रुग्णांना काढा देऊ लागले. का? याचे उत्तर मला एक ही डॉक्टर देऊ शकला नाही. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये कार्य करणारे अधिकान्श कर्मचारी स्वतचा प्राण वाचविण्यासाटी ज्याला आयएमए शिव्या देते त्या रामदेवचे कोरोनील घेऊ लागले. सकाळी उठून योग आणि प्राणायाम करू लागले. अधिकान्श करोना रुग्णांनी एलोपैथी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली, हे सत्य मेडिकल माफियाला पचणे कठीणच. अर्थात खर्‍या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोण असणार्‍या डॉक्टरांनी कधीच प्रामाणिक आयुर्वेदिक औषधींचा करोना काळात विरोध केला नाही.

पतंजलिने योग आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सेवर अनुसंधानासाठी पतंजलि रिसर्च फाउंडेशन आणि पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूटची स्थापना केली आहे. करोना काळात रिसर्च आधारित अत्यंत स्वस्त औषधी देऊन भारतात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले. पतंजलिने जगातील सर्वात मोठे प्राकृतिक चिकित्सा केंद्र योगग्रॉमची स्थापना 2009 मध्ये केली होती जिथे 400 निवासी रुग्ण एका वेळी निवासी प्राकृतिक चिकित्सा घेऊ शकत होते. पण 2020 एप्रिल पासून ही क्षमता नवे निर्माण करून अल्पावधीत 1000 पर्यन्त वाढवावी लागली. सीजीएचएस ने ही सरकारी कर्मचार्‍यांसाठी एप्रिल 2021 पासून काही आयुर्वेदिक आणि प्राकृतिक चिकित्सा केंद्रांना पंचकर्म, षटकर्म सहित प्राकृतिक चिकित्सेसाठी अनुमति दिली. आज अनेक प्राकृतिक चिकित्सा केंद्र ही आपले विज्ञापन, फेसबूक वर का होईना, देऊ लागले आहे. करोना काळात लोकांचे डोळे उघडले. अधिकान्श रोगांत प्राकृतिक उपायच अधिक कारगर आहे, हे कळले. निसर्ग प्रदत्त चिकित्सेचे भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. प्राकृतिक चिकित्सा दिवसाची सर्वांना शुभेच्छा.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

'न'वी बाजू Thu, 25/11/2021 - 18:10

In reply to by सई केसकर

एक अनाघ्रात बाई गर्भवती राहिल्याचे मिडलईस्टमधील उदाहरण सुप्रसिद्ध आहे की!

(राजेशजी छुपे ख्रिस्ती असावेत, असा संशय येतो.)

लंपन Fri, 26/11/2021 - 07:39

In reply to by 'न'वी बाजू

मिडलिस्टर्न बाईंनी गोऱ्या, ब्लॉन्ड आणि निळ्या डोळ्याच्या बाळाला जन्म दिलेला म्हणे त्या केस मध्ये...

मनीषा Wed, 24/11/2021 - 12:17

आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गोपचार यांचा प्रसार आणि प्रचार करणारे श्री पटाईत यांनी, तीन- चार वर्षांपूर्वी (जर मला स्मृती दगा देत नसेल तर) अधुनिक वैद्यक शास्त्रानुसार शस्त्रक्रिया करवून घेतली होती आणि आजारपणापासून संरक्षण मिळवले होते. म्हणजे हे तर "लोकां सांगे ब्रम्हज्ञान ... " असेच म्हणावे लागेल.
आयुर्वेद शास्त्र अजिबात निरूपयोगी आहे असे नाही, परंतु त्याचा उपयोग तारतम्य बाळगून करायला हवा. परिचितांमधे अशी काही उदाहरणे बघितली आहेत, की आयुर्वेदाचा अनाठायी आग्रह धरून त्यांनी प्रकृतीची हेळसांड केली आणि भयंकर दुष्परिणाम भोगायला लागले.
माझ्या मते आयुर्वेद निरोगी जीवनशैली कशी आत्मसात करावी हे सांगते. आयुर्वेदिक उपचार हे दीर्घकालीन असतात. तातडीने आणि त्वरीत परिणाम देणारी औषधे अजून तरी उपलब्ध नाहीत. योगासने, योगोपचार, निसर्गोपचार , ध्यानधारणा इ. दीर्घकालीन स्वास्थ्य नक्कीच देतात. परंतु एखाद्या गंभीर आजारापासून त्वरीत संरक्षण देणारे, खात्रीलायक आयुर्वेदिक औषधोपचार उपलब्ध नाहीत. असे असताना अधुनिक वैद्यक शास्त्रावर अविश्वास निर्माण करणारे असे प्रचारकी लेख लिहीणे आयोग्य आहे. यामूळे दिशाभूल होऊन एखाद्याच्या जीवावर बेतण्याची देखिल शक्यता आहे.

ऐसी प्रशासनाचा निर्णय अगदी योग्य आहे.

Rajesh188 Thu, 25/11/2021 - 14:21

In reply to by मनीषा

आधुनिक शास्त्र कडे पण उपचार नाहीत.कोणताच डॉक्टर लिहून गॅरंटी देत नाही.
माझ्या छाती मध्ये दुखत आहे अशी तक्रार घेवून डॉक्टर कडे गेले.
तर तुम्हाला अटॅक येणार नाही ह्याची गॅरंटी आहे असे कोणताही डॉक्टर लिहून देईल का?

चिमणराव Wed, 24/11/2021 - 14:50

चिकित्सा करत नाही. परवडेल त्याच्याकडे, तिथे जातो. बरा होतो.
वादविवाद त्याच्यासाठी नसतो.

Rajesh188 Wed, 24/11/2021 - 21:32

ह्या दोन चीकिस्ता पद्धती मध्ये.
जे डॉक्टर लोकांचे तीव्र मतभेद आहेत एकमेकांस पाण्यात बघतात जणू काही हिंदुस्थान पाकिस्तान. च आहेत.
त्याला व्यावसायिक कारण आहे धांद्या वर परिणाम होतो म्हणून झगडा आहे..
. तात्विक झगडा बिलकुल नाही.
सामान्य लोकांचे मतभेद आहेत त्याला काय कारणे असावीत.
इथे पण तात्विक कारण नाही.
वेगळीच कारणे आहेत .

Rajesh188 Thu, 25/11/2021 - 14:09

बाकी कोणत्या ही देशात लोक आयुर्वेद, चा तिरस्कार करतात का?
की आयुर्वेद नी दावे केले ले सर्व प्रकार शास्त्रीय कसोटी मध्ये बसत आहे की नाही ह्याचा शोध घेतात..
भारत देश व्यक्तिरीत जगातील सर्व देश .
आयुर्वेद मध्ये सांगितलेले ज्ञान खरे आहे की खोटे ह्याची आधुनिक शास्त्र नुसार तपासणी करतात.
आणि नंतर व्यक्त होतात..
भारत हा एकमेव देश आहे इथे पूर्वग्रह असणारी जमात खूप आहे.
काहीच न सिध्द करता फक्त फालतू दावे केले जातात.
हळद आणि कडू निंब ह्याचे पेटंट वर पण दुसऱ्या देशांनी दावा केला होता.
जागरूक आणि विज्ञान वादी(खरे नकली नाहीत) लोकांनी तो डाव हाणून पाडला.

Rajesh188 Thu, 25/11/2021 - 15:19

१) खसा खराब असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या उपयोगी पडतात
करोडो लोकांचा अनुभव आहे आणि माझा पण.
२) जखम झाल्यावर हळद लावली जाते त्या मुळे इन्फेक्शन होत नाही
करोडो लोकांना अनुभव आहे आणि मला पण.
३) दात दुःखी वर लवंग उत्तम काम करते .
करोडो लोकांचा अनुभव आहे आणि माझा पण.
४) ज्या प्रदेशात राहता त्या प्रदेशातील नैसर्गिक आहार च शरीराला उत्तम असतो ( स्थलांतरित लोक ह्या मध्ये नाहीत)
लाखो वर्षाचा अनुभव वरून काढलेला निष्कर्ष आहे
५) योगा केल्या मुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
हा जागतिक अनुभव आहे आणि माझा पण आहे
६) रिटा हे फळ होते आज दुर्मिळ आहे.त्यांनी कपडे स्वच्छ केली जात
आज चा कपडे साफ करण्याचा साबण आणि रिटा ह्या मध्ये काय फरक आहे .
शास्त्रीय रिती नी कोणी सिद्ध केले आहे का.
७)शिकेकाई केसांसाठी उत्तम प्राचीन ज्ञान लाखो वर्षाच्या अनुभव वरून .
आताचे शाम्पू आणि शिकेकाई ह्यांच्या गुणधर्मात काय फरक आहे शास्त्री दृष्ट्या कोणी सिद्ध केले आहे का?
८) आधुनिक टूथ पेस्ट आल्या पासून माणसाच्या दाताचे आरोग्य उत्तम राहते
हे कोणी सिद्ध केले आहे का?
पाहिले सिद्ध करा आणि नंतर विरोध करा.
हीच प्रामाणिक इच्छा.
आंधळे पने प्राचीन ज्ञान जे अनुभव वर अवलंबून आहे ते आणि आताचे आधुनिक ज्ञान ते फक्त प्रयोग शाळेत सिद्ध झाले आहे .
ह्या मध्ये कोणते श्रेष्ठ हा निर्णय भावनेने घेवू नका
विज्ञान चे नियम नेहमी लक्षात असू द्या

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 29/11/2021 - 06:24

In reply to by Rajesh188

मला सध्या अलर्जीमुळे नाक गळणं, शिंका वगैरे त्रास होतोय; आणि हा प्रतिसाद लिहिताना मी एकीकडे हळद-मध चाटत्ये. त्यानं बरंही वाटतंय, शिंका थांबल्यात, नाक गळणं थांबलंय, घसा खवखवणं खूपच कमी झालंय. कफ सिरप पिण्यापेक्षा हळद-मध मला बरं वाटतं. बरं मग?

माझ्या अलर्ज्या आणि त्यामुळे होणारी सर्दीसारखी लक्षणं आणि कोव्हिड, कोव्हिडवरच्या उपचारांशी संबंध काय? मूळ विषय काय, तुमचा प्रतिसाद काय?

Rajesh188 Mon, 29/11/2021 - 14:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तर जगातील सर्व देशात असणाऱ्या परंपरा ,प्राचीन ज्ञान सर्व क्षेत्रातील ह्यावर जागतिक विचार विनिमय होवून .
सर्व माहिती एकत्र करून प्रतेक गोष्टीचे शास्त्र शुध्द विश्लेषण केले पाहिजे.
माझी विचार धारा ही खास आहे म्हणून मी सर्व नाकारणे हा फालतू पना नको.
जो शास्त्रीय कसोटी मध्ये निष्कर्ष निघेल तो मात्र मान्य च असला पाहिजे .पाश्चिमात्य राष्ट्र पूर्वी चे ज्ञान वापरून तेच नवीन आहे म्हणून धंदा करतील .
इन्कम महत्वाचा.
पण बाकी राष्ट्र नी ज्यांना इतिहास आहे त्यांनी जोर लावला पाहिजे..
हेच स्पष्ट मत आहे.

Rajesh188 Thu, 25/11/2021 - 15:57

Agenda चालू ध्या फक्त विज्ञाना लाच बदनाम करु नका .
विज्ञान वादी लोक अजेंडा चालवत नाहीत ह्याचे भान ठेवा.

सुनील Sat, 27/11/2021 - 12:55

'तिकडे' केवळ एका "अतार्किक" प्रतिसादासह लेख दुसऱ्या पानावर आणि इथे चक्क सेंच्युरी??

Rajesh188 Sun, 28/11/2021 - 15:29

पाश्चिमात्य हेकेखोर लोक आणि भारतील कशी हेकेखोर लोक ह्या मुळे जगाचे खूप नुकसान झालेले आहे.
प्राचीन ज्ञाना ला काहीच कारण नसताना कमी लेखणे ही ह्यांची वृत्ती चुकीची आहे.
अनेक औषधी वनस्पती त्यांचे गुण धर्म,त्यांची रोग निवारण करण्याची क्षमता असे खूप प्रचंड ज्ञान ,माहिती अस्तित्वात आहे.
पण त्याच्या वर कोण संशोधन करायला लागले की त्याची खिल्ली उडवणे ही नक्की कोणती वृत्ती हे समजत नाही.
ऑस्ट्रेलिया मध्ये प्राचीन काळी उपचार साठी त्या वेळी वापरत असणाऱ्या वनस्पती मध्ये असे घटक आहेत की ते कॅन्सर उपचार मध्ये अत्यंत मोलाची मदत करू शकतात.
कॅन्सर पेशींचे औषधांना विरोध करण्याची वृत्ती ते मोडून काढू शकतात,त्यांची वाढ थांबवू शकतात.
फक्त हिणकस वृत्ती मुळे त्या वर संशोधन करू दिले जात नाही.
Science alert वर च लेख आहे.
पृथ्वी वर सापडणारे एक विषारी झाड covid च्या सर्व mutation वर उपयोगी पडू शकते.
भारतात तर ज्ञाना चा खजिना आहे फक्त हेकेखोर लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे गरजेचे आहे
ते काम पतंजली करत च आहे.
राज आश्रय मिळाला तर खूप प्रगती होईल नाही तर अडथळे आणून संशोधन करू दिले जाणार नाही.
अटॅक आला मग का डॉक्टर कडे गेलं पारंपरिक औषध का वापरली नाहीत .
असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांच्या बुध्दी ची कीव येते.

माचीवरला बुधा Sun, 28/11/2021 - 22:55

In reply to by Rajesh188

“पृथ्वी वर सापडणारे एक विषारी झाड covid च्या सर्व mutation वर उपयोगी पडू शकते.”

याला पुरावा काय? की पुरावा वगैरे मागायचाच नसतो?

मी ती लिंक वाचली. धन्यवाद. पण Thapsigargin (TG) ची covid च्या पेशंट्सवर एकही clinical trial झालेली नाही. त्यामुळे ते रसायन कोव्हिडवर उपचार ठरू शकेल की नाही याबद्दल काहीही सांगतां येत नाही. विज्ञानाची एक विशिष्ट पद्धत असते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन चालत नाही.

Rajesh188 Mon, 29/11/2021 - 16:03

In reply to by माचीवरला बुधा

पूर्वजांच्या अनुभव वरून त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत त्याची समीक्षा झाली पाहिजे.
आधुनिक शास्त्र च्या नियमाने . कठोर परीक्षणं
नंतर जे निष्कर्ष निघत असेल त्या वर व्यक्त व्हा
अगोदरच प्राचीन सर्व भोंदू,अज्ञान, हा निष्कर्ष काढू नका
राजकीय नुकसान होण्याची भीती आहे ,मान्य आहे.
तरी सत्याच्या बाजूला उभे रहा.
हेच तर सांगायचा प्रयत्न करत आहे

तारारमपम...पम् Mon, 29/11/2021 - 07:41

यज्ञ?? दिल्लीतील प्रदूषण कमी पडले की काय, अजून धूर हवाय! यज्ञ, त्याच्या मागून चातुर्वर्ण्य...अंधार युगाकडे वाटचाल आहे.

'न'वी बाजू Mon, 29/11/2021 - 08:53

In reply to by तारारमपम...पम्

यज्ञात झोपणारे लोक आहेत… चालायचेच.

anant_yaatree Mon, 29/11/2021 - 15:21

भारतात हजारो (किंवा लाखो) वर्षांपूर्वी कोविड चा प्रादुर्भाव झाला असावा व त्यावेळी भारतातील ज्ञानी लोकां नी केलेल्या अंतर्ज्ञानोद्भव अनुसन्धाना मुळे त्यावर मात केली असावी त्यामुळे च मार्च 2020 पूर्वी हजार (की लाख) वर्षे भारतात कोविड च्या केसेस आढळल्या नसाव्यात असे स्पष्ट मत आहे.

Rajesh188 Mon, 29/11/2021 - 15:28

In reply to by anant_yaatree

२१ vya शतकातील आहात.सर्व प्राचीन महापुरुषांचे विचार त्याग करा.
स्व बुध्दी वापरा.
कोणत्याच डावे,उजवे,मधले कोणतेच विचार स्वीकारू नका.
आणि परत विचार करून तुम्ही जी पोस्ट केली आहे त्याला काही अर्थ आहे का?
ह्याचा विचार करा.

मारवा Sat, 11/12/2021 - 06:37

व्यवस्थापनाने असे हायलाइट करुन काय साधले ?
यााने लेखकाची रॅगिग करन्यास अप्रत्यक्शा पणॅ प्रोत्साहन , संस्थला च्या तटस्थतेविषयी संशय, ऐसी डाव्यांचे माहेरघर उजव्यांचे यातनाघर वगैरे ( चे गव्हेरा चा फोटो मेन बोर्डावर आर्वजुन लावणॅ ) हे सर्व टाळले तर बरे होइल.
एका बाजुचे असन्यात काहीच् गैर ही नाही पण ते किमान स्पष्ट असावे . तटस्थांच्या तुटवड्यात आणखी भर नसती तर बरे
तटस्थतेचे आकर्शण आणी त्यापेक्षा त्याचा प्रभाव हा मोठा असतो त्याचा सर्वात मोठा फायदा असा की विरोधी मतांची व्यक्ती सुद्धा आपल्या मतांप्र्ति लवचिक होते , मुरड घालन्यास तयार होते. पण तसे नसल्यास मग विरोधी विचारासाठी मनाची कवाडेच साधी किलकीली ही केली जात नाहीत.
मग ते पांचजन्य काय वाचायचा ? माहीतेय त्यात काय असणाऱॅ ( प्रत्येक पक्षाचा पांचजन्य असतोच की तो मेंबरां शिवाय कोण वाचतो ) पण तटस्थतेची ताकद असते की सर्वात मोठी ताकद त्याला सिरीयसली घेतले जाते . उदा आ.ह. साळूखे किवा ह मो मराठे पेक्षा सदानंद मोरे हे सिरीयसली कन्सीडर होतात ( उदाहरण चपखल नाही एका बाजुने पण समजुन घ्या )
असो

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/12/2021 - 01:25

In reply to by मारवा

बिचारे डावे! त्यांना माहेरपणासाठी ऐसीवर यावं लागणार!! मला डाव्यांबद्दल अधिक करुणा वाटते ती अशाच कारणांमुळे!!

हा धागा वरपर्यंत स्क्रॅाल करून पहा. अदितीतैंनी २२ नोव्हेंबर ला लिहिलेल्या प्रतिसादात तसा शेरा का दिला याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. यात डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा काहीच संबंध मला दिसत नाही.