Skip to main content

अस्टेरॉइड २०१२DA१४

millions of sleepless people staring in helpless terror at the incandescent sky; and then, low and growing, came the murmur of the flood. And thus it was with millions of men that night – a flight no whither, with limbs heavy with heat and breath fierce and scant, and the flood like a wall swift and white behind. And then death.

—H. G. Wells, “The Star”

फेब्रुअरी २०१३
जगातील खगोलशास्त्रज्ञ उत्सुकतेने अस्टेरॉइड २०१२DA१४ची वाट पाहत होते.
अस्टेरॉइड २९१२DA१४चा शोध एका वर्षापूर्वी एका स्पॅनिश दंतशल्याने(!) लावला होता. तो हौशी आकाश निरिक्षक होता. स्पॅनिश वेधशाळेने टिपलेल्या आकाशाच्या फोटोंची तपासणी करत असताना हा लघुग्रह त्याच्या नजरेस पडला. अवकाशात असे लाखो लघुग्रह फिरत आहेत. त्याची रुंदी १५० फूट होती. ही देखील सर्वसामान्य गोष्ट होती. ह्यात काही नवल विशेष नव्हते. तरी देखील ह्या लघुग्रहाने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. कारण एक वर्षाने म्हणजे १५ फेबुअरी २०१३ रोजी हा पृथ्वीच्या जवळून म्हणजे फक्त १७००० मैल अंतरावरून जाणार होता. शास्त्रज्ञांनी ह्याच्या कक्षेचा अभ्यास करून हे भाकीत केले होते. तसेच १७००० मैल अंतर ही गोष्टही फारशी चिंताजनक नव्हती. दोनच वर्षांपूर्वी रिचर्ड कोवाल्स्की ह्या खगोलशास्त्रज्ञाने शोधलेला २०११CQ१ हा तीन फुट रुंदीचा अतिलघुग्रह पृथ्वीपासून केवळ ३४०० मैल अंतरावरून गेला होता. फरक इतकाच होता कि २०१२DA१४ इतक्या जवळून जाणारा त्या आकाराचा पहिला लघुग्रह होता. २०११CQ१चे अस्तित्व पृथ्वीशी “डावी-उजवी” व्हायच्या आधी काही तासच लक्षात आले होते. पण २०१२DA१४ चे “स्वागत” करायला शास्त्रज्ञांना एक वर्ष मिळणार होते.
हा लघुग्रह दुर्बिणीशिवाय दिसणारा नव्हता, पण साध्या दुर्बिणीतून किंवा चांगल्या प्रतीच्या बायनाक्युलर मधून त्याचे दर्शन होऊ शकले असते. खगोलशास्त्रज्ञ जय्यत तयारीनिशी सज्ज झाले होते.
वर्तमानपत्रे मागे कशी राहतील? त्यांनी भडक मथळे देऊन ही बातमी प्रसृत केली.
“अस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून घोंघावत जाणार.”
“पृथ्वी थोडक्यात वाचणार.” इत्यादी.
आणि आजचे वर्तमानपत्र असते तर?
“ही ह्याच्यापासून थोडक्यात वाचली. समजून घ्या कोण आहे ही?” असे क्लिक-बेट मथळे दिले असते.
नासाने जाहीर केले की आमचे तज्ञ लाघुग्रहाबद्दलच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. ज्या दिवशी हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार होता त्या दिवशी विएना मध्ये ह्या विषयातील तज्ञांची बैठक भरणार होती.
एकूण लोकांनी ह्या लघुग्रहाची हवा हवा केली होती, पण...
हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार होता त्याच्या आधी केवळ सोळा तास रशियातील चेल्याबिंस्क या शहरात एक विचित्र घटना घडली. एक नवीन “नभोनाट्य” घडले.
आणि क्षणात लोक २०१२DA१४ विसरून गेले.
चेल्याबिंस्क हे कुप्रसिध्द औद्योगिक शहर होते. जवळच मायाक प्लुटोनिअम प्रोड्युसिंग प्लांट होता. हा कारखाना त्यांचा किरणोत्सर्गी कचरा जवळच्या नदीत फेकत होते. ह्या कारखान्यात एकदा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात अगदी चेर्नोबिल पेक्षाही जास्त प्रमाणात किरणोत्सर्ग झाला होता. अशा ह्या शहरातील रहिवासी रोगग्रस्त होतील यात नवल ते काय?
सूर्योदयाच्या सुमारास एका २० मीटर रुंद लघुग्रहाने ताशी ४२००० मैल वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला, ती जागा होती चेल्याबिंस्क! आता त्याने पेट घेतला होता. अश्या ह्या अग्निगोलकाचा चेल्याबिंस्क शहरावर १४ मैलावर हवेत स्फोट झाला. ह्या शक्तिशाली स्फोटाची ताकत ५०० किलोटन होती. हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणु बॉंबच्या पेक्षा ३० पटींनी जास्त होती. ह्या स्फोटामुळे आघात तरंग (शॉकवेव) तयार झाले. नव्वद सेकंदानंतर ह्या तरंगाने चेल्याबिंस्कला धडक दिली.
आकाशातला अग्निगोल आणि स्फोट बघायला लोक घराच्या खिडक्यात उभे होते. शॉकवेवमुळे खिडक्यांची तावदाने फुटली आणि लोकांच्या डोळ्यांना, चेहऱ्याला जखमा झाल्या. धक्क्यामुळे लोक इतस्ततः फेकले गेले. एका स्त्रीच्या मणक्याला इजा पोचली, स्फोट बघितलेल्या काही लोकांची दृष्टी अधुरी झाली. हजारांपेक्षा जास्त इमारतींची हानी झाली. लघुग्रहाचे हजारो तुकडे झाले. कोई यहा गिरा कोई वहा गिरा. सुदैवाने प्राणहानी मात्र झाली नाही.
ह्या शतकातील तीन मोठ्या घटनांचा अनुक्रम असा आहे.
१. तुंगाश्का
२. चेल्याबिंस्क
३. सिखोट अलिन पर्वत
ही तिन्ही घटनास्थळे रशियात आहेत हा योगायोग नाही. रशियाचा भौगोलिक विस्तार इतका मोठा आहे कि तिथे अश्या घटना घडण्याची शक्यता १ in ३२ आहे तर मालदीव सारख्या बेटावर ही आपत्ती कोसळण्याची शक्यता १ in २००००० आहे. रशिया जैसे देशमे ऐसी छोटी मोटी चीजे होती रहती है.

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात अद्वा तिद्वा मथळे देऊन ही बातमी छापून आली. अनेक अफवांचे चर्वितचर्वण सुरु झाले. जसे
“रशियन हवाई दलाने हल्ला करून लघुग्रह पडला...”
“अमेरिकेने गुप्त अस्त्राची चाचणी केली....”
खगोलशास्त्रज्ञ पुरते गोंधळून गेले. ते ज्या लघुग्रहाची दुर्बिणी रोखून वाट पाहत होते त्या ऐवजी ही बया कुठून आली. झाल्या प्रकाराची त्यांना थोडी लाज वाटली. नंतर नीट खुलासा झाला. २०१२DA१४ चा ह्या उत्पाताशी काहीही संबंध नव्हता. हा निव्वळ योगायोग होता. चेल्याबिंस्कच्या आकाशात स्फोट झालेला उपग्रह सूर्याला पाठी ठेऊन पृथ्वीकडे झेपावला होता. आणि त्या वेळच्या दुर्बिणी सूर्याकडे रोखणे शक्य नव्हते. (कारण त्यांची “दुर्बीण-फ्राय” झाली असती.) त्यामुळे तो नजरेतून निसटला होता. हा जर आधीच दिसला असता तर चेल्याबिंस्कच्या लोकांना आगाऊ तयारी करता आली असती.
ज्या संशयात्म्यांना अजूनही धोक्याची गंभीरता लक्षात आली नसेल त्यांच्यासाठी कृपा करून “थोडक्यात चुकामुक” झालेल्या लघुग्रहांची यादी इथे मिळेल---

https://en.wikipedia.org/wiki/List_of_asteroid_close_approaches_to_Earth

चेल्याबिंस्कच्या लघुग्रह स्फोटाचा विडीओ
https://www.youtube.com/watch?v=dpmXyJrs7iU&ab_channel=Tuvix72

२०१२DA१४चे आताचे नाव आहे 367943 Duende आहे. द्युएन्ड हे परीकथेतील उपद्व्यापी गॉब्लिनचे नाव आहे. वेट अ मिनिट हा पुन्हा १५ फेब्रुअरी २०४६ला परत येणार आहे!
आता एक सिक्रेट सांगणार आहे. पण मी सांगितले असे कुणाला सांगू नका. हे जे जुन्या काळाचे प्लेग आणि सध्याचा कोविड ह्यांचे विषाणू अशाच लघुग्रहांनी/ धुमकेतूंनी पृथ्वीवर आणले असे काही खगोलजीवशास्त्रज्ञांचे मत आहे असे म्हणतात म्हणे. खर खोट देव जाणे!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अरविंद कोल्हटकर Fri, 02/09/2022 - 21:41

त्सारकालीन रशिया मध्ये जून ३०, १९०८ ह्या दिवशी असाच एक प्रसंग तुंगुष्का नदीच्या परिसरात घडला. त्याची माहिती येथे पहा.

सुधीर Fri, 02/09/2022 - 22:19

ज्या संशयात्म्यांना अजूनही धोक्याची गंभीरता लक्षात आली नसेल त्यांच्यासाठी कृपा करून “थोडक्यात चुकामुक” झालेल्या लघुग्रहांची यादी इथे मिळेल

यादी पाहून संशय दूर झाला. :-) त्या पेजवर ॲनिमेशन पण खूप चांगले बनविले आहे.

सुधीर Sat, 10/09/2022 - 20:42

सध्याचे तंत्रज्ञान किती अचूक (वा ढोबळ) अंदाज देवू शकते, की अमुक एका ठिकाणी अमक्या वेळी (किती तास अगोदर) असे घडू शकते.

जोपर्यंत कॉर्पोरेटचा पैसा या संशोधनासाठी येत नाही तोपर्यंत संशोधनाला चांगली गती मिळणार नाही. एकट्या नासाने (वा युएसनेच) याचा भार का सहन करावा. सध्या तरी दोशोदेशीचे कॉर्पोरेट्स ESG वर पैसा खर्च करताना दाखवत आहेत. (त्यात त्यांचा स्वार्थ पण आहे, नाहीतर त्यांचे समभाग गडगडतील. इंडेक्स मध्ये समावेश नाही झाला तर). काहींचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. विजपुरवठ्याचे, पाण्याच्या वापराचे युनिट्स कमी केल्याची आकडेवारी निदान वार्षिक अहवालात "कागदावर" दाखवतात तर काही आपले "एलीडी दिवे लावले" अशी फुटकळ माहिती छापतात. पण एकंदर जागरुकता आल्याने तेवढे तरी पैसे खर्च होत आहेत. पण आश्चर्य आहे यावर कुणीच काही बोलत नाही आहे.

सुधीर Sat, 10/09/2022 - 20:44

सध्याचे तंत्रज्ञान किती अचूक (वा ढोबळ) अंदाज देवू शकते, की अमुक एका ठिकाणी अमक्या वेळी (किती तास अगोदर) असे घडू शकते.

जोपर्यंत कॉर्पोरेटचा पैसा या संशोधनासाठी येत नाही तोपर्यंत संशोधनाला चांगली गती मिळणार नाही. एकट्या नासाने (वा युएसनेच) याचा भार का सहन करावा. सध्या तरी दोशोदेशीचे कॉर्पोरेट्स ESG वर पैसा खर्च करताना दाखवत आहेत. (त्यात त्यांचा स्वार्थ पण आहे, नाहीतर त्यांचे समभाग गडगडतील. इंडेक्स मध्ये समावेश नाही झाला तर). काहींचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. विजपुरवठ्याचे, पाण्याच्या वापराचे युनिट्स कमी केल्याची आकडेवारी निदान वार्षिक अहवालात "कागदावर" दाखवतात तर काही आपले "एलीडी दिवे लावले" अशी फुटकळ माहिती छापतात. पण एकंदर जागरुकता आल्याने तेवढे तरी पैसे खर्च होत आहेत. पण आश्चर्य आहे यावर कुणीच काही बोलत नाही आहे.

Rajesh188 Sat, 10/09/2022 - 23:20

अंदाज हे अंदाज असतात त्याला गंभीर पने घेण्याची गरज नाही आज काल सायन्स विषयी माहिती कमी आणि जाहिरातबाजी जास्त असते.
अनेक शक्यता लपवलेल्या असतात.
जेव्हा खरोखर एकदा विशाल लघु ग्रह पृथ्वी वर धडक देव्याची तीव्र शक्य निर्माण होईल आणि जाहिराती मध्ये अंदाज केल्या प्रमाणे त्याचे आकाशात तुकडे करून पृथ्वी वर होणारे नुकसान थांबवले जाईल तेव्हाच असे काही तंत्र खरे आहे हे मी तरी मान्य करेल.
गर्दी बरोबर जाण्याची मला तरी सवय नाही.

Rajesh188 Tue, 27/09/2022 - 13:28

Astroid वर आघात केला जाणार आहे पण तो astroid प्रचंड वेगात त्याच्या कक्षेत फिरत आहे. ..
आकार नी जास्त मोठा नाही.
पृथ्वी च्या कक्षेत आल्या नंतर astroid वर आघात केला तरी धोका कमी होत नाही त्याचे तुकडे पृथ्वी वर पडू शकतात आणि ते विनाश पण घडवू शकतात.
त्या पेक्षा पृथ्वी च्या गुरुत्व कक्षे बाहेर च च आघात केला तर तो दिशा बदलेले का?
ह्याचा अभ्यास केला जात आहे
तो यशस्वी झाला तर भविष्यात पृथ्वी वर कोणते astroid आघात करू शकतात त्यांची दिशा बदलत येईल.

Rajesh188 Sun, 02/10/2022 - 18:11

ह्या मध्ये तथ्य असण्याची पण शक्यता आहे.अवकाशातून विषाणू जिवाणू अवकाश पिंड बरोबर पृथ्वी येवू शकतात.
आपले यान पण जाते दुसऱ्या ग्रहावर आणि परत येते तेव्हा पण असे alien जिवाणू,विषाणू पृथ्वी वर येवू शकतात
पृथ्वी वर पाणी आणि जीवसृष्टी साठीलागणारे primary रासायनिक संयुग पण बाहेरून च आले होते .
असे पण दावे आहेतं

Rajesh188 Sun, 02/10/2022 - 18:11

ह्या मध्ये तथ्य असण्याची पण शक्यता आहे.अवकाशातून विषाणू जिवाणू अवकाश पिंड बरोबर पृथ्वी येवू शकतात.
आपले यान पण जाते दुसऱ्या ग्रहावर आणि परत येते तेव्हा पण असे alien जिवाणू,विषाणू पृथ्वी वर येवू शकतात
पृथ्वी वर पाणी आणि जीवसृष्टी साठीलागणारे primary रासायनिक संयुग पण बाहेरून च आले होते .
असे पण दावे आहेतं

Rajesh188 Sun, 02/10/2022 - 23:18

In reply to by मार्मिक गोडसे

समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश नाही तरी खोल समुद्रात विविध जीव जंतू,प्राणी,वनस्पती आहेत.
Uv पृथ्वी वरील दृश्य जीव सृष्टी ला हानिकारक आहे म्हणजे सूक्ष्म जिवणापण हानिकारक असेल असे काही नाही.
तीव्र उच्च तापमानात पण काही सूक्ष्म जीव जिवंत राहतात.

प्रभुदेसाई Sun, 02/10/2022 - 19:37

आता फोटू टाकायला जमला!! Happy

प्रभुदेसाई Sun, 02/10/2022 - 20:04

http://cosmology.com/Panspermia10.html

Comets and Contagion: Evolution, Plague, and Diseases From Space
Rhawn Joseph, Ph.D.1, and Chandra Wickramasinghe, Ph.D. ह्या विद्वानांनी लिहिलेला हा लेख वाचनीय आहे.
https://www.laksara.com/professor-chandra-wickramasinghe-predicts-coron…

Q & A with Professor Chandra Wickramasinghehttps://sesa.scholasticahq.com › article
अनेक रेफ आहेत. तसेच हे मत खोडून काढणारे पण आहेत. वाचा आणि तुम्हीच ठरवा.

Rajesh188 Sun, 09/10/2022 - 22:39

चंद्र पण पृथ्वी वर आदळू शकतो.असे घडणार च नाही हा आशावाद झाला..
जगात काही ही घडू शकते

अतिशय अशक्य असून पण पृथ्वी वर जीव सृष्टी निर्माण झालीच ना.
सहज शक्य असते तर ह्या विशाल ब्रह्मांड मध्ये अनेक ग्रहावर जीवसृष्टी आणि प्रगत जीवन असते.