सहा शब्दांच्या कथा
सहा शब्दांच्या कथा :
-------
१.
फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.
२.
हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.
३.
भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.
४.
म्हातारी नंतर म्हातार्याची आबाळ होणारच होती.
५
आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.
--------
लेखक : अनंत ढवळे
-----
( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखज हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )
ह म् म्
प्रकल्प छानच आहे.
'नॉमन रॉकवेल' ह्या प्रसिद्ध अमेरिकी चित्रकाराने काढलेली अनेक चित्रे किंवा आपल्याकडचे 'शि. द. फडणीस' याञ्ची चित्रे अश्याच प्रकारची आहेत. चित्र पाहताच त्या चित्रात पकडलेला क्षण हा त्यापूर्वीचे बरेच काही आणि त्यानन्तरचे थोडे काही साङ्गून जातो.
काही प्रयत्न
त्याचा आत्मघातकी हळवेपणा अजून पटत नाही.
मग तिनं ठरवलं - हिरमुसण्यापेक्षा अपेक्षाच नको.
हे दाखवायचे फोटो आता कशाला ठेवायचे?
विश्वासघाताला गैरसमज ठरवून फसणार्याला कोण वाचवणार?
दोघेही एकमेकांकरिता मुक्त व्हायला पंचेचाळिशी उगवली.
चष्म्याचं भिंग चिकटपट्टीनंच दुरुस्त करायचं, पुन्हा...
हेमिंग्वे?
पुस्तकखरेदेसाठी रोजरोज उपाशी राहणं परवडणारं नव्हतं.
.
झिजलेल्या चपला दडवत व्याह्यांकडे टाकलेले आशाळभूत स्मित.
.
अजगराच्या मिठीत गळाठलेले मृतप्राय हरीण
.
स्फोटानंतरः- हो, माझाच तर हात तो!
.
नवर्यासोबत असल्यानं तिनं बाजूलाच असूनही त्याला ओळखही दाखवली नाही.
.
जाहिरसत्कार होतानाही त्याला खर्या कर्त्याची आठवण पुसता आली नाही.
.
गर्दित खेटल्यावर आपल्याच मुलीचा दिसलेला तो चेहरा.
.
आता तो पोलिसांपासून दूर, निवांत होता.
.
अंत्यविधी(दहनामुळं) संपल्यानं पुरावा नष्ट झाला होता.
.
कवळी बसवतानाही आठवत असलेला रम्य मधुचंद्र.
.
तंत्रज्ञानामुळं का असेना तो बाप बनलाच.
.
शेवटी एकदाचा पाळणा हलला.
.
ओकारीतून सांडलेले घोट नि हास्याचा फवारा.
.
पुन्हा खालमानेनं तो उकिरड्यातलं खरकटं अन्न शोधू लागला.
.
आज पुन्हा डझनभर दारुडे तिच्यावर चढणार होते.
.
नलिनी त्याच्या बाहूंत असतानाच मनिषाचाही आलेला कॉल.
.
रसाळ ट्याहॅच्याऐवजी निष्प्राण बाहेर आलेला मृतदेह.
.
जबरदस्तीनं सुन्नत होउनही विठूचच नाव ओठांवर.
.
तिच्या अगतिकतेवर हसत त्यानं गोलाई हाताळली.
.
लेकराचय जीवाकडे पहात तिनं मांड्या फाकवल्या.
.
ऐसा मत समझ पीके बोल रहा हूं
.
पेढा भरवताना त्यानं सारं श्रेय पालकांनाच दिलं.
थांकू थांकू
आता काही चितपरिचित, इतिहासप्रसिद्ध सूक्ष्मकथा:-
you too Brutus?
.
'Able was I ere I saw Elba'
.
काका मला वाचवा.
.
देवा त्यांना माफ कर.
.
ह्या संन्याशाच्या पोरांना वाळीतच टाका.
.
आम्ही वडीलमस्तकी असता चिंता कोण गोष्टीची?
.
आता उर्वरित सामान्य वाक्ये :-
मै तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हू
.
म्हणून सांगते शेखर मला विसरून जा. (courtsey :- "माझे पौष्टीक जीवन" -- पु ल )
.
शत्रूच्या ह्या सुवर्णमोहरा तुझ्याकडे कशा?
.
रश्मी तर म्हणाली तू तिच्याकडे काल झोपायला नव्हतीस.
.
मुलासकट त्याने तिला स्वीकारले होते.
.
इन्स्पेक्टर सायेब तो खरच त्यो याक्सिडेंट व्हता.
.
काय? नापास झाला म्हणून आत्महत्या??!!
.
मुलाचे मामा मुलाला आणा
.
शरीराने नाही पण मनाने मी त्याचीच झालिये.
.
आजन्म अविवाहित राहण्याची हा शंतनुपुत्र प्रतिज्ञा करीत आहे.
.
हे दशरथा, तुलाही तीव्र पुत्रशोक घडेल.
.
केशवा, माझ्या आप्तांस मी कसा मारु?
.
तू केलेल्या तपोभंगाबद्दल हा शाप, मेनके.
.
तुझं गुपित हे ; गुपित ठेवण्या॑त माझा काय फायदा?
.
अरेरे आजपासून तिसर्याही मुलीचाच बाप म्हणवून घ्यावं लागणार.
--मनोबा
भिंग
प्रतिसादातल्या काही कथा चांगल्या आहेत :
चष्म्याचं भिंग चिकटपट्टीनंच दुरुस्त करायचं, पुन्हा.. ( धनंजय) -(कथेतले वयस्कर पात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे चष्मा बद्लू शकत नाही असा मी अर्थ घेतला )
चिकणी-हॅंडसम. शुभमंगल सावधान. कटकटी-चिडका. ( घासकडवी ) -(बर्याच घटना आल्यात)
बाकी विडंबनाच्या जीर्ण जालीय अतिसाराची ( ग्रहणी म्ह्णा हवातर) कल्पना असल्याने अनेकाना वेग आवरणार नाही याची कल्पना होतीच :)
बाकी विडंबनाच्या जीर्ण जालीय
बाकी विडंबनाच्या जीर्ण जालीय अतिसाराची ( ग्रहणी म्ह्णा हवातर) कल्पना असल्याने अनेकाना वेग आवरणार नाही याची कल्पना होतीच
तुम्ही कोणाचं नाव घेतलं नाहीयेत, पण अनेकांना वेग आवरणार नाही वगैरे कल्पना होतीच म्हणता आहात. या धाग्यावर सर्वात कॅज्युअल / विनोदी वाटू शकेल अश्या प्रतिक्रिया किमान मी नक्कीच दिल्या आहेत. त्या करुण, धक्कादायक, सिरियस नसतीलही. पण यात विडंबन, चेष्टा,खिल्ली अशा आशयाचे प्रतिसाद नाहीत अशी माझी समजूत आहे, कारण धाग्याचा उद्देश आणि विषय मला आवडला होता आणि त्यामुळेच उत्स्फूर्त असे प्रतिसाद इथे लिहीले.
माझं नाव घेतलेलं नसताना मी उत्तर का देतोय असं कोणी म्हणू शकेल, पण त्या वाक्यातून जे जाणवलं त्यावर मी एक जनरल प्रतिक्रिया देतो आहे.
बाकी कोणाचे अंतर्गत उद्देश मला माहीत नाही, पण वाचक म्हणून या पूर्ण धाग्यावर विडंबनाचे जुलाब, अतिसार, ग्रहणी वगैरे म्हणावेत अशा दर्जाचे प्रतिसाद मला दिसले नाहीत. अर्थात माझ्या नजरेचाही तो दोष असेल. पण तुमच्या या प्रतिसादाचा व्यत्यास करु जाता केवळ गंभीर कथासूत्रांना अन तत्सम प्रतिसादांना काय जालीय बद्धकोष्ठ म्हणावे का?
आवेग सर्वांनाच असतो.. एक मत देण्याचा.. असो.
वाचनानुभव
तिच्या फोटोतलं माझंच फिकट होत जाणारं प्रतिबिंब ( संजोप राव) - दुरावत चाललेल्या संबंधाची कथा
मग निर्धाराने तिने पाऊल उंबरठ्यावर ठेवले ( मनीषा) - एक स्त्री आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करते आहे, आपला प्रतिकूल वर्तमान / गतआयुष्य निर्धारपूर्वक मागे सारून.
आणि ते दोघं सुखासमाधानाने नांदू लागले. ( मुक्त सुनीत ) - हॅप्पी एंडींग !
एक नवा वाचनानुभव मिळतो आहे !
पोस्ट स्क्रीप्ट - आधी चा प्र तिसाद केवळ मला विडंबने अपेक्षित होती एवढेच सुचवण्यासाठी होता.
अाणखी एक
अशीच एक कथा मी पूर्वी कुठेतरी वाचलेली अाहे: