Skip to main content

AIचा घो(र)

चौदा विद्यांच्या वाचस्पतींनो
चौसष्ट कलांच्या कलानिधींनो
गानगंधर्वांनो, भसाड्यांनो
चित्रकारांनो, रंगाऱ्यांनो
सिद्धहस्त लेखकांनो, कळफलकबडव्यांनो
कवींनो, कवड्यांनो
वैद्यराजांनो, वैदूंनो
नटवर्यांनो, साजिंद्यानो
विचारवंतांनो, प्रचारवंतांनो
कोतवालांनो, ठकसेनांनो
वलयांकितांनो, ट्रोलभैरवांनो
बेलकर्व्हवरील डाव्या-उजव्यांनो
बेलकर्व्हच्या मध्यावरील बेसुमार सुमारांनो
शुभ्रधवलांनो, काळ्याकुट्टांनो, अधल्यामधल्या कृष्णधवलांनो
सावध ! AIका AIच्या हाका
जुनी चंगळ संपली बर्का!
Plan B तय्यार ठेवा पक्का
नैतर वर्मी बसेल धक्का
धश्चोट टर्टर फाडेल बुरखा
:)

'न'वी बाजू Sun, 26/10/2025 - 17:17

सुरुवात जोरदार. दणकट. आवडली. शेवट — विशेषेकरून, शेवटची ओळ — समजली नाही.

(आणि, Plan B म्हटल्यावर भलतेच काहीतरी डोळ्यांसमोर आले, आणि, ‘आता हे कशासाठी तय्यार ठेवायचे आणखीन?’ असा प्रश्न — आणि, नाही नाही त्या शक्यता — डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. But that’s just me being me. चालायचेच.)

तिरशिंगराव Sun, 26/10/2025 - 20:11

गानगंधर्वांनो नंतर संवयीने भलतंच वाचलं !
नबां प्रमाणेच सुरवात आवडली म्हटल्यापेक्षा कळली. नंतर, माझ्या मते, प्लान बी चा ही पर्याय रहाणार नाही.

anant_yaatree Sun, 26/10/2025 - 21:08

मीही त्या शब्दातल्या भलत्याच अक्षराला एक काना आणि एक मात्रा देत होतो. पण मग....

मारवा Sun, 26/10/2025 - 21:31

मी अशी शैली वापरून एक कविता (अर्थातच पांचट) केलेली होती ती आठवली.
मला शैली ची प्रेरणा विलास सारंग यांच्या एका कवितेवरून मिळाली होती. ती विलास सारंगांची कविता अर्थातच भारी होती.
माझ्या कवितेची जाहिरात इथे.
तुम्हारे खत में हमारा सलाम.
तुम्हारे धागेमे हमारा कलाम.
https://www.misalpav.com/node/28976