छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १६ : संध्याकाळ
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : संध्याकाळ.
या विषयाचबद्दलही अधिक काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. तसा सोपा विषय म्हणता यावा. अर्थ किती व्यापक असू शकतो हे चित्रांमधूनच पाहू !
------
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १३ फेब्रुवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल . १४ फेब्रुवारीच्या गुरुवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय - प्रतिबिंब.
स्पर्धा का इतर?
खर आहे. मला काही वेळा हा फरक
खर आहे. मला काही वेळा हा फरक ओळखता येत नाही (हे आधीच कबुल करतो नाहितर प्रतिक्रीयेत दोन फोटो यायचे ;) )
रंगात बराच सारखेपणा असला तरी मावळतीचे रंग अधिक उष्ण असतात, तर उगवतीचे सौम्य असतात. केवळ आकाशातील रंगच नव्हे तर स्थिरचरांचे चित्रही उगवतीला घेतले असता शीतल दिसते तर मावळतीला ते अधिक उष्ण भासते.
तसे अनेकदा असे म्ह्टले जाते की संध्याकाळी अनेकदा आकाशात क्षितीजापाशी ढग असतात तर बर्याचदा उगवतीच्या वेळी आकाश क्षितीजापाशी निरभ्र असते, मात्र हा थंब रुल झाला. मात्र रंगाची सौम्यता/उष्णता अधिक चांगला मापदंड होईल.
अर्थात हे अंदाज झाले प्रत्यक्ष ज्या ठिकाणचा फोटो आहे तेथील माहिती असल्यास दिशा समजू शकतात अन्यथा अश्या अनुमानावरच जावे लागते. या दुव्यावर एकाच ठिकाणची दोन वेळी काढलेली काही चित्रे पाहता येतील
दिवसभराच्या उष्णतेमुळे आणि
दिवसभराच्या उष्णतेमुळे आणि माणसांच्या वर्दळीमुळे संध्याकाळच्या आकाशात बरेच जास्त धूलिकण असू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमधे हा फरक अधिक जाणवत असावा. सूर्योदय लवकर होतो, दिवस लांबल्यामुळे हवा अधिक कोरडी होते, त्यामुळे धूलिकणांचं प्रमाण वाढतं. सूर्योदयाच्या वेळेस पश्चिमेला गुलबट रंग फार दिसत नाही, पण सूर्यास्ताच्या वेळेस पूर्वेला हा रंग अनेकदा दिसतो.
---
शिवाय संध्याकाळी कातरवेळ का कायशी असते, त्यामुळे लग्न झालेल्या बायका प्रियकराच्या आणि/किंवा माहेरच्या आठवणीने रडतात, समईच्या शुभ्र कळ्या लावतात, मुलं शुभंकरोति वगैरे म्हणतात, वयस्कर लोकं नॉस्टॅल्जिक होतात. शिवाय संध्याकाळी दिवसभराच्या कामाने शीण आलेला असतो. तो घालवायला पुरुष दारवा पितात.
शिवाय संध्याकाळी कातरवेळ का
शिवाय संध्याकाळी कातरवेळ का कायशी असते, त्यामुळे लग्न झालेल्या बायका प्रियकराच्या आणि/किंवा माहेरच्या आठवणीने रडतात, समईच्या शुभ्र कळ्या लावतात, मुलं शुभंकरोति वगैरे म्हणतात, वयस्कर लोकं नॉस्टॅल्जिक होतात. शिवाय संध्याकाळी दिवसभराच्या कामाने शीण आलेला असतो. तो घालवायला पुरुष दारवा पितात.
म्हणजे संध्याकाळ ह्या विषयावरचे फोटू कुठले असू शकतात त्याची हिंटच आहे की ही!
विसरलो सॉरी
१) पहिले चित्र
ISO 450
Exposure 1/30 s
Focal Length 16.3 mm
Aperture f/4.0
Flash Used False
२) दुसरे चित्र
ISO 400
Exposure 1/640 s
Focal Length 9.4 mm
Aperture f/8.8
Flash Used False
३) तिसरे चित्र
ISO 160
Exposure 1/500 s
Focal Length 5.9 mm
Aperture f/3.8
Flash Used False
माझाही एक प्रयत्न
1. घरांची रांग - संध्याकाळच्या वेळी
camera: olympus E-PL1 with Lens: Nikon AIS 35-135mm F3.5 manual focus set at F8 / 130mm /ISO: 320
2. क्लॉक टॉवर, संध्याकाळचे ५
Camera: Olympus E-PL1 with Lens: Canon FD 50mm F1.4 manual focus set at F4 / 50mm / ISO: 800
3. तळ्याकाठची संध्याकाळ
Camera: Olympus E-PL1 with Lens: Minolta Rokkor 35mm F2.8 set at F5.6 / 35mm / ISO: 125
फोटो ओळखीचा
फोटो ओळखीचा वाटला.
http://www.aisiakshare.com/node/1415#comment-18754
ह म् म्
दोन हे आहेत फोटो
आपुले नाही जणू
कोणता आहे तुझा अन्
कोणता माझा म्हणू ...
;)
सन्दर्भ : हे घासकडवीञ्चे चित्र पाहून मला चटकन् त्याञ्च्याच 'दोन' या आव्हानात दिलेल्या या चित्राची आठवण झाली. त्या चित्रामुळे सध्याच्या आव्हान-धागाकर्त्या ऋता यान्ना त्यावेळी एका आरती प्रभूञ्च्या कवितेची आठवण झाली होती. ते हे गाणे.
संध्याकाळ
१) संध्याकाळ (निकॉन डी-५०, १८-५५ लेन्स)
२)संध्याकाळ (निकॉन डी-५०, ५५-२०० लेन्स)
३)संध्याकाळ (निकॉन डी-५०, ५५-२०० लेन्स)
४)संध्याकाळ (निकॉन डी-५०, १०-२० लेन्स)
५)संध्याकाळ (निकॉन डी-५०, १०-२० लेन्स)
६)संध्याकाळ (निकॉन डी-५०, १०-२० लेन्स)
७)संध्याकाळ (निकॉन डी-५०, १०-२० लेन्स)
८)संध्याकाळ (निकॉन डी-५०, १०-२० लेन्स)
९)संध्याकाळ (कॅनन पॉवरशॉट ए-९५)
१०)संध्याकाळ (कॅनन पॉवरशॉट ए-९५)
धन्यवाद
धन्यवाद, दोन्ही छायाचित्रे युत्रेख(हॉलंड)मधील आहेत, पहिले छायाचित्र दोन कालव्यांच्या संगमावरचं आहे, दुसरं छायाचित्र युत्रेखच्या प्रसिद्ध डोम चर्चच्या समोरच्या कमानींचं आहे,
इतर-** पहिलं छायाचित्र उन्हाळ्यातल्या संध्याकाळचं असल्याने चंद्र पण टिपला गेला आहे, दुसरं छायाचित्र सातार्याजवळ(शिरवळ) निरेकाठचं आहे, तिसरं दिवेआगारच्या समुद्रकिनारचं आहे, पाचवं युत्रेखच्या डोम-चर्चचं आहे, त्याचा इतिहास वाचण्यासारखा आहे, सहावं युत्रेख मधल्या एका छोट्याश्या बागेचं आहे, आठवं युत्रेखच्या एका कालव्याचं आहे, हे शहर नितांत-सुंदर आहे, नववं न्यु-जर्सीतलं हडसन नदीकाठचं आहे, त्यात काही भाग गोल्डमन सॅक्सच्या बिल्डींगचा आहे, दहावं चित्र मार्लबोरोमधल्या एका तळ्याकाठचं आहे. **
छान
चौथे विशेष आवडले.
या चित्रासाठी पोलराइज़र वापरला आहे का ? असेल, तर अधिक उत्कृष्ट करता आले असते असे वाटले.
कृपया कॅमेरा व भिङ्गाच्या माहितीसोबत इतर (Exposure time, ISO आणि Shutter Speed) माहिती द्यावी.
तसेच परीक्षिकेच्या सोयीसाठी कुठली ३ चित्रे स्पर्धेसाठी देत आहात ते स्पष्ट करावे.
निकाल
स्पर्धेत भाग घेता/ न घेता यात सहभागी झाल्याबद्द्ल आभार.
संध्याकाळ या विषयाशी निगडीत विविध कल्पना पहायला मिळाल्या: मावळतीचे रंग (कोणत्याही वेळी टिपलेले का असेनात ! (अमुक यांच्या शंकेला स्मरून)), सूर्यास्त, दिवेलागण, कामावरून घरी परतण्याची वेळ, वाट पहाण्याची वेळ, दिवसाचा थकवा मनोरंजनाने दूर करण्याची वेळ, खरेदी करण्याची/फिरण्याची वेळ, किंवा मवळतीला पडणारा सोनेरी प्रकाश आणि त्यातल्या लांब सावल्या बघत चिंतन करण्याची वेळ....अशा कितीतरी.
काही चित्र त्यातल्या रंगांमुळे लक्ष वेधून घेतात: अनामिक (चित्र १), रूची (गुंता), वाचक (घरांची रांग - संध्याकाळच्या वेळी), मी (चित्र ३)
अमुक यांचा 'सांजगजबज' हा फोटो वेगळ्या विषयामुळे आवडला...पण त्यात मागचे दिवे आणि इमारती शार्प (गर्दीची 'गजबज' राखून) असत्या तर आणखीन आवडला असता. ऋषिकेश यांनी दिलेला 'नदीकिनारी सरत्यावेळी' सुद्धा आवडला पण स्पष्ट हवा होता (मोबाइल कॅमेर्याची मर्यादा). राजेश घासकडवींचा 'तो न चंद्रमा नभात...' (दोन पेले) सुद्धा छान कल्पना...पेल्यातून डोकावणारा सूर्य खासच आहे.
तरी काही चित्र पाहिल्या बरोबर एक गोष्ट सांगून गेली...(नाव नसलेली चित्र कोणती ते पटकन कळावं म्हणून '[]' कंसात नावं मीच दिली आहेत.)
विजेती चित्र :
तृतीय क्रमांकः अमुक (चित्र २) [वाट पहाणारी चिमुरडी]
द्वितीय क्रमांकः राजेश घासकडवी (कबुतरावलोकन)
प्रथम क्रमांकः आबा (चित्र १) [आता घरी जायचं]
अभिनंदन !
आबा*...पुढचा विषय द्या.
*आबा, तुमचा कॅमेरा कोणता ?
'ग्रँड' संध्याकाळ
Camera SONY
Model DSC-W70
ISO 160
Exposure 1/80 sec
Aperture 4.0
Focal Length 12mm
Flash Used false