<आइस्क्रीमवाले गंजे अंकल..>


प्रेरणा

आमच्या हाउसिंग कॉंप्लेक्सच्या बाहेरचं एक छोटंसं हॉटेल.

हॉटेलात मराठी मध्यमवर्गाला आवडणाऱ्या सर्व शाकाहारी गोष्टी मिळतात. म्हणजे इडली, वडे, डोसे सारखे दाक्षिणात्य; पनीर मटर, रोटी सारखे उत्तरेकडचे; गोबी मांचुरियन, व्हेज फ्राइड राईससारखे तथाकथित पौर्वात्य आणि पावभाजी, भेळ सारखे दिशाहीन पदार्थ. अर्थात थालिपीठ, साबुदाण्याची खिचडी, पोहे वगैरे मिळत नाही, पण बहुधा मराठी मध्यमवर्गाचं त्यावाचून अडत नसावं, कारण कधीही गेलं तरी भरपूर गर्दी असते.

मी एकटाच हाटेलात हादडून आलो असं सांगितलं तर अर्धांग उगाच पिडत बसेल. म्हणून फोन लावला. 'आत्ता भलत्या वेळी खाऊन घ्यायचं आणि मग नीट जेवायचं नाही. डॉक्टरांनी पथ्य सांगितलं आहे ते पाळायला नको' वगैरे अपेक्षित तक्रारी मुकाट्याने ऐकून झाल्यावर विचारलं

"तुझ्यासाठी काय घेऊन येऊ?"
"चला आठवण तरी झाली. नशीब माझं."
"एवढं प्रेमाने विचारतोय तर तिरक्यात का शिरत्येस?" बोलून गेलो आणि चूक लक्षात आली. मग थोडा वेळ 'घरी येऊन आपण दोघं गेलो असतो तर काय भोकं पडली असती का? की मी बरोबर असल्यामुळे तरुण पोरींवर इंप्रेशन वाईट झालं असतं का?' वगैरे बोलणं ऐकून घ्यावं लागलणार हे लक्षात आलं. मी फोन लांब ठेवला. आवाज संपल्यावर म्हणालो
"बरं, घेऊन येतो माझ्या मनाप्रमाणे काहीतरी"

इतका जुनाट संसार असला की सगळे तिढे सुकून घट्ट झालेले असतात. एखाद्या कोवळ्या रोपट्याला वाकवून ठेवलं, तर पुढे त्याचं खोड वेडंवाकडं व्हावं तसंच. ते पिळले तरी ढिम्म फरक पडणार नव्हता. मग मी वयोपरत्वे आलेल्या विसरभोळेपणाचं नाटक करण्याचं ठरवून खुशाल तिच्यासाठी वडा सांबार पॅक करून मागवला. कदाचित तिला तो आवडतही असेल. कोण जाणे.

माझ्यासाठी मस्त एसबिडिपी मागवली. माझ्यासारख्या कष्टमरासाठी मालक स्वतः गल्ल्यावरून उठून येतो. कारण हे हॉटेल काढलंय ते माझ्याच पैशावर. त्याचं आधी छोटंस केमिस्टचं दुकान होतं. अजूनही आहे, पण पोरगा चालवतो. गेली अठरा वर्षं मी भरलेल्या बिलांचा हिशोब केला तर हॉटेल आणि त्याचं नुकतंच केलेलं रिनोव्हेशन सगळं माझ्या खात्यातूनच सहज आलं असावं. नवीन डेकोर म्हणजे काय, तर भर लख्ख उन्हातही अंधारलेले मंद दिवे. हॉटेलच्या आधुनिक डेकोरेशनसाठी जागोजागी ठेवलेली बाभळीची झाडं. खुर्चीवर बसताना डोक्याला काटे लागतील असं सारखं टेन्शन.

"हॅ हॅ हॅ. कसा काय शेट? मजामा?"

मराठी लोकांना शेट म्हणत म्हणत या गुजरात्यांनी इमले उठवले. पण ऐकून कुठेतरी आत बरं वाटतं हे मात्र खरं.

"हा. काही विशेष नाही"
"डायबिटिस, ब्लड प्रेसर कंट्रोलमधी हाय ना?" त्याचा आवाज पूर्वीप्रमाणेच खणखणीत. आसपासच्या टेबलांनी कान टवकारल्यासारखं मला उगीचच वाटलं.
"हम्म्म" मी तोंडातल्या तोंडात म्हटलं. आणखीन कशाकशाविषयी त्याला असलेली माझी खाजगी माहिती जाहीर करतोय या भीतीने माझं कंट्रोलमध्ये असलेलं ब्लडप्रेशर साट्कन वाढलं. काही क्षण थोड्याशा अनकंफर्टेबल शांततेत गेल्यावर त्याने उगाच पोऱ्याला ओरडून बोलवून स्वच्छ दिसणाऱ्या टेबलावर एक गलिच्छ फडका मारायला लावला. तेवढ्यात एसबिडिपी आली, आणि तो मला माझ्या समोरच्या पूर्णब्रह्माबरोबर एकटं सोडून गेला. पहिली पुरी तोंडात कोंबली. पूर्णब्रह्म अंतरात्म्यात विलीन झालं. डायबिटिस, ब्लडप्रेशरच्या आठवणीने मनात आलेली सगळी गिल्ट वाऱ्यासवे उडाली.

चौथ्या पुरीच्या आसपास ती दिसली. आणि माझ्या मनात पंधरा वर्षांपूर्वीचं वादळ पुन्हा उभं राहिलं.

मला आठवला तो फ्रीझरमध्ये घुसणारा इवलासा हात. चॉकोबार उलटसुलट करून न्याहाळणारा. तिच्या स्वप्नांना गवसणी घालायला अपुरे असलेली तिच्या हातातली दहा रुपयाची नोट. किंचित चुरगळलेली. जीभ फिरवून फिरवून सुकलेले ओठ. आणि 'बीस से स्टार्ट' ऐकून खट्टू झालेला चेहरा.

चौथी एसबिडिपी घशात अडकल्यामुळे आवंढा आल्यासारखं झालं. पण तेवढंच कारण नव्हतं...

'अमुक की याद आती है, तमुक की याद आती है,
जिक्र होते ही नौजवानी का, कुछ खयालों की याद आती है'

हा शेर मला अर्धवट का होईना, पण आठवला. त्यावेळी काय झालं होतं? घटना तशी मामूलीच. तिला आइस्क्रीम हवं होतं, मी ते देऊ धजलो नाही, इतकंच. मनात इच्छा होती - पैसे दिले असते तर मला आनंद झाला असता आणि तिलाही. ती त्यावेळी सहा वर्षाची आणि मी तिचा अंकल शोभावा असा, माझाही मुलगा तिच्याच वयाचा. त्यामुळे आठवणी आहेत त्या फक्त खयालांच्या. न जमलेल्या कृतीच्या. आणि ते खयाल मांडल्यावर संस्थळांवर झालेल्या जोशपूर्ण चर्चांच्या.

अनेकांचं मत होतं की मी जे केलं ते बरोबरच होतं. अनोळखी मुलीला कितीही चांगूलपणाने आइस्क्रीम ऑफर केलं तरी त्यामुळे तुमची प्रतिमा अकारण डागाळण्याची शक्यता असते. इतकंच नव्हे तुमच्या चांगूलपणावर विश्वास ठेवून ती इतरांवरही अशी विसंबली तर धोका होण्याची शक्यता आहे. काय करणार. कलयुग म्हणायचं, एक सुस्कारा सोडायचा आणि सोडून द्यायचं.

पण काहींनी असंही म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही उत्स्फूर्ततेनं जगता तेव्हा विचार करण्याची जरूर भासत नाही. फक्त हेतू शुद्ध लागतो. पटलंही होतं आणि नव्हतंही. माझं नेहमीच असंच होतं. सर्वच गोष्टींचा मी सांगोपांग विचार करतो. आणि मग धड ना या काठाला धड ना त्या काठाला असा प्रवाहपतीतासारखा वाहतो. दिलसे मला वाटत होतं की आइस्क्रिम द्यावं पण दिमागसे निर्णय घेतल्यानं मी मागे फिरलो.

मी पुन्हा तिच्याकडे बघितलं. माझ्यापासून वायव्येला बसली होती. आमच्या मध्ये एक टेबल. रिकामं. देखणी होती. चुणचुणीतही वाटत होती. वयाने माझ्याच मुलाएवढी. म्हणजे एकवीसच्या आसपास. तिने अजून कॉफीपलिकडे काही मागवलं नव्हतं. किंवा मागवलं असलं तरी ते अजून आलं नव्हतं. पण ती आपल्या फोनवर काहीतरी टकटक करण्यात गर्क झाली होती. अंगावर टाइट टॉप... छान दिसत होता. अर्धपारदर्शक...

"और कुछ लावू साब?" वेटरच्या पृच्छेने माझी तंद्री भंगली.

"आं? नही नही. बिल लाव" मी काहीसं भांबावून म्हटलं.

त्याने माझी प्लेट उचलली आणि गेला. मग त्याच्यापाठोपाठ तो पोऱ्या आला आणि पुन्हा ते कळकट फडकं फिरवून ते टेबल एव्हाना स्वच्छ वाटत असलं तरी घाणेरडंच आहे याची आठवण करून दिली. पण कलयुगात असं व्हायचंच असं स्वीकारून मी लक्ष पुन्हा त्या मुलीकडे वळवलं. तसंही टेबलाकडे बघायचं का तिच्याकडे यात तिच्याकडे बघण्याचा पर्याय जास्त आकर्षक होता. मग पुन्हा माझ्या मनातली विचारांची वादळं सुरू झाली.

जीवनातली कोणतिही गोष्ट असो जर मनात करू की नको असा संभ्रम असेल तर न करणं श्रेयस्कर असतं. साधा रस्ता देखील गर्दीच्या वेळी क्रॉस करू की नको असं वाटलं तर थांबणं सोयीचं होतं. खरेदीच्या वेळी देखील घेऊ की नको असं वाटलं तर सरळ 'न घेणं' उपयोगी होतं. याच एक साधं कारण आहे, तुम्ही मनाच्या चकव्यात सापडत नाही कारण मनच तुम्हाला एखादी गोष्ट करायला भरीला घालतं आणि मग पश्चाताप करायला लावतं. द बेस्ट सोल्युशन इन कन्फ्युजन इज टू ड्रॉप द डिसीजन. हेच गेल्यावेळी केलं होतं. आणि मग एका अनोळखी नात्याचा गळा घोटत असल्याचं फीलिंग आलं त्याचं काय?

आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आपल्याला दोन पर्याय दिसतात. एक सोपा एक कठीण. दर वेळी सोपे निर्णय घेण्याची आपली प्रवृत्ती असते. पण त्या सोपेपणात त्या 'रोड नॉट टेकन' बद्दल स्वतःलाच दोष देण्याची किंमत गृहित धरलेली नसते. ते काही नाही. इतकी वर्षं दिमागसे निर्णय घेऊन कुठच्याही गुंत्यात अडकू नये अशी व्यवस्था केली. आज निर्णय दिलसे घ्यायचा.

"आपका बिल" वेटरला मी काहीतरी गहन विचारात पडल्याचं जाणवलं असावं. तो क्षणभर थांबला. माझ्या नजरेच्या रेषेत पाहिलं. आणि पुन्हा माझ्याकडे पाहिलं. काहीतरी उमजल्यासारखा त्याचा चेहरा खरोखरच झाला की मला तसा भास झाला? मी पैसे ठेवायला हात पुढे केला आणि थांबलो. हाच तो क्षण. साक्षात्काराचा. सिद्धार्थाला कुठल्यातरी वृक्षाखाली साक्षात्कार झाला, मला बाभळीच्या झाडाखाली. पण जातकुळी तीच. मागच्यावेळी मी पैसे देण्यासाठी पुढे केलेला हात मागे घेतला. आता ती चूक दुरुस्त करण्यासाठी हात मागे घेतला.

"सुनो. आइस्क्रीम है?"

"हां. कौनसा चाहिये?"

"चॉकोबार." माझ्या तोंडून ताबडतोब शब्द निघाले. "और सुनो. दो लेके आना. एक मेरे लिये, और एक उस टेबल पे बैठे हुए लडकी के लिये. और उससे कहो, की मै बहुत दिन से उसे आइस्क्रीम देना चाहता हू" आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर चमत्कारिक भाव उमटण्याबद्दल भास होण्याचा प्रश्नच नव्हता. पण टु हेल विथ इट. दिलसे निर्णय घेणारांकडे जग असंच चमत्कारिक नजरेने बघतं. तशा नजरा येऊ नयेत यासाठी इतकी वर्षं धडपडलो. ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीत, समाजात, वेटरांमध्ये... हेल विथ इट ऑल. इतक्या वर्षांनंतर आता तरी मला दिलसे जगायला मिळायला हवं.

हा निर्णय घेतल्यावर मला खूप हलकं हलकं वाटायला लागलं. अरेच्च्या हे वाटलं होतं तितकं अवघड नव्हतं तर. आतापासून ठरवलं. बास! असंच मोकळं जगायचं. बायकोच्या पिरपिरीचा त्रास होतो तेव्हा खुशाल सांगायचं की गप्प बस नाहीतर मी बाहेर जातो मित्रांच्यात पत्ते कुटायला. खरं तर त्यांनाच बोलवून घ्यायचं. बायको कटकट करते म्हणून आपण तेही स्वातंत्र्य मारलं. सुरूवातीला मित्रांकडे बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणून चिडवलो गेलो. आता करुणेपोटी ते काहीच बोलत नाहीत, ते आणखीनच टोचतं. हे सगळं बदलून टाकायचं. आपल्या आयुष्याची ही नवीन इनिंग. आजच्या दिवसाचा पहिला बॉल बाउन्सर. एरवी सराइताप्रमाणे डक केला असता. पण नाही. आज खंबीरपणे उभा राहिलो आणि हुक करायचं ठरवलं. भले शाबास.

विचार चालू असताना वेटर आइस्क्रीम घेऊन आला. मी रॅपर उघडून आइस्क्रीम चोखायला सुरूवात केली. अहाहा. किती दिवसांनी खात होतो चॉकोबार. त्या थंड गोठलेल्या चॉकोलेटवरून जीभ फिरवताना आनंदाच्या लहरी शरीरभर पसरल्या. डायाबिटिस गेला खड्ड्यात. बाउन्सरला ताठ उभं राहून हुक.

वेटर तिच्या टेबलाकडे गेला. एव्हाना तिची कॉफी पिऊन झालेली होती. बहुधा निघायच्या तयारीत असावी. कारण नाइलाज झाल्याप्रमाणे फोन पर्समध्ये ठेवत होती. वेटरने प्लेट समोर ठेवली. तिने प्रश्नार्थक बघितलं. त्याने हलकेच काहीतरी सांगितलं. त्यातलं माझ्याकडे मान वळवतानाचं 'गंजे अंकलने भेजा...' इतकंच ऐकू आलं. अजूनही काहीतरी बोलला. तिने माझ्याकडे एक चमत्कारिक कटाक्ष टाकला. मी तिला चॉकोबार चाटत चाटत एक स्माइल दिलं. हात वर करून हाय म्हटलं. तिच्या चेहऱ्यावरचे चमत्कारिक भाव अजूनच वाढले. काही पर्वा नाही. मी माझ्या दिलसे निर्णय घेतला होता. लोकमताचा विचार न करता, आपल्याला वाटलं, आपला हेतू शुद्ध होता, आपण आइस्क्रीम दिलं, प्रश्न संपला. पुढे काय होईल ते तेव्हा बघू.

तिने काहीही न बोलता टेबलावर पैसे टाकले आणि ताडकन उठून निघून गेली. मीही नोट टाकली. वडासांबारचं पॅकेज विसरून तिच्यामागे गेलो. बाहेर बघतो तर ती एका तरुणाबरोबर उभी होती. त्याचीच वाट बघत कॉफी पीत थांबली असावी. त्याला काहीतरी तावातावाने सांगत होती. त्यातलं फक्त "यक्क... सो क्रीपी" एवढं ऐकू आलं. तेवढ्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती थबकली. ते पाहून त्या तरुणानेही माझ्याकडे वळून बघितलं. आमची दृष्टादृष्ट झाली.
_____

एकंदरीत काय दिलसे घेतलेला निर्णय दिलालाच भारी पडला. माझ्यासाठी अक्षरश:. आता मी नुकताच आयसीयूतून बाहेर पडलो आहे. जगण्यासाठी ज्या गोळ्या लागायच्या त्यात बरीच भर पडलेली आहे. तेव्हा लवकरच केमिस्ट पोरगाही आपलं नवीन हॉटेल काढणार याची खात्री आहे. कॉंप्लेक्समधल्या लोकांच्याही चेहऱ्यावर ते विचित्र भाव दिसायला लागलेले आहेत. त्याची हळूहळू सवय होते आहे. सवयीपेक्षा ते टाळण्यात मी तरबेज होत चाललेलो आहे. नातेवाइकांमध्ये हे प्रकरण षट्कर्णी झाल्यामुळे त्यांच्यात फार मिसळत नाही. ऑफिसमधूनही व्हीआरेसचं पॅकेज जरा गरजेपेक्षा लवकरच स्वीकारलं. कॉंप्लेक्समध्ये दिवसाढवळ्या फार बाहेर पडत नाही. मराठी संस्थळावर पडीक असतो. इथे कोणीच क्रीपी नाही.

बायकोही 'कुठल्यातरी पोरीवर भाळलात आणि माझा वडासांबार विसरलात' हे ओठांवर बाळगून आहे, पण बोलत नाही. त्यावेळचा माइल्ड होता, पण अजून मोठा हार्ट अॅटॅक येईल की काय या भीतीने बहुतेक. पण माझ्या मुलाच्या दिलाला खरंच हा निर्णय भोवला. आपली हातातोंडाशी आलेली गर्लफ्रेंड हातची गेली म्हणून तो खचून गेलेला आहे. सगळ्या कॉंप्लेक्सभर आणि पंचक्रोशीतल्या कॉलेजातल्या पोरींमध्ये उगाच त्यालाही "क्रीपी" हा शब्द चिकटला आहे. फेसबुकावरही काहीतरी टोमणे मिळाले त्याला म्हणे.

एक नवीन नातं फुलवण्यापायी आयुष्यभर कष्ट करून जपलेली नाती चमत्कारिक झाली. तिशीच्या शेवटीशेवटी जे 'बिकट वाट वहिवाट नसावी' हे शिकलो होतो ते पन्नाशीत विसरून गेलो. म्हणून म्हणतो बाबांनो, तो रोड नॉट टेकन घेताना जरा विचार करा.

असो. मी भेटतच राहीन तुम्हाला इथे, तिथे आणि इतरत्रही. तसा मला आता काहीच उद्योग नाही.

(श्रेयअव्हेर - मिपावर व मनोगतवर प्रसिद्ध झालेल्या काही प्रतिसादांचे अंश लेखात वापरलेले आहेत.)

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (10 votes)

प्रतिक्रिया

हजम नही हुआ. स्वारी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेखातला कल्पनाविस्तार चांगला आहे हे मान्य करूनसुद्धा काहीसे माझे मतही असेच आहे.कुछ हज़म नही हुआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे 'सिक्वेल" आवडले. फुल धमाल आली वाचताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबनापेक्षा सिक्वेल हा शब्द बरोबर आहे आणि वाचताना धमाल आली यालाही जोरदार दुजोरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हुक केलेला चेंडू स्क्वेअर लेगवरुन सीमापार झालेला आहे. 'गंदे' वरुन 'गंजे' सुचणं यात काही विशेष नाही, पण पुढच्या कल्पनाविस्ताराने चकित झालेलो आहे. बेष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

+१
__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
खुप मजा आली. मराठी संस्थळावर खंडीत होणारी लेखांच्या विडंबनाची प्रथा पुन्हा चालू करण्यात आपला सहभाग वाखाणजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

'गंदे' वरुन 'गंजे' सुचणं यात काही विशेष नाही, पण पुढच्या कल्पनाविस्ताराने चकित झालेलो आहे. बेष्ट!

+१
मजा आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त! क्लायमॅक्स छान जमलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आय हाय... लाजवाब.. तुस्सी ग्रेट हो गुर्जी.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सोपा केलेला, संक्षीप्त[sic] लेख Wink

१. या शब्दाचे 'विक्षिप्त' ह्या शब्दाशी जुळणारे यमक हा निव्वळ योगायोगाचा भाग आहे.
२. येथे एकता कपूरवरील आकसापोटी k वगळलेला नाही.
३. हट(वादी)योग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

बाकी चालू द्या.

अतिअवांतर:

२. येथे एकता कपूरवरील आकसापोटी k वगळलेला नाही.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास जमलय विडम्बन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> मराठी संस्थळावर पडीक असतो. इथे कोणीच क्रीपी नाही.

थँक्स फॉर द काँम्प्लिमेंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

बाय द वे, हे 'क्रीपी' म्हणजे मराठीत काय? गावंढळ, चीप? अन काय स्पेलिंग आहे या क्रीपी शब्दाचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

creepy अंगावर शहारे आणणारं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'क्रीप' ('क्रेप'?) म्हणजे डोसा. सबब, 'क्रीपी' म्हणजे डोसा खाणारा, डोशाने बरबटलेला, डोसामय, इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोसाचा ओव्हरडोस झालाय असे नमूद करु इच्छितो.

इथेही श्लेष लागू.
म्हंजे जास्त आणि ६ वेळेला असे दोन्ही अर्थ लागू ; क्रीप=डोसा या समीकरणामुळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काहीतरी चुकतेय.
लेखक तर एसबिडिपी, पुरी अन चोकोबार की काय असलं खात होता ना? मग हा डोसा आला कुठून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हाटेलात डोसा मिळतो. भले लेखकाने खाल्ला नसेना. त्याने खाल्ला, असे त्या कन्यकेला वाटायला काही हरकत?

तसेही, अशा हाटेलात बहुतांश मराठी मध्यमवर्गीय गिर्‍हाइके जनरीतीस अनुसरून डोसाच खात असणार, असा अंदाज आहे. त्यामुळे वाटलेही असेल तसे तिला कदाचित. ती काय तो नेमके कायकाय खातो, याकडे टक लावून बघत थोडीच बसली होती? (बघत बसली असेल, तर लेखकापेक्षासुद्धा तिच्यातच काहीतरी गडबड आहे, असे मी म्हणेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद लहान असल्यामुळे यावेळी वाचला तरी. पण तरीही सहीच जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजू आणि राजेश घासकडवी यांनी पुण्यभू भारतभूमी सोडल्याला फारच काळ लोटला असावा. त्यांना २००३ च्या 'प्राण जाये पर शान न जाये' या चित्रपटाचं मध्यंतर संपताना असणारा असंबद्ध जोक माहित नसावा. तो इथे पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी हेच म्हणणार होतो.

आता 'बनियान' आणि 'गंजे'वगैरेवरून इतकी अवांतर मौजमजा चालूच आहे तर एक प्रश्न.
बनियानसाठी 'गंजिफ्रॉक' हा शब्द कसा अस्तित्वात / वापरात आला असावा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमरेच्या वरती जे काही बनियन/शर्टसदृश घालतो त्याला गंजी असे म्हण्ण्याची पद्धत आहेच. त्यातूनच हे आले असावे. आता या गंजीचा उगम पहावा लागेल.असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तर अंगरखा, पैरण, बंडी, इ. शब्द माहित आहेत (आणि गवताची असते ती गंजी).
पण महाराष्ट्रात अंगातल्याला गंजी कुठल्या प्रदेशात म्हणतात ? (मोल्सवर्थमध्येही तसा अर्थ नाही.) असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वारी. महाराष्ट्रात कुठे म्हणत नसावेतच, पण हिंदी आणि बंगालीत ते तसे म्हणतात ही पुरवणी जोडावयाला विसरलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बनियन/शर्टसदृश घालतो त्याला गंजी असे म्हण्ण्याची पद्धत आहेच. त्यातूनच हे आले असावे. आता या गंजीचा उगम पहावा लागेल.असो.

अरे.. मुळात तो शब्द बनियन असाच होता. महाराष्ट्रात बर्‍याच चाळींमधे आणि मध्यमवर्गीय वस्त्यांमधे तारेवर कपडे वाळत घालतात. अगदी कंपाउंडच्या बार्ब्ड वायरवर देखील..

त्यामुळे त्यावर वाळत घातलेल्या शुभ्र बनियन्सना भोके पडण्यासोबतच गंजाचे डाग लागतात. मग ते पेहेनणार्‍या पुरुषांची भोकाभोकाचे पिवळट बनियन घालणारा गबाळा पुरुष अशी संभावना होते.

तेव्हा गंजाचे डाग पडलेला कपडा अशा अर्थी गंजी हा शब्द उगम पावला आहे.

समझींग्ड??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्युत्पत्ती लॉजिकल आहे तसे पाहिले तर, पण मग हिंदी आणि बंगालीत हाच शब्द कसा आला याचे उत्तर मिळत नाही. कारण हिंदीत गंज लागण्याला जंग लगना म्हटल्या जाते. त्यामुळे तिकडे हा शब्द जंगीफ्रॉक किंवा जंगी असा पाहिजे होता Wink नेटवर पाहिले असता या शब्दाची व्युत्पत्ती मात्र कुठेही दिसत नाहीये.

हिंदी शब्दसागर लिंक

इथेही बनियानला गंजीफ्रॉक म्हटले आहे.असो.

पण गंजी म्हंजे ढीग याच्याशी कुठे मेळ लागत नाहीये. पाहिले पाहिजे इतरत्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण मग हिंदी आणि बंगालीत हाच शब्द कसा आला याचे उत्तर मिळत नाही.

बस का ब्याटम्याना.. सगळीकडे भाषाशास्त्राने नाही काम चालत रे..

परप्रांतीय केव्हाचेच मुंबईत घुसलेत.. इथून शब्द उचलतात आणि आपापल्या प्रांतात सुटीवर गेले की पसरवतात झालं.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही शक्यताही या ठिकाणी विचारात घेण्याजोगी आहे.

बंबैया हिंदीचा प्रादुर्भाव हिंदी हार्टल्यांडातही बराच आहे. मेरेको-तेरेको, बाई, फोकट में, इ.इ. शब्द आता हिंदीत घुसलेत. यालाच पिच्चरगत न्याय म्हणावे काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गंजी फ्रॉक. किंवा फार झालं तर गंजीफराक. = हाफ बाह्यांचा, पिवळा पडलेला, शक्यतो चट्यापट्याच्या नाडीवाल्या अंडरप्यांटीवर घातलेला बनियन.
आता यात गंजी कुठून आलं? तर गंदी वरून असावं. अन फ्रॉक म्हणाल तर ढिला पडलेला तो बनियन असा फ्रॉकसारखाच दिसतो. (विशेषतः कमरेखालचा तरंगणारा मिनिस्कर्टाच्या झालरीसारखा भाग)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'गंजीफरास' सुद्धा. (मुडदेफरास च्या चालीवर). Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उन्हाळ्यात घालता येतील असे पारदर्शक* वगैरे नाहीत का? ते काढा.. काढा म्हणजे दाखवा.. नाही कपड्यांच्या दुकानात असे म्हणतात असे माहित नसेल तर उगाच राडा व्हायचा

*हवेशीर, छिद्रं छिद्रं असतात त्याला पारदर्शकच म्हणतात ना रे बॅट्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

म्हणायला हर्कत नै कैच नंदणभौ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नायल्या चा डु आय डी नंदन आहे हे असं फोडायचं नाई बॅट्या Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नायल्या चा डु आय डी नंदन आहे हे असं फोडायचं नाई बॅट्या

नंदनचा डु. आयडी Nile! शिंपल गोष्टी कळत नाहीत तुम्हाला!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

गलतीसे मिष्टेक होगया Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रापचिक लोक या प्रकारच्या कपड्यांना Camisole असं म्हणतात. यांना कधीमधी व्हेस्ट असंही म्हणतात. पण तुमचे हे कॅमिसोल माझ्या रोजच्या बघण्यातल्या कॅमिजपेक्षा फारच जास्त संस्कृतीरक्षक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरय. मलाही आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रापचिक लोक का कॅमिसोल? (कस्लं सजेस्टीव्ह नाव आहे त्या गंजीचं!) Wink

नाही, सहजच विचारलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फोटुतल्या प्रकाराला टँकटॉप/ रेसरबॅक म्हणतात. कॅमिज जरा नाजूक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात खल्लास विडंबन,
नंतर हा भाग कमाल मार्मिक.

जीवनातली कोणतिही गोष्ट असो जर मनात करू की नको असा संभ्रम असेल तर न करणं श्रेयस्कर असतं. साधा रस्ता देखील गर्दीच्या वेळी क्रॉस करू की नको असं वाटलं तर थांबणं सोयीचं होतं. खरेदीच्या वेळी देखील घेऊ की नको असं वाटलं तर सरळ 'न घेणं' उपयोगी होतं. याच एक साधं कारण आहे, तुम्ही मनाच्या चकव्यात सापडत नाही कारण मनच तुम्हाला एखादी गोष्ट करायला भरीला घालतं आणि मग पश्चाताप करायला लावतं. द बेस्ट सोल्युशन इन कन्फ्युजन इज टू ड्रॉप द डिसीजन. हेच गेल्यावेळी केलं होतं. आणि मग एका अनोळखी नात्याचा गळा घोटत असल्याचं फीलिंग आलं त्याचं काय?

आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आपल्याला दोन पर्याय दिसतात. एक सोपा एक कठीण. दर वेळी सोपे निर्णय घेण्याची आपली प्रवृत्ती असते. पण त्या सोपेपणात त्या 'रोड नॉट टेकन' बद्दल स्वतःलाच दोष देण्याची किंमत गृहित धरलेली नसते.

हे वाचल्यावर खरंच विडंबन करायचं होतं का अशी शंका यावी इथं पर्यंत..

आणि क्लायमेक्स कडून अपेक्ष भलत्या होत्या, तो नेतो भलतीकडे, याक्क सो क्रीपी वर लेख संपला असता तरी चाललं असतं असं उगाच वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विडंबन नव्हेच! (फारतर गंदे अंकलचे भविष्य.) एक नवाच लेख - कदाचित थोडासा विनोदी. पण सूत्र तेच.

आवडला. (आणि कदाचित आता मी त्या 'वयात आल्याने' भावला असे म्हणा...काय सन्जोप राव? Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली. काही वाक्ये वाचून ज्ञानाच्या क्षीरसागरात डुबकी मारल्यासारखे वाटले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हा ज्ञान्या क्षीरसागर कोण? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज तर हाईट झाली. एका फ्रेंडने मला एका मराठी साईटवरचा लेख पाठवला. शी! मराठी कोण वाचतंय आजकाल. आय लाईक चेतन भगत. मराठी वाचायचंच असेल तर मी बालाजी तांबे आणि सोनाली कुलकर्णीचं वाचते. ती कसली ग्लॅमरस आहे ना, मराठी असूनही! एनीवे, हा फ्रेंड मला इमोशनल ब्लॅकमेल करत होता. कोणत्याशा म्हातार्‍या क्रीपला मी डिसगस्टेड लुक्स दिले आणि त्याच्या मुलाला अनफ्रेंड केल्याची तक्रार असं काहीतरी बकवास त्या लेखात आहे. म्हणे, म्हातार्‍याला माझ्यामुळे हार्ट अटॅक आला, त्या शाम्याला आता कोणी गर्लफ्रेंड मिळत नाही, फेसबुकावरही त्याला सगळ्या मुलींनी अनफ्रेंड केल्यामुळे तो डिप्रेस झालाय आणि सगळा ब्लेम माझा आहे. सो ही सेज.

आता यात माझी काय मिस्टेक आहे? तो ओल्डी माझ्याकडे बघत आईस्क्रीम खात होता. आधी मला ते फनी वाटलं. एवढा म्हातारा झाला, अजून सांडवल्याशिवाय आईस्क्रीम खाता येत नाही! शर्टावर डाग पाडले. पब्लिकमधे मोठ्याने एकटीच बसून हसले तर बरं झालं असतं. थेरड्याला रिस्पेक्ट म्हणून मी हसले नाही. तर या थेरड्याचं काय सटकलं, मलाच आईस्क्रीम ऑफर केलं. फेसबुकावर काय क्रीपी अंकल फ्रेंड रिक्वेस्ट टाकताना पाहिलेले नाहीत काय! पण हा तर अमिताभचे पिक्चर पाहून फारच डॅशिंग झाला असणार. तरूण वयात ते अ‍ॅक्शनवाले, आता नि:शब्द आणि काय काय. आणि कुठलेतरी मराठी पिक्चरचे फंडे डोक्यात असतील, "मुलगी हसली तर फसली" टाईप्स. काय वायझेड आहे!

तसं मिळतंय फुकट म्हणून आईस्क्रीम लाटलंही असतं. स्टुपिड इडीयट थेरड्याला समजायला नको, कॉफीनंतर कोणाच्या बापाने चोकोबार खाल्लंय का? सो मिडलक्लास, थर्डग्रेड टेस्ट, यू नो! थेरड्याला खाई खाई सुटली असेल, पण मला काही टेस्ट आहे की नाही! तेवढ्यात तो शाम्या आला म्हणून बिल देऊन हॉटेलाबाहेर गेले. ऑनेस्टली, बिटविन यू अँड मी, तो यडा वेळेत आला नाही म्हणून ही फ्री-एंटरटेनमेंट झाली. त्याला असं कशाला सांगायला हवंय? आल्यावर झापलं त्याला. त्याच्यामुळे मला आधी कॉफीचे पैसे खर्च करायला लागले, आणि फ्री-आईस्क्रीम समोर येऊनही खाता आलं नाही. एक काम धड करता येत नाही. हे त्याला सांगत होते तेवढ्यात तो क्रीप अंकल समोर आला. बाहेरच्या लाईटमधे बघितल्यावर वाटलं, "आय हॅव सीन धिस बॉल्डी समव्हेअर". क्लिक झालं नाही. मी कोणाकडे बघत्ये म्हणून शाम्यानेपण तिकडे पाहिलं. शाम्याचा बाप निघाला हा! म्हणूनच या क्रीपचे फोटो पाहिले होते, शाम्याच्या फेसबुकावर.

शाम्याचं माझ्यावर प्रेम आहे, लग्न करायचंय माझ्याशी ... सो ही सेज. बाप एक वायझेड, पोरगा दहा वायझेड! प्रपोज करायचंच होतं तर ते पण बहुतेक मुहूर्त काढून आला असणार. थेरड्याने आधी माझं डोकं फिरवलं, वर हा आपलाच बाप हे माझ्यासमोर मान्य केलं. निदान माझ्या तोंडावर थोबाड बंद ठेवायचं ना! मी काय याला याच्या बापावरून जज करणार नाही? एवढा वायझेड प्रकार झाल्यानंतर तिथेच, त्याच हॉटेलात नेऊन डायरेक्ट प्रपोज? मी टांग दिली त्याला.

रस्त्यातच हा जोक चार फ्रेंड्सना फोन करून सांगितला. आय कुडण्ट स्टॉप रिडीक्यूलिंग देम, यू सी! तर माझ्या बर्‍याच फ्रेंड्सनी त्याला अन्फ्रेंड केला. आता सेंटी मारत फिरतोय, बापाने त्रास दिला, मैत्रिणीने हर्ट केलं. सल्की, मिडलक्लास क्रीचर. निदान तेव्हाच "हा माझा बाप आहे" हे न सांगण्याइतका स्ट्रीट स्मार्टनेसही नाही याच्याकडे!

-- अ‍ॅन अस्पायरींग रापचिक गर्ल, मु. पो. डोंबिवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शाम्याचा मित्रांना मेसेज :
"आयला , बापानं घाण केली. गावलेली पोरगी सटकली."

मित्रांचे प्रतिसाद :
रम्या - केलेलास नव्हे एकदा, जाऊ दे सोड.
सुर्‍या - कोण ? डोंबिवली ची ?
अंत्या - आज बसायचं काय ?
पश्यादादा - बापानं तुला काढलंय , लै उत्ताणा हू नकोस.
गोप्या - म्हणुन आमोशेदिवशी प्रपोज मारायचं नसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गंदे अंकल' बद्दल वाटलेली सहानुभूती 'गंजे अंकल' बद्दलही वाटली. काही टिपण्ण्या अतिशय मार्मिक! मजा आला... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी

मूळ प्रेरणा, हा धागा आणि ही '३_१४ विक्षिप्त अदिती' ची प्रतिक्रिया हे सगळे मिळून एक आधुनिकोत्तर राशोमानच्या पटकथेची सुरूवात झाली आहे !
नांव काय देऊया बरे ! 'मया'* देऊयात ? ( 'राठी संकेतस्थाळावरील एका धाग्याच्या विडंबनावरील प्रतिक्रिया' )
* 'ठष्ठ ' च्या चालीवर (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> 'मया' देऊयात ? <<<
त्यापेक्षा "गोग्गोड मराठी संकेतस्थाळावरील एका धाग्याच्या विडंबनावरील प्रतिक्रिया" म्हणून "गोमया" द्यावं काय ?

बाकी आम्हाला आता पर्यंत मराठी आंतरजालावरच्या प्रतिसादांचं स्वरूप "जितम् मया" असतं हे ठाऊक होतं. परंतु त्याची व्युत्पत्ती ही अशी "ठष्ट" असेल याची यत्किंचितही कल्पना नव्हती !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नावाचं नंतर पाहू. सध्या "शाम्या"चं मनोगत लिहीणारे स्वयंसेवक हवे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नांव काय देऊया बरे ! 'मया'* देऊयात ? ( 'मराठी संकेतस्थाळावरील एका धाग्याच्या विडंबनावरील प्रतिक्रिया' )

मराठी संकेतस्थळांवरील धाग्यांना शेंडा-बुडखा, आदि-अंत असतो असं दुरान्वयाने सुचवल्याबद्दल श्री. अमुक यांचा निषेध!

*पहा आत्मबल: अनादि मी, अनंत मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली. रापचीक गर्लच्या पायात गंजे अंकल आणि त्यांच्या चिरंजीवांची झालेली वाताहात पाहून डोळ्यात अश्रू आले आणि त्यावर रापचीक गर्ल अदितीचे विचार ऐकून तर धो धो रडायचंच बाकी राह्यलय!
बाकी हे 'वायझेड' काय प्रकरण आहे बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वायझेड : प्रमाण मराठीतील 'वेडझवा' ह्या शब्दाचे ग्रामीण अथवा प्रादेशिक बोलीतले रूप 'येडझवा'; त्याचे उच्च व इंग्रजीशिक्षित बोलीमधील रूप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण मायमराठीची इतरही लेणी अशीच उजळवून दाखवावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवी, आपल्या लेखनाचा दर्जा हळूहळू उंचावत चालला आहे. असेच अजून येऊद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रशंसा हा डाव्या हाताचा खेळ वाटते? Biggrin

प्रतिक्रिया आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> शहराजाद :: घासकडवी, आपल्या लेखनाचा दर्जा हळूहळू उंचावत चालला आहे. असेच अजून येऊद्या.

लेखनाचा दर्जा हळूहळू उंचावत चालला आहे म्हंजे? ती मराठी संस्थळे काढा. दहा ठिकाणी लेख छापलेले अढळतील तुम्हाला. प्रतिसादातदेखील लेख असतात.
- पाषा बरवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

संध्याकाळी निवांत " एम टीव्ही रावडी " पहात लोळत होते . आमचं थेरड हुंदडायला गेलं होतं अन श्याम्या वासुगिरी करायला गेलेला होता . माझ्या सारख्या आर्य पतिव्रता स्त्रीला असली थेर करायला कुठे वेळ आहे ? इतक्यात थेरड्याचा उगीच लाडिक फोन आला तुझ्यासाठी काय आणु ग खायला म्हणून , म्हटले विष आण इतकी वर्षे संसार केला अजून बायकोच्या आवडी माहित नाहीत तर जगतय कशाला ? J)
थू तुझ्या जिंदगानीवर !
सोसायटीतली मुले आमच्या थेरड्याला गंजे अंकल म्हणून चिडवतात . थेरडा असे दाखवतो की माझ्या शिवाय दुसरी कुणीही सुंदर स्त्री त्याच्या नजरेस पडतच नाही पण ह्या थेरड्याच्या हुंगेगिरीला मी चांगले ओळखून आहे . तसे शेजारचे मिथुन राव इथून तिथून गोंडा घोळतात पण मी नाही लक्ष देत . मला सुद्धा सहज जमेल ओठांचा लाडिक चंबू करून डोळे पिट पिट करायला ;;) मग मिथुनरावच काय अनुपम राव आणि चिकणा ऋषी सुद्धा चुटकीसरशी :love: गळाला लागतील . पण नकोच तो ससेमिरा उगीच चोरून भेटा , लफडी करा अन शेवटी काय तर थेरड्याशी करते तोच प्रकार इथे करा नसती पीडा . शिवाय समाजात आर्य पतिव्रतेचा ट्यार्पी परमोच्च आहे .त्यामुळे प्रतिमा सांभाळणे श्रेयस्कर आहे . खर सांगू का , घरातली न संपणारी कामं , महिला मंडळ आणि एकसे बढकर एक चमचमीत सिरियल सोडुन मनोरंजनासाठी काही काही करायची गरज नाहीये .
आमच थेरड नेहेमीप्रमाणे घरी न येता हार्ट अट्याक येउन दवाखान्यात दाखल झाल्याचा फोन आला .मनात म्हटले चांगली अद्दल घडली आता बस गुमान घरी ढीगभर गोळ्या गिळत . Sad श्याम्याच्या गर्ल फ्रेंडवरच थेरडा लाईन मारत बसत होता म्हणे . हा नाही सुधारणार ,थोबड्यात कवळी आली तरी नातवाच्या गर्ल फ्रेंडला चुंबन मागेल अस आहे हे आमचं थेरड . अजून न सांगण्यासारख बरच आहे लोकहो पण जाउद्या झाल . Wink
सुबक ठेंगणी ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या! या माणसाला काय करायचं? माझं केमिस्टचं दुकान होतं तेव्हापासून बघतोय याला. खूप पुर्वी आईस्क्रिम घ्यायला यायचा. तेव्हाही त्याची लक्षण ठिक नव्हतीच म्हणा. मला एक प्रसंग चांगलाच आठवतोय, हा मनुष्य एकदा आईस्क्रीम घ्यायला आला होता. तिथे एक लहान मुलगी उभी होती. माझ्याच बिल्डिंग मधली. ती कोणतं आईस्क्रीम घ्यायचं ठरवत होती. खरंतर याचं आईस्क्रीम घेऊन झालं ही होतं, पण तो तिच्याकडे टक लाऊन बघत होता. इतक्या लहान मुलीकडे त्याचं असं बघत राहण माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं. पण त्याला मी थेट हटकलं नाही माझं नियमित गिर्‍हाईक होता ना तो. मात्र त्या मुलीला वैतागून म्हटलं की कमीत कमी आईस्क्रीम २० रुपयाला आहे १० ला नाही. त्यामुळे मला हवं तेच घडलं ती बिचारी त्याच्या समोरून तिथून गेली आनि मग तो हळहळत निघुन गेला. तो जाताच त्या मुलीला हाक मारून मी १० रू चं आईस्क्रिम दिलं होतं

आता ती मुलगी मोठी झालीये, माझंही केमिस्टचं दुकान बंद करून रितसर हॉटेल टाकलंय. आता हा मनुष्य चांगला पिकला आहे, पण पिकल्यापेक्षा मुरला आहे असेच म्हणायला हवे. आता खरं तर हे वय नातवंड खेळवायचं (पण कसं शक्य आहे, त्याचा पोरगा नुसताच इथेतिथे हुंगत असतो, फारसा कोणी भाव देत नाही - कालपर्यंत एक मुलगी तरी द्यायची) पण याची नजर अजूनही कोणी आईस्क्रिम घेतंय का इथेच! इतके दिवस नकळत बघायचा, काल मात्र एका तरूण मुलीकडे बराच वेळ रोखून बघत होता. मला आठवलं की तीच ती मुलगी जी लहान असल्यापासून हा टापत होता. एखादीवर एवढा जीव. बाकी ही चीज तरुणपणी अशी मस्त मस्त होणार आहे हे थेरड्याने लहानपणीच ओ़ळखलं होतं तर! उगाच नै म्हटलं 'मुरला आहे'! तर तो तिथेच थांबला नाही त्याने तिच्यासाठीही आईस्क्रिम घेतलं आणि ते चोखत तिच्याकडे बघुन हसु लागला. मी त्याला तिथेच हाकलणार होतो पण तेवढ्यात ती मुलगीच बाहेर गेली. या थेरड्याला माहित नव्हते बहुदा की ती त्याची मे-बी-सुन आहे ते! त्याने त्याला पाहिले आणि दोघांचीही फाफलली. पोरगा त्याच्याकडे वळणार तोपर्यंत म्हातार्‍याला मागेच रस्त्यावरून शेजारचा मिथुन आणि त्याची बायको स्कूटरवरून फिरताना दिसली. त्याच्या बायकोने मिथुनला पकडून धरले होते. "तरीच खायला काय आणू? विचारलं तर विष असं म्हणाली, मला मारून दोघेही सुटका करून घेणार वाट्टे" असं काहिसं म्हणत कोसळला ना तो!

च्यामारी, माझ्या हॉटेलात हे घडल्याने मला फुकटचा अ‍ॅमब्युलन्सचा खर्च करावा लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

देवा... सुटलेत लोक!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मूळ लेख, त्यावरील प्रतिक्रिया, विडंबन आणि त्यावर निरनिराळ्या कोनांतून लिहिलेले प्रतिसाद या सार्‍याला आता (नाबोकोव्हची क्षमा मागून) 'लोलितेचे आंतरजालीय लळित' म्हणावेसे वाटू लागले आहे ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगागा ROFL
अदिती, सखु आणि ऋ _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंज्याचा पार पंचनामाच करुन टाकला हो ! आधी गुर्जींनी आणि मग बाकी पण आलेत हात धुवून घ्यायला. अजून एक शाम्याचा अँगल राहिलाय, तोही लिहावा कोणी , म्हणजे कॅलिडोस्कोप पूर्ण होईल!

हहपुवा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशक्य!
मला सारखी साशा बॅरनची आठवण होते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत धाग्याशी संबंधित अशी बातमी वाचली :

"आईसक्रीममुळे गूंगे झालेले अंकल"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

विनोदी म्हणावं का माहितीपूर्ण? सखूमावशींची सुबक ठेंगणी ठसकेबाज असली तरी या अंकलच्या सुबक ठेंगणीबद्दल सहानुभूती वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हजम नही हुआ.
अन का ते लिहितो आता डिट्टेलवार.

पहिले (अन कदाचित शेवटचेही) कारण : प्रेरणा.

या प्रेरणेशिवाय स्टँडअलोन लेखन कदाचित हजम केले असते.

इथेच मोलकरणीला सोसाव्या लागलेल्या त्रासाबद्दल गविंनी लिहिले होते तिथे मी अत्यंत खडूस प्रतिक्रिया लिहिल्या होत्या, अन तो धागा त्यांनी उडवला होता. ऐसीच्या सुरुवातीच्या दिवसांतली ही गोष्ट आहे.

पण, या धाग्यातली प्रेरणा असलेल्या धाग्यात गविंनी मांडलेल्या भावनेची खिल्ली उडविणे मला, व्यक्तिशः, कोणत्याही अँगलने पचले नाही. या म्हातार्‍याला/प्रौढाला एका लहान मुलीला आईसक्रीम विकत घेऊन देण्याची भीती वाटली, या पाठीची सामाजिक पार्श्वभूमी (चॉकोलेटचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार) ध्यानात असेल, तर माझी बोटे तो प्रेरणावाला लेख कितीही फडतूस असेल तर त्याचे विडंबन करू धजणार नाहीत.

हे दुसरे कारण होते.

प्रेरणेच्या लेखात आहे तशी भिती वाटलेल्या म्हातार्‍याने, दहापाच वर्षांनंतर त्याच/किंवा इतर लहान मुलीकडे पहाणे व तिने असे इंटरप्रिट करणे. अन त्यावरचे हे प्रतिसादही...
वेल,
बात कुछ हजम नही हुई.

गविंसारखे विचार मनात आल्याने ६ वर्षांच्या मुलीला आईसक्रीमचे एक्स्ट्रा १० रुपये न देता, १० वर्षांनंतर मी तिच्या तारुण्यात चोकोबारचे पैसे कॉम्प्लिमेंटरी देईन, अन तेही स्वतःचा डायबेटीस खड्ड्यात घालून, बाऊन्सरला उभा राहून सिक्षर ठोकताना????

वेल,
बात कुछ..
अजिबातच हजम नही हुई...

गुर्जी, तुमच्याकडून हे असं यायला नको होतं, असं वाटतं, इतकंच.

(ऋषिकेश यांचा हा प्रतिसाद = गविंच्या कथानायकाचे वागणे असे गृहित धरले तर मग तुमचे चालू द्या.., माझे सपशेल चुकले असे म्हणेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अरे या डागदरांनाच कोणीतरी औषध का नाही पिलवून देत रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बिगर औषदाचा अस्ला मंजी मी लिव्ला तसा पर्तिसाद लिव्ता येतो का वो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एखाद्या लेखावर आधारित विडंबन लिहिणं म्हणजे त्या लेखाचं विडंबन इतकं सरळ गणित नेहमी नसतं. किंबहुना या लेखाला अनेकांनी 'सीक्वेल' म्हटलेलं आहे. आणि ते एका अर्थाने अधिक लागू होतं. या कथेत नक्की कसली खिल्ली उडवलेली आहे हे दुर्दैवाने तुमच्या लक्षात आलेलं नाहीये. तुम्ही चिं वि जोश्यांचं 'माझे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' लेख वाचलेला आहे का? ती कसली खिल्ली आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्या लेखाचं नाव आधी होतं 'माझे सत्याचे प्रयोग'. हे टायटल फारच थेट होतं असं वाटून प्रकाशकांनी अर्थातच बदललं. त्या लेखात चिमणराव ठरवतो की ते काही नाही, आतापासून सत्य बोलायचं. हे तत्व तो जिवापाड पाळतो. मग जिथे व्हाइट लाय वापरायला हवी तिथेही तो खरं बोलतो, आणि त्याची पंचाइत होते. बाकीची उदाहरणं आठवत नाहीत, पण एक आठवतं. त्याच्या एका मित्राची आई का काकू आजारी असते. तिला हा भेटायला जातो. आणि सरळ बोलून टाकतो - 'काकू, तुम्ही काही या आजारातून बऱ्या होणार नाहीत, डॉक्टरांनी तुम्हाला जेमतेम सहा महिने दिले आहेत.' कहर म्हणजे काही दिवसांनी त्याला आपलं सत्य 'झाकण्या'साठी 'मी दारू पिऊन बोलत होतो' असं खोटं बोलायला लागतं.

गविंचा मूळ लेख आला तेव्हा 'दिलसे' निर्णय घ्यायचा की 'दिमागसे' याच्यावर थोडी चर्चा झाली. आणि गविंनी बराच विचार करून 'दिमागसे' निर्णय घेतल्याबद्दल काहींनी टीकाही केली. 'सदा सत्य बोलावं' हे जसं आकर्षक पण निरुपयोगी तत्व आहे तसंच 'नेहमी दिलसे निर्णय घ्यावा, समाजाचा विचार करू नये' हेही आहे. या सल्ल्याची चेष्टा आहे. गविच्या कथेतल्या व्यक्तीलाच पुढे ही चूक सुधारायची संधी मिळाली आणि त्याने ती घेतली तर? या कल्पनेतून कथा लिहिलेली आहे.

तेव्हा एका अर्थाने गविंच्या विचारपद्धतीला दुजोराच आहे. द रोड नॉट टेकन वॉज नॉट टेकन, प्रॉबेबली फॉर अ गुड रीझन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही लिहिलेत ते मान्य आहे, समजतेही. अन जरा जास्तच दिल्से प्रतिसाद होता तो माझा. पहिलाच लिहिला तेव्हाच भावना पोहोचल्या असतील असे वाटत असतानाच पुन्हा 'डिट्टेलवार' का लिहावा वाटला कुणास ठाऊक.
असो.
उडवायलाच आलो होतो, पण बूच लागलंय. सबब आहे ते आहे तिथे आहे.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डॉक, आता उतारा म्हणून प्रतिसाद उडवण्याचा विचार करण्याऐवजी राशोमान बघा. एकदा बघितलेला असेल तर पुन्हा एकदा पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गविंचा मूळ लेख आला तेव्हा 'दिलसे' निर्णय घ्यायचा की 'दिमागसे' याच्यावर थोडी चर्चा झाली. आणि गविंनी बराच विचार करून 'दिमागसे' निर्णय घेतल्याबद्दल काहींनी टीकाही केली. 'सदा सत्य बोलावं' हे जसं आकर्षक पण निरुपयोगी तत्व आहे तसंच 'नेहमी दिलसे निर्णय घ्यावा, समाजाचा विचार करू नये' हेही आहे. या सल्ल्याची चेष्टा आहे. गविच्या कथेतल्या व्यक्तीलाच पुढे ही चूक सुधारायची संधी मिळाली आणि त्याने ती घेतली तर? या कल्पनेतून कथा लिहिलेली आहे.
तेव्हा एका अर्थाने गविंच्या विचारपद्धतीला दुजोराच आहे. द रोड नॉट टेकन वॉज नॉट टेकन, प्रॉबेबली फॉर अ गुड रीझन.

>>>>>>>>>>>>>>> सहमत... याच कारणासाठी हा एक उत्तम जमलेला लेख ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाम चे मनोगत :
"आमचे फ़ादर. कधी कसे वागतील सांगता येत नाही. इतकंच त्यांच्याबद्दल सांगणं योग्य" असं तिला थोडक्यात सांगितलं होतं. आता ही म्हणजे अस्मादिकांची मैत्रीण. चांगली गुंतागुंतीची. म्हणजे आमच्या बाजूने जोरकस गुंतवणूक. पण तिचे काही समजत नाही असे काहीसे.... म्हणजे नेहमीचंच. हा गुंता सोडवायचा एकच मार्ग म्हणजे अर्थातच प्रपोज करणे. त्यासाठीची आवश्यक सारी फ़ील्डिंग लावून सेट केलेली.
आमचा फ़ादर म्हणजे माणूस तसा धोरणी, नाकासमोर चालणारा. पण दोन्ही बाजूंचा अति विचार करणारा. सारख्या आशिडिटीच्या कस्ल्या कसल्या गोळ्या खाणार. बीपी डायबेटिस तर आहेच. कोणालाही खरंतर कीव यावी असाच आहे हा माणूस. मलाही आली नेमकी एकदा आणि त्यांना गेल्या आठवड्यात पटवून दिलं मीच... ( झक मारली आणि .. असो ) की तुमचे आजार हे तुमच्या सार्‍या अतृप्त इच्छांचं मूर्तरूप आहेत. वर तोंडी लावायला थोडी सहानुभूती दाखवली तर फ़ादर पहिल्यांदा म्हणाला, "पुरे झालं. पैसे वगैरे मिळणार नाहीत. " महा संशयी माणूस. सरळ म्हणालो, " पैसे नकोत. पण जरा सुखाने जगा. अतिविचार करता, ते विचार असे जठराग्नी पेटवतात अन रक्तदाब वाढवतात. जरा दिलसे जगा .. इच्छा मारून किती दिवस काढणार ?"

पुढे काय होणार याची कल्पना असती तर नसतो बोललो. खरंच नसतो बोललो.
नाही, म्हणजे बिलाची आणि शुगर / कोलेस्टेरॉलची चिंता न करता हॉटेलात जाऊन चमचमीत खाणं, विविध डेझर्ट्स हाणणं एक वेळ परवडलं, पण रविवारी सकाळी उठून सरळ " आज पत्ते खेळायला जातो आणि रात्री पार्टी आहे, उशीरा येइन " असं म्हणत सरळ गायब होणं, हे जरा अति होतं. ... चमत्कारिक. पण त्याकडे लक्ष द्यायला मला खरंच वेळ नव्हता. त्या दिवशीचं मिशन प्रपोजल अधिक महत्त्वाचं होतं. दुपारी तिला हॉटेलात सरळ विचारून टाकायचं असं मी ठरवलं होतं. तर आमच्या टूव्हीलरने ऐन वेळी दगा दिला. क्लच वायर तुटली मग गाडी ढकलत नेऊन दुरुस्त करून आणेपर्यंत चाळीस मिनिटं गेली. तेवढ्यात तिचे चार पाच मेसेज येऊन गेले " वॉट्सऍप" वरती ...

हॉटेलवर पोचतानाच बाहेर सोसायटीतल्या एक काकू दिसल्या. गोड हसल्या. मीही हसलो. यांची मुलगी माझ्याबरोबर मॅथ्सच्या क्लासला यायची शाळेत असताना. मी पहिलीत असताना आमची ओळखसुद्धा नव्हती तरी एका दुकानात माझ्याकडे पैसे कमी पडत होते तेव्हा काकूंनी मला एकदा पतंग घेऊन दिला होता, हे सगळं मला बरोब्बर आठवतंय म्हणून त्यान्नी अस्से डोळे मोठ्ठे करून पाहिलं माझ्याकडे... आणि पुन्हा गोड हसल्या. माधुरी दीक्षितच जणू. मज्जाच सगळी. त्या इतके दिवस कशा परदेशात होत्या आणि आत्ताच परत आल्या आहेत असं काहीबाही सांगत होत्या आणि माझं लक्षच नव्हतं त्या बोलण्याकडे. इतक्या सुंदर स्माईलचा माणूसच मी प्रत्यक्ष पाहिला नव्हता. म्हणजे मी काकूंचा मेकअप पाहण्यात गर्क असताना तिथे नेमकी ही येऊन उभी राहिली आणि काकूंनी एक अत्यंत सुमार जोक करून मला टाळी दिली. मला ही सारी कितीही मज्जा वाटत असली तरी तिला अजिबात वाटली नाही...

" भडकल्यावर तू खूप सुंदर दिसतेस " असं म्हणायची प्रथा असली तरी मला अजिबातच पसंत नाही ते. खोटंच सगळं. तर तिने सांगितलं की हॉटेलच्या आत कोणी एक टकलू अंकलने तिला डर्टी लुल्क्स दिले आणि आईस्क्रीम ऑफ़र केलं. काकूंच्या समोरच. काकू हसल्या आणि हॉटेलात गेल्या. मीही रोमन स्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या काही मराठी प्रेमकविता तिला द्यायला आणल्या होत्या. तिचं देवनागरी रीडिंग खूप वीक आहे. तर ती म्हणते की आधी त्या गंज्या अंकलना जाब विचारायला हॉटेलात चल. मीही तिरीमिरीत आत गेलो तर एक टकलू माणूस माझ्याकडे पाठ करून काकूंशी बोलत उभा होता. म्हटलं आता दोघींवर इम्प्रेशन मारायची हीच संधी आहे... तर त्या माणसाला मी जोराने माझ्याकडे वळवून तीन चार शिव्या दिल्या आणि जोरात भिंतीवरती ढकलून दिले आणि अभिमानाने तिच्याकडे पाहिले. त्याच वेळी तो पडलेला माणूस " अरे शाम...." असं क्षीण पुटपुटत होता. कमाल झाली... आमचे फ़ादर नेमके त्याच वेळी त्याच हॉटेलात कडमडले होते. पुढच्या गोष्टी वेगाने घडल्या. " तू आणि तुझा बाप.. योर होल फ़्यामिली इज यक्क्क. पुन्हा कधी भेटू नकोस मला....डिस्गस्टिंग... " असं काहीबाही म्हणत ती बाहेर गेली... काकू थक्क झाल्या होत्या. आणि उठून उभं राहतानाच मला सॉरी म्हणणार्‍या फ़ादरला घाम फ़ुटला आणि पुन्हा चक्करच आली... मग ऍम्ब्युलन्स काय आयसीयू काय, सारं झालं... माईल्ड हार्ट ऍटॅक म्हणे...

आता ही सारी ष्टोरी कोणाला कळलीही नसती. पण हिनंच आमच्या सार्‍या ग्रुपला फोनवर कळवली.. मग मोघम असं फ़ेस्बुक स्टेटसच टाकलं... लोकांना अंदाज आलाच. काकूंनी सगळ्या सोसायटीतही सांगून टाकलं ... कुठं बाहेर पडावंसं वाटत नाही. डिप्रेशन येणार असं वाटतंय. एकवीस बावीस हे काही डिप्रेशनचं वय आहे काय? पण काय करणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ.

हल्ली मी " दिलसे" काहीच करत नाही.
क्षणभरसुद्धा बघत नाही कोणाकडे..
अगदी काकूंकडे कितीही बघावंसं वाटलं तरीसुद्धा.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खल्लास!

आता १. गंजा अंकल चोकोबार चाटतोय, २. शाम्या बापाला फाईट मारून मैत्रिण आणि काकूंवर इंप्रेशन मारू पहातोय हा प्रसंग हॉटेलवाला "ये सब क्या हो रहा है बेटे दुर्योधन" अवतारात पहातो आहे आणि ३. 'सुबक ठेंगणी' घरात लोळत 'एमटीव्ही रावडी' पहाते आहे अशी चित्रं कोणीतरी काढणं बाकी आहे.

शिवाय या काकूंच्या मुलीचं शाम्यावर प्रेम आहे, आणि या प्रसंगानंतर पुढे काय असाही कल्पनाविस्तार करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"श्याम, अरे पतंग उडवताना जसं कायम पतंगाचा विचार करतोस, तसं पतंग उडवत नसताना कधी कधी माझाही विचार कर हो."

या कथेत श्यामच्या काकूंचं नवं कॅरेक्टर घालून रंग भरल्याबद्दल भडकमकर मास्तरांना एक झिंदाबाद, एक वंदे मातरम, आणि एक भारतमाता की जय!

आता श्यामच्या काकूंची कथा कोण बरं लिहील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'शामचे मनोगत' झक्कास जमले आहे.
'ते चौकोनी कुटुंब' किंवा 'शामची घाई' या शीर्षकाखाली या सार्‍या कहाण्यांचे संकलन करता येईल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काय म्हणतोय. सगळे घोस्ट रायटर्स जमलेत इथे. एक १३ किंवा २६ भागांची कॉमेडी सिरीयलच काढूया. धमाल येईल. जाहिराती मिळाल्या तर भाग आणखी वाढवू. काय?

अवांतरः मुळ लेखात गुर्जींनी 'एसबिडिपी' शब्द कोणत्या डिशसाठी वापरलाय? त्यात पुरी आहे म्हणजे पुरीभाजी किंवा काय आहे ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

शेव बटाटा दही पुरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकू:

श्याम...त्याच्याबद्दल विचार करूनच मनात रोमांचक लहर उत्पन्न होते. तो समोर असतो तेव्हा त्याच्याशी किती बोलू अन किती नको असे होवून जाते. लहाणपणी मी त्याला एकदा पतंग घेवून दिला त्यावेळी कस्सला बघत होता माझ्याकडे! तो पतंग उडवायला सोसायटीच्या टेरेसवर गेला. ते निमीत्त साधून मी पण कपडे वाळत टाकण्याच्या बहाण्याने वर टेरेसवर गेले. तो पतंग उडवतांना सारखा वळून माझ्याकडेच बघत होता. मनात बोलले,"श्याम, अरे पतंग उडवताना जसं कायम पतंगाचा विचार करतोस, तसं पतंग उडवत नसताना कधी कधी माझाही विचार कर हो." असो.

लहाणपणीतला "आईचा श्याम" आता मोठापण झालाय. अगदी मस्त दिसतो. नाहीतर आमचे हे. काय मेलं ते ध्यान! एवढा मेकअप करते, फिगर मेंटेन ठेवते तरी माझ्याकडे मेलं लक्षच नाही. नेहमी आपलं त्या श्यामच्या वडीलांसोबत त्यांच्या घरी पत्ते कुटायला नाहीतर पार्टीला जातात. श्यामच्या आईशी नेहमी गुलूगुलू बोलतात. श्यामच्या आईची तारीफ करतात. मल म्हणतात कसे, "अगं ती श्यामची आई नेहमी एमटीव्ही रावडी पाहत असते. तू काय नेहमी केकता कपूरच्या सिरीयल बघत बसते मठ्ठाड." घ्या मी मठ्ठाड काय? तो श्याम कधी हातात येतो तेव्हा दाखवते इंगा.

बाकी आज तर कमालच झाली. नेहमीप्रमाणे कोपर्‍यावरच्या केमीस्ट्+ हॉटेलात गेले होते. तेथे श्याम भेटला. कस्सला बघत होता माझ्याकडे! तेव्हढ्यात त्याची गर्लप्रेंड आली. माझ्याकडचे लक्ष श्यामने काढून घेवून तो तिला मोबाईल दाखवायला लागला. असेल काहीतरी चावट मेसेजेस. पण मला न दाखवता तिला? माझा संताप झाला अन मी केमीस्ट्+ हॉटेलात गेले. जातांना ओझरते ऐकले की ती फिंदरी त्याला म्हणत होती की, " तू आणि तुझा बाप.. योर होल फ़्यामिली इज यक्क्क. पुन्हा कधी भेटू नकोस मला....डिस्गस्टिंग... "

पुढची घटना मला काहीच समजले नाही. श्यामने तिरीमिरीत त्याच्या पाठमोर्‍या टकलू बापाला ढकलून दिले. तो बाप कोसळला तसे श्याम अन ती पोरगी गायब झाली. शेवटी केमीस्टवाल्याने अँबूलंन्स मागवली अन त्या टकलूला हॉस्पीटलात नेले. त्या दिवसापासून मात्र श्याम अन ती पोरगी काही एकत्र दिसली नाही. काय बिनसले कोण जाणे. आता मला श्यामला जरूर भेटता येईल. नाहीतरी त्या दोघांचे फाटल्यावर माझी गरज त्याला जास्त पडेल. पाहू त्याला उपयोगी पडून एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

जे श्री क्रष्ण.
तमारा घाटला लोगोनी साईटपर आवीने कईं बोलवानु तो अमने जराक "ओड" तो लागे. गया पंदर वरस हूं "शोप" पर बेठा बेठा जोऊं छुं की आ एटला बध्धा घाटला लोगो अने एमनी बेइरी अने बध्धा कुटुम अमारी "शोप"पर आवीने संताकुकडी रमीने जाय छे, उपरथी एटला बध्धा कथा केवाय छे तो हूं मनीमन बोलुं छूं की एमने बे त्रण कामनी वातपण कहीं आउं.

तो पेल्लो गवि नामनो घाटलो. जवानीमां "शोप"पर आवीने "सिग्रॅट" उधार लईलईने जावतो हतो अने राहपर चलवावाळीं पोयरी पछीं दोडतो हतो. पछीं मायबापने एनो लगन लगावी दिधोपछी बेइरीनी पाछड पाळेलु जानवर तरीके सांझना वक्ते आवी लाग्यो. "सिग्रॅट" ना एकाऊंट तो डूबी गिया, आ घाटलो तो "रात नी वखते नवपरिणित पति जे वस्तु खरीदवा माटे आवतो छे ए वस्तुओ" माटे पण उधार लेतो हतो ! हवे वात करो तमें. पण माणस बहुं सज्जन. एक दिवसे बपोरे मने याद छे, आ घाटलो बेइरीने माटे आईसक्रीम खरीदवा माटे आव्यो हतो. एक नानी छोकरी पण आ वक्ते आईसक्रीम लैवा आवी हती. मने मन ही मन ख्याल आव्यो के आ घाटी छोकरीनी माटे आईसक्रीम लेवानु विचार करतो हतो. हुं मनमा एवुंच विचार करतो हतो, के घाटला, तू पेल्लो उधार तो चुक्ता कर ! पण शुं करवानुं. एक तो जूनो घराक. अने उपरथी "केसरी" कपडा पेरवावाळां पार्टीनुं "शाखाप्रमुख" ! एटले छोडी आपयो.

अने आ पेल्लो घासकडवी घाटलो. पेल्लो गवि दोडडाह्यो तो आ घेलचोदियो डोहो. डायबेटीस अने ब्लडप्रेशर अने भगवान खबर शुं शुं बीमारीमाटे दवा खरीदवा माटे गया पंधर वरस आवती रह्यो छे. एक वात तो चोक्कस छे. साला बाकी कोन्स्टिपेशन थई जेवां लागता घाटला लोगोमां आ बहुं रंगीलो लागे छे. फॉनमां बेईरीने "लव यु डारलिंग" बोलीने अमने बॉर्र (कोई साईटउप्पर आ नामनी ओरत छे एनाथी कोई वास्ता नथीं) करी रेहेतो छे. पेल्ले पेल्ले मने लागतो हतो के बेईरीने "लव यु" बोलतो हशें, पण एक वखते बेईरीनी साथे "शोप" पर आव्या करता मने खबर पडी गईं की कोई अलग लफडो चोक्कस छे. तो आ गांडाभाय एकवार हांफता हांफता बेसी गिया अने कोई दिकरी उप्पर लाईन मारतो हूं आ आ मारी पोत्तानी ऑखथी जोव्या. ते वखते मने खबर लागी गईं के "मामा, एमने कोई विक्षिप्त दिकरी मळीं गई" !

शुं जमानो आवी ग्यों. एक घाटलो उधार चुक्ता करतावगैर भागी जाय छे. अने दूसरो दिकरीसाथे रमे छे. पण जवा दो. म्हारी "शोप" पर ज्यां सुधी आ घाटला लोग आव्ती रह्यां छे त्यां सुधी फरीयाद केम करवानी ! केम साची वात के नथी ? जे श्री क्रष्ण !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्रिवार निषेध ! हे गुजु मराठीत चालले असते . आम्हाला लै त्रास होतोय समजून घ्यायला .
मराठी अनुवाद द्यावा अन्यथा परिणाम वाईट होतील . ( इति एक मणसे समर्थक !) Fool Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जय श्री राम साहेब, आपण या संकेतस्थळावर नवीन दिसता. हरकत नाही. (पक्षी : आम्ही उदारमतवादी असल्याकारणाने आणि संकेतस्थळावर तसेही ट्रॅफिक कमी असल्याकारणाने वाटेल त्याचे स्वागतच करतो.) आपल्यासाठी एक सूचना : कृपया संकेतस्थळावर मराठीत लिखाण करावे. देवनागरी लिपीत गुजराती लिहिल्यास संस्थळचालिकेला वाचताना त्रास होतो. अधिक माहितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे वाचावीत. ह्याउप्पर असे वर्तन आढळल्यास नाईलाजाने कडक कारवाई करावी लागेल. (पक्षी : 'संस्थळवाले गंजे अंकल' असं विडंबन पाडावं लागेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संताकुकडी :). आ संताकुकडी अहियां वांचीने मने ओलो मुंबई दूरदर्शननो बीजो चेनेल याद आवी गयो.

"रात नी वखते नवपरिणित पति जे वस्तु खरीदवा माटे आवतो छे ए वस्तुओ" माटे पण उधार लेतो हतो ! हवे वात करो तमें.

तमारी घाटी भासा मा सुं केवाय? एकदम 'कंडम' माणस!

पेल्लो गवि दोडडाह्यो तो आ घेलचोदियो डोहो

ROFL =)). 'पेस्तनकाका'नी याद आवी गयी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजराती पाठ-एर जोन्नो ऑनेक धोन्नोबाद. एटा मोन दिये पोडते हॉबे.

मोदले ओन्दु मातु कुडा तिळितिद्दिल्ला, आदरे ईसरे स्वल्प स्वल्प तिळितद, जास्ती येन कठीण इल्ला काणसतद. हिंगे ओदबेकु बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे फोनवाले मित्र तुम्हीच का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मिथुनराव
अख्ख्या तरूणपणात मिळून आयुष्यात जितक्या घटना घडल्या नसतील तितक्या या नवतारुण्यात घडु लागल्या आहेत. मला आणि माझ्या हिला पहिल्यापासूनच नीटनेटकेपणाची आवड. पण माझं नीटनेटकेपण मात्र माझ्या हिच्या सौदर्यापुढे अगदी फिकं पडत असे. सुरवातीला माझी बायको इतकी सुंदर आणि मादक आहे म्हणून मला मजा येत असे. पण नंतर आम्ही अमेरिकेला गेलो असता, तेथील ऑफिसातील कलिग्जमध्ये ही भलतीच फेमस झाली आणि तिला तिच्या सौंदर्याचा गर्वच चढला. पलिकडल्यावर्षी आम्ही परतल्यावर ही पारच बदलली. सगळा वेळ त्या एकता कपूरच्या सिरीज बघत वेळ घालवायची. माझ्याकडे जाम लक्ष द्यायची नाही. घरातूनही फारशी कधी बाहेर पडायची नाही. अपवाद फक्त गेल्या संक्रांतीला गच्चीवर जाऊन बसली होती. म्हणे की तीला पतंग उडताना बघायला खूपच आवडतं.

हिच्या या अशा वागण्याने इथे आल्यावर मला अगदीच एकटं वाटु लागलं होतं. त्यातच एकेदिवशी शेजारच्या ग्यालरीत श्यामच्या आई कपडे वाळत घालताना दिसल्याबामी हाय केले तर त्यांनी चक्क दुर्लक्ष केले. मग मी हिच्याकडून माहिती मिळवली की त्यांचा नवरा हल्ली अचानक कसा पत्ते आणि पार्ट्यांच्या आहारी गेला आहे. त्यातून मला इतकेच कळले की त्या कशा एकट्या आहेत. एके दिवशी धीर करून दुपारी त्यांच्या घरी गेलो, तर त्यांचे मिस्टर - म्हणजे श्यामचे बाबा -बाहेरच निघाले होते. त्यांनी मला त्यांच्या सोबत पत्ते खेळायला खेचूनच नेले. त्यांचा ग्रुपही मस्त होता. मला दुपारचा टाईमपास मिळाला. शिवाय या निमित्ताने त्यांच्या बायकोशीही ओळख झाली. त्या संध्याकाळी त्यांच्या घरी चहाला म्हणून गेलो तर त्या चक्क 'एम टिव्ही रावडी' बघत होत्या. मला त्यांच्या पुरोगामित्त्वाबद्दल खात्रीच पटली. मी घरी येऊन हिला म्हटलेही की "अगं ती श्यामची आई नेहमी एमटीव्ही रावडी पाहत असते. तू काय नेहमी केकता कपूरच्या सिरीयल बघत बसते मठ्ठाड." तशी रागाने आत निघून गेली.

काल मात्र गंमतच झाली. ही चक्क घराबाहेर गेली होती. मी श्यामच्या बाबांबरोबर बाहेर पडायचे म्हणुन त्यांच्या घरची बेल वाजवली तर त्यांच्या मिसेसने दार उघडले. म्हटले चला दिवसाची सुरवात तर चांगली झाली. त्या डोळ्यांची पिटपिट पिटपिट करत म्हणाल्या "अहो हे की नै आज सकाळीच बाहेर पडलेत. शाम्यासुद्धा गेलाय कुठेसा. मला बै कंटाळा आलाय" माझी लाळ कशी गळली नाही कोण जाणे, त्या बोलतच होत्या "खरंतर मला दळण आणायला जायचे होते आजच्या पुरती कशीबशी कणीक आहे". मी म्हणालो अहो मग चला की आपण जाऊन येऊ स्कूटरवरून. त्या चक्क हो म्हणाल्या. त्या मागे मला घट्ट पकडून बसल्या होत्या. आम्ही दळण घेऊन येत होतो तो काय समोरच्या केमिस्टवाल्याने टाकलेल्या हॉटेलसमोर मला ही आणि तो शाम्या दिसले. मी कोपर्‍यावरच स्कूटर थांबवली. घरी मख्खासारखी बसणारी ही इथे मात्र अगदी हसत होती, त्या शाम्याला टाळी दिलेली सुद्धा मी पाहिलं. इतक्यात तिथे अजून एक मुलगी येऊन शाम्याशी बोलु लागली तशी ती आत गेली आणि मी ती संधी साधुन घराकडे निघालो. हॉटेलसमोरून जाताना आत गडबड ऐकू आली म्हणून आत पाहिलं तर ही, शाम्या, शाम्याचे बाबा सगळेच हॉटेलात होते, हॉटेलमालक डोक्याला हात लाऊन बसला होता, बहुदा शाम्याच्या बाबांनी आम्हाल स्कूटरवर बघितलं असावं, नक्की काय झालं कळ्ळं नाही पण आम्ही तिथून निघालो. नशीब हिने मला पाहिलं नाही.

घरी आल्यावर श्यामच्या आई एम्टिव्ही लावणार इतक्यात श्यामचा त्यांना फोन आला की बाबांना हॉस्पिटलात हलवलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या चक्क हो म्हणाल्या. त्या मागे मला घट्ट पकडून बसल्या होत्या

ROFL ROFL आवरा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने