Skip to main content

'टायटन् अ‍ॅरम्' ऊर्फ 'कॉर्प्स् फ्लॉवर' ऊर्फ 'शवफुला'चे फुलणे

वॉशिंग्टन् डीसी मधील 'यू.एस्.बोटॅनिक् गार्डन्' मध्ये आज एक फूल फुलते आहे.
ते फूल म्हणजे 'टायटन् अ‍ॅरम्'. आपण त्यास 'शवफूल' म्हणूयात.

हे अवाढव्य जांभळे-हिरवे-पिवळे फूल १० फुटांपर्यंत उंच होऊ शकते. याच्या उमलण्याचा / बहराचा काळ निश्चित नाही. कधी वर्षांनी तर कधी दशकांनी ते उमलते. उमललेल्या स्थितीत २४ ते ४८ तास राहिल्यावर ते झटकन मिटते. निरीक्षकांच्या मते डीसी मधील ते फूल पूर्ण फुलण्याचा आज दिवस आहे (२२ जुलै - ईस्टर्न् टाईम्).

या फुलाचे असे विचित्र नांव अश्यासाठी की ते उमलल्यावर त्याला सडलेल्या मांसाचा असह्य दर्प येतो. परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करून घेताना या वासासोबतच काही प्रमाणात उष्णताही बाहेर फेकली जाते.

इथे त्या फुलण्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण आणि लगोलग प्रसारण होत आहे.
-----

२०१० साली तोक्योमधील हे दृश्य

किंवा
२०१२ साली स्वित्झर्लंड मधील हे शवफूल -

किंवा हे आणखी एक उदाहरण (स्त्रोत)-

धाग्याचा प्रकार निवडा:

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/07/2013 - 01:00

अशा प्रकारचा असह्य दर्प सहन करून कोणत्या प्रकारचे कीटक या फुलासाठी परागीभवनाचं काम करतात? यांचा रंगही फार आकर्षक दिसत नाहीये. कीटकांना त्यातून काय फायदा होत असेल?

अमुक Tue, 23/07/2013 - 01:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो तो दर्प, रंग माणसांसाठी वाईट असला तरी कीटकांसाठी मेजवानी असावी.
आता सडलेल्या मांसाच्या आजुबाजूस माश्या घोंघावताना पाहतोच की आपण. त्यांच्यासाठी सुग्रास असणार तो..
मात्र या फुलाबाबत कीटकांचा निश्चित फायदा माहीत नाही. माहिती खोदून काढावी लागेल. त्यांना काहीतरी अन्न मिळतच असावे, असा कयास.

अवांतर -
यावरून एक आचरट विनोद आठवला.
Two flies are sitting on human shit. One fly farts. Other says, "Hey, damn you, I am eating here". :)
यावरूनच "प्रथमग्रासे मक्षिकापातः" हे अवतरण आले असावे काय ?
(असा प्रश्न विचारण्याचा अभिषिक्त अधिकार खरे तर नंदन यांचा. ते उदार अंतःकरणाने क्षमा करतील अशी आशा. ;) )

Nile Tue, 23/07/2013 - 01:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा प्रकारचा असह्य दर्प सहन करून कोणत्या प्रकारचे कीटक या फुलासाठी परागीभवनाचं काम करतात?

लेखात सरळसरळ लिहलंय की!

कधी वर्षांनी तर कधी दशकांनी ते उमलते

बोंबलायला उमलतच नसेल तर परागीभवन काय कप्पाळ करणार? हे म्हणजे... असो असो.. उगाच उपमा नको द्यायला, ब्यान व्हायचो! ;-)

अरविंद कोल्हटकर Tue, 23/07/2013 - 02:06

वर दाखवलेले फूल जसे जगात सर्वात मोठे फूल आहे तसेच सर्वात मोठे पान असणारे झुडूप मी वँकूवर येथे क्वीन एलिझाबेथ उद्यानात पाहिले होते. त्याचे मी घेतलेले छायाचित्र येथे दर्शवीत आहे.

अधिक माहिती येथे पहा.