१९४३ची मुंबई.

जालावर http://cbi-theater-10.home.comcast.net/ ह्या संस्थळावर मला १९४३ सालच्या दक्षिण मुंबईची त्रोटक माहिती देणारे एक ३०-पानी पुस्तिका मिळाली. येथे ती पूर्ण दाखवीत आहे.

दुसर्‍या महायुद्धातील CBI Theatre म्हणजेच China-Burma-India Theatre ह्या भागातील युद्धामध्ये भाग घेण्यासाठी आणण्यात आलेले अमेरिकन, ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सैनिक मुंबई बंदरात उतरल्यावर त्यांचे मुंबईतील काही दिवसांचे वास्तव्य सुरळित पार पडावे अशा हेतूने त्यांना दक्षिण मुंबईची तोंडओळख करून देणे हा ह्या पुस्तिकेचा हेतु आहे. पुस्तिकेची निर्मिति तेव्हाचे मुंबई इलाख्याचे गवर्नर रॉजर लम्ली ह्यांची पत्नी कॅथेरीन अध्यक्ष असलेल्या Hospitality Committee ने केली आहे आणि मुंबईत व्यवसाय करणार्‍या काही कंपन्यांनी त्या पुस्तिकेचा खर्च केला आहे. पुस्तिकेच्या प्रारंभालाच गवर्नमेंट हाउसच्या स्टेशनरीवर लिहिलेले आणि अध्यक्षबाईंची स्वाक्षरी असलेले पत्र पुस्तिकेचा हेतु स्पष्ट करते.

पुस्तिका चाळणे म्हणजे ६०-७० वर्षापूर्वीच्या काळात डोकावण्याची खिडकी उघडण्यासारखे आहे. दक्षिण मुंबईतील सैनिकांना उपयुक्त जागा (Services Rest Room, Seamen's Institute, Green's Restaurant, Shandy Tavern), सिनेमाची थिएटरे (Capitol, Empire, Excelsior, Metro, Regal - बहुतेक आजहि चालू आहेत), पोहण्याचे तलाव (ब्रीच कॅंडी फक्त युरोपियनांसाठी!), ट्रॅम-बसचे मार्ग, प्रेक्षणीय स्थळे (हॅंगिंग गार्डन - बस रूटस् E,H, विक्टोरिया गार्डन्स - बस रूटस् A,G, प्रिन्स ऑफ वेल्स म्यूजियम - बस रूटस् A,B,C,D) असे आता विसरलेले बरेच तपशील येथे दिसतात. वस्तूंच्या किंमती पाहण्यासारख्या आहेत. गोल्ड-फ्लेक, प्लेयर्स आणि वुडबाइन सिगरेट्सची १० ची पाकिटे ४॥, ३॥ आणि २ आण्यांना, अर्ध्या बाह्यांचा खाकी शर्ट २रु १५आ, बसचे तिकीट २ मैलांना १ आणा, टॅक्सी मैलाला ८ आणे अशा आज विश्वास ठेवता येणार नाही अशा किंमती पाहण्यास मौज येते.

पुस्तिकेच्या शेवटास दक्षिण मुंबईचा नकाशा जोडला आहे. क्रुकशॅंक रोड (महापालिका मार्ग), कारनॅक रोड (लोकमान्य टिळक मार्ग), क्वीन्स रोड (महर्षि कर्वे मार्ग), हॉर्नबी रोड (दादाभाई नौरोजी मार्ग), जीआयपी रेल्वे ( सेंट्रल रेल्वे), बीबीसीआय रेल्वे (वेस्टर्न रेल्वे) अशी विस्मृतीत गेलेली नावे तेथे दिसतात. (ह्यात मला एक गोष्ट बुचकळ्यात टकणारी दिसते. रस्त्यांची सर्व नावे जुनीच असतांना जुन्या एस्प्लनेड रोडलाच केवळ महात्मा गांधींचे नाव कसे? १९४३ साली ब्रिटिश सत्ताधारी मुंबईतील एका मोठया रस्त्याला गांधींचे नाव, आणि तेहि महात्मा ह्या पदवीसह देतील हे शक्यच नव्हते. माझ्या समजुतीनुसार हा नावाचा बदल १९४७ नंतर लगेचच करण्यात आला पण तेव्हा अन्य नावे बदलली नव्हती. म्हणजेच हा नकाशा १९४७ नंतरचा असून कोणीतरी पुस्तिकेला जोडून दिल्यामुळे पुस्तिकेबरोबरच येथे उपलब्ध झाला आहे. नकाशा सैनिकी वापरासाठी तयार करण्यात आला आहे हे उघड आहे कारण दक्षिण मुंबईच्या उत्तरेकडील सर्व भागास 'Out of bounds' करण्यात आले आहे. कॅंटोनमेंटच्या पलीकडील सर्व ’नेटिवां’च्या भागातील वेश्यावस्तीपासून सैनिकांना दूर ठेवण्यासाठी त्याच्या हद्दीवर Out of bounds च्या पाटया लावण्याची ब्रिटिश पद्धतच होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

किमती बघून खरंच गंमत वाटली. डोक्यात काही गणितंही झाली. सुमारे ३ रुपयाला अर्ध्या बाह्यांचा खाकी शर्ट, आणि सव्वाचार आण्यांना गोल्ड फ्लेकचं पाकीट. गोल्ड फ्लेकची किंमत २४० पट झालेली आहे. म्हणजे सुमारे ८.२ टक्के दराने भाववाढ. (यातली काही किंमतवाढ करांपोटी असेल तेव्हा हा आकडा तितका बरोबर नाही) मात्र अर्ध्या बाह्यांच्या खाकी शर्टाची किंमत ७०० रुपये नसावी असा अंदाज आहे. ती जर ३०० रुपये असेल तर किंमतवाढ सुमारे १०० पट - म्हणजे ६.८% दराने किंमतवाढ. त्याच दरम्यानच्या काळात दरडोई उत्पन्न सुमारे १४ टक्क्यांनी वाढलं (जीडीपी 93.7 billion rupees in 1950 to about 410006.4 billion rupees in 2006. लोकसंख्या तिप्पट म्हणजे महागाई वजा न करता रुपयांत मोजलेलं दरडोई जीडीपी १४५८ पट)

ही गणितं दोनतीन गोष्टींच्या दरावरून करणं योग्य नाही, पण साधारण अंदाज यायला मदत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या मुंबईची वर्णने वडील, काका, आजी इ कडून ऐकलेली आहेत. हे लोक तेव्हाच्या मुंबैबद्दल फार आत्मियतेने बोलत. वरील पुस्तिका वाचून त्याची आठवण झाली. चित्रात दाखवलेल्या देखण्या इमारती त्या काळी तर फारच प्रभावशाली वाटत असणार. दुर्दैवाने, मुंबैच्या जनजीवनाच्या रगाड्यात हे सौंदर्य बघायला मुंबैकरांना सवड नसते. ( मुंबैत असताना मीही व्ही टी च्या रचनाचिल्पाकडे मान वर करून कधी पाहिले नव्हते; खोटे का बोला? )
महानगरपालिकेची इमारत ह्या लांबून घेतलेल्या छायाचित्रात चांगलीच उंच वाटते आहे. एरवी समोरून बघताना रुंदीच जास्त जाणावते.
हा यॉट क्लब कुठेशी आहे / होता?

अवांतरः
ह्या घासकडव्यांना आकडे दिसले की बेरजावजबाक्या करून काहीतरी मोजल्याशिवाय मुळी चैनच पडत नाही. नाही, म्हणजे त्यांच्या म्ह्णण्यात तथ्य असेलही, आम्ही ते नाकारत नाही. पण धागा काय? स्मरणरंजनाचा. ह्यांना दिसते काय? किंमतींचे आ़कडे. असो! एकेकाची आवड, दुसरे काय?
जाता जाता, त्यांना पाठिंबा देणारा एक विदाबिंदू (डेटापॉइंट) आम्हीही देऊ शकतो. वरील पत्रकावरून १९४३ साली एका आण्याला दोन केळी मिळत असल्याचे दिसते.* १९७५ सालाच्या सुमारासही 'केळी आण्याला दोन' च मिळत होती. यावरूनही महागाई कमी कमी होत असल्याचे दिसून येईल. आमचे कुतुहल असे की १९४३ ते १९७५ मध्ये जराही दरवाढ न होण्यास काय बरे कारणे असू शकतील? मुंबैची वस्ती वाढली त्याकारणे केळ्याची आवक वाढली, म्हणून केळी लय स्वस्तात मिळू लागली, की आणखी कसे?
* संदर्भः येथे २३ मिनिटांवर बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९४३ सालचे जे दर लिहिले आहेत ते कुलाब्याचे (ताजमहाल हॉटेलच्या फूटपाथवरचे) असावेत (ज्या अर्थी नकाशात मेट्रो सिनेमाच्या पलिकडे आउट ऑफ बाउंड्स म्हटले आहे. म्हणजे गिरगाव सुद्धा आउट ऑफ बाउंड्स). म्हणजे ताजमहाल हॉटेलात येणार्‍या परदेशी पाहुण्यांसाठीचे दर आहेत.

१९७५ चे दर पांडू हवालदार चित्रपटातले म्हणजे गिरणगाव/वरळी बीडीडी चाळींच्या परिसरातले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा यॉट क्लब कुठेशी आहे / होता?

हा यॉट क्लब म्हणजे रॉयल बॉम्बे यॉट क्लब असावा. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकाकडून अपोलो बंदर्/ताज कडे येताना उजवीकडे आहे. सध्या यॉटिंग वगैरे बंद असावं, कारण उच्चभ्रूंच्या क्लबसारखंच सगळं वातावरण असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचक. धागा पाहून "मुंबै शहराचे वर्णन" हे गोविंद माडगावकरांचे (बहुतेक हेच नाव असावे- लेखकाच्या नावाबद्दल स्लाईट कन्फ्यूजन असले तरी पुस्तकाचे नाव नक्की तेच आहे) १८६० च्या आसपास प्रकाशित झालेले आणि आता पुन:प्रकाशित केलेले पुस्तक आठवले. एखाद्या शहराचे वर्णन किती साकल्याने अन रंजकपणे करावे त्याचा वस्तुपाठ म्हणून ते अभ्यासण्यासारखे आहे. तत्कालीन मुंबै डोळ्यांसमोर एकदम उभी राहते. मुंबैकर नसलो तरी भारी वाटते वाचून, मग मुंबैकरांना अजूनच जबरी वाटेल. जरूर वाचावे, वट्ट ५० रु. किंमत आहे. प्रकाशन बहुतेक कोल्हापूरचे अजब पुस्तकालय असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लै भारी!
श्री. कोल्हटकरांच्या पोतडीतून काय निघेल याचा अंदाज बांधणे निव्वळ अशक्य आहे!
असेच येत राहु दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान!

> श्री. कोल्हटकरांच्या पोतडीतून काय निघेल याचा अंदाज बांधणे निव्वळ अशक्य आहे!
असेच म्हणतो.

किमती आणि "आउट ऑफ बाउंडस" या दोन गोष्टी विशेष लक्षात आल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप धन्यवाद ह्या धाग्याबद्दल! दरम्यान, एक छोटेखानी पण बरंच माहितीपूर्ण पुस्तक हाती लागलं होतं, गिरगावाबद्दल.. बरीच माहिती आणि चित्रे होती लेखकाचं नाव साफ आठवत नाहीये (मधुसूदन.. ?)
नॉस्टेलजिक वाटलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी