छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी
या वेळेची कथावस्तू* (थीम) आहे "एकाकी".
एकाकी पडलेले मुल. एकाकी स्त्री. गर्दीत असुनही एकटा जाणवणारा इसम. जंगलात असुन एकटे पडलेले झाड. असे काहिही. छायाचित्र कोणत्याही सजीव/निर्जीव विषयाशी निगडीत असु शकते. पण त्या विषयाचा एकाकीपणा हा जाणवला पाहिजे.
चला तर मग!
(*) ह्या शब्दाचा वापर करण्यामागचा हेतु - माझ्या मते "एकाकी" हि एक "कथावस्तू" आहे. कारण "एकाकीपणा" हा एक बहुव्यापी गुणधर्म आहे. अनेक बाबतीत तो जाणवु शकतो (जसे स्त्री, मुल, घर, झाड ई.ई.). तो ज्या बाबतीत जाणवला तो (फक्त) तुमच्या छायाचित्राचा विषय झाला. भेद महत्वाचा नसला तरि मला तो व्यक्त करावासा वाटला. असो.
-----
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २५ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २६ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय "यंत्र", आणि विजेते छायाचित्र "निर्जीव यंत्रेदेखील सजीव"
उप्पर तीन
१.
Camera Canon
Model Canon PowerShot SD850 IS
ISO 200
Exposure 1/200 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
२.
Camera Canon
Model Canon PowerShot SD850 IS
ISO 80
Exposure 1/160 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
३.
Camera Canon
Model Canon PowerShot SD850 IS
ISO 80
Exposure 1/1000 sec
Aperture 8.0
Focal Length 6mm
राधिका
संपादकः width="" height="" टाळावे
गेल्या आठवड्यात काढलेला हा
गेल्या आठवड्यात काढलेला हा फोटो एकाकी या थीमशी सुसंगत वाटला म्हणून टाकतो आहे. घराबाहेर पडताना एका कोळ्याच्या जाळ्यात अडकलेले एक सरड्याचे लहानसे पिल्लु दिसले. ते थोड्याथोड्या वेळाने ते सुटण्यासाठी धडपड करत होते पण त्याला सुटता येत नव्हते. नंतर त्याने प्रयत्न करणे सोडून दिले. फोटो काढला तेव्हा ते जिवंत होते, दुसर्या दिवशी मेलेले दिसले. रात्रभरात थंडीने मेले असावे.
तांत्रिक माहिती:
Camera : Canon T1i
Lens : Canon EF 100mm f/2.8L Macro IS USM
Exposure mode : Manual
Aperture : f/16
Shutter speed : 1/80 S
ISO : 800
Flash use : 1 fill flash,manual settings
White balance : Manual, 4750K
Post processing details : Shot in RAW, exposure and contrast modified in Photoshop
१. रुसूबाई रुसूबाई कोपर्यात
१. रुसूबाई रुसूबाई कोपर्यात बसू :- मित्रांवर रुसलेलं हे गोड पिल्लू असं एकाकी ...(पण तरीही सगळं लक्षं मात्र मित्रांचं काय चाललाय त्यावरच :)... )
२. 'सोमवारची' आतुरतेने वाट पाहणारेही असतात तर :- एरवी सकाळ पासून रात्री पर्यंत गजबजलेलं हे ऑफीस मधलं 'पुल टेबल' विकांताला मात्र असं एकाकी... ही जीवघेणी शांतता त्याला नक्कीच अस्वस्थ करत असेल ...
पहिलं चित्रं आवडलं, एकाच
पहिलं चित्रं आवडलं, एकाच रंगाच्या अनेक छटा हे वैशिष्ट्य, बोटीचा एकाकीपणा थोडासा जाणवतो आहे पण तो नेमका जाणवण्यासाठी चित्र थोडं अधिक वाईड हवं आहे असं वाटलं.
शंका- लेन्सवर/फिल्टरवर उजविकडे खाली एक हलकासा डाग असावा असे वाटते आहे, सेन्सरवर असेल तर साफ करणं थोडं अवघड आहे, पण सेन्सरवर डाग नसावा.
सेन्सरवर डाग नाहीये, दुसर्या
सेन्सरवर डाग नाहीये, दुसर्या लेन्सने डागाळलेले फोटो आलेले नाहीत. हा फोटो मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यावर लगेचच डाग दिसला, दुर्दैवाने तो फोटोवरून काढता येत नाहीये. कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर डागही अधिक स्पष्ट होतोय. आता लेन्स साफ केली आहे, चाचणी करून पहाते.
हा य-अक्षावर कातरलेला फोटो. आता हा मलाही जास्त आवडला.
(आयगरची उत्तरभिंत धाग्यातले फोटो पाहून या फोटोची कल्पना आली. पांथस्थांनी विषय दिला त्याच्या आदल्याच दिवशी हा फोटो काढला आणि त्याला शीर्षक काय देता येईल असा विचार करताना 'एकाकी' असंच सुचलं होतं.)
'ऋता'शी सहमत
मला देखील आवडले हे चित्र. नि़ळ्या रंगाच्या सलग बदलत्या छटा एकाकीपणा अधोरेखीत करतात.
मात्र चित्राच्या आकारामुळे, एकाकी पक्ष्याच्या उजव्या बाजूस अधिक पक्षी असतील असे वाटत राहते. तसे नसेल, तर चित्र विषयास अगदी अनुसरून आहे !
आणि चित्राचे तपशील ?
या चित्रामुळे रवींद्रनाथांच्या काही ओळी आठवल्या...
मेघेर ओपोरे मेघ जोमेछे
आँधार कोरे आशे
आमाय कॅनो बोशिये राखो
अॅका द्वारेर पाशे
बराच स्वैर अनुवाद -
घनांच्या पल्याड घनगर्दी
दाटे काळोख कासाविशी
सोयरे मागे विरून जाती
मी एकाकी उंबर्यापाशी.
धन्यवाद ऋता आणि अमुक >>एकाकी
धन्यवाद ऋता आणि अमुक
>>एकाकी पक्ष्याच्या उजव्या बाजूस अधिक पक्षी असतील असे वाटत राहते.
बरोबर, म्हणूनच हे चित्र स्पर्धेसाठी नाही, ती कबुतरांची जोडी होती, तसेही पक्षी निदान कबुतरे एकटे सहसा बसत नाहीत असा अनुभव आहे(ऋता अधिक सांगू शकतील), कावळे एकटे बरेचदा आढळतात. :). अनुवादित कविता उत्तम आहे, एकाकीपणा नेमका सुचवणारी आहे, आवडला. चित्राचे तपशील निवांत देतो, ते कंटाळवाणे काम आहे :)
शांत.. निवांत.. एकाकी..
१)
----------------------------------------------------------
बवेरिअन स्टेट (साऊथ जर्मनी)- फ्युसेन.(near Neuschwanstein castle)
----------------------------------------------------------
Sony -DSC W530
ISO speed- 400
exposer time - 1/80 sec.
F No. F/5.7
----------------------------------------------------------
पिकासा मधील 'I am feeling lucky' वापरलंय.
----------------------------------------------------------
२)
----------------------------------------------------------
The Alps- Salzburg- ऑस्ट्रिया.
----------------------------------------------------------
अवांतर आहे पण सगळे
अवांतर आहे पण सगळे साहित्यप्रेमी असल्याने स्वातंत्र्य घेते - अनेक कवींना जेव्हा त्यांचा प्रत्येकाचा आवडता शब्द सांगण्यास सांगीतले होते तेव्हा एका कवीने पुढील शब्द निवडला - KANKEDORT
हा शब्द इतका एकाकी आहे की त्याचा संपूर्ण इंग्रजी भाषेत माहीत वापर फक्त एकदाच झालेला आहे. A lonely word whose definition can only be inferred from its single, immediate context in Chaucer's poem:
या एकाकी शब्दावरच या कवयित्रीने तिचा आवडता शब्द म्हणून लेख लिहीला आहे तो लेख येथे
सुंदर!
धनंजय यांची प्रकाशचित्रे नेहमीच त्यामागच्या विचारांच्या नाविन्याने उठून दिसतात, वरचे 'एकाकी' विषयावरचे चित्र याचे उत्तम उदाहरण आहे!
या धाग्यावर लावता येतील अशी काही प्रकाशचित्रे काढायचा मीही प्रयत्न ़केला होता पण मांडणीमागच्या सरळधोपट विचारांचा मला स्वतःलाच कंटाळा आला होता म्हणून कष्ट घेतले नाहीत.
"एकांत", "एकटा" आणि "एकाकी"
"एकांत", "एकटा" आणि "एकाकी" या तिन्हीत गल्लत करत करत ...
सर्व छायाचित्रे कॅनन ११०० डी ने ऑटो मोडवर काढलेली आहेत. एक्झिफ डेटा कसा शोधायचा माहिती नाही. फ्लिकरमध्ये लगेच दिसतो म्हणे. थोडासा प्रयत्न केला पण आधी सापडला नाही. ( एसीडीसी मध्ये चित्राखालीच एक्झिफ डेटा असतो तो नंतर सापडला... प्रतिसाद संपादित करून एक्झिफ डेटा लिहिला आहे))
माउंट टिटलिस
आय एस ओ १००
२१ एम एम
एफ/९
१/२०० सेकंद
आय्फेल प्यारिस मॉमा टेकडीवरून
आय एस ओ ८००
५५ एम एम
एफ/२२
१/२०० सेकंद
युन्ग्फ्रॉ खिंडीतली वेधशाळा
आय एस ओ १००
७५ एम एम
एफ/ ११
१/८०० सेकंद
ब्रिएन्झ तलाव
आय एस ओ ८००
२५ एम एम
एफ/२२
१/२०० सेकंद
संपादकः width="" height="" टाळावे
स्पर्धेचा निकाल!
निकाल जाहिर करायला वेळ झाला म्हणुन प्रथम आपल्या सगळ्यांची माफि मागतो.
या स्पर्धेचा विषय थोडा गोंधळ निर्माण करणारा होता हे कबुल करायला हवे. ऋषिकेश यांनी वर म्हटल्याप्रमाणे अनेक स्पर्धकांची "एकांत", "एकटा" आणि "एकाकी" या तिन्हीत गल्लत झाली आहे असे वाटते. आवाहनकर्ता म्हणुन मी ह्या बाबतीत स्पष्टीकरण दिले पाहिजे होते पण ते वेळे अभावी शक्य झाले नाहि त्यामुळे दिलगीर आहे.
असो, आता निकाला कडे वळुयात -
- प्रथम क्रमांक - ऋषिकेश यांचे "एकाकी-१"
- दुसरा क्रमांक - केतकी यांचे "एकाकी लढाई.. (पणती)"
- तिसरा क्रमांक - नंदन यांचे "चर्चगेटच्या कोलाहलातले सर जमशेटजी जीजीभॉय"
दखल घेण्यासारखे -
- रंग यांचे "एकाकी..."
विषय आवडला. चित्रे बघण्यास
विषय आवडला. चित्रे बघण्यास उत्सूक