Skip to main content

HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितात!

हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी
हॅरी हार्लो या महान मानसशास्त्रज्ञाचा जन्म १९०५ मध्ये फ़ेअरफ़ील्ड काउंटी आयोवा येथे झाला.याने ग्रॅज्युएशन रीड कॉलेज मधुन पुर्ण केल्यावर हा स्टॅनफ़ोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सीटी त मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.हार्लोने सुरुवातीला लेविस टर्मन या प्रसिद्ध संशोधकाच्या हाताखाली उमेदवारी केली. लेविस हा त्या काळात gifted child मध्ये असलेल्या बुद्ध्यांका वर I.Q. वर संशोधन करीत होता.लेविस च्या लॅब मध्ये एकाहुन एक विलक्षण बुध्दीमत्ता लाभलेली लहान मुल आणली जात असतं( आजकालच्या गुगल बॉय सारखी) यातल्या च एका गिफ़्टेड चाइल्ड शी ती मोठी झाल्यावर हार्लो ने लग्न केले तिचे नाव क्लारा मिअर्स होते तिचा आय.क्यु. १५५ नोंदला गेलेला होता.

हार्लो चे सुरुवातीचे प्रयोग आणि या प्रयोगांना कलाटणी देणारा अपघात

तर हार्लो पुढे युनिव्हर्सीटी ऑफ़ विस्कॉन्सीन मध्ये दाखल झाला आणि आता एक स्वतंत्र संशोधक म्हणुन काम करु लागला, त्याने RHESUS MACAQUE मंकीज ची बुध्दीमत्ता I.Q. वर सुरुवातीला संशोधन सुरु केले याला लेविस च्या संशोधनाची अर्थातच प्रेरणा होती.याने आपल्या संशोधनाने Primates च्या बुध्दीमत्तेविषयी अनेक नविन गोष्टींचा शोध लावला. आणि तोपर्यंत अज्ञात असलेले Primates च्या बुध्दीमत्ते संदर्भातील अनेक पैलु समोर आणले. या प्रयोगां दरम्यान अपघातानेच एक नविन गोष्टी कडे त्याचे लक्ष वेधले गेले. ती म्हणजे तो काही काळ या लहान माकडाच्या पिलांना प्रयोगा दरम्यान त्यांच्या आईशी आणि इतर पिलांशी वेगळ तोडुन एकट ठेवीत असे , तर त्याने बघीतलं की ही जी एकांतात ठेवलेली पिल्ल होती ती पिंजर्या च्या जमीनीवर जी सॉफ़्ट टॉवेल्स होती त्याला भलतीच बिलगत असत, त्या टॉवेल्स शी खेळत, आणि पिलांना याचा फ़ारच लळा लागत असे.जर ती टॉवेल्स बाजुला केली तर ही पिल्ले चिडुन प्रचंड गोंधळ घालीत असत आणि त्याने अजुन एक बघितले की यांची दुधाची बाटली यांच्या तोंडातुन काढली तर ते फ़ारसा विरोध करीत नाहीत पण सॉफ़्ट टॉवेल जर दुर नेण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते जणु वेड लागल्या सारखे किंचाळु लागत त्यांच अन्ना पेक्षा वरचढ टॉवेल च हे आकर्षण बघुन हार्लो आश्चर्य चकीत झाला आणि त्याने याचा शोध घ्यायचे ठरविले यातुन एका विलक्षण प्रयोगाचा आणि चक्रावुन टाकणार्याक निष्कर्षांचा जन्म झाला. हा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासातील एक मोठा प्रयोग आजही मानला जातो.

Psychology च्या क्षेत्रातील एक विलक्षण प्रयोग

या प्रयोगा साठी जी RHESUS MACAQUE प्रजातीची जी माकड वापरली गेली त्यांच एक मोठ वैशिष्ट्य अस की यांचा ९४ % जनुकीय वारसा मानवाच्या जनुकीय वारशाशी मेळ खातो.सोप करुन सांगायच म्हणजे मानव हे ९४% RHESUS MACAQUE माकड आहेत आणि ६ % स्वतंत्र मानवी वैशिष्ट्य जोपासुन आहेत. याच प्रमाणे ओरांग उटांग शी आपले साम्य ९८% आणि चिंपांझी शी ९९ % आहे. आणि याच कारणास्तव मानसशास्त्रज्ञांची विवीध प्रयोगांसाठी पहीली पसंत ही माकडे असतात यांच्या वर केलेले प्रयोग आणि त्यातुन निघालेले निष्कर्ष माणसांवर मोठ्या प्रमाणावर लागु होतात. म्हणुनच यांची प्रयोगासाठी निवड केली जात असते.
तर आता हार्लो ने आता दोन प्रकारच्या कृत्रीम आई बनविल्या एक सॉफ़्ट सरोगेट मदर कार्डबोर्ड वापरुन त्याला माकडीणी सारखा आकार देउन त्याभोवती अतिशय मउ सॉफ़्ट टॉवेल गुंडाळला तिला एक कृत्रीम स्माईली चेहरा जोडला आणि एक सॉफ़्ट स्पर्श केल्यास उबदार वाटेल अशी एक कृत्रीम आई बनविली हीला मुव्हमेंट करु शकेल अशी सुविधा दीली की जेणेकरुन ती पिलाला स्पर्श करु शकेल आणि कुरवाळु शकेल. दुसरी कृत्रीम आई बनविली तीला दुध देइल अशा सुविधेने बनविली मात्र तीला सॉफ़्ट टॉवेल वगैरे न देता केवळ कडक स्टील असलेली, विदाउट स्माईल अशी Steel mother with milk बनविली.

आता त्याने नुकत्याच जन्मलेल्या काही पिलांना त्यांच्या खर्याे आईपासुन तोडुन दुसरीकडे पिंजर्या त एकाकी ठेवले. सुरुवातीला ही आईवेगळी पिलं प्रचंड रडत किंचाळत असत.आईविना ती फ़ार व्याकुळ अस्वस्थ होत असत चिडचिडी होत, हार्लो ने त्यांचे बारकाइने निरीक्षण करणे नोंदी ठेवणे सुरु केले. त्यांच्या शारीरीक अवस्थे वरुन , मुव्हमेंट्स , stools च्या विश्लेषणातुन त्यांची पराकोटीची अस्वस्थता निश्चीत झाल्यावर त्याने त्यांच्या पिंजर्यामत दोन्ही कृत्रीम आया सोडल्या एक सॉफ़्ट कुरवाळणारी स्मायलीफ़ेस आई आणि दुसरी हार्ड स्टील पण दुध देणारी आई. आता ही आपल्या नैसर्गिक आई पासुन वंचित झालेली पिलं पटकन Soft Mother कडे आकर्षीत झाली ही छोटी माकडाची पिल. त्या Soft Mother ला जाउन बिलगत असत,तिच्या अंगावर खेळत, आपल्या इवल्याशा हातांनी तिचा चेहरा ओरबाडत.,तिला चावत आणि तास न तास तिच्या अंगा पोटा वर तिला घट्ट बिलगुन पडुन राहत.मात्र एक गोची होती या आई कडे खाय प्यायला काही नसे तर मग ही पिलं भुक लागल्यावर Steel mother with milk जी होती तिच्याजवळ जात एकदाच तिथे दुध प्यायले की लगेच परत सॉफ़्ट मदर कडे येउन तिला बिलगत असत.यातुन एक महत्वाचा निष्कर्ष निघाला की बाळाच्या संगोपनात दुधाच्या गरजेपेक्षाही मोठी गरज ही मायेच्या स्पर्शाची,कुरवाळण्याची ही होती.आईचा स्पर्श व कुशीतला उबदार पणा अधिक गरजे चा आहे.दुसरा एक निष्कर्ष होता की खर्याु आईच्या प्रेमाचा बंध जरी मजबुत असला तरी Substitute mother ही तिची जागा भरुन काढु शकते.हार्लो म्हणतो" Certainly man cannot live by milk alone"

चेहरा हा प्रयोगाचा दुसरा पैलू

या प्रयोगा चे आणखीही काही पैलु होते त्यांनी प्रेमाचा एक घटक contact comfort शोधला तसाच दुसरा एक प्रयोग केला चेहर्याु संबंधी. हार्लोने एका आईपासुन तोडलेल्या दुसर्याी पिलाच्या पिंजर्या त एक वरच्यासारखीच एक Soft Mother ठेवली मात्र तिला चेहर्याणचे कुठलेच features जसे नाक,डोळे. कान न देता blank face च ठेवली.परीणाम असा पाहण्यात आला की ते जे छोट पिलु होत ते या blank face मदर च्या प्रेमात पडलं, नंतर हार्लो ने एक सुंदर सर्व features असलेला मास्क या blank face मदर ला लावला जि फ़ार च आकर्षक features असलेली होती.पण झाल अस की पिलु नविन चेहरा बघुन घाबरुन जात असे, किंचाळुन दुर पळत असे.त्याच्या अगदी जवळ तीला ठेवल तर पिलु तो मास्क काढुन टाकीत असे आणि पुर्वीचा blank face दिसला की च शांत बसत असे.यावरुन हा निष्कर्ष आला की जो बाळाच्या अगदी सुरुवातीला बघितलेला प्रेमळ आईचा जो चेहरा असतो तो त्याच्या नेणीवेवर खोलवर ठसा उमटवितो मग तो कसा का असेना आणि बाळ ते विसरु शकत नाही.
पुढील सर्व प्रेमसंबंध त्या पहील्या अनुभवाची पुनरावृत्ती
यावरुन च एक महत्वाची psychological थेअरी बनली जिच्या अनुसार पान्हा आटल्यावर देखील आईवरचं बाळांच जे प्रेम अबाधित राहतं याचं कारण तिच्या स्पर्शातुन मिळालेल प्रेम आणि हीच जी मुळ प्रेमाची स्मृती memory आहे तीच ते बाळ मोठ झाल्यावर carry करतो आणि मोठेपणीची त्याची प्रत्येक इतरांशी झालेली प्रेमाचे संबंध ही त्या पहील्या आईच्या प्रेमाची पुनुरावृत्ती केवळ असते.

Evil Mother चा परीणाम काय झाला?

या प्रयोगात त्याने आणखी एका Evil Mother चा देखील समावेश केला यात ही Evil Mother बाळाला सुरुवातीला कुरवाळणे आदी प्रेम स्पर्श दिल्यानंतर या पिलांवर थंडगार पाणी ओतत असे, उचलुन जोराने दुर फ़ेकुन देत असे, कधी भोसकत ,मारत असे आणि आश्चर्य म्हणजे तरी ही पिलं अशा मारणार्या द्रुष्ट आईला प्रेमाच्या आशेने पुन्हा पुन्हा जाउन बिलगतं असत. याने अजुन एक निष्कर्ष समोर येत होता. की माणसाला कीतीही लाथाडलं तरी त्याच प्रेमस्त्रोता (source of love ) कडे जाणं थांबत नाही. माणुस सतत प्रेम शोधत असतो त्याचा एकवार मिळालेल्या प्रेमावर विश्वास बसतो. त्या source शी तो पुन्हा पुन्हा connect करण्याचा desperate प्रयत्न माणुस सतत करीत असतो.

प्रेमा पासुन मायेच्या स्पर्शापासुन वंचित झालेल्या रोमानियन मुलांवर काय परीणाम झाला?

तर जी मुल अशा प्रेमापासुन वंचित राहतात अथवा प्रेम मिळण्याएवजी child abuse चा शिकार होतात त्यांच्या मेंदुच्या भावनिक नियंत्रण करणार्याम भागावर मोठा परीणाम घडुन येतो. मोठे सीरीयल कीलर्स हे बहुतेकदा child abuse चे शिकार अथवा आईच्या प्रेमा पासुन वंचित असतात. याचे एक उदाहरण म्हणजे रोमानीया या देशात १९६६ मध्ये कम्युनिस्ट सरकार होते यांचा हुकुमशहा नेता निकोल सेयुसेच याने सर्व प्रकारच्या गर्भनिरोधकांवर काही राजकीय हेतुंनी बंदी घातली. परीणाम स्वरुप मोठ्या प्रमाणावर मुलांचा जन्म झाला. जे गरीब कुटुंबातील होते, ज्यांना पोसणे जड होते त्यांनी सरकारी अनाथालयात आपली मुल जमा केली. मुलांच्या मोठ्या संख्येमुळे त्यांची अनाथालयात अजिबात काळजी घेतली गेली नाही. त्यांना बेड ला बांधुन ठेवुन एक बाटली पकड्वुन दीली जात असे, जास्त रडणार्याा बाळांना गुंगीची औषधे देउन झोपवुन ठेवले जात असे. मायेच्या स्पर्श अजिबात मिळत नसे.थंडीत उबदारपणाचा ही अभाव होता. सरकारी यंत्रणा एक ब्याद मिटवावी तसे ही बाळ सांभाळीत असे.यातील २५ % बाळ ५ वर्षांची होण्याच्या आतच दगावली. या मुलांच्या शारीरीक वाढी वर तर परीणाम झालाच मात्र त्याहुन भयानक परीणाम यांच्या मनावर झाला. ज्या पालकांनी ही रोमानीयन मुले दत्तक घेतलेली होती त्यांना या मुलांची अशी निरीक्षणे नोंदविली.

यातील काही मुले त्यांना स्पर्श केल्याबरोबर जोरजोरात रडायला सुरुवात करीत, काही मुले तासन तास शुन्यात बघत बसत काही अचानक हींसक होत असत आणी जे हातात येइल त्याने मारण सुरु करीत असत. एका कॅनेडीयन जोडप्याने असेच एक रोमानियन मुल दत्तक घेतलं होत त्यांनी एकदा बेडरुम मध्ये जाउन बघीतल तर त्यांच्या दत्तक मुलाने त्यांच्या मांजरीच्या पिल्लाला उचलुन सरळ खिडकीतुन बाहेरच फ़ेकुन दिल

या रोमानीयन मुलांचा एक मोठा सर्व्हे केला गेला यात जेव्हा या मुलांच्या मेंदुचा अभ्यास केला गेला त्यात यांच्या मेंदु च Imaging करुन बघीतल गेल तर अस लक्षात आल की. मेंदु चे दोन भाग orbifrontol cortex आणि amygdale ज्या माणसांतील भावना आणि माणसाचा सामाजिक व्यवहार या गोष्टींच नियंत्रण करतात या दोन्ही भागाची कार्यक्षमता मंदावलेली आहे. या मुलांमध्ये इतरांच्या भावना समजावुन घेण्याची आणि इतरांच्या चेहर्यांवरील भाव समजुन घेण्याची त्याचा अर्थ लावण्याची क्षमताच संपुन गेली होती.आणि सर्वात महत्वाच म्हणजे vasopressin आणि oxytocin ही महत्वाची हार्मोन्स जी माणसाला इतरांशी सामाजीक संबध स्थापण्यात महत्वाची भुमिका बजावतात या हार्मोन्स चे प्रमाण या मुलांत अतिशय कमी झालेले होते. ज्याने चांगले सामाजिक सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता ही मुलं हरवुन बसलेली होती. दुसर्यां च्या भावना समजुन घेण्याची कुवत ही मुल हरवुन बसली होती. प्रेम स्पर्श याने वंचित झालेल्या मुलांची अशी दयनीय करुण अवस्था झाली होती

हार्लो च्या प्रयोगांमधील प्राण्यावर करण्यात आलेली कृरता

हार्लो आपल्या प्रयोगांत करण्यात आलेल्या प्राण्यांवरील कृरते मुळे ही फ़ार बदनाम झाला. प्राणि हक्कांची चळवळ सुरु करण्यामागे याचे प्रयोग ही एक मुख्य प्रेरणा होते. हार्लो ने असंख्य वेगवेगळे प्रयोग या प्राण्यांवर केले होते काही तर अत्यंत भयानक असे क्रुर होते. सर्व जागे अभावी देता येत नाही पण एका चे उदाहरण देउन लेख संपवितो. आयुष्याच्या शेवट च्या काळात हार्लो ला डिप्रेशन वर संशोधन करायचे होते त्यासाठी त्याने परत एकदा RHESUS MACAQUE प्रजातीच्या माकडांची निवड केली. त्याने एक पुर्ण ब्लॅक अशा चेंबर ची निर्मीती केली. जे बाहेरील वातावरणा पासुन पुर्णपणे तोडलेले होते त्यात ही माकड त्याने सलग दोन वर्ष उलटी टांगुन ठेवली आणि ज्यांना साधी हालचाल किंवा बाहेरचा प्रकाश ही दिसणार नाही अशी व्यवस्था केली यांना अन्न एका जाळीमधुन खालुन दीले जात असे. याला तो वेल ऑफ़ डीस्पेयर म्हणत असे. याच्या लॅब समोर आजही प्राणी हक्क कार्यकर्ते दरवर्षी आंदोलन करतात.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ऋषिकेश Tue, 26/11/2013 - 15:24

ऐसी अक्षरेवर स्वागत!

विषय, माहिती, मांडणी सगळेच आवडले. ही माहिती माझ्यासाठी नवीसुद्धा आहे.
यात काढलेले निश्कर्ष सहज उडवून लावण्यासारखे वाटले नाहीत. मात्र त्या निष्कर्षांच्या मागे काही क्रूर प्रयोग आहेत हे ही सतत जाणवत होतेच, तेही शेवटच्या परिच्छेदात आले आहे.

छान.. येत रहा.. लिहित रहा.. आम्ही वाचतो आहोतच

राजेश घासकडवी Tue, 26/11/2013 - 18:38

In reply to by ऋषिकेश

ऐसीवर स्वागत. माहितीपूर्ण लेख, मांडणीही छान झाली आहे. या प्रयोगाविषयी त्रोटकपणे वाचलेलं होतं, पण रोमेनियन मुलांबद्दलची प्रथमच मिळाली.

ॲमी Tue, 26/11/2013 - 16:58

लेख आवडला. त्या डिप्रेस्ड माकडांवरच्या निरीक्षणाबद्दलपण लिहायला हव होत.
प्राणी, क्रुर, पेटा वगैरे प्रतिसाद येत आहेत... मला वाटत मनुष्यांच्या शारीरीक, मानसिक विकारांसाठी, औषधांसाठी प्राण्यांवर प्रयोग करत असतील तर त्याला विरोध करु नये. कॉस्मेटीक्स वगैरे फालतू गोष्टीँसाठी असेल तर करावा.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 17:05

In reply to by ॲमी

असेच म्हणतो. अन्यथा पुढचे प्रयोग आणि औषधांच्या पुढच्या ट्रायल्स पेटा कार्यकर्त्यांवर कराव्यात.

मन Tue, 26/11/2013 - 16:30

ती माकडे आहेत म्हणून क्रूर वागणुकीस पात्र आहेत हा विचार भयंकर आहे.
"पेटा"ची खूपदाअ खिल्ली उडवली जाते; ओपण अशा केसेसमध्ये त्यांचं म्हतव समजतं.

कुमारकौस्तुभ Tue, 26/11/2013 - 17:17

In reply to by नितिन थत्ते

अहो मला अजुन परीच्छेद चे टायटल बोल्ड करायला जमत नाहीये ते अगोदरच पब्लीश होत आहे. बदल काही नाही थोडा व्यवस्थित करायचा प्रयत्न करतोय पण अजुन काही जमत नाहीये

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 18:12

In reply to by कुमारकौस्तुभ

इनपुट फॉर्मॅट फुल एचटीएमएल करा म्हणजे बोल्ड केलेले दिसेल.
(इतर संस्थळांवर असे करावे लागत नाही)

कुमारकौस्तुभ Tue, 26/11/2013 - 17:17

In reply to by नितिन थत्ते

अहो मला अजुन परीच्छेद चे टायटल बोल्ड करायला जमत नाहीये ते अगोदरच पब्लीश होत आहे. बदल काही नाही थोडा व्यवस्थित करायचा प्रयत्न करतोय पण अजुन काही जमत नाहीये

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/11/2013 - 01:21

In reply to by कुमारकौस्तुभ

शीर्षक बोल्ड करण्यासाठी ब> हा कोड वापरला आहे. धाग्याचं संपादन केलंत तर दिसेलच.

---

या प्रकारचं संशोधन आणि ते कसं केलं जातं याबद्दल मला फार कुतूहल आहे. अशा प्रकारची एक लेखमालाच सुरू करा.

मी Tue, 26/11/2013 - 18:45

यावरुन च एक महत्वाची psychological थेअरी बनली जिच्या अनुसार पान्हा आटल्यावर देखील आईवरचं बाळांच जे प्रेम अबाधित राहतं याचं कारण तिच्या स्पर्शातुन मिळालेल प्रेम आणि हीच जी मुळ प्रेमाची स्मृती memory आहे तीच ते बाळ मोठ झाल्यावर carry करतो आणि मोठेपणीची त्याची प्रत्येक इतरांशी झालेली प्रेमाचे संबंध ही त्या पहील्या आईच्या प्रेमाची पुनुरावृत्ती केवळ असते.

ह्या संदर्भात को-स्लिपिंगबद्दल इथल्या पेरेन्टसची मते कळल्यास रोचक ठरेल.

ऋषिकेश Wed, 27/11/2013 - 08:58

In reply to by मी

ह्या संदर्भात को-स्लिपिंगबद्दल इथल्या पेरेन्टसची मते कळल्यास रोचक ठरेल

माझी मुलगी शेजारच्या खेटलेल्या गादीवर एकटीच झोपते. झोपवताना मांडी हवी असते. नंतर एकटीच झोपते. (कारण ती संध्याकाळी ७:३० वाजताच झोपते त्यावेळी आम्ही झोपणे शक्य नसते ;))
साधारणतः तीला फार चोंबाळलेले/अंगावर हात टाकून झोपलेले वगैरे आवडत नसल्याने दोघांपैकी कोणीही तिला अगदी खेटून झोपत नाही. मात्र उत्तररात्री कधीतरी तिला इच्छा होते आणि मग दोघांच्या मध्ये येऊन "पांगरूणात घे" असे झोपेत सांगते आणि आमच्या पांघरूणात शिरून एकाला बिलगून झोपून जाते.

हे को-स्लिपिंग जाणीवपूर्वक आहे का? तर होय म्हणावे लागेल. कारण मुळातच एकत्र कुटुंब असल्याने तिला वेगळी खोली परवडणेही शक्य नाही आणि परवडत असते तरी वेगळ्या खोलीत ठेवले नसते.

अवांतरः मुलीला स्वतंत्र बाबागाडीही कधी घेतली नव्हती कारण कडेवरील मुलांना चेहर्‍यावरील हावभाव बघणे, आपल्याला ज्यांनी उचलले आहेत त्यांच्या तोंडाच्या हालचाली व आवाज यांचा संबंध जोडणे, त्या व्यक्तीने मुलांशी केलेली अव्याहत बडबड, कडेवर घेतलेली व्यक्ती इतरांशी कशी बोलते, काय बघते, काय बोलते याचे निरिक्षण करणे, मिळणारा सततचा स्पर्श वगैरे गरजेचे वाटते. बाबागाडीत बाटली/बोंडलं चोखत बसलेल्या मुलांना हे एक्पोजर चालायला लागेपर्यंत मिळत नाही.

मी Wed, 27/11/2013 - 13:54

In reply to by ऋषिकेश

रोचक, पण अमेरीकेत को-स्लिपिंग(एकाच बेडवर झोपणे वगैरे) टाळण्याकडे कल दिसतो, मुल झोपेमधे असताना जवळ झोपल्यामुळे गुदमरु शकते त्यामुळे एका खोलीत चालेल पण एका बेडवर शक्यतो झोपू नये यासम कन्व्हेशन असल्याचे कळते. रोमानीयन मुलांचा अभ्यास को-स्लिपिंगचे समर्थनच करताना दिसतो.

ह्याच धर्तीवर जे पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र खोल्यात झोपवितात त्यांची मते रोचक ठरतील.

ऋषिकेश Wed, 27/11/2013 - 14:02

In reply to by मी

अगदी सुरवातीच्या काळात (पहिला एखाद-दुसरा महिना वगैरे) बाळ आईच्याच खोलीत पण पाळण्यात झोपत असे.
नंतर पाळण्यात मावेनासे झाल्यापासून को-स्लिपिंगच होते आहे.

सुरवातीला तुम्ही म्हणता तशी भिती मलाही वाटत असे (बाळ गुदमरेल किंवा झोपेत हात पाय त्याच्यावर पडला तर!)
पण हळुहळू सवय झाली व भिती आपोआप कमी होत गेली.

तिरशिंगराव Tue, 26/11/2013 - 20:13

एक चांगला आणि माहितीपूर्ण धागा लिहिल्याबद्दल धन्यवाद आणि स्वागत. प्रयोगांसाठी सुद्धा,प्राण्यांवर केलेल्या अत्याचारांशी सहमत नाही.
माणसांवर ह्याच्या उलटे प्रयोग कोणी केले आहेत का ? म्हणजे हिंसक, खुनी माणसांना प्रेम दिल्याने ते परत नॉर्मल (कमीतकमी सोबर)होऊ शकतात का ?

मन Tue, 26/11/2013 - 23:29

In reply to by तिरशिंगराव

दो आंखे बारह हाथ हा सोबर चित्रपट,.
इतर अनेकानेक थिल्लर बॉलीवूडपट.
अगदि अलिकडचा म्हणजे महेश भट्ट कंपनीचा गँगस्टर.
.
.
पण हे असले चित्रपट बघणे म्हणजे प्रेक्षकांना ह्या लेखाच्या शेवटी लिहिलेल्या माकडाप्रमाणे उलटे टांगून अघोरी प्रकारे वागवल्यासारखेच आहे.

सुनील Wed, 27/11/2013 - 09:14

लेख पूर्वी वाचल्यासारखे वाटते आहे (देजा वू?). पूर्वप्रकाशित आहे काय?

असो, लेख माहितीपूर्ण आहे यात शंका नाही.