भय इथले संपत नाही..........!!

भय इथले संपत नाही
किती गोष्टींना घाबरून जगत असतो आपण. यात आपल्याशी संबंधित गोष्टी तर असतातच पण बरेचदा दुरान्वयेही संबंध नसलेल्या गोष्टींचाही भरणा असतो.

निमित्त झालं एक दहा बारा वर्षाच्या टवटवीत मुलीला मोकळं हसत रस्त्याने जाताना पाहिल्याचं .टपोरल्या फुलासारखा रसरशीत चेहरा , बोलके माऊसारखे डोळे ,फिकट गुलाबी टी-शर्ट, गडद गुलाबी वितभर शॉर्ट्स , पायात रंगीत शूज आणि अर्थातच फोनवर कोणाशी तरी दाट संभाषण चालू . अशी दुनियेपासून तद्दन बेफिकीर ती रस्त्याने चालली होती . टी-शर्ट जरा जास्तच मोकळा होता आणि त्याचा गळाही अंमळ मोठा.,त्या वितभर शॉर्ट्समधून दिसणारे तिचे तरुण होऊ घातलेले पाय लक्ष द्यायचे नाही म्हंटले तरी लक्ष खेचून घेणारे असे .

अशा मुली पहिल्या कि माझ्या काळजाचा ठोकाच चुकतो. त्या कोणीच नसतात माझ्या खरंतर आणि पाच पंधरा सेकंदात त्या मला पार करून पलीकडेही जातात , पण केवढी खळबळ ओतून जातात मनात ! सात ते सतराचं अवधड आणि अर्धवट वय उरात धडकी भरवणारं. बरंच काही उमलू पाहणारं पण जाणीवेच्या बाहेरचं , शरीराच्या नव्या उमलाणाऱ्या कला आणि स्वतःमध्ये अनेक शक्याशक्यतांचे भोवरे घेऊन उतणाऱ्या त्या जीवांना जाणीव असते कुठे स्वतःचे सुरवंटी रूप सुटत चालल्याची. मागेच सुटलेलं बालपण अजून रांगण्यात मग्न आणि आकर्षक स्त्रीपण लांबून खुणावणारं. परंतु ही स्थित्यंतराची घातक वळणं , कळण्या-न कळण्याचे बंद दरवाजे,मुख्य म्हणजे स्वतःच्या फुलण्याबद्दलची अनभिज्ञता ....या साऱ्या विचारांचे खूप दडपण येते मनावर .

त्या अलीकडे पलीकडे खोल रुतणाऱ्या नजरा आणि नकळत केल्यासारखे सहेतूक स्पर्शाचे विटाळ ...न उतरणारे जहरच ते ..!! सात ते सतरा म्हंटले खरे पण हीच मर्यादा मागे खेचत अमर्याद शून्यापर्यंत आणि पुढे नेत कोणत्याही तीन आकडी अंकापर्यंतच्या वयापर्यंत खेचली जाऊ शकते . हे मघा उल्लेख केलेले अर्धवट वय, काहीच न कळण्याचे , कळले तरी न वळण्याचे, धोक्यांमधील धोके न उमगण्याचे आणि तरीही बरंच काही कळतंय असे वाटण्याचे .भयाचे लाल कंदील त्यांना दाखवावे तरी वाटतं मनाची कोवळीक नाहक चिरडली जाईल याने , पण पुन्हा आपणच म्हणावे , कंदील असून प्रकाशाची वाट दाखवली नाही आणि अंधाराने दबक्या पावली येऊन आपला दावा साधला तर त्याच कंदिलाच्या काजळीने आपलाच श्वास काळवंडून जाईल, घूसमटून जाईल. थेट काही सांगणे म्हणजे नुकत्याच घडलेल्या मातीच्या घड्याला पोलादाच्या भट्टीत ठेवल्यासारखे होईल आणि आडून सांगितले आणि हवा तो अर्थच पोहोचला नाही तरी अंती परिणाम शून्यच होईल . दुसरे म्हणजे इतरांच्या जायदादींना हे एवढे आतले काही सांगण्याचा हक्क मी कोणत्या भूमिकेत जात बजावू ?

पण हे एकदा नाही अनेकदा घडतं आणि या जीवांना पाहून मी अस्वस्थ होतच राहते. घडू शकणाऱ्या शक्यतांची कल्पनाचित्रे बघून ही व्याकूळ होत राहते.

बरं या फुलोऱ्याला दुखावणाऱ्या पक्षाला नेहमी प्रमाणेच वय,धर्म,जात, भाषा, पैसा असणे-नसणे, नाव असणे-नसणे , नात्यांची बूज वगेरे कोणतेच निकष थांबवू शकत नाही,अवरोध करू शकत नाही. ना ठिकाणाची तमा ना काळाची भीती...कुठे कुठे...कसे आणि किती जपायचे त्यांना.....!! ..प्रबोधन तर व्हायलाच हवे पण प्रबोधनकाराच्या समजुतीच्या प्रौढपणावर या प्रबोधनाचा परिणाम अवलम्बून असतो .

आदिम काळापासून चालत आलेला हा भावनिक बलात्कार पृथ्वीच्या अंतापर्यंत असाच होत राहणार का ?आपल्या पुस्तकी किंवा अन्य शिक्षणाचा यावर काहीच परिणाम होणार नाही का ? कि जोवर मानवी मनातला एक अधम स्वर वाजतोय तोवर अमानुषपणाचे हे भेसूर गायन चालूच राहणार ? यावर इथून तिथून बरेच सल्ले,सूचना,अभिप्राय,सहानुभूतीच्या टिपा ,उपरोधाचे तीर आणि बरेच काही अर्थातच अपेक्षित आहे ज्यात "करायलाच हवे" किंवा "कोणीतरी केलेच पाहिजे " ची मोठी यादीही असेलच असेल .मान्य आहे कोठेतरी कोणीतरी ...नव्हे सर्व ठिकाणी सर्वांनी हे केलेच पाहिजे ....पण पुन्हा त्या दुराग्र नजरांचे काय .... त्या अस्पर्श स्पर्शांचे काय .......मनातल्या आंधळ्या बेफाम असुराचे काय .............?? हा प्रश्न अनुत्तरीत राहत मनाच्या स्पन्दनांसोबत उचंबळतच राहतो .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

बाब्बौ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खिक्क!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दु आ प्र का टा आ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच एका मैत्रिणीबरोबर चर्चा झाली. या लेखात मांडलेला मुद्दा योग्यच आहे. मी उद्वेगाने तिला विचारले. यावर तिने खूप छान मुद्दा मांडला की १०० /१२५ वर्षापूर्वी काय परिस्थीती होती आणि आता किती सुधारणा आहे. मग दर वेळी नकारात्मक विचार का करायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदिम काळापासून चालत आलेला हा भावनिक बलात्कार पृथ्वीच्या अंतापर्यंत असाच होत राहणार का ?आपल्या पुस्तकी किंवा अन्य शिक्षणाचा यावर काहीच परिणाम होणार नाही का ? कि जोवर मानवी मनातला एक अधम स्वर वाजतोय तोवर अमानुषपणाचे हे भेसूर गायन चालूच राहणार ? यावर इथून तिथून बरेच सल्ले,सूचना,अभिप्राय,सहानुभूतीच्या टिपा ,उपरोधाचे तीर आणि बरेच काही अर्थातच अपेक्षित आहे ज्यात "करायलाच हवे" किंवा "कोणीतरी केलेच पाहिजे " ची मोठी यादीही असेलच असेल .मान्य आहे कोठेतरी कोणीतरी ...नव्हे सर्व ठिकाणी सर्वांनी हे केलेच पाहिजे ....पण पुन्हा त्या दुराग्र नजरांचे काय .... त्या अस्पर्श स्पर्शांचे काय .......मनातल्या आंधळ्या बेफाम असुराचे काय .............?? हा प्रश्न अनुत्तरीत राहत मनाच्या स्पन्दनांसोबत उचंबळतच राहतो .

____________________________________________________________

डिसक्लेमर = नामस्मरण केले म्हणजे, बलात्कार होत नाहीत, मॉलेस्टेशन होत नाही असे मला म्हणायचे नाही. विपर्यास नको.
_______________________________________________________________

संपूर्ण आतापर्यंतचे आयुष्य प्रत्येक चांगल्या मूडवर/घटनेवर मीठाचा खडा टाकणारा विचार मला त्रास देत राहीला. ना कधी थेरपीत त्याचेवर उत्तर सापडले न माझ्या जीवास शांती लाभली. ९८% लोक हे चांगले असताना, २% लोक वाईट का निघतात? व्हाय द इव्हिल एग्झिस्ट्स? मला हा प्रश्न पडण्याचे कारण सांगता येणार नाही ते फार व्यक्तीगत आहे पण एक सांगता येईल, This unanswered question has caused a nagging unrest & literally sickness in my life. ग्रंथालयात तर ख्रिश्चन लेखकांनी पुस्तके च्या पुस्तके या विषयास .'सुष्ट-दुष्ट हे आदिम द्वंद्व' वाहीलेली आढळतात. I always believed that someday I will get an answer. पण तसेही मी फार तत्वज्ञानी अथवा ज्ञानमार्गाचा साधक नसल्या कारणाने, मला हे माहीत आहे की मला उत्तर नको आहे, मला हवीये शांती.

मला आज हे सांगण्यास अतिशय आनंद होतो की या प्रश्नाचा निकालच नामस्मरणाने लागला. महाराज सांगतात = 'तुम्ही फक्त नामस्मरण करा,तुमची काळजी, दु:ख मी वाहीन.' इतके साधे-सोपे गणित असताना, मला मेंदू शीणवायचे, अति विचारांनी आजारी पडून घेण्याचे कारणच नाही. मला काय गरज आहे सुष्ट - दुष्ट आणि अन्य द्वंद्वाच्या जोड्या व गूढ उकलत बसायची? माझे काम आहे, अनन्यभावे म्हणजे, तन्मयतेने व चिकाटीने नामस्मरण करणे.

जी शांती, मला ना थेरपी देउ शकली, जी शांती फक्त औषधांनी तीही अपूर्ण मिळाली. ती फक्त काही चुटपूट तासांच्या नामस्मरणाने मिळत असेल, तर माझा नामस्मरणावरती विश्वास बसणे साहजिकच आहे. बरे कोणाला वाटेल अरे त्यात काय किती सोपा उपाय होता हा तर सहज प्राप्य व अंमलात आणण्यास अतिशय सुलभ होता. तर मी एवढेच सांगेन की इट टुक माय लाईफ सो फार टु फाईंड इट.

कसं असतं ना पेरुची बी दाढेत अडकून बसते किंवा एखाद्या गाण्याची ट्युन / धून आपल्याला आठवत असते परंतु गाणे काही केल्या आठवत नसते - जीव कासाविस होतो, तगमग वाढते त्याच त्याच गोष्टीवर आपण झिरो डाउन होतो की कधी ही बी निघणार, कधी गाणे आठवणार. पण काही केल्या त्यातून मार्ग निघत नाही तसे माझे झालेले होते. ज्या क्षणी मला हे उमगले की थेरपिस्ट जी तगमग शांतवु शकले नाहीत ती तगमग महाराजांच्या एका वाक्याने थांबणार होती. ती सापडायचा योग मात्र येत नव्हता तो आला. अक्षरक्षः तापल्या वाळूवरती जलधारा बरसल्यासारखे मला वाटले. विचाररुपी सैतानाच्या तावडीतून सुटल्याचा आनंद मला झाला.

कोणा कोणाला हे escapism वाटू शकते, हे म्हणजे वास्तवापासून दूर पळणे झाले. तर वाटो बापडे. तसही मन कुरतडण्याशिवाय आणखी कोणतीही कृती या त्रासातून घडत नव्हती. तेव्हा असे escapism मला पुन्हापुन्हा मान्य आहे.

||श्रीराम जय राम जयजयराम||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

एखाद्या वाईट घटनेचा विचार आपण परत परत का करत असतो? दिवस व्यवस्थित चाललेला आहे, अचानक आपले मन एखादी घटना आठवुन विद्ध, विचलित, खरे तर कडू जहर बनुन जाते का? या का चे उत्तर मध्यंतरी सापडले.
आपला मेंदू ती घटना परत परत जगतो/ रिप्ले करत असतो कारण त्याला वाटत असते की काहीतरी बरासा शेवट करता येइल.

As if we will be able to reframe the story

म्हणुन तो तिच तिच रेकॉर्ड/ तीच तीच स्क्रिप्ट प्ले करत असतो.
हा मानसशास्त्रातील शोध रॅडिकल वाटतो मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0