.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
म्हणजे..
आपण शेवटी लिहिलत की:-
"रेडिओ कम्युनिकेशनमधे क्रांतिकारक म्हणावेत असे बदल झाले. "ओके", "अॅट टेकऑफ" अशा मनाला येईल त्या शब्दांत संभाषण करणं त्यागलं गेलं. शब्दरचनेचे नियम कडक झाले.. एक उदाहरण द्यायचं तर "टेकऑफ" हा शब्द फक्त आणि फक्त फायनल टेकऑफ क्लिअरन्सच्या वेळीच वापरण्याचा नियम आला. त्याआधीच्या सर्व स्टेजेसना "डिपार्चर" हा शब्द वापरणं बंधनकारक झालं. "लाईन अप अँड वेट" असा स्पष्ट "वाट पाहण्याचा आदेश आता दिला जातो.
-दोन व्यक्तींनी रेडिओवर एकाच वेळी बटण दाबून बोललं तर जो कर्कश गोंगाट होतो, तो टाळण्याची टेक्नॉलॉजी निघून ती प्रचलितही झाली. यामधे कोणीही बोलत असताना त्याचवेळी दुसर्याने बटण दाबून बोलायचा प्रयत्न केला तर नंतर बटण दाबणारा संभाषणातून "ब्लॉक" केला जातो. त्यामुळे गोंगाट होत नाही.
-एकत्र, एकमताने निर्णय घेण्याचं ट्रेनिंग (कॉकपिट रीसोर्स मॅनेजमेंट) हे पायलट ट्रेनिंगचा भाग बनवण्यात आलं. यात हायरार्की आणि प्रेशर मधे न आणता एकमेकांशी म्युच्युअल कन्सेंटने सर्व कृती करण्याची पद्धत बनली.
-नुसतं ओके किंवा रॉजर म्हणून रेडिओसूचनेची पोच देण्याऐवजी मुख्य आकडे आणि मुद्दे पुन्हा उलट वाचून दाखवण्याची पद्धत अत्यावश्यक केली गेली..
"
म्हणजेच हे सर्व शिकण्यासाठी एक जबरदस्त किंमत मानवी जीवांच्या रुपाने द्यावी लागली.
पॅशन
हीरो होंडाची एक जाहिरात होती,'व्हॉट इज लाईफ विदाउट अ लिटल पॅशन' अशी. ज्या तन्मयतेने, अभ्यासाने तुम्ही हे तपशीलवार लिखाण चालवले आहे ते काबिल-ए-तारिफ आहे. अशा पॅशनेट लोकांचे समाजात असणे ही समाजाची मोठी गरज आहे. धन्यवाद.
बाकी लिखाण वाचताना मी शक्य तितका अलिप्त राहाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पायांना कंप, घामाच्या धारा वगैरे असे सहसा होत नाही. लिखाण अतिशय आवडले तरीही.
जरा कठीण वाटले समजायला. मधले
जरा कठीण वाटले समजायला. मधले थोडे कळेना (हापिसात आहे, निवांत वाचत नाही म्हणून असेल) म्हणून मग २-३ परिच्छेद सोडून दिले आणि शेवट वाचला. इथे पायाला कंप सुटला बसल्याजागी. तुम्ही वर इंधनाचे लिहिलेत तेव्हाच कळले होते की यामुळे अपघाताची तीव्रता वाढणार आहे. जामच भयानक अपघात आहे हो. घरी गेल्यावर परत नीट वाचावे लागणार सोडलेले डीटेल्स कळायला.