.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
फाजिल आत्मविश्वास हाच शेवटचा श्वास.
छान लेख(ट्रॅजिक तरिही). तुमची वाक्यरचना खिळवून ठेवते, फॅक्ट फिक्शनसारखं वाटायला लागतं.
हा लेख वाचून कोरिअन एअर क्रॅश ची आठवण झाली, ज्याबद्दल मायकेल ग्लॅडवेलने ऑउटलायरमधे लिहिलं आहे. मायकेल म्हणतो एकंदरित अथॉरिटी आणि हायरारकी पाळताना निर्माण झालेली कम्युनिकेशन गॅप अपघाताला कारणीभूत ठरली, को-पायलटने दिलेल्या सुचना नजरेआड केल्या गेल्या, फाजिल आत्म-विश्वास किंवा को-पायलटने अतिशय संदिग्ध सुचना केल्या, इतर तांत्रिक-बाबीही होत्याच पण बहुतांशी कम्युनिकेशन गॅप अपघाताला कारणीभूत ठरते.
पुण्यात काही ठिकाणी कॅब चालवणारे कधी-कधी सलग २४+ तास कॅब चालवतात, कारण त्यानंतर १ पुर्ण दिवस सुट्टी मिळते, त्या २४ तासाच्या शेवटी त्या चालकाची स्थिती अत्यंत दयनिय असते आणि आपण स्वत:च ती गाडी चालवावी असे वाटते, मार्केट फोर्सेस ह्या परिस्थितिस आणि पिळवणूकीस कारणीभूत असावेत.
ट्रोल अलर्ट -
पण एकूण आपण मागे झोपत/पस्तक वाचत/सिनेमा बघत असताना पुढे असे काही घडते आहे हे बसल्यावर लक्षात आले तर लोक कसे वागतिल ह्यावर एक मोठे चर्चा-सत्र झडू शकेल.!
आणि समजा म्हटले, तरी फरक तरी
आणि समजा म्हटले, तरी फरक तरी काय पडतो? मी तर म्हणेन आकाशातील रिक्षावाला म्हणा. म्हणजे "वाट तुझी बघतोय रिक्षावाला" सारखी अजरामर गाणी त्यांनाही आपल्यात सामावून घेतील. ट्रक आणि रिक्षांमधील वाङ्मय तिथेही बघावयास मिळेल मग धन्य होऊ. "बघतोस काय रागानं, टेकॉफ केलाय वाघानं",
"तुमच्यासाठी कायपण- एरपोर्टवर जॅम झाला तरीपण", "बुरी नजर वाले तेरा प्लेन काला", "शिग्नल ओके- प्लीज", "सफेद पानी-कम पी मेरी रानी", झालंच तर बोइंग च्या ऐवजी "बूंग१" ७४७ असेही लिहिता यावे.
१ कर्टशी: वर्हाड निघालंय लंडनला.
सहवैमानिक
अशा परिस्थितीत सहवैमानिक विमान हाती घेऊ शकत नाही का?
की त्याला कायद्याचा वगैरे अडसर असतो?
मला वाटते इजिप्शियन विमानाचाही एक अपघात निव्वळ प्रमुख वैमानिक आणि त्याला त्याच्या हुद्द्याने, अनुभवामुळे दिला जाणारा मान असल्या प्रकारातूनच झाला होता. उड्डाण झाल्यावर विमान नक्की कुठे आहे हे एका क्षणी त्यांच्या 'समजेतून' निसटले. कारण आपली पोझिशन पाहायला तारे नव्हते आणि दिवेही दिसत नव्हते. रात्रीच्या अंधारात विमान किती खाली आहे हेच त्यांना कळले नव्हते. विमान इशारे देत होते. सहवैमानिक उंची सांगत होता त्यावर वैमानिक विश्वासच ठेवत नव्हता. शेवटी ते विमान समुद्रात कोसळले.
तेथेही अगदी हाच प्रकार घडला होता.
अनुभवी पायलट, शिवाय त्याला हवाईदलाचा अनुभव, संस्कृतीच्या(?) त्याला मान देण्याची पद्धत त्यामुळे त्याचा फाजिल आत्मविश्वास.
जावे त्यांच्या वंशा...
शेवटी "जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!" हेच खरं!
काटा आला अंगावर आणि सगळ्यांविषयी (अगदी ग्लुसिकाविषयीही) हळहळ वाटली.
ही सारी तांत्रिक माहिती इतक्या नाट्यपूर्ण शब्दात दिल्याबद्दल आभार! (काश! पेपरातून/टिव्हीवर येणार्या बातम्या इतक्या अभ्यासपूर्ण असत्या)