Skip to main content

मुंबईतील बलून

आजच्या दिनविशेषात पुढील माहिती दिली आहे:

१८६७ : प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत बलूनचे यशस्वी उड्डाण केले.>

हे मुंबईतील किंवा हिंदुस्तानातील पहिले उड्डाण असावे असे येथे स्पष्ट म्हटलेले नाही पण ते तसेच म्हणायचे असावे, अन्यथा दिनविशेषात त्याची नोंद झाली नसती.

मजजवळची ह्या बाबतीतील माहिती थोडी वेगळी आहे. दिनशा वाछा (१८४४-१९३६) ह्यांनी आपल्या Shells from the Sands of Bombay ह्या मुंबईच्या जुन्या आठवणींच्या पुस्तकात ते ८ वर्षांचे असतांना म्हणजे १८५२ साली मुंबईत पाहिलेल्या बलून उड्डाणाचे वर्णन केले आहे. काइट (Kyte)नावाच्या इंग्रजाने सध्याच्या राणीच्या बागेच्या जागेमध्ये - तेव्हा ती जागा गावाबाहेर होती आणि गवताच्या गंजी रचण्यासाठी वापरली जात असे - हे उड्डाण केले असे वाछांनी नोंदवले आहे. (हे उड्डाण करणार्‍याचे नाव 'काइट' असावे ही एक गंमतच!) ३-४ प्रयत्नांनंतर हे सल्फ्यूरिक अ‍ॅसिडवर चालणारे बलून अखेर उडाले आणि खाडीपलीकडे ठाणे परिसरात उतरले असे दिसते.

ह्या नोंदीला एक आधारहि मला उपलब्ध झाला आहे. ह्या जागी Indian Journal of History of Science च्या मार्च १९९२ च्या अंकातील 'The First Indian Aeronaut' असा एक लेख मिळतो. लेख रामचंदर चटर्जी नावाच्या व्यक्तीबाबत आहे. १८८९ मध्ये कलकत्त्यात बलून उड्डाण करणार्‍या पहिल्या भारतीयाचा मान त्यांच्याकडे आहे. त्या लेखात तत्पूर्वी कलकत्त्यात झालेल्या बलून उड्डाणांचीहि काही माहिती आहे. त्यामध्ये नोवेंबर ६, १८५० ह्या दिवशी फिट्झहर्बर्ट काइट (Fitzherbert Kight) ह्या व्यक्तीने कलकत्त्यात बलून उड्डाण केल्याचा उल्लेख आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी तफावत दिसते पण तोच तो काइट असावा असा तर्क करता येतो.(हिंदुस्तानातील पहिले बलून उड्डाण डी.रॉबर्टसन नावाच्या व्यक्तीने मार्च १६,१८३६ ह्या दिवशी केले अशीहि नोंद लेखामध्ये आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा:

बॅटमॅन Fri, 10/01/2014 - 12:26

रोचक माहिती.

अवांतरः शिवंकर बापूजी तळपदे यांनी जे काही उड्डाण केले ते अशाच प्रकारचे काहीतरी असावे काय? त्याबद्दल नक्की माहितीचा सोर्स काय आहे? नेटवर अन पुस्तकांतही १८९५ साली मुंबैच्या चौपाटीवर तळपद्यांनी विमान उडवले इतकेच वाचले आहे. याला मूळ आधार काय??????????

गवि Fri, 10/01/2014 - 13:10

In reply to by बॅटमॅन

काही नाही. ते तळपदे प्रकरण म्हणजे अन्य कोणी काही कर्तबगारी केल्यानंतर अतिपश्चात जागृत होऊन आपली बाडे चापसत वृथा अभिमान दर्शवण्याचे आणखी एक उदाहरण.

बॅटमॅन Fri, 10/01/2014 - 13:17

In reply to by गवि

ते आहे ओ, त्यांनी खरंच विमान उडवलं असं मलाही वाटत नै. वृथाभिमानाबद्दल कुडंट अग्री मोर.

पण उत्सुकता आहे की बॉ या बातमीचा नक्की उगम आहे तरी कुठे???? त्यांनी काही तरी उडवलं ते विमान नव्हतं तर काय होतं? बलून नसावा कारण या लेखात बलूनवाल्यांचा शेप्रेट उल्लेख आहे. तसं काही असतं तर त्यांचाही उल्लेख आला असता. कुछ तो सच्चाई होगी असे वाटते आहे.अ‍ॅट मॅक्स काहीतरी विमानसदृश उडवले असेल-अनम्यान्ड लहानसे कैतरी-मिनिएचर छाप.

पण समकालीन म्हणा उत्तरकालीन म्हणा, याचा पुरावा काय???????

गवि Fri, 10/01/2014 - 13:27

In reply to by बॅटमॅन

या विषयावर मी अनेक ठिकाणी डोकं फोडून घेतलं आहे. अगदी सुरुवातीला या विषयावर वाचल्यावर माझी प्रतिक्रिया अशी काहीशी उखडल्यासारखी होती.

आपणां भारतीयांचं जुनं दुखणं परत उसळलं..आमच्याकडे अणुशास्त्र,विमान,रॉकेट,चुंबक,मिसाईल सगळं सगळं होतं.. As usual हे ज्या जुन्या ग्रंथात होतं तो जळला,मुस्लिमांनी लुटला. As usual मूळ बनवलेलं विमान काळाच्या उदरात गडप. Now Thanthangopal.

लेखामगची भावना जेन्युईन आहे. पण मानव विरहीत विमान हा काही राईट बंधूंचा शोध नव्हे. ‘हवेहून जड एरोफ़ॉईल वापरुन मानवासहित’ विमान हा राईट बंधूंचा शोध होता.

लगेचच जिवाची बाजी लावून अनेक चाचण्या,सुधारणा करुन विमान हा ‘वाह्तुकीचा practical feasible मार्ग’ बनवला गेला.माफ़ करा आपण भारतीय,मी धरून,फक्त श्रेयभक्त आहोत.डॉक्युमेंटेशन,प्रोटोटाईप काही काही मेंटेन केलेले नाही.अहो तो जुना ग्रंथ आहे अजून? त्यावरुन राईट ब्रदर्सच्या त्या किरकोळ 120 फ़ूट उड्डाणानंतर इतक्य वर्षात भारतात स्वत:ची बनावट असलेली किती विमाने तयार झाली? एखादे हायब्रीड ट्रेनी लेव्हलचे विमान सोड्ल्यास? शून्य..तेच शून्य जी आमची गणिताला देणगी आहे.

एवढ्या काळात ते पोचले सुपरसोनिक आणि स्पेस शटलमधे. आणि आम्ही चापसतोय जुनी फ़ड्ताळं. पणजोबांच्या पोथ्या धुंडाळत. उपरोधाबद्दल सॉरी.मी non technical पण विमानक्षेत्राशी संबंधित असल्याने सेन्सेटिव्ह वाटले. बॉटमलाईन हीच की जग गेलं पुढे.आपल्याकडे आहे न अक्कल? मग ‘माझे आजोबा सर्वात शक्तिमान’ हा बालिश विचार सोडून एखादे चार सीटर विमान तरी आपले आपले पूर्ण बनवूया.ही कळकळ…..

शिवाय तळपदेंचा उल्लेख करुन राईट बंधूंना तिथल्यातिथे कमी दाखवण्याचा प्रयत्न सगळीकडेच होतो. राईट बंधू आणि तळपदेंची तुलना मला अत्यंत खटकते.

त्यावरही थोडंफार:

शिवकर, भारद्वाज मुनी आणि विमान ही सर्व अफवा किंवा अस्तित्वात नसलेले काहीतरी आहे असे मी कुठेच म्हटलेले नाही. केवळ नवा शोध लागल्यावर मग उठून तो आमच्याकडे आधीच कसा लागला होता हे सांगण्याची असंख्य उदाहरणे आपल्यालाही सापडतीलच. त्याला आक्षेप हा लिमिटेड मुद्दा होता. सामान्य असलो तरी भौतिक शास्त्राचा इतपत अभ्यास (त्यात पदवी घेतल्याने आणि छंद म्हणूनही) मला नक्की आहे की कुठले दावे अचाट आणि अफाट आहेत ते समजावे. भारतीय मन हे तात्विक बाबींमध्ये फार तेज आहे. पूर्वी पासून “अणू”, “शून्य”, “कालप्रवास” (Time travel) अशा तत्वाधारित संकल्पना भारतीयांनी जरूर विकसित केल्या आहेत. ते खूप महत्वाचे योगदान आहेच. त्यातही बुद्धी लागतेच. पण आपण ज्यात मार खातो ते प्रोटोटायपिंग, practical application, engineering, reproducible documentation या सर्व गोष्टी आपण मान्य का करत नाही तेच कळत नाही..असो.

Rally brothers ला ते विमान विकले असले तर मग (जर त्यात काही सबस्टेन्स असता तर) ion mercury इंजिनवाले विमान किंवा तसा काही प्रगत डेरीव्हेटीव खूप पूर्वीच युरोपियन देशांनी बाहेर आणला असता. शिवाय आयन प्रपल्शन इंजिनचे तत्वच असे आहे की त्यापासून मिळणारा दाब इतका कमी असतो कि निर्वात स्पेसमधेच तो काहीसा उपयोगात आणला जाऊ शकतो (आणि स्पेसक्राफ्ट अवकाशात जागच्या जागी हलवून पोझिशन अड्जस्ट करण्यापुरतीच ती वापरली जातात.)

राईट बंधूंचे काम उगीच उणावण्याचा सूरही लेखात होता. त्यांनी जे दीर्घ चिकाटीने श्रम केले आणि जोखीम उचलली त्याच्या एक हजारांशही आपल्या देशात झाले नाही आणि आता मात्र त्यांचे (फक्त) किती फूट उडाले आणि आमचे हे गहाळ विमान (मानव विरहीत बरे का..) किती हजार फूट याची तुलना?

बॅटमॅन Fri, 10/01/2014 - 14:01

In reply to by गवि

तुमच्या प्रतिक्रियेशी सहमत आहेच की ओ. राईट बंधूंचे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

पण पण पण या बातमीचा सोर्स काय???????? हा प्रश्न अगदीच निरर्थक नसावा असे वाटते.

गवि Fri, 10/01/2014 - 14:07

In reply to by बॅटमॅन

त्यावेळी केसरीत आली होती बातमी. मूळ प्रत उपलब्ध आहे का माहीत नाही.

सयाजीराव गायकवाड, खुद्द टिळक उपस्थित होते वगैरे म्हटलं जातं. इतके प्रतिष्ठित लोक उपलब्ध असताना आणि "मर्क्युरी आयन प्रपल्शन" तंत्र वापरुन (ज्यासाठी नासा त्यांच्या प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरसहित आत्ता आतापर्यंत धडपडत होते) कुटिरोद्योग पातळीवर बनवलेलं विमान उडलं असताना त्याचा परिणाम केवळ एका विस्मरणात गेलेल्या बातमीपुरताच रहावा आणि नंतर तो विमानाचा नमुनाही रॅली ब्रदर्सना विकला जावा आणि त्यानंतर आपल्या हाती मूळ प्रयोगाचे रिप्लिकेशन करण्याइतकेही काही राहू नये आणि रॅली ब्रदर्सनीही पुढे शतकभर मर्क्युरी आयन प्रकारचे इंजिन आणू नये या सर्वाचा अर्थ त्या प्रयोगात, झाला असलाच तरी, काही सबस्टन्स नसावा.