पैशाला पासरी मुलाची गोष्ट
लास्ट टाईम त्या शाम्यामुळे पोपट झाला होता, तेव्हापासून मी नवीन फ्रेंड्स चूझ केले आहेत. उगाच इमोशनल, सेंटी न मारणारे. घरी बोलावत नाही त्यांना. आई-पप्पा लाजच काढतील माझी फ्रेंड्ससमोर.
परवाच माझा अठरावा वाढदिवस होता. घरी आई-पप्पांनी बरंच काय काय दिलं, लेक्चर दिलं आणि गिफ्ट दिलं तर स्कूटी पेप. हाऊ बोअरींग. मी फ्रेंडस् बरोबर नेक्स्ट वीकमधे सेलिब्रेट केलं. आई म्हणत होती, स्कूटी घेऊन जा. आता तिला कोण सांगणार, स्वतः गाडी चालवली म्हणजे फ्रीडम मिळालं असं नाही. आजोबांनी तिला स्कूटर चालवू दिली नव्हती म्हणून आता मला स्कूटर चालवायला लावते. आई-पप्पा दोघेही स्कूटीची चावी घेऊन आले आणि एकदम "तोहफा तोहफा" करून नाचायला लागले. स्वतःच्या अॅनिव्हर्सरीला असलंच काहीतरी डान्स म्हणून करतात. आमचं घर आधीच एवढं कंजस्टेड. त्यात कुठलेतरी लोक्लास सिनेमे लागायचे त्यांच्या काळात, त्यातल्या डॅन्सचं इमिटेशन करत होते. पप्पा तर व्हाईट शूज घालून आले होते, माझा बड्डे म्हणून. बरं झालं माझे न्यू फ्रेंड्स घरी यायला मागत नाहीत. मी तर पप्पांना सांगितलंय, माझ्याबरोबर यायचं असेल तर व्हाईट शूज आणि पँट्स घालायच्या नाहीत. मी काही तशी गावात फिरत नाही, पण आपली पण काही इज्जत म्हणून असते की नाही.
मी तर रोज कॉलेजातले नवे बाईकवाले शोधून काढती. आपली लिफ्टची सोय झाली, पैसे वाचले, एफर्ट वाचले आणि वर पुन्हा विंडो शॉपिंग करता येतं ... कपड्यांचं आणि पोरांचंही. हे आईला कोण सांगणार? मी स्कूटी घेतली, बाजूच्या गल्लीत लावली आणि एका फ्रेंडच्या बाईकवर बसून गेली, सेलिब्रेट करायला.
बरोबर त्याच पार्टीत मधुराने तिच्या एका फ्रेंडशी फोनवर इंट्रो करून दिला. आम्ही दोघी ड्रिंक्स घेत होतो तेव्हा त्याचा फोन आला. त्याने मधुला विचारलं, तिनं सांगितलं आम्ही ड्रींक्स विकत घेतोय म्हणून. हा म्हणे, मधु फेकत्ये. म्हणून मी त्याच्याशी बोलली. अशी आमची ओळख झाली.
तं नंतर त्यानं भेटायलाच बोलावलं. ग्रीन टीशर्ट घालणार म्हणाला. लकी कलर नायतर लकी टीशर्ट असेल. चार साईझ मोठा होता टीशर्ट. मला सगळेच कलर्स आवडतात. मधु म्हणते, कॉन्फिडन्स असला की सगळंच चांगलं दिसतं. बरोबरच असणार. ती तं काय फार प्रिटी नाही, पण कॉन्फिडन्ट आहे. तिच्याभोवती नेहेमी बॉइज असतात. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे.
तं आम्ही भेटलो तर कोणत्या लेकच्या इथे गेलो. तिथे बसलो, तर आधी हा बरा होता. गळ्यात हात टाकला. आधी वाटलं की आज काहीतरी एक्सपिरीयन्स मिळेल. तर हा आपण होऊनच घाबरला. तळ्यासमोर बसून काहीतरी राज्श्री पिक्चर्सटाईप बोलत बसला. मला तर वाटलं हे असंच ऱ्हायलं तर मधुला काय सांगू? मागून जाणाऱ्या बारक्या पोरांच्या कमेंट्स?
पण मं नंतर आम्ही खायला गेलो. पावभाजी मला आवडत नाही, किती बटर असतं! मला फिगर मेंटेन नको करायला? आमची आई किती जाडी झाल्ये आता, मी तशीच झाले तर? पण मी व्यवस्थित खाल्लं. तो तर कायच बोलत नव्हता. मी तरी काय बोलणार? हिंदी फिल्म्सबद्दल बोलली. कायतरी डफ्फर, तुझी आई काय करते आणि माझा भाऊ काय शिकतो यापेक्षा हिंदी फिल्म बऱ्या. मग आम्ही नंतर मूव्ही पहायलाच गेलो. तिथे तरी कायतरी करता येईल असं वाटलं.
तिकीट घेताना तो थोडा अपसेटच वाटला. कशाबद्दल विचारलं तं बोलला नाही. आम्ही आत गेल्यावर काहीतरी करेल असं वाटलं तर काहीच नाही. मला तर फार बोर झालं. आधी काहीतरी फालतू बोलत बसला होता तळ्याकाठी. आता इथेपण काहीच नाही! आजचा दिवस वेस्ट होणार का काय? मधुसमोर तर इज्जतच जाईल. पण इंटर्व्हलनंतर काहीतरी मजा आली. आधी थोडं किस केलं आणि मग त्याने मला जस्ट हात लावला. मी त्याला हात लावणार तर लांब बसला होता, खुर्चीच्या दुसऱ्या टोकाला. माझा हात कसा पोहोचणार, आधीच त्याचा हात मधे होता. किस करताना त्याच्या तोंडाला कांद्याचा वास. म्हणून मं थोडं उडवून लावलं त्याला. हाऊ लेम, तो पण बाजूला झाला. मूव्ही संपल्यावर मी बसमधे बसून घरी आले.
मधुला हा प्रकार सांगावा का नाही असा विचार करत होते. त्याने सांगितलं तर? आपल्या तोंडानंच आपली फजिती सांगितलेली बरी. तिनी मला वेळीच वॉर्न केलं. हा प्रकार काहीतरी सानेगुरूजी असणार, आपले पेरेंट्स असतात त्यातला काहीतरी. याच्याकडून काही होणार नाही. पण दुसरा कोणी फ्रेंड असा नव्हता म्हणून मी याच्याशी फोनवर बोलणं कंटीन्यू केलं. तोंडात टाकायला तेवढाच बरा आहे.
मं त्याचे आई-पप्पा कुठे जाणार होते म्हणून त्याने त्याच्या घरी बोलावलं. घरी म्हणजे बरंच झालं, आता मधुसमोर इज्जत जाणार नाही. हा कोणत्यातरी हॉटेलातून जेवण घेऊन आला. घर तसं बरं होतं. मोठा टीव्ही होता, मायक्रोवेव्हपण दिसलं. आम्ही जेवलो, जेवणात खूप कांदा होता. म्हणजे किस करताना पुन्हा तोंडाला वास येणार. मला कांदा आवडत नाही, शी! किती डिसगस्टिंग वास येतो तोंडाला. सकाळी उठल्यावरही येतो. असं किस करायचं? कांद्याच्या वासानी माझं डोकंच आऊट होतं. मी थोडावेळ जाऊन झोपली, तं हा आला. डोकं आऊट झालेलं असताना काय करणार? मी निघाली. केस सारखे करत होती तं आईचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं. "शी! लग्न करायचा विचार करतोय का हा? आयॅम नॉट रेडी फॉर अ फ* विथ हिम यट. कमावत नाही आणि लग्नं कसली करायची!" मी त्याला लिपकिस करू नाही दिलं. तं तो रडायलाच लागला. म्हंजे हा पण शाम्याच आहे का काय? ओह माय गॉड. ओह माय फ** नशीब!
मला तं ते काय आवडलं नाही, ते सांगून मी तिथून निघाली. पण टाईमपासला चांगला होता हा. मं मी आम्ही पुन्हा मूव्हीला गेलो. तिथे मी त्याला थोडी ढील दिली. मधूनी मला तसं सांगितलंच होतं. तर तिथेही काहीच नाही, किसपण नाही. आता तर कांद्याचा वासही नव्हता तोंडाला. पण काही नाही. मी तं त्याला म्हंटलं, "आहे तसं अॅक्सेप्ट कर. काय प्रॉब्लेम आहे तुला? थोडी फ्रेंडशिप झाली की आणखी काही करता येईल." पण तो काही बघतच नव्हता. हे असले बॉईज तर कितीतरी आहेतच की! आधी हिरोगिरी करायची आणि मग वेळेला पळायचं.
हे शामूलोक अमर आहेत. याचं नाव अमरच.
आईचा मंगळसूत्र एकदम
आईचा मंगळसूत्र एकदम उत्सुकतेने कशाला बघत होती हि मुलगी ते कळाल नाही. या गाढवाला मंगळसूत्र आणि इतर गळ्यात घालायच्या गोष्टींमधला फरक देखील ठाऊक नव्हता. काय काय गळ्यात घालतात पोरी उगाच. हीच मंगळसूत्र हातात घेऊन आरश्यात बघत बसली होती.
एखादी मुलगी एवढीच मिक्स सिग्नल देत असेल तर डोक फिरवून घेण्यापेक्षा आमच्या कोलेजातली किंजल परवडली. सरळ सरळ तोंडावर तरी बोलते पुढच्या वेळेस कांदा खाऊन येऊ नको म्हणून.आउट ऑफ टाऊन जाऊया.खरी स्त्रीवादी तिचं.
कमीत कमी तिला छलिया छलिया सारखी करीना कपूरची गाणी तरी पाठ नाहीत.
पी.एस.-कांदा खाण्याच महत्व माहित नाही अस दिसतंय.
कुतूहल
कांदा खाण्याच महत्व माहित नाही अस दिसतंय.
कथेतल्या नायिकेचेच काय, आम्हालादेखील कांदा खाण्याचे ( ह्या संदर्भातले )महत्त्व माहित नाही. आयुर्वेदानुसार, कांदा थंड असतो एवढेच ठाउक आहे. श्रमजीवी जीवनशैलीच्या व्यक्तींना तो उत्तम. अंगमेहनत फारशी न करणार्यांना तो तेवढा बरा नव्हे असे म्हणतात.
वरील संदर्भात लसूण खाण्याचे (दूरगामी) महत्त्व आम्ही ऐकून आहोत. पण त्याचा तात्कालीन परिणाम काम्य व्यक्ती आणि व्हअॅम्पायर यांना दूर ठेवण्यात होतो.
तुम्हीच वरच्या प्रतिसादात
तुम्हीच वरच्या प्रतिसादात कांद्याच्या महत्त्वाचा उल्ल्ख केला होता. त्यामुळे तुम्हाला माहित आहे व खुलासा कराल अशी अपेक्षा होती. ते असो.
जालावर छोटा सर्च केला असता कांद्याच्या अनेक वैद्यकीय उपयोगांची माहिती ( कोलेस्टेरोल, रक्तातली साखर इ चे नियमन, आणि अनेक) मिळाली.
ते सोडून इतर एकीकडे ''एका प्राचीन हिंदू पुस्तकात कांदा कामोत्तेजक किंवा वीर्योत्तेजक असल्याचे म्ह्टले आहे'' असे कळले.
तो खराच कामोत्तेजक इ असतो की नाही हा मुद्दा वेगळाच. पण तो तसा आहे असे घटकाभर धरले तरी वर लसणाचे म्हटले आहे त्याप्रमाणे त्याच्या सेवनाचा तात्काळ परिणाम म्हणून त्याच्या दर्पाने काम्य व्यक्ती दूर होण्याचीच शक्यता अधिक. मग तेव्हा नुस्ती इच्छा / पर्फॉर्मन्स वाढून काय *ट फायदा होणार?
"वेदों में विज्ञान"
"वेदों में विज्ञान"?
आमचा आवडता कांदा आम्हाला जालावर मिळतो. याला वाईट दर्प येत नाही. उदा - Woman Who Had Almost Formed Healthy Sense Of Self Rejoins Social Media
=))
=))
हे असं काहितरी येणार ह्याची खात्री होतीच. तसं त्या धाग्यात लोकांना विडंबनासाथी उचकवायचं पोटेंशिअलही होतच.
(शिवाय मिसळपावावर तूच लिहिलेला "शाहीद" सुद्धा असलाच. ते अत्यंत (शा) हीन दर्जाचं लिखाण होतं. ;) )
मी लेख वाचली आणि त्यातली शैली जी वापरली ती आवडली.
फ्रेंड, डान्स....
पांढरी प्यांट...
कै च्या कै च धमाल आहे.
अगदि ह्याच धर्तीवरचं चिंजंचा धागा देत आहे :-
http://www.aisiakshare.com/node/1766
कायपण हां...
हे काय आपल्याला पटला नाय हां. सांगायचा ना त्याला - अबे शाम्या, तुला पोरींचा कायपण एक्पिरियन्स नाय.
तूच मस्त घुमवायचा ना त्याला... आणि काय एकदापण त्याला नाय घेऊन गेली ना डिस्कोला. काय तूपण ना! मस्त ऑरबिटसला घेऊन जायचा ना त्याला! तिथे मग जाम कापायचा ! काय म्हणते? ते कांदावांदा त्याच्यासाठी इतका कशाला राडा करायचा? माऊथ फ्रेशनर ठेवायचा ना पर्समधे. काम खल्लास.
ए, ती मधू कुठे भेटेल ते सांग ना... ;)
आई: माझ्या मुलीचा परवाच
आई:
माझ्या मुलीचा परवाच अठरावा वाढदिवस होता. म्हटलं लेकीला जरा चार शहाणपणाच्या गोष्टी सांगाव्यात. कालच जोशीकाकू म्हणाल्या तसं 'स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन होऊ नये' त्यामुळे आता सज्ञान झालेली आपली लेक आता समाजाच्या लेखी ऑब्जेक्ट् होते की काय या विवंचनेत अख्खी रात्र तळमळत घालवली. आधी ठरवलं होतं की मुलीला चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात, झालंच तर इतके दिवस संकोचाने ज्या विषयावर बोल्ले नव्हते त्या 'विषया'वर बोलावं. पण सकाळी तिच्या सोफ्यावरच्या उघडया पर्समधून आय-पील डोकावलेलं दिसलं नी हादरलेच. ह्यांना उगाच काही सांगितलं नाही. पण माझ्या डोळ्यासमोर गेल्या आठवड्यात एका मुलाच्या बाईकवर त्याला घट्ट चिकटून जाणारी तिची मैत्रीण मधुराच आली. त्या मधुरेचं एकवेळ ठीक आहे, तिच्या आईचीच लग्नाबाहेर दोन लफडी, मोठी बहिण लग्नाआधी दोनदा गरोदर आणि लग्न झाल्यावर घटस्फोट, या पोरीवर काय संस्कार होणार! पण आपली कारटी तशीच निघावी! संगतीचा परिणाम म्हणावा का?
शेवटी मी ह्यांना म्हटलं की आपण मुलीला स्कुटी घेऊन देऊ. मनात होतं की निदान त्यामुळे हि कोणावरोबर बाईकवरून जाणार नाही. त्या जोशीकाकू सांगतच नव्हत्या का की "स्त्रियांचं वस्तूकरण करताना, स्त्रियांच्या दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास विसरता येत नाही". हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे, की स्त्री पुरूषाबरोबर एखाद्या वहानाने समाजापासून, गर्दीपासून दूर एकटी गेली की काय होते, हे मी का नव्याने सांगायला हवे? मी शक्य तितके नॉर्मल रहायचा प्रयत्न करत होते. स्कुटी दिल्यावर आम्ही एक नाचही बसवला होता तिला खुश करायला. हे काय दिस्ले होते म्हणून सांगु त्या दिवशी. अशा वेळी ना मला या पोरींच्या जन्रेशनचा हेवाच वाट्टो बै. त्यांना त्या कपड्यांत बघुन मी गेल्या २० वर्षांची ओळख विसरले. ह्यांना बघुन थेट माझ्या कॉलेजातला सुरेश आठवला. तेव्हा मी सहसा कधी जास्ती इमोशनल वैगेरे होत नसे पण 'त्या' दिवसानंतर आठ दिवस मी आमच्या हॉस्टेलचा रेक्टर सोडला तर दुसर्या कुणासोबत बोललेही नव्हते. त्या दिवशी भेटायला आला तेव्हा सुरेशने अस्सेच ह्यांच्यासारखेच कपडे घातले होते. बराच वेळ न बोलता आम्ही बागेत तसेच पडून राहिलो होतो. शेवटी तो बोलला "तुला जे पाहिजे आहे ते मी देऊ शकत नाही कारण तुझ्यावर माझा अजून विश्वास नाही आपण आता कुठ फ्रेंड्स बनतोय आज तू जे काही वागलीस ते काय मला पटल नाही". मी तेव्हा काहीच बोलले नाही तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मला त्याचा देह दिसत होता नी त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं! ह्म्म्म्म... तेव्हाची मी नी आताची किती बदलले नै.
मी पण काय सांगत बसले. तर स्कुटी दिली खरी पण नंतर कळले की आठच दिवसांत ही बया मित्र-मैत्रीणीबरोबर एका पबमध्ये नाचत होती. मी तर हायच खाल्ली. आता काय करायचं विचार करत असताना घरी मधुरा आली. काय ते कपडे घातले होते की नव्हते असा संशय यावा इतके छोटे. गुढग्यापर्यंतच स्कर्ट काय नी वर शर्टाचे एक बटण उघडे काय. हे तर लगेच आले बाहेर गप्पा मारायला. अगदी चष्मा घालून गप्पा मारत होते (जवळचं नीट दिसत नाही त्यांना म्हणून कधीकधी वापरतात, पण मला ते चष्म्याशिवायच आवडतात). मी त्यांना साखर आणायला पिटाळलं, नी मधुराकडे थेट विषयच काढला. आम्ही दोघांनी मिळून एक गुपित ठरवलं. आमच्याच शेजारच्या गल्लीत अमर नावाचं एक गुणी पोरगं आहे. चांगलं शिकतंय, आई वडीलही वेल टु डू आहेत. शिवाय त्याच्या वडिलांनी यांच्याकडून पन्नास हजार रुपये घेतलेत ते परत केलेलेच नाहियेत. ह्या बयेने उगाच कुणाशी काहितरी करून बसण्यापेक्षा आपल्या कर्जदाराच्या पोराशी सूत जुळतंय का ते पहावं म्हटलं. तसा तो काही करेलसं वाटत नव्हतंच पण आपल्याच मुलीकडून थोड्या अपेक्षा होत्या.
पण कसलं काय, तिच्या पर्समधल्या आयपील अजूनही फोडलेली दिसत नाहिये. :(
शब्दक्रम
'कल्पनेचे सुमार चौर्यकरण' की 'सुमार कल्पनेचे१ चौर्यकरण'?
===================================================================
१ डिस्क्लेमर: 'सुमार कल्पने'चा येथील उल्लेख हे त्या कल्पनेचे ('भिकार' किंवा 'फालतू'वरून) ऊर्ध्वश्रेणीकरण समजू नये. केवळ उद्धरणाच्या सोयीसाठी ती शब्दयोजना वापरलेली आहे. खुलासा समाप्त. धन्यवाद.
मी नाही
चिंजंच्या लेखाची आठवण ह्या धाग्यवर सर्वप्रथम मी काढली असली तरी ही त्याची नक्कल आहे असे मी म्हणत नाही.
तसं म्हटलं तर विडंबनं वगैरे सगळेच कुठल्यातरी आधीच्या विडंबनाच्या संकल्पनेवरून उचलेलेत म्हणावं लागतं.
सगळे रहस्यपट वा अगदि थ्रिलर्सही किंवा सगळे रोड मूव्हिज हे आद्य रहस्यपटाची किंवा रोड मूव्ही ची नक्कल आहे असं म्हणावं लागतं.
चिंजंच्या धाग्याच्याही पूर्वी विक्षिप्तनं मिपावर शाहीन - शाहीद स्टाइल असलाच लेख टाकला होता.
आता मिपाअॅक्सेस नाही, तस्मात लिंक देउ शकत नाही.
मला ऐसीवरील दोन्ही लेख रोचक वाटले. त्यात डावं - उजवं असं काही नाही.
मुलीचं पात्र एकूणच तं , मं
मुलीचं पात्र एकूणच तं , मं म्हणण्याची तर्हा आवडली.बाकी कथा अधिक विर्स्तृत करता आली असती.
बाकी कांद्याच्या एवढा मोठा इशू असतो हे कळाल तरी इथे आम्ही मुली किती निरागस निष्पाप टाईप वाटत. जर मुलाला एवढीच मोकळीक द्यायची असेल तर बोलू का शकत नाहीत या मुली असा एक प्रश्न या लेखाच्या अनुषंगाने डोक्यात आला.मागचा याच धाग्यावरचा प्रतिसाद वाचलात तर उत्तमच.
सुपारी दिली
... कथा अधिक विर्स्तृत करता आली असती.
इतर कोणीतरी हे करावं.
आधीच उधारीची कल्पना, उसनी भाषा आणि लांबट तपशीलांमधून* 'राशोमान' लिहीण्याची कुवत माझ्याकडे नाही. मलाच लिहीताना कंटाळा आला, तर लोकांनी वाचलं का आणि कसं असा प्रश्न पडला. तेवढ्यापुरतं आपलं "आली लहर केला कहर".
तसं ऋनेही एक काडी टाकली आहे; आता मधुरा काय म्हणते, आधीच्या शाम्याला हे कळलं तर तो काय म्हणेल वगैरे कल्पनाविस्तार बाकी आहेत.
*या सगळ्या अटी नसतील तरीही तेच.
असही असेल Woody Allen
असही असेल Woody Allen च्या
Everything You Always Wanted to Know About Sex * But Were Afraid to Ask (1972) या फिल्म मधला डायलॉग आठवला.
[the Fool standing next to the Queen in her bedroom]
The King: [to the Queen] Come, give me a kiss.
The Fool: 'Course, Milord - stick out your tongue.
लेख
लेख आवडला.
कळावे, आपला,
- कांदा न खाणारा :)