Skip to main content

'अंकल शेल्बी'

राजेश घासकडवी Mon, 24/02/2014 - 13:18

थोडक्यात ओळख आवडली.

लहान मुलांसाठी असलेलं लेखन हेही कलात्मकतेने करण्याचं काहीतरी आहे हे मला अमेरिकेतली विविध चित्रपुस्तकं वाचून कळलं. एक पुस्तक आठवतंय त्यात एका मुलीच्या तोंडी 'मला कधीकधी राग येतो. मग मला कसं वाटतं, मी काय केल्याने बरं वाटतं...' असं आहे. त्यात रागाची चित्रं, तो राग जाण्याच्या छोट्या छोट्या पायऱ्या असं दाखवणारी चित्रं अतिशय छान काढली होती. मुलांसाठी सर्व प्रकारचे विषय हाताळता येतात हे त्या आणि इतर पुस्तकांतून दिसलं.

ऋषिकेश Tue, 25/02/2014 - 09:37

अतिशय रोचक माहिती दिलीत. अनेक आभार.
या लेखकाचे काहिहि वाचलेले नाही. आता शोधून मागवतोच.

सगळ्यात पहिल्यांदा कोणते पुस्तक वाचावे असे सुचवाल?

मुक्ता_आत्ता Tue, 25/02/2014 - 15:09

In reply to by ऋषिकेश

खरंतर मी पुस्तकांनुसार कविता वाचलेल्या नाहीत कारण इंटरनेटवर त्या रँडमली येतात. मी 'द गिव्हिंग ट्री' हे काव्यरूप गोष्टीचं मूळ पुस्तक व त्याचा मराठी अनुवाद वाचलेले आहेत...खूप सुंदर! शेलच्या कवितांबाबत प्राधान्यक्रम लावणं खरंच अवघड आहे - साध्यासध्या घटना, वस्तू , व्यक्तीवर्णनं यातून फुलणारी त्याची सर्जनशीलता अफाट आहे. :)