Skip to main content

अलीकडे काय पाहिलंत - १०

यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग.
याआधीचे भाग : | | | | | | |

My afternoons with Margueritte नावाचा फ्रेंच चित्रपट पाहिला. जरमॉं नावाचा कमी शिकलेला, शारीरिक कष्टाची कामं करून पोट भरणारा उतारवयाकडे झुकलेला पुरुष (जेरार्द दिपार्दिउ) मार्गरित नावाच्या सुशिक्षित, वृद्धेला (जिझेल कासादिसु) भेटतो. त्या दोघांची मैत्री होते अशी चित्रपटाची गोष्ट. दोघं योगायोगाने बागेत भेटतात. मार्गरित बागेत कबुतरं बघत बसलेली असते. दोघं कबुतरांवरून गप्पा मारायला सुरूवात करतात आणि पुढे त्यातून दोघांची ओळख वाढते.

मार्गरित आणि जरमॉंमधला फरक सगळ्या प्रकारचा आहे; ती अशक्त, छोटीशी, पुस्तकांपलिकडे बोलण्याचे विषय नसलेली आणि हा आडदांड, काहीसा रासवट वाटावा अशा शरीराचा, वाचनाशी काहीही संबंध नसलेला. पण दोघांमधे एक गोष्ट समान आहे, दोघंही हळुवार मनाचे आहेत. अगदी रासवट दिसणारा जरमॉंसुद्धा गर्लफ्रेंडवर आसुसून प्रेम करणारा आहे. मार्गरित त्याला पुस्तकं वाचून दाखवते. त्यातली जी वाक्य त्याला लक्षात राहतात, त्यावरून मार्गरित त्याच्या आयुष्याबद्दल बोलायला सुरूवात करते. आणि दोघांची मैत्री व्हायला लागते.

चित्रपटाबद्दल सांगण्यासारख्या अनेक सुंदर गोष्टी आहेत, पण त्या पाहिल्याशिवाय त्याबद्दल बोलणं-वाचणं योग्य नाही. पण अशी ही न-गोष्ट अतिशय बघण्यासारखी चित्रित केलेली आहे. वयोमानानुसार अशक्त पण उल्हसित मार्गरित नेहेमी वसंत ऋतूतल्या कोवळ्या, फिक्कट पिवळ्या उन्हात काहीतरी वाचताना, विचार करताना, गप्पा मारताना दिसते. दोनच प्रसंगांमधे मार्गरित बंदीस्त खोलीत दिसते, जेव्हा ती तिच्या निकामी होत जाणाऱ्या दृष्टीबद्दल बोलते आणि एकदा जेव्हा तिच्यावर आर्थिक दुरवस्था येते. जरमॉंचा पुस्तकं वाचण्याचा आळस, शब्दांशी करावी लागणारी झटापट हे सगळं दिसताना त्याचं मांजर समोर असणं हे पण गमतीशीर आहे.

चित्रपटाबद्दल बोलता येईल खूप, पण त्यापेक्षा तो पहाच. (अॅमेझॉन व्हीडीओवर विकत किंवा भाड्याने घेता येईल.)

ऋषिकेश Wed, 12/03/2014 - 10:01

काल बरेच दिवसांनी एक मराठी मालिका पाहिली - जुळून येती रेशीमगाठी!

एकत्र कुटुंब म्हणजे जणु सुखाची गुरुकिल्लीच! हा मेसेज डोक्यात जाईपर्यंत देणे, बायकांनी फक्त कुटुंबियांची चिंता करणे नी खाण्याबद्दल बोलणे, वडिलधार्‍यांनी मुलांना उपदेशावर उपदेशाचा रतीब घालणे, नी अजिबात व्रात्यपणा न करणार्‍या लहानग्यांनी मोठी बोलत असताना घरातून पूर्ण गायबणे वगैरे अतर्क्य गोष्टींनी भरलेली ही मालिका इतकी विनोदी आहे याची अजिबात कल्पना नव्हती!

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 12:50

In reply to by ऋषिकेश

बरोबर आहे, थ्रीसमची आशा तरी किमान पल्लवित केली पाहिजे, पूर्वार्धात का होईना, तर त्या मालिकेत काही रंजनमूल्य.

अशा मालिका कोण पाहतं, ती केव्हापासून चालू आहे, तिला प्रेक्षकवर्ग आहे का हे सगळे वेगळे विषय आहेत. तुमची जी कौटूंबिक, सामाजिक मूल्यं आहेत ती तिच्यात दिसली नाहीत म्हणून उपहासाने विनोदी म्हणणार? सहसा जे आपल्या अभिरुचित मोडत नाही, ते सोडून द्यावं, पण लोकांच्या रुचिला हिन लेखू नये. घरी बायका ज्या सिरियल्स पाहतात आणि काही पुरुष त्यात एक मूर्खपणा आणि मठ्ठपणा पाहतात, हा प्रकार तसाच आहे. तुम्हाला आवडत नाही म्हणा, रिमोटसाठी भांडा, पण जे लोकांना आवडतं त्याचं रंजनमूल्य हिन आहे असा शेरा मारून पुढे जाणं म्हणजे तिडिक आणणारा प्रकार आहे.

मन Thu, 13/03/2014 - 13:01

In reply to by अजो१२३

अगदि अगदि.
लोकांनी राखी सावंतच्या मुलाखती लावून ठेवल्या, वीणा मलिकयुक्त व त्याव्यतिरिक्तचे बिग बॉसचे एपिसोड लावले, शक्ती कपूर ह्यांचे "आऊ" स्टाइल करत व चिंगम चघळत हिरोइनसोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करण्याची दृश्येही मिटक्या मारित पाहिले आणि अगदि "रामगोपाल वर्मा की आग्/शोले" असले चित्रपट लावले किंवा शकीरा ह्या तारकेने वापरलेले अंतवर्स्त्र नेमक्या किती कोटी किमतीचे असावेत ह्याबद्दलच्या बातम्या व ह्यावरही गप्पा ठोकल्या किंवा १९८०च्या दशकातल्या काही चित्रपटात कसे गावातले वातावरण व हागल्या-पादल्याचे ज्योक किंवा शेंबूड/मेकुड चाखण्याचा सीन विनोदी म्हणून असतो असे काही किंवा "मेला"* ह्या आमीर खान असलेल्या चित्रपटात कसा जॉनी लिव्हरचे पात्र नायकाचे वगैरे मूत्र पिउन विनोद निर्मिती करताना दाखवले आहे असे हे सारेच उच्च, अत्युच्च व उदात्त समजल्या जावे.
.
.
.
बाकी "मेला" ह्या चित्रपटाचे शीर्षक प्रेक्षकांसोबत काय होणार आहे ते आधीच सूचित करण्याच्या द्वैभाषिक कल्पकतेबद्दल दिग्दर्शकाला सलाम!

ऋषिकेश Thu, 13/03/2014 - 13:11

In reply to by अजो१२३

बरोबर आहे, थ्रीसमची आशा तरी किमान पल्लवित केली पाहिजे, पूर्वार्धात का होईना, तर त्या मालिकेत काही रंजनमूल्य.

छ्या! तुम्ही म्हणजे भलतेच आशावादी आहात! मला तरी पुढिल १० वर्षांत मराठी मालिका असे (हे वा अन्य समकालीन) विषय हाताळतील असे वाटत नाही. त्या काळाच्या ३०-४० वर्षे मागेच रहाणार!

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 13:09

In reply to by ऋषिकेश

एकत्र कुटूंबाचे आपणांस फार वावडे दिसते. एकत्र कूटुंब म्हणजे आजी-आजोबा-त्यांची क्ष मुले- य मुली- त्यांचे पती पत्नी - त्या सर्वांची मुले, हे सगळी वळकटीस घालून दोरीने करकचून बांधणे का? असे कि त्यांना किंचिंतही हालचाल करता येणार नाही. असे असेल तर कूटूंबाचे सारे सदस्य भूतलावर जास्तीत जास्त अंतर ठेऊन कसे राहायचे याचे एक मॉडेल तयार करा. मानसिक दुराव्याचे एक मॉडेल करा.

ड्रामा, सिरियल मधे दाखवलेला रंजक, नाटकीय भाग वापरून एकत्र कुटुंबाला झोडून घ्यायचे? धन्य आहे.

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 13:52

In reply to by अजो१२३

एकत्र कुटुंबाबद्दल तुम्हाला इतके ममत्व का आहे? की वर्षानुवर्षे चालत आलेली अन म्हणूनच योग्य असलेली सिस्टिम आहे म्हणून?

तुमची मते ठाम नसतात असे तुम्ही म्हणता, पण कैक प्रतिसादांतून तसे दिसत नाही. स्वमताच्या पुष्ट्यर्थ टोकाची अर्ग्युमेंट्स पेश केलेली पाहिल्यामुळे तर तसे नक्कीच वाटत नाही.

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 13:56

In reply to by बॅटमॅन

वर्षानुवर्षांचा काही संबंध नाही.
मला माझे आई वडील भाऊ बहीण त्यांचे स्पाऊस मुले बायको मुले यांचेबद्दल ममत्व आहे. जेव्हा एकत्र कुटुंबावर प्रहार होतो तेव्हा या भावनेवर प्रहार होतो असे मला वाटते.

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 14:03

In reply to by अजो१२३

शत्रूत्व नसणे म्हणजे ममत्व असणे नव्हे.

हे वाक्य फेकून तुमचा मुद्दा बरोबर ठरत नाही.

विभक्त कुटुंबात राहणार्‍यांना ममत्व नसते हे विधान अतिशय भोंगळ आहे. विदा द्या, व्याख्या करा अन मग पाहू. नपेक्षा एकत्र कुटुंब म्ह. हुकूमशाहीच असते.

अजो१२३ Fri, 14/03/2014 - 16:13

In reply to by बॅटमॅन

१. आई-वडील, इ आप्त कुठे कसे आहेत हे माहित नसणे, त्याच्याशी देणे घेणे नसणे
२. आई-वडीलांशी आर्थिक व्यवहार करणे.
३. पुतणे, भाच्चे, भाच्च्या, इ इ ना कोणतीही मदत न करणे
४. आपला वेळ, उत्पन्न, इतर स्रोत केवळ पत्नी, मुले यांच्यासाठीच राखीव ठेवणे. इतर आप्तांसाठी -०.
५. स्पावसासोबतही डायवोर्स झाला तर ... अशा विचाराने सगळे स्रोत मालकी/विभाजन प्लॅन करणे.
६. उतारवयात मूलांकडून अगदी वेळेचीही अपेक्षा न करणे.
७. आपली संपत्ती मरण्यापूर्वी संपवणे, पास न करणे.
८. आपले नुकसान होते वा रिस्क असते म्हणून आप्तांस अल्पशीही मदत न करणे.
९. नुकसान नसेल तरी, उगाच का असंबंधित लोकांच्या नादी पडा म्हणून दूर राहणे.
१०. अजून काही विसरलो असेन.

बॅटमॅन Fri, 14/03/2014 - 16:18

In reply to by अजो१२३

यातले किती मुद्दे विभक्त कुटुंबात राहणार्‍यांना लागू होतात अन किती मुद्दे एकत्र कुटुंबात राहणार्‍यांना लागू होतात याचे एक कोष्टक बनवून विदा द्या. नपेक्षा तुमच्या तथाकथित निरीक्षणाच्या आधारे निघणार्‍या तथाकथित निष्कर्षांबद्दल कुणालाही ममत्व नसेल. फँटॅस्टिक क्लेम करायची ही तुमची पहिलीच वेळ नाहीये, पण आता विदा द्याच बॉ. नसेल तर हे सर्व निरुपयोगी आहे. सारखे इतरांच्या मागे लागता ना तुम्ही, जुन्या काळच्या अत्याचारांचा विदा द्या, एकत्र कुटुंबातल्या अन्यायांचा विदा द्या म्हणून? मीही त्याच हक्काने तुमच्याकडे विदा मागतो. विदा द्यायची तयारी नसेल तर तुमच्या फँटॅस्टिक दाव्यांना कसलाही अर्थ नाही.

आणि हो, तुमची ठाम मते वेळोवेळी दिसतच आहेत. त्यांना नाकारणे हे अतर्क्य अन तर्कदुष्ट वाटते.

अजो१२३ Fri, 14/03/2014 - 17:09

In reply to by बॅटमॅन

१. हे सगळे मुद्दे विभक्त कूंटूंबाना लागू होतात.( खाली तुम्हीच पित्यापेक्षा बॉस कसा बरा हे लिहिले आहे.). पण तरीही मी तुम्हाला लिहून थकलो कि एकत्र आणि विभक्त ची आपली कल्पना तीच कि वेगळी हे कळण्यासाठी दोन्हीकडच्या सदस्यांची नावे लिहा. मी लिहिली आहेत ते मानून चालू का?

२. विदा नसताना निष्कर्ष काढू नका म्हणणे आणि विदा मागणे यात फरक आहे. किंबहुना तुम्ही माझे प्रतिसाद वाचतच नाही. मी कोणत्या अन्यायाचा विदा कोणाला मागितला?

३. आणि मी कोणता १००% फन्टास्टिक दावा केला आहे ते मलाच जाणायची इच्छा आहे.

बॅटमॅन Fri, 14/03/2014 - 17:39

In reply to by अजो१२३

१. सगळे मुद्दे विभक्त कुटुंबाला लागू कशावरून होतात? अन खाली जे लिहिलं आहे ते तुमच्याच शैलीत, फक्त विरुद्ध बाजूने लिहिले आहे. एक डिफॉल्ट पोझिशन मानून अन्य पोझिशन्सना बिनबोभाट झोडण्याचा आनंद क्वचितच मिळतो.

२. तुम्हीही विदा नसतानाच निष्कर्ष काढू पाहत आहात. कुटुंबप्रमुखांनी केलेल्या अन्यायाचा विदा तुम्ही याच धाग्यात मागितला आहे.

३. जुना काळ नव्या काळापेक्षा सर्वच बाबतींत चांगला होता, गणितात इन्कन्सिस्टन्सीज आहेत, इ.इ. दावे मस्त फँटास्टिक आहेत.

अजो१२३ Fri, 14/03/2014 - 17:53

In reply to by बॅटमॅन

१. सगळे मुद्दे विभक्त कुटुंबाला लागू कशावरून होतात?

कधीही डायवोर्स झाला तर संपतीचे/मुलांचे विभाजन कसे होईल याची बर्‍यापैकी कल्पना असणारे पती पत्नी, फक्त वयात न आलेली मुले (थोडी कमावती झालेली असली तर सोडून गेलेली), इतर आप्तांचा (आजी, आजोबा, आई, वडील, काका, ....पुतणी, भाची) काही संबंध नाही याला/याच्या आसपासच्या थीमला मी विभक्त मानतो.

तुम्ही शेवटपर्यंत एकत्र आणि विभक्त कशाला म्हणत आहात ते सांगणारच नसाल तर तुमचे सगळे मुद्दे मान्य करून मी रजा घेतो.

बॅटमॅन Fri, 14/03/2014 - 17:59

In reply to by अजो१२३

आई-बाबा अन असतील तेवढी मुले यांनी एकत्र राहणे. आजीआजोबा यात बहुतेकदा नसतात, पण कैकदा असतातही. असले तर त्याच घरात किंवा हाकेच्या अंतरावरील घरात राहतात. अन्य भावांचे कुटुंब जवळ अथवा लांब कुठेही राहू शकते-फक्त सेम घर शेअर न करणे हाच निकष. साधारण अशा थीमला मी विभक्त म्हणतो.

मुळात इतर आप्तांचा काहीही संबंध नाही हा तुमचा निकषच अतिशय व्हेग आहे. संबंध नाही म्हणजे काय? एकत्र कुटुंबातही आत्या वैग्रे लोक रोजरोज भेटतात काय?

अन तुमच्या व्याख्येप्रमाणे, संपत्तीच्या विभाजनाची कल्पना एकत्र कुटुंबात नसते असा निष्कर्ष निघतो. त्याचा बेसिस काय?

मन Fri, 14/03/2014 - 17:04

In reply to by अजो१२३

सहावा मुद्दा खरा असेल तर अत्यानंद होतो आहे.
व्यवस्थेकडून घेतलेला पैसा साठवून ठेवण्याऐवजी व्यवस्थेला तिच्या क्षमतेनुसार शोषू दिला; ह्याहून उत्तम उदात्त काय असू शकते ?
वस्तू-सेवा ह्यांच्या देवाणघेवाणीतून विषमता निर्माण होणारच.(मागणी-पुरवथा-गरज ही तत्वे आपली ताकत दाखवणारच)
त्यामुळे विषमता राह्णाराच.
ती समस्या नाहिच.
संपत्तीची आनुवांशिकता ही मात्र समस्या आहे.
(for those who are skilled,)distribution of wealth is not a problem.
Inheritance of the wealth surely is!

नेमकं सांगता येत नाहिये; पण मातीचा देह मातीत परत जाणं हे जितकं स्वाभाविक वाटतं; तितकीच व्यवस्थेतून घेतलेला पैसा पुन्हा व्यवस्थेत गेलेला पाहून बरं वाटतं.
(बिल गेट्स, वॉरन बफे वगैरेंना अधिक संपत्ती घराण्याकडे राखता आली असती; पण त्यांनी ती दान केली.
दान करण्यापेक्षा खर्च केली असती तरी चालली असती असं माझं मत आहे; फार काही मागे ठेवून जायची गरज नाही.

)

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 19:24

In reply to by बॅटमॅन

तुमची मते ठाम नसतात असे तुम्ही म्हणता, पण कैक प्रतिसादांतून तसे दिसत नाही

माझी मते ठाम नसतात हे बर्‍यापैकी खरे आहे. पण तुमचे जर एखादे मत बर्‍यापैकी ठाम असेल तर ते हलवून काढीन इतके प्रश्न माझ्याक्कडे असतात. ते मी एकामागे एक विचारतो. शेवटी तो प्रकार टोकाला जातो.

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 19:34

In reply to by अजो१२३

पण तुमचे जर एखादे मत बर्‍यापैकी ठाम असेल तर ते हलवून काढीन इतके प्रश्न माझ्याक्कडे असतात. ते मी एकामागे एक विचारतो. शेवटी तो प्रकार टोकाला जातो.

प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र मत हलवून काढण्याइतके मूलगामी प्रश्न असतात असे फारसे कधी इतके दिसले नाही.

शिवाय, इथल्या व्यक्तींना प्रतिवाद करता आला नाही म्हणजे तुमचे मत बरोबर ठरले असे तर नाही ना?

शिवाय एकत्र कुटुंबाबद्दल तुम्ही जे प्रतिसाद दिलेत त्यावरून तुमचे ठाम मत समजतेच ;) तुमच्या प्रश्नमालिकेमुळे ते लपत नाही.

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 20:05

In reply to by बॅटमॅन

प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र मत हलवून काढण्याइतके मूलगामी प्रश्न असतात असे फारसे कधी इतके दिसले नाही.

आजपावेतो ऐसीवर "मूलगामी प्रांत" सुरु व्हावा अशी चर्चा मी करू शकलो नाही. चर्चा मूलगामी तर जाऊच द्या, विषय नीट मांडणे इथपर्यंतही येत नाही. बहुतेक टंकून टंकून मूलगामी चर्चा करता येत नाही. बोलून करता येतात.

शिवाय, इथल्या व्यक्तींना प्रतिवाद करता आला नाही म्हणजे तुमचे मत बरोबर ठरले असे तर नाही ना?

सहसा माझे मत नसते. प्रतिवादातला स्वीकर्र्य सारांश स्वीकारणे आणि विषय डोक्यातून काढणे.

शिवाय एकत्र कुटुंबाबद्दल तुम्ही जे प्रतिसाद दिलेत त्यावरून तुमचे ठाम मत समजतेच तुमच्या प्रश्नमालिकेमुळे ते लपत नाही

माझे कोणते ठाम मत नाही. तुमचे आहे. म्हणून मी शंका घेतोय. प्रो एकत्र कुंटुंब तुम्ही सगळे अवाजवी काव काव करायला लागलात तर मी पूर्ण उलटे प्रश्न विचारू शकतो. असे पलडे बदलत्ताना मी माझे विचार शक्यतो सुसंगत ठेवायचा प्रयत्न करतो.

To summarize, I don't have fixed opinions but a hell lot of confusions. I just try to keep my confusions in logical order. I envy all those having fixed opinions.

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 20:58

In reply to by अजो१२३

एकत्र कुटुंबाबद्दल तुम्ही स्पष्टपणे लिहिले की तुमची वैयक्तिक भावना दुखावल्याने तुम्ही प्रश्नमालिकेची सुरुवात केली. वैयक्तिक भावना दुखावल्या कारण तुमचे मत ठाम होते. तस्मात, तुमची मते ठाम नसतात अन फक्त प्रश्न असतात असा तुमचा दावा इथले प्रतिसाद पाहिल्यावर आजिबातच टिकणारा नाही.

हा प्रतिसाद पाहिल्यावर तुमचे काहीएक मत ठाम आहे हे लगेच कळून येते, सबब हा दावा फसवा आहे.

http://www.aisiakshare.com/node/2674#comment-51105

अजो१२३ Fri, 14/03/2014 - 16:56

In reply to by बॅटमॅन

१. मी जेव्हा मला ठाम मते नाहीत म्हणतो तेव्हा ते सरसकट विधान घेता येईल का? म्हणजे वेलींना फुले येतात, प्राण्यांना नाही हे एक सत्य आहे. माझे कोणत्याच विषयावर ठाम मत नाही म्हणजे प्राण्यांना फुले येतात असे मी मानतो असे होते का? प्रत्येक विधानाला संदर्भ आणि मर्यादा असतात. सर्वदा त्या अचूकपणे लिहिणे शक्य होत नाही.
२. ज्या ठिकाणी भिन्न भिन्न कोण्या विषयावर मतप्रवाह असतात आणि खोल अशी शास्त्रीय क्वेरी फारसे काही दाखवून देत नाही, शोध चालू असतात, अधिकतर लोकांचे वर्तन उलटे असते, सत्यावर शिक्कामोर्तब व्हायचे असते, इ इ ठिकाणी मी कोण्या प्रवाहात स्वतःला समाविष्ट करणे कठीण आहे असे पाहतो.
३. मला मतेच नाहीत आणि भावनाच नाहीत असे मी म्हणालो नाही. आपण दाखवून दिल्याप्रमाणे मला कुटुंबीयाबद्दल भावना आहेत आणि टू दॅट एक्स्टेंट मला ठाम मते नाहीत असे माझे म्हणणे चूक आहे हे मी मानतो. (तुम्हीही तुमचे समाधान करून घ्या.) "एकत्र कुटंब पद्धती" "समाजासाठी" योग्य आहे कि नाही याचे माझे सद्य उत्तर आहे असे आहे आणि ते तितकेसे ठाम नाही. माझे कुटुंब एकत्र असावे अशी माझी भावना आहे. कुटुंबप्रमुख या नात्यांनी मुद्दाम आमच्या अत्याचार करायची इच्छा माझ्या आईवडलांच्या वा स्वतःच्या घरात दिसली नाही.
४. एकत्रित कुटुंबात अन्याय होतो हे आपले निरीक्षण असू शकते. पण "एकत्रित कुटुंब पद्धत मूलतः अन्याय करण्याच्या हेतूनेच आहे", "सर्वच अशी कुटुंबे अन्यायी असतात", "कोणतेचे एकत्र कुटुंब सुखी नसते" हे माझ्या निरीक्षणाच्या विपरीत आहे.
५. एकत्रित कुटंबात काय काय चूक होते याची चर्चा वाजवी ठरावी. परंतु कुटुंबाचे "एकत्रितपणच" तांत्रिकदृष्ट्या प्रश्नार्ह, विरोधार्ह आणि त्यजनार्ह आहे असा निष्कर्ष घाईने काढू नये. आजार पाहून रोगी दुरुस्त करायचा का मारायचा हा प्रश्न आहे.
६. म्हणून मी तुम्हाला एकत्रित कुटुंबात कोण कोण अभिप्रेत आहे ते विचारले. विभक्तात कोण कोण?
७. When we change one order of society, it has huge socio-economic implications. इंहेरिटन्सचा एक कायदा बदलला तर कितीतरी दरडी कोसळतील. त्यासाठी एक प्लॅन हवा. वृद्धाश्रमांचे भारतात किती infrastructure आहे, किती लोक म्हातारपणीसाठी सेव करतात, हे पॅतर्न कसे बदलायचे , इ इ.
८. कुटुंबप्रमुख अन्याय करतात इतक्याच सबबीखाली एका अनिश्चित जगात प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे किती उचित आहे? कौटुंबिक या टायटलखाली अन्याय कमी झाला तरी जीवनातला एकूण अन्याय नविन पद्धतीत जास्त असू शकतो. सासू जाचकच असते आणि तुम्ही शिक्षिका असाल तर मुख्याध्यापिका/ पक्/सहशिक्षिका या जाचक नसतातच असा काही नियम नाही. तिथे वेगळे राजकारण असते. अशा सर्व राजकारणांची बेरीज व्हायला हवी.

शिवाय वैयक्तिक भावना दुखावली असा शब्दप्रयोग मला उचित वाटत नाही. "माझे माझ्या एकत्र कुटंबावर प्रेम आहे. मी या पद्धतीच्या बाजूने आहे" असे मी म्हणालो आणि पुढचा "एकत्र कुटुंबपद्धती समाजास पोषक नाही" असे म्हणला तर याने बहुधा वैयक्तिक भावना आहत न व्हाव्यात.

बॅटमॅन Fri, 14/03/2014 - 17:08

In reply to by अजो१२३

माझे कोणत्याच विषयावर ठाम मत नाही म्हणजे प्राण्यांना फुले येतात असे मी मानतो असे होते का? प्रत्येक विधानाला संदर्भ आणि मर्यादा असतात. सर्वदा त्या अचूकपणे लिहिणे शक्य होत नाही.

इतरांनी हे समजून घेण्याची अपेक्षा तेव्हाच करता येते, जेव्हा इतरांच्या 'ठाम' मतांबद्दलही तुम्ही हे समजून घेऊ शकाल. तसे दिसत नसल्याने तुम्ही संदर्भ अन मर्यादा लिहिल्या पाहिजेत ही अपेक्षा अगदी वाजवी आहे. टाळी एका हाताने वाजत नसते, सबब इतरांची मते औट ओफ प्रपोर्शन ब्लो करून तोच न्याय स्वतःला लावल्यास क्रायिंग फौल हा मात्र दुटप्पीपणा आहे.

"एकत्र कुटंब पद्धती" "समाजासाठी" योग्य आहे कि नाही याचे माझे सद्य उत्तर आहे असे आहे आणि ते तितकेसे ठाम नाही. माझे कुटुंब एकत्र असावे अशी माझी भावना आहे. कुटुंबप्रमुख या नात्यांनी मुद्दाम आमच्या अत्याचार करायची इच्छा माझ्या आईवडलांच्या वा स्वतःच्या घरात दिसली नाही.

इतकेच मत असेल तर विभक्त कुटुंबाला झोडण्याचे कारण कळाले नाही. त्याचे समर्थन तर होऊच शकत नाही. एकत्र कुटुंब ही तितकीशी वाईट व्यवस्था नाही/नसते याचा अर्थ विभक्त कुटुंब ही संस्था तितक्याच प्रमाणात चांगली नाही/नसते असा तुम्ही काढू पाहताहात. याला नक्की आधार काय? ते अजूनही तुम्ही सांगितलेले नाही.

एकत्रित कुटुंबात अन्याय होतो हे आपले निरीक्षण असू शकते. पण "एकत्रित कुटुंब पद्धत मूलतः अन्याय करण्याच्या हेतूनेच आहे", "सर्वच अशी कुटुंबे अन्यायी असतात", "कोणतेचे एकत्र कुटुंब सुखी नसते" हे माझ्या निरीक्षणाच्या विपरीत आहे.

आरोप वेगळा आणि हेत्वारोप वेगळा. तुम्ही म्हणता तसे हेत्वारोप इथे कोणीच केलेले नाहीत. मुळात विभक्त कुटुंबव्यवस्थेत तुम्ही फक्त आणि फक्त दोष व स्वार्थीपणाच पाहत असल्यामुळे (अन तेही स्वार्थी या शब्दाची शक्य तितकी निगेटिव्ह अर्थच्छटा घेऊन) तसे रिअ‍ॅक्शनरी शेरे बाहेर पडले तर तो दोष तुमचा आहे.

कुटुंबप्रमुख अन्याय करतात इतक्याच सबबीखाली एका अनिश्चित जगात प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे किती उचित आहे? कौटुंबिक या टायटलखाली अन्याय कमी झाला तरी जीवनातला एकूण अन्याय नविन पद्धतीत जास्त असू शकतो. सासू जाचकच असते आणि तुम्ही शिक्षिका असाल तर मुख्याध्यापिका/ पक्/सहशिक्षिका या जाचक नसतातच असा काही नियम नाही. तिथे वेगळे राजकारण असते. अशा सर्व राजकारणांची बेरीज व्हायला हवी.

अनिश्चित जगाची नक्की काय व्याख्या आहे? विभक्त कुटुंब अन एकत्र कुटुंब या दोहोंत अनिश्चितता कशात जास्त व कशात कमी असते? हे ठरवलंत कशावरून?
सम्यकतेचा आग्रह धरताना तुम्ही डिफॉल्ट पोझिशन ही एकत्र कुटुंब अन बाकी जणू नैसर्गिक अवस्थेपासून ढळलेले, पदच्युत, मार्गच्युत असे पाहताहात. हे ठरवताना तुमचा सम्यकतेचा आग्रह कुठे जातो/गेला होता?

शिवाय वैयक्तिक भावना दुखावली असा शब्दप्रयोग मला उचित वाटत नाही. "माझे माझ्या एकत्र कुटंबावर प्रेम आहे. मी या पद्धतीच्या बाजूने आहे" असे मी म्हणालो आणि पुढचा "एकत्र कुटुंबपद्धती समाजास पोषक नाही" असे म्हणला तर याने बहुधा वैयक्तिक भावना आहत न व्हाव्यात.

काय की. स्वतःच केलेला शब्दप्रयोग तुम्हांस आता उचित वाटत नाही का? असो.

आदूबाळ Thu, 13/03/2014 - 21:03

In reply to by अजो१२३

I don't have fixed opinions but a hell lot of confusions. I just try to keep my confusions in logical order. I envy all those having fixed opinions.

हे वाक्य अजो.बांच्या नावाने बुक ऑफ क्वोट्स मध्ये जायला हरकत नाही. ;)

साहिर Tue, 18/03/2014 - 18:45

In reply to by बॅटमॅन

एकत्र कुटुंब म्हणजे इमोशनल अत्याचार आहे. काही लोकांन्ना दुसर्‍यांना गुलामा सारखे वागवता यावे म्हणुन हे एक गोंडस नाव आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 13/03/2014 - 13:54

In reply to by अजो१२३

अजोमोडऑनः
९९ टक्के एकत्र कुटुंबांत म्हातार्‍या / पुरुष लोकांनी चालवलेली मनमानी आणि केलेले अन्याय; बायकांची, तरुणांची मुस्कटदाबी; मूर्ख परंपरांची भलावण... असते. त्यामुळे एकत्र कुटुंबांचा सत्यानाश झाला पाहिजे. तेव्हाच लोक खर्‍या अर्थाने सुखी होतील.
अजोमोडऑफ.

ह.घ्या. ;-)

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 14:00

In reply to by मेघना भुस्कुटे

तुमच्या आजोबांनी, वडीलांनी आणि मोठ्या भावाने तुमच्यावर काय काय अन्याय केले याची यादी द्या (as applicable). नंतर आपण त्यांचाही पक्ष ऐकू. मग ठरवू.

मेघना भुस्कुटे Thu, 13/03/2014 - 14:07

In reply to by बॅटमॅन

शिकतेय अरे मी! माणसाला काही वेळ द्याल का नाही? ;-)

@अरुणजोशी
विदाबिदा नाही. असला तरीही देणार नाही. तुमच्याशी वाद घालायचाच नाही मुळी. काय थोडीफार चेष्टामस्करी करू फारफार तर. मनस्ताप करून घेण्याचा इरादा नाही. :ड

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 19:16

In reply to by बॅटमॅन

बॅटमना, अजून अजोमोड चालू झाला नाही. उगाच मेघनेला पहिला दुसरा धडा शिकवून अंतिम परीक्षेला पाठवू नकोस.
हे पहा -
१. जगाच्या नि देशाच्या राजकीय, आर्थिक नि तत्सम संस्थांना जोडून तू नि मेघनेने एका फार मोठ्या कुटुंबाचे सदस्यत्व घेतले आहे. या संस्थांच्या प्रमुखांची तुमच्यावर नक्की किती अन्याय करायची इच्छा आहे याचा तुम्हाला थांगपत्ता देखिल नाही.
२. कुटुंबप्रमुख अन्याय करतो म्हणून डंका वाजवण्यापूर्वी आपण ज्या कंपनीत काम करता तेथे पाहावे. रक्ताच्या नातेवाईकांचे कुटुंब लहान करून हे नविन कूटुंब तुम्ही स्वीकारलं आहे, स्वीकारावं लागलं आहे. तिथल्या प्रमुखाच्या इच्छा आणि तुमच्या इच्छा यात किती सुसंगती आहे? बाप बरा कि बॉस?
३. प्रत्येक काळाच्या राजकीय, आर्थिक, इ इ संस्थाच्या कार्यप्रणालीनुसार कुटुंबप्रणालीला जूळवून घ्यायचे असते. या कारणाने गतकाळात शेतीला उपयुक्त एकत्र कुटुंबाची पद्दह्त होती. पण म्हणून ती वाईट ठरत नाही.
४. लोक एकत्र आले कि ते कसे वागतात याचे कुठलेच नियम नाहीत. तुमचा विरोध लोकांच्या एकत्र यायला आहे कि कुटुंब म्हणून एकत्र यायला आहे? तुम्ही कशेही एकत्र या, ते अन्याय वैगेरे चालू होणारच. त्यातल्या त्यात रक्ताच्या लोकांकडून बरी वागणूक मिळण्याची शक्यता.
५. समाजात चांगल्या नि वाईट प्रवृत्तींचे एक प्रमाण असते. तुम्ही कूटुंबात वा कंपनीत, तितका अन्याय चालू राहतोच. कौटूंबिक अन्यायाला मोठा इतिहास आहे म्हणून ती संस्था लोक फोडत आहेत. पण उद्या असाच अन्याय ज्या कोण्या लोकांत तुम्ही राहत आहात (कूटुंबाशी तूटून, कराराने बांधलेले) तिथे प्रत्येक जागी होईल. आताही होताना दिसतो.
६. आपण ज्या ज्या सर्कल मधे जातो ती सारे कुटुंबेच असतात. रक्ताची, बिनरक्ताची, कायदेशीर, इन्फॉर्मल, इ इ . कूटूंब तोडून इतरत्र गेल्याने अन्याय कमी होईल अशी आशा मूर्खपणाची आहे. तेच मूर्ख, तेच चांगले, तेच वाईट, तेच हुशार, तेच स्वार्थी, तेच त्यागी, इ इ लोक प्रत्येक ठिकाणी दिसतील. रक्ताचे लोक विशिष्ट अन्यायाच्या इतिहासाने त्यागले म्हणजे जिकडे असाल तिकडे फार चांगले वातावरण असेल अशी खात्री नाही.

चिंतातुर जंतू Thu, 13/03/2014 - 19:21

In reply to by अजो१२३

>> कुटुंबप्रमुख अन्याय करतो म्हणून डंका वाजवण्यापूर्वी आपण ज्या कंपनीत काम करता तेथे पाहावे. रक्ताच्या नातेवाईकांचे कुटुंब लहान करून हे नविन कूटुंब तुम्ही स्वीकारलं आहे, स्वीकारावं लागलं आहे. तिथल्या प्रमुखाच्या इच्छा आणि तुमच्या इच्छा यात किती सुसंगती आहे? बाप बरा कि बॉस?

नफेखोरीसाठी एकत्र आलेला गट 'कुटुंब' का मानावा? धन्याची चाकरी करणं परिस्थितीनुसार ठीक, पण जिथे परिस्थितीनुसार कधीही नोकरी जाऊ शकते किंवा राजीनामा देऊन नोकरीवर लाथ मारता येते त्याला उगीच कौटुंबिक रंग का द्यावा?

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 19:52

In reply to by चिंतातुर जंतू

मी काय लिहितो नि तुम्ही त्याचा काय अर्थ काढता यात बरेचदा गल्लत झाली आहे. म्हणून मी काहीसे असे लिहिन.

नोकरीवर लाथ मारणे खरेच सोपे नसते. नोकरी बदलणारांचे बरेच प्रकार आहेत. अधिक चांगली संधी मिळाली म्हणून नोकरी बदलणे वेगळे आणि जुन्या नोकरीत अन्याय आहे म्हणून बदलणे वेगळे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे no one is happy with his/her job. आणि असे म्हणायचे म्हणून म्हणतात. पण चिक्कार लोक (ट्क्का टाकला तर मला अवघड जाईल म्हणून टाळतो) are really really unhappy with their jobs. आता मागच्या काळातल्या पिडित अन्यायित एकत्र कुटंबातल्या सदस्यांची टक्केवारी आणि आज नोकरीत दुखी असणारांची टक्केवारी तोलली तर , आज प्रचंड लोक दु:खी निघतील. याला विदा नाही, व्यक्तिगत निरीक्षण आहे. ए सी रूम, ए सी कार नि ए सी घर असा प्रवास असणार्‍या कलिगना सोडून सुरक्षाकर्मी नि रिक्षावाले, कामवाली, चतुर्थ श्रेणी कामगार , करारी कामगार यांना बोलले तरच हे कळते. असो.

समजा मी एकटाच राहतो. रोज जेवण मागवतो. आता आई मला जसे खाऊ घालते, तसेच खानावळवाल्याने घालणे गरजे आहे तरच दोन बाबींत संतुलन आहे. समजा आपल्या जीवनातली क्ष नाती य प्रकारांत (कौटूंबिक, इ) विभागली गेली आहेत. जीवनपध्हती बदलून आपण ही नाती आणि प्रकार यांचे reconfiguration करत असतो. नात्यांची नि प्रकारांची नावे काय आहेत याने काय फरक पडतो (Coming to what you asked. How does it matter if I don't 'term' closely associated people as family members?)? शेवटी तुमच्यावर होणारा नेट न्याय्/अन्याय महत्त्वाचा. नाही का?

आपल्या एकत्र कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन, तिथे आपले रोल/महत्त्व/न्याय्/अन्याय आणि विभक्त पद्धतीतले साधन, तिथला रोल, महत्त्व, न्याय, अन्याय हे ही एकत्र जोडून भाष्य करायला हवे.

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 21:18

In reply to by अजो१२३

आता मागच्या काळातल्या पिडित अन्यायित एकत्र कुटंबातल्या सदस्यांची टक्केवारी आणि आज नोकरीत दुखी असणारांची टक्केवारी तोलली तर , आज प्रचंड लोक दु:खी निघतील. याला विदा नाही, व्यक्तिगत निरीक्षण आहे

व्यक्तिगत निरीक्षण म्हटलं की विदा द्यायची जबाबदारी अज्जीच झटकता येते. जबराट इन्व्हेन्शन. मान गये.

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 19:43

In reply to by अजो१२३

हम्म. प्रयत्न करून पाहतो तुमचा मोड जमतो की कसे.

जगाच्या नि देशाच्या राजकीय, आर्थिक नि तत्सम संस्थांना जोडून तू नि मेघनेने एका फार मोठ्या कुटुंबाचे सदस्यत्व घेतले आहे. या संस्थांच्या प्रमुखांची तुमच्यावर नक्की किती अन्याय करायची इच्छा आहे याचा तुम्हाला थांगपत्ता देखिल नाही.

एकत्र कुटुंबात नक्की किती अन्याय होतो किंवा कुटुंबप्रमुखांची अन्यायाची इच्छा तुम्हालाही माहिती नाही.

कुटुंबप्रमुख अन्याय करतो म्हणून डंका वाजवण्यापूर्वी आपण ज्या कंपनीत काम करता तेथे पाहावे. रक्ताच्या नातेवाईकांचे कुटुंब लहान करून हे नविन कूटुंब तुम्ही स्वीकारलं आहे, स्वीकारावं लागलं आहे. तिथल्या प्रमुखाच्या इच्छा आणि तुमच्या इच्छा यात किती सुसंगती आहे? बाप बरा कि बॉस?

बॉस फक्त ९ ते ६ काम करून घेतो. बॉसला तोंडावर शिव्या घालता येतात. बापाला शिव्या घालता येत नाहीत. शिवाय बापासोबत दररोज रहावे लागते, खाण्यापिण्यातल्या बारीकसारीक आवडीनिवडी सांभाळाव्या लागतात. बॉस बरा की बाप?

रत्येक काळाच्या राजकीय, आर्थिक, इ इ संस्थाच्या कार्यप्रणालीनुसार कुटुंबप्रणालीला जूळवून घ्यायचे असते. या कारणाने गतकाळात शेतीला उपयुक्त एकत्र कुटुंबाची पद्दह्त होती. पण म्हणून ती वाईट ठरत नाही.

त्याच न्यायाने सध्याची विभक्त कुटुंब पद्धतीही वाईट ठरत नाही.

लोक एकत्र आले कि ते कसे वागतात याचे कुठलेच नियम नाहीत. तुमचा विरोध लोकांच्या एकत्र यायला आहे कि कुटुंब म्हणून एकत्र यायला आहे? तुम्ही कशेही एकत्र या, ते अन्याय वैगेरे चालू होणारच. त्यातल्या त्यात रक्ताच्या लोकांकडून बरी वागणूक मिळण्याची शक्यता.

उलट रक्ताच्या लोकांकडूनच इस्टेटीवर डोळा ठेवला जातो, भाऊबंदकी होते. त्यापेक्षा आपण बरं आपलं काम बरं. त्यामुळे नातेसंबंध नसलेल्या लोकांकडूनच बरी वागणूक मिळण्याची शक्यता.

समाजात चांगल्या नि वाईट प्रवृत्तींचे एक प्रमाण असते. तुम्ही कूटुंबात वा कंपनीत, तितका अन्याय चालू राहतोच. कौटूंबिक अन्यायाला मोठा इतिहास आहे म्हणून ती संस्था लोक फोडत आहेत. पण उद्या असाच अन्याय ज्या कोण्या लोकांत तुम्ही राहत आहात (कूटुंबाशी तूटून, कराराने बांधलेले) तिथे प्रत्येक जागी होईल. आताही होताना दिसतो.

कुटुंबात अन्यायाला स्कोप कितीतरी जास्त असतो कारण सान्निध्य अजून डीप असते.

आपण ज्या ज्या सर्कल मधे जातो ती सारे कुटुंबेच असतात. रक्ताची, बिनरक्ताची, कायदेशीर, इन्फॉर्मल, इ इ . कूटूंब तोडून इतरत्र गेल्याने अन्याय कमी होईल अशी आशा मूर्खपणाची आहे. तेच मूर्ख, तेच चांगले, तेच वाईट, तेच हुशार, तेच स्वार्थी, तेच त्यागी, इ इ लोक प्रत्येक ठिकाणी दिसतील. रक्ताचे लोक विशिष्ट अन्यायाच्या इतिहासाने त्यागले म्हणजे जिकडे असाल तिकडे फार चांगले वातावरण असेल अशी खात्री नाही.

एकत्र कुटुंबात ममत्व जास्त असते अन विभक्त कुटुंबात ममत्व असते हा शेराही तितकाच बिनबुडाचा आहे. उलट स्वातंत्र्यातून एकत्र कुटुंबात पडणे म्हणजे पारतंत्र्याला निमंत्रणच! पदोपदी आपल्या आशाआकांक्षांना मुरड घालून वागत राहण्यापेक्षा स्वतंत्र राहून पॉलिटिक्स खेळलेले कधीही चांगले.

त्यामुळे एकत्र कुटुंबव्यवस्था ही हुकूमशाही अन विभक्त कुटुंबव्यवस्था हीच बेस्ट. एकत्र कुटुंबव्यवस्थेतले तथाकथित ममत्व हा या ना त्या प्रकारचा स्वार्थ असतो.

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 18:53

In reply to by मेघना भुस्कुटे

तुम्हाला माझ्या तर्कांमुळे मनस्ताप होतो? मनस्ताप स्वतःच्या कृतींमुळे होतो असे ऐकून आहे.

ऋषिकेश Thu, 13/03/2014 - 14:14

In reply to by अजो१२३

एकत्र कुटुंबाला मी नाही हो झोडपलेय. २०-३० वर्षांपूर्वीच ते झोडपले गेलेय नी हल्लीच्या काळात निरुपयोगाने आता उन्मळून पडलेय. त्याचे कढ काढत किती पिढ्या सिरीयल्सवाले हा अत्याचर करणारेत?

दुसरे असे की एकत्र कुटुंब नी भावनिक गुंतवणूकीचा काय संबंध? एकत्र कुटुंबातील कित्येक व्यक्ती भांडतात तर विभक्त कुटुंबातील कित्येक जोडपी ममत्त्वाने राहतात. एक चुल असल्याने, एका वाडग्यात अन्न शिजल्याने ममत्त्व वाढते वगैरे दवणीय/साने गुर्जीछाप काही म्हणायचे असेल तर अर्रर्र तुमचा काळच चुकला!

कुटुंब एकत्र विभक्त असणे या दोन्ही पद्धती, निव्वळ आर्थिक गरजांपोटी आपोआप निर्माण झालेल्या व्यवस्था आहेत.

मेघना भुस्कुटे Thu, 13/03/2014 - 14:16

In reply to by ऋषिकेश

"त्याचे कढ काढत किती पिढ्या सिरीयल्सवाले हा अत्याचर करणारेत?"

जोवर एकत्र कुटुंबाचे तोटे दाखवून दिल्यावर आपल्या कौटुंबिक स्नेहभावनेवर प्रहार झाला असं वाटणारे लोक समाजात शिल्लक आहेत, तोवर. ;-)

ॲमी Wed, 12/03/2014 - 10:42

'गेहरी चाल' नावाचा महाभयानक चित्रपट पाहिला. अमिताभ, जितेँद्र, हेमामालिनी. त्यात 'कुकडु कुकडु' असल काहीतरी डेँजरस गाणं होत. देवा! shudder... :-D

आणि चमेली की शादी पाहिला. मला पुर्वीपण आवडलेला यावेळीपण आवडला. अमृता सिँगने छान काम केलय.

सध्या कॉकटेल पाहतेय. होमी अदाजानीयाचा बिईँग सायरस जबरदस्त आवडलेला हे कॉकटेलमात्र कैच्याकै आहे. असो चालायचच.

ऋषिकेश Wed, 12/03/2014 - 10:44

In reply to by ॲमी

मला कॉकटेलचा पुर्वार्ध आवडला होता. आता हिंदी चित्रपट चक्क आधुनिक बहुभार्या / लीव्ह इन किंवा लग्नाशिवाय एकापेक्षा अधिकांशी संबंध ठेवण्याच्यापद्धतीवर किंवा दुसर्‍या टोकाला थेट "थ्रीसमवर" भाष्य करणार की काय अशी अंधुकशी आशा जागृत झाली होती. पण उत्तरार्ध इतका पुळचट आणि प्रेडिक्टेबल (नी त्यात बाष्कळ मेलोड्रामाटिक) आहे की अरारा! असं होऊन गेलं :(

ॲमी Wed, 12/03/2014 - 11:04

In reply to by ऋषिकेश

मला कथा आधीच माहितीय त्यामुळे आवडत नसेल बहुतेक. तू काही आयड्या नसताना पाहिला असशील, रिलीज झाला तेव्हाच. पण तरीही बॉलीवूड धंदेवाइक चित्रपटापासून तू 'या अशा' अपेक्षा केल्या म्हणजे टोकाचा आशावादी आहेस _/\_.

आदूबाळ Wed, 12/03/2014 - 16:29

In reply to by ॲमी

चमेली की शादी लय भारी आहे. त्यात अमजद खान सर्वात जास्त लक्षात रहातो. प्रॅक्टिकल, बेरकी वकील बेष्ट आहे.

ॲमी Wed, 12/03/2014 - 16:39

In reply to by आदूबाळ

हो पहील्यांदा पाहिला तेव्हा अमजद खानच आवडलेला आणि अनिल कपुरच चालणं ;-). यावेळी मात्र अमृता सिँग आवडली.

रमताराम Thu, 13/03/2014 - 11:26

(क्रिएशन्स' निर्मित) साहित्य अभिवाचन - रारंग ढांग : एक संमिश्र अनुभव

माध्यमांतर करताना, एक कादंबरी अभिवाचन स्वरूपात नेताना दोन तीन महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे लागते असा माझा समज आहे. पहिले म्हणजे कादंबरीचा विस्तार मोठा, त्यातले सारे काही दीड-दोन तासाच्या कार्यक्रमात बसवणे शक्यत नसते. तेव्हा पहिली गरज म्हणजे संपादन आणि त्यातून सिद्ध होणारी संहिता. हा टप्पा यशस्वीपणे पार केला असं म्हणावं लागेल. कादंबरीत काटछाट करताना संहितेमधे कच्चे दुवे राहू नयेत याची काळजी व्यवस्थित घेतली गेली. मुख्य गाभ्याला धक्का न लावता परिघावरची दोन कथानके त्यांनी सफाईने वेगळी करून व्यवस्था, व्यक्ति आणि निसर्ग या तीन घटकांमधल्या संघर्षावर भर दिला, जो मुळातच त्या कादंबरीचा गाभा आहे. दुसरी बाब म्हणजे नव्या माध्यमासाठी नवी भाषा कदाचित निर्माण करावी लागते. वाचनाऐवजी संवाद माध्यम जेव्हा येते तेव्हा भाषेलाही संवादी रूप द्यायला हवे. पण ही बाब मात्र मंडळी साफ विसरून गेलेली दिसतात (असेच काहीचे पुलंच्या म्हैस' वरून त्याच नावाचा चित्रपट तयार करणार्‍यांच्या बाबत झाले होते नि तो चित्रपट पूर्ण फसला होता.). कादंबरीतील भाषा जशीच्या तशी ठेवण्याने त्या सादरीकरणाला काहीचा कृत्रिमतेचा बाज आला होता. तिसरे म्हणजे नवे माध्यम हे नाटक, एकांकिका असे कायिक वाचिक अशा दोन्ही प्रकारच्या अभिनयाचे आहे की अभिवाचनासारख्या निव्वळ वाचिक अभिनयाचे आहे यानुसारही संहितारचनेत फरक पडू शकतो असा माझा समज आहे. इथे अभिवाचनाचे माध्यम असल्याने घटनांची मांडणी करण्याबरोबरच निवेदनात्मक बाजू देखील मांडता येते आणि त्याचा वापर इथे चांगला करून घेतला होता. अधेमधे येणारे निवेदन मागच्या पुढच्या घटना/संवाद यांना बर्‍यापैकी पूरक ठरून त्या अनुभवाला एकसंधपणा आणत होते.

प्रत्यक्ष सादरीकरणात केवळ अभिवाचनावर अवलंबून रहायचे असल्याने वाचनकौशल्याचा वापर पुरेपूर करणे अपेक्षित असते. अभिनय, वावर, नेपथ्य इ. नाटकाची परिमाणे उपलब्ध नसल्याने जे काही पोचवायचे ते केवळ शब्दातून. इथे मात्र सादरीकरण बरेच उणे ठरले असं म्हणावं लागेल. एकाहुन अधिक पात्रांच्या संवादांचे अभिवाचन वेगवेगळ्या आवाजांचा, चढ-उतारांचा, पट्टीचा वापर करून सुरेख सादर करणार्‍या मंगेश दिवाणजी यांचा एक सन्माननीय अपवाद वगळता इतरांनी बव्हंशी निराशाच केली असं म्हणावं लागेल. 'एक थरारक अनुभव' असा दावा करणारे हे सादरीकरण नेटके असले तरी थरारकच काय पण कुठेही प्रेक्षकाला धरून ठेवत नाही. भैरवी पुरंदरे यांनी निवेदनाचे केलेले वाचन आणि मेजर बंबांचे संवाद वाचणारे विश्वास सहस्रबुद्धे (?) यांना आवाजाची देणगी आहे ती त्यांनी पुरेपूर वापरली नाही. विश्वनाथ'च्या संवादांचे वाचन करणारे अमृत सामक त्याच्या व्यक्तिमत्त्वातील करारीपणा, निर्धार पुरेसा उलगडू शकले नाही. याशिवाय एकुणच कुणीही अभिवाचक समोरच्या प्रेक्षकाकडे ढुंकून न पाहता मान खाली घालून वाचत होते. 'आय काँटॅक्ट' चा पूर्ण अभाव होता. कदाचित पहिलाच प्रयोग(?) असल्याने आपापले संवाद्/संहितेचा भाग पुरेसा पाठ नसेल म्हणून हे घडले असेल. पण हा वाचनकौशल्याचा भाग आहे. कागदाकडे पाहताना एकदोन वाक्ये एकदम वाचून, ती सादर करताना मात्र प्रेक्षकांशी समोरासमोर सादर व्हायला हवीत. कथनाताला एखादा अत्यंत महत्त्वाचा, प्रेक्षकांवर अधिक प्रभावीपणे ठसवणे आवश्यक आहे असा भाग तर पूर्णपणे प्रेक्षकांशी नजरानजर करूनच सादर व्हायला हवा.

निवेदनात्मक भागाचा वापर करताना ते निवेदन आणि प्रत्यक्ष घटना/संवाद यांच्यात आत-बाहेर करताना सांधा बदल सहजपणे जाणवायला हवा. त्यासाठी निवेदनाची पट्टी नि अन्य संवादांची पट्टी वेगळी ठेवणे हा एक -निदान ढोबळ - मार्ग असू शकतो. माझ्या मते निवेदन हे मागीलपुढील घटना/संवाद यांना जोडणारी कडी एवढेच असेल तर त्याची पट्टी साधारणपणे खालची असायला हवी. किंवा संगीताचा पूरक वापर करत असाल तर एक निश्चित संगीताचा तुकडाच निवेदनाला पार्श्वसंगीत म्हणून वापरला तरी काम होते. अर्थात हे माझे - एका अनभ्यस्ताचे - विस्कळित विचार आहेत. त्या त्या क्षेत्रात काम करणारे अधिक चांगले, नेमके काही सांगू शकतील.

प्रयोगाला जेमतेम वीस माणसे उपस्थित होती. या एका बाजूने अवकाळी पावसाचा परिणाम असावा किंवा योग्य प्रकारे, योग्य त्या माध्यमातून जाहिरात पुरेशी खोलवर न पोचवल्याचा पारिणाम असावा. मी क्रिएशन्स'च्या मंगेश दिवाणजींशी बोललो तर त्यांनी फेसबुकवरही जाहिरात केली होती असे कळले. परंतु इथे असलेल्या नाटक, कला प्रेमी मंडळींच्या ग्रुपमधे मला कुठे सापडली नाही. कदाचित मराठी माणसे प्रत्येकाचे आपापले संस्थान सांभाळून असतात नि एकमेकांच्या संस्थांनाबाबत बोटे मोडण्यापलिकडे काही करत नसावेत तसेच ग्रुप्सचेही असावे. पैशाला पासरी ग्रुप असावेत नि ते एकमेकांना फॉलो करत नसावेत किंवा केले तरी त्यातील कंटेंट शेअर करत नसावेत असे दिसते.

ऋषिकेश Thu, 13/03/2014 - 12:18

In reply to by रमताराम

तुमच्याच कडून माहिती मिळूनही संधी साधता आली नाही. या वृत्तांतावर तहान भागवतोय.
एकुणात प्रयोग बर्‍यापैकी रोचक होता असे दिसतेय.

माझ्याकडे स्नॉवेलची रारंगढांगची अ‍ॅडीयो-बुक सीडी आहे. त्यात दिलीप प्रभावळकरांसारख्या नटाच्या आवाजाने एक वेगळी मजा येते. तिथे संगीताचा वापरही यथायोग्य वाटाला. मात्र तरीही मला ऑडीयो बुक हा प्रकार भावला नाही (इंग्रजीतही नाही नी आता मराठीतही नाही). मात्र (कसे कोण जाणे, पण) समोर बसून केलेले अभिवाचन मात्र आवडते असा पूर्वानुभव आहे.

आदूबाळ Thu, 13/03/2014 - 19:27

In reply to by ऋषिकेश

मराठी ऑडियो बुक्स ऐकली नाहीत, पण इंग्रजी आवडतात.

"मर्डर ऑन ओरिएंट एकस्प्रेस" वाचताना बोअर झालं होतं (अगाथाबै ख्रिस्तींचा फ्यान असूनपण) पण ऑडियो बुक ऐकायला मजा आली. "इंपॉर्टन्स ऑफ बीईंग अर्नेस्ट" हे ऑस्कर वाईल्डचं नाटक ऑडियो बुक फॉर्ममध्ये ऐकायला भारी वाटलं होतं.

https://librivox.org/

इथे बरीच चकटफू ऑडियो बुक्स मिळतात.

अक्षय पूर्णपात्रे Thu, 13/03/2014 - 21:03

In reply to by रमताराम

'रारंग ढांग' ही कादंबरी नुकतीच वाचली. मला ही कादंबरी अतिशय सामान्य दर्जाची वाटली. माध्यमांतर करतांना या कादंबरीचे सामन्यत्व अधिकच खुलून समोर आले असावे का?

बॅटमॅन Thu, 13/03/2014 - 21:07

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

मी काही वर्षांपूर्वी वाचली. आवडली, पण मित्रांनी लै भारी इ.इ. म्हटले होते तसे मात्र आजिबात वाटले नै. कदाचित संस्कारक्षम इ. वयात न वाचल्याचा परिणाम असावा.

साहिर Tue, 18/03/2014 - 18:49

In reply to by बॅटमॅन

मराठी भाषेतला साहित्याचा दर्जा एकुणच सुमार असतो. त्यात अगदी थोडे below average आले की डोक्यावर घेउन नाचले जाते.

साहिर Tue, 18/03/2014 - 19:02

In reply to by बॅटमॅन

बिलो अव्हरेज च म्हणायचे होते मला. बाकी तर अगदीच टाकावु असते. रारांग्ढांग वगैरे बिलो अ‍ॅवरेज.
अ‍ॅवरेज सुद्धा काही निर्माण होत नाही मराठीत, तर अबव्ह अ‍ॅवरेज कुठले होयला.

बॅटमॅन Tue, 18/03/2014 - 19:06

In reply to by साहिर

साहिर ऐवजी अरसिक असा आयडी जास्त शोभला असता.

असली अज्ञानमूलक बद्धकोष्ठी वक्तव्ये ऐकली की आजकाल हसू अन कणव वैग्रे येते. चालूद्या.

'न'वी बाजू Fri, 28/03/2014 - 16:15

In reply to by साहिर

मराठी भाषेतला साहित्याचा दर्जा एकुणच सुमार असतो. त्यात अगदी थोडे below average आले की डोक्यावर घेउन नाचले जाते.

समजा, मराठी भाषेतला साहित्याचा दर्जा एकूणच सुमार असतो. ('कशाच्या तुलनेत?' हा प्रश्न तूर्तास सोडून देऊ.) तर मग त्या परिस्थितीत तुमचे अ‍ॅव्हरेजसुद्धा बर्‍यापैकी खाली असणार नाही काय?

डोक्यावर घेऊन नाचले जाणारे अबव्ह अ‍ॅव्हरेज असेल, बिलो नव्हे. जरा पुन्हा एकदा तपासून पहा.

अजो१२३ Fri, 28/03/2014 - 16:24

In reply to by 'न'वी बाजू

What he wrote was- Marathi literature is mediocre in general and (even) if something below average (of global sample) is found, it is eulogized more than it deserves.

भाषेचे दौर्बल्य हो!

अजो१२३ Fri, 28/03/2014 - 16:46

In reply to by बॅटमॅन

मराठी भाषेतला साहित्याचा दर्जा एकुणच सुमार असतो. This very clearly means all Marathi literature is being compared with all possible literature. He wants to imply that our literature is at rock bottom.

त्यात अगदी थोडे below average आले की डोक्यावर घेउन नाचले जाते.
Now he has already said that everything mostly is below, much below average. Now he wanted to say if something nears average from bottom, it is praised. To describe something near average and below it, "just below average" is a proper phrase. And he used a marathi word for just - थोडे.

बॅटमॅन Fri, 28/03/2014 - 16:50

In reply to by अजो१२३

हे सांगायला ठीके, पण ती लेखनचूक असावी असे अजूनही वाटते. वरिजिनल लेखकच काय तो खुलासा करू शकतील. तदुपरि तो खुलासाही पश्चाद्दृष्टीने कलङ्कित झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो.

अजो१२३ Thu, 13/03/2014 - 13:01

दिल्लीत टाटास्काय च्या मराठी रिजनल पॅकमधे ८-९ टी वी चॅनेल्स उपलब्ध आहेत. कोणत्या चॅनेलवर कोणत्या वारी कोणत्या वेळी सिनेमा (वा इतर कोणता रोचक कार्यक्रम ) लागतो याचे काही शेड्यूल आहे का? जालावर प्रत्येक (किमान मराठी) चॅनेलचे आठवड्याचे किंवा दिवसाचे वेळापत्रक देणारी साईट मला दिसली नाही. तुम्हाला माहीत आहे का? दिल्लीच्या पेपरात दिवस्भर मराठी चॅनलवर काय येणार आहे हे दिलेले नसते. टाटा स्काय मधे पुढचा कार्यक्रम (सहसा दिवसभर)काय आहे ते पाहायची सोय आहे पण नेहमी information not available असेच लिहून येणार, शिवाय प्रत्येक चॅनेल कोण खंगाळणार?

कान्होजी पार्थसारथी Fri, 14/03/2014 - 03:34

नुक्तेच The Viral Fever , All India Bakchod यांचे काही विडीओ पाहिले.
तिकडे eye ह्या indian express च्या नियतकालिकाकडुन जाणे झाले.
इन्जिनिअरिंग कॉलेजांत असणारा मोठा तरुणवर्ग, आय-टी साक्षर असणारा बॅचलर तरुणवर्ग हा त्यांचा त्यांचा प्रमुख प्रेक्षक. राजकारणी, जोहर-चोपडा-चित्रपट, फिरणार्‍या मीम्स, अशा गोष्टींवर भंकस करताना ती अतिफालतु होणार नाही याची काळ्जी घेतलेली दिसते, ती सर्वांनाच (फेस्बुक वापरणार्‍या अम्क्या तम्क्याला!) रुचेल/कळेल अशी नाही. राजकारणी, सामाजिक विषय यांना एका प्रकारे इनर्ट होत असणार्‍यांचा, डोक्याला ताप न देणार्‍या, 'संस्कारी अलोकनाथ' अशा गोष्टींमध्ये करमणूक शोधणार्‍यांचा उपरोधिक सूर त्यांनी मस्त पकडला आहे. आय मध्ये त्यावर त्यांच्या कर्त्या-धर्त्यांचे डिट्टेल विश्लेषण आले आहेच.
यु-ट्यूब वर त्यांच्या विडीओंना बरीच लोकप्रियता मिळत आहे, सोबत जाहिराती सुद्धा. काहीवेळेस जाहिराती कल्पक वापरल्या आहेत. त्यांच्या कामांत, उदा. अनुराग कश्यपच्या कामांतली धग नसली तरी त्याची विनोदाची-उपरोधाची धाटणी मात्र सापडेल.
पोरं हुशार आहेत. पॉलिटीकल पॅरडी, नेट-साक्षरांची भंकस यात नक्कीच माइलस्टोन ठरतील.

कान्होजी पार्थसारथी Sun, 16/03/2014 - 04:25

नुकताच महाराष्ट्र शासन प्रस्तुत डॉ. पटेलांचा यशवंतराव चव्हाण- बखर ... हा बंडल चित्रपट पाहिला.
पोस्टरवर नाना पाटेकरचे बुद्धीबळाच्या पटावरचे चित्र पाहुन पिच्चरला जावे की नको हा प्रश्न पडला. पोस्टरवर डॉक्टरांच्या नावासाठी वापरलेला फाँट बघुन चित्रपट बोगस असणार याची खात्री पटली आणि स्टॉलचे तिकिट काढले. (लोखंडी खुर्च्या असूनही) पाठीत खंजीर घुसणारच होता. पटेल म्हणून गेलो, असो.
( गणपतराव चव्हाण खोकत यशवंतरावांना सल्ला देण्याचा प्रसंग, इतर बरेच हास्यास्पद प्रसंग डॉक्टरांच्या दिग्दर्शक म्हणून माझ्या मनातल्या प्रतिमेला सुरुंग लावणारे होते. आता नो मोअर जब्बार पटेल! (कोल्हापुरात काही वर्षांपूर्वी शाहू स्मारक भवनासमोर पटेलांना कुणी हौश्या म्हातार्‍याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना सहज ऐकले, तर ते "नो मोअर मराठी फिल्म्स" असे काहीसे बोलल्याचे स्मरते, त्या धर्तीवर))

साहिर Tue, 18/03/2014 - 19:07

In reply to by कान्होजी पार्थसारथी

अजुन एक बिलो अव्हरेज माणुस मराठीत. बाकीचे टाकावू असल्यामुळे जब्बार कोणी महान दिग्दर्शक असल्याचे चित्र निर्माण केले गेले.

सिंहासन बघा नीट. साधुंची व्यक्तीचित्रे आणि सर्व नावाजलेल्या नटांचा वावर म्हणुन तो बरा वाटतो.
पण सिनेमा म्हणुन काही विषेश achievement आहे का?

हा माणुस थोड्याच दिवसात श. पा, वर पण सिनेमा काढेल. नाव पण सांगतो " जाणता राजा"

सन्जोप राव Sun, 16/03/2014 - 06:24

फार अपेक्षा न ठेवता या चित्रपटाला गेलो. चित्रपट आवडला. गेल्या काही दिवसांत कोणताही चित्रपट बघायचा आणि वैफल्य घेऊन परत यायचे हे चक्र या चित्रपटामुळे संपले म्हणायचे. मराठी चित्रपटातली निर्मितीमूल्ये आता सुखद झाली आहे. अजिंक्य देवचा संयत, सुरेख अभिनय.

साहिर Tue, 18/03/2014 - 18:56

In reply to by सन्जोप राव

भीषण सिनेमा होता. एक तर एखाद्या सिरियल चे दोन एपिसोड असावेत एव्हडाच ऐवज होता. आणि सगळ्याच बाजुनी चुकला होता हो. फार बालिश आहेत हो ही लोक.

त्यापेक्षा Sony वर Crime Petrol असते, ते फार फार चांगले असते ह्याच्या पेक्षा.

मिलिंद Sun, 16/03/2014 - 07:50

"द हाउस ऑफ बर्नार्डा आल्बा"

फेडेरिको गार्सिया लॉर्का ह्यांच्या स्पॅनिश नाटकावर आधारित (टिव्हीसाठी बनवलेला) चित्रपट पाहिला. खूप आवडला. कथाबीज, दिग्दर्शन, अभिनय (विशेषतः बर्नार्डाच्या भूमिकेत ग्लेन्डा जॅक्सनचा) सारेच उत्तम. गोष्ट साधारण १०० वर्षांपूर्वीच्या काळात स्पेनच्या एका गावात घडते. आपल्या मुलींसोबत गावातील सर्वात मोठ्या वाड्यात राहणारी व त्यांच्यावर जबरदस्त दरारा असणारी विधवा आई आपल्या दुसर्‍या पतीच्या निधनानंतर तत्कालीन प्रथेप्रमाणे घरात आठ वर्षांचा दुखवटा जाहीर करते. आधीच गावात आपल्या तोलामोलाचे कोणतेही घर व घराणे नाही ह्या मतामुळे ती मुलींची लग्न होऊन देत नसते. मुलींची घुसमट, कोंडमारा, आईचा त्यांच्यावरील वचक, त्यांच्या भावनांविषयी बेफिकिरी ह्या सार्‍यामुळे संपूर्ण चित्रपटावर कौटुंबिक दहशतीची, आणि अतृप्त लैंगिकतेची विलक्षण छाया दाटलेली आहे. खरे तर वर्णन करून सांगण्यापेक्षा हा अनुभवण्याचा चित्रपट आहे. यूट्यूबवर इथे पाहता येईल.

ह्याच चित्रपटावरून गोविंद निहालानी ह्यांनी "रुक्मावती की हवेली" हा चित्रपट काढला होता. तोही छान होता. उत्तरा बावकर, ज्योती सुभाष ह्यांचा अभिनय अविस्मरणीय.

अतिशहाणा Mon, 17/03/2014 - 18:54

मराठीतील एकमेव सुपरष्टार भरत जाधव 'अभिनित' खोखो हा चित्रपट पाहिला. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ परत येणार... नव्हे तो आलाच आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली. ;) ज्यांना मराठी चित्रपटांच्या भवितव्याबाबत काही शंका आहेत त्यांनी हा चित्रपट चुकवू नये... तत्काळ सर्व शंकानिरसन होईल.

अजो१२३ Tue, 18/03/2014 - 13:13

In reply to by अतिशहाणा

खो-खो हे एका नाटकावर आधारित आहे. मी २००४ ते २००६ च्या दरम्यान केव्हातरी ते मूळ नाटक वाशीला पाहिले होते. चित्रपटात जे अधिकचे सेट वापरता येतात ते वापरून चित्रपट बनवला आहे. नाटक तरी मला फार आवडले होते. चित्रपट अपेक्षा उंचावल्याने निष्प्रभ वाटला.

ऋषिकेश Tue, 18/03/2014 - 10:16

चर्चित क्वीन आणि गुलाब गँग बघितले.
'क्वीन' आवडला. त्याबद्दल बरेच बोलुन झाले आहे त्यामुळे अधिक लिहित नाही फक्त कंगनाच्या अभिनयापेक्षा संवादलेखनाने जिंकले आहे असे वाटले. पटकथेवर यथाप्रथा काम करायला हवेच होते. दुसर्‍या भागात कास्टिंगही सुधारता आले असते. तरी चित्रपटाची कथावस्तु व फ्रेश कल्पनाच इतकी रोचक आहे की अभिनयादी अंगांतील किंचित कमतरता झाकली जाते. संगीत पीसेसमध्ये चांगले, तरी चित्रपट एकुणात स्मरणीय झाला आहे. नक्की बघा.

'गुलाब गँग' टिपिकल बॉलिवून मनोरंजनपट आहे. सिंघम स्टाईल स्टंट्स आहेत (फक्त ते माधुरी व तिच्या सहकारी करतात).
माधुरीसाठी चित्रपट पाहिला. तिच्या इंटरव्ह्युत दिसणार्‍या रुपामुळे तिच्याजागी मेकअपचे दुकान दिसते का याची चिंता होती, मात्र चित्रपटात मेकपशिवायची माधुरी आहे. तिचे नी त्याहुन अधिक जुहीचे काम चोख आहे! माधुरीचा एक नव्हे तर तीन-तीन फुलफ्लेज्ड नाच आहेत. अर्थात विस्कळीत पटकथा, शब्दबंबाळ 'टिपिकल' संवाद, काही अनावश्यक पात्रयोजना आदी अंगामुळे चित्रपट टॉलरेबलचा दर्जा क्रॉस करू शकत नाही. सहज घरीच बघत आला तर फॉरवर्ड करत बघा ही शिफारस

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/03/2014 - 18:59

In reply to by ऋषिकेश

केस मोकळे सोडून किंवा लांबसडक वेणी पुढे आणलेल्या, गुलाब गँगच्या लीडरचं काम करणाऱ्या माधुरीताई ट्रेलरमधे पाहिल्या आणि सिनेमा काय असेल याची कल्पना आली. तिच्यापेक्षा जुही चावला भूमिकेत चांगली वाटते. निष्ठा जैन यांनी 'गुलाबी गँग' नावाचा माहितीपट काढला आहे, त्याचा ट्रेलर मात्र आश्वासक वाटला.

मणिकर्णिका Tue, 18/03/2014 - 19:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निष्ठा जैन यांनी 'गुलाबी गँग' नावाचा माहितीपट काढला आहे, त्याचा ट्रेलर मात्र आश्वासक वाटला.

मुंबईतील मिफ २०१४मध्ये पाहिला.रिसायकलवालाने तो निवडक स्क्रीनवर रिलीजही केला होता. 'गुलाब गँग'च्या आधी आल्याने डोअरकीपरने "ये माधुरीवाला मूव्ही नहीं है, पता है नं" अशी मूल्यवान टीप कम चेतावनीही दिली होती.

घनु Tue, 18/03/2014 - 13:05

विकांताला इराणी चित्रपट "अ सेपरेशन" पाहिला, उत्तम...! चिंजनी ह्या चित्रपटाबद्दल इथे छान लिहिले आहेच म्हणून फार काही लिहित नाही. पण जरुर बघावा असा :)

मेघना भुस्कुटे Wed, 19/03/2014 - 10:35

रुची आणि नायल्याच्या शिफारशीवरून 'ट्रू डिटेक्टिव्ह' पाहिली. आवडली. मॅथ्यूबुवा तर फारच आवडले. डिटेक्टिव्ह मालिका असूनही राखलेली संथ गती पाहून सुखद अचंबा वाटला. शिवाय मालिकेत येतो तो सगळा भूगोल. अहाहा. स्थळही पात्र होऊन जाते, अशा कमी गोष्टी सापडतात. त्यामानाने रहस्याची उकल अगदीच 'ही' वाटली. पण ते ठीक... रस्ट, मार्टी, मार्टीची बायको यांची चित्रे तब्बेतीत काढली आहेत एकदम. आवडेश!

सुशेगाद Thu, 20/03/2014 - 09:52

मी अलीकडे भरपूर काय काय पाहील
फक्त नाव सांगतो

Nunta de piatr by dan pita and Mircea Veroui (१९७२)
हा रोमानियन सिनेमा बघितला.एका मुलीच्या लग्नाभोवती स्टोरी आहे.पारंपरिक संगीताचा सुंदर उपयोग केलाय.हाँटिग. कंप्लीट रोमानियात गेल्यागत वाटतय.

Midnight in paris-woody allen हा पाचव्यांदा बघितला. Woody screenplay लिहण्यात बाप आहे.

Uncle Bonne who cam recall his past- apochitpong
स्पेलिंग लयच अवघड आहे डिरेक्टरच आणि मी भयानक आळशी आहे.
हा पण एक भारी पिच्चर आहे.
Imdb वर सर्च मारा.
नाना पाटेकरला घेउन याचा रिमेक करावा म्हणतोय. Lets c.

घनु Thu, 20/03/2014 - 13:32

ह्या विकांताला 'ब्लू जास्मीन' पाहिला.

शक्यतो जेव्हा एखादा सिनेमा त्या सिनेमातल्या नायक / नायिकेच्या नावावर असतो (उदा. अगदी आत्ताचा क्वीन किंवा मग बर्फी, इक्बाल इ.) तेव्हा सहसा तो/ती कसे भारी आहेत असं दाखवण्यात येतं. थोडक्यात सिनेमा संपल्यावर (जर तो सिनेमा खरंच चांगला असेल तर) कुठे न कुठे तरी ते कॅरेक्टर आपल्यावर छाप पाडतं आणि कुठेतरी आपणही त्याच्यासारखं असावं असं वाटतं, मग अगदी प्रेक्षागृहा बाहेर पडे पर्यंत का तसं वाटेना पण ते वाटतं. ब्लू जास्मीन मधे नेमकं तेच नाहीये आणि तेच त्याचं वेगळेपण असावं असं मला वाटतं (अर्थात असा हा एकमेव सिनेमा आहे हे माझं म्हणणं नक्कीच नाहीये). आपण कसं "नसावं" हे ते कॅरेक्टर सांगून जातं. पण म्हणून त्या पात्राला कुठे निगेटिव्ह शेड्स आहेत किंवा त्या पात्राचा राग्/संताप येतो असंही नाही.

थोड्क्यात मी पाहिलेली जास्मीन - केवळ उच्चभ्रू जीवनशैलीच्या हव्यासापोटी तिच्या आजूबाजूला चाललेल्या सगळ्या 'चुकीच्या' गोष्टींना नजरेआड करून हायप्रोफाईल आयुष्य जगणारी जास्मीन. जेव्हा तिला कळतं की ज्याच्यापासून आपल्याला हे सगळं ऐश्वर्य मिळतय तोच आता आपल्याला सोडून जातोय तेव्हा अस्वस्थ/कावरीबावरी होउन उतावळेपणाने आणि त्याच्यावर सुड घेण्याच्या नादात ती स्वतःवरच संकटं ओढावून घेते (तरीही त्यातून काही शिकून पुढे काही चांगलं वगैरे करते असं न दाखवून दिग्दर्शकाने त्या कॅरेक्टरचा सच्चेपणा जपला आहे आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे त्यासाठी त्याचं कौतूक). मग सगळं गमावल्यावरही त्याच थाटात राहाण्याची धडपड आणि पहिल्यासारखंच आयुष्य हवं म्हणून स्वतः काहीतरी करुन दाखवायचा 'केविलवाणा' प्रयत्न करते. पण 'हे सगळं फार अवघड आहे आणि आपल्याच्याने नाही होणार ब्वा हे' असं अ‍ॅटीट्यूड बाळगून कष्ट करायची तयारीच दाखवत नाही. आणि पुन्हा एखाद्या बड्या 'हस्थी' मार्फत - सोप्या मार्गाने ते सगळं मिळवण्याचा पर्याय शोधते(निवडते). तर थोडक्यात ह्या सगळ्याच गुंत्यात अडकलेली अशी ही 'ब्लू' जास्मीन. संपुर्ण सिनेमा मधे जस्मीन अस्वस्थ पण ते लपवण्याचा प्रयत्न करत असते असं दाखवलं आहे; कारण कदाचित तिलाही कळत असतं तिचं आधीचं आयुष्य, तिने घेतलेले निर्णय, आणि पुन्हा ते आयुष्य मिळवण्याचे मार्ग हे सगळंच अयोग्य होतं पण आता त्या जीवनशैलीचं तिला एवढं व्यसन लागलं आहे की ती स्वतः पुढेच हतबल आहे.

मी म्हणेन हा सिनेमा केवळ केट ब्लँचेटचाच आहे (त्यामुळे बाकी पात्रांबद्दल विशेष लिहित नाही) . केट ब्लँचेटने ती अस्वस्थ, कमी कष्टात श्रीमंती जपून ठेवण्याचा प्रयत्न (?) /धडपड करणारी जास्मीन उत्तम वठवली आहे हे.वे.सां.न.ला. एकदा जरूर पहावा असा सिनेमा.

अजो१२३ Thu, 20/03/2014 - 15:30

In reply to by घनु

ब्लू जास्मिनमधला केटचा सायकिक वर्तनाचा भाग अभिनय म्हणून आवडला. खासकरून ती कोणाच्याही शेजारी जाऊन बसते आणि एकटीच बोलायला चालू करते. बाकी चित्रपट सातत्यशीलाने विभक्तीकृत कुटुंबाचा (continuously disintegrating families चा) उत्तम दाखला आहे. पाहण्यासारखं विशेष मला काही वाटलं नाही.

घनु Thu, 20/03/2014 - 18:38

In reply to by अजो१२३

पाहण्यासारखं विशेष मला काही वाटलं नाही. >>>
तसं विशेष काही नसल्यानेच मी "एकदा जरुर पहावा" असं म्हणालो. आणि अर्थात केट ब्लँचेट च्या अभिनयासाठी तो एकदा पहावा असंही मला म्हणायचं होतं. मला ह्या सिनेमाबद्दल काहीच माहिती नव्हती पण केट ला ऑस्कर मिळाल्यामुळे म्हंटलं ' एवढं काय आहे ब्वा, जरा बघावं' म्हणून पाहिला. आता तिचा अभिनय ऑस्कर मिळण्याइतका भारी होता का हे कळण्याइतकं मला काही कळत नाही पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून नक्कीच उत्तम अभिनय केलेला आहे हे माझं वैयक्तिक मत.

Nile Thu, 20/03/2014 - 22:03

In reply to by घनु

कमी कष्टात श्रीमंती जपून ठेवण्याचा प्रयत्न (?) /धडपड करणारी जास्मीन उत्तम वठवली आहे हे.वे.सां.न.ला. एकदा जरूर पहावा असा सिनेमा.

मला तसे वाटले नाही. नशिबाने ती एकदम श्रीमंत होते आणि ऐश्वर्य भोगायला मिळते. (त्या आयुष्यातील खोटेपणाची एक झलक थोडक्यात चित्रपटात दिसते) पुढे ती अचानक रस्त्यावर येते, पण तोवर उशीर झालेला आहे. ती त्या आयुष्यात अडकलेली आहे. त्यामुले स्वतःवर ओढवलल्या परिस्थितीतही ती जुन्या केटमध्येच अडकलेली दाखवलेली आहे. आपण अजूनही 'संस्काराने' रस्त्यावर आलेलो नाही हे दाखवण्याचा प्रयत्न ती करत राहते. हळूहळू वस्तुस्थितीची जाणीव तिला होऊ लागते, अशातच जेव्हा तिला पुन्हा एका श्रीमंताची बायको होण्याची संधी मिळते तेव्हा ती खोटं बोलून ती मिळवायचा प्रयत्न करते कारण तिला आता यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाहीए.

इतर पात्रंही बिलकूल दुर्लक्षणे बरोबर होणार नाही. तिची बहिण (या दोघींना त्यांच्या पालकांनी दत्तक घेतलेले आहे. या दोघींमधील काँट्रास्ट काय सुरेख साधलाय. यामुळे जास्मीनचे पात्र उठून दिसते) तिच्या साध्या आयुष्यात सुखी आहे, पण जास्मीनमुळे ती जवळजवळ भरकटतेच. शिवाय तिचा जुना नवरा, ज्याचे कॅरॅक्टर गरीब असूनही तत्त्वाने, समजुतीने जगणारा (तिच्या बहिणीच्या छोट्याश्या अंगकाठी साठी बलदंड असा मुद्दाम घेतला असावा) या लोकांकडून फसवला जातो. त्याच्या तोंडी असलेले मोजकेच पण प्रभावी संवाद नोंद घेण्यासारखे आहेत असे मला वाटते.

घनु Fri, 21/03/2014 - 09:47

In reply to by Nile

नाही मला तसे म्हणायचे नव्हते. कमी कष्टात श्रीमंती जपून ठेवणे म्हणजे जेव्हा ती रस्त्यावर येते तेव्हाची तिची धडपड, तेच आयुष्य पुन्हा मिळवण्यासाठी किंवा जे आधी होतं तसंच आयुष्य पुढेही टिकवून ठेवण्यासाठी. माझ्या मते 'जपून ठेवणे' ऐवजी मी ' पुन्हा मिळवण्यासाठी' असे म्हणायला हवे होते ते जास्त योग्य झाले असते.

आणि हो मी सहमत आहे, बाकी पात्रांबद्दल मी फार लिहिले नाही पण मला त्याचं फार महत्त्व नाही असे म्हणायचे नव्हते. पण धन्यवाद तुम्ही इतर पात्रांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण ओळख करुन दिल्याबद्दल, माझ्याकडून एक 'माहितीपूर्ण' :)

ऐसि पाहुणा Sat, 22/03/2014 - 20:29

अलेक्झांडर पेनचा 'नेब्रास्का' पाहीला. आवडला. त्याचेच साइडवेज, अबाउट श्मिड्ट हे आवडलेले असल्याने या सिनेमाविषयी उत्सुकता होती. नेब्रास्का, मॉन्टाना अशा सौंदर्यपिडीत मानल्या जाणार्‍या भुभागावर ही म्हटले तर प्रवासकथा उलगडत जाते. स्वप्नवत काळे-पांढरे चित्रीकरण, कुर्कूरीत संवाद, समर्थ अभिनय, साधी नात्यांबद्दलची कथा हे सगळे एकत्रपणे एखाद्या अटूरिस्टी प्रवासासारखा सुरेख अनुभव देऊन जातात.

मिलिंद Sun, 23/03/2014 - 19:34

"द परवर्ट्स गाइड टू सिनेमा"

शीर्षकावरून गैसमजही करून घेऊ नये, व भलत्याच अपेक्षांनी ह्या सोफी फियेन्न दिग्दर्शित माहितीपटाकडे धावही घेऊ नये. स्लॅवॉज झिझेक (उच्चाराविषयी साशंक) हे स्लोवेनियन तत्त्ववेत्ते व मनोविश्लेषक ह्याचे लेखक व निवेदक आहेत.

"The problem for us is not, are our desires satisfied or not? The problem is, how do we know what we desire?
There is nothing spontaneous, nothing natural, about human desires. Our desires are artificial. We have to be taught to desire. Cinema is the ultimate pervert art. It doesn't give you what you desire, it tells you how to desire."

अशी सुरुवात करून झिझेक अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध चित्रपटांतील दृश्यांकडे, व पर्यायाने चित्रपटांकडे वेगळ्या फ्रॉइडियन दृष्टिकोणातून बघत त्यांची रोचक मनोविश्लेषणात्मक समीक्षा करतात. मात्र सादरीकरण काहीसे नर्मविनोदी अंगाने केलेले असल्यामुळे हा माहितीपट रुक्ष न होता आपल्याला गुंतवून ठेवतो. चित्रपटांकडे बघण्याची वेगळी नजर देतो. तीन भागात असलेल्या ह्या अडीच तासाच्या माहितीपटाची डिवीडी पाश्चात्त्य देशांत उपलब्ध असली तरी भारतात बहुधा टॉरेन्टवाचून गत्यंतर नसावे.

अमुक Sun, 23/03/2014 - 20:07

In reply to by मिलिंद

तीन भागात असलेल्या ह्या अडीच तासाच्या माहितीपटाची डिवीडी पाश्चात्त्य देशांत उपलब्ध असली तरी भारतात बहुधा टॉरेन्टवाचून गत्यंतर नसावे.
.....'यू ट्यूब'वर इथे फुकटात उपलब्ध आहे.

चिंतातुर जंतू Mon, 24/03/2014 - 11:42

In reply to by मिलिंद

किरण नगरकरांचं 'सात सक्कं त्रेचाळीस' किंवा अशोक शहाण्यांचं डांबरट लिखाण ज्यांना आवडतं अशांना झिझेकसुद्धा आवडतो असं माझं निरीक्षण आहे. ज्यांनी झिझेक पाहिल्याचा / वाचल्याचा आणि तो आवडल्याचा प्रतिसाद इथे दिला आहे त्यांच्याबाबतीत हे निरीक्षण कितपत ग्राह्य आहे हे समजून घ्यायला आवडेल.

अजो१२३ Mon, 24/03/2014 - 12:03

In reply to by चिंतातुर जंतू

http://timesofindia.indiatimes.com/home/opinion/edit-page/Save-Hinduism… इथे नगरकरांचा लेख आजच टाइम्स मधे आला आहे.

आपल्या ललितांमधे लेखकांच्या राजकीय, इ मतांचा प्रभाव पडत असावा का? त्यांच्या कादंबरीत कोण्या पात्राने मोदींची सभा अटेंड केली असे नमूदायचे असेल तर
१. तिने मोदींच्या प्रचंड सभेत उत्स्फूर्त सहभाग घेतला नि वाक्यावाक्यावर टाळ्या वाजवल्या.
नि
२. अंध कळपातल्या मेंढराप्रमाणे ती मोदीच्या मतांवर हा मधे हा भरत होती.

पैकी दुसरे विधान लिहिण्याची शक्यता जास्त आहे का?

मिलिंद Mon, 24/03/2014 - 16:23

In reply to by चिंतातुर जंतू

सात सक्कं त्रेचाळीस, व शहाण्यांचे लिखाण, दोन्ही वाचलेले नाही. ह्यामुळे आपल्या निरीक्षणसिद्ध निष्कर्षांना धक्का पोहोचत असल्यास क्षमस्व. :)

कान्होजी पार्थसारथी Wed, 26/03/2014 - 22:51

In reply to by चिंतातुर जंतू

किरण नगरकरांचं 'सात सक्कं त्रेचाळीस' वाचलेलं नाही.
अशोक शहाण्यांचं डांबरट लिखाण जे सहजी उपलब्ध झालं तेही फारसं फारसं भावलं नाही.
त्यामुळं मा़झ्यापुरता तरी हा निष्कर्ष काढण्यासाठी/तपासण्यासाठी 'किरण नगरकर' वाचेपर्यंत मला वाट पाहावी लागेल.
(अवांतरः झिझेक आवडण्याचं कारण इंटेलेक्चुअल कमी आणि वैयक्तिक जास्त आहे.)

ऐसि पाहुणा Fri, 28/03/2014 - 04:43

In reply to by चिंतातुर जंतू

नगरकर किंवा शहाणे यांच्याबद्दल ऐकून आहे. वाचन शून्य. माझ्या मते झिझेक यांना युट्युबमुळे प्रसिद्धी मिळाली असावी. तीच तीच पण वेधक उदाहरणे देऊन त्यांच्या खास देहबोलीने ते प्रेक्षकांचे चांगलेच रंजन करतात. आंतरजालामुळे लोकांना एखाद्या विचारसरणीची ओळख होण्यासाठी एकच एक चढण चढावी लागत नाही. झिझेक आणि चॉम्स्की एकाचवेळी वाद घालतांना पाहता येतात. थोडक्यात वर्गीकरणासाठी नवी परिमाणं शोधणं गरजेचं आहे.

Nile Fri, 28/03/2014 - 07:28

In reply to by चिंतातुर जंतू

किरण नगरकरांचं 'सात सक्कं त्रेचाळीस' किंवा अशोक शहाण्यांचं डांबरट लिखाण ज्यांना आवडतं अशांना झिझेकसुद्धा आवडतो असं माझं निरीक्षण आहे. ज्यांनी झिझेक पाहिल्याचा / वाचल्याचा आणि तो आवडल्याचा प्रतिसाद इथे दिला आहे त्यांच्याबाबतीत हे निरीक्षण कितपत ग्राह्य आहे हे समजून घ्यायला आवडेल.

एकूण प्रतिसाद पाहता, मराठी संस्थळावर येणारी मंडळी फारसं मराठी वाचन करत नाहीत असं माझं निरीक्षण आहे. इथे ज्यांनी प्रतिसाद दिला आहे त्यांच्याबाबतीत हे निरीक्षण कितपत ग्राह्य आहे हे समजून घ्यायला आवडेल! ;-)

'न'वी बाजू Fri, 28/03/2014 - 23:17

In reply to by Nile

मराठी वाचन तूर्तास शून्य आहे.

उलटपक्षी, 'झिझेक' हे नावही तूर्तास प्रथमच ऐकले.

कान्होजी पार्थसारथी Sun, 23/03/2014 - 20:04

अरे व्वा!
मी दोन्ही झिझेकिअन माहितीपटांविषयी इथेच टाकणार होतो! योगायोग!
मला वाटतं, गाईड टु सिनेमा हा यु ट्यूबवर बघता येईल.
त्याचा परवा आलेला,द परवर्ट्स गाईड टु आयडियालॉजी देखील आवर्जून पहावा असा आहे. आपण तर झिझेकिअन निवेदनशैलीचे फ्यान आहोत!!
हेगेल,फ्रॉइड, हिचकॉक, लिन्च, मार्क्सवाद-भांडवलशाही-जागतिकीकरण, पर्यावरणवाद अशा विषयांना मनोविश्लेषणाची डूब देणारा झिझेक काही वेळेस जार्गन वाटु शकतो, पण, सादरीकरण, देहबोली यामुळे माझा डोळा हलत नाही!

ऐसि पाहुणा Sun, 23/03/2014 - 21:22

In reply to by कान्होजी पार्थसारथी

झिझेकच्या मजेदार निरीक्षणांतून वेगळ्या अंगाने गोष्टींकडे बघून पहावे अशी प्रेरणा मिळते. एका विशिष्ट लकबीने बोललेले इंग्रजी ऐकायला मजा वाटते पण सतत नाकावरचे काहीतरी स्वच्छ केल्यासारखे नाकावरून बोटांनी सारवतांना पाहणे भारीच कंटाळवाणे वाटते. तो बोलतांना दिसणार्‍या देहबोलीचेही कुणीतरी मनोविश्लेषण करून टाकले तर मजा येईल.

कान्होजी पार्थसारथी Sun, 23/03/2014 - 21:49

In reply to by ऐसि पाहुणा

अगदी अगदी!
तो बोलतांना दिसणार्‍या देहबोलीचेही कुणीतरी मनोविश्लेषण करीलच! (त्याची विचार-प्रक्रियाच अधीर असावी!) त्याच्या इंग्रजीचे मला मात्र कौतुक आहे! झिझेक पुस्तकांत खतरनाक आहे. यु ट्यूब वर त्याच्या बहुतांश लेक्चर्स मध्ये त्याचे यु. एस. पी असलेले जोक्स, काही टिपण्ण्या यांचा मलाही कंटाळा येतो. पण एकंदर प्रकरण धमाल आहे!
त्याला केरळच्या एका संस्थेने भारतात आंमंत्रित केले होते. तेव्हा त्याची शुद्धव्रत सेनगुप्ता यांनी घेतलेली मुलाखत आवडली होती.

सानिया Wed, 26/03/2014 - 20:02

गेल्या आठवड्यात एका नृत्यमहोत्सवाला जाता आले. कुचिपुडी शैलीत सादर केलेले रोमियो-ज्युलियेट हे नृत्य-नाट्य बघण्याचा योग आला. ज्युलियेट मनात भरली. ती अलंकार जोशी यांची कन्या आहे ही माहिती नंतर मिळाली. रोमियोही उत्तम नाचत होता पण भावदर्शनात ज्युलियेटच्या मानाने किंचीत तोकडा पडत होता. ती त्याच्याकडे प्रेमभराने बघत असताना तो आपल्याच नाचात मश्गुल असे. एका तासाच्या कमी वेळात हे नृत्यनाट्य बसवण्याची कसरत बर्‍यापैकी साधली होती. धर्मगुरुच्या हालचालींमधला ठेहेराव, ज्युलियेटच्या आईचा कावेबाज स्वभाव रोमियो-ज्युलियेट यांची पहिली भेट हे छान चितारलं होतं. निवेदनही करतानाही कुचिपुडीशैलीचा आधार घेऊन केलं होतं. विशेषतः रोमियो आणि ज्युलियेट एकत्र नाचताना पदन्यास कुचिपुडी नृत्यशैलीत ठेऊन हात मात्र वॉल्ट्झ सारखे गुंफले होते, हे मिश्रण छान जमुन आलं होतं. काही रसभंग करणार्‍या गोष्टी म्हणजे ध्वनीयोजनेतले दोष आणि निवेदीकेच्या भुमिकेतल्या मुलीचे केसांना(कपाळावरच्या झिपर्‍यांना) बोलताना झटके देण.

याच नृत्यमहोत्सवात, कथक-भरतनाट्यम-फ्लेमेंको जुगलबंदी आणि मुघलकालीन कथकची झलक पाहायची संधी मिळाली. यात पर्शियन नृत्यप्रकाराचाही अंतर्भाव करण्यात आला होता. इथे त्या नृत्यशैलीची एक झलक देत आहे. http://www.youtube.com/watch?v=KU0YtrZBN5w