Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३१ : काँट्रास्ट

काही वेळा फोटोंमध्ये जेव्हा सार्‍या रंगसंगती एकमेकांना पुरक असतात आणि मध्ये एखादा अगदी वेगळा रंग त्यात उठुन दिसतो त्यावेळी त्या रंगाचं आणि तो रंग असलेल्या वस्तुचं अस्तीत्व ठळक उठुन दिसतं. तेव्हा यावेळचा विषय आहे "काँट्रास्ट". मी काढलेला एक फोटो उदाहरणादाखल दिला आहे.

------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २ एप्रिल रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------

अमुक Sun, 16/03/2014 - 18:55

स्पर्धेचा शेवट १२ फेब्रुवारी ....१३ फेब्रुवारी रोजी निकाल
.........कृपया योग्य ती दुरुस्ती करावी.

विषय आवडला आहे.

बोका Sun, 16/03/2014 - 22:19

हे पोष्टखाते रसिक दिसते! वेलींनी मढवलेल्या भिंतीत पोष्टाची पेटी बसवलीय.
कॅनन 1000डी, भिंग टॅमरॉन 17 50
एफ ८, १/२०० से.

बोका Sun, 16/03/2014 - 22:23

हे लाल रंगाचे बाक अधिक खुलवण्यासाठी लाल सोडून इतर भाग रंगहीन केला (डार्कटेबल प्रणाली वापरून). तसेच अनावश्यक भाग कातरला.
कॅनन 1000डी, भिंग टॅमरॉन 17 50
एफ ८, १/६०० से.

कान्होजी पार्थसारथी Tue, 25/03/2014 - 20:15

रंगांबरोबरच त्यातल्या वस्तु देखील, त्यांची मांडणी देखील एकमेकांना कॉन्ट्रास्ट दिसताहेत का?
आजच बहिरेश्वर(कोल्हापूर)ला एका कामानिमित्त गेलो, येताना ह्या इमेजेस घेतल्या. कॅमेर्‍याच्या जवळपास सगळ्या सेटिंग्ज ऑटो मोडवर आहेत. तिन्ही चित्रे स्पर्धेसाठी घेऊ शकता. शिवाय तिन्ही चित्रे प्रताधिकारमुक्त आहेत तेव्हा हवी तशी वापरण्यास काडीचीही हरकत नाही.
थोडाशी मा़झी मखलाशी:

१) ही काही मुद्दामहून स्पर्धेसाठी काढलेली इमेज नव्हे. मला प्रामुख्याने भावली होती ती त्या झाडाच्या फांद्यांची गुंतवळ. (randomness कसा मोहक असू शकतो याचं चपखल उदाहरण म्हणूत फारतर!) त्या अत्यंत विस्कळीत पण सुंदर गुंतवळीला कॉन्ट्रास्ट असणारा, खेचलेल्या समांतर रेषांनी थेट छेदणारा विजेच्या तारांचा संच. त्याही सुबक आणि अतिव्यवस्थित नाहीत, पण त्या झाडाला तो सरळ पोल सुंदर कॉन्ट्रास्ट दाखवतो.(असे मा़झे मत आहे, हुश्श!) ते मंदीर काही अपरिहार्य भौगोलिक कारणांनी आले आहे. आता आलेच आहे तर त्याचा रंगीत कॉन्ट्रास्ट पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ती पिवळी लाईन मी नंतर काढुन एकप्रकारे हळद-कुंकु आगाऊपणा केलेला आहे हे मला आता जाणवत आहे. असो!

Camera: LG Lte2 Mobile
ISO: 100
Exposure: 1/2500 sec
Aperture: 2.4
Focal Length: 4.6mm
Flash Used: No
Tools: Android Pixlr Editor, GIMP

२) गावच्या रस्त्यावर एका बाजुला बैलगाडी, काही बैल आणि एका बाजुला ट्रॅक्टरची ट्रॉली दिसली. तेव्हा परतीच्या प्रवासात या दृष्याची इमेज आपण स्पर्धेसाठी घ्यावी हा विचार मनात आला. पण येताना बैल गायब होते, आणि त्या एकाकी रस्त्यावर (आणी दोन्ही बाजुंना) त्या दोन परस्परांना एका परीने कॉन्ट्रास्ट असलेल्या (एक सजीवाकडुन ओढले जाते, एक निर्जीवाकडुन, ..चेतन-अचेतन..हाय)परंतु एकाच वापराच्या गोष्टी अधिक परिणामकारक वाटल्या. शिवाय त्या नव्या ट्रॉलीचा रंग! असो.

Camera: LG Lte2 Mobile
ISO: 100
Exposure: 1/1111 sec
Aperture: 2.4
Focal Length: 4.6mm
Flash Used: No
Tools: Android Pixlr Editor, GIMP

३) मळ्यातल्या घरात चहा पीत बसलो होतो त्या समोर्‍च्या मातीच्या भिंतीवरल्या खुटीला लाल(!) मोबाईल अडकवलेला दिसला आणि लगेच माझ्यातला स्पर्धक जागा झाला! मी पटकन एक दोन फोटो घेतले आणि अजुन काही इंट्रेस्टिंग सापडते का ते पाहायला गेलो तर त्या भिंतीच्या समोरच्या भिंतीमधल्या तश्याच दिवळीत एक काळी-पांढरी(स्पष्ट विभागलेली, ग्रे नव्हे)(कॉन्ट्रास्ट!!) कोंबडी अंड्याला बसलेली दिसली. तिला उचलुन या फोटोमधल्या दिवळीत ठेवायला गेलो तर तिला तिची फेव्रीट जागा सोडवेना. त्यामुळे, त्या पडक्या धाब्याच्या घराला क्लिशेड कॉन्ट्रास्टमध्ये जाणार्‍या मोबाईलवरच समाधान मानुन वाटेला लागलो!

Camera: LG Lte2 Mobile
ISO: 1500
Exposure: 1/17 sec
Aperture: 2.4
Focal Length: 4.6mm
Flash Used: No
Tools: Android Pixlr Editor

मी Tue, 25/03/2014 - 21:07

Model --- NIKON D50
ISO --- 800
Exposure--- 1/160 sec
Aperture --- 5.6
Focal Length -- 200mm

वाचक Wed, 26/03/2014 - 23:34

ran_ful

Sony NEX-5N with Canon FD85mm F1.8 Lens
f/2.8, 85mm, 1/3200, ISO:1600


Kiron 28-200 wide open
Sony NEX-5N with Kiron 28-200 F3.5 Lens
f/5.6, 100mm, 1/640, ISO:100


snow chairs
Olympus E-PL1, mostly Minolta 24mm F2.8
F/5.6, 24mm, 1/320, ISO:200

कान्होजी पार्थसारथी Wed, 26/03/2014 - 23:35

स्पर्धेसाठी अशी इमेज देता येते का?

वाचक Tue, 01/04/2014 - 19:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बॉस्टनला जॉन हॅन्कॉक इमारतीत पडलेले समोरच्या ट्रिनिटी चर्चे प्रतिबिम्ब आहे का हे?

उपाशी बोका Tue, 01/04/2014 - 19:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, फोटो खूप छान काढला आहे. बघितल्या-बघितल्या एकदम आवडला. केवळ रंगाचाच काँट्रास्ट नाही, तर गुळगुळीत काचांवर खडबडीत दगडांचे प्रतिबिंब हा काँट्रास्टपण एकदम खुलून दिसतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/04/2014 - 19:08

In reply to by उपाशी बोका

बॉस्टनचा हा भाग, हा ब्लॉक छायाचित्र काढण्यासाठी पर्वणी आहे. ट्रिनीटी चर्च (वाचक, नाव सांगितल्याबद्दल आभार, मी विसरले होते.) आणि बॉस्टन ग्रंथालय यांच्या मधे मोकळी जागा आहे तिथे फार्मर्स मार्केट भरतं. (कधी असतं ते स्थानिक लोक सांगू शकतील. मी गेले होते तेव्हा होतं.) फार्मर्स मार्केट आणि हे चर्च मिळून फार वेगवेगळे फोटो काढता येतील.

उपाशी बोका Tue, 01/04/2014 - 19:08

In reply to by अमुक

रंगसंगती छान दिसत आहे. व्हाईट बॅलन्स, एक्स्पोजर आणि शार्पनेस अचूक आले आहेत. टिपीकल लँडस्केप किंवा पोट्रेट मोडमध्ये फोटो देण्याऐवजी, चौरस आकारात फोटो दाखवण्याची कल्पना आवडली.

अतुल ठाकुर Wed, 02/04/2014 - 08:33

सर्व फोटो सुरेख आहेत हे प्रथमच मान्य करुन असे म्हणावेसे वाटते की निर्णय करणे कठीण होते. बोका यांचे दोन्ही फोटो उत्तम. खासकरुन पोष्टाच्या पेटीचा तर अगदी नैसर्गिक. अमुक यांचे खोडावरले अंकुर हेही चित्र खुप आवडले. शीत उष्ण कृष्ण ही रंगसंगती सुरेख.

मात्र माझी सर्वाधीक पसंती वाचक यांच्या "विरोधाभास" मधील पहिल्या चित्राला आहे. हिरवट, निळसर आणि वरच्या बाजुला ब्लर होत गेलेल्या गवताच्या पार्श्वभुमिवर ठळकपणे उठुन दिसणारे पिवळ्या रंगाचे फुल.

वाचक यांचे अभिनंदक करुन, स्पर्धेचा पुढील विषय त्यांनी सुचवावा अशी मी त्यांना विनंती करतो.