Skip to main content

सध्या मासिक खर्च किती आहे?

शंकाः त्रिकोणी मध्यमवर्गीय कुटुंबाला भारतात महिन्याला सध्या किती खर्च येतो?

संपादकः या प्रतिसादापासुन मुळ धाग्यावर अवांतर परंतु रोचक चर्चेचे स्वतंत्र धाग्यात रुपांतर करत आहोत. इच्छा असल्यास स्वयंसंपादनकरून धागाकर्ता विषय अधिक तपशीलात मांडू शकेल.

ॲमी Sun, 22/06/2014 - 07:00

In reply to by मेघना भुस्कुटे

बाईचा खर्च नाय पकडला? परत वर्षातून एकदा द्यावा लागणारा प्रॉपर्टी ट्याक्स?

स्वैपाकाला इंधन = ५०० एवढं नाय लागत. एक सिलेंडर एका माणसाला कमीतकमी ४ ६ महीने जाईल.

मेंटेनन्स + टॅक्स = १५०० आमच्याकडे सोसायटी मेटेंनन्स २५०० आहे.

तरी एकुण १५ ते १७मधे आरामात राहू शकतो असे वाटतेय.

ॲमी Sun, 22/06/2014 - 09:31

In reply to by नितिन थत्ते

माझ्या मते किती जागा लागते यापेक्षा किती जागा अफोर्ड करू शकतो हा प्रश्न असतो. मुळात त्याचे घर ऑलरेडी आहे, ते किती रूमचे आहे हे मेग्नाने सांगितल नाहीय. मीतर फुकटचा सल्लापण देऊन टाकलाय की जुने असेलतर सरळ विकून भाड्याने फुल्ली फर्निश्ड घरात रहायला जावे.

ॲमी Fri, 20/06/2014 - 13:47

In reply to by मेघना भुस्कुटे

वय काय आहे मित्राच? ३०ते४० वय, मुंबईत ऑल सेट घर आणि २० २५लाखांच सेव्हींग असेल तर माझ्यामते रिटायरदेखील होऊ शकतो. चूक असेल तर सांगा बॉ. पटकन कबूल करेन :-)

सविता इंफीचे सिनीअर म्यानेजर मंजे १५ ते २० वर्ष अनुभववाले? ५० नसेल ग पगार. ३० ते ३५ असेल. डिरेक्टरचा असेल ५०पर्यंत.

अनुप ढेरे Fri, 20/06/2014 - 14:10

In reply to by ॲमी

२०-२५ लाख कमी आहेत अस वाटतय. २५ लाखावर वार्षिक १०% रिटर्न्स धरले तरी वर्षाला २.५ लाख म्हणजे जेम्तेम २० हजार महिना. हेही आजच्या दिवशी. आजचा खर्च महिना १५००० पकडा. खर्चामधली वाढ दरवर्षी १०% (इंन्फ्लेश्न). उर्वरीत आयुष्य किमान ३० वर्ष. ८०व्या वर्षी आजचा १५००० खर्च तेव्हाचा ६ लाख होणार. बचत महिन्याला १००००. त्यावर वार्षिक परतावा ८% (सगळ्यात सुरक्षित). कधीतरी हे क्रॉस होणार.

ॲमी Fri, 20/06/2014 - 14:51

In reply to by अनुप ढेरे

१० १५वर्षांनी घर विकून टाकायचे किंवा लोन अगेन्स प्रॉपर्टी घ्यायचे असा विचार केलेला. ते घर काय वर घेऊन जायच आहे की उगाच वारसाविरसा करत बसायच आहे. आपणच कमवायचे आणि आपणच उडवायचे.

अतिशहाणा Fri, 20/06/2014 - 16:15

In reply to by अनुप ढेरे

२५ लाखात दुसरे काहीच उत्पन्न नसताना रिटायर म्हणजे म्हातारपणी भिकेला लागणे आहे. साध्या गणितानुसार किमान वार्षिक खर्चाच्या ३० पट पैसे हवेत. व त्यावर महागाई दरापेक्षा किमान एक टक्का जास्त परतावा कर जाऊन मिळत राहायला हवा. (२५००० मासिक च्या हिशोबाने ३ लाख * ३० = ९० लाख. सध्याचा महागाई दर ९ टक्के पकडला तर निदान १० टक्के परतावा कर देऊन मिळणारी एकही 'सेफ' योजना उपलब्ध नाही)

अधिक गुंतागुंतीचे कॅल्क्युलेटर इथे पाहा. अगदी ८० लाख सेविंग असले तरी भूतकाळातील वेगवेगळ्या टाईमलाईन्समध्ये ३० वर्षात ९८ टक्केच वेळा लोक यशस्वी झाले आहेत २ टक्के वेळा भिकेला लागले आहेत. यू नेवर नो आताची वेळ काय आहे. (खालील आलेखात दोन लाल रेषा क्ष अक्षाखाली गेल्या आहेत.) ९० लाख बरेच सेफ आहेत.

अतिशहाणा Fri, 20/06/2014 - 16:40

In reply to by बॅटमॅन

शिवाय तरलता नसल्याने घराचा विचार करणे फारच अवघड आहे. उद्या पैसे कमी पडले म्हणून एक खिडकी विकली किंवा दरवाजा विकला असे करता येणार नाही.

रिवर्स मॉर्गेज करता येईल. मात्र त्याबाबत मला फारशी माहिती नाही.

मन Fri, 20/06/2014 - 16:44

In reply to by बॅटमॅन

लोकांना स्वतःच्या एरियातील किमती वाढताना ऐकून आनंद होतो. त्यांना हेच सांगू इच्छितो :-
अरे बाबा , एरियाची किंमत कितीही वाढली तरी तुझ्या घराचा एरिया वाढणार नाही. त्यामुळे प्रत्यक्षात विकत नाहिस तोवर तुला मानसिक समाधानापलिकडे नक्की काय मिळते आहे ? पैशाच्या ढिगार्‍यावर बसल्याचं समाधान ?
त्याहून मोठी गंमत म्हणजे तुझे घर घेउन दशकभर उलटून गेले आहे. सध्या भारी रक्कम मोजणारी मंडळी तुझ्या शेजारच्या बिल्डिंगमधील नवा फ्लॅट चढ्या किमतीने घेत आहेत. तुझे दशकभर जुने घर त्याच किमतीने विकले जाइल असे नाही.
प्रत्यक्ष मार्केटात उतरलास तर पाहू.
उदा :-
ह्याने फ्लॅट पाच लाखाला दहा वर्षापूर्वी घेतला. आता तिथे त्याच आकाराचा फ्लॅट ४० लाखाला जातोय असे त्याला दिसते.
पण ४० लाखला जाणारा फ्लॅट नवा असतो. जुन्या फ्लॅटची किंमत तितकी कशी असेल ?

अनुप ढेरे Fri, 20/06/2014 - 16:59

In reply to by ॲमी

माझ्या माहितीप्रमाणे रिअल इस्टेट विकल्यावर वर्षभराच्याआत दुसर्‍या रिअल इस्टेटमध्ये ते पैसे न घातल्यास पूर्ण टॅक्स पडतो.

अजो१२३ Fri, 20/06/2014 - 18:38

In reply to by ॲमी

Capital gains tax on real estate in long-term is 20% (+ EC and ES) and not 30% post adjustment for inflation indexation.

This cusumer inflation index does not reflect any kind of price rise in any consumption basket. It is rather a fraction of a real inflation rate for (consumption basket of) a certain kind of labor meaning that such application of such index is absolutely absurd.

मन Fri, 20/06/2014 - 17:00

In reply to by अनुप ढेरे

फ्लॅट पझेशन नंतर तीन वर्षांनी विकला व मिळालेला नफा(पूर्ण उलाढाल नह्वे, फक्त नफा) पुन्हा स्थावर मालमत्तेत (रियल इस्टेट मधी) गुंतवला तर काहीही ट्याक्स लागत नाही. शिवाय नफा कागदावर दिसतो त्यापेक्षा कमी मिळाला असं कायदेशीर रित्या दाखवता येतं.
इन्फ्लेशन अ‍ॅडज्स्टिंग असं कायतरी म्हणतात त्याला. इंडेक्सिंग का काहीतरी असतं. त्याने नफा अजूनच कमी दिसतो.

तीन वर्षाच्या आत विकलात तर मात्र ट्याक्स द्यावा लागतो.
कित्येक लोक फ्लॅट विकून टाकतात बिंदास एखाद दोन वर्षात, स्वतःहून ट्याक्स भरायला जात नाहित.
ट्याक्स डिपार्टमेंटही त्यांना धरायला आलेले आजवर पाहिले नाही.

बेकाय्देशीर उपाय :-
शिवाय काही मंडळी वरकड रक्कम रोख घेतात किंवा सोने वगैरे मधून घेतात.
दहा लाखा ऐवजी तीन लाखच फायदा झाल्याचे दाखिवतात.

अनुप ढेरे Fri, 20/06/2014 - 17:03

In reply to by मन

चोरगिरी करण अध्यारूत नव्हतं धरल. चोर रिटायर्मेंट प्लॅनिंग गुंतवणूकी थ्रू नसतील प्लॅन करत. डायरेक मोठा हात वगैरे...

ॲमी Fri, 20/06/2014 - 18:12

In reply to by अनुप ढेरे

चोरगिरी करायची गरज नाही. फ्ल्याटची किंमत इंडेक्ससेशेनने काढून, त्यापेक्षा जास्त नफा झाला असेल तर फक्त त्या नफ्यावर ट्याक्स पडतो. फक्त तो नफा रिअल इस्टेटमधे किंवा कुठल्यातरी पर्टीक्युलर बाँड मधे ३वर्ष गुंतवलातर चालते. बाँड्सची तीन वर्षे झाल्यावरमात्र बहुतेक ट्याक्स पडतो नक्की माहीत नाही. उदा तू २०१०मधे २५ला घर घेतल २०१४मधे ५०ला विकल इंडेक्सनुसार त्याची किंमत ४० येतेय तर फक्त १०लाखवर ट्याक्स बसतो.

अतिशहाणा Fri, 20/06/2014 - 18:28

In reply to by मन

भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनचा फायदा घेतल्यानंतर लागू होणारा कराचा दर (२० टक्के) व इंडेक्सेशनचा फायदा न घेता लागू होणारा कराचा दर (१० टक्के) यात फरक आहे. त्यामुळे अगदी सरसकट फायदाच होतो असे नाही.

(भांडवली नफा हा संपूर्णपणे उत्पन्नात धरला जात नाही. त्यामुळे ३० टक्क्याची ट्रीटमेंट नाही.)

ॲमी Fri, 20/06/2014 - 16:54

In reply to by ॲमी

www.aisiakshare.com/node/2962#comment-63148 हा प्रतिसाद दिलेला आहे मी वर. त्याचे घर किती जुने आहे माहीत नाही पण साधारण १५ २० वर्षापेक्षा जास्त जुनी घरं, इमारती फारच जुनाट होतात. तसेच तो मित्र देखील तोपर्यंत ५०+ वयाचा झाला असणार. घर विकून आपापल्या वयाच्या, मानसिकतेच्या इतर मित्रमैत्रीणीसोबत राहीलेल चांगल पडेल.
प्लीज नोट मी वृद्धाश्रम म्हणत नाहीय. मी एकदाच गेलेय एका वृद्धाश्रमात आणि ती जागा फार डिप्रेसिंग होती.

मन Fri, 20/06/2014 - 17:04

In reply to by ॲमी

वृद्धाश्रम ....
डिप्रेसिंग....
+१

एकदा "आपण (मेनस्ट्रीम मधले तरुण) तिथे गेल्याने त्यांचा दिवस चांगला जात असेल तर एक दिवस जायला काय हरकत आहे " असा विचार करुन गेलो होतो. (प्लान मित्राचा होता, तो अधून मधून सामाजिक ऋण वगैरे विचार करुन अशा ठिकाणी दिवाळीला वगैरे जाउन लोकांना भेटतो, गप्पा मारतो. कधी मिठाई वगैरे घेउन जातो.)
तिथे जाउन शहारलो. त्या वातावरणाचा मुकाबला करणे एकाच दिवसाचा प्रश्न असला तरी फारच कठीण गेले होते.
पहिल्या काही तासातच अगदि तिथून पळून जावेसे वाटले.....

बॅटमॅन Fri, 20/06/2014 - 17:31

In reply to by ॲमी

साधारण १५ २० वर्षापेक्षा जास्त जुनी घरं, इमारती फारच जुनाट होतात.

रिनोव्हेषण नामक प्रकाराची आपणांस अ‍ॅलर्ज्यी असावीसे वाटते.

'न'वी बाजू Fri, 20/06/2014 - 18:23

In reply to by ॲमी

मी एकदाच गेलेय एका वृद्धाश्रमात आणि ती जागा फार डिप्रेसिंग होती.

'निवारा'ची जागा 'वैकुंठा'च्या ब्यांग ऑपोझिट ज्याने कोणी ठरवली, तो भयंकर प्र्याक्टिकल मनुष्य असला पाहिजे.

----------------

ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.

ॲमी Fri, 20/06/2014 - 18:37

In reply to by 'न'वी बाजू

:-) निवारा कुठे सिंहगड रोड ना? मी इकडे राजाराम पुलापाशीचे मातोश्री तिथे गेलेले.

खरंतर मेघनाच्या मित्राला 'कशाला येतोय इकडे परत?' म्हणणार होते. पण ते असो. वय वाढेल तशा बदलणार्या गरजा, सोयी भारतापेक्षा तिकडेच चांगल्या असतील असा अंदाज. पण आता पुढची १५वर्षतरी अच्छे दिनवालेच राज्य करणार आहेत असे नस्त्रदमस सांगून गेलाय म्हणे सो बोटांची फूली.

सविता Fri, 20/06/2014 - 14:52

In reply to by ॲमी

रिजनल मॅनेजर - एपॅक रिजन/ ऑस्ट्रेलिया वगैरे - २० + अनुभव असलेले.

माझ्या एक्स-मॅनेजर ची बायको होती - तेव्हाच ती ३५ + लाख होती, माझा मॅनेजर २८-२९ लाख रेंज मध्ये असावा. म्हणजे घराची टोटल इन्कम ५५-६० लाख, एकच मुलगा. आम्ही म्हणायचो, काय करता एवढे छापून - आम्हाला दत्तक घ्या नाहीतर किडन्यॅप करू! :)

मन Fri, 20/06/2014 - 14:54

In reply to by ॲमी

रिटायर व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं ते समजत नाही.
"चाळिशीपूर्वीच रिटायर व्हायला हवं/होउया/व्हावंसं वाटत" असं आर्थिक उदारीकरण वेग घ्यायला लागल्यापासून अधिकच ऐकू येतय.
नक्की असं का करायचं ? आणी रिटायर व्हायचं म्हणजे काय करायचं?
(हे अस्मि ला उद्देशून नाही, लवकर रिटायर होणे, ह्या संकल्पनेबद्दलच्या माझ्या शंका आहेत.)

मेघना भुस्कुटे Fri, 20/06/2014 - 15:04

In reply to by मन

माझ्यासाठी या संज्ञेचा अर्थः
पोटासाठी कराव्या लागणार्‍या तडजोडी आनंदाने थांबवून टाकायच्या. (बसने/रेल्वेने हापिसटायमातल्या गर्दीतला प्रवास, कंटाळवाणी-एकसुरी कामं, सोमवार सकाळचा अनन्वित कंटाळा...) आवडीचे प्रकल्प हाती घ्यायचे. नवीन काहीतरी मजेशीर शिकायचं. भरपूर भटकायचं. भरपूर सिनेमे-नाटकं-पुस्तकं-चित्रं अनुभवायची. आपल्याकडची उपयुक्त कौशल्य इच्छुकांना शिकवायची...

सुचिता Fri, 20/06/2014 - 19:57

मला बर्याच प्रतिक्रिया अगदी अक्षर न अक्षर पट्तात. पण मार्मीक श्रेणी योग्य नाही वाटत. मला वाट्ते, सहमत श्रेणी देता येण्याची सोय करवी . असहमत श्रेणी पण असु शकते , पण असहमत श्रेणी देण्या पेक्शा का असहमत त्याची कारणे देणं जास्त योग्य.

शहराजाद Mon, 23/06/2014 - 19:06

भारतात मोठ्या शहरांत लहान मुलाला चांगल्या शाळेत घालायचे असल्यास खर्च किती येतो?
'चांगल्या' शाळेला खालील निकष लावले आहेत, आणखी भर घालावी.
१) शैक्षणिक दर्जा - दरवर्षी ढीगभर मुले गुणवत्ता यादीत येणे गरजेचे नाही, पण शिक्षणाचा दर्जा चांगला असावा.
२) वर्गातील मुलांची संख्या- वर्गात जास्त मुले नसावी. ३०, साधारणपणे.
३) अभ्यासक्रमाव्यतिरिक्त गोष्टी- खेळ, संगीत, नाट्य व अन्य कलागुणाचा विकास अभ्यासक्तमात अंतर्भूत असणे.
अशा शाळांसाठी एकूण वार्षिक खर्च किती येतो? ( शाळेची बस, कला/ खेळ इ साठीचा खर्च, प्रवेशासाठीचे डिपॉझिट वगैरे धरून)

ॲमी Mon, 23/06/2014 - 20:11

In reply to by शहराजाद

www.aisiakshare.com/node/2962#comment-62864 इथुन थोडी आयड्या येइल.
बहुतेक CBSC शाळांत एका वर्गात ३०च विद्यार्थी असतात. फी ५०पर्यंत. बाकी बस, युनिफॉर्म, पुस्तक वगैरे खर्च वेगळे.
मागे कोणत्यातरी धाग्यावर ऋ, सविता आणि जंतूंची चांगल्या मराठी माध्यमाच्या शाळांबाबत चर्चा झालेली.