Skip to main content

सरवन भवनाची फिल्मी ष्टोरी

गेल्या 10 – 15 वर्षात चेन्नईला भेट दिलेल्यांना कधी ना कधी तरी सरवन भवनाबद्दल ऐकून माहिती असेल. कदाचित तेथील खाद्य पदार्थांची चवही घेतली असेल. चेन्नईसाठी सरवन भवन चेन हॉटेल्समधील शाकाहारी खाद्यपदार्थ म्हणजे जणू मेजवानीच. भारत भर 33 शाखा व परदेशात 47 शाखा चालवणार्‍या एवढ्या मोठ्या कारभारामागे 66 वर्षाच्या राजगोपाल या व्यक्तीची दूरदृष्टी, त्याचे श्रम व मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जिद्द आहेत. चेन्नईच्या हॉटेल व्यवसायात याचा भार मोठा दबदबा आहे. शाकाहारी हॉटेल व्यवसायाला त्यानी गौरव प्राप्त करून दिले असेच अनेकांचे मत आहे. सरवन भवनशी स्पर्धा करणार्‍या मुरुगन इडलीच्या व्यवस्थापकाच्या मते राजगोपाल यानी या व्यवसायात क्रांती केली आहे.

नाडार या मागास जातीत जन्मास आलेला राजगोपाल यानी एके काळी चेन्नई येथे फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी असलेल्या हॉटेल व्यवसायाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली व व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. आयटी इंडस्ट्रीत जम बसवत असलेल्या मध्यमवर्गाची पारंपरिक शाकाहारी खाद्य पदार्थांची मागणी पूर्ण करण्यात राजगोपाल यशस्वी झाला आहे. चेन्नई शहरातच या हॉटेल्सच्या एकूण कामगारांची संख्या 800 आहे. आयटी सारख्या प्रगत उद्योगातील सोई सुविधा – ट्युशन फी, घरभाडे, हॉस्पिटल्सचा खर्च, वाहन सुविधा, निवृत्तीवेतन इ.इ. – या चेन हॉटेल्सच्या कामगारांना दिल्या जातात. म्हणूनच हा कामगार वर्ग त्याच्याप्रती श्रद्धा बाळगून आहे. राजगोपाल यानी आपल्या जन्माच्या ठिकाणी एक प्रचंड देऊळ बांधले असून दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनी तेथे भक्त येतात. त्याचप्रमाणे सरवन भवनातील खाद्यपदार्थासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात.

या चेन हॉटेल्सच्या बिझिनेस मॉडेलला कुठल्याही प्रकारचा धोका नाही हे राजगोपालच्या अटकेनंतर सिद्ध झाले. सरवन भवनाचा जगभर विस्तार होत असताना राजगोपाल याला एका खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खटला भरला गेला व त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. परंतु हा केवळ 11 महिन्यानंतर जेलमधून बाहेर आला. काही दिवसातच त्याच्या चेन हॉटेलची एक शाखा हाँगकाँग येथे व दुसरी शाखा ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे उघडली. या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल उघडण्याचाही विचार त्याच्या डोक्यात घोळत होता.

सरवन भवनाची खासीयत इडली व मेदू वडा (वडाई) या ‘टिफिन’ पदार्थात आहे. सोनेरी रंगाचा खरपूस मसाला दोसा, पांढरे शुभ्र इडली (त्याभोवती रंगीत चटण्याची आरास), व डोव्हनटसदृश मेदू वडा यांना नुसते बघितले तरी तोंडात पाणी सुटेल. सकाळपासून रात्रीपर्यंत यांचे उत्पादन होत असते व चवीतही अजिबात फरक पडत नाही. या चेन हॉटेल्सच्या कांउटरवर 1997 साली (म्हणजे त्याच्या अटकेपूर्वी) प्रकाशित झालेले I Set My Heart on Victory या पुस्तकाची विक्रीसुद्धा होत असते. राजगोपाल यानी लिहिलेल्या (वा लिहून घेतलेल्या!) त्याच्या आठवणी, कार्यशैली व स्वतःचा उदोउदो करून घेणार्‍या घटनांची त्यात माहिती आहे.

राजगोपालची ही कथा 1947 सालापासून सुरु होते. तमिळनाडूच्या दक्षिणेकडील पुन्नयाडी या खेड्यात त्याचा जन्म झाला. हे गाव इतके छोटे आहे की तेथे एस टी बसेससुद्धा कधी थांबत नव्हत्या. मातीने सारवलेल्या घरात त्याचे कुटुंब राहत होते. सातवीत असताना त्यानी घर सोडले व हातात एक टॉवेल घेऊन एका सामान्य दर्जाच्या चहाच्या टपरीत टेबल पुसण्याचे काम तो करू लागला. जवळच असलेल्या वाहत्या नदीत आंघोळ व टपरीतील चहाच्या भट्टीसमोर झोप. परंतु त्याचा स्वतःवर भरपूर विश्वास होता. काही दिवसानी टपरीच्या मालकानी याला चहा करण्याचे गुपित सांगितले. फक्कड चहा बनवण्याचे तंत्र त्याला सापडले. मालक एकदम खूश!

काही दिवसातच हॉटेल पोर्‍याच्या कामाचा त्याला कंटाळा आला. कुणालाही काहीही न सांगता तो चेन्नईला (पूर्वीचे मद्रास शहर) पळून गेला.शहराच्या बाहेरच्या केके नगर या भागात त्यानी किराणामालाचे एक छोटेसे दुकान उघडले. त्या काळी त्या भागात एकही खानावळ नसल्यामुळे जेवणासाठी त्याला टी नगरपर्यंत पायपीट करावे लागत असे. 1979 च्या सुमारास शेजार्‍याशी गप्पा मारत असताना केके नगरमध्येच एक हॉटेल उघडण्याची कल्पना त्याला सुचली.

शंभर वर्षापूर्वी मद्रास येथे एकही खानावळ नव्हती. पारंपरिक पद्धतीने आयुष्य काढणार्‍या येथील कर्मठ लोकांना बाहेरचे खाणे निषिद्ध होते. 1950च्या सुमारास कुठेतरी एखादे तुरळक हॉटेल तेथे दिसू लागले. व त्याही ब्राह्मणाकडून चालणार्‍या व ब्राह्मणासारख्या उच्चवर्णीय प्रवाश्यासांठी होत्या. इतर जातींना तेथे मज्जाव होता. मोजकेच खाद्य पदार्थ बनविणार्‍या अशा हॉटेल्मध्ये सोवळ्या ओवळ्यांचा बडेजाव होता. स्वयंपाकी, वाढपी, पाणी देणारे, उष्टे काढणारे... सर्व ब्राह्मणच असायला हवेत अशी अलिखित अट होती. इतर जातीच्या ग्राहकांनी उष्टे केलेल्या कप-बश्या, प्लेट-वाट्या स्वच्छ धुऊन ठेवले तरी ब्राह्मण ग्राहक त्यांना शिवत नसे. ब्राह्मण वर्गाची नाराजी पत्करून हॉटेल चालवणे शक्य होत नसे. कारण अतिरिक्त पैसा याच वर्गाकडे होता व इतर जाती पोटा-पाण्यापुरते कमावत असत. त्यामुळे त्यांना हॉटेलची चैन परवडत नसे. नाडार जातीच्या या पोर्‍याला हॉटेल चालवण्यास देणारे तरी सोडा, खानावळीत जेवायला प्रवेश देणारेसुद्धा त्याकाळी नव्हते. काही ठिकाणी मात्र इतर जातीचे व इतर जातीसाठी हॉटेल्स दिसू लागले.

अगोदरच नुकसानीत चालत असलेल्या या इतर जातीच्या हॉटेल्समध्ये गुंतवणूक करणे राजगोपालला शक्य नव्हते. शेवटी 1981 साली केकेनगर येथे त्यानी एक छोटीशी चहाची टपरी उघडली. धंदा नीटसा चालत नव्हता. किराणामालाच्या विक्री खरेदीचाच अनुभव गाठीशी असल्यामुळे काही महिन्यात त्याच्यावरील कर्जाचा बोजा वाढू लागला. परंतु एका ज्योतिषाने जवळ अग्नी असलेल्या धंद्यात बरकत होईल असे वर्तवल्यामुळे अजून काही दिवस वाट बघण्याचे त्याने ठरवले. त्याच्या एका हितचिंतक सल्लागाराने जास्तीत जास्त स्वस्त माल, टाकाऊ भाज्या, कामगारांना कमीत कमी पगार व स्वयंपाकासाठी रस्त्यावरील कुठल्याही उपाशी भटक्याला पकडून काम करून घेतल्यास नुकसान होणार नाही हा कानमंत्र दिला. त्यानी लिहिलेल्या आठवणीत सल्लागाराचा हा सल्ला त्याला आवडला नाही असे नमूद केले आहे. सल्लागाराचे न ऐकता चांगले पदार्थ, चांगल्या दर्जाचा भाजीपाला, कामगारांना इतर हॉटेलपेक्षा जास्त पगार यावर त्यानी भर दिला. याचे परिणाम म्हणजे काही दिवसातच महिन्याला 10 हजार रुपयाचा तोटा होत आहे हे त्याच्या लक्षात आले. कारण त्याकाळी खाद्य पदार्थांच्या किंमती रुपया-दीड रुपया एवढ्याच होत्या व 10 हजार ही कर्जाची रक्कम फारच मोठी होती.

परंतु पुढील काही महिन्यात याच्या हॉटेलातील खाद्य पदार्थ रुचकर व स्वस्त आहेत याची मौखिक जाहिरात होऊ लागली. बघता बघता ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कर्ज फिटले. फायदा होऊ लागला. इतर ठिकाणी शाखा उघडण्याचा विचार घोळू लागला. कामगारांनी साथ दिली. प्रोत्साहन मिळाले. धोका पत्करून शाखा उघडली. विश्वासू नोकर मिळाले. कामगारांच्या पगारात वाढ, मोफत रोगोपचार, कामगारंच्या मुलींच्या लग्नासाठी विनव्याजी कर्ज इत्यादी सुविधा तो देऊ लागला. इतर व्यावसायिकांच्या तुलनेत हे कामगार आपल्या मालकावर खुश होते. राजगोपाल हा कामगारांच्या दृष्टीने ‘आण्णाची’ – मोठा भाऊच होता.

1990 च्या नंतर चेन्नईतील अनेक उपनगरामध्ये सरवन भवनाच्या पाट्या झळकू लागल्या. चेन्नईच्या नागरिकांना सरवन भवन म्हणचे जणू मॅक्डोनाल्डच वाटत आहे. खाण्याच्या जागेत भरपूर उजेड, खाद्यपदार्थांची उच्च व सातत्य असलेली गुणवत्ता, सगळ्याच शाखामधल्या पदार्थांची एकाच प्रकारची चव, hot, healthy, hygienic हा मंत्र, पारदर्शक स्वयंपाकाची जागा, पिण्यासाठी फिल्टरचे पाणी, त्यामुळे ग्राहकांची प्रथम पसंती या चेन हॉटेल्सना आहे. मॅक्डोनाल्डसारखे बाहेरून तयार केलेले खाद्यपदार्थ येथे आणल्या जात नाहीत. सर्व पदार्थ येथेच तयार होतात. इतर हॉटेल्सप्रमाणे रात्री उरलेले पदार्थ ठेवण्यासाठी येथे फ्रीझरसुद्धा नाही. फक्त भाजीपाल्यासाठी कूलरचा सोय आहे. दोश्या-इडलीचे पीठसुद्धा हॉटेलच्या जागेतच तयार केले जाते. हॉटेलचा स्टाफ राजगोपाल देत असलेल्या पगारावर खुश आहे. प्रत्येक व्ववस्थापकाकडे मोबाइल, व बाइक असल्यामुळे हा वर्ग मालकाबद्दल अत्यंत आत्मीयतेने बोलत असतो. बाइकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकसुद्धा या कंपनीचाच पगारदार नोकर आहे. (एके काळी दाढी कटिंगचे पैसेसुद्धा भत्ता म्हणून वेटर्सना मिळत होते!)

2000 साली सरवन भवनाची एक शाखा दुबईमध्ये राजगोपालचा मुलगा शिवकुमार याच्या पुढाकाराने उघडली. चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो सारखे हॉटेलच्या उद्घाटनाच्या दिवशी गर्दी उसळली होती. बघता बघता पॅरीस, फ्रँकफुर्ट, लंडन, डल्लास, दोहा इत्यादी ठिकाणी सरवन भवनच्या शाखा उघडल्या व धंदाही चांगल्या प्रकारे चालू लागला. ज्या शहरात लक्षणीय प्रमाणात भारतीय आहेत त्याच शहरात शाखा उघडण्याचे धोरण कंपनी राबवते. सामान्यपणे प्रत्येक शहरात एकच शाखा असते. अपवाद फक्त मॅनहाटनचा, जेथे दोन शाखा आहेत. जे भारतीय होमसिक् आहेत त्यांच्यासाठी भारतीय चेफनी बनवलेले खास भारतीय शाकाहारी पदार्थ – अगदी चेन्नईमध्ये बनवल्यासारखे – सरवन भवनामध्ये मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी होते. त्या देशातील स्थानिक नागरिकांना आग्रह करण्याची वा त्यांना आकर्षित करण्याची गरजच त्यामुळे भासत नाही.

***

2002 साली सिंगापूर व कॅलिफोर्निया येथे शाखा उघडताना राजगोपालवर प्रेयसीच्या खुनाचा खटला भरला गेला. जिच्याशी त्याला लग्न करावेसे वाटत होते तिलाच त्यानी मारून टाकले असा आरोप त्याच्यावर होता. त्याच सुमारास ओमान, कॅनडा, मलेशिया, येथे सरवन भवनाच्या शाखा उघडल्या. 2004 साली राजगोपालवरील खुनाच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल लागला. स्थानिक न्यायालयाने त्याला 10 वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. याच कालखंडात या हॉटेलच्या 29 शाखा जगभर पसरल्या होत्या. राजगोपालला या झालेल्या शिक्षाबद्दल विचारल्यावर "मी कुणाच्याही मृत्युला जबाबदार नाही. दुसऱ्यानी केलेल्या कृत्यासाठी मला शिक्षा भोगावी लागत आहे. व मी ईश्वराची प्रार्थना करतो. खरे पाहता ईश्वरानीच मला तुरुंगात पाठवले तेही माझ्या भल्यासाठीच. कारण माझा मुलगा, शिवकुमारला या व्यवसायाचा अनुभव यावा हे ईश्वराच्या मनात होते."

आठ महिने शिक्षा भोगल्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रकृती अस्वास्थ्याच्या निमित्ताने शिक्षा भोगण्यास स्थगिती दिली. 2009 साली मद्रास हायकोर्टाने त्याचे अपील फेटाळले व खालच्या कोर्टाच्या निकालावर शिक्का मोर्तब केले. एवढेच नव्हे तर खुनाबरोबर कट कारस्थान रचल्याच्या आरोपावरून शिक्षेत वाढ केली. पुढील 3 महिन्यात जामीनावर सुटून तो जेलबाहेर पडला. कारण त्यानी झालेल्या शिक्षेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले. हे अपील सुनावणीस येण्यास किती कालावधी लागेल, किती वर्ष लागतील याचा कुठलाही अंदाज नसल्यामुळे शिक्षा न झाल्यासारखे त्याचे दैनंदिन व्यवहार चालू झाले. सुप्रीम कोर्टाने त्याचा पासपोर्ट जप्त केल्यामुळे तो परदेशी जाऊ शकत नाही याचा अपवाद वगळता त्याच्या जीवनशैलीत कुठलाही फरक पडला नाही. खुनाच्या आरोपानंतरच्या 12 वर्षाच्या कालावधीत बाहेरच्या देशात कित्येक शाखा उघडलेले आहेत.

चेन्नई येथील स्थानिक वृत्तपत्रात मोठमोठ्या मथळ्याखाली राजगोपालवरील खटल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. तिखट मीठ लावून बदनामकारक मजकूर छापला जात होता. निंदा नालस्ती केली जात होती. त्याच्या जागी इतर कुणी लेचा पेचा असता तर तो कधीच या प्रसंगातून सावरला नसता. हा संपला त्याचा व्यवसाय संपला, सरवन भवन गाशा गुंडाळणार अशी अटकळ बांधली जात होती. परंतु हॉटेल्समधील गर्दी काही कमी झाली नाही. त्याच्यावरील शिक्षेचा परिणाम त्याच्या धंद्यावर झाला नाही हे विशेष.

खेडेगावातील बेकार, भटक्या, अनाथ मुला-मुलींना/तरुण-तरुणींना हेरून तो त्याच्या कंपनीत भरती करतो व कामाचे प्रशिक्षण देतो. त्यांच्या खाण्या-पिण्याची व राहण्याची सोय करतो. त्यामुळे त्याच्या हॉटेल्सचे कामगार कायमच मालकाच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहतात. मुळात राजगोपालला स्वतःच्या प्रसिद्धीची हौस नाही – फक्त हॉटेल्सचे नाव झळकत असणे त्याला पुरेसे वाटते. त्यामुळे हॉटेलात येणार्‍या ग्राहकांना हॉटेल व हॉटेलचा मालक यात फरक करणे शक्य होते. एखाद्या खुनी माणसाच्या हॉटेलमध्ये जाऊन त्याला श्रीमंत करत राहणे योग्य नाही असे जरी एखाद्याने नाक मुरडले तरी मी कुणाशी व्यवहार करतो याचे मला देणे घेणे नाही तो दारुडा आहे का, तो बायकोली मारहाण करतो का असले प्रश्न मी विचारणार नाही. जोपर्यंत त्याच्या हॉटेलमध्ये माझ्या चवीचे रुचकर पदार्थ मिळतील तोपर्यंत मी त्याच्या हॉटेलमध्ये जाईन. अशी मानसिकता बहुतांश ग्राहकामध्ये असते. कदाचित येथील कामगारांनासुद्धा मालकावरील आरोप वा त्याचे तुरुंगातील वास्तव्य याबद्दल काही वाटत नसावे. त्यांच्या दृष्टीने राजगोपाल हा प्रत्यक्ष परमेश्वरच. एकदा राजगोपाल तुरुंगात असताना उपनगरातील एका सरवन भवनात 10 -12 गुंड–मवाली शिरले व तेथील वेटर्सना उद्देशून मालकाबद्दल यद्वा तद्वा बडबडू लागले. अगदीच पाप्याचे पितर असलेल्या एका बारक्या वेटरला राग आला व एका जग् मध्ये असलेले पाणी त्यानी त्यांच्या म्होरक्याच्या अंगावर ओतत "अजून एक शब्द जरी मालकाच्या विरोधात उच्चारल्यास जग् मधील पाणी तुझ्या अंगावर नव्हे तर तोंडात ओतीन, हे लक्षात ठेव" अशी धमकी दिली. तोपर्यंत इतर सर्व वेटर्स त्या बारक्याभोवती कडे करून उभे राहिले.

कामगारांची कुठलीही तक्रार असली तरी ते राजगोपालपर्यंत पोचते. त्याच्या दरबारात योग्य फैसला होतो याची तक्रारदाराला खात्री असते. रात्रीचे 11 -12 वाजेपर्यंत राजगोपालचे ऑफिस उघडे असते. काही वेटर्स खोटे बोलतात, भांडखोर असतात हेही त्याला माहित असते. परंतु त्यांना त्यांच्या भाषेत चार सब्द सुनावल्यानंतर त्याला उदार मनाने क्षमा केली जाते. चुका होतातच हे त्याच्या मागचे कारण असावे.

***

राजगोपालच्या गुन्ह्याची केस मद्रास हायकोर्टात दाखल झाली होती. 30000 शब्दांच्या निकाल पत्रात कोर्टाने कुठल्याही साक्षीदाराला फोटोग्राफिक मेमरी नसते, त्यामुळे काही वर्षापूर्वी घटनांचे तंतोतंत शब्दचित्रण करणे अशक्यातली गोष्ट ठरेल व्हिडिओटेपप्रमाणे मागे पुढे करून घटनाक्रम दाखवता येत नाही अशा प्रकारचे ताशेरे ओढून राजगोपालला अनुकूल होईल अशी शब्दरचना करून जीवज्योतीच्या खून खटल्याचा निकाल लावला.

राजगोपालला एका ज्योतिषाच्या भाकिताप्रमाणे त्याच्याच हॉटेलमधील मॅनेजरच्या मुलीशी लग्न करायचे होते. जर लग्न झाले असते तर हे त्याचे तिसरे लग्न ठरले असते. यापूर्वी त्याचे लग्न 1972 मध्ये झाले होते व त्या पत्नीपासून त्याला दोन मुलं होती. दुसरे लग्न 1994 मध्ये झाले होते.

जीवज्योतीला राजगोपालसारख्या म्हातार्‍याशी लग्न करायचे नव्हते. शांतकुमार नावाच्या तिच्या भावाच्या मित्राच्या प्रेमात ती पडली होती व त्यांच्यात आणाभाकाही झाल्या होत्या. 1999 साली जीवज्योती शांतकुमारबरोबर घरातून पळून गेली. परंतु राजगोपाल सूडाने पेटला होता. तिला त्याने एक ट्राव्हल एजन्सी खोलून दिली होती. तिला भरपूर दागिने, कपडे-लत्ते, रोख पैसा भेट म्हणून दिले होते. जीवज्योतीसुद्धा ती भेट स्वीकारत होती मात्र ती कधीच राजगोपालची इच्छा पूर्ण करत नव्हती वा करणारही नव्हती. 28 सप्टेंबर 2001 च्या रात्री राजगोपाल जीवज्योती व शांतकुमार राहत असलेल्या घरी गेला. शांतकुमारला "दोन दिवसात जीवज्यातीशी असलेले संबंध तोड. नाहीतर तुला जिवेनिशी मारून टाकीन" अशी धमकी दिली. जीवज्योतीला उद्देशून "माझी दुसरी बायको तुझ्यासारखीच लग्नाला नकार देत होती, पिरी पिरी करत होती. परंतु आता ती एखाद्या महाराणीसारखे जीवन जगत आहे." असे म्हणत होता.

त्याच्या धमकीला घाबरून ते दोघेही रातोरात पळून जायचे ठरवत होते. परंतु राजगोपालनी पाळलेले पाच गुंड व त्यांचा म्होरक्या डेनियल त्यांच्यावर पाळत ठेवून होते. या सर्वांनी मिळून त्या दोघांना एका अंबॅसडर कारमध्ये कोंबून केकेनगर येथील सरवन भवनाच्या वखारीत आणले. तेथे राजगोपाल हजर होता. कोर्टाच्या नोंदीप्रमाणे राजगोपालने शांतकुमारला भरपूर चोपले. जीवज्योती मध्ये पडून शांतकुमारच्या जीवाची भीक मागत होती. राजगोपालने गुंडांना बोलवून शेजारच्या खोलीत मारहाण करण्यास सांगितले. जीवज्योती रात्रभर रडत होती. दुसर्‍या दिवशी डेनियलने तिची क्षमा मागितली व पोलीसाकडे जाण्यास सांगितले. नंतर या जोडप्याला एका गुप्त ठिकाणी कोंडून ठेवले. राजगोपालच्या माणसांची दिवस-रात्र पाळत असूनसुद्धा आक्टोबर 12 ला दोघेही तेथून पळून गेले व पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये रीतसर तक्रार नोंदविली. पुढील 6 दिवसानंतर राजगोपालच्या गुंडानी पुन्हा एकदा त्याना पळवून नेऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवले. जीवज्योतीला राजगोपाल बसलेल्या मर्सीडीस गाडीत ढकलून दिले. राजगोपालने अत्यंत अभिमानाने तिने केलेल्या पोलीस तक्रारीची कागदं तिच्यासमोर फाडले.

हे सर्व कसे काय घडू शकते याचा सुगावा कधीच लागला नाही. भारतातील न्यायव्यवस्था इतक्या खालच्या पातळीवर जाईल याची कल्पनाच कुणी करू शकणार नाही.

जीवज्योतीला शांताकुमारचे पुढे काय झाले याचा पत्ता नव्हता. अचानक एके दिवशी त्याचा फोन आला. त्याला मारून खलास करण्यासाठी राजगोपाल यानी 5 लाखाची सुपारी डेनियलला दिली होती. परंतु डेनियलने त्याला न मारता मुंबईला पळून जाण्यास मदत केली असे त्यानी तिला कळवले. शांतकुमारला परत येण्याची तिने विनंती केली. आपण दोघेही राजगोपालच्या पाया पडू, क्षमा मागू व आपल्यावर सूड न उगवण्यासाठी विनंती करू असे तिने सांगितले म्हणे. कोर्टाने मात्र या दोघामधील अतूट नात्याची नोंद घेतली होती.

हे दोघे, जीवज्योतीचे आई वडील व भाऊ राजगोपालला भेटले. त्यानी त्यांना शेजारच्या खोलीत बसायला सांगितले. डेनियलला बोलवून "शांतकुमारचे काय झाले?" अशी विचारणा केली. डेनियलने "आम्ही त्याला रेल्वे रुळावर बांधून ठेवले होते व रेल्वे त्याच्या अंगावरून गेल्यानंतर त्याचे कपडे जाळून टाकले" असे सांगितले. शेजारच्या खोलीतील शांतकुमारला बोलावून "हे त्याचे भूत आहे का?" असे तो ओरडला. डेनियलने राजगोपालचा विश्वासघात केल्याबद्दल जीवज्योतीच्या कुटुंबियानी त्याची माफी मागितली. राजगोपालची माणसं या सर्वांचे भूत उतरवण्यासाठी एका कारमधून लांबच्या गावी नेल्याची नोंद सुनावणीच्या वेळी केली.

31 आक्टोबरला शांतकुमार याचे प्रेत कोडायकनालच्या जंगलात सापडले. गळा दाबल्यामुळे मृत्यु झाल्याची नोंद पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये होती. तेथेच कुठे तरी खुनाचे हत्यार – एक लुंगी - सापडली.

डेनियलला खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आले. राजगोपालची जामीनावर सुटका झाली. जीवज्योती कुठे आहे, काय करते याचा अजूनही शोध लागत नाही.

***

राजगोपालच्या पुन्नायडी गावाचे नाव आता पुण्याई नगर झाले आहे. राजगोपाल अत्यंत अभिमानाने त्या गावचा विकास मीच केला असे सांगत असतो. नियमितपणे आता तेथे एस टी बसेस थांबतात. जनसंख्येत फार मोठी वाढ झालेली नसली तरी गावात मोठ्या प्रमाणात पैसा खेळत आहे. चार एकर जागेत सरवन भवन हॉटेल बरोबरच लाखो रुपये खर्चून तेथे एक देऊळ बांधलेले आहे. 90 घर असलेल्या या गावात सरवन भवनमध्येच 140 कामगार आहेत. यावरून देवदर्शनास येणार्‍या भक्तांचा नक्कीच अंदाज येईल. राजगोपालच्या जुन्या राहत्या घरात भिंती भरून देव देवतांचे फोटो लटकवलेले आहेत. घराचा काही भाग वेटर्सना राहण्यासाठी दिलेला आहे.

राजगोपाल जेलमध्ये असताना जेलमधील जेवण सुधारण्याचा प्रयत्न करत होता म्हणे. परंतु त्याला त्याच्या आवडीचे जेवण मिळण्यासाठी महिना लाख रुपये लाच द्यावी लागत होती.

राजगोपालचा मुलगा, शिवकुमारला इंजिनियर ह्वायचे होते. परंतु बापाच्या आग्रहामुळे त्याला हॉटेल व्यवसायात पडावे लागले. आता तोच सर्वे सर्वा आहे. त्याचा लहान भाऊ, सरवन, परदेशातील व्यवहार सांभाळतो. शिवकुमारचे इंजिनियंरिंगचे वेड कमी झालेले नाही. त्यामुळे त्याच्या चेन हॉटेल्समध्ये ऑटोमेशन, संगणकीकरण होत आहे.

एका अल्पशा चुकीमुळे राजगोपालचे डागाळलेले चारित्र्य सरवन भवनाच्या स्वरूपातून पुसून जाण्याची शक्यता आहे असे त्याच्या मुलां – बाळांना वाटत आहे.

आज या चेन हॉटेल्सची किंमत 5200 कोटी रुपयापर्यंत पोचली आहे. म्हणूनच या आठवड्यात या चेन हॉटेल्सच्या ठिकाणी इनकम टॅक्स डिपार्टमेंटची धाड पडली, अशी बातमी आहे.

संदर्भ:
1. सरवन भवन
2. न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सुनील Thu, 26/06/2014 - 13:45

छान माहिती.

पुन्नायडी गावाचे नाव आता पुण्याई नगर झाले आहे.

पुनवडीचे पुण्यनगरी झाल्याचे आठवले! साधर्म्य रोचक!

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 22:02

In reply to by प्रभाकर नानावटी

पुण्यात नाहीये. खराडीच्या जवळ कधीकाळी होते असे ऐकून होतो, पण अधिक चौकशी करता आढळून आले की ते कधीचेच बंद झाले.

तूर्तास पुण्यात ऑथेंटिक सौदिंडियन कमीच हाटेले आहेत. दक्षिणायन नामक अप्रतिम चवीचे हाटेल बंद झाले. :( ते सोडल्यास युनिव्हर्सिटी रोडवर पुणे सेंट्रल मॉलला लागून सौथ इंडीज नामक हाटेल आहे पण बर्‍यापैकी महाग. झालंच तर अप साऊथ नामक कमी दामवाले पण उत्तम चवीचे हाटेल अमनोरा मॉलच्या अगोदर तसेच विमाननगरात फीनिक्स मॉलमध्ये आहे. स्टेशनजवळ चेन्नै पालीमर्स नामक अजूनेक आहे असे ऐकतो पण तिकडे कधी जाणे झाले नाही...

बाकी मानकर डोसा नामक एक मराठाळलेला प्रकार असला तरी तोही मला आवडला.

रमताराम Fri, 27/06/2014 - 17:47

In reply to by बॅटमॅन

बाणेर रोडवर डी-मार्ट शेजारी 'वे डाऊन साउथ' म्हणून एक हाटेल आहे. चित्रापूर पद्धतीचे डोसे छान मिळतात. तिथेच रस्सम-वडा भारी मिळतो.

रमताराम Fri, 27/06/2014 - 18:21

In reply to by मेघना भुस्कुटे

'चित्रापूर सारस्वत' समाजाच्या रेसिपीनुसार केलेले. (गिरीश कार्नाड हे चित्रापूर सारस्वत आहेत). माझी खात्री आहे अनेक नावे बहुतेकांना नवीनच असतील. येक डाव नक्की खावा.

http://www.zomato.com/pune/way-down-south-restaurant-baner

सुनील Fri, 27/06/2014 - 22:08

In reply to by रमताराम

मेन्यू खतरी दिसतोय! बघू कधी जायला जमतेय ते!

(गिरीश कार्नाड हे चित्रापूर सारस्वत आहेत)

व्हय म्हाराजा!

तसे पाहिले तर पडुकोणांची दीपिका (हिच्यावर आमचा फार जीव!) देखिल चित्रापूरच!

बाकी कल्याणपुरांपासून ते हट्टंगडींपर्यंत (मार्गे करनाड आणि बेनेगल) सगळ्या चित्रापुरांनी नाट्य-संगीत क्षेत्र गाजवले आहेच. आता पाकृतदेखिल आले असतील तर उत्तमच!

मन Fri, 27/06/2014 - 18:09

In reply to by रमताराम

समोरुन जाणे होते; पण नेमके त्या हाटेलात जाणे झाले नाही अजून

बॅटमॅन Fri, 27/06/2014 - 18:16

In reply to by रमताराम

धन्यवाद. नाव कधी ऐकले नव्हते-यद्यपि त्या भागात 'तारीफ'ला गेल्तो तरीही. आता ट्राय करेन.

बाकी चित्रापूर पद्धतीचे डोसे म्हणजे काय?

धनंजय Fri, 27/06/2014 - 20:54

In reply to by बॅटमॅन

रास्ता पेठेत कन्नड शाळेजवळची खानावळ चालू आहे की बंद आहे? साधे, पण मस्त जेवण मिळे.

धनंजय Fri, 27/06/2014 - 23:22

In reply to by बॅटमॅन

बहुधा हा पत्ता असावा :
Kundan Apartment, D S Iyyer Road, Rasta Peth, Pune City -411011

माझे मित्र त्याला "सदर्न लंच होम" म्हणत, परंतु ते त्याचे कागदोपत्री नाव नाही. दाक्षिनात्य विद्यार्थी वसतीगृहाची खानावळ असे काहीतरी (इंग्रजीत) लांबलचक नाव होते.

गवि Thu, 26/06/2014 - 14:32

लय भारी. या हाटेलात बसून वडै चापताना हा असा सगळा इतिहास त्यामागे असेल हा विचारही येत नाही.

तामिळनाडूच्या दीर्घ वास्तव्यावरुन सदरहू हाटेलसाखळीच्या नावाचा उच्चार सरवन नसून "स्रीसरोणा भवन" असल्याचे नम्रपणे नमूदवतो.. :) ("णा"च्या वेळी जीभ वरच्या टाळूवरुन सट्टकन सुटण्याचा आवाज इन्क्लुडेड)

जाता जाता उगाच टीपः स्रीसरोणा हे काही सर्वोत्कृष्ट हाटेलांपैकी नाही. ब्रँडेड आहे इतपत पटणेबल. टेस्टवाईज त्याहून जास्त चांगली हॉटेल्स चेन्नईत अन बाकीच्या तामिळनाडूत सहज मिळतात.

स्वच्छता आणि स्टँडर्डायझेशन याबाबत मात्र प्रश्नच नाही.

मी Thu, 26/06/2014 - 14:46

In reply to by गवि

तामिळनाडूच्या दीर्घ वास्तव्यावरुन सदरहू हाटेलसाखळीच्या नावाचा उच्चार सरवन नसून "स्रीसरोणा भवन" असल्याचे नम्रपणे नमूदवतो..

आम्ही कायम 'सर्वणा भवन' असा उच्चार करत असू, स्रीसरोणा भवनाबद्दल एक (दंत)कथा सांगितली जाते,त्यांची कॉफी फारच फेमस आहे/होती, ती पिण्यासाठी लोकांची रांग लागत असे, कॉफी फेमस करण्यासाठी स्रीसरोणा वाले कॉफीत अफु घालत असत असे बोलले जाते. पण स्रीसरोणा भवन परदेशात अनेक दाक्षिणात्यांचे तारणहार रेस्तरां आहे.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 15:38

कंपनीत बॅचलर असताना रोजच सरवणा भवनचे जेवण चापायचे गोड गोड दिवस आठवले. प्रचंड कल्ला चव असते इथे. मी साउथ इंडीयन जेवण चिकार आवडते नि अद्यापि मी इतके उत्कृष्ट जेवण खाल्ले नाही. हॉटेलसमोर रविवारी आपली बारी यायची वाट पाहायचा कंसेप्ट मला जनरली चीड आणतो, पण मी विकडेजला तरी सरवणामधे अवश्य जातो. विकेंडला इंडिया गेटला असलोच, तर वाट पाहाण्याचे अपराधीपण वाटू नये.

इतरत्र यापेक्षा चांगली चव असते याबाबत, माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने, गविंशी असहमत. गविंना चवीने (पॉसिबली दिल्लीत) बेटर दॅन सरवणा काही सुचवायचे असेल तर अवश्य सुचवावे, मी जरूर जाऊन पाहीन.

सामान्यपणे प्रत्येक शहरात एकच शाखा असते. अपवाद फक्त मॅनहाटनचा, जेथे दोन शाखा आहेत.

दिल्लीतही दोन शाखा आहेत.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 15:43

In reply to by अजो१२३

दिल्लीतले आंध्रा भवनही अत्युत्तम आहे असे मित्रांकडून कळते. सरवणा भवनमध्ये चापायचा योग अजूनपर्यंत आलेला नाही, पण ईगरलि वेटिङ्ग फॉर द सेम.

(सौदिंडियन-सापड-कादलन) बी. वेनन् ब्याट-मनिदन्.

गवि Thu, 26/06/2014 - 16:40

In reply to by अजो१२३

@अजो. तुम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर भारतात राहिलेले असाल तर तुम्हाला स्रीसरोणा भलतेच आवडेल सौधिंडियन पदार्थांसाठी. इन द्याट केस तुम्हाला अगदी कामत चेनही आवडेल उडपी पदार्थांसाठी.

पण तामिळनाडूत राहिल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी, लोकल आणि घरगुती इन्क्लुडेड, खाल्ल्यावर जो बेंचमार्क सेट होतो त्यानुसार त्या एरियात सरोणापेक्षा चांगल्या चवीचे बरेच ऑप्शन्स आहेत.

बर्‍याच प्रकारच्या क्विझिन्सची एखादी स्टँडर्डाईज्ड साखळी निघते. ती वाईटच असते असे अजिबात नाही, त्यात बरेच स्टँडर्डायझेशनही असते. पण त्या स्टँडर्डायझेशनच्या प्रोसेसमधे म्हणा किंवा अन्य अज्ञात कारणांनी म्हणा, त्यातला लोकल इसेन्स कमी होतो आणि जणू फोरेनरांना खिलवण्याच्या सपक आणि सिंप्लिफाईड व्हर्शन्स तिथे मिळतात.

पुरेपूर कोल्हापूर ही कोल्हापुरी जेवणाची ब्रँडेड चेन आहे. त्यात जेवण चांगलेच असते. पुणे, मुंबई, दिल्ली अन यथावकाश अमेरिका आदि ठिकाणी कोल्हापूरच्या जेवणाची काहीशी फॅन्सी पण स्टँडर्डाईज्ड व्हर्शन देण्यासाठी या चेन्सचा उपयोग होईलच.

... पण खुद्द कोल्हापुरात, सांगलीत, सातार्‍यात, जयसिंगपुरात पुरेपूर कोल्हापूरपेक्षा प्रेफरेबल चवीचे असंख्य ऑप्शन्स उद्भवतात.

सेम विथ कामत.. त्याविषयी इतरेजनांचे काय मत आहे याचा अंदाज नाही, पण कामत रेस्टॉरंट्सची हायवेसाईड चेन ही निव्वळ "उपयुक्तता", "युनिफॉर्मिटी" इ इ आहे.. चवीच्या बाबतीत अगदीच उदास.

पुलंचा "पट्टीचा पानवाला" आणि "गादीचा पानवाला" असा फरक आठवतोय का कोणाला?

गवि Thu, 26/06/2014 - 16:50

In reply to by गवि

अगदी थेट यासदृश मत कदाचित तुमचे "दिल्ली चाट" किंवा "दिल्ली" अशा प्रीफिक्सने सुरु होऊन पुढे दिल्ली दा परांठा, दिल्ली रसोई, दिल्ली हाट इ इ अशा काहीतरी नावांनी खुद्द दिल्लीत आणि शाखास्वरुपात मुंबई, दुबई किंवा चेन्नईत चाललेल्या "स्वच्छ आणि स्टँडर्ड" हाटेलांविषयी असू शकेल.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 17:26

In reply to by गवि

वेल, मी मद्रास, बंगलोर इथे नि आंध्रात पाच-पंचेवीस जागी हॉटेलात प्रत्येकवेळी साउथ इंडियन खात असे. पण सरवणाला तोड नाही. पण बहुतेक मी डाय हार्ड सरवणा फॅन असावा. अगदी चेन्नईत मी सरवणातच जाऊन चरत असे. पण आपण म्हणताय ते बरोबर आहे. सरवणा कमी आंबट असते हा बहुतेक त्याचा उत्तर भारतीय गुण आहे. इतर जागी सांबार, रास्सम जागा खट्ट असते. आमच्या घरी (वडल्यांच्या शिवाय न्यूक्लिअर) सर्वांनाच आंबट अगदी वर्ज्य आहे म्हणून असेल.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 17:36

In reply to by अजो१२३

अर्रर्रर्र सरोणा कमी आंबट????? हरे राम...आता अपेक्षा कमी करून जायला पाहिजे बहुधा.

(खिन्न आंबटप्रेमी) बॅटमॅन.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 17:44

In reply to by बॅटमॅन

तशा आमच्या ब्राह्मण असण्यावर चिकार शंका उपस्थित करण्यात येतात. पैकी एक -आमचे वरण आंबट नाही हे चाखून "तुम्ही नक्की ब्राह्मण का? - असे विचारले गेल्याचे आठवते.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 17:49

In reply to by अजो१२३

आमच्याही घरचे वरण आंबट म्हणावे असे नसते. अंमळ सपकावरचे असते. पण यावरून कुणी ब्राह्मण्य काढले नाही. उत्तरेतला निकष वेगळा असेल बहुधा.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 18:34

In reply to by अजो१२३

माहिती नाही मग. आमचे ब्राह्मण्य या किंवा अन्य निकषावरून काढलेले नसल्याने माहिती नाही. हां, काही गांधारदेशीयांनी एकदा दाढीवरून अविंध ठरवले होते त्याची या निमित्ताने आठवण झाली.

मन Thu, 26/06/2014 - 17:49

In reply to by अजो१२३

अशाच शंका माझ्या शिक्षणावर व्यक्त होतात.
माझे लिखित आंग्ल जाल निरोप (इ मेल्स) पाहिले की "तू नक्की म्याट्रिक पास झाला आहेस का" अशी विचारणा होते.

अनामिक Thu, 26/06/2014 - 17:30

In reply to by ऋषिकेश

हेच म्हणतो.

सगळ्यात पहिले अटलांटात सरवणा भवन मधे खल्लेला उत्तपा भयंकर आवडला होता. पण त्यानंतर कित्येकवेळा तिथे जाऊनही निराशाच झाली. मागच्या वर्षी तिरूपतीला गेलो असता तिथे सरवणा मधे खाणे झाले. चव नक्कीच चांगली आहे, पण उत्कृष्ठं म्हणवत नाही!

इथे दिलेला इतिहास पहिल्यांदाच माहीत झाला.

'न'वी बाजू Thu, 26/06/2014 - 19:55

In reply to by अनामिक

सगळ्यात पहिले अटलांटात सरवणा भवन मधे खल्लेला उत्तपा भयंकर आवडला होता.

बंद झाले.

तेथे आता दुसरे कोणतेतरी (सौदिण्डियनच) रेष्टारण्ट आलेले आहे. (नाव विसरलो. बरे आहे. पण गर्दी त्या मानाने खूपच कमी असते.)

त्रिशंकू Thu, 26/06/2014 - 19:48

अमेरिकेतील मला आत्तापर्यन्त सगळयात आवडलेले सौधिंडिअन रेस्टॉरंट : उडिपी कॅफे पिट्सबर्गच्या देवळाजवळ असलेले.
http://www.udipicafepittsburgh.com/

सांबाराची चव अप्रतिम.

आदूबाळ Thu, 26/06/2014 - 20:23

गोष्ट भारीच आहे!

एका अल्पशा चुकीमुळे राजगोपालचे डागाळलेले चारित्र्य

ठरवून, आखून अनेक महिने/वर्षं चालवलेल्या सूडसत्राला "अल्पशी चूक" म्हणणे मनोरंजक आहे.

बाकी या कथेत डेनियलच्या पात्राच्या वागणुकीत सातत्य नाही. असं का बरं?

अरविंद कोल्हटकर Thu, 26/06/2014 - 20:39

हॉटेलचे सरवणा हे सर्वतोमुखी असलेले नाव सीस्रोणा आहे असे काही वर लिहिले आहे ते योग्य वाटत नाही.

माझ्या समजुतीनुसार 'सरवणा' हेच नाव 'शरवणभव' ह्या कार्तिकेयाच्या संस्कृत नावाचा अज्ञानजन्य अपभ्रंश आहे. 'शरवणभव' हे मालगाडीसारखे लांब नाव ज्यांना त्याचा अर्थ समजत नाही त्यांच्या तोंडी सहजच 'सरवणा' असे होते. शरवणभव हे दाक्षिणात्यांच्या प्रिय कार्तिकेय - षडानन - षण्मुगम (शंकराचा पुत्र) ह्या देवाचे विशेषण आहे. (शरजन्मा षडाननः - अमरकोष). हा तान्हा असता नदीकाठी लव्हाळ्यांच्या बनामध्ये कृत्तिकांना सापडला आणि त्यांनी त्याला वाढविले आणि म्हणून त्याला कार्तिकेय असे संबोधिले जाते. शर+वन+भव (शरांच्या-म्हणजेच लव्हाळ्यांच्या- वनात जन्मलेला) असे त्याचे विशेषण आहे. (व्याकरणाच्या नियमानुसार उच्चारसौकर्यासाठी 'वन'चे येथे 'वण' होते.)

ह्या नावाचा एक उल्लेख मला लगेच आठवतो. मेघदूताचे ४६ ते ४८ श्लोक असे आहेतः

तत्र स्कन्दं नियतवसतिं पुष्पमेघीकृतात्मा
पुष्पासारै: स्नपयतु भवान् व्योमगङ्गाजलार्द्रै: ।
रक्षाहेतोर्नवशशिभृता वासवीनां चमूना-
मत्यादित्यं हुतवहमुखे संभृतं तद्धि तेज:॥४६॥

ज्योतिर्लेखावलयि गलितं यस्य बर्हं भवानी
पुत्रप्रेम्णा कुवलयपदप्रापि कर्णे करोति ।
धौतापाङ्गं हरशशिरुचा पावकेस्तं मयूरं
पश्चादद्रिग्रहणगुरुभिर्गर्जितैर्नर्तयेथा:॥४७॥

आराध्यैनं शरवणभवं देवमुल्लङ्घिताध्वा
सिद्वद्वन्द्वैर्जलकणभयाद्वीणिभिर्मुक्तमार्ग: ।
व्यालम्बेथा: सुरभितनयालम्भजां मानयिष्यन्
स्त्रोतोमूर्त्या भुवि परिणतां रन्तिदेवस्य कीर्तिम् ॥४८॥

(सारांशरूपाने येथे आवश्यक तितका अर्थ) (हे मेघा) तेथे निवास करणार्‍या स्कंदाला अपल्या धारांनी स्नान घालून आणि त्या शरवणभव देवाची आराधना करून मार्गक्रमण करता होत्साता तू...)

गवि Thu, 26/06/2014 - 20:45

In reply to by अरविंद कोल्हटकर

सरवणा हे सर्वतोमुखी असलेले नाव सीस्रोणा आहे असे काही वर लिहिले आहे ते योग्य वाटत नाही.

----------

हे राम..

मन Fri, 27/06/2014 - 17:33

In reply to by अजो१२३

कार्तिक उत्तेरेत कडक्क , उग्र बम्हचर्य पाळतो.
दक्षिणेत त्याला दोन बायका आहेत.

त्याचे सोडून द्या...
सौथ मध्ये मकरध्वज हा सुद्धा....
असो.

बॅटमॅन Fri, 27/06/2014 - 17:56

In reply to by अरविंद कोल्हटकर

शरवणभव हे देवाचे मूळ नाव असेल तर "श्री सरवणाभवन" हेही देवाचेच नाव वाटते. तमिळमध्ये पुल्लिंगी प्रत्यय म्हणून शेवटचा -अन् लागतो, त्याच्याशी ते सुसंगतच आहे. शिवाय, नेटवर दिलेल्या சரவணபவன் या तमिळ स्पेलिंगवरून 'सरवणभवन' असा एकच शब्द दिसतो, सरवण-भवन असा स्प्लिट दिसत नाही. सबब अपभ्रंश झाला असेल तर तो फक्त श चा स होण्यापर्यंतच मर्यादित झालासे दिसते. मात्र शेवटच्या 'भवन' मुळे लोकांचा कल 'सरवणाचे भवन' असा अर्थ करण्याकडे झालेला दिसतो असे वाटते.

धर्मराजमुटके Thu, 26/06/2014 - 21:30

मी आतापर्यंत आपले जे लेख वाचले त्यात हा सर्वात रसाळ लेख आहे असे नमूद करतो.
एवढी चांगली लिखाणकला आणी विषय रंजक पद्धतीने हाताळण्याची हातोटी असतां आतापर्यंत ते लोकशिक्षणाचे रटाळ लेख का बरे लिहित होता ?
असो. तुम्हाला ह्या लेखाबद्दल आपल्यातर्फे तुम्ही म्हणाल तेथे पार्टी ! (सब्जेक्ट टु मुंबई, ठाणे ज्युरीसडीक्शन)
अर्थात तुम्ही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ह्याही वेळी प्रतिक्रिया देणार नाही म्हणजे पार्टीचा खर्च वाचलाच म्हणा ! :)

रमताराम Fri, 27/06/2014 - 17:51

राजगोपालच्या जागी चित्रपट अभिनेते असलेले दिवंगत मुख्यमंत्री आणि जीवनज्योतीच्या जागी अभिनेत्री राजकारणी स्त्री (कोण ते सांगायला नकोच, आप सब उनको जानते है) असा बदल करून अगदी डिट्टो हीच ष्टोरी मी ऐकली आहे. शांतकुमारच्या जागी एक सहकारी नट होता.

रमताराम Fri, 27/06/2014 - 22:33

हे काय सरवन, सरवना, सीस्राना वाद घालताहेत लोक. ते 'सर्वान्न भवन' आहे. येवडं शिंपळ समजना ये री ई ई ईऽ

- रु रा ओक aka र. रि. तर्कट aka आर. रंगेशराव

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/06/2014 - 22:12

गोष्ट रंजक आहे. शांतकुमार, जीवजोत्यींबद्दल वाईट वाटलं. आपल्या ओळखीचा, नात्यातला मनुष्य कितीही गुन्हेगार का असेना, लोकांना सहानुभूती का वाटत राहते ते अशा गोष्टींमधून समजायला लागतं.

मन Sat, 28/06/2014 - 09:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अब क्या कहे मौसी. वो और जुआरी ? ना ना ना.
वो तो बहुत ही नेक और अच्छा लडका है.
लेकिन एक बार शराब पी ली तो अच्छे बुरे का कहां खयाल रहता है.
.
.
.
मौसी :-
एक बात दाद दूंगी बेटा.भलेही सौ बुराइयां है तुम्हारे दोस्त में. फिर भी तुम्हारे मुंह से उसके लिये तारिफही निकलती है.

जय :-
अब क्या करु मौसी मेरा तो दिल ही कुछ ऐसा है

शशिकांत ओक Fri, 29/03/2019 - 21:15

Supreme Court gives life term to South Indian restaurant Saravana Bhavan proprietor P Rajagopal, for getting an employee murdered in 2001 so as to marry the victim's wife on an astrologer's advise.

५ वर्षा पुर्वीच्या धाग्यावर आज निकाल लागला. काय ते वर उपलब्ध आहे.
त्यातील ज्योतिषाच्या सल्लाचा संदर्भ आहे. म्हणून मला या सरवना भवनात घडलेल्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली.
यात वर्णन केलेले नाडी ग्रंथ वाचकांचा केस शी संबंध आहे का नाही हा सध्या विषय नाही.
सरवना माझ्या आवडीचे हॉटेल. खूप वर्षांपूर्वी कोवैला असताना अन्नपूर्णा कि सरवना अशी लता का आशाआवडते? अशा अनिर्णयात्मक चर्चा झडत.
सन १९९५. बहिणीसमावेत वडपलनी भागातील ॐ उलगनाथन यांच्या नाडी केंद्रात भेट द्यायला गेलो होतो. वेळ होता म्हणून जवळच्या सरवना भवनात बॉम्बे मील ऑर्डर केले. पण भाताचे ढीग नको चपाती पाहिजे म्हणून बरीच तणातणी झाली. बहिणीने मधे पडून थांबवले.
नंतर अदभूत पणे आम्हाला रीडींग मिळाले. त्यात इथे यायच्या आधी जेवणात हवातो पदार्थ मिळाला नाही म्हणून वादावादी झाली? खरे का? असे विचारून आधी जमलेल्या ८ - १० जणांना संभ्रमात टाकले गेले. आम्ही हो म्हणावेच लागले.
ते रीडींग नंतर ५ तास सतत चालू होते. त्यात धक्क्यावर धक्के
बसत होते. मी ॐउलगनाथना प्रथमच भेटत होतो. ते सर्व सविस्तर पुस्तकात लिहिले आहे म्हणून इथे ाआवरते घेतो.